आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २७ जुलै, २०२०

जय जवान परिवाराचा संकल्प : प्लॅस्टिकमुक्त मुंबई करण्याचा निर्धार

मुंबई / वार्ताहर : 

   गेले चार महिने कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना करत अविरतपणे अनेक सामाजिक उपक्रम राबविणारे सर्वच गोविंदा पथक यंदा दहीहंडीच्या थरारापासून वंचित राहिले आहेत. अशा वेळी जय जवान गोविंदा पथकाचे  सर्व खेळाडूही सर्वांप्रमाणे यंदा दहीहंडीचा जल्लोष नसल्यामुळे नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर जय जवान परिवाराने चालू वर्षी दहीहंडीचा उत्सव जरी नसला तरी एक नवीन संकल्प केला आहे. तो म्हणजे प्लॅस्टिकमुक्त मुंबईचा आणि स्वच्छ पर्यावरणाचा.  साहजिकच इतका मोठा संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी  त्यांना  मुंबई उपनगरातील सर्व गोविंदा पथकांची साथ अपेक्षित आहे.
       ह्या संकल्पाच्या अनुषंगाने Bottle For Change ह्या सामाजिक उपक्रमांतर्गत प्लास्टिक संकलन आणि प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याची योजना ते  करत आहोत.सर्वांना प्लस्टिकचे दुष्परिणाम माहीत आहेतच.  या उपक्रमात मोठ्या प्रमाणात  आपल्या विभागातून निरुपयोगी प्लास्टिक जमा करणार आहोत. प्रचंड प्रमाणात जमा केलेले प्लास्टिक Recycle करून त्याचा एका सामाजीक संस्थेच्या माध्यमातून पुनर्वापर करणार आहोत. ह्या संकल्पनेने प्लॅस्टिकमुळे होणारे दुष्परिणाम रोखता येतील आणि त्याचबरोबर प्लास्टिकच्या पुनर्वापर करून मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा जय  जवान परिवाराचा मानस आहे.  त्यासाठी  सर्वांचा  हातभार आवश्यक असल्याचे  जय जवान गोविंदा पथकाचे  प्रशिक्षक- संदीप ढवळे यांनी म्हटले आहे . 
      अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक :

      8286668111
      9833366008
      9004489734
      9969197917

                         
                   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...