आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १२ मे, २०२६

तांबडीकोंड प्रीमियर लीग 2026 बॉक्स क्रिकेट स्पर्धा संपन्न

दापोली (प्रतिनिधी): दापोली नवानगर (तांबडीकोंड)- युवा प्रतिष्ठान नवानगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली “तांबडीकोंड प्रीमियर लीग (TPL) 2026” ही बॉक्स क्रिकेट स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली.
        कै.अविराज (बंटी) महाडीक आणि शहीद कॅप्टन नितीन प्रकाश चव्हाण यांच्या स्मरणार्थ आयोजित या स्पर्धेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.श्री हरिश्चंद्र बाळाजी महाडीक यांनी शिवप्रतिमेस पुष्पहार घालून या क्रीडा सोहळ्याची सुरुवात केली. स्पर्धेचे उद्घाटन माजी सैनिक श्री. प्रकाश परशुराम चव्हाण आणि श्री. विजय सुंदरराव महाडीक यांच्या शुभहस्ते झाले.स्पर्धेदरम्यान गावात क्रिकेटमय वातावरण निर्माण झाले आणि सर्वांच्या एकोप्याचे दर्शन घडले.
       या स्पर्धेच्या यशामागे युवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत मोलाची ठरली.श्री.व सौ. रोहिणी प्रकाश चव्हाण,श्री.व सौ. अपर्णा जनार्दन माने,श्री.व सौ. प्रिती कविराज महाडीक, श्री.व सौ.संजना सचिन घाडगे यांनी स्पर्धेसाठी देणगी स्वरुपात मोलाची मदत केली.सर्व देणगीदारांनी दिलेली आर्थिक व साहित्यिक मदत ग्रामस्थांचे सहकार्य आणि उपस्थिती तसेच खेळाडूंचा उत्साह यामुळे स्पर्धा भव्य आणि संस्मरणीय ठरली.
         स्पर्धेत एकूण ६ संघ सहभागी झाले होते.अंतिम सामन्यात तांबडीकोंड रॉयल्स संघांनं तांबडीकोंडचे शिलेदार या संघाचा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून रुद्र महाडीक,सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून आशिष महाडीक, सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून साहिल महाडीक तर सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून राहुल राणे यांची निवड करण्यात आली.
         यंदा प्रथमच महिलांसाठीहि या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सर्व वयोगटातील महिलांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या उपक्रमातून महिलांमध्ये आत्मविश्वास टीम स्पिरिट आणि सशक्तीकरणाची भावना दृढ झाल्याचे या स्पर्धेच्या प्रायोजक प्रिती कविराज महाडीक यांनी सांगितले.
           स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.सर्वांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.भविष्यातही अशाच प्रकारच्या उपक्रमांद्वारे गावातील एकता आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होण्यासाठी प्रयत्न करू असे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोशन मोरे यांनी सांगितले. सचिव सर्वेश महाडीक यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पत्रकारितेतील तळागाळातील शब्दांना सलाम ; ‘पत्रकार व संपादक सन्मान सोहळा 2026’ चे आयोजन

मुंबई: समाजातील प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आणि कोणत्याही परिस्थितीत सत्य मांडणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘आर्यारवी एंटरटेनम...