कल्याण (प्रतिनिधी): रविवार दि.१४ डिसेंबर २०२५ रोजी खिडकाळीमध्ये गांवदेवी मंदिराजवळील 'TALENT CLASS' चे प्रो.राजन पाटील आणि सौ.प्रा.किर्ती पाटील यांच्या संकल्पनेतून इयत्ता ५ वी.ते १२ वी.च्या विद्यार्थ्यांनी एक 'FUN FAIR' साकारले होते. सदर कार्यक्रम म्हणजे एक उत्सवच.! यात खाद्यपदार्थ व गेम असे एकुण २१ स्टॉल मांडले होते. साधारणतः५० -६० विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता. 'FUN FAIR' उत्सवात विद्यार्थ्यांनी पाणी पूरी, शेव पूरी, सोया चिल्ली, पास्ता, पानी बोटल, कोल्ड्रींग, पेस्ट्रीक, पेरी-पेरी चिप्स, नुडल्स, मंच्युरियन भेळ, मोमोज, उकडीचे मोदक, फ्रेंड फ्राईज, स्माइलीज, कोल्ड कॉफी, चॉकलेट मिल्क सेक, मोजीटो, पाव भाजी, पनीर पकोडे, कप केक, ब्रेड रोळ, चना भेल, पॕटीस इ. खाद्यपदार्थ व खेळांचेही स्टाॕल मांडले होते. हे बनवण्यात विद्यार्थ्यांचाच सहभाग होता.
'TALENT CLASS' खऱ्याअर्थाने विद्यार्थ्यांसाठी 'लकी-स्पोट' आहे. कारण तेथे विद्यार्थ्यांची जडण-घडण होते. SSC च्या विद्यार्थ्यांकडून चांगली तयारी करवून घेतली जाते. परिणामी १००% निकाल लागलो. ९-१० वर्षापासून खिडकाळी गावात 'TALENT CLASS' मधील विद्यार्थ्यांच्या बुध्दित शिक्षणासोबत व्यावसायिक ज्ञानाची भर पडावी म्हणून प्रो.राजन पाटील यांनी केलेला 'FUN FAIR' हा अनोखा प्रयोगच म्हणावा लागेल. या 'FUN FAIR' उत्सवाचा आनंद घेण्यासाठी खिडकाळी गावातील ग्रामस्थांनीही भेटी दिल्या. तसेच खिडकाळी गावातील 'सांस्कृतिक कार्यक्रम' व 'सामाजिक बांधिलकी' जपणाऱ्या 'ईको-फ्रेंडली गृप' मधील कवी-श्री.नवनाथ ठाकुर, श्री.रूपेश पाटील, श्री.अनिल म्हात्रे, श्री.धनेश ठाकुर, श्री.दिगंबर पाटील यांनीही सदर उत्सवास सदिच्छा भेट दिली व सर्व स्टाॕलवर जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांचे मनभरून कौतुक केले तसेच विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद ही घेतला व 'TALENT CLASS' चे प्रो. राजन पाटील व प्रा.किर्ती पाटील यांस शुभेच्छा देऊन दोघांचे अभिनंदन केले.
'FUN FAIR' हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक आवड निर्माण व्हावी आणि भविष्यात आर्थिक नियोजन करावे तसेच स्वावलंबी जीवनाचे प्रशिक्षण मिळावे.हा मुख्य हेतू प्रो.राजन पाटील यांनी केलेला क्रांतिकारी प्रयत्न आहे.असे कवी नवनाथ ठाकुर यांनी आपले मत मांडले व प्रो.राजन पाटील आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा