आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

मतदारयादी नावनोंदणी साठी जनजागृती : पनवेल महानगर पालिकेकडून कु. साईली भाटकर व "स्वदेशी तुझे सलाम "चा सन्मान


मुंबई :
पनवेल महानगरपालिका “स्वीप-२०२१” अभियान अंतर्गत “उत्सव मतदार साक्षरता, नोंदणी व जनजागृतीचा” या विषयाच्या अनुषंगाने मतदार नोंदणी व जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम, चर्चासत्र व सामाजिक संदेश देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात  होते.  यावेळी  मतदारयादी नावनोंदणी साठी जनजागृती करण्याप्रती दिलेल्या  योगदानाबद्दल मुंबईतील  कु. साईली प्रशांत भाटकर हिचा  आणि "स्वदेशी तुझे सलाम" संस्थेचा चा ३० डिसेंबर रोजी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल   याठिकाणी   पनवेल महानगर पालिकेकडून  सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन  सन्मान करण्यात आला. यावेळी  पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त , उपायुक्त यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी व मान्यवर मंडळी उपस्थित होती. कु. साईली  भाटकर हिने दिलेल्या या सामाजिक योगदानाबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून  अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. 





बदलापूर येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ व ऍक्युपंचरिस्ट व होप फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रविण निचत, ह्यांना २०२१चा भारतीय संविधान राष्ट्र गौरव पुरस्कार

मुंबई  : ''लेक लाडकी अभियान'' हे दलित विकास महिला मंडळ या सातारा येथील संस्थेने २००४ साली सुरु केलेले अभियान आहे. याच लेक लाडकी अभियानांतर्गत भारतीय संविधान राष्ट्र गौरव पुरस्कार २०२१चा पुरस्कार वितरण सोहळा २७ डिसेंबर २०२१ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात पार पडला. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा तसेच मुंबईच्या माजी महापौर अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर, होप फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रविण निचत, कॉँग्रेसच्या पदाधिकारी तसेच महिला हक्क कार्यकर्त्या डॉ. मोनिका जगताप, मिसेस महाराष्ट्र २०२० वृषाली प्रवीण, अभिनेत्री जानकी पाठक, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक प्रसाद तारकर तसेच मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरज भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. 

      कार्यक्रमाची सुरूवात सर्व मान्यवरांच्या हस्ते संविधान प्रतिमेला पुष्प अर्पण करून झाली. राजेश जाधव यांनी सरनामा वाचन केले. तेजस्विनी डोहाळे यांनी प्रस्तावना केली तर मैत्री संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुरज भोईर यांनी लेक लाडकी अभियानाची भूमिका विषद केली. सत्काराला उत्तराला देताना अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांनी लेक लाडकी अभियानासाठी पोषक अशा नव्यानेच पारित झालेल्या शक्ती विधेयकाबद्दल सविस्तर माहिती दिली. 

     लेक लाडकी अभियानांतर्गत महत्वपूर्ण कार्य करत असलेल्या बदलापूर येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार  तज्ज्ञ व ऍक्युपंचरिस्ट  व होप फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रविण निचत,  ह्यांना भारतीय संविधान राष्ट्र गौरव पुरस्कार २०२१च्या पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक अशा विविध क्षेत्रांतून उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

आंबा व काजू मोहर संरक्षण विषयी कार्यशाळा "उमराठ ग्रामपंचायतीच्या स्तुत्य उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद!"

गुहागर- (उदय दणदणे )-ग्रामपंचायत उमराठ आणि कृषी विभाग, गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा व काजू मोहर संरक्षण विषयी कार्यशाळा-२४ डिसेंबर २०२१  रोजी श्री नवलाई देवीची सहाण येथे आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक श्री. सानप साहेब, कृषी अधिकारी चव्हाण साहेब सोबत सहकारी भिसे मॅडम आणि सकपाळ साहेब उपस्थित राहिले होते.

    सदर कार्यशाळेत सरपंच श्री जनार्दन आंबेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले. चव्हाण साहेबांनी प्रस्तावना करताना कार्यशाळेचा उद्देश आणि महत्व समजावून सांगितले तर पर्यवेक्षक श्री सानप साहेब यांनी आंबा व काजू मोहर संरक्षण विषयी महत्वपूर्ण सखोल माहिती दिली.

     सदर कार्यशाळेत सरपंच श्री जनार्दन आंबेकर, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप गोरिवले, उमराठ खुर्दच्या पोलीस पाटील वासंती आंबेकर, नामदेवराव पवार तसेच बहुसंख्य महिला व पुरुष ग्रामस्थ शेतकरी बंधू उपस्थित होते.कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कृषी मित्र - प्रशांत कदम, असिस्टंट नितीन गावणंग आणि डाटा ऑपरेटर  कु. प्रज्ञा पवार या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले!

सन २०१५ च्या शासन निर्णयातील "आजीवन विशेष कार्यकारी अधिकारी" पदासाठीच्या जाचक अटी व शर्ती मध्ये बदल करण्याची राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची मागणी ; संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना निवेदन

मुंबई ( प्रतिनिधी) -महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने विविध आस्थापनेत काम करत असताना महाराष्ट्राच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कामगारांना दरवर्षी "गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार" महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री /कामगार मंत्री यांच्या हस्ते देऊन  गौरविण्यात येते. अशा गुणवंत   कामगारांच्या मागणीनुसार शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र..विकाअ १११५ / प्र.क्र.८८/५ दि. ३१/१२/२०१५ अन्वये राज्यातील गुणवंत कामगारांना" आजीवन विशेष कार्यकारी अधिकारी"पदाच्या  नेमणूक बाबत धोरण ठरविण्यात आलेले असून त्या मधील जाचक अटी व शर्ती मध्ये बदल करण्यात यावा अशी मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री.मुख्य सचिव, प्रधान सचिव ( कामगार) व कल्याण आयुक्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबई यांच्याकडे लेखी निवेदन द्वारे करण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर व राज्य कार्यकारी सदस्य यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.   

    यासंदर्भात अधिक माहिती अशी की,सदर शासन निर्णयाचे परिपत्रक ६. (६.५)  अन्वये  ' गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार "प्राप्त व्यक्ती ना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती ही त्यांच्या वयाच्या ७० वर्षांपर्यंत ग्राह्य धरण्यात आलेली आहे. तसेच शैक्षणिक पात्रता किमान १० वी, वयाची अट ६५ वर्षं व गुन्हे नोंद असलेल्या  गुणवंत कामगारांना विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती न करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. हे चुकीचे असून हा पुरस्कार कामगार कल्याण निधी स्वरूपात ज्या कामगारांच्या वेतनातून सहामाही १२ रुपये कपात होतात.त्यानाच पुरस्कार दिला जातो. यामध्ये शिक्षणाचा काहीही व कोणत्या ही  स्वरुपाचा संबंध येत नाही. कारण पूर्वी नववी पास वरती आयटीआयला प्रवेश दिला जात होता.तसेच गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार विजेता हा आयुष्याच्या अंतापर्यंत / शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक कार्यात हिरीरीने कार्यरत असतात. उतारवयात समाजातील तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देऊन अविरतपणे समाजामध्ये निष्ठेने व प्रामाणिकपणे आदर्श  पिढी तयार करीत असतात. तसेच गुणवंत कामगारांना मिळालेला पुरस्कार हा वयाच्या ६५ वर्षांपर्यंत नसून तो आयुष्यभरासाठी आहे. काही गुणवंत कामगार हे समाजातील सर्वच क्षेत्रातील चळवळीमध्ये न्याय हक्कासाठी कार्यरत असतात. त्यामुळे अपरिहार्य परिस्थिती त त्याचेवरती स्थानिक प्रशासनाकडून गुन्हे नोंदविले जातात ते  कालांतराने मागे घेतले जातात , त्या मुळे गुन्हा नोंद आहे या कारणास्तव त्या ची विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती नाकारणे हे पुर्ण या चुकीचे व अन्यायकारक असून सदर कामगारांना जोपर्यंत त्या गुन्ह्यात न्यायलयाकडून दंड अगर शिक्षा दिली जात नाही तोपर्यंत त्याची सदर पदावरती नियुक्ती करणे आवश्यक व गरजेचे असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

      तरी संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच मंत्रीमहोदयानी  दि. ३१/१२/२०१५ च्या शासन निर्णयामध्ये आवश्यक व योग्य असे बदल करावेत जेणेकरून जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत समाजसेवेचे व्रत स्वीकारुन समाजातील सर्वच घटकांसाठी सातत्याने निष्ठेने व प्रामाणिकपणे कार्यरत असणाऱ्या गुणवंत कामगारांना जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. त्वरीत यांची दखल घेऊन आजीवन विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी काढलेल्या शासन निर्णय त्वरित बदल करण्यात यावा, अशी मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीने असो. चे अध्यक्ष सुरेश केसरकर , राज्य कार्यकारीणी सदस्य व  मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे ( प्रसिद्धीप्रमुख)यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले..

लोक गौरव राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या वतीने गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे यांना " राष्ट्रीय लोक गौरव पुरस्कार "

मुंबई( प्रतिनिधी) विक्रोळी टागोर नगर येथील ज्येष्ठ समाजसेवक, गुणवंत कामगार, वनिता  फाऊंडेशनचे संस्थापक व राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र रत्न प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी सामाजिक, शैक्षणिक, सहकार ,कामगार व  पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या समाजकार्याची दखल लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वाशी येथील साहित्य  मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या राष्ट्रीय सन्मान सोहळ्यात सुप्रसिद्ध उद्योजक शेठ एन.के.टी.  चॅरीटेबल ट्रस्ट चे  अध्यक्ष डॉ नानजीभाई. ठक्कर ठाणावाला, अभिनेत्री साक्षी परांजपे अभिनेता व गायक अरुण कुमार यांच्या हस्ते , ,,राष्ट्रीय लोक गौरव पुरस्कार सन्मानचिन्ह व सन्मानपत्र शाल व  गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले आहे  . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे संस्थापक एन. डी. खान   होते .

         महाराष्ट्र रत्न  प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी सामाजिक , शैक्षणिक , सहकार  ,कामगार  व पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या अनमोल योगदानाची दखल घेऊन अत्यंत मानाचा असा राष्ट्रीय लोकगौरव पुरस्कार देण्यात आला असून त्यांनी विविध क्षेत्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या  जडणघडणीत उल्लेखनीय कार्य करून इतरांच्या प्रगतीमध्ये स्वतःच्या आंतरिक समाधान मानले असून आपल्या कार्याची व  कामगिरीची दखल घेऊन अनेक संस्था-संघटनानी  राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय  दोनशेहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत . तसेच महाराष्ट्र शासन अंतर्गत असणाऱ्या कामगार कल्याण मंडळाचा सन 2013 चा  "गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार " मिळालेला आहे

    अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या प्रभाकर कांबळे यांना लोक गौरव राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सर्व स्तरातून तसेच वनिता फाउंडेशनच्या अध्यक्षा वनिता कांबळे ,व सुनील निकाळे, ज्येष्ठ समाजसेवक  राजेंद्र कांबळे अष्टपैलू कलाकार राजेंद्र सावंत ,राज जाधव आदींनी  अभिनंदन केले आहे .

मेट्रो - ६ या प्रकल्पातील जोगेश्वरी विभागातील बाधित घरे स्थलांतरीत करावी याकरिता पत्रकार शरद बनसोडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई (उदय वाघवणकर )- जोगेश्वरी - पुर्व येथील जोगेश्वरी - विक्रोळी रस्त्यावर स्वामी समर्थ नगर - विक्रोळी ह्या दरम्यान धावणाऱ्या मेट्रो क्र. ६ चे काम सुरू असून जोगेश्वरी - विक्रोळी रस्ता रुंदीकरणाचे देखील काम सुरू आहे.रस्ता रुंदीकरण आणि मेट्रो क्र. ६ च्या प्रकल्पबाधित झोपडपट्टीवासियांना पर्यायी घरे देण्यासंदर्भात ऑक्टोबर २०१९ मध्ये सर्व्हे करून बाधित झोपडपट्टीवासियांची पात्र - अपात्र यादी जाहीर करण्यात आली होती.परंतु दुर्गानगर, प्रतापनगर, दत्तटेकडी, रामवाडी, आनंदनगर ह्या भागातील रस्त्याच्या दुतर्फा असणारी घरे अजूनही स्थलांतरित करण्यात आलेली नाहीत.त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची घरे मोडकळीस आली आहेत.दुरूस्ती देखील करू शकत नाही.काही घरे कोसळण्याच्या स्थितीत आहेत.महानगरपालिका आणि एमएमआरडीएच्या संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करून प्रकल्पग्रस्त बाधित घरे स्थलांतरित करावी, अशी झोपडपट्टीवासियांची मागणी आहे.दरम्यान स्थानिक पत्रकार शरद बनसोडे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

ग्रामपंचायत नवघर हद्दीतील विविध विकासकामांचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते उद्धाटन व भूमिपूजन संपन्न

उरण (विठ्ठल ममताबादे )-उरण तालुक्यातील ग्रामपंचायत नवघर येथे नवघर कमान ते भेंडखळ फाटा रस्ता डांबरीकरण करणे, नावघरपाडा येथे पाण्याची पाईपलाईन टाकणे, नवघरपाडा येथे प्रवेशद्वार कमान बांधणे सदरील कामे ही जिल्हापरिषद सेस फंड, जिल्हापरिषद १५वा वित्त आयोग आणि ग्रामपंचायत १४ वा वित्त आयोग या निधींअंतर्गत मंजूर केली होती. स्वागत कमानीचे काम पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन व पाण्याची लाईन व रस्त्याच्य कामाचे भूमीपूजन सोमवार दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर व काँगेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.

    यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय भोइर, माजी सरपंच  दौलत शेठ घरत, माजी उपसभापती  महादेव बंडा, सरपंच आरती चौगुले, उपसरपंच रवीशेठ वाजेकर, शेकाप नेते मनोहर बंडा, ग्रामसेवक किरण केनी , शाखाप्रमुख नवघर  अविनाश म्हात्रे, शाखाप्रमुख नवघर पाडा  विलास जोशी, मनोज पाटील, युवासेना नवघर विभाग प्रमुख चेतन पाटील, उपशाखाप्रमुख विशाल डाके, टेम्पो युनियन अध्यक्ष रवी पाटील,  संतोष पाटील, माजी उपसरपंच हितेश भोइर,  सुरेश बंडा,सुमती बंडा, जयवंत बंडा, मुकुंद बंडा, प्रशांत बंडा, अतिश बंडा, परेश पाटील, प्रमोद पाटील, दिनेश बंडा, विनोद बंडा, मिलिंद बंडा, किशोर बंडा, महेश पाटील, विनायक बंडा, संदेश भोईर, तसेच शिवसैनिक, शेकाप व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोफत आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

उरण - उरण तालुक्यातील दिघोडे गावात GALAXY MULTI-SPECIALITY HOSPITAL तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते .गावातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे या दृष्टीकोणातून आयोजित केलेल्या या शिबिराला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत दिघोडे तर्फे आयोजन करण्यात आले होते. त्यात मोलाचे सहकार्य महेंद्र घरत अध्यक्ष जय माता दि ग्रुप, निलेश पाटील भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष जासई विभाग,कु. रोहण म्हात्रे, समाज सेवक कु. अभिषेक पाटील, कु.पंकज पाटील ह्यांचा मोलाचा वाटा होता. 

 कार्यक्रमाच्या शेवटी GALAXY MULTI-SPECIALITY HOSPITAL च्या टीमला एक भेट वस्तू देवून त्याचे आभार मानण्यात आले.

करंजा गावात पोलीस चौकी सुरू करण्याची सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांची मागणी

उरण (विठ्ठल ममताबादे )-समुद्र मार्गी दहशतवादी हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहेत. तसेच उरण तालुक्यातील करंजा परिसरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असतानाही त्यांच्या सुरक्षिततेसाठी असलेली पोलीस चौकी गायब करून त्याठिकाणी सपाटीकरण करून ती जागा बळकविण्याचा घाट सुरू आहे. तरी या परिसरातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी पोलिसचौकी पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी करंजा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे पत्र व्यवहारद्वारे केली आहे.

        दहशतवाद्यांचे समुद्रमार्गे हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे समुद्र किनारे सुरक्षित राहण्यासाठी समुद्र किनारी पोलिसचौकी सुरू करण्यात आली होती. करंजा गावातही कोंडवाडा असलेल्या शासकीय जागेत काही वर्षांपूर्वी पोलीसचौकी सुरू करण्यात आली होती. परंतु कालांतराने ही चौकी आजतागायत बंद पडलेली आहे.  बंद असलेली पोलीस चौकी सपाट करून त्याठिकाणी सध्या टँकर उभे करण्यासाठी होत आहे. भविष्यात ती जागा बळकाविण्याचा घाट काहींचा असल्याचे बोलले जात आहे.

   करंजा गावची लोकसंख्या आता २५ ते ३० हजारांच्या घरात पोहचली आहे. त्यात करंजा परिसरालगतच द्रोणागिरी नोडची उभारणी होत  इमारतींचे जाळे विणले जात आहे. त्यामुळे भविष्यात उरण पोलीस ठाण्यावर त्याचा अतिरिक्त भार पडेल.तसेच समुद्रमार्गे होणारे दहशतवादी हल्ले विचारात घेता करंजा गावातील गेली अनेकवर्षे बंद असलेली पोलिस चौकी पुन्हा नव्याने सुरू करण्यात यावी. अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.

   भारत देशावर समुद्रमार्गे होणारे दहशतवादी हल्ले विचारात घेता व करंजा परिसराचा दिवसेंदिवस वाढत चाललेला विस्तार व लोकसंख्या याचा विचार करता करंजा गावानजीक समुद्रकिनारी पोलीस चौकी नाही तर पोलीस ठाणेच नव्याने सुरू करण्याची नितांत गरज आहे. तरी करंजा ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून पोलीस चौकी लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी पत्रव्यवहाराद्वारे सचिन डाऊर-सामाजिक कार्यकर्ता तथा अध्यक्ष

रमेशशेठ डाऊर सामाजिक प्रतिष्ठान उरण यांनी पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे केली आहे

खोपटे नवनगर अधीसूचित क्षेत्राला (प्रकल्पाला )उरणमधील ग्रामपंचायतीचा तीव्र विरोध ; सुमारे 4 हजार वयक्तिक हरकती कार्यालयात दाखल

उरण (विठ्ठल ममताबादे )-महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने खोपटा नवनगर अधिसूचित क्षेत्रासाठी 32 गावे (रायगड जिल्ह्याच्या पनवेल तहसीलची 7 गावे आणि उरण तहसीलची 25 गावे) विकसित करण्यासाठी सिडकोने विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नैना प्राधिकरनाची नेमणूक केली आहे.त्यानुसार सर्वसमावेशक व उत्तम दर्जाची सोयी-सुविधांनी परिपूर्ण विकास करण्यासाठी खोपटा नवनगर अधिसूचित क्षेत्रातील 32 गावाचा विकास आराखडा तयार करण्याचा इरादा सिडकोच्या नैना प्राधिकरनाने जाहीर केला आहे.मात्र त्यास उरण मधील सर्व शेतकऱ्यांचा, ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे.

   याचाच एक भाग म्हणून सुमारे चार हजार वयक्तिक हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.यापूर्वी दोन ते तीन हजार हरकती दाखल झालेल्या आहेत. अनेक ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेत याबाबत विरोध करून तसे ठरावही घेण्यात आले आहेत.प्रत्येक गावात, प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये जनजागृती सुरु आहे

      दि 28 डिसेंबर 2021रोजी कोप्रोलीचे सरपंच श्रीमती  अलका म्हात्रे ,  उपसरपंच विपूल म्हात्रे , आवरेचे सरपंच श्रीमती निराबाई पाटील , सरपंच केळवणे  संदिप घरत यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते रूपेश पाटील, गुरूनाथ गावंड ,  विश्वनाथ म्हात्रे , अनिल म्हात्रे,चंद्रशेखर ठाकूर , रोशन पाटील , प्रकाश पाटील , कुलदीप नाईक,उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील,पंकज ठाकूर,कोप्रोली, आवरे, कळंबूसरे, केळवणे या ग्रामपंचायती सह पाणदिवेचे ग्रामस्थ आदींनी प्रांजली केणे -सिडको मुख्य नियोजनकार (नैना) बेलापूर, नवी मुंबई यांच्या कार्यालयात जाऊन खोपटे नवनगर प्रकल्पास विरोध म्हणून सुमारे चार हजार वयक्तीक हरकती दाखल केल्या आहेत.

[[ सिडकोने 95 गावातील जमिनी संपादित करून त्यांना भूमिहीन केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी गावांचे विस्थापन केलं. आजही त्यांचे योग्य रीतीने पुनर्वसन झालं नाही. प्रकल्पाच्या नावाने संपादित जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचे काम सिडको करत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते न सोडवता त्यांना न्यायासाठी संघर्ष करावा लागत आहे. सिडको किंवा तिचेच अपत्य असलेल्या नैनाने उरण पनवेल मधील शेतकऱ्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी राखून ठेवलेल्या जमिनींचे नियोजन करण्याची गरज नाही. वेळ पडली तर इथला शेतकरी सिडकोचे दुकान बंद करायला मागे पुढे पाहणार नाही. सिडको नैनाच्या विरोधात इथला शेतकरी रस्त्यावरील आणि न्यायालयीन लढाई लढण्यास तयार आहे. इथला शेतकऱ्यांनी याआधी रिलायन्ससारख्या बड्या भांडवलंदाराला पाणी दाखवलं आहे.]]

- रूपेश पाटील,सामाजिक कार्यकर्ते, उरण

साईभक्त नवजागृत ग्रुप, कासार कोळवणचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा ; युयुत्सु आर्ते आणि मराठी टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत काब्दुले यांची प्रमुख उपस्थिती

कोकण (शांताराम गुडेकर/मोहन कदम )  रत्नागिरी जिल्हामधील संगमेश्वर तालुक्यातील कासार कोळवण गावच्या श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ पुरस्कृत साईभक्त नवजागृत ग्रुप, कासार कोळवण या तरुण मुलांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या  संघटनेच्या दिनदर्शिका २०२२ चा प्रकाशन सोहळा  साई मंदिर , कासार कोळवण येथे सामाजिक कार्यकर्ते श्री. युयुत्सु आर्ते आणि मराठी टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध अभिनेते श्री. प्रशांत काब्दुले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी कासार कोळवण गावच्या सरपंच सौ.मानसी करंबेळे, कुणबी युवा संगमेश्वरचे सेक्रेटरी कु. वैभव तोरस्कर , ग्रा.पं. सदस्या सौ.वनिता करंबेळे, सौ.श्रद्धा करंबेळे, सौ.दीक्षिती करंबेळे,पोलीस पाटील श्री. महेंद्र करंबेळे, जेष्ठ नागरिक श्री.शंकर तोरस्कर,श्री राजाराम करंबेळे,श्री.तुकाराम करंबेळे , श्री. रोशन कदम आणि गावातील प्रतिष्ठित मान्यवर तसेच कासार कोळवण ग्रामस्थ उपस्थित होते. 

            कार्यक्रमाची सुरुवात कुळवाडी भूषण रयत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली.उपस्थित मान्यवरांनी नवजागृत ग्रुप च्या सर्व युवा कार्यकर्त्याना मोलाचं असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शैलेश दळवी यांनी केले. कार्यक्रमाला साईभक्त नवजागृत ग्रुप चे सर्व कार्यकर्ते खूप तळमळीने मेहनत घेतली.त्या सर्वांचे  आभार मानण्यात आले तसेच ज्यांनी या दिनदर्शिकेस जाहिराती दिल्या अशा जाहिरातदारांची नावे वाचून त्यांचे देखील आभार मानण्यात आले.व सर्व उपस्थित मान्यवरांचे कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि साईभक्त नवजागृत ग्रुप चा उत्साह द्विगुणित केला त्या बद्दल आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१

घाम फोडणारे प्रश्न विचारा,सरकारी यंत्रणा सुधारेल : निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे ; सांगलीत पत्रकारांची कार्यशाळा उत्साहात

सांगली : अधिकारी सांगतील तेवढेच छापण्याची पद्धत बदलून नागरिकांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना घाम फोडणारे प्रश्न पत्रकारांनी विचारायला हवेत. त्यासाठी कायदे व नियमांचा सुक्ष्म अभ्यास करायला हवा, असे मत राज्याचे निवृत्त प्रधान सचिव महेश झगडे यांनी व्यक्त केले. 

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि ग्राहक पंचायत यांच्या वतीने टिळक विद्यापीठाच्या सभागृहात  ‘प्रखर पत्रकारितेसाठी चौथा स्तंभ अधिक धारदार’ या विषयावर पत्रकारांची कार्यशाळा पार पडली. यावेळी जिल्हा ग्राहक पंचायतीचे पालक भास्करराव मोहिते, टिळक विद्यापीठाचे विभागप्रमुख डॉ. हेमंत मोरे, ज्येष्ठ पत्रकार बापुसाहेब पुजारी, परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी उपस्थित होते. 

    झगडे म्हणाले की, जगातील लोकशाहीची आरोग्य तपासणी दरवर्षी केली जाते. दुर्दैवाने जगात लोकशाही ढासळत चालली आहे. प्रसार मध्यमांना स्वातंत्र्य नाही तिथे वेगाने लोकशाही ढासळत असल्याचे निरीक्षण आहे. त्यामुळे पत्रकारांची जबाबदारी अधिक वाढत आहे. शासकीय यंत्रणा लोकाभिमुख आहेत का, याबाबत तपासणी होते, त्यात देखील घसरण होत आहे. लोकशाहीचे ध्रुवीकरण थांबवायचे असेल तर माध्यमांनी महत्वाचे प्रश्न प्रशासनाला, लोकप्रतिनिधीना विचारायला हवेत. 

     लोकांचे प्रश्न मांडताना अधिकाऱ्यांची कायदेशीर कोंडी करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. आक्रमकपणे बोलण्यापेक्षा कायद्याच्या तराजूत आक्रमकपणे प्रश्न मांडायला हवेत. त्यासाठी कायद्यातील तरतुदी, शासनाची परिपत्रके, प्रशासकीय नियम यांच्याबाबतीत माहिती घेतली पाहिजे. सध्या अधिकारी सांगतील तेवढीच माहिती आपण देतो. अधिकारीही त्यांना सोयीची वाटेल अशीच माहिती माध्यमांना पुरवितात. पत्रकार नियम व कायद्याबाबत जागरुक असणे अधिकाऱ्यांना नुकसानकारक ठरु शकते. असे त्यांना वाटते पण धारदार प्रश्न केल्याशिवाय त्यांची कारकीर्द बहरतात नाही आणि जनतेचे काम होणार नाही. प्रत्येक विभागात तपासणी होते, पुढे काय झाले, किती, कोणत्या त्रुटी आढळल्या, कारवाई काय हे विचारले पाहिजे. 

    महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार वृत्तपत्रांना माहिती देणे आयुक्तांना बंधनकारक आहे, तरीही राज्यातील अनेक आयुक्त पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ करीत असतात. अशाठिकाणी कायदेभंगाविरोधात चळवळ उभी रहायला हवी. 

       अधिवेशनासह महापालिका, जिल्हा परिषदेच्या सभांना पत्रकारांना उपस्थित राहण्याची मुभा असते, तर जिल्हा नियोजन समितीला पत्रकारांना का मज्जाव केला जातो, हे चुकीचे असून पत्रकारांनी संघटीत दबाव निर्माण केला पाहिजे. सार्वजनिक बैठका, सभा या कधीही गोपनीय नसतात. मी सामान्य प्रशासनाचा सचिव असताना महिन्याच्या पहिल्या सोमवारी ठराविक वेळेत शासकीय कार्यालयांमधील कोणतीही कागदपत्रे पाहण्यासाठी खुली करण्याचे परिपत्रक काढले होते. याची माहिती कोणालाही नाही. कायद्याने अधिकारी कोणती माहिती लपवू शकत नाहीत. तरीही ते लपवितात. लोकांनी, पत्रकारांनी सोमवारी शासकीय कार्यालयात जाऊन माहिती मागावी. तो त्यांचा हक्क आहे. 

     बऱ्याच खात्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामाचा जास्त एरिया मिळावा म्हणून पदे भरली जात नाहीत. अन्न व औषध प्रशासनाच्याही केवळ कारवाईबाबतच्या बातम्या येतात, मात्र त्यांच्यावर कायद्याने दिलेली जबाबदारी ते पार पाडताहेत का, याची चौकशी पत्रकार करीत नाहीत. लोकांच्या मुखात जाणारे प्रत्येक प्रकारचे खाद्य हे तपासणी होऊन यायला हवे. मात्र भेसळीची तक्रार आल्यानंतरच अधिकारी जागे होतात, त्यावर प्रस्न उठवला पाहिजे असे ते म्हणाले. 

   यावेळी सूत्रसंचालक कुलदीप देवकुळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष बलराज पवार, सरचिटणीस प्रवीण शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष गणेश कांबळे, महादेव केदार, विकास सूर्यवंशी, घनश्याम नवाथे, विनायक जाधव, नंदू गुरव, तानाजी जाधव, चंद्रकांत गायकवाड, शैलेश पेटकर अक्रम शेख, अमोल पाटील, आदित्यराज घोरपडे, किशोर जाधव, किरण जाधव, प्रशांत साळुंखे आदींनी परिश्रम घेतले.


लोकांचे प्रश्न मांडायला हवेत

कितीही अडचणी असल्या तरी कायद्याच्या आधारावर लोकांचे प्रश्न सोडविता येतात, मात्र त्यासाठी चौथा स्तंभ अधिक सजग असायला हवा. त्याचा दबाव प्रशासकीय यंत्रणेवर असायला हवा. तरच लोकांची कामे होती. देशातील कोणत्याही नेत्याला लोकांची कामे होऊ नयेत, असे कधीच वाटत नाही, मात्र अधिकारीच त्यांची दिशाभूल करीत असतात. लोकशाही दिन, जनता दरबार अशी खेळणी देऊन राजकारण्यांना भुलवतात. अशा बाबतीत गाव ते मंत्रालय अशी अपिलाची व्यवस्था न करता प्रश्न ज्या त्या पातळीवरच सोडवण्याची कार्य संस्कृती निर्माण झाली पाहिजे. 

जि. प. सीइओ व्हायला आवडेल

येण्याची पुन्हा संधी मिळाली तर काय व्हायला आवडेल असा प्रश्न कार्यशाळेत विचारला गेला. त्यावर उत्तर देताना महेश झगडे म्हणाले, जिल्हा परिषद सीइओ व्हायला आवडेल. महाराष्ट्राचे वेगाने नागरीकरण होत आहे ते लोकांची असेल तर गाव पातळीवर काम करून घ्यावे आर्थिक दृष्ट्या सक्षम केली रोजगार उद्योग व्यवसाय येथेच उभा केले तर नागरीकरण आणि लोकांचा शहराकडे जाण्याचा ओढा थांबू शकेल मला तेथून काम करायला आवडेल.


माजी पंतप्रधान , भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त "काव्यांजली कार्यक्रम" उस्फुर्त प्रतिसादात संपन्न

वेंगुर्ला  - येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान  भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त काव्यांजली या कार्यक्रमातून त्यांच्या कवितांचे अभिवाचन करून अनोखी श्रद्धांजली देण्यात आली. या कार्यक्रमामध्ये वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाड़्मय मंडळ, बॅ. खर्डेकर महाविद्यालय, वेताळ प्रतिष्ठान, किरात ट्रस्ट, नगरवाचनालय इत्यादी संस्थांचा सहभाग होता. कॅम्प येथील घोडेबाव गार्डनमध्ये  खुल्या रंगमंचावर झालेल्या काव्यांजली या कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळाला.  लेखिका वृन्दा काम्बळी व किरातच्या संपादिका सीमा मराठे यांच्या ओघवत्या भाषेतील निवेदनाने कार्यक्रमाला रंगत आणली. यातील कवितांची निवड व कवितेतील आशयाला पूरक अशा निवेदनातील लेखन वृन्दा काम्बळी  यानी केले होते. 

      प्रथम नगराध्यक्ष  राजन गिरप व विश्व हिंदु परिषदेचे प्रांताचे सेवा प्रमुख डाॅ. राजन शिरसाठ यांच्याहस्ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या  प्रतिमेला पुष्पहार  घालून  उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारी सदस्य शरदजी चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,उपनगराध्यक्षा  शीतल आंगचेकर ,  तालुकाध्यक्ष  सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेविका साक्षी पेडणेकर व कृपा मोंडकर, महिला मोर्चाच्या वृन्दा  गवंडळकर,  बुथप्रमुख नितीश कुरतडकर , ओंकार चव्हाण  इत्यादी तसेच अनेक  काव्यरसिक उपस्थित होते. 

     उत्तरोत्तर रंगत गेलेल्या काव्यांजली या कार्यक्रमात कवितांचे वाचिक अभिनयातून केलेले उत्तम सादरीकरण आणि कार्यक्रमाला एका सूत्रात गोवणारे ओघवते निवेदन ही वैशिष्ट्ये होती. शैलेश जामदार, पांडुरःग कौलापुरे,  प्रतिक्षा भगत, प्रा. पी. जी. देसाई, फाल्गुनी नार्वेकर, वासूदेव पेडणेकर, प्रा. आनंद बांदेकर,  संजय पाटील, संजय पुनाळेकर,  अवधूत नाईक,  अजित राऊळ, कैवल्य पवार, प्राजक्ता आपटे, महेश बोवलेकर, प्रा. सुरेखा देशपांडे, डाॅक्टर पूजा कर्पे, स्वप्नील वेंगुर्लेकर,  राजश्री परब, इत्यादीनी कवितांचे अभिवाचन केले. पि. के. कुबल व आदित्य  खानोलकर  यानी अटलजींवरील स्वरचित कविता सादर केली. 

     डाॅ.  राजन शिरसाट यानी मनोगत व्यक्त केले.  नगरसेवक प्रशांत  आपटे यानी शेवटी आभार मानले.



सायन ते मुलुंड येथील कविंसाठी कविता वाचन स्पर्धा

मुंबई : स्नेहदा संस्थेच्या  वतीने  बुधवार  दि.२६ जानेवारी २०२२  रोजी  सायं. ४ ते ८  या वेळेत  सायन  ते  मुलुंड  या  परिसरातील  कविंसाठी  कविता वाचन  स्पर्धा  आयोजित  करण्यात  येत  आहे.  कवींनी  आपल्या  दोन कविता  दि. १५ जानेवारी २०२२ पर्यंत  खालील  पत्तावर  स्वहस्ताक्षरात  लिहून  पठवाव्यात, असे  स्नेहदाचे  संस्थापक  श्री. उमाकांत  सावंत  यांनी  आवाहन  केले  आहे. स्पर्धेत  सहभागी  होणाऱ्या  स्पर्धकांना  कोविड  साथीचे  शासकीय  नियम  बंधनकारक  राहतील. प्रसंगी  स्पर्धेत  बदल  करण्याचे  अधिकार  संस्था  राखून  ठेवीत  आहे.

 पत्ता - क्षितिज  को-आप. हौसिंग  सोसायटी, इमारत  क्रमांक ४१०/क/४८६, वामनराव  पै  उद्याना  समोर ,टागोर  नगर ,  विक्रोळी (पूर्व ) मुंबई -४०० ०८३. भ्रमणध्वनी  क्रमांक - ९९३०६६५८२९. येथे  संपर्क  साधावा.

