आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

अनेक तक्रारी करून अखेर ठाणे येथील स्पिड ब्रेकरची दुरूस्ती!

मुंबई (सतिश पाटील):गेल्या अनेक दिवसापासून ठाणे तिनहात नाका ते कशिश पार्क मुंबई मुलुंड पच्छिम चेक नाका कडे जाणारा हायवे व आग्रारोड जोड रस्त्यावर असलेले पेवर ब्लॉकचे स्पिड ब्रेकर खूप खराब व चुकीचे होते.तसेच ते अपघाताला निमंत्रण देणारे व वाहनासही धोकादायक स्थितीत होते. नेहमीच विनाकारण वाहतुक खोळंबा व पाणी साचत होते तसेच प्रदृषण होत असे.कारण स्पिड ब्रेकर वर खाली व खड्डेमय झालेले होते. साहजिकच वाहने दिम्यागतीने जात असत.या समस्ये बद्दल सामाजिक कार्यकर्ते व  पत्रकार सतिश पाटील यांनी हा मुद्दा मार्गी लावून धरला होता. अखेर ठाणे महानगर पालिकेने उशीरा का होईना दखल घेऊन आता जुने धोकादायक स्पिडब्रेकर काढून त्या ठिकाणी नवीन डांबरी स्पिडब्रेकर बसवून वाहन चालकांना व जनतेला जनतेला दिलासा दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

डॉ सुरेश पाटील यांना कोकणरत्न पुरस्कार प्रदान

मुंबई - भांडुप येथील शिक्षक , पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ सुरेश भिवाजी पाटील यांना मुंबई मराठी पत्रकार भवन येथे...