आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

रा. स्व. संघ जनकल्याण समिती (परळ विभाग) माता बाल आरोग्य आहार प्रकल्प अंतर्गत आरोग्य तपासणी साठी मोबाईल आरोग्य तपासणी व्हॅन चा प्रकल्प...!


परेल (महेश्वर तेटांबे)-
रा. स्व. संघ जनकल्याण समिती (परळ विभाग) माता बाल आरोग्य आहार प्रकल्प अंतर्गत ०० ते ०६ वय वर्षे असलेली मुले व त्यांच्या माता, यांच्या आरोग्य तपासणी साठी मोबाईल आरोग्य तपासणी व्हॅन चा शुभारंभ २६ जानेवारी २०२२ पासून करण्यात आला.

या वेळी गिरगाव भाग मधून बाणगंगा वस्ती व कामाठीपुरा वस्ती; परळ भाग मधून सीतासदन वस्ती, श्री दत्त कृपा वस्ती, त्रिवेणी सदन नंबर १ आणि योगेश्वर सोसायटी; दादर भाग मध्ये सिद्धिविनायक येथे ठाकूर वाडी आणि गीता नगर; माटुंगा मध्ये वडाळा विजय नगर या वस्त्यांमध्ये एकूण ९ ठिकाणी कायम स्वरुपी हा प्रकल्प सुरू केलेला आहे. प्रत्येक महिन्यालातून एक दिवस ही आरोग्य तपासणी व्हॅन वरील प्रत्येक वस्ती मध्ये आरोग्य तपासणी साठी जाणार आहे असे परळ विभागाचे प्रमुख कार्यवाह प्रताप परब यांनी सांगितले आहे.


सामाजिक जाणीवेतून व्हीलचेअर लोकार्पण


भांडुप (सुरेश पाटील)-  मातोश्री मित्र मंडळ, राम नगर या मंडळास, राम नगर विभागातील रहिवाशांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा म्हणून एक व्हीलचेअर देण्यात आली.

सामाजिक कार्यकर्त सौ शितल अजय भुवड यांच्या विशेष प्रयत्नाने नसीमा नेरली ताई यांच्या योगदानातून ही व्हीलचेअर मातोश्री मित्र मंडळास  देण्यात आली. सोबत त्यांना रितेश चव्हाण आणि टीम तसेच श्री सचिनजी कुडाळकर सर यांचे देखील सहकार्य लाभले.

"ओंजळीतील शब्दफुले" संस्थेचे स्नेहसंमेलन संपन्न

डोंबिवली - (सुरेश पाटील) ओंजळीत शब्दफुले या साहित्य संस्थेचे "आम्ही ओंजळकर" स्नेहसंमेलन रविवार दिनांक ३० जानेवारी रोजी विनायक सभागृह, डोंबिवली येथे संपन्न झाले. प्रसिद्ध साहित्यिक श्री विजय जोशी, सौ. चैत्राली जोगळेकर आणि सौ. मानसी चाफेकर या ओंजळकरांनी या कार्यक्रमाचे आयोजन खूप उत्कृष्ट पद्धतीने केले होते.

सदर स्नेहसंमेलनात ५० कवींनी सहभाग घेतला होता. विविध विषयांवरील विविध काव्यप्रकारांचे वाचन सदर संमेलनात करण्यात आले. प्रसिद्ध साहित्यिक श्री विजय फडणीस हे सदर संमेलनाचे अध्यक्ष होते. प्रसिद्ध साहित्यिका सौ‌ अंजली बापट या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

मैदानी खेळावरील बंदी उठवून मैदानी खेळ चालू करण्यात यावे- विविध क्रीडा संघटनाची मागणी

उरण (विठ्ठल ममताबादे )- रायगड जिल्ह्यातील मैदानी खेळ (क्रिकेट, फुटबॉल, खोखो, बॅडमिंटन, कबड्डी )खेळण्यास परवानगी मिळावी यासाठी विविध क्रीडा क्षेत्रातील संघटनानी आता राजकीय पुढारी नेते, आजी माजी लोकप्रतिनिधी यांची भेट घेण्यास सुरवात केली आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते पुढारी, लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन उरण, पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यात मैदानी खेळ सुरु करावी अशी मागणी क्रीडा संघटना, क्रीडा प्रेमीकडून केली जात आहे.

   पनवेल, उरण, पेण, अलिबाग, कर्जत, खालापूर परिणामी रायगड जिल्हा आणि त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये क्रिकेट, फुटबॉल, खोखो, बॅडमिंटन, कबड्डी आदी मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जातात. या खेळाच्या विविध स्पर्धाच्या माध्यमातून शेकडो हजारो नागरिकांना विविध प्रकारे रोजगार उपलब्ध होत असतो. मात्र कोरोनाच्या नियमामुळे मैदानी खेळावर बंदी आल्याने या खेळावर अवलंबून राहणाऱ्या विविध घटकावर उपासमारीची वेळ आली आहे. खेळ खेळण्यासाठी लागणारे साहित्य टी शर्ट, ट्रॅक, पॅन्ट, बॅट, बॉल आदी साहित्य बनविणारे अनेक कारखाने रायगड जिल्ह्यात व महाराष्ट्रात आहेत. त्यातील शेकडो कामगार रोजंदारीवर काम करत आहेत. जर हि मैदाने आणि खेळ बंद झाली तर त्यांना उपजीविका करणे खूपच कठीण जाईल. खेळ खेळण्यासाठी लागणारे टी शर्ट, पॅन्ट, बॅट, बॉल, इतर साहित्याची विक्री करणारे अनेक दुकाने ओस पडतील. प्रत्येक दुकानात 3,4 माणसे असतात. अशी शेकडो लोकांची रोजगार बुडून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. खेळाच्या आणि स्पर्धेच्या माध्यमातून समालोचक, पंच, गुणलेखक, अपडेटर, लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी अशा अनेक लोकांची कुटुंबे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या खेळावर अवलंबून आहेत. अगदी पाण्याच्या बॉटल पासून ते चायनीज गाडी, वडापाव, टपरी, चाय दुकान ढाबा यांचाही रोजगार या खेळावर, स्पर्धावर अवलंबून आहे. मैदानी खेळ हे स्वतःला फिट ठेवण्यासाठी, स्वतःची एम्युनिटी पॉवर वाढविण्यासाठी मदत करत असतात. शिवाय या खेळावर अनेक लोकांची पोट भरत असल्याने सदर मैदानी खेळावर, मैदानावर विविध स्पर्धावर कोरोनामुळे बंदी आणू नये यासाठी विविध क्रीडा संघटना, संस्था, क्रीडा रसिक प्रेमी, चाहते यांनी उरण, पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यात मैदानी खेळ, स्पर्धा, मैदाने सुरु करावी अशी मागणी विविध राजकीय पक्षाचे पुढारी, नेते, लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली आहे.

   विविध क्रीडा, संघटनांनी रायगड जिल्हा पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेत्या आदितीताई तटकरे, मावळ लोकसभा मतदार संघांचे खासदार तथा शिवसेना नेते श्रीरंग बारणे, भाजपा नेते आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर,शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा आमदार बळीराम पाटील, आमदार महेंद्र थोरवे, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना निवेदन देऊन उरण पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यात मैदानी खेळ सुरु करण्याची मागणी केली आहे.

सूर्यनमस्कारातून राष्ट्रवंदना

उरण (विठ्ठल ममताबादे )-संपूर्ण भारतात गीता परिवारातर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सूर्यनमस्कार या योग व्यायाम प्रकाराचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण भारतातून 1000 ग्रुप निवडण्यात आले. त्यात उरणच्या ग्रुपचा सुद्धा समावेश असून उरण मधील योग विद्या धामचे योग शिक्षिका सुवर्णा मनिष शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाळा महाविद्यालयामध्ये सूर्यनमस्कारांचे आयोजन करण्यात आले.

  आजादी का अमृत महोत्सव या संकल्पनेतून एकवीस दिवस सलग तेरा सूर्यनमस्कार या प्रोजेक्टमध्ये लिबर्टी पार्क महिला ग्रुप ,सेंट मेरीज जेएनपीटी विद्यालय, भागुबाई चांगू पाटील विद्यालय, रोटरी स्कूल ऑफ उरण विद्यालय, नेव्ही स्कुल करंजा अशा सर्व शैक्षणिक संस्थांमधून सुमारे तीन हजार शाळकरी मुले व महिला यांनी हा संकल्प पूर्ण करून त्याबद्दलचे सर्टिफिकेट मिळवले. 26 जानेवारी ला या विशेष कार्यक्रमात आनंद नगर मधील 50 साधकांनी लाईव्ह जाऊन या कार्यक्रमात सहभाग घेऊन "सूर्यनमस्कार से राष्ट्रवंदना" ही संकल्पपूर्ती केली.

   उरण तालुक्यामध्ये गीता परिवाराचे सदस्य तथा योग शिक्षिका सुवर्णा शर्मा या उरण तालुक्यातील सर्वत्र शाळा महाविद्यालयामध्ये फिरून योगाविषयी मार्गदर्शन, जनजागृती करीत आहेत.

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते नवघर जिल्हा परिषद विभागातील महिला बचत गटांना विविध साहित्याचे वाटप ; जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांच्या प्रयत्नाने महिला व बाळ कल्याण विभागातून मंजुरी

उरण (विठ्ठल ममताबादे )-बुधवार दिनाकं 26 जानेवारी 2022 या प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते नवघर  जिल्हा परिषद विभागातील  महिला बचत गटांना विविध साहित्याचे वाटप वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्यामुळे महिला व बाल कल्याण विभागातून सदर मंजुरी मिळवली होती.यामध्ये  श्री विठ्ठल- रखुमाई प्रसन्न महिला बचत गट भेंडखळ यांना भजन साहित्य, कुलस्वामिनी बचत गट पागोटे यांना पापड मशीन, द्रोणागिरी प्रकल्पग्रस्त बचत गट पागोटे यांना सतरंजी, माऊली महिला बचत गट भेडखळ यांना सतरंजी, अष्टविनायक स्वयं सहाय्यता महिला बचत गट पागोटे यांना दळण मशीन, श्रमिक महिला बचत गट भेंडखळ यांना पापड मशीन व क्रांती स्वयसाहयता महिला समूह फुंडे  यांना सतरंजी  यांचा समावेश होता. सदर साहित्य माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते प्राथमिक शाळा भेंडखळ, तालुका उरण येथे झालेल्या कार्यक्रमात देण्यात आल्या.

