आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १ जुलै, २०२०

वेबसिरीजला सेन्सॉरशिप हवी

सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. या डिजिटल युगात सध्या वेबसिरीजची रेलचेल आहे.देशभर  लॉक डाऊन असल्याने चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणाला बंदी आहे. नवीन मालिका व चित्रपट प्रदर्शित होत नसल्याने प्रेक्षकही वेबसिरीजकडे वळले आहेत. दर आठवड्याला नवीन वेबसिरीज प्रदर्शित होत आहे. अमेझॉन, नेटफ्लिक्स यासारख्या विदेशी कंपन्या या वेबसिरीजना प्रायोजित करीत आहे.  प्रेक्षकही घरबसल्या मनोरंजन होत असल्याने त्यांना पसंती देत आहे. यामुळेच अनेक बडे निर्माते दिग्दर्शक या वेबसिरीजची निर्मिती करीत आहे.  वेबसिरीज प्रदर्शित करण्यासाठी कोणत्याही सेन्सॉरची आवश्यकता नसते त्यामुळेच या वेबसिरीजवर अश्लीलता आणि हिंसेचा भडिमार असतो. कोणतेही बंधन नसल्याने हे वेबसिरीज म्हणजे अश्लीलतेचा अड्डा बनत चालले  आहेत. या बेबीसीरिेजमधील कथानक देखील अनेकांच्या भावना दुखावणारे असतात. एकता कपूर दिग्दर्शित  ट्रिपल एक्स ( xxx ) नावाची एक वेबसिरीज नुकतीच प्रदर्शित झाली. त्यातील कथानकात  सीमेवरील जवानांचा अपमान करण्यात आला आहे. जे जवान देशासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देतात त्यांच्या कुटुंबाची बदनामी होईल अशी दृश्ये या वेबसिरीजमध्ये आहेत. स्वरा भास्कर अभिनित एक वेबसिरीजची जाहिरात नुकतीच पाहिली त्यात शिक्षिका असलेली अभिनेत्री आपल्याच विद्यार्थ्यांपुढे अंगप्रदर्शन करून त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढते असे दाखवले आहे. ही वेबसिरीज म्हणजे आपल्या महान गुरू शिष्य परंपरेचा अपमान आहे. निर्माते,  दिग्दर्शक असे दाखवतात कारण त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. जर सरकारने चित्रपट, मालिकांप्रमाणेच वेबसिरीजवर देखील सेन्सॉरशिप लागू करावी. जर वेबसिरीजला सेन्सॉर केले तरच त्यातील अश्लीलता, हिंसा कमी होईल. सरकारने वेबसिरीजला सेन्सॉरशिप लागू करण्यासाठी कायदा करावा. 

-श्याम बसप्पा ठाणेदार
 दौंड जिल्हा पुणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...