आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

महात्मा गांधीजींचे शैक्षणिक योगदान

            शिकविले जनतेस स्वावलंबन
            देऊनि स्वातंत्र्यलढ्याचा मंत्र
            दिली प्रेरणा शिक्षणासाठीच  
            सांगुन व्यवसायिक शिक्षणतंत्र


                             भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांचे योगदान खूप मोलाचे अन्  महत्त्वपूर्ण आहे.१८२० सालानंतर भारतीय लढ्याचे नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे आले. त्यांनी असहकार अहिंसा आणि सत्याग्रहाच्या शस्त्राने राजकीय क्षेत्रात आपला चांगलाच ठसा उमटवला. ते स्वातंत्र्ययोद्धा तर होतेच परंतु समाजसुधारक, शिक्षणतज्ञ, राजकीय विचारवंत, अस्पृश्य जणांचे उद्धारक, अर्थतज्ञ आणि कनवाळू राजकारणी होते. ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी दिलेला मानवी लढा हा भारतीय समाजाच्या बदलाला कारणीभूत ठरला. जर स्वातंत्र्याच्या लढ्यात महात्मा गांधीजींचा सहभाग नसता तर देशभक्त हत्यार घेऊन अहिंसात्मक लढ्यासाठी सज्ज होते. सशस्त्र क्रांती होऊन अनेक वीरांनी आपल्या प्राणास मुकावे लागले असते.
                  टॉल्स्टॉयसारख्या तत्ववेत्त्या वर त्यांच्या शैलीचा चांगलाच प्रभाव होता. गांधीजींचे धार्मिक, शैक्षणिक विचार प्रेरणादायी ठरतात. महात्मा गांधीजींची शिक्षण पद्धती मुलोद्योगी , बुनियादी व जीवनशिक्षण या नावाने ओळखली जाते. गांधीजींनी समाज शिक्षण,प्रौढशिक्षण, स्त्री व हरिजन शिक्षण, विद्यापीठ शिक्षण या घटकांत महत्त्वपूर्ण कार्य केलेले दिसते. शिक्षण हे समाज बदलाचे मूलभूत माध्यम आहे. सामाजिक जीवनाला निश्चित ध्येय ठरविणे आणि नवी दिशा देण्याचे कार्य केवळ शिक्षणानेच शक्य होते हे विचार गांधीजींनी मांडलेले दिसतात. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी समर्पित केलेच पण राजकीय-सामाजिक क्षेत्रात कार्य करत असतानाही "स्वदेशीचा स्वीकार" हा नारा त्यांनी भारतीयांना दिला. त्यासाठी चरख्यावर सूतकताई करून कापड विणायला सुरुवात केली. स्वतः स्वदेशी कपडे वापरायला सुरुवात केली. स्वदेशीचा प्रसार करत असताना त्यांच्या लक्षात आले की शिक्षण क्षेत्रात सुद्धा स्वावलंबन गरजेचे आहे म्हणून "बेसिक एज्युकेशन" या नावाने त्यांनी आपली व्यवसायिक शिक्षण प्रणाली प्रसारित केली.
         शहरात राहून उच्च शिक्षण घेणे खेड्यातील जनतेला अशक्य होते.वैज्ञानिक अभियंता, तांत्रिक तज्ञ आणि परिवर्तनाच्या इतर घटकांनी एकत्र प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे लक्षात आल्यावर ग्रामीण भागाच्या सध्याच्या गरजा पाहता आणि ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्यक्रम पाहता असे दिसते की आज ग्रामीण भागात सामाजिक सक्रियता कार्यक्रम आणि सामाजिक नेतृत्व आणि संस्थापक क्षमता बळकट करण्याची खूप गरज आहे. यासह ग्रामीण जनतेला विविध कौशल्ये विकसित करण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील. होत असलेल्या बदलांच्या संदर्भात लोकांना योग्य दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करावे लागतील.हे सर्व करत असताना असे लक्षात ठेवणे देखील आवश्यक आहे की परिवर्तनाच्या या टप्प्यात ग्रामीण भागाचे काही चांगले आहे ते सर्व नष्ट होत नाही. बदलाची सद्य प्रक्रिया अत्यंत जटील आहे. ग्रामीण विकासाचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे योग्य शिक्षण, व्यवसाय कौशल्य किंवा विशेष काम संबंधित कौशल्य आवश्यक आहेत. रोजगार मिळवून तो टिकवणे आणि त्याच बाबतीत शिक्षणाची उपलब्धता देखील महत्त्वाचे आहे. कारण ग्रामीण भागातील तरुणांसाठी ते फार कठीण आणि महागडे आहे. या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ग्रामीण उच्च शिक्षणाची पातळी वाढवण्याची गरज आहे. याव्यतिरिक्त ग्रामीण तरुणांना अशा प्रकारे तयार करणे आवश्यक आहे की त्या बहुस्तरीय बदलांशी जुळवून घेतील आणि विकास कार्यक्रमात तेही भाग घेतील.
             वर्तमान शिक्षण पद्धतीत ही गांधीजींच्या मूल्य विचारांची बीजे रुजलेली आहेत. त्यांच्या मते शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञान नसून शिक्षणामुळे बुद्धी, शरीर, हृदय या तिन्हींचा समतोल विकास साधता आला पाहिजे. त्यांच्या मते शिक्षणामुळे रोजची भाकरी मिळवून देण्याची ताकद येते. तसेच समता, सहिष्णुता, सहकार्याची भावना निर्माण व्हावी हे फक्त अर्थार्जनासाठी असे उद्दिष्ट अंगी बाणवले जाते. गांधीजींच्या मते शिक्षकांचा केवळ ज्ञानदान करणे हा हेतू  नसावा तर विद्यार्थ्यांपर्यंत सत्य, सहिष्णुता, सहानुभूती निर्माण करण्याचे कार्य असावे. स्त्रीशिक्षणाच्या प्रभावी योजना आखल्या पाहिजेत. भारतातील स्त्री ही रूढी आणि अन्यायामुळे निरक्षर राहिली असून त्यासाठी पुरुष प्रधान संस्कृती आणि आळस या गोष्टी कारणीभूत आहेत. कुटुंब साक्षर नि संस्कारित होण्यासाठी स्त्री साक्षर असणे महत्त्वाचे आहे. गांधीजींनी वर्धा शिक्षण योजनेत बरेच मुद्दे उपस्थित केलेले पहावयास मिळतात.७ ते १४ वर्षांचे शिक्षण सक्तीचे, मोफत असावे. शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले जावे. शिक्षण कोणत्या तरी उत्पादन उद्योगाच्याद्वारे दिले जावे. उद्योगातून शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सुटावा. त्यामुळे ते मानसशास्त्रीय तत्त्वांशी सुसंगत वाटते. यावरून एवढेच लक्षात येते की महात्मा गांधीजींची शिक्षण विषय प्रणाली व्यवसायभिमुख असावी. शिक्षणाबद्दल त्यांचे विचार बहुजनकेंद्री असून समाजोपयोगी असावे. फक्त पाठ्य पुस्तक वाचणे म्हणजे शिक्षण असून शरीर, बुद्धी, आरोग्य यांची वृद्धी म्हणजे शिक्षण. त्यातून स्वावलंबन, सज्ञान, सतेज बनण्यासोबतच विद्यार्थी सक्षम व्हावा, विद्यार्थ्यांचे हित जोपासणारे शिक्षण हेच खरे शिक्षण होय.
       
          ठेवुनी पदकमलावर पाऊल
          थोर नेत्यांचा राखुनी प्रभाव
          जाज्वल्य राष्ट्रनिष्ठेची जाण
          नसावा राष्ट्रभक्तीचा अभाव


-सौ भारती सावंत,मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...