जीवनधारा संघाचे कार्यकर्ता संमेलन भांईदर येथे उत्साहात संपन्न

भांईदर(नुतन भोईर)- सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या जीवनधारा संघाचे कार्यकर्ता संमेलन भांईदर येथील कार्यालयात संघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत उत्साहात संपन्न झाले. यावेळी सर्व कार्यकर्त्यांना मनमोकळेपणाने बोलण्याची संधी मिळाली. या अनुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पांण्डे यांनी शनिवार १९मार्च २०२२रोजी ४था स्वामी विवेकानंद ग्लोबल अवार्ड सोहळा आयोजित करण्याची घोषणा केली. याप्रसंगी अभिनेत्री गुरु मां पुजा शर्मा,संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पांण्डेय,राष्ट्रीय सल्लागार मनोज झा,राष्ट्रीय कार्याध्यक्ष बिरजु चौधरी, राष्ट्रीय महिला अध्यक्षा अधिवक्ता किरण गुप्ता, राष्ट्रीय युवा अध्यक्षा रुचिता त्रिपाठी, महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव आशा राजपूत, महाराष्ट्र प्रदेश सचिव बृजलता वर्मा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेश सुराणा,महाराष्ट्र प्रदेश प्रभारी शेषमनी यादव, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा कंचन सिंघ, महाराष्ट्र युवा अध्यक्ष सुशिल मिश्रा,महाराष्ट्र प्रदेश फील्म पॅनल सचिव अभिनेता सुनिल तिवारी, पालघर जिल्हा कार्याध्यक्ष राकेश दुबे, चांदीवली विधानसभा सचिव विजय केसावलेकर, चांदीवली विधानसभा उपाध्यक्ष आरिफ अली, कांदीवली विधानसभा अध्यक्ष रामसिंगर पटेल, समाजसेविका प्रमिला गुप्ता, समाजसेवक प्रभाकर जाधव,व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जीवनधाराच कार्य उत्कृष्टच होईल अस गौरवोदगार राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पांण्डे यांनी काढले.व सर्व मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

शिव प्रज्ञा आयोजित भव्य सत्कार सोहळ्यात दिग्गजांनी लावली हजेरी,तर सारेगमप लिटील चॅम्स गौरी गोसावी ठरली खास चर्चेचा विषय

बदलापुर(गुरुनाथ तिरपणकर)-शिवप्रज्ञा ही महाराष्ट्र भरात महिला उद्योजक आणि व्यावसायिक घडविण्यासाठी बांधिलकी जपत पुन्हा स्वराज्याच्या ध्यासाने उदयास आलेली एक चळवळ आहे.त्यांनी बनविलेल्या प्राॅडक्सचे लाॅचिंग महाराष्ट्राची सारेगमप लिटील चॅम्सची महाविजेती गौरी गोसावी हीच्या हस्ते नुकताच झाले. हा कार्यक्रम बदलापुर पश्चिम,भारत काॅलेज समोरील,हेंद्रेपाडा फिटनेस सेंटर मध्ये संपन्न झाला. याप्रसंगी शिवप्रज्ञा आयोजित भव्य सत्कार सोहळा पार पडला. सारेगमप लिटील चॅम्स विजेती सेलिब्रेटी स्टार गौरी गोसावी हीचा सत्कार समारंभ शिवप्रज्ञाचे संचालक आदर्श तायडे आणि आपला माणूस चे संपादक विनीत मोरे यांनी आयोजित केला होता. ख-या अर्थाने हा दीवस बदलापुरकर नागरीकांसाठी मोलाचा ठरला कारण या कार्यक्रमात आपल्या कार्याने जगाला भुरळ पाडणारे अनेक व्यक्तीमत्वे आणि त्यांचा सहवास लाभला. जगविख्यात चित्रकार सचिन जुवाटकर, आपल्या व्यवसायाला देशाच्या बाहेर पोहचविणारे बदलापुरचे सुपुत्र निमेष जनवाड, समाजसेविका ते मिसेस इंडीया ब्रेव्ह ठरलेल्या गीता गडकर,शिवसेनेच्या महिला उप शहर प्रमुख अर्चना ताई सूरुडकर,जेष्ठ पत्रकार,लेखक,आणि समाजसेवक आदर्श तायडे, पत्रकार विनीत मोरे अशा अनेक मान्यवरांचा सत्कार शिव प्रज्ञा आयोजित भव्य सोहळ्यात पार पडला.मराठी महिलांना पुढे आणत त्यांना उद्योग आणि व्यवसायाची प्रेरणा देऊन त्यांच्या हक्काच्या भूमीत न्याय मिळावा यासाठी समाजसेवक आदर्श तायडे आणि त्यांचे सहकारी विनीत मोरे गेल्या अनेक वर्षांपासून झगडत असून त्यांच्या प्रयत्नांना यश मिळताना दीसत आहे. शिव प्रज्ञा ही जनसामान्य माणसाची चळवळ होऊन लवकरच प्रत्येक घराघरात पोहचेल यासाठी शिव प्रज्ञा परिवाराला सहकार्य,पाठबळ व शुभेच्छा मिळत आहेत.

वाढत्या व्यसनाधीनतेबद्दल सामीलकी नव्हे तर बांधीलकी दाखवायला पाहिजे.- डॉ आशिष देशपांडे

 

मुंबई (रवींद्र मालुसरे )- मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईच्या वतीने "आजचा दिवस फक्त" या पुस्तक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दारूमुळे जैविक म्हणजेच शरिराची अपरिमित हानी होते व मनावरही तितकाच गंभीर परिणाम होतो. मात्र ही हानी तेवढ्यापुरतीच मर्यादित न राहता नातेसंबंध देखील पार विस्कळीत होतात. परिणामी, आधी कुटुंबापासून व नंतर समाजापासून मद्यपीडित तुटतात आणि त्यानंतर निरनिराळ्या समस्यांच्या गर्तेत ते  खोल रुतत जातात. जगातील आरोग्याशी संबंधित बहुतांश नामांकित संस्थांनी, 'मद्यपानाचे व्यसन हा एक आजार' असल्याचे म्हटले आहे. त्यातही अनुवंशिकतेतून हा आजार बळावतो. असेही समोर आले आहे. मद्यपान करणाऱ्या सर्वांनाच मद्यपानाचे व्यसन जडत नाही. तर त्यातील ८ ते १० टक्के मद्यपींनाच हे व्यसन जडते, हे पुरते सिद्ध झाले आहे. मेंदुतील विशिष्ट जनुकीय रचना-स्थिती ही या आजाराला कारणीभूत ठरते आणि अशाच व्यक्ती व्यसनी होतात. एखादी व्यक्ती व्यसनी होण्यामध्ये ४० टक्के जीन्स व ६० टक्के परिस्थिती कारणीभूत ठरते. असे उदगार ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ आशिष देशपांडे यांनी व्यक्त केले.

     व्यसनातून मुक्त होऊन गेली ३० वर्षे व्यसनमुक्ततेसाठी विनामोबदला कार्य करणाऱ्या रमेश सांगळे यांनी लिहिलेल्या 'आजचा दिवस फक्त' या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच डॉ आशिष देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, मिरॅकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष मनराय, भाजपा युवामोर्चा दक्षिण मुंबई अध्यक्ष सन्नी सानप, मैत्री प्रकाशनाच्या मोहिनी करांडे, अजय चौरासिया महामंत्री मलबार हिल, शांता दुर्गा चॅरिटेबल ट्रस्टचे सहसचिव भूषण जाक, रामशेठ साळवी, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक सुरेंद्र तेलंग हे उपस्थित होते. त्यांनीही या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

      डॉ देशपांडे पुढे असेही म्हणाले की, कामाच्या ठिकाणी गैरहजेरीचे तब्बल ४० टक्के कारण हे मद्यपान असून, दोन तृतीयांश घरतुगी हिंसा व एक तृतीयांश आत्महत्या या मद्यपानाच्या प्रभावाखाली होतात.  धक्कादायक कारण म्हणजे १९९० मध्ये मद्याचा पहिला घोट घेण्याचे वय हे १९ होते, २००५ मध्ये ते १६ वर आले आणि आता २०१८ मध्ये हे वय १३-१४ वर्षांपर्यंत आले आहे. याचा गांभीर्याने विचार करुन कृती करण्याची वेळ आली आहे, असे मत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे (मुंबई) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आपल्याला व्यसनाधीनते बद्दल सामीलकी दाखवून चालणार नाही तर बांधीलकी दाखवायला पाहिजे. मद्याचा पहिला घोट घेणाऱ्यांचे वय आता १३-१४ पर्यंत खाली आले आहे आणि जेवढ्या कमी वयामध्ये मद्यपान सुरू होते, तेवढे त्याचे घातक परिणाम होतात. या पुस्तकाचे खरे यश हे पुस्तक विकलं जाण्यात नाही. तर वाचल्यानंतर अस्वस्थ होत कुणाला काहीतरी मिळण्यासारखे आहे. व्यसनाधीन माणसाला किंवा त्यांच्या पालकांना अंधारात ध्रुव ताऱ्यासारखे दिशा देण्याचे काम हे पुस्तक करणार आहे. आपण सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न केला तर हे पुस्तक पैशाच्या यशामध्ये न मोजता त्याच्या कामाच्या यशामध्ये मोजता येईल. आपण जो टॅक्स भरतो त्याच्या पैकी ८० टक्के टॅक्स हा स्वास्थावर खर्च होतो. मित्रांनो यातील ८० टक्के खर्च हा दारू आणि व्यसन याच्याशी निगडित आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या आल्या आणि समाजातली नशा संपली तर हा पैसा शिक्षणासाठी इतर विकासाबाबतीतल्या गोष्टींसाठी खर्च होईल. अशी अपेक्षा रास्त नाही का ?

      कार्यक्रमात शाहीर विजय लक्ष्मण कदम यांनी व्यसनमुक्तीविषयी गीत सभिनय सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण खटावकर तर आभार प्रदर्शन आदेश गुरव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ताराम गवस, प्रशांत भाटकर, नारायण परब, सुदेश दुखंडे यांनी विशेष प्रयत्न केले.

वेद फाउंडेशन बालिका समवेत नाताळ साजरा ; बालिकांना वस्त्र तथा पौष्टिक आहाराचे वाटप

मुंबई(शांताराम गुडेकर)  डिसेंबर गोरेगाव स्थित विशेष व्याधिग्रस्त बालिकांसाठी स्थापित आश्रमाला प्रत्यक्ष भेट देऊन बालिकांना वस्त्र तथा पौष्टिक आहाराचे वाटप वेद फाउंडेशन द्वारा करण्यात आले.कवयित्री, लेखिका तथा बृ.मनपा कामराज नगर हिंदी शाळेच्या शिक्षिका सौ. मंजू सराठे आणि बृ.मनपा. एन वाॅर्डचे डॉ.वैभव गजानन पाटील यांच्या निधी द्वारे उपलब्ध वस्त्र आणि पौष्टिक आहाराचे वाटप या प्रसंगी करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मान.श्री स्वप्निल नंदकुमार वाडेकर, संस्थेच्या सल्लागार सन्मा.सौ.सोनल गांधी, साई परिवाराचे अध्यक्ष सन्मा.श्री मंगेश रासम तथा अंकुश रासम उपस्थित होते.श्रीमती सराठे यांनी बालिकाशीं संवाद साधला आणि चॉकलेट्सचे वाटप करून त्यांच्यासोबत नाताळ साजरा केला.संस्था अध्यक्षांनी या स्तुत्य उपक्रमासाठी सौ.मंजू सराठे आणि डाॅ.वैभव जी.पाटील यांचे सन्मानपत्र देऊन गौरव करीत आभार मानले.

पंचरत्न मित्र मंडळाच्या वार्षिक दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन

मुंबई(शांताराम गुडेकर)

          पंचरत्न मित्र मंडळाच्या वार्षिक दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन आज दि २७/१२/२१ रोजी आरसीएफचे (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक) श्री.श्रीनिवास मुडगेरिकर साहेब, (संचालक वित्त) नजत शेख मॅडम,(संचालक टेक्निकल)श्री मिलिंद देव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री.अशोक भोईर, सचिव श्री.प्रदीप गावंड, तसेच मंडळाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी मा. सी एम डी साहेबांनी सर्वांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सर्वांनी कोविड नियमांचे पालन करून आरसीएफच्या उन्नती  मध्ये हातभार लावण्याच्या सूचना दिल्या.

पंचरत्न मित्र मंडळाच्या वार्षिक २०२२ च्या दिनदर्शिकेचे महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री सन्मा.श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई(शांताराम गुडेकर)      पंचरत्न मित्र मंडळाच्या वार्षिक २०२२च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन  दि.२६/१२/२१ रोजी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री सन्मा.श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक भोईर, सचिव श्री प्रदीप गावंड, सहसचिव श्री वैभव घरत, सल्लागार श्री हनुमंता चव्हाण, व्यवस्थापक मा.सं.आरसीएफ श्री अश्विन कांबळे साहेब, अधिकारी होर्टिकल्चर श्री अमर आंबेकर, तसेच कविता शिकतोडे मॅडम व संतोष शिकतोडे सर (संचालक जी एस के महाविद्यालय खडवली) उपस्थित होते.

संतोष अगबुल प्रतिष्ठानचा अनोखा विक्रम एका वर्षात म्हणजे १ जानेवारी २१ ते २६ डिसेंबर २०२१ दरम्यान तब्बल २००० पेक्षा जास्त रक्त पिशव्या जमा विक्रम करणारे पहिले प्रतिष्ठान म्हणून नावलौकिक

नालासोपारा( दीपक मांडवकर /शांताराम गुडेकर)   संतोष अबगुल प्रतिष्ठान दापोली- मंडनगड-खेड व रत्नागिरी जिल्या विभाग वसई नालासोपारा व विरारच्या माध्यमातून चौथ्यांदा के. एम. पि. डी विद्यालय येथेनालासोपारा येथे रविवारी २६ डिसेंबर २०२१ रोजी पुन्हा ५०१ रक्तदात्यांनी रक्त देऊन इतिहासीक रक्तदान शिबीरची नोंद केली. तर  मागील वेळी रविवारी ८ ऑगस्ट २०२१ रोजी पुन्हा एकदा ६११ रक्तदात्यांनी रक्त देऊन इतिहासीक रक्तदान शिबीरची नोंद केली होती.रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान, रक्तदान हेच जीवनदान मानले जात असताना आताच्या काळात प्रत्येक रुग्णालयात रक्तचा तुटवढा भासत आहे. विविध संस्था रक्तदान शिबिरचे उपक्रम राबवत असून देखील ही रक्तदानाची समस्या दिवसांन दिवस वाढत आहे. अशातच संतोष अबगुल प्रतिष्ठांचे प्रेरणास्थान श्री. संतोष अबगुल यांच्या माध्यमातून दर वर्षी विविध सामाजिक व वैद्यकीय, महिलान साठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी असे विविध मोफत उपचार उपक्रम राबवत असताना सामाजिक बांधिलकी व नागरिकांना आपुलकीचे नाते जोडले जात आहे. (जेथे समस्या तेथे संतोष अबगुल प्रतिष्ठान) अशी प्रतिमा जनतेने आपल्या मनात उतरवली असल्याचे आजच्या रक्तदान योदनाने प्रदर्शित झाले. रविवारी सकाळ पासूनच के.एम. पि. डी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज तुलिंज रोड नालासोपारा पूर्व येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराने प्रामुख्याने सर्व सभासदांना इछुक नागरिकांनी देखील सहभाग घेतला या कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी ७.३० वाजता झाला तर श्री संतोष दादा अगबुल व माजी सभापती श्री. निलेशजी देशमुख साहेब.  यांनी सर्वात मोलाचे सहकार्य केले तर अविनाशजी जाधव, शिवसेना युवा नेते श्री. पंकजजी देशमुख, डॉ संजयजी जाधव, अवधूत लिंगायत, व प्रतिष्ठाण चे सदस्य या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

             कोरोना काळात रक्त उपलब्ध होत नाही म्हणून रुग्णाच्या नातरवाईकांची तारांबळ होते. हे पाहून व त्याची उणीव भासू नये म्हणून संस्थापक श्री संतोष अबगुल यांच्या माध्यमातून संतोष अबगुल प्रतिष्टान दापोली- मंडनगड-खेड व रत्नागिरी जिल्ह्या विभाग वसई नालासोपारा व विरारच्या माध्यमातून तिसऱ्यांदा भव्य रक्तदान शिबिरा करण्यात आले.या प्रतिष्ठान च्या सहयोगात महात्मा गांधी सेवा मंदिर हॉस्पिटल ब्लड बँक नवी मुंबई, साथीया ब्लड बँक, नवी मुंबई, सायन ब्लड बँक आणि विजया ब्लड बँक यांनी सहयोग दिला.या शिबिरात प्रमुख्याने सात ते आठ तालुक्यातील रक्तदातांनी सहभाग घेतला. त्यात महिलानी  सुद्धा उसूक्त पणे सहयोग दिला. संतोष अगबुल प्रतिष्ठान हे केवळ प्रतिष्ठान नसून आपच्या परिवाराचा हिस्सा असल्याचे  श्री. संतोषजी अगबुल यांनी मनोगत वेक्त केले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असता ५०१ रक्त दाता लाभले. असा ईतिहास नालासोपारा परिसरात प्रथमच या प्रतिष्ठानने केल्याचे संबोधले जाते आहे. या कार्यक्रमात सर्व सभासदांनी शंभर टक्के प्रतिसाद देऊन कार्यक्रम यशस्वी केला.प्रतिष्ठानचे प्रेरणास्थान श्री. संतोष अगबुलयांनी स्वःता वयक्तिक आभार मानले. प्रत्येकाला कोणत्याही क्षणी कोणहीती मदत लागल्यास मी सदैव आपल्या सेवे साठी हजर राहण्याचे आश्वासन दिले.

गाव विकास समितीमार्फत राबविण्यात येणारा जनतेचा जाहीरनामा हा उपक्रम सामान्य माणसाचा आवाज बळकट करेल ; स्वयंभू मार्लेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित रेवाळे यांचा उपक्रमास पाठिंबा

कोकण (शांताराम गुडेकर) गाव विकास समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणारा जनतेचा जाहीरनामा हा उपक्रम ग्रामीण भागात सामान्य माणसाला ताकद देणारा असून सामान्य माणसाच्या सूचनांचा आदर करून निर्माण होणाऱ्या या विकासनाम्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे,लोकहिताच्या या उपक्रमास माझा नागरिक म्हणून पाठिंबा आहे असे मत स्वयंभू मार्लेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित रेवाळे यांनी व्यक्त केले आहे.आजच्या घडीला प्रस्थापित राजकीय नेते सामान्य लोकांवर आपली मते लादत असताना दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांची संघटना असणाऱ्या गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, अध्यक्ष उदय गोताड यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकशाही अधिक बळकट होण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविले जात आहेत, कोकणात विकासाच्या नावाखाली अनेकांनी आपली घरे भरली मात्र कोकणचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर येथील गावांचा,गावातील माणसांचा विकास व्हायला हवा ही भूमिका घेऊन गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे व अध्यक्ष उदय गोताड लढत आहेत ही समाजासाठी चांगली गोष्ट आहे असेही अमित रेवाले यांनी म्हटले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील गावागावांत अनेक समस्या नागरिकांना भेडसावत असतात.राजकिय दबाव व स्थानिक राजकिय पुढारी यांच्या अनास्थेमुळे अनेक वेळा सामान्य नागरिक आपल्या समस्या प्रखरपणे मांडत नाहीत मात्र आता गाव विकास समितीने जनतेचा जाहीरनामा हा उपक्रम हाती घेऊन सामान्य माणसाला त्याचा आवाज बुलंद करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मी स्वतः जनतेचा जाहीरनामा या उपक्रमात सहभागी होणार असून इतर नागरिकांनी देखील आपल्या गावातील समस्या, सूचना जनतेचा जाहीरनामा या उपक्रमासाठी पाठवाव्यात असे आवाहन अमित रेवाळे यांनी केले आहे.

निसर्गोपचार तज्ज्ञ व ऍक्युपंचरिस्ट डॉक्टर प्रवीण निचत आचार्य आर्यभट्ट रत्न पुरस्काराने सन्मानित

ठाणे /प्रतिनिधी : बदलापूर येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार  तज्ज्ञ व ऍक्युपंचरिस्ट डॉक्टर प्रवीण निचत ह्यांच्या कार्याची दाखल घेत सेवक सेवाभावी संस्थाच्या वतीने आचार्य आर्यभट्ट रत्न पुरस्कार देऊन रविवारी दि. २६ डिसेंबर रोजी कांताई सभागृह नवीन बस स्टँड जवळ, जलगांव येथे गौरविण्यात आले.  यावेळी मंचावर आ. सुरेश भोळे, जळगावचे महापौर जयश्री ताई महाजन, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अंकुश आगलावे, 'देवमाणूस' मालिका फेम अभिनेत्री पुष्पा चौधरी,  डॉ.ऍड.जया उभे, व इतर मान्यवर उपस्तिथ होते. जळगावचे महापौर जयश्री ताई महाजन व 'देवमाणूस' मालिका फेम अभिनेत्री पुष्पा चौधरी ह्यांच्या हस्ते आचार्य आर्यभट्ट रत्न पुरस्कारने गौरविण्यात आले.  कार्यक्रम अगदी सुंदररित्या  पार पडला,  ह्या वेळी विविध क्षेत्रातून विविध पुरस्कार्थीना  सन्मानित  करण्यात आले. 

   डॉ .निचत यांच्या  कार्याची वेगवेगळ्या संस्थांनी दखल घेऊन जवळपास 165 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.  त्यांचे होप फाउंडेशन मार्फत समाजासाठी विविध उपक्रम चालू असतात, त्यामध्ये अन्न वाटप, औषध वाटप, कपडे वाटप व इतर गरजेच्या वस्तूंचा समाविष्ट आहे. ते वैद्यकीय क्षेत्रात निसर्गोपचार चा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वाना मोफत टेलिफोनद्वारे सर्वच रोगांवर "घरगुती उपाय" सांगतात. त्याचे ते एकही रुपया आकारत नाही. अशी ही त्यांची आगळी वेगळी समाज भक्ति व निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य गेले कित्येक वर्षांपासून करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना 2021 ह्या वर्षीचा आचार्य आर्यभट्ट रत्न पुरस्कारने गौरविण्यात आले.

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान आयोजीत नाताळ सणानिमित गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धा आणि शालेय वस्तूंचे वाटप...!

मुंबई : 'एक क्षण आनंदाचा' या उंक्ती प्रमाणे नाताळ सणाचे औचित्य साधून अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जोपासून गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावाखाली आपला आनंद गमावून बसणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्याना 

आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी तसेच आपले आनंदाचे काही क्षण अनुभवता यावेत हया उद्देशाने 
अक्षरा अपना स्कूल' पांजरपोळ, चेंबूर  मुंबई येथील भागांत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यांत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आनंद वाटणाऱ्या सांताक्लॉजचे प्रतीक असलेल्या दिवसानिमित्त प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय वस्तू भेटवस्तू म्हणुन प्रदान करण्यात आली. याप्रसंगी अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमोल वंजारे , दिग्दर्शक पत्रकार महेश्वर तेटांबे, समाज सेविका सौ विद्या विजय पाटील ,  समाजसेवक श्री. विजय पाटील , बालकलाकार मास्टर आर्य तेटांबे तसेच स्थानिक रहिवासी उपस्थित होते. या उपक्रमास मदत करणाऱ्या सर्व मान्यवरांचे संस्थेचे अध्यक्ष श्री अमोल वंजारे यांनी आभार मानले.

व्रतस्थवृत्तीचे उपेक्षित कुष्ठरोग्यांच्या जीवनात नंदनवन फुलविणाऱ्या समाजसेवक डॉ. शिवाजीराव ऊर्फ दाजीसाहेब पटवर्धन

       श्री.वसंत बुटके तपोवन यांच्या लेखणींतून मनोगत,देशसेवा व समाजसेवा यासाठी आयुष्य झिजविणारे डॉ. शिवाजीराव ऊर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांनी अफाट इच्छाशक्तीने, असामान्य त्यागाने अत्यंत महत्त्वाचे कार्य करून दाखविले. कर्नाटकात जन्म घेऊन अमरावती कर्मभूमी करणार्या या महापुरुषाने आपल्या सर्वस्वाचा होमकुंड पेटवून मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी देह झिजवला.

डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांचा जन्म २८ डिसेंबर १८९२ रोजी कर्नाटकातील जामखिंडी या संस्थानातील ‘आसंगी’ या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मध्यम स्वरूपाची होती. लहानपणीच आईचे निधन झाल्यामुळे त्यांची उणीव मोठ्या बहिणीने भरून काढली. डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांचे प्राथमिक शिक्षण गावात झाले तर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पुणे येथे झाले. मॅट्रिक पास झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी कलकत्ता गाठले. त्या ठिकाणी त्यांनी होमियोपॅथीत वैद्यकीय पदवी प्राप्त केली. लहानपणापासूनच दुसर्यांसाठी काहीतरी करावे असा विचार त्यांच्या मनात होता. पुढे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या शिक्षणाचा उपयोग गोरगरीब लोकांसाठी झाला पाहिजे या भूमिकेतून त्यांनी कार्यास सुरूवात केली. १९१७ ला डॉ. शिवाजीराव पटवर्धन अमरावती येथे आले. १९१८ मध्ये अमरावती शहरात प्लेगची साथ आली आणि माणसे पटापट मरू लागली. तेव्हा डॉ. शिवाजीराव पटवर्धनांनी जिवाची पर्वा न करता प्लेग ग्रस्त सर्वसामान्य लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्यावर योग्य उपचार केले. यातून बरीच माणसे रोगमुक्त झाली. हे कार्य करीत असताना त्यांनी लोकांकडून कुठल्याही प्रकारचा मोबदला घेतला नाही. तेव्हापासून समाजातील सर्व लोक त्यांच्याकडे आदराने पाहू लागले. लोक त्यांना देवदूत समजू लागले. तरूणांनी निरोगी, धडधाकट राहावे असे त्यांना वाटत असे. त्यामुळे त्यांनी तरूणांना आरोग्यविषयक धडे दिले.
१९२६ ला डॉ. शिवाजीराव पटवर्धन हे नगर परिषदेच्या निवडणुकीला उभे राहिले व प्रचंड बहुमताने निवडून आले. २८ ऑगस्ट १९२७ रोजी डॉ. शिवाजीराव पटवर्धन, श्री. दादासाहेब खापर्डे, डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अंबादेवीच्या देवळात दलितांना व हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी चळवळ सुरू केली, त्यात त्यांना यश मिळाले. १५ मे १९२८ रोजी श्रीमद् शंकराचार्य यांनी ‘समाज बलरक्षक’ अशी पदवी देऊन डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या कार्याचा गौरव केला. १९३८ साली सुभाषचंद्र बोस अमरावतीस आले असता डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी एका तासाचे भावोत्कट आभार प्रदर्शनपर भाषण केले होते. तेव्हापासून या दोन महापुरूषांमध्ये मैत्री निर्माण झाली. विदर्भ युवक परिषदेचे पहिले अधिवेशन डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी अमरावतीला घडवून आणले. त्यामुळे त्यांची वर्हाड प्रांतातील काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. 
डॉ. शिवाजीराव पटवर्धन हे जगप्रसिध्द श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. १९२६ साली श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने बांधलेल्या नवीन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हस्ते झाले. महात्मा गांधी यांच्या भेटीतून स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा शिवाजीरावांना मिळाली व पुढे ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. डॉ. शिवाजीराव पटवर्धन व त्यांच्या पत्नी पार्वतीबाई पटवर्धन या दोघांनीही स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन मोलाची कामगिरी केली. स्वातंत्र्यपूर्व काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निकटचे स्नेही म्हणून डॉ. पटवर्धनांनी स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यासाठी  त्यांना अनेक वेळा तुरूंगवास भोगावा लागला. महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत व मिठाच्या सत्याग्रहात त्यांचा सक्रिय सहभाग होता. ९ ऑगस्ट १९४२ चे मुंबई काँग्रेसचे अधिवेशन आटोपून अमरावतीला परत येत असताना त्यांना मलकापूर रेलवे स्टेशनवर अटक करण्यात आली. तीन वर्षाच्या कारावासानंतर १९४५ मध्ये त्यांची तुरूंगातून सुटका झाली. त्यावेळी अमरावतीकरांनी त्यांची भव्य मिरवणूक काढून त्यांचा गौरव केला. 
१९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी आपले लक्ष समाजसेवेवर केंद्रित केले. महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने नंतरच्या काळात कुष्ठरोग्यांच्या सेवेकडे वळले. त्यावेळी समाजात या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. आणि या लोकांकडे समाजातील लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय अमानवी होता. तेव्हा कुष्ठरोग्यांना रोगमुक्त करण्याचा त्यांनी निर्धार केला आणि कार्याची सुरूवात केली. श्री जुगलकिशोर जयस्वाल यांची अमरावती शहरापासून ५ किलोमिटर अंतरावर असलेली जमीन दान म्हणून त्यांनी या कार्यासाठी मिळवली. २६ सप्टेंबर १९४६ ला घटस्थापनेच्या दिवशी परमपूज्य विनोबा भावे यांच्या हस्ते कुदळ मारून ‘तपोवनाचा’ शुभारंभ केला. पुढे अनेक कुष्ठरोगी तेथे दाखल झाले.
कुष्ठरोग्यांना वेळेवर औषध पाणी मिळावे म्हणून ‘महर्षी दधिची शल्यभवनाची’ त्यांनी उभारणी केली. कुष्ठरोग्यांच्या मन:शांतीसाठी संतांच्या अभंगावर आधारलेले कीर्तनाचे, भजनाचे कार्यक्रम करण्यात येऊ लागले. निराशेच्या गर्तेतून अशाप्रकारे डॉ. पटवर्धनांनी कुष्ठरोग्यांना बाहेर काढले. ‘श्रमप्रतिष्ठा’ नावाचा औद्योगिक विभाग सुरू करून या औद्योगिक विभागातून विणकाम, सुतारकाम, मुद्रणालय, यंत्रमाग, चर्मोद्योग अशी अनेक कामे करून कुष्ठरोग्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले. एवढेच नव्हे तर त्यांनी तयार केलेला माल खरेदी करण्यासाठी शासनाला भाग पाडले. त्याच बरोबर कुष्ठरोग्यांच्या मुलांसाठी ‘शिशुविहार’ उभारला. मुलांना दूध मिळावे म्हणून ‘गोशाळा’ सुरू करण्यात आली. तसेच मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ‘महामना मालवीय विद्यालय’, स्वतंत्र परीक्षा केंद्र आणि वाचनासाठी ‘सरस्वती वाचनालय’ सुरू केले.
पुढे ‘तपोवन’च्या निधीच्या संदर्भात शासनाशी बेबनाव झाल्यामुळे संतप्त झालेल्या डॉ. शिवाजीराव पटवर्धनांनी तपोवन संस्थेची स्थावर मालमत्ता एकूण ५ कोटी रूपये व अनेक एकर जमीन १० नोव्हेंबर १९८४ रोजी तडकाफडकी शासनाच्या स्वाधीन केली व ‘तपोवन’ कायमचे सोडले. डॉ. शिवाजीराव पटवर्धन हे स्वत: प्रसिध्दी पराङमुख होते. त्यामुळेच त्यांच्या कार्याचा उदो उदो झाला नाही. त्यांची मूलभूत जडणघडण, त्यांचे जीवनविषयक चिंतन सर्वसामान्यांपर्यंत पोहचले नाही. लोकमान्य टिळक पुरस्कार, अमरावती विद्यापीठाने दान केलेली प्रथम मानद डी.लिट. पदवी त्यांनी नम्रतेने नाकारली पद्मश्री हा पुरस्कार केवळ भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या स्नेहाखातर स्वीकारला. ते नेहमी म्हणत - ‘स्वत:च्या कामाचे मोजमाप स्वत: करू नका, ते दुसर्याच्या लक्षात आल्यावर आपोआपच त्याची किंमत केली जाईल, तुम्ही स्वत: जर प्रामाणिकपणे व जिद्दीने आपआपले कार्य करीत राहिला तर समाजाचे लक्ष तुमच्याकडे जायला वेळ लागणार नाही.’ अशा निस्पृह, सेवाभावी थोर पुरूषाचे निधन ७ मे १९८६ रोजी चांदुर रेलवे येथील त्यांचे जुने मित्र श्री. चांदुरकर यांच्या घरी झाले. 
व्रतस्थवृत्ती उपेक्षित कुष्ठरोग्यांच्या जीवनात नंदनवन फुलविणाऱ्या या समाजसेवकाचे चरित्र आजच्या उच्चशिक्षित चंगळवादी समाजाला प्रेरणा व योग्य दिशा देणारे आहे.

 ✍ अविनाश म्हात्रे,अंबरनाथ  

सोमवार, २७ डिसेंबर, २०२१

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त रायगड जिल्हास्तरिय खुली निंबध स्पर्धा

 उरण - १२ जानेवारी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत असणाऱ्या नेहरू युवा केंद्र, अलिबाग यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे आणि  वटवृक्ष सामाजिक संस्था उलवे यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरिय सर्व वयोगटासाठी खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

१२ जानेवारी ते १९ जानेवारी हा युवा सप्ताह साजरा करण्याच्या दृष्टीने" वन संवर्धन काळाची गरज" ह्या एका विषयावर निंबध लेखन स्पर्धेचे दुसऱ्यांदा आयोजन होत असल्याने स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे.

१२ जानेवारी २०२२ पासुन १७ जानेवारी २०२२ पर्यंत स्पर्धकांनी आपले निंबध ९८७०९५५५०५ ह्या व्हाटस्अप क्रमांकावर लेखी स्वरुपात अथवा टायपिंगद्वारे पीडीफ फाईल स्वरुपात पाठविण्याचे सर्व स्पर्धकांना आवाहन आयोजकांनी केले आहे. ही स्पर्धा नि:शुल्क आहेच शिवाय प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे दोन हजार रुपये, दिड हजार रुपये, एक हजार रुपये रोख रक्कमे सोबत सन्मानचिन्ह व सन्मानपत्र म्हणून पारितोषिके मिळाणार आहेत, शिवाय पाच उत्तेजनार्थ स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग ई प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात येणार असल्याचे मत महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रायगड भूषण मनोज पाटील यांनी व्यक्त केले आहे. ह्या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील नामांकीत परिक्षकांची निवड झाली असून त्या निवड समितीद्वारे योग्य परिक्षणद्वारे स्पर्धेचे विजेते घोषित केले जातील तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी ह्या निबंध स्पर्धेत सहभागी होऊन ही स्पर्धा यशस्वी करावी असे मत नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक निशांत रौतेला यांनी मांडून निंबध स्पर्धा जाहीर केली आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थे तर्फे गरम ब्लॅंकेटचे वाटप ; थंडीच्या दिवसात गोरगरिबांना दिली 'मायेची उब'

उरण - श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण तालुक्याच्या वतीने दरवर्षी पनवेल रेल्वे स्टेशन येथे गोरगरीब, गरजू व्यक्तींना थंडीच्या दिवसात गरम ब्लॅंकेटचे वाटप करण्यात येते. गोरगरिबांचे थंडी पासून संरक्षण व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो याही वर्षी पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरील गोरगरीब व गरजू व्यक्तींना गरम ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, संस्थेचे मार्गदर्शक सल्लागार ऍडव्होकेट गुरुनाथ भगत,सामाजिक कार्यकर्ते श्रीपत भगत,सचिव प्रेम म्हात्रे, सदस्य नितेश पवार, शुभम ठाकूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

गोपाळ म्हात्रे महाराष्ट्र प्रतिभा गौरव पुरस्काराने सन्मानित

उरण - इमेज इंटरनॅशनल ऑनलाइन रिसर्च सेंटर व समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने लोकसंवाद प्रतिमा संमेलन यांच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त प्रतिभावंतांचा पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथे पार पडला.यामध्ये महाराष्ट्रा मधून  काना कोपऱ्यातून कला साहित्य सामाजिक क्रीडा यामध्ये नैपुण्य मिळविलेल्या मान्यवरांना महाराष्ट्र प्रतिभा गौरव पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये गोपाळ दिनकर म्हात्रे सारडे- उरण व रोहित शरद घरत विंधने- उरण यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरणासाठी प्रसिद्ध अभिनेते माधव अभ्यंकर, जेष्ठ समाजसेवक प्रकाश गायकवाड,पुणे मॅनेजिंग डायरेक्टर अविल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे निसार सुतार , पंच गण्य तज्ञ-विवेकानंद जितकर,संस्थेचे अध्यक्ष बि. एन खरात आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कळंबोलीमध्ये मनसे - रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त रोजगार मेळावा संपन्न

 



कळंबोली- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने रोजगार व स्वयंरोजगार विभाग अध्यक्ष  महेंद्र बैसाणे तसेच मनसे व्यापार सेना अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा संघटक  रामदास पाटील व व्यापार सेना उपाध्यक्ष  नितीन काळे यांच्या आयोजनात "भव्य रोजगार मेळावा" मोठ्या उत्साहात पार पडला.  सदर मेळावा रविवार दि. २६ डिसेंबर २०२१ रोजी सुधागड जुनी शाळा, सेक्टर - ३, कळंबोली, जि. रायगड या ठिकाणी आयोजित केला होता. त्याप्रसंगी माजी आमदार व मनसे नेते  नितीन सरदेसाई, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. शांताराम कारंडे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संदीप ठाकूर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर  रोजगार व स्वयंरोजगार विभागाचा वर्धापन दिन  नितीन सरदेसाई यांच्या शुभहस्ते केक कापुन साजरा करण्यात आला.सदर रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत, कळंबोली शहर अध्यक्ष अमोल बोचरे, महीला रायगड जिल्हाध्यक्ष अदितीताई सोनार,रायगड सहकार सेल गिरीश तिवारी,उपशहर  प्रमुख विवेक  बोराडे, प्रशांत कदम. सचिव राहुल  चव्हाण,वाहतूक  महानगरपालिका पनवेल पनवेल शहर अध्यक्ष संजय  मिरकुटे, उपशहर प्रमुख प्रकाश लाड, योगेश चिले - रस्ते आस्थापना महाराष्ट्र आदी मनसेच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  मेहनत घेतली.

