बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३
सह्याद्री कुणबी संघ,पुणे शहर ( महाराष्ट्र प्रांत ) तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
मुंबई -(दिपक कारकर )सामाजिक बांधिलकी व सदैव नाविन्यपूर्ण उपक्रम राबवुन समाजात आगळीक ओळख निर्माण करत, अनेक पुरस्कारांनी सन्मानित असणाऱ्या उपरोक्त संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी सामाजिक बांधिलकीची वात्सल्यता जपत दिव्य प्रगल्भता जपण्याची भावना मनी रुजवत,समाजाची जाणीव ओळखून आपलं नेतृत्व दान करणारा उपक्रम म्हणजे "रक्तदान"होय."करुनी दान रक्ताचे...ऋण फेडू समाजाचे" ह्या पंक्तीप्रमाणे भव्य रक्तदान शिबीर याग - २०२३,रविवार दि.०३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक १० ते दुपारी ०३.वाजेपर्यंत सह्याद्री कुणबी संघ पुणे बहुउद्देशीय हॉल,शास्त्रीनगर,विसावा स्मशान भूमी जवळ,कोथरूड, पुणे - ४११०३८ येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व रक्तदात्यांनी या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे. असे आवाहन सहयाद्री कुणबी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.ह्या उपक्रमाला ओम ब्लड बँक, पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.अधिक माहितीसाठी राज भागणे - ८९८३४७५९८९ यांच्याशी संपर्क साधावा. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व विभागीय शाखेचे कार्यकारिणी पदाधिकारी,सदस्य व महिला आघाडी परिश्रम घेत आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रथम पुण्यस्मरण : कै.विष्णू शंकर पाटील
दोन ओळी बाबासाठी .... बाबा आमचे आधार स्तंभ हरवले .आज राहून राहून डोळ्यात पाणी येते .कोणालाही दुखवले नाहीत. नेहमीच हसत मुख जीवन जगलात ! नेहमी...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा