1)निधी ..
आपदाग्रस्तां करिता
जमवू लागले निधी
कोणता कोष सच्चा
नवीन लागली व्याधी
तपासून पहावे नीट
निधी पाठवण्याआधी
करूनि घेतात चांदी
अट्टल चोर अपराधी
दानशूर आहांत जरी
पारखून घ्यावी यादी
संधीसाधू जागोजागी
उगाचं लावती नादी
कुणाचा कोष उत्तम
रंगू लागली वादा वादी
समस्या पडे एकीकडे
चाले तिकडे गुद्दा गद्दी
- हेमंत मुसरीफ पुणे
-----------------------------
2)ऊस तोड...
मजूर मी आलो दूर
करायला ऊस तोड
पोट असे हातावरी
मेहनतीले नसे तोड
कोरोना आला द्वाड
बंद झालं गाडीघोडं
पहारे ही सक्त सारे
कसे जावे गावाकडं
लाचारीची सवय ना
मागताना वाटे जड
मदतीला धाऊनिया
आलेलोक धडाधड
जपती असे आम्हां
तळ हातावर फोड
ओळखीचे ना कुणी
मानवता हीचं ओढं
ऊसापरीस म-हाठी
माणूसचं अति गोड
निघताना गावाकडं
पाय होई आता जड
- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996
आपदाग्रस्तां करिता
जमवू लागले निधी
कोणता कोष सच्चा
नवीन लागली व्याधी
तपासून पहावे नीट
निधी पाठवण्याआधी
करूनि घेतात चांदी
अट्टल चोर अपराधी
दानशूर आहांत जरी
पारखून घ्यावी यादी
संधीसाधू जागोजागी
उगाचं लावती नादी
कुणाचा कोष उत्तम
रंगू लागली वादा वादी
समस्या पडे एकीकडे
चाले तिकडे गुद्दा गद्दी
- हेमंत मुसरीफ पुणे
-----------------------------
2)ऊस तोड...
मजूर मी आलो दूर
करायला ऊस तोड
पोट असे हातावरी
मेहनतीले नसे तोड
कोरोना आला द्वाड
बंद झालं गाडीघोडं
पहारे ही सक्त सारे
कसे जावे गावाकडं
लाचारीची सवय ना
मागताना वाटे जड
मदतीला धाऊनिया
आलेलोक धडाधड
जपती असे आम्हां
तळ हातावर फोड
ओळखीचे ना कुणी
मानवता हीचं ओढं
ऊसापरीस म-हाठी
माणूसचं अति गोड
निघताना गावाकडं
पाय होई आता जड
- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा