नवी मुंबई(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्था आणि गिरीजा फाउंडेशन च्या विशेष सहकार्याने अमरदिप बालविकास फाउंडेशन आयोजित २६/११ च्या आतंकवादी हल्ल्यात वीर सुपुत्रांना समर्पित , वंचित व तळागाळातील बालक आणि जेष्ठ नागरिकांसोबत आपुलकी चा दीपोत्सव रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी नेरे येथे संपन्न झाला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा "कलाविष्कार उडान २०२३" सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन एन.डी.खान व सुनंदा गणेश सपलिंग यांनी केले होते. तसेच कार्यक्रमाची 'संकल्पना व नियोजन' एन.डी.खान यांचे होते.
यावेळी दीपक कदम यांनी घेतलेला गाण्याचा तास सुरेख रंगला.यावेळी छोट्या छोट्या मुलांनी देखील झकास नृत्य सादर केले. निवृत्त पोलीस सहआयुक्त एकनाथ खोलम यांनी २६/११ चा "चित्तथरारक प्रसंग वर्णन" करून एक सुमधुर गाणी गायले. ऍड सुरेखा भुजबळ, विजय मोरे, सुखदा ठाकूर, महेक शेख, संध्या भुजबळ ,अंजली संत, अरविंद शिंदे आणि अनंत मुळे यांच्या गाण्याला टाळ्या आणि प्रतिसाद मिळाला. अनेक गायकांनी सादर केलेल्या देशभक्ती पर गाण्यांनी अंगात वीर रस संचारला.विजय मोरे यांनी संविधान वाचन केले.संजीवन म्हात्रे यांनी मोबाईल या विषयावर प्रबोधन करून सर्वाना पोट धरून हसवले.डॉ स्वरांजली गायकवाड यांनी Spritual Tapping and clapping tharapy सर्वांकडून करून घेतली. तसेच साहीत्यिक व कवी विलास देवळेकर यांनी थम्युझिकल इको साऊंड सिस्टिम हास्य कविता सादर केली.यावेळी चित्रकला स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या आश्रमातील बालकांना सन्मानित करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा