आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्यात कार्यरत !!

स्वतः उच्चशिक्षित होंऊन त्या शिक्षणाचा- कामाच्या अनुभवाचा  उपयोग समाजातील  विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्यासाठी कसे उपयुक्त ठरेल याचा ध्यास सौ माधवी पाटील यांनी घेतलेला आहे . सौ . पाटील यांचे MA B. Ed(फर्स्ट क्लास ),DSM Course (फर्स्ट क्लास ) तसेच ITI मधून ड्रेस मेकिंग कोर्स उत्तीर्ण असे उच्चशिक्षण झाले  असून   त्या गुहागर- जिल्हा रत्नागिरी मध्ये राहतात .महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा जळगाव (MTS ) यांचे केंद्राध्यक्ष म्हणून गुहागर मध्ये चांगले काम करताना  अनेक उमेदवारांना स्पर्धा परीक्षेच्या प्रवाहात आणले आहे. तसेच ज्ञानदीप करिअर अकॅडमी तर्फे सुट्टीच्या कालावधीत त्यांनी mpsc , तलाठी पदाच्या  स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना  मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे. साक्षरता अभियान , शिक्षण सार्वत्रिकरण यासह त्यांनी TPO अंतर्गत शिक्षक ऑलंम्पियाड स्पर्धा परीक्षा आणि इतर अनेक    स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे. स्पर्धपरिक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यास सदैव कार्यरत असणाऱ्या नवदुर्गा सौ माधवी पाटील यांचे  आदर्श वार्ताहर टीमकडून मनपूर्वक अभिनंदन आणि भविष्यातील कार्यासाठी सदिच्छा !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...