    या  वेळी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, पंचायत समिती सदस्य  दीपक भोईर, विजय-विकास सामाजिक संस्थेचे  विकास भोईर, विधी सेलचे  अध्यक्ष  मछिंद्र घरत, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटाच्या सभासद उपस्थित होते.

घारापुरी पर्यटन स्थळाला स्वतंत्र प्रशासकीय घटक घोषित करण्याची सरपंच बळीराम ठाकूर यांची मागणी.

उरण -उरण तालुक्यातील घारापुरी (एलीफंटा )हे जागतिक कीर्तीचा दर्जा लाभलेले पर्यटन क्षेत्र आहे. समुद्राच्या चारही बाजूने वेढलेले हे बेट आहे. त्या अनुषंगाने समुद्राची सफर तसेच कोरोव लेणी पाहण्यासाठी बेटावर देश विदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात आणि घारापुरी (एलीफंटा)येथील ग्रामस्थांचा उदरनिर्वाह हा 100% पर्यटनावर अवलंबून असतो. पर्यटक हेच एकमेव रोजगाराचे व उपजीविकेचे साधन आहे. तसेच पर्यटका व्यतिरिक्त बेटावरील ग्रामस्थांना अन्य कोणतेही रोजगाराचे साधन नाही.त्यामुळे शासनाने घारापुरी बेटाला स्वतंत्र प्रशासकीय घटक घोषित करून पर्यटन सुरु ठेवून घारापुरीतील स्थानिक ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

   देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्यामुळे पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु एन हंगामात बंदी लागू केल्याने घारापुरी या पर्यटन क्षेत्रावर आधारित अर्थचक्र पूर्णतः ठप्प झाले आहेत. तसेच सरसकट पर्यटन क्षेत्र बंद केल्याने बेटावरील लोकल गार्ड, हस्तकला, वस्तू विक्रेते, लघु उद्योजक, स्टॉल धारक, हॉटेल व्यावसायिक तसेच पर्यटकावर आधारित बेटावरील सर्व भागधारकांवर रोजगाराविना उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरसकट बंदी ऐवजी निर्बंधासह व्यवसाय करण्याची मुभा दिल्यास येथील ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध होईल.

    या आधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून मार्च 2020 रोजी पासून पुकारलेल्या पर्यटकबंदी मुळे घारापुरी (एलीफंटा )येथील ग्रामस्थ एक ते दिड वर्षापासून बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे आताच कुठे पर्यटन क्षेत्र सुरु होऊन बेटावर पर्यटकांची रेलचेल सुरु असतानाच पुन्हा पर्यटन क्षेत्र बंद झाल्याने ग्रामस्थांवर बेरोजगाराची आपत्ती कोसळली आहे. त्यामुळे घारापुरी (एलीफंटा )पर्यटन क्षेत्राला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून घोषित करून सदरचे पर्यटन क्षेत्र सुरु ठेवल्यास येथील ग्रामस्थांना दिलासा मिळेल अशी मागणी घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदितीताई तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार मनोहरशेठ भोईर आदींना पत्रव्यवहार करून केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिपत्याखाली एखाद्या पर्यटन स्थळास स्वतंत्र प्रशासकीय घटक घोषित करू शकतील असे निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने घारापुरी (एलीफंटा )या उरण तालुक्यातील जगप्रसिद्ध बेटाची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता बेटावर अन्य कुठेही, कोणतेही रोजगाराचे साधन नसल्याने सदरचे पर्यटन क्षेत्र सुरु ठेवण्याकरिता रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी निर्देशित केल्यास घारापुरी ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मित्रमंडळाचा हळदीकुंकु समारंभ उत्साहात संपन्न.

डोंबिवली(गुरुनाथ तिरपणकर)-सिंधुदुर्गातील कोकणवासियांनी 'सिंधुदुर्ग जिल्हा मित्र मंडळ'ही सामाजिक संस्था कार्यरत आहे.सध्या विविध संस्थांचे हळदीकुंकु समारंभ संपन्न होत आहेत,त्याच अनुषंगाने मकर संक्रांतीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा मित्र मंडळाने आशा टेलरींग क्लासेस,नरेश स्मृती,जुना आयरे रोड,डोंबिवली(पुर्व)येथे हळदीकुंकु सालाबादप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा मित्र मंडळाच्या महिला सदस्यांनी आयोजित केला होता.महिलांना हळदीकुंकु,सवाशिण वाण,पुष,तिळगुळ देऊन हा सोहळा एकमेकांशी गोड बोलण्यासहीत अभिनंदन व शुभेच्छासहीत उत्साहात संपन्न झाला. या हळदीकुंकु समारंभात ७५महिलांनी सहभाग घेतला होता.याप्रसंगी अंबरनाथच्या प्रमुख अतिथी सौ.युगंधरा लाड यांनी बिझनेस संदर्भात महिलांना मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.आशा कदम,सौ. पुनम कदम,सौ.प्रियांका राणे,श्रीमती सुचिता खानोलकर,सौ.पुजा राणे,सौ.शोभा राणे,सौ.प्रमिला सातवसे,सौ.स्नेहल मयेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच या कार्यक्रमाला संस्थेचे चिटणीस ज्ञानेश्वर सावंत,उपाध्यक्ष गोविंद म्हाडगुत,सदस्य मनोहर परब,सुरेश सावंत,विनोद राणे हे उपस्थित होते, या मान्यवरांनी हळदीकुंकु समारंभ यशस्वी केल्याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.कोविड १९च्या नियमानुसार हळदीकुंकु समारंभ मर्यादित स्वरूपातच आयोजित करण्यात आला होता.

गणेश हिरवे यांना केतन भोज युवा मंचतर्फे "कोरोना योद्धा पुरस्कार -२०२१" ने सन्मानित

मुंबई(उत्कर्ष गुडेकर/सौ. मनस्वी मनवे ) -कोविड-१९ या महामारी काळात प्रत्येकजण आपआपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करत होता. जोगेश्वरी पूर्व  येथील सामाजिक कार्यकर्ता आदर्श शिक्षक गणेश हिरवे हेही  याला अपवाद नाहीत.त्यांनी आवश्यक तेथे जी-जी गरज होती तेथे तेथे गरजेनुसार मदतीचा हात दिला. स्वतःच्या वाढदिवसाच्यानिमित्त (दि.२७ जाने.) ईशान्य मुंबईतील घाटकोपर पश्चिम अमृत नगर सर्कल, बंबखाना  व पार्क साईट येथील जेष्ठ नागरिकांना मदतीचा हात देण्याची महत्वपुर्ण कामगिरी बजावली.जोगेश्वरीचे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ वृत्तपत्रलेखक, अनेकदा रक्तदानासारखे पवित्र कार्य साकारणारे जॉय ऑफ गिव्हिंग सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री गणेश हिरवे यांना सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, पर्यावरण या क्षेत्रात कार्य करणाऱ्या केतन भोज युवा मंचतर्फे "कोरोना योद्धा पुरस्कार -२०२१" ने नुकतेच अखिल भारतीय पत्रकार हक्क संसद समितीचे मुंबई जिल्हा सचिव, माहिती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना मुंबई प्रसिद्धी प्रमुख, मा. विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन शांताराम गुडेकर(वृत्त पत्रलेखक /पत्रकार ) यांच्या हस्ते केतन भोज युवा मंच यांच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले.हिरवे सरांचे इतक्या वर्षांतील कार्य हे हेवा वाटण्याजोगेच आहे. गरीब लोकांसाठी तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. यासाठी सातत्याने ते धडपडत असतात. इतरांसाठी काहीतरी करायची त्यांची वृत्ती अनेकांना प्रेरणादायी ठरली आहे. शिक्षकी पेशा आणि कौटुंबिक जीवन सांभाळून सतत काही ना काही सामाजिक उपक्रम राबवण्याची त्यांची धडपड गेली कित्येक वर्षे अविरतपणे कशी सुरू आहे व इतकी इच्छाशक्ती त्यांच्यात कशी जागृत होते हा मला नेहमीच पडणारा प्रश्न. कारण आज नोकरी - प्रपंच सांभाळून सामाजिक जीवनात सक्रिय राहणे म्हणावे तितके सोपे राहिलेले नाही.तरी सुद्धा हिरवे सर सतत वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबवत आहेत.यातुनच त्यांच्या सामाजिक भावनेने झपाटलेल्या संवेदनशील मनाचे दर्शन घडते. हिरवे सरांसारखी आसामी समाजात अपवादानेच आढळते व अनेकांना आदर्शवत ठरते.

                मूर्ती छोटी पण कार्य आणि  मेहनत महान.सरांना सुरवातीपासूनच ग्रुपमधे राहून कार्य करायला आवडते.अगदी रस्त्यावरच्या माणसांपासून, खेडेगावातील लोकांपर्यंत जरूरी वस्तू  पोहोचवणारा समाजसेवक. वृत्तपत्रातून आपले परखड विचार मांडणारा वृतपत्रलेखक.संसाराची सुरळीत गाडी चालवणारा पती आणि मुलांना योग्य मार्गदर्शन करणारे वडील.रक्तदान  करणारे  रक्तदाता.लोकांना वाचनाची गोडी लावणारे  पुस्तके उपलब्ध करून देणारे..शाळेतील मुलांना चांगली मूल्य देणारे आणि अनेकांना सामाजिक कार्याची आवड निर्माण करणारे.. अशा विविध पैलूने संपन्न असलेले सन्मा.  गणेश हिरवे यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेकांकडून अभिनंदनसह उदंड आयुष्य लाभो आणि असेच चांगले कार्य होत राहो अशा शुभेच्छा  सदिच्छा देण्यात आल्या आहेत.


मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले पुर्व (मुंबई) येथे बहुरंगी बहुढंगी नमनाचे आयोजन

मुंबई (शांताराम गुडेकर)     कोकण ही कलारत्नाची खाण म्हणून ओळखले जाते. याच कोकणात नमन, जाखडीनृत्य कोकणात प्रसिद्ध आहे. नमनही देखील महाराष्ट्रातीलच लोकप्रिय लोककला आहे. नमन या लोककलेला वाव मिळावा म्हणून सर्व रंगकर्मी व रसिकजण मेहनत घेत असताना दिसून येते.कोकणातील कलावंतांना मुंबईतील मोठ्या रंगमंचावर आपली कला सादर करण्याची संधी अविअनिल कलामंच देत असतात.* तसेच अनेक कलाकारांना घडवणारे, व संधी देणारे पार्वतीपुत्र निर्मित अविअनिल कलामंच मुंबई प्रस्तुत, ग्रामदेवता श्री चंडिका देवी मंदिराच्या नूतनीकरण मदतीसाठी (मालगुंड, गणपतीपुळे, ता. जि. रत्नागिरी)आयोजित मालगुंड मराठा समाज मुंबई यांच्या सहकार्याने दिनांक ०६ फेब्रुवारी  २०२२ रोजी रात्रौ  ०७:३० वाजता, मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले  (पूर्व ) येथे बहुरंगी बहुढंगी नमनाचा कार्यक्रम गण, गवळण, आणी शिवशंभो मर्दानी आखाड्यासह छत्रपती संभाजी महाराजांचा खराखुरा इतिहास सांगणारे एक ज्वलंत वगनाट्य "अजिंक्य योद्धा अर्थात शिवाचा छावा शंभुराजा."निर्माता/संकल्पना/लेखक/दिग्दर्शक: अविनाश गराटे. गिते व गायक :शाहीर अनिल गराटे. गायक: एकनाथ डिके, गायिका:प्रिती भोवड (वीर) मेकप/हेअरस्टाईल/काँस्टयुम डिझाईनर :विद्या तुपे. नृत्य दिग्दर्शिका - तेजल पवार (गोताड) प्रकाश योजना :रमाकांत घाणेकर मॅनेजमेंट :राहूल पवार /गणेश देवकड. कलाकार :दिग्गज सिनेअभिनेते मा.श्री.सुनिलजी गोडबोलेसर एका चित्तथरारक भुमिकेत पहायला मिळणार आहेत, अनिल गराटे, शैलेश कुवार, भार्गव कदम, अंकुश थेराडे, अजय ओर्पे, निलेश बढे, सुरज परब, केदार महाजन, रमेश हतपले, सतिष बंडबे, ओमकार गिडये, आणी प्रज्ञा वारंग ,जान्हवी कोळवणकर, तृप्ती भोवड, प्रगती ठोंबरे, वृषाली माचिवले, जान्हवी सातपुते, समिक्षा टेमकर असुन शासनाच्या नियमाचे पालन करुन च कार्यक्रम पार पाडण्यात येईल असे पार्वतीपुत्र निर्मित अविअनिल कलामंचाचे निर्माते अविअनिल यांनी सांगितले.तिकिटांसाठी संर्पक :९५९४९४७९१२/९७०२१३७७८०/९६८९२१२१६४/८३५६९१४१२४/८२९१४१९६४३/८६९१८२८९११कार्यक्रमासाठी* संर्पक :९५९४९४७९१२/९७०२१३७७८० साधावा.

सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र स.भुवड यांचा आदर्श क्रिकेट संघतर्फे जाहीर सन्मान


मुंबई(शांताराम गुडेकर)

         आदर्श क्रिकेट संघ करंजाळी आयोजित क्रिकेट संघ ता.दापोली जिल्हा, रत्नागिरी आयोजित किंग मैदान उसघर आगासन दिवा आयोजित सामने मंडळाच्यावतीने सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख-राजेंद्र स.भुवड यांचा जाहीर सन्मान करण्यात आला. यावेळी आदर्श क्रिकेट संघ करंजाळी आयोजित क्रिकेट संघ ता.दापोली जिल्हा, रत्नागिरीचे पदाधिकारी, सदस्य आणि क्रिकेट संघ उपस्थित होते.

गिरनार नागरी निवारा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम संपन्न


मुंबई(शांताराम गुडेकर/मोहन कदम )

           गिरनार नागरी निवारा सहकारी गृहनिर्माण संस्था या संस्थेच्या माध्यमातून प्रतीवर्षा प्रमाणे कोविडच्या शासनाच्या सर्व  नियमांचे पालन करून पूजा महोत्सव साजरा करण्यात आला. पूजा महोत्सवचे हे २२ वे वर्ष होते. यावेळी भव्य महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते.प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार महोत्सव साजरा करत असताना चित्रकला स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा , विद्यार्थी गुणगौरव सोहळा ,त्याचबरोबर विविध रेकॉर्ड डान्स व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.या सर्व कार्यक्रमाला रहिवाशी यांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सोसायटीचे पदाधिकारी ,उत्सव समितीचे कार्यकर्ते ,महिला मंडळ व मुला-मुलीने यामध्ये  सहभाग घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी, सदस्य व सभासद आणि रहिवाशी आणि हितचिंतक यांनी महत्वाचे सहकार्य केले याबद्दल सर्वाचे आभार मानले.या कार्यक्रमला अनेक मान्यवर यांनी भेट दिली.शेवटी आभार प्रदर्शनाने पूजा महोत्सवची सांगता करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना व माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर)- माहिती अधिकार, पोलीस मित्र पत्रकार संरक्षण सेनेचा वर्धापन दिन नुकताच विविध समाज उपयोगी कार्यक्रमानी साजरा करण्यात आला.संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमाची आखणी करून करोना चे सर्व नियम पाळून पुण्यामधील विविध ठिकाणी साजरा करण्यात आला.स्वारगेट येथे देशभक्त केशवराव जेधे चौकात संघटनेच्या नामफलकाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अविनाश सकुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी डेक्कन याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुणे विश्रांतवाडी शाखेच्या नामफलकाचे अनावरण विश्रांतवाडी पोलिस स्टेशन समोर करण्यात आले. खराडी येथेदेखील संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर कैलास दादा पठारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच खराडी येथील"संतुलन"अनाथाश्रमात लहान मुलांना खाऊ वाटप भोजनाचा कार्यक्रम करण्यात आला.

     कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी संघटनेचे संस्थापक/आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ . अविनाश धनंजय सकुंडे , राष्ट्रीय अध्यक्ष श्री . डॉ. कैलासदादा पठारे , राष्ट्रीय महिला अध्यक्षा जयश्रीमाई सावर्डेकर , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ . अफसरभाई चाँद कुरेशी , महाराष्ट्र महिला अध्यक्ष डॉक्टर श्रुतिकाताई कडू, राष्ट्रीय अध्यक्ष युवक आघाडी प्रवीण राठोड महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी संतोष माने, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल जाधव, महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरीसंदीप पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष संग्राम भाऊ तळेकर, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शशांक शिरोडे, जिल्हा उपाध्यक्ष कांता भाऊ राठोड, आंतरराष्ट्रीय समन्वयक संकेत बाळासाहेब जगताप,ब्लू क्रॉस मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष  विशालभाऊ शेडोळकर , स्वारगेट शाखेचे मिलिंद सुतार , अमित चौधरी , गणेश पवार , अतिश झुरंगे , श्रीकांत कर्णवर , विश्रांतवाडी शाखेचे राहुल जाधव , आकाश लोंढे , प्रदीप कांबळे , सुमित मोरे ,खराडी खराडी शाखेचे स्वप्निल जगताप, गणेश मसलेकर, व्ही बी डावरे, राहुल पठारे आकाश पठारे ऋत्विक दरेकर,सुभाष अडागळे ,  दत्ता सुकळे , त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड विभागाच्या  सौ . अमृता जाधव , सौ.अनिता शिंदे , तानाजी संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते .

श्री कांटेश्वरी इलेव्हन संघ भडवळे आयोजित गावदेवी चषक -२०२२ क्रिकेट स्पर्धा मोठ्या आनंददायी वातावरणात संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर/प्रदीप खांबे )- गावाच्या विकासात्मक कार्यात हातभार लावण्यासाठी आयोजित करण्यात आलेली गावदेवी चषक ही स्पर्धा कोणतेही गालबोट न लागता सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून  अत्यंत उस्ताहपूर्ण वातावारणात पार पडली.स्पर्धेचे अंतिम विजेता पद व्ही. बी. (विशाल बंदरकर ) इलेव्हन भडवळे या  संघाने तर उपविजेता पद सोमजाई क्रिकेट संघ असोंड संघाने पटकावले.स्पर्धेसाठी भडवळे गावचे सुपुत्र ,उद्योजक श्री.रमेशजी नाचरे , भडवळे गावचे युवा सरपंच श्री. विजयजी नाचरे, सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोकजी रेवाळे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. लक्ष्मणजी खांबे, पोलीस पाटील दिलावरजी बामणे ,भडवळे ग्रामविकास संघटना ग्रामीण अध्यक्ष श्री.रामचंद्र पावसकर , मुंबई अध्यक्ष श्री.रामचंद्रजी भुवड, पुणे अध्यक्ष श्री. पांडुरंगजी खांबे, भडवळे गावचे सुपुत्र , उद्योजक श्री.गणेशजी शिंदे आणि श्री. मंगेशजी शिंदे, भडवळे गावचे माजी उपसरपंच , सामाजिक कार्यकर्ते श्री.अनंतजी टाकले, भडवळे गावचे सुपुत्र ,जि. प. शाळा भडवळे उसवाडीचे मुख्याध्यापक श्री. अनंतजी दणदणे गुरुजी , पुणे विभाग उपाध्यक्ष श्री.मुकुंदजी फडकले, मुंबई सचिव श्री.सुरेशजी जाधव , विनोदजी भुवड, सुधीरजी राऊत, कैलासजी माने ,भडवळे ग्रामविकास संघटना ग्रामीण, मुंबई, पुणे  पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली.तसेच मोठया संख्येने भडवळे आणि पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थ, माता भगिनी उपस्थित होते.ही स्पर्धा पार पाडण्यासाठी सुरवातीपासून बहुमूल्य सहकार्य करणाऱ्या भडवळे ग्रामविकास संघटना आणि सर्व गावकऱ्यांचे तसेच श्री साईनाथ मित्र मंडळ भडवळे ऊसवाडीचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. सर्व संघ, पंच आणि आयोजक, हितचिंतक यांचे श्री कांटेश्वरी इलेव्हन संघ - भडवळे तर्फे आभार मानून या सामान्यांची सांगता करण्यात आली.

रविवार, ३० जानेवारी, २०२२

तरुण कार्यक्षम खासदार डॉ.श्रीकांत शिंदे ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी

अंबरनाथ / अविनाश म्हात्रे :- कल्याण लोकसभेचे तरुण खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे हे कार्यक्षम खासदार म्हणून त्यांची ख्याती असून आपल्या लोकसभेच्या कार्यक्षेत्रात नेहमी व्यस्त असून अनेक धडाडीचे निर्णय त्यांच्या कारकिर्दीत होत आहेत त्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक प्रकल्प मार्गी लागेल आहेत युवासेना प्रमुख,पर्यावरण मंत्री मा.श्री.आदित्य ठाकरे यांच्या मार्ग दर्शनाखाली श्री. श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली असून आता ठाणे जिल्ह्यात फुटबॉल वाढीसाठी नक्कीच मदत होईल.

मुलुंड मध्ये ग्रंथालय व पतसंस्थेचे उदघाटन

 

मुंबई : मुलुंड पश्चिम काशीबाई भवन येथे कृतिशील आदिवासी सहकारी पतसंस्था व कै. देवेंद्र भांगे स्मृती ग्रंथालय चे उदघाटन पालघरचे निवृत्त उप पोलिस आयुक्त सुरेश निर्मळ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अनंत कांबळे,खेमचंद्र भोईर,दिलीप साबळे,रामचंद्र कोठावळे, मारुती दिघे,रघुनंदन भांगे,सचिन दे.भांगे,सुशीला भोईर, शारदा साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.


शनिवार, २९ जानेवारी, २०२२

आंबेडकरी चळवळीतील कणखर नेतृत्व "शांताराम मोहिते" कालवश

मुंबई (प्रवीण रा. रसाळ)- आंबेडकरी चळवळीतील कणखर नेतृत्व, कामगार नेते, न्यायप्रिय व चिपळूण हितवर्धक समितीचे (सत्तावीस गाव ग्रुप, शिरवली) माजी चिटणीस उमरोली गावचे सुपुत्र शांताराम आनंदा मोहिते यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले, त्यांच्या अंतयात्रेला बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, आरपीआय तसेच समाजातील विविध स्तरावरील नेतेमंडळी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता तसेच हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उसळला होता, सर्वांनी अत्यंत जड अंतकरणाने आपल्या लाडक्या नेत्यास शेवटचा निरोप दिला.

शांताराम मोहिते हे मनमिळाऊ, हसतमुख व अडल्या-नडलेल्याना सढळ हस्ते मदत करण्यास तत्पर असत, कामगारांच्या अनेक किचकट समस्या योग्यरीत्या हाताळून सत्याच्या बाजूने न्याय करणारे अशी त्यांची ख्याती होती, प्रसंगी स्वतःच्या नोकरीचीही पर्वा न करता कामगारांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आपल्या लाडक्या नेत्यास शेवटचा निरोप देताना अनेकांचे अश्रू अनावर झाले.

दिवंगत शांताराम मोहिते यांच्यामागे पत्नी, दोन मुले व दोन मुली, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे, शांताराम मोहिते यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, त्यांची शोकसभा त्यांच्या जन्मगावी मु. गाव उमरोली, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे दि. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी उमरोली शाखेच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आली आहे.

म्हसळा तालुक्यातील कु.अर्चना येलवे हिने सादर केलेल्या काव्याचा सन्मान !

कोकण - ( दिपक कारकर  )म्हसळा तालुक्यातील व्हिजन एज्युकेशन फाउंडेशन व तहसील कार्यालय म्हसळा तर्फे भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनी  आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलनात उत्तम काव्य सादर करणाऱ्या अर्चना येलवे हिला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.म्हसळा तालुक्यातील करंबे ताम्हाणे गावची अर्चना डोंगराळ विभागातून रोज पायी प्रवास करून तालुक्यात शिक्षण घेताना गतवर्षी म्हसळा तालुक्यातून बी.ए.उत्तीर्ण होताना तालुक्यातून प्रथम आली होती.शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी कलेक्टर होण्याचं स्वप्नं मनी बाळगणाऱ्या अर्चनाने आता पासूनच अभ्यासाची पूर्वतयारी सुरू केली आहे.तिच्या या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी गावचे ग्रामस्थ/पालक व प्राचार्य वर्ग देखील तिला प्रोत्साहित करत आहेत.प्रत्येक उपक्रमात सक्रिय राहून यश मिळणाऱ्या अर्चनाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

ई साहित्य प्रतिष्ठान यांच्या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

मुंबई : ई साहित्य प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या वतीने २६ जानेवारी, रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून, 'येस, लाईफ इज ब्युटीफुल, बट ....., या चारुदत्त  यांनी लिहिलेल्या ललित ई पुस्तकाचे प्रकाशन,  ई साहित्य प्रतिष्ठानचे प्रमुख -सुनीळ सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. करोनाच्या पाश्वभूमीवर हा कार्यक्रम साध्या पध्दतीने व   मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला .

    'welcomezindagimarathi.blogspot.com ' या ब्लॉग साईटवर चारुदत्त या नावाने मंगेश वि. चौधरी हे सन २०१८ पासून नियमितपणे भटकंती, गिर्यारोहण, चित्रपट आस्वाद,  समाजसंवेदना, कथा, काव्य-गीते, व्याख्याने, लक्षवेधी अश्या विविध विषयांवर ब्लॉग लेखन करीत आहेत. 
     हे पुस्तक ई साहित्य प्रतिष्ठान या प्रकाशन संस्थेने, साहित्य प्रेमी करिता, www.esahity.com  या संकेत स्थळावर उपलब्ध केले असल्याची माहिती, संस्थेचे प्रमुख-सुनीळ सामंत यांनी दिली आहे.

भांडुप येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

मुंबई : शिवशक्ती चाळ कमिटी भांडुप (पश्चिम) तर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी परिक्षक म्हणून  विभागातील सामाजिक कार्यकर्ते कवी -पत्रकार सुरेश पाटील उपस्थित होते . या स्पर्धेत  सर्वच सहभागी स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आजच्या विद्यार्थ्यांची बौद्धिक जडणघडण करणाऱ्या अशा खऱ्याखुऱ्या कार्यक्रमांची खरंच खूप गरज असल्याचे सांगताना अपघातात  पायाला इजा झालेली असताना ही बालमित्रांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहणे यानिमित्ताने सार्थकी  लागल्याचे  यावेळी पाटील  सर म्हणाले . 

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

बेस्ट वैश्य वाणी समाजाचा १५वा वर्धापन दिन संपन्न..!

मुंबई( प्रतिनिधी)- परेल येथील बेस्ट वसाहतीमधील वेश्यवाणी समाज मंडळाचा पंधरावा वर्धापन दिन समारंभ श्री. दिगंबर पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली बेस्ट हॉलमध्ये मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. प्रास्ताविक भाषण समाजाचे सरचिटणीस श्री. संतोष कोलगे यांनी करून समाजाच्या १५ व्या वर्षांच्या कार्याचा अहवाल सादर केला. याप्रसंगी जेष्ठ समाजसेवक श्री. राजेंद्र लकश्री यांचा ५० वर्षाच्या कार्याचा गौरव म्हणून समाजरत्नभूषण पुरस्कार, सन्मान पत्र, शाल, श्रीफळ व गुच्छ देवून यथोचित सत्कार, तसेच सिने नाट्य - दूरदर्शन मालिकेचे कलावंत, दिग्दर्शक व पत्रकार श्री. महेश्वर तेटांबे यांना समाजभूषण पुरस्कार, सह शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन त्यांचाही सत्कार या प्रसंगी करण्यात आला. या समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी प्रगती करून उत्तीर्ण झाल्याबद्दल कु. रिया राजेश वंजारे, कु.श्रध्दा बेर्डे, कु. यश नामदेव नारकर, तसेच कुमारी श्रावणी नामदेव नारकर यांना स्मृतीचिन्ह देवून त्यांच्या गौरव करण्यात आला. तर बेस्ट मधून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी व त्यांच्या सुविज्ञ पत्नी सर्वश्री दिगंबर पाटणकर, श्री. नामदेव नारकर, श्री. प्रदीप नारकर, श्री. जयवंत साठे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व गुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री. अमृत रावराणे, श्री. एकनाथ सणस, श्री. राजेंद्र मुंबरकर, श्री. अवधूत हरयाण, श्री. प्रशांत पिळणकर, श्री. संजय कापडी, श्री. महेंद्र बेर्डे, श्री. विलास वारंगे, श्री. दत्ताराम वंजारे, श्री. राजेश्वर जोगू व श्री. हेमंत अनुमाला यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. शेवटी महिला मंडळाचा हळदी कुंकू समारंभ सौ. निकीता बेर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. 

     यावेळी सौ. दर्शना पाटणकर, स्मिता कोलगे इत्यादिची मार्गदर्शन पर भाषणे झाली. कार्यक्रमाच्या शेवटी सरचिटणीस श्री. संतोष कोलगे यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच वैश्यवाणी संघाचे कार्यकर्ते यांचे आभार मानले.


पालघर मधील ग्रीन वूड्स सोसायटीचा ७३व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !

 ठाणे : व्हीबीएचसी ग्रीन वूड्स सोसायटी, देवखोप, जिल्हा पालघर येथील भारताच्या ७३व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला. भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभाग सीईओ व सतर्क पोलीस टाईम्स चे सल्लागार संपादक राजन रेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी सतर्क पोलीस टाईम्स चे व्यवस्थापकीय संपादक केतन चव्हाण ही उपस्थित होते. ग्रीन वूड्स सोसायटीचे सेक्रेटरी कुशलसिंग रावत, खजिनदार संदीप शिंदे, सहसचिव मिलिंद गुरव, सदस्य संजय भट, वरिष्ठ सदस्य घनश्याम चव्हाण, रविशंकर तिवारी, महेश चौहान, कमलकांत, चंद्रविकास आकेवार, गोविंद पंत, दलाल, श्रीम.रेखा राठोड, कविता रावत, श्रद्धा भट, जेटल दलाल, निखिता आकेवार, पूर्णिमा गुरव, पार्वती पंत व इतर सदस्य उपस्थित होते.

       भारत देश हा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असून, प्रजासत्ताक दिन साजरा करणे हा प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य असून सोसायटीने ध्वजारोहण कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, एकोपा व देशभक्तीचे दर्शन घडवलेले आहे, असे मत राजन रेडकर यांनी व्यक्त करून भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

शिवसेना शाखाप्रमुख सुनील पाटील,सचिन म्हात्रे यांच्यातर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

मुंबई (समीर खाडिलकर/शांताराम गुडेकर  )बोरिवली  शिवसेना शाखा क्र.१७ चे शाखाप्रमुख सुनील पाटील आणि शिवसेना शाखा १५ चे शाखाप्रमुख सचिन म्हात्रे याच्यातर्फे हिंदुरुदयसम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती व भगवा सप्ताह अंतर्गत रविवार दिनांक ३० जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९ ते २-३० या वेळेत समर्थ कुटीर (आलम मंदिर ), गावदेवी मैदान जवळ, शिंपोली गांव, बोरिवली पश्चिम येथे कोरोनाचे संकट अजून संपलेले नसल्याने मोफत आरोग्य तपासणी शिबीरचे (शिवसेना शाखा १५ व १७ संलग्न )आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात शरीराची तपासणी करण्याबरोबरच मधुमेह मध्ये पायांची काळजी कशी घ्यायची, शरीराची चरबी मोजणे, रक्तातील साखर तपासणे, हृदयाच्या कार्याची स्थिती, हाडांची खनिज घनता चाचणी, डोळ्यांची तपासणी चा समावेश आहे. उपरोक्त तपासण्या करण्यासाठी धनश्री हॉस्पिटल, बोरोबर पश्चिमचे चिकित्सक, बालरोग तज्ज्ञ, हाडांचे डॉक्टर उपस्थित रहाणार आहेत.तरी नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी शिवसेना शाखा क्र.१७ चे  शाखाप्रमुख सुनील पाटील आणि शिवसेना शाखा १५ चे शाखाप्रमुख सचिन म्हात्रे यांच्याशी शाखेत संपर्क करावा असे आवाहन शिवसेना शाखा १५ आणि  १७ च्या पदाधिकारी, सदस्य आणि तमाम शिवसैनिक यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

कांजुरमार्ग भाजपा- वॉर्ड क्रमांक.११७ च्या वतीने "शासकीय योजना - सेवा शिबिर" संपन्न

मुंबई : ईशान्य मुंबई जिल्ह्याचे कार्यसम्राट  खासदार मनोज कोटक  व वॉर्ड अध्यक्ष वीरेंद्र महाडीक  यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार  दिनांक २६ जानेवारी  रोजी  कांजुरच्या  जनतेसाठी "शासकीय  योजना सेवा शिबिर '' आयोजीत करण्यात आले होते . यावेळी या  शिबिरासाठी उपस्थित असणाऱ्या व्यक्तींची इ - श्रम कार्डसाठी नोंदणी करून त्याचे वाटप करण्यात आले तर राष्ट्रीय वयोश्री योजनेसाठी नाव नोंदणी करण्यात आली . विभागातील जवळपास १५० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला . 

    या शिबिरास माजी आमदार  मंगेश सांगळे , नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी ,नगरसेविका सौ. सारिका पवार जिल्हा महामंत्री श्री दिपक दळवी , मंडळ अध्यक्ष श्री मंगेश पवार, मुंबई सचिव म. मोर्चा उपाध्यक्ष सौ ज्योती दुराफे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती . सदर शिबिराचे जिल्हा कार्यकारणी सदस्य (ईशान्य मुंबई जिल्हा)  रवींद्र नारायण कदम, विधानसभा अध्यक्ष म.  मोर्चा -सौ. रजनी रविन्द्र कदम,युवा मोर्चा अध्यक्ष-वॉर्ड क्रमांक. ११७  अभिषेक नवनाथ ढोले यांच्यामार्फत करण्यात आले होते . हे शिबीर यशस्वी होण्यासाठी   नेहरू नगर मित्र मंडळाचे  विशेष सहकार्य लाभले तर वॉर्ड ११७ चे  सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली . 


४० वर्षानंतर SSC चा वर्ग भरला...पुन्हा घंटा वाजली, धडे गिरवले

     

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार की नाहीत असा राज्यात संभ्रम असताना .... प्रभादेवी म्युनिसिपल सेकंडरी स्कुलमधील ४० वर्षापूर्वीच्या १९८२ च्या SSC च्या शाळेच्या वर्गाची बॅच पुन्हा एकदा त्यावेळचे शिक्षक सर्वश्री वासुदेव दिंडोरे सर, भालचंद्र पिळणकर सर, चौधरी सर, अरुणा केळकर मॅडम, अस्मिता गोविंदेकर मॅडम यांच्या उपस्थितीत घंटा वाजली...वर्ग भरला...यस सर - यस मॅडम 'हजर' म्हणत पट भरला...फळ्यावर त्याची नोंद झाली. ओळख परेड होत सर्वांना  करीत 'पास' करीत गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले, मधली सुट्टी झाली, डब्यातून खाऊ खाल्ला, टेबलावरचे डस्टर दाखवत शिक्षकांनी पुन्हा एकदा उर्वरित आयुष्यासाठी सुखी जीवनाचे धडे आपल्या भाषणातून दिले, राष्ट्रगीत होऊन शाळा सुटली. त्यावेळी व्रात्य असलेले प्रशांत भाटकर-गणेश तोडणकर कार्यक्रमाच्या प्रसंगी 'मॉनिटर' होते त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त कार्यक्रम यशस्वी झाला,...

      आज तुमच्यापैकी काहींचे चेहरे तर काहींची नावे आठवताहेत, निसर्गाचा आणि काळाचा हा महिमा आहे, पण शाळेतील गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने हजर राहिलात, आपल्या एकमेकांना भेटण्याचे प्रचंड कुतूहल असणार, त्यामुळेच हे आज घडले. तुम्ही होतात म्हणून शाळा आणि आम्ही होतो. त्यामुळे बदल घडला असला तरी तुम्ही आताच्या शाळेच्या इमारतीत आठवणींना उजाळा देण्यासाठी तुम्ही इच्छा होईल तेव्हा जात जा असे भावनिक उदगार वासुदेव दिंडोरे सर यांनी आपल्या भाषणात काढले. गोविंदेकर मॅडम आपल्या भाषणात म्हणाल्या की, जुन्या आठवणी अत्तरासारख्या  कुपीमध्ये साठवून ठेवा, आणि जेव्हा केव्हा मनात निराशा येईल तेव्हा त्यांची स्मरण करा, नक्कीच ताजेतवाने व्हाल. ४० वर्षानंतर तुम्ही पुन्हा शाळेचा वर्ग भरवत आहात व तुम्ही भेटणार असे समजल्यानंतर एक शिक्षिका म्हणून मला जास्त आनंद झाला आहे. हे माझे शिक्षक आहेत असे जेंव्हा तुम्ही अभिमानाने आमची ओळख करून देता त्यावेळच्या भावना मला शब्दात व्यक्त करता येत नाहीत.

माझ्या मुलांच्यावर जसे प्रेम होते तीच भावना तुमच्याही बाबतीत होती, तुम्ही नावलौकिक मिळवावा आणि महापालिका शाळेत शिकलो आहोत याचा न्यूनगंड न राहता तुम्ही भविष्यात मोठे व्हावे याहेतूने कदाचित तुम्हाला मी त्यावेळी मारले असेल, परंतु आज विठ्ठलाच्या भेटीसाठी जी तळमळ असते तीच ओढ आणि हुरहूर आज माझ्या मनात दाटली आहे. असे भावुक उदगार केळकर मॅडम यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. 

तर चौधरी सर म्हणाले की, मी वर्गाकडे येतो आहे असे दिसले की, तुमच्या वर्गात शांतता पसरायची त्यामुळे मला नक्कीच विसरला नसाल, खरं तर मी खाजगी शाळेतली चांगल्या पगाराची नोकरी सोडून गरीब मध्यमवर्गीय मुलांना चांगले शिक्षण देता यावे हे एक धेय्य मनाशी बाळगून महापालिका शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो. अनेकांना त्यावेळी याचे आश्चर्य वाटले होते पण, माझ्या कार्यकाळात तुमच्यातले अनेक गुणी विद्यार्थी भेटले त्यांची नावेही मी अजून विसरू शकलो नाही, त्यामुळे प्रभादेवी ही शाळा माझी आवडती शाळा ठरली. 

     सुप्रसिद्ध कलाशिक्षक भालचंद्र पिळणकर सर यांनी ४० वर्षांपूर्वी सेंडऑफ देताना 'तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने' आणि 'या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार नव हिंद युगाचे तुम्हीच शिल्पकार' ही दोन गाणी म्हटली होती ती पुन्हा वाढत्या वयातही सुरेल आवाजात म्हटली. 

तर विद्यार्थ्यांच्या वतीने रवींद्र मालुसरे हे कार्यक्रमाची प्रस्तावना करताना म्हणाले की, शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शाळेच्या नावाचा फक्त शिक्का आहे परंतु आमच्या मनामनात आणि आठवणीत कायमचे गेली ४० वर्षे तुम्ही राहिलात याचे एकमेव कारण म्हणजे तुम्ही निरपेक्षपणे आम्हाला घडण्या-बिघडण्याच्या वयात चांगले संस्कार देण्याचे काम केलेत. आज आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलात आम्हाला स्मरणरंजन करण्याची संधी दिलीत, तोच आनंद आमच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. 

      सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तासाला महेश पै, प्रशांत भाटकर, गणेश तोडणकर, उमेश शिरधनकर यांनी गाणी तर संगीता पाटणकर, मीनाक्षी बोरकर यांनी आपले विचार मांडले. 

      कार्यक्रमाला शुभांगी पेडणेकर-विलणकर, शुभांगी भुवड-बैकर, मिनाक्षी बोरकर-मोपकर, साधना बोरकर, सविता गाड-धुरी, संगीता पाटणकर-जाधव, सुनंदा धाडवे, सुरेखा चव्हाण, कल्पना किर-आंबेरकर, शोभा पोटे, रेखा चव्हाण-सुभेदार, प्रतिभा खाटपे-बहिरट, कांचन शिर्के-शिंदे, भारती चव्हाण या माजी विद्यार्थीनी तर रविंद्र मालुसरे, प्रशांत भाटकर, सचिन पाताडे, रमेश राऊळ, नरेश म्हात्रे, महेश पै, जगन्नाथ कदम, अविनाश हुळे, गणेश तोडणकर, विजय विलणकर, संतोष गुरव, गुरुनाथ पटनाईक, नंदकुमार लोखंडे, उमेश शिरधणकर, पांडुरंग वारिसे, दिनेश पांढरे, शेखर भुर्के, अनिल कदम, किशोर किर, हनुमंत नाईक, दिनकर मोहिते, शैलेश माळी, राजू दोडे, संजय धामापूरकर, दिनेश मोकल, दीनानाथ शेळके, दत्ताराम बोरकर, विश्वनाथ म्हापसेकर, संदीप केणी हे माजी विद्यार्थी उपस्थित होते.

अ.भा.म.चि.निर्माता महामंडळाच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांच्या पुर्ततेबाबत नाना पटोले यांची घेतली भेट..!

मुंबई : आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ.श्री. नाना पटोले साहेब यांनी शिफारस केलेल्या आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याबाबत महत्वाची बैठक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी, टिळक भवन, दादर येथे आयोजीत केली होती. 

    या बैठकीत महाराष्ट्रप्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार श्री.नानाभाऊ पटोले यांनी मराठी चित्रपट वाहिनीवरील अन्य भाषेतील मराठी डब चित्रपटाचे प्रदर्शन तात्काळ थांबविले जावे आणि यांसाठी मी स्वतः जातीने लक्ष घालून येणार्‍या महाराष्ट्र अधिवेशनात हा प्रश्न मांडून कायद्याच्या चौकटीत तो धसास लावून मराठी कलावंताना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे ठोस आश्वसान दिले. त्याचबरोबर नाना पटोले यांनी आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या मागण्यांचा आढावा घेऊन शासनदरबारी त्याची लवकरात लवकर पूर्तता केली जाईल असे देखिल आश्वासन दिले. याप्रसंगी श्री.देवेंद्र मोरे (संस्थापक अध्यक्ष), श्री.प्रशांत नांदगावकर, (उपाध्यक्ष), श्री.विकास पाटिल (उपाध्यक्ष), श्री.शरदचंद्र जाधव (महासचिव), श्री.मनिष व्हटकर (खजिनदार), श्री.विजय शिंदे (पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख), श्री.महेश्वर तेटांबे (संचालक), श्री.किशोर केदार (संचालक) अँड.मनिष व्हटकर (संचालक), ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश साळगांवकर तसेच कार्यालयीन प्रमुख श्री.रुपेश शिरोळे.आदी मान्यवर उपस्थित होते.


गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

बोगस डॉक्टरांना गोवंडीत अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : डॉक्टरांची पदवी तसेच विशेष प्राविण्य नसताना देखील दवाखाना उघडून सर्वसामान्य नागरिकांच्या, रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या गोवंडी परिसरातील तीन डॉक्टरांना मुंबई गुन्हे शाखेच्या अँटॉप हिल पथकाने अटक केली आहे. कमलेश कुमार पटेल (५१), मेहबूब शेख (४० ), जयप्रकाश यादव (४८) अशी या डॉक्टरांची नावे आहेत. चुकीच्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाल्याच्या दोन घटना याच शिवाजी नगर, गोवंडी परिसरात महिन्याभरात घडलेल्या आहेत. गोवंडी शिवाजीनगर येथील परिसर हा झोपडपट्टीचा असल्याने या ठिकाणी दवाखाने थाटून स्वस्तामध्ये उपचार, औषधे उपलब्ध करून दिली जातात. कुठलीही पदवी व प्रमाणपत्र विचारणारे येथे कुणीच येत नसल्याने या भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. येथील रहिवाशांची मोठ्या प्रमाणात या डॉक्टरांकडून फसवणूक करण्यात येत आहे.  पोलीस निरीक्षक इंद्रजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-४ पथकाने बोगस ग्राहक तयार करून या ठिकाणी छापा टाकला. यासाठी मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली. एकाचवेळी तीन दवाखान्यांवर छापा टाकून कमलेश कुमार, मेहबूब आणि जयप्रकाश यादव या तीन बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली. त्यांच्या दवाखान्याची झडती घेतली असता कोणताच परवाना तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र आढळून आले नाही. कमी पैशात उपचार मिळत असल्याने झोपड्यांमध्ये राहणारे गरीब रहिवासी या अटक केलेल्या बोगस डॉक्टरांकडे जात होते. नागरिकांच्या अशिक्षितपणाचा आणि परिस्थितीचा गैरफायदा घेऊन हे डॉक्टर चुकीच्या पद्धतीने उपचार करत होते.

रंगारी बदक चाळ येथे प्रजासत्ताक दिन साजरा


मुंबई : काळाचौकी येथील रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात भारतीय संविधानाचे महत्त्व नरेंद्र पांगे आणि अनिल घाडीगांवकर यांनी मुलांना समजावून सांगितले. लहान मुलांच्या उपस्थितीत झेंडावंदन करण्यात आले. झेंडावंदन झाल्यानंतर लहान मुलांनी गाणी तसेच डान्स सादर केले. उत्कृष्ट गाणी तसेच डान्स सादर केलेल्या मुलांना भेटवस्तू देण्यात आली. सदर कार्यक्रमास भाई मयेकर, लक्ष्मण देवरुखकर, विनोद मकवाना, सुनील डीचोलकर, राकेश जेजुरकर, निकेश जाधव, संतोष सकपाळ, प्राची कदम, संतोष कदम, प्रसाद सावंतसत्यवान नर आदी कार्यकर्ते तसेच लहान मुले मोठया संख्येने उपस्थित होते. अशी माहिती मंडळाचे प्रसिद्धिप्रमुख दादासाहेब येंधे यांनी दिली आहे.

सर्व मतदार बनू..“सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरुक” !! जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी “राष्ट्रीय मतदार दिवस” झाला उत्साहात साजरा ; मतदारांनी जागरुकपणे मतदान करावे - जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

अलिबाग (जिमाका):- मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. मतदान करताना आपली सद्सदविवेकबुध्दी जागृत ठेवून मतदान करुन लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी सहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी येथे केले.

     राष्ट्रीय मतदार दिवसाच्या पार्श्वभूमीवर हा जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड व जे.एस.एम महाविद्यालय अलिबाग, निवडणूक साक्षरता क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि.25 जानेवारी रोजी पी.एन.पी. नाट्यगृह, अलिबाग येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, जे.एस.एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड-19 नियमांचे पालन करीत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

     यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री.अमोल यादव, उप जिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी सुषमा सातपुते, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री.प्रशांत ढगे व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार श्रीमती मीनल दळवी, जिल्हा दिव्यांग आयकॉन श्री.साईनाथ पवार, प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा जिल्हा युथ आयकॉन तपस्वी गोंधळी आदी मान्यवर उपस्थित होते.

        जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर पुढे म्हणाले, राष्ट्रीय मतदार दिनाचा आजचा हा कार्यक्रम केवळ रायगड जिल्ह्यात, कोकणात किंवा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देश पातळीवर राबविला जात आहे. आजच्या या राष्ट्रीय मतदार दिनाची मुख्य संकल्पना आणि मुख्य हेतू हा आहे की, आपण आपली मतदार नोंदणी केली म्हणजे सर्व झाले असे नाही तर आपल्या शेजारी आपले मित्र, मैत्रीण, नातेवाईक यांनाही आपण विचारले पाहिजे की, ते मतदार आहेत की नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मतदार झाल्यानंतर ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका किंवा विधानसभा ज्यावेळी आपल्याला मतदान करण्याची संधी मिळते तेव्हा आपण आपले मतदान प्रक्रियेतील अविभाज्य मत नोंदविणे गरजेचे आहे.

     आजचा हा कार्यक्रम आपण कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करीत शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून साजरा करीत आहोत. कोविडमुळे हा कार्यक्रम आज आपण आयोजित केला नसता तर वर्षभर आपण केलेल्या कामाचा प्रचार व प्रसार झाला नसता आणि राष्ट्रीय मतदार दिवसही यंदा साजरा झाला नसता. आजचा कार्यक्रम मा. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तसेच समाजमाध्यमातून संपूर्ण राज्यात तसेच देशभर हे शेअर करण्यात येत आहे. मा.भारतीय निवडणूक आयोगाला देखील आपण या कार्यक्रमाची छोटीशी चित्रफित तयार करून पाठविणार आहोत.

     जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर म्हणाले की, दि.05 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यात विविध मतदार जनजागृती कार्यक्रम देखील राबविण्यात आले होते. त्यामध्ये शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, विविध महामंडळ, संस्थाना जनजागृतीसाठी अंतर्भूत केले होते. त्यानंतर वोटर हेल्पलाईन ॲप तयार केलेला आहे. या वोटर हेल्पलाईन ॲपमध्ये मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओ यांना आम्ही प्रशिक्षण दिले होते. या ॲपची माहिती देखील देण्यात आली आणि नागरिकांना हे ॲप डाऊनलोड करून त्याचा उपयोग करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. नवीन युवा मतदारांची देखील नोंदणी करण्यात आली. त्यांच्यासाठी वेबिनार आणि ऑनलाईन बैठका आयोजित करण्यात आल्या तसेच महाविद्यालय स्तरावर ब्रँड अँबेसेडर नेमण्यात आले होते. महिला मतदारांसाठी देखील जनजागृती करण्यात आली. तसेच आपल्यामध्ये उपस्थित दिव्यांग आयकॉन श्री.साईनाथ पवार यांच्या तसेच इतरांच्या माध्यमातून दिव्यांग मतदारांची देखील नोंदणी करण्यात आली. आपण सर्वजण ज्यावेळी शपथ घेत होतो त्यावेळी ती शपथ दिव्यांगांना कळावी,याकरिता आपण सांकेतिक भाषा दुभाषीही उपलब्ध करून दिले.

     एवढेच नाही तर पनवेल तालुक्यात आपण तृतीयपंथी मतदारांची देखील नोंदणी केली. या मोहिमेंतर्गत विशेष ग्रामसभांचेही आयोजन करण्यात आले. दि.16 डिसेंबर 2021 रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण करण्यात आले, वाचन करण्यात आले. आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने आपण महानगरपालिका क्षेत्रात देखील मतदार नोंदणी केली. असंघटित मजूरांचीदेखील मतदार नोंदणी आपण केली. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातूनही मतदार जनजागृती करण्यात आली. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम व युट्यूब अशा विविध समाजमाध्यमातून मतदार नोंदणी आणि निवडणूक विषयक प्रसिद्धी करण्यात आली.