हांडे देशमुख कुटुंबाचा आधारवड पडद्याआड

मुंबई(गणेश हिरवे)- हांडेदेशमुख परिवाराचे आधारस्तंभ काकाश्री भास्करराव खंडेराव हांडेदेशमुख यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी अल्पशा आजाराने, पुणे येथे दिनांक २० डिसेंबर २०२१ रोजी निधन झाले. वयस्क झालेले असूनही तीव्र बुध्दीमत्ता व स्मरणशक्ती जागृत असलेले काकाश्रींचे  आकस्मिकरित्या इहलोकी जाणे झाल्याने ते सर्वांच्याच मनाला चटका लाऊन गेले. म्हणूनच धनकवडी येथील स्मशानभूमीत झालेल्या त्यांच्या अंत्यसंस्कार विधीप्रसंगी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे व जाणीवपूर्वक उपस्थिती दर्शवून, काही जणांनी आपल्या वक्तव्यातून श्रध्दांजलीच्या निमित्ताने भावना व्यक्त करून आपल्या मनातील  दुःखाला वाट करून दिली..भास्करराव काका अण्णा  या टोपण नावाने हांडेदेशमुख परिवारासह त्यांचे मित्रमंडळ व निवास परिसरात सुपरिचीत होते. अण्णांना तीन भाऊ व चार बहिणी अशी सात सख्खी भावंडे तर चार चुलत भाऊ व एक चुलत बहीण. एक सावत्र बहीण. यात अण्णा दोन नंबरचे पाल्य. त्यांच्या हळव्या मनाला लागणारी दु:खत घटना अशी घडून गेली  की, गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमधे त्यांच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या चार भावंडांनी अखेरचा श्वास घेतला आणि सतत हसत खेळत वावरणारे, गप्पांमध्ये रंगणारे, दुर्दम्य इच्छाशक्ती व प्रचंड आत्मविश्वास असणारे अण्णा मनस्वी खालावत गेले.  परिणामी दिवाळीच्या सुमारास पडलेल्या आकाली पावसाच्या वातावरणाने मनस्वास्थ्य हरवलेल्या अण्णांना किरकोळ आजाराने घेरले व त्यातच ते निजधामाला निघून गेले. हांडेदेशमुख परिवारातील सर्व भावंडांना त्यांच्या मुलांना, नातवंडांना एकत्रित ठेवणारे व प्रसंगी प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन देणारे व योग्य मार्गदर्शन करणारे आणि उपवर झालेल्या वधूवरांची नेटकी लिखित नोंद ठेऊन लग्नकार्य जमविण्यास सातत्याने पुढाकार घेणारे असे अण्णा. म्हणूनच एवढ्या मोठ्या कुटुंबाचा आधारवडच काळाच्या पडद्याआड गेला ही तीव्र भावना हांडेदेशमुख परिवारास दुःख देणारीच ठरली यात शंका नाही.

       पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधीलओतूर या खेडेगावातून अण्णा पुढील शिक्षणासाठी पुण्यात आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थीतीतून आपले शिक्षण पूर्ण करून जिल्हापरिषद पुणे यामध्ये शिक्षक म्हणून नोकरीत रुजू झाले. स्वातंत्र्य सैनिकाच्या घराण्याचा लाभलेला वारसा त्याचबरोबर एकत्र कुटुंबात वाढल्यामुळे उपजतच आलेला सुसंस्कृतपणा,  प्रचंड बुद्धीमत्ता, तीव्र ग्रहण व स्मरणशक्ती, कुठलेही काम निष्ठेने करण्याची सवय व जीद्द तसेच कामातील प्रामाणिकपणा याच्या बळावर उत्तम सेवा देऊन ते जिल्हापरिषदेच्या नोकरीतून गट शिक्षण अधिकारी या पदावरून सन्मानाने सेवानिवृत्त झाले. शिक्षण क्षेत्रातील गट शिक्षणअधिकारी या नात्याने अनेक  शिक्षणसंस्थां प्रमाणे शिक्षण स्तरावरील अनेक मान्यवरांच्या संपर्कात ते आले. नोकरी निमित्तानं सतत फिरण झाल्यानं ग्रामीण भाग त्यांना फिरता आला. जवळून बघता आला. त्यामुळे त्यांच व्यक्तीमत्व अधिक प्रगल्भ तर झालेच त्याचबरोबर त्यांचा जनसंपर्कही  अफाट वाढला. वागण्यात विनयशीलता तर त्यांनी अंगी बाणली होतीच बोलण्यातही प्रतिभा साकारली. जन्मत:हाच मोठ्या प्रमाणात आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती लाभल्यामुळे एकदा भेटलेली व्यक्ती, तीचे नाव - गाव त्यांच्या कायमचे लक्षात रहायचे. नुकत्याच झालेल्या दिवाळी सणाच्यावेळी दिनांक ८.११.२०२१ रोजी मी व मुलगा धिरज त्यांना भेटावयास गेलो होतो त्यावेळेस दोन तास त्यांनी राजकारण, समाजकारण आणि त्यांना भेटलेल्या व्यक्ती त्यांची वैशिष्ट्ये त्यांनी सांगितली. नेहमीप्रमाणे मी आणि धिरज त्यांचेशी सखोल गप्पा करून, ऐकून, खरे तर त्यांच्या समोर बसल्यावर फक्त ऐकून घेणे एवढीच भूमिका बजवायला लागायची  हे अनुभवसिद्ध असल्यामुळे त्यांच्या आफाट स्मरणशक्तीच घरी नेरुळला येईपर्यंत चर्चा करीत होतो. आणि त्यानंतर दीड महिन्याच्या आत त्यांनी देह ठेवला की जो कायमचा चटका लाऊन गेला. एक बाकी खरं, समाजहिताच भान त्यांनी शेवटपर्यंत जपल. त्यांच्या प्रचंड जनसंपर्कामुळे आणि शिक्षण खात्यातील त्यांच्या उच्चपदस्थांशी  दृढ झालेल्या ओळखींचा त्यांनी अनेक युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी उपयोग करून घेतला. अनेकांच्या कुटुंबाला आधार दिला, अनेकांची लग्ने जुळविण्यात पुढाकार घेतला. अगदि शेवटपर्यंत त्यांनी हा घेतलेला वसा जपला. सतत कार्यरत राहीले. बोलत राहीले. जनसंपर्कात रममाण राहीले. म्हणूनच त्यांच्या या निरलस अशा जीवनाला निरोगी असे दीर्घ आयुष्य लाभले.  म्हणूनच या दशक्रिया विधिच्या अनुशंगाने त्यांना हांडेदेशमुख परिवारातर्फे मनःपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना अभिमानच वाटतो.म्हणूनच सारख जाणवत की, जसा काळ पुढे सरकेल तशी मनाची जखम सुध्दा भरत जाईल पण सातत्याने येणाऱ्या त्यांच्या आठवणींच काय? त्या आठवणी इतक्या खोलवर रुजल्या आहेत की ते सांगायला शब्द नाहीत.

शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

जिल्ह्यातील विविध विकासात्मक कामासांठी भरघोस निधी मंजूर करून घेण्यास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांना यश

अलिबाग:- विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये रायगड जिल्ह्यातील विविध विकासात्मक कामासांठी भरघोस निधी मंजूर करून घेण्यास रायगड जिल्हा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांना यश आले आहे.     

      पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या जिल्ह्यातील विकासात्मक कामांसाठी निधी मिळविण्याच्या प्रयत्नांना राज्याचे मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे नेहमीच पाठबळ लाभले आहे, याकरिता पालकमंत्री कु.तटकरे यांनी मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत. 

     जिल्ह्यातील या विकासात्मक कामांसाठी निधी मंजूर झाला असून ती कामे पुढीलप्रमाणे :-  1) श्रीवर्धन येथील न्यायाधीशांच्या निवासस्थानाकरीता 20 लाख रूपये,  2) महाड तालुक्यातील मांदाडतळा, इंदापूर,निजामपूर महाड,विसापूर,दापोली रस्ता रा.मा.97कि.मी.92/200 वरील दादली पूलाचे बांधकाम करणे, ता.महाड 4 कोटी 44 लाख 81 हजार रुपये, 3) ढालकाठी निगडे गोठवली रस्ता प्रजिमा 67 कि.मी.6/00 ते 12/00 मध्ये सुधारणा करणे (3.75 मी.चे 5.50 मध्ये रुंदीकरण व डांबरीकरणे करणे), ता.महाड 2 कोटी 8 लाख 31 हजार रुपये, 4) तुडील भेलोशी मंडणगड रस्ता प्रजिमा 67कि.मी.4/500 ते 10/00 मध्ये डांबरी नूतनीकरण करणे ता.महाड 7 लाख 86 हजार रुपये, 5) बारसगाव शिवथर रस्ता प्रजिमा 70 कि.मी मध्ये नूतनीकरण करणे (3.75 मी.चे 5.50 मध्ये रुंदीकरण व डांबरीकरण करणे), ता.महाड 6 लाख 29 हजार रुपये,  6) तुडील भेलोशी मंडणगड रस्ता प्रजिमा 67 कि.मी.4/800 मधील पुलाचे पुर्नबांधकाम करणे, ता.महाड 6  लाख 92 हजार रुपये, 7 )कळंब साळोख पाषाणे ते जिल्हा हद्द रस्ता प्रजिमा 106, कि.मी.06/00 ते 10/200 मध्ये रस्त्याची सुधारणा करणे, ता.कर्जत 3  कोटी 1 लाख 45 हजार रुपये, 8) श्रीवर्धन म्हसळा लोणेरे रस्ता रा.मा.99 कि.मी. 0/00 ते 49/800 ची सुधारणा करणे (म्हसळा बाह्यवळण कि.मी.0/00 ते 3/500/ समाविष्ट) ता.श्रीवर्धन 5  कोटी 21 लाख 98 हजार रुपये, 9) अलिबाग रोहा रस्त्याची सुधारणा करणे रा.मा.91 कि.मी. 0/00 ते 85/600जि.रायगड  10  कोटी 22 लाख 59 हजार रुपये, 10) पोयानाड नागोठणे रस्ता रा.मा.87 कि.मी. 0/00 ते 29/500 मध्ये रस्त्याची सुधारणा करणे, ता.अलिबाग  3  कोटी 11 लाख 93 हजार रुपये, 11) इंदापूर पाचाड महाड करंजाडी विसापूर दापोली रस्ता रा.मा.97 कि.मी. 28/00 ते 113/00 ची सुधारणा करणे (किमी 65/00 ते 92/00 वगळून) जि.रायगड 2  कोटी 72 लाख 38 हजार रुपये, 12) पाली पाटणूस रस्ता रा.मा.94 कि.मी. 0/00 ते 23/060  मध्ये रस्त्याची सुधारणा करणे, ता.सुधागड, 2  कोटी 72 लाख 11 हजार रुपये, 13) मुरुड-रोहा-कोलाड-पुणे रस्त्याची सुधारणा करणे प्ररामा 5कि.मी. 0/00 ते 48/100 जि.रायगड 12  कोटी 9 लाख 60 हजार रुपये, 14) रायगड जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची सुधारणा करणे (विळे भागाड, तळोजा) 1  कोटी 83 लाख 41 हजार रुपये, 15) रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांची सुधारणा करणे (राजगड, रायगड किल्ला) 3  कोटी 34 लाख 22 हजार रुपये,  16) अष्टविनायक रस्त्याची सुधारणा करणे  (मोरगाव मंदिर 61 कि.मी., सिध्दटेक 73.80 कि.मी., रांजणगाव 89.15, कि.मी., श्रीक्षेत्र ओझर 71.95 कि.मी., श्रीक्षेत्र लेण्याद्री 40.10 कि.मी., थेऊर 19 कि.मी., श्रीक्षेत्र पाली 6.00 कि.मी., श्रीक्षेत्र महड 1.00 कि.मी.) 18  कोटी 14 लाख 40 हजार रुपये, 17) श्रीवर्धन येथे नवीन न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करणे, 1  कोटी 47 लाख 66 हजार रुपये, 18) खालापूर येथे तालुकास्तरीय प्रशासकीय इमारत बांधकाम करणे, 1  कोटी रुपये, 19) ग्रामीण रुग्णालय पाली-सुधागड येथील मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थान इमारतीचे बांधकाम करणे,  2  कोटी 40 लाख 72 हजार रुपये, 20) उरण येथील 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व अधिकारी आणि कर्मचारी यांचे निवासी गाळे इमारत बांधकाम करणे 15  कोटी रुपये, 21) ग्रामीण रुग्णालय पाली सुधागड येथील मुख्य इमारत व निवासी गाळे बांधणे, 2  कोटी 2 लाख 73 हजार रुपये, 22) ग्रामीण रुग्णालय खालापूर येथील मुख्य इमारतीचे बांधकाम, 4  कोटी 49 लाख 99 हजार रुपये, 23) ग्रामीण रुग्णालय वडखळ नाका येथील मुख्य इमारतीचे बांधणे, 4  कोटी 50 लाख  रुपये, 24) ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथील मुख्य इमारतीचे बांधकाम, 3  कोटी 94 लाख 79 हजार रुपये, 25) वावे पोटगी खारभूमी योजना,ता.रोहा सा.क्र.0 मी. ते 1500 मी.मधील बांधाचे नूतनीकरण व सा.क्र.30 मी., सा.क्र.965 मी.वरील उघाडीचे मजबूतीकरण करण्याचे काम, 1 कोटी रुपये, 26) शेणवई पाबळ खारभूमी योजना,ता.रोहा सा.क्र.0 मी. ते 1590 मी.मधील बांधाचे नूतणीकरण करण्याचे काम, 1  कोटी रुपये, 27) कांदळवाडा (जूनी) खारभूमी योजना,ता.म्हसळा, सा.क्र.0 मी. ते 1110 मी.मधील बांधाचे नूतणीकरण व सा.क्र.136 मी.वरील उघाडीचे मजबूतीकरण, 1  कोटी रुपये, 28) कुडगाव हरवित खारभूमी योजना,ता.श्रीवर्धन, सा.क्र.0 मी. ते 1320 मी.मधील बांधाचे नूतणीकरण व सा.क्र.185 मी.वरील उघाडीचे मजबूतीकरण, 1  कोटी रुपये, 29) बानुमरीयम खारभूमी योजना,ता.म्हसळा, सा.क्र.0 मी. ते 1310 मी.मधील बांधाचे नूतणीकरण करण्याचे काम, 1  कोटी रुपये, 30) साई खारभूमी योजना,ता.पनवेल, 1  कोटी रुपये, 31) सुधागड पाली येथे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत बांधकाम, 1  कोटी 25 लाख रुपये, 32) शिलार ते शिलारवाडी रस्त्याची सुधारणा 2.00 कि.मी. ता.कर्जत, 7 लाख 4 हजार रुपये, 33) किकवी ते कशेळे रस्ता तयार करणे 8 लाख 1 हजार रुपये, 34) किकवी ते खरबाचीवाडी रस्ता तयार करणे भाग-1, 9 लाख  रुपये, 34) किकवी ते खरबाचीवाडी रस्ता तयार करणे भाग-2, 9 लाख  रुपये.

    निधी मंजुरीमुळे जिल्ह्यातील विकासात्मक कामांना मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार असून पालकमंत्री कु.आदिती तटकरे या जिल्ह्यातील विविध विकासात्मक कामांसाठी अधिक निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कसली कंबर

ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन

 अलिबाग:- दक्षिण आफ्रिकेसह जगातील इतर काही देशांमध्ये कोविड-19चा घातक ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळल्यामुळे महाराष्ट्रात विशेष काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. 

     या पार्श्वभूमीवर  जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांना कोविड लसीकरण मोहीम अधिक गतीने व नियोजनबद्ध लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या, तहसिलदार, प्रांताधिकारी यांनीही कोविड लसीकरण, कोविड प्रतिबंधक उपाययोजना व्यवस्थितपणे राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

      तसेच ओमायक्रॉन या विषाणूच्या नव्या व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढविणारे आहे. ओमायक्रॉन या व्हेरिएंटची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढता कामा नये, यासाठी एकूण परिस्थिती पाहता अजूनही ज्यांनी कोविड-19 लसीचा एकही डोस घेतला नाही त्यांनी आपल्या विभागातील शासकीय वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका किंवा तहसिलदार, प्रांत अधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क साधावा. तसेच दुसरा डोस प्रलंबित असलेल्या नागरिकांनी त्यांच्या दुसऱ्या डोसबाबतचा विहित कालावधी पूर्ण झाल्याबरोबर आपला दुसरा डोसही घ्यावा. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेत नव्याने सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरीएन्टचे रुग्ण पाहता जिल्ह्यातील नागरिकांनीही याबाबत हलगर्जीपणा न दाखवता सामाजिक अंतर पाळणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, मास्क वापरणे याबाबत काटेकोरपणे सतर्कता बाळगावी, जबाबदारीने वागावे, जिल्ह्यात जास्तीत जास्त अँटीजन, आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात, परदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी येणे सुरू झाले आहे. त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमान सेवेने, रस्ते व रेल्वेमार्गे येतात. त्यांच्यात कुणी विषाणूचा वाहक असेल तर इतरांना मोठा धोका होऊ शकतो, त्यामुळे अशा प्रवाशांची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी ती माहिती तात्काळ स्थानिक प्रशासनाला द्यावी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी नागरिकांना केले आहे.

कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य अभियान राबविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. यांची नोडल ऑफीसर म्हणून नियुक्ती

अलिबाग: शासन निर्णयानुसार मा.सर्वोच्च न्यायालयाने दि. 4 आक्टोबर, 2021 च्या आदेशान्वये सविस्तर आदेश निर्गमित केले आहेत. राज्य शासनाने महसूल व वन विभागाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्याकरिता योजना आखली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना सहाय्य प्रदान करण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून आधार क्रमांकाव्दारे ओळख पटवून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सहाय्याची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. 

      राज्यातील कोविड-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्रदान करण्याबाबत आदेश शासनाने निर्गमित केले आहेत.

      जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हयातील सर्व कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्यासाठी नातेवाईकांकडून अर्ज दाखल करणे, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे इ.मार्गदर्शन करण्यासाठी गावापापतळीवरील आशा कार्यकर्तीमार्फत अभियान राबविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांना नोडल ऑफीसर म्हणून नियुक्त केले आहे.

      जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क व समन्वय साधून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गावपातळीवर कार्यरत आशा कार्यकर्तीमार्फत कोविड-19 मुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकांकडून शासन निर्णयातील सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायतमार्फत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. ज्यांनी अर्ज भरले आहेत व ज्यांची कागदपत्रांच्या अभावी अर्ज स्विकारलेले नाहीत, अशा नागरिकांना देखील आवश्यक मदत तातडीने करावयाची आहे.

      आयुक्त, पनवेल महानगरपालिका यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 मुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकांना वरीलप्रमाणे आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी प्रभागनिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. संबंधित तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगर परिषद यांनी देखील याकामी आपल्याकडील आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावयाचे आहे. जिल्हयातील सर्व कोविड-19 मुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकांना दिनांक 26 डिसेंबर 2021 रोजी पर्यंत सानुग्रह सहाय्य वाटप करण्याचे असल्याने याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहे.

चित्ररथ आणि पथनाट्याद्वारे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

अलिबाग : दि.24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. शासन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडील दि.17 डिसेंबर, 2021 च्या आदेशानुसार या वर्षाचा ग्राहक दिन साजरा करण्यासाठी केंद्र शासनाने Consumer Know Your Rights अशी संकल्पना निश्चित केली आहे.

      त्यानुसार शासनाच्या विविध योजना व ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायद्यामधील हक्काचे अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात  चित्ररथ व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. 

     या चित्ररथास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष रविंद्र नगरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, उप नियंत्रक, वैधमापन शास्त्र रामसिंग राठोड  व जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. 

       या कार्यक्रमास तहसिलदार महसूल सचिन शेजाळ, तहसिलदार सर्वसाधारण विशाल दौंडकर, सहा.जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे,  सहा.आयुक्त, समाजकल्याण सुनिल जाधव,  रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी,  विकास खोलपे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. 

      त्यानंतर हा चित्ररथ अलिबाग, पेण व मुरुड या तालुक्यामध्ये फिरविण्यात आला. तसेच रायगड जिल्हयामध्ये  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार या संकल्पनेवर आधारित प्रिझम सामाजिक विकास संस्थेव्दारे पथनाटयाचे आयोजन करण्यात आले होते. या पथनाटयाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग, अलिबाग समुद्र किनारा व एस.टी. स्टॅंड अलिबाग येथे करण्यात आले होते.


महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी आरोग्य शिबीर संपन्न



अलिबाग:-
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत "आझादी का अमृत महोत्सव" अंतर्गत व "सुप्रशासन सप्ताहाच्या" निमित्ताने दि.24 डिसेंबर रोजी गोदरेज अँड बॉईज तालुका खालापूर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

      या शिबिरात ५१ बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी करून त्यांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले.यावेळी कामगार उपायुक्त श्री. प्र.ना. पवार, सहायक कामगार आयुक्त श्री.समीर चव्हाण व इतर कार्यालयीन कर्मचारी, प्रकल्प अधिकारी श्री. रमेश भंडारकर, मनुष्यबळ व्यवस्थापक श्री.राजेंद्र पाशिलकर, जनरल मॅनेजर श्री. अमित कुलकर्णी उपस्थित होते.कार्यक्रमावेळी सर्व उपस्थित बांधकाम कामगारांना नोंदणी व नूतनीकरणाचे महत्त्व पटवून देत जास्तीत जास्त कामगारांनी कामगार विभागाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

पेण तालुक्यातील शेतकरी संघटनेने आमदार रवीशेठ पाटील यांच्या मार्फत घेतली महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट ; मुंबई एस. ई. झेड कंपनीने संपादीत केलेल्या व खरेदीखताने नावे केलेल्या शेतजमीनीच्या सात बाराच्या उताऱ्यावरील कंपनीची कब्जेदारी सदरी झालेली नोंद रद्द करण्याची व सदर शेतजमीन शेतकऱ्यांना परत देण्याची निवेदनातून मागणी

मुंबई : पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील महसूली गावातील   मे.  मुंबई एस. ई. झेड लिमी. कंपनीने संपादीत केलेल्या व खरेदीखताने नावे केलेल्या शेतजमीनीच्या सात बाराच्या उताऱ्यावरील कंपनीची कब्जेदारी सदरी झालेली नोंद रद्द करण्यासाठी तसेच  सदरहु  शेतजमीन या  शेतकऱ्यांना परत देण्यासाठी पेणमधील शेतकरी संघटनेने  आज शुक्रवार दि.२४ डिसेंबर रोजी  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदन दिले. या  निवेदनातून  त्यांनी खारेपाट विभागातील शेतकऱ्यांच्या वतीने  वरील  मागणी केली.

     या निवेदनातून  सविस्तर बाजू मांडण्यात आली आहे.  मे. मुंबई एस. ई. झेड लिमी.  कंपनीने मे. विशेष भुसंपादन अधिकारी काल प्रकल्प माणगाव यांच्या मार्फत खारेपाट विभागातील शेतजमीनींचे भुसंपादनाचे संमत्ती निवाडे हे ता.२४/८/२००९ व ता.३१/०८/२००९ या कालावधीत कुलमुखत्यारपत्राच्या आधारे केलेले आहेत. सदरील भुसंपादनाचे संमत्ती निवाडे हे करणेकरिता ता.३०/११/२००६ रोजीच्या जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशात व परवानगी मध्ये समंत्ती निवाड्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाच्या परवानगी विना मे. विशेष भुसंपादन अधिकारी काल प्रकल्प माणगाव यांनी  संमत्ती निवाडे हे केल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच सदरील मे. मुंबई एस. ई. झेड लिमी. कंपनीने ता.०८/६/२००७ रोजी शासना बरोबर  अग्रीमेंट केलेले असून त्या अग्रीमेंट मध्ये देखील समंत्ती निवाड्याचा उल्लेख नाही. तसेच सदरील अग्रीमेंट सोबत जे पुनर्वसन पॅकेज म्हणून जाहीर केलेले आहे, त्याची देखील पूर्तता आजमितीस झालेली नाही.
        महाराष्ट्र प्रकल्प बाधित प्रकल्प ग्रस्तांचे पुनर्वसन कायदा १९९९ च्या कलम १२ (१)(२) अन्वये खरेदी केलेल्या जमिनी नुसार पुनर्वसन पॅकेज न दिल्याने सदरच्या भुसंपादन जमिनीची संमती निवाड्याने व खरेदी खताने हस्तांतरित  झालेल्या जमिनीचा  व्यवहार हा कायदेशीर नाही व त्यामुळे कलम १२ (३) स्पष्टपणे उल्लंघन झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
      यावेळी हे निवेदन स्विकारल्यानंतर याबाबत पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी  दिले. सदर निवेदन देण्यासाठी पेण तालुक्यातील आमदार रवीशेठ पाटील ,ऍड.नंदू म्हात्रे,संदेश पाटील,नारायण म्हात्रे,अशोक पाटील,विलास पाटील,देविदास वर्तक,शशिकांत म्हात्रे,समीर पाटील,प्रवीण पाटील,बाबुराव पाटील उपस्थित होते. 
       

आठवणीत रंगला १९८८-८९ च्या दहावीच्या बॅचचा ३५ वर्षांनी स्नेह मेळावा

        आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा..!शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई -वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याच...