आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २७ नोव्हेंबर, २०२३

भारतीय लोकसत्ताक संघटना तर्फे शिक्षण हक्क चळवळ जनमोर्चा

मुंबई - भारतीय लोकसत्ताक संघटना आणि शिक्षण हक्क चळवळ यांच्या वतीने शिक्षणाच्या मुलभूत अधिकाराच्या अंमलबजावणी व शैक्षणिक धोरणा विषयी दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी आझाद मैदान येथे सकाळी ११.०० वाजता जनमोर्चा आयोजित करण्यात आला. सदर जनमोर्चास विद्यार्थी व पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर जनमोर्चात विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटना, सामाजिक संघटना मोठया प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. 

    भारतीय संविधानात शिक्षणाचा मूलभूत अधिकार असताना देखिल त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे भारतीय लोकसत्ताक संघटना आणि शिक्षण हक्क चळवळ यांच्या वतीने सदर जनमोर्चात शासन व प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. भारतीय लोकसत्ताक संघटनेचे अध्यक्ष मा. अमोलकुमार बोधिराज सर यांनी संघटनेच्या वतीने आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करीत शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रभर शिक्षण हक्क यात्रा चालवण्यात येईल असे घोषित केले. शिक्षण हक्क चळवळ वतीने आयोजीत जनमोर्चात महाराष्ट्र कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, कुणबी समाज उन्नती संघ सलग्न कुणबी युवा संघ फेस ऑफ आंबेडकरराईट मुव्हमुमेंट, आंबेडकरी क्रांती दल, युवक क्रांती संघ, त्रिरतन संघ, २२ प्रतिज्ञा अभियान, आदी संघटना, युवा संघर्ष संस्था, इंडियन सोशियल मुव्हमेट आंबेकरराईट वरळी, सिद्ध आर्ट आदी संघटना संस्था सहभागी झाल्या होत्या. तसेच ,शिक्षण हक्क चळवळ, या गाण्याचे गीतकार संगीतकार मा. प्रितेश मांजलकर यांची विशेष उपस्थिती होती.सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी मा. अमोलकुमार बोधिराज, मा. दिपीका आग्रे, मा. सनी कांबळे, मा. किरण गमरे, मा. वैशाली कदम, मा.दिनेश जाधव,मा.वैभव मोहिते,मा. कमलेश मोहिते, मा. किशोर येडे,मा. गुणवंत कांबळे, मा. रुपाली खळे, मा.सूर्यकांत खरात, मा.योगेश कांबळे, मा.श्रेयस जाधव, मा. पिलाजी कांबळे, मा. मयुरेश जंगम, मा. वैभव मोहिते, मा. मनीष जाधव, मा.अंकिता मोरे, मा.सुप्रिया मोहिते, मा.सुषमा सावंत, मा.अभिषेक कासे, मा.प्रेमसागर बागडे, मा.संदीप आग्रे,मा.प्रशांत माळी, मा.सुहास येडे,मा.मनिष कदम, मा.मदन खळे आदी.पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रथम पुण्यस्मरण : कै.विष्णू शंकर पाटील

दोन ओळी बाबासाठी .... बाबा आमचे आधार स्तंभ हरवले .आज राहून राहून डोळ्यात पाणी येते .कोणालाही दुखवले नाहीत. नेहमीच हसत मुख जीवन जगलात ! नेहमी...