     ते पुढे म्हणाले, दि.01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित सेनादलातील अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात 1 हजार 228 (पुरुष- 1 हजार 192 आणि स्त्री- 36) सैनिक मतदार आहेत. याप्रकारे जवळजवळ 22 लाख 82 हजार 203 मतदारांची जिल्ह्यात नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरुष 11 लाख 62 हजार 900 आणि तृतीय पंथी 24 अशी मतदार नोंदणी करण्यात आली आहे. हा 12 वा मतदार दिन साजरा करीत असताना यापूर्वी आपण फक्त नोंदणी करीत होतो आणि नोंदणी करीत असताना त्या मतदार यादीमध्ये काही प्रमाणात त्रृटी तयार होत गेल्या. त्या त्रृटींचे निराकरण करून त्या मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरणाचे काम गेल्या चार-पाच वर्षांत आपण चालू केले आहे. या वर्षी आम्ही मतदार यादी अद्ययावतीकरणापूर्वी जवळजवळ 22 हजार नवीन युवक मतदार होते ते या मोहिमेत 66 हजारापर्यंत पोहोचले आहेत. याशिवाय बऱ्याच मतदारांचे छायाचित्र नव्हते, काहींचा फोटो होता परंतु तो फार जुना होता. तर या अद्ययावतीकरणाच्या मोहिमेत आपण सर्व जुने छायाचित्र काढून त्या जागी त्या व्यक्तीचे नवीन छायाचित्र समाविष्ट केले. जवळ जवळ 99% मतदार यादीचे अद्ययावतीकरण पूर्ण झाले आहे. मतदार यादी अद्ययावतीकरणाचे काम सर्व यंत्रणेने कोविड महामारीच्या काळातदेखील चालू ठेवले, हे यातील वैशिष्ट्य आहे. संपूर्ण यंत्रणेचे हे कार्य विशेष उल्लेखनीय आहे.

     शेवटी आजच्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सर्वांचे कौतुक करून जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये आपण सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले.

     यावेळी जे.एस.एम महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल पाटील म्हणाले की, भारत हा जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश आहे आणि ही लोकशाही जर टिकवून ठेवायची असेल तर लोकशाहीचे प्रमुख स्तंभ म्हणून निवडणुकांकडे पाहिले जाते. या निवडणुका अत्यंत पारदर्शक, नि:पक्षपातीपणे आणि अत्यंत व्यवस्थित पार पाडण्याचे काम भारताच्या निवडणूक आयोगामार्फत केले जाते. 1952 साली ज्यावेळी पहिल्यांदा निवडणूक झाली त्यावेळी पासून हे काम सुरू आहे.

     निवडणूक आयोगाची स्थापना दि.25 जानेवारी 1950 रोजी झाली म्हणून आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करत असतो. याची सुरुवात 2011 साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एक आयोग स्थापन केला आणि प्रस्ताव सादर केला की, आपण मतदार दिवस साजरा करूया आणि त्यानुसार निवडणूक आयोगाच्या 61 व्या वर्धापन दिनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते पहिला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.

     ते म्हणाले, या वर्षीचा राष्ट्रीय मतदार दिवसाचा विषय “सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणूका” असा आहे. या सगळ्याचा समावेश असलेल्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग कायमच प्रयत्न करीत असतो. मतदान ही आमची जबाबदारी नाही तर आमचा हक्क आहे, असे या देशातील प्रत्येक नागरिकाने म्हटले पाहिजे. आपण ज्या वेळेस सर्वसमावेशक असे म्हणतो त्या वेळेस त्यामध्ये समाजातील सगळे घटक, प्रत्येक नागरिकाचा यामध्ये समावेश झाला पाहिजे याचा अंतर्भाव आहे. प्रत्येक नागरिकाने ज्याने आपल्या वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत त्यांनी आपले नाव मतदारयादीमध्ये नोंदविलेच पाहिजे आणि मतदार होण्याचा हक्क मिळविला पाहिजे.

        याप्रसंगी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाल्या की, सर्व युवांना माझे एकच आवाहन असेल की, आपण 18 वर्षाचे झालो आणि आपण वोटर आयडी बनविले पाहिजे केवळ यासाठी मर्यादित ठेवू नका. तर हे वोटर आयडी बनविल्यानंतर तुम्ही मतदान देखील केले पाहिजे. आपला भारत देश हा लोकशाही देश आहे आणि आपण मतदान करणे हे खूप महत्वाचे आहे.

       यावेळी नवमतदार कु.अक्षया प्रशांत नाईक हिला मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच मतदार नोंदणीसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राकेश सावंत यांनी केले. तर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार श्रीमती मीनल दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.


राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर ; अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर खुल्या प्रवर्गासाठी १०९ पदे राखीव

मुंबई : राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी  नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आज आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये १३९ नगरपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर खुल्या प्रवर्गासाठी १०९ नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.

    नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतप्रसंगी उपसचिव श्रीमती प्रियांका कुलकर्णी-छापवाले, अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे हे प्रत्यक्ष तर  अमरावती, नागपूर, कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक या विभागीय आयुक्त कार्यालयांमधून जिल्हा प्रशासन अधिकारी आणि संबंधित नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

    ज्या १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आज सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले त्या नगरपंचायतीचे आरक्षण प्रवर्गनिहाय खालीलप्रमाणे-

अनुसूचित जातीसाठी अध्यक्षपदाच्या १७ जागा असून त्यातील ९ जागा या अनुसूचित जाती (महिला) तर ८ जागा या अनुसूचित जाती (सर्वसाधारण) साठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.

■ अनुसूचित जाती (महिला) राखीव- लाखणी, कुही, नातेपुते, खंडाळा (जि. सातारा), जळकोट (लातूर), माळेगाव बुद्रुक, पाटण, देहू, वैराग (सोलापूर)

■ अनुसूचित जाती (सर्वसाधारण) राखीव- म्हाळुंग श्रीपूर, भिसी, केज, देवणी, वाशी, औंढा नागनाथ, संग्रामपूर, लोणंद

 अनुसूचित जमाती प्रवर्गात अध्यक्षपदासाठी एकूण १३ जागा राखीव असून त्यातील ७ अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी तर ६ जागा अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी सोडतीद्वारे आरक्षित करण्यात आल्या आहेत.

■ अनुसूचित जमाती (महिला) राखीव- धानोरा, अहेरी, मोहाडी, बाभुळगाव, साक्री, सोयगाव, शहापूर

■ अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)- दिंडोरी, देवरी, गोंडपिंपरी, राळेगाव, भिवापूर,सडक अर्जुनी

खुल्या प्रवर्गासाठी एकूण १०९ अध्यक्ष पदे असून त्यातील ५५  अध्यक्षपदे हे महिलांसाठी राखीव निश्चित करण्यात आले आहेत.

■ खुला प्रवर्ग (महिला) राखीव- कळंब, समुद्रपूर, अर्जुनी मोरगाव, अनगर, पारशिवनी, मंठा, शेंदुर्णी, हिंगणा, वाभवे वैभववाडी, खालापूर, बदनापूर, चामोर्शी, भातकुली, महादुला, वाडा, वडूज, रेणापूर, दापोली, शिंदखेडा, एटापल्ली, देवगड-जामसंडे, जामणी, कारंजा, महागाव, नायगाव, शिरुर अनंतपाळ, पालम, सिरोंचा, पोलादपूर, कोरपना, देवरुख, देवळा, सेनगाव, लांजा, सावली. फुलंब्री, कोरची, तिर्थपुरी, तळा, पोंभुर्णा, जाफ्राबाद, पाटोदा, जिवती, शिर्डी, कुडाळ, निफाड, धारणी, कर्जत, कुरखेडा, वडगाव मावळ, कोरेगाव, सेलू, आष्टी, सालेकसा, शिरुर-कासार,

■ खुला प्रवर्ग (सर्वसाधारण)- गुहागर, अकोले, मुक्ताईनगर, घनसावंगी, मानोरा, मंडणगड, माहूर, आष्टी (वर्धा), कवठे महांकाळ, लोहारा (बु), खानापूर, बार्शी-टाकळी, नांदगाव खंडेश्वर, मुरबाड, ढाणकी, कळवण, हातकणंगले, मुलचेरा, आजरा, दहिवडी, कणकवली, पेठ, पाली, बोदवड, तिवसा, मोताळा, मारेगाव, गोरेगाव, मंचर, मेढा, हिमायतनगर, मौदा, लाखांदूर, भामरागड, सिंदेवाही, मालेगाव-जहांगीर, वडवणी, सुरगाणा, अर्धापूर, चाकूर, धडगाव-वडफळ्या, पारनेर, नेवासा, तलासरी, मोखाडा, विक्रमगड, माणगाव, म्हसळा, कसई-दोडामार्ग, कडेगाव, शिराळा, माळशिरस, माढा, चंदगड.

    सन २०२० च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. १२ नुसार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार नगरपंचायतींचे नगराध्यक्ष हे प्रचलित पद्धतीने नगरसेवकांमधूनच निवडले जात असून त्यांचा पदावधी अडीच वर्षे इतका करण्यात आला आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित करताना राज्यातील नगरपंचायतींमध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे राज्यातील नगरपंचायतींमधील एकूण लोकसंख्येशी जे प्रमाण असेल त्या प्रमाणानुसार अध्यक्षांची पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक प्रवर्गात निम्म्यापेक्षा कमी नाहीत इतकी पदे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. एखादी नगरपंचायत अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी येत असल्यास तेथे ज्या प्रवर्गाच्या लोकसंख्येची टक्केवारी अधिक आहे, अशा प्रवर्गासाठी ती राखीव ठेवण्यात आली आहे.


नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द -पालकमंत्री कु.आदिती तटकरे

अलिबाग (जिमाका) :- समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास साधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.

     अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे प्रजासत्ताकदिनाच्या 72 व्या वर्धापनदिनी मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

     यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीम.योगिता पारधी, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुषमा सातपुते, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे,  जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा कृषी अधीक्षक श्रीम.उज्वला बाणखेले, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग जगदीश सुखदेवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी चिंतामणी मिश्रा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, डॉ.ज्ञानदा फणसे, मुख्य वित्त लेखा अधिकारी  श्री.घाडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, उप वनसंरक्षक आशिष ठाकरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या, व्यवस्थापक श्यामकांत चकोर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसिलदार विशाल दौंडकर, श्रीमती मिनल दळवी, सतिश कदम, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, प्रवीण बोणे आदी मान्यवर उपस्थित होते.

     सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

     या सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना संबोधीत करताना पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, विविध धर्म, भाषा, प्रांत, संस्कृती जोपासणाऱ्या भारतीयांचा जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश. आपण साजरा करीत असलेला प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविध प्रयत्नांमुळे आपली लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे.  सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून मतदानात सहभाग घेणे आवश्यक आहे. तसेच स्वत:बरोबर इतर नागरिकांना मतदानाच्या कर्तव्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.

     त्या पुढे म्हणाल्या, सर्वत्र पसरलेल्या कोरोना संसर्ग व वेळोवेळी नैसर्गिक आव्हानांवर संघर्ष करीत आपले राज्य प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहे. याची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. या महामारी बरोबरच अलिकडील काळात संपूर्ण कोकण किनारपट्टीसह आपल्या जिल्ह्यात नैसर्गिक संकटांमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला. प्रत्येक प्रसंगास सामोरे जाताना पालकमंत्री व रायगडवासी म्हणून जिल्हाहितार्थ अनेक निर्णय घेत आहे. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यासह रायगड जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्याचा व परिस्थिती कोणतीही असो ‘महाराष्ट्र थांबला नाही व थांबणार नाही’ ही संकल्पना सिद्धीस नेण्याचा माझा प्रयत्न आहे. समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार, दुर्बल घटकांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध आहे.

     पालकमंत्री कु.तटकरे पुढे म्हणाल्या की, औद्योगिक जिल्हा अशी रायगडची ओळख आहे. विविध उद्योगांसाठी गुंतवणूक जिल्ह्यात होणार आहे. रोजगार निर्मितीसह वाढत्या नागरीकीकरणाचा सर्वकष विचार करुन  जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून मागील वर्षाच्या तुलनेत जास्तीच्या सुमारे 295 कोटी इतक्या निधींची तरतूद सन 2022-23 या आर्थिक वर्षात करण्यात येत आहे. जिल्ह्याचा मानबिंदू असलेला स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ल्याच्या विकासासाठी समितीच्या माध्यमातून स्वतंत्र 5 कोटींचा निधी येत्या वर्षी प्राप्त होत आहे, असे सांगून पालकमंत्री कु.तटकरे पुढे म्हणाल्या,अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीची प्रवेश प्रक्रिया यावर्षी सुरू होत आहे, ही बाब जिल्हासाठी अभिमानास्पद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विभागीय क्रिडा संकुल या सर्व माध्यमातून जिल्ह्यातील व कोकणातील तरुणांना शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात भविष्यातील वाटचाल निश्चित करण्यास नक्कीच मदत होणार आहे.

     त्या म्हणाल्या, पर्यटकांना पर्यटनमुग्ध करणारा जिल्हा असा जिल्ह्याचा लौकिक आहे. समुद्रकिनारे, तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले, वन्यजीव अभयारण्य व पक्षी अभयारण्य या माध्यमातून जिल्ह्याचे प्राकृतिक सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी अनेक महत्त्वाची कामे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून पूर्णत्वास येत आहेत.  किहीम येथे पक्षीप्रेमी व पर्यटकांसाठी डॉ.सलीम अली पक्षी अभ्यास व संशोधन केंद्र, अलिबाग येथे कान्होजी आंग्रे समाधी परिसर विकास, आक्षी येथील शिलालेख परिसराचे सौंदर्यीकरण, उमरठ येथे तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ व परिसराचे सुशोभिकरण, साखर येथे सुर्याजी मालुसरे समाधीस्थळ व परिसराचे सुशोभिकरण, दिवेआगर येथील कासव संवर्धन प्रकल्प उभारणी, जिल्हा पक्षी म्हणून ओळख मिळालेल्या तिबोडी खंड्याचे शिल्प उभारणी करणे आदी विविध कामांचा यात समावेश आहे. आपले सण, उत्सव, खाद्य संस्कृतीचा अनुभव येणाऱ्या प्रत्येक पर्यटकास अधिक चांगल्या प्रकारे सेवा देत पर्यटन व्यवसायातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

     आरोग्य सुविधा बळकटीकरणासाठी आरोग्य संस्थांना शासकीय जागा प्रदान केल्या आहेत  व संस्थांच्या उभारणीसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे/उपकेंद्रे व ट्रॉमाकेअर सेंटर, रुग्णवाहिका, पशुवैद्यकीय दवाखाने या माध्यमातून आरोग्य संपन्न रायगड जिल्हा करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्या म्हणाल्या.

     मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात 73 रस्त्यांच्या कामांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या प्रकल्प आराखड्यात अलिबाग मधील महत्त्वाचे जोडरस्ते, 93 पर्यटन स्थळांना जोडणारे रस्ते व खाड्यांवरील पूल यांचा समावेश करून जिल्ह्यातील दळणवळण अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न आहे. विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिक प्रकल्पाच्या नवघर ते बलवली प्रकल्पास मान्यता देण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

     राज्यातील ग्रामीण डोंगराळ व आदिवासी भागामधील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण सहज उपलब्ध व्हावे, यासाठी “नवीन सॅटेलाईट केंद्राची निर्मिती” या शैक्षणिक वर्षापासून नवीन सॅटेलाईट केंद्र मंजूरीसाठी कार्यपध्दती व निकष जाहीर करण्यात आले आहेत, असे सांगून पालकमंत्री म्हणाल्या, महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या 7/12 वर जलद व सुलभरितीने पीक पाहणी नोंदविण्यात खातेदाराचा प्रत्यक्ष सहभाग शक्य करणारी “ई-पीक पाहणी सुविधा 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यात सुरू झाली आहे.

     पुढील 5 वर्षांमध्ये अपारंपारिक उर्जास्रोतांचा वापर करून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात परवडण्या जोगी, खात्रीची, शाश्वत व स्वच्छ ऊर्जा यासाठी सुनिश्चिती करण्यासाठी शासन सदैव कटिबध्द आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून प्रस्तावित योजनेंतर्गत दरडग्रस्त गावांमध्ये बांबू वृक्ष लागवड करून भावी काळात दरडप्रवण गावांमध्ये जीवितहानी होवू नये यासाठी नियोजन केले जात आहे, असेही त्या म्हणाल्या.

     जिल्हा नियोजन विकास समितीच्या उपलब्ध निधीपैकी 3 टक्के निधी महिला व बालविकासांतर्गत कामांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाकडून कोविड-19 रोगाबाबत बालकांची काळजी व संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती दलामार्फत जिल्हयातील 18 बालकांच्या खात्यावर प्रत्येकी 5.00 लक्ष रुपयांप्रमाणे 90.00 लक्ष रुपये जमा करण्यात आले आहेत, असे सांगून पालकमंत्री कु.तटकरे पुढे म्हणाल्या की, आपल्या देशाची संस्कृती खूप प्राचीन आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा मोठा इतिहास आपल्या पुढे उभा आहे. सुमारे दीडशे वर्षाचे पारतंत्र्य आणि त्यातून मुक्ततेसाठीचा व्यापक संघर्ष आपण सगळे जण जाणून आहोत. 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत'. ही सर्व व्यापी प्रतिज्ञा आणि संविधानावर आपली कमालीची निष्ठा आहे. 'सार्वभौम, समाजवादी, धर्म निरपेक्ष लोकशाही गणराज्य' असल्याचा आपल्याला अभिमान आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील या प्रजासत्ताक दिनाचे आपण देशाप्रती एकनिष्ठता, एकात्मता व समतेच्या भावनेतून स्वागत करु या.

        शेवटी कोरोनाशी सामना करण्यास आपण परिपूर्ण प्रयत्न करीतच आहोत. सुजाण जिल्हावासियांनी लसीकरणासाठी पुढे येणे गरजेचे आहे. सौर ऊर्जेचा वापर, वनसंवर्धन, प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणे हे आपले कर्तव्य आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांतून जिल्ह्यांचा सर्वांगिण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून कायम असेल. यासाठी आपलेही सहकार्य लाभेल, सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात रायगड जिल्हा अधिक प्रगतीच्या दिशेने आगेकूच करताना दिसेल, असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सर्वांना  पुन:श्च प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

“परिवर्तन” या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते संपन्न

     यावेळी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रम, कार्यक्रमांवर आधारित “परिवर्तन” या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या पुस्तिकेत जिल्हा प्रशासनाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, कातकरी उत्थान अभियान, माझी वसुंधरा व सुप्रशासन या अभियानांतर्गत राबविलेल्या विविध योजना, उपक्रम आणि कार्यक्रमांची छायाचित्रे व संक्षिप्त माहिती स्वरूपात मांडणी करण्यात आली आहे.

     या पुस्तिकेची संकल्पना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांची असून यासाठी त्यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले आहे. तसेच अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुषमा सातपुते, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, तहसिलदार विशाल दौंडकर, सचिन शेजाळ, सतिश कदम, गोविंद वाकडे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व सर्व शासकीय कार्यालयांचे कार्यालय प्रमुख यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तर जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी या पुस्तिकेचे संपादन केले असून जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी श्री.विठ्ठल बेंदुगडे, श्री.जयंत ठाकूर, श्री.प्रसाद ठाकूर यांनी आवश्यक माहिती व समर्पक छायाचित्रांच्या संकलनाची जबाबदारी पार पाडली आहे.

     या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे सूत्रसंचलन श्रीमती करंदीकर यांनी केले. करोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर या सोहळयात करोना प्रतिबंधक नियमांचे व सूचनांचे काटेकोर पालन करीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

अलिबाग (जिमाका):- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताकदिनाच्या 72  व्या वर्धापनदिनी ध्वजारोहण जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

     यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुषमा सातपुते, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी चिंतामणी मिश्रा, तहसिलदार विशाल दौंडकर, श्रीमती मिनल दळवी, सतिश कदम, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

     सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी प्रजासत्ताकदिनाच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.



आठवणीत रंगला १९८८-८९ च्या दहावीच्या बॅचचा ३५ वर्षांनी स्नेह मेळावा

        आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा..!शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई -वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याच...