आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

प्‍लॅस्टिकमुक्‍तीचा नारा

 स्‍वतंत्र भारताचा ७२वा प्रजासत्‍ताक दिन आज सर्वत्र माेठया उत्‍साहात साजरा होत आहे. प्रभात फेरी, ध्वजारोहन, वक्तृत्व व इतर क्रीडा स्पर्धांची रेलचेल, शाळा, महाविद्यालयांत पाहायला मिळेल तर आपल्या परीसरात अवतीभोवतीदेखील सर्वत्र सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची नांदी असणार आहे. मात्र प्रजासत्‍ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र प्लॅस्टिकच्या ध्वजांची दयनीय अवस्था बघितली तर आपल्या बेगडी राष्ट्रप्रेमाची किव येते. प्लास्टिक हा अविघटनशील घटक असल्यामुळे निसर्गात त्याचा निचरा होत नाही. यामुळे जमा झालेले प्लास्टिक रसायनाचे रूप धारण करते व ते मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. निसर्गदेखील त्याला पचवू शकत नसल्याने त्याचा अतिरिक्त भार पर्यावरणावर पडतो व त्याचे देखील संतुलन बिघडते. प्रजासत्‍ताक दिनाच्या दिवशी मोठ्या अभिमानाने मिरवणाऱ्या राष्ट्रध्वजाचा इतर वेळी मात्र आपण नको तितका अवमान करतो. खरेतर प्‍लॅस्टिकजन्‍य पदार्थांपासुन बनवलेल्‍या राष्ट्रध्वजावर बंदी असतानादेखील असे ध्वज सर्रास रेल्वे स्टेशन, बाजार, बस थांबे, रस्त्यारस्त्यांवर कसे उपलब्ध होतात हा प्रश्न पडतो, त्यामुळे असे राष्ट्रध्वज खरेदी न करण्याची जबाबदारी भारतीय नागरिकांचीच आहे. कापडी किंवा कागदी राष्ट्रध्वजच वापरावेत, त्यांची योग्य प्रकारे हाताळणी करावी व वापर झाल्यावर उचित मार्गाने विघटन करावे अथवा जपून ठेवावेत. प्लास्टिक राष्ट्रध्वज न वापरता राष्ट्रसन्मानाला तसेच पर्यावरण संतुलनाला हातभार लावणे हि प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. तसेच प्‍लॅस्टिकमुळे होणारे दुष्‍परिणाम पाहता आपण आपल्‍या दैनंदिन जिवनातुन  हददपार केले पाहिजे. प्‍लॅस्‍टीकबंदीचा कायदा सरकारने काढलेला असतानादेखील मोठया प्रमाणावर प्‍लॅस्‍टीक बाजारात सर्रास विकले जात आहे. कायदा अंमलबजावणीच्‍या सुरुवातीच्‍या काळात तिव्र करण्‍यात आलेली मोहिम सध्‍या थंड झाल्‍याचा हा परिणाम आहे. त्‍यामुळे प्‍लॅस्टिकच्‍या पिशव्‍या, सामान, खेळणी, वस्‍तू विकत न घेता पर्यावरणाला हातभार लावण्‍याचा संकल्‍प प्रत्‍येकाने करायला  हवा. या प्रजासत्‍ताक दिनी आपण सर्व 'प्लॅस्टिकमुक्त भारत' हि संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करू या. जय हिंद ।।


-वैभव मोहन पाटील
घणसोली,नवी मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...