आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

शिवसेना नगरसेविका ज्योती हारूण खान यांच्यातर्फे विक्रोळी पार्क साईट येथे हजारो कुटुंबीयांना दिवाळी फराळाचे साहित्य वाटप



विक्रोळी (शांताराम गुडेकर )-
 सालाबाद प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात गेल्या पंधरा वर्षाची परंपरा जपत वार्ड न.१२४  शिवसेना नगरसेविका ज्योती हारुन खान आणि शिवसेना नेते हारुन खान यांच्या प्रयत्नाने सर्वसामान्यांची दिवाळी  आनंददायी होण्यासाठी यंदाही "आपुलकीची दिवाळी" हा उपक्रम विक्रोळी पार्क साईट येथे  राबवण्यात येत आहे .

         दिवाळीत घरोघरी उत्साहाचे वातावरण असते प्रत्येक कुटुंब ऐपतीप्रमाणे दिवाळी आनंदात साजरा करत असतात. पण आपल्या विभागातील सर्वसामान्य ची दिवाळी आनंदात साजरी झाली पाहिजे. म्हणून दिवाळी फराळाचे साहित्य वाटप करून "आपुलकीची दिवाळी" हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचसोबत भाऊबीजेची भेट म्हणून आपल्या लाडक्या वहिनींना साड्यांचे ही वाटप करण्यात आले आहे.

शिवसेना शाखा क्र. १७ शाखाप्रमुख सुनील पाटील यांच्यातर्फे नवीन मतदार नोंदणी जनजागृती आणि शासकीय योजना विषयक मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर )-   निवडणुकीच्या काळात सर्वांत महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक असतो तो म्हणजे मतदार. पण मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे कसं पाहाता येईल किंवा नसेल तर मतदार यादीत नाव नोंदणी कशी कराल?स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदार यादी नूतनीकरण मोहीम राबवण्यात येणार असून पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी तर इतरांना दुरुस्तीसाठी अर्ज करता येणार आहे. त्याबाबत विधानसभा मतदार यादीच्या नूतनीकरणाबाबत जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांनी व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असा आदेश राज्य निवडणूक आयुक्त यांनी दिला आहे.सर्वसामान्य लोकांना याबाबतची योग्य माहिती उपलब्ध व्हावी यासाठी बोरिवली  शिवसेना शाखा क्र. १७ चे शाखाप्रमुख सुनील पाटील यांच्यातर्फे नवीन  मतदार नोंदणी जनजागृती आणि शासकीय योजना विषयक मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.जर तुमचं नाव यादीमध्ये आहे पण ते चुकले असेल तर फॉर्म -८ भरवा.जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलात आणि तुम्हाला तुमचे नाव तेथे नोंदवायचं असेल तर फॉर्म ६ भरावा लागणार आहे.जर कुणाच्या नावावर तुमची हरकत असेल तर फॉर्म- ७ भरावा लागतो.विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत पत्ता बदलण्यासाठी - नमुना ८ अ भरावा लागेल.यासाठी आवश्यक २ रंगीत फोटो, वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला, तुमचा पत्ता असलेला पुरावा जशे  की रेशन कार्ड, टेलिफोन-इलेक्ट्रिसिटी बिल, पासपोर्ट, लायसन्स किंवा आधारकार्ड, घरातील एका सदस्यची मतदार कार्डची छायाप्रत आवश्यक आहे.याशिवाय विभागातील नागरिकांना "सुगंधी उटणं "चे वाटप होणार आहे. शिवाय सरकारी योजना विषयक मार्गदर्शन व  निशुल्क नोंदणी करण्यात येणार आहे. या योजना मध्ये इमारत आणि इतर बांधकाम कामगार ओळखपत्र,आयुष्मान भारत-आरोग्य योजना, सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुकन्या समृद्धी योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, अटल पेन्शन योजना, इ -श्रम कार्ड, घरघुती कामगार ओळखपत्र आदींचा समावेश आहे. तरी नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी शिवसेना शाखा क्र.१७ चे  शाखाप्रमुख सुनील पाटील  यांच्याशी शाखेत संपर्क करावा असे आवाहन शिवसेना शाखा १७ च्या पदाधिकारी, सदस्य आणि तमाम शिवसैनिक यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

एस.टी.सेवा दरवाढीचा परिणाम

इंधन दरवाढीचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा शासकीय एस.टी.सेवा प्रथम अडचणीत सापडते.इंधन दरवाढ सातत्याने होत राहणार आहे. पेट्रोल ११४ /- रूपये झाले. झालेली दरवाढ केंद्र सरकार- महाराष्ट्र सरकार कमी करण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत. जनता माञ मुकाट्याने सहन करते.

   एस.टी.दरवाढीचा प्रस्ताव कार्यालयात बसून तयार करणे सोपे आहे. आपण दरवाढी बरोबर प्रवाशांना कोणत्या सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि पुढे देणार आहे हे एस.टी.महामंडळाने प्रवाशांना जाहीरपणे सांगावे.एस.टी.डेपो मधून सुटणार्या गाड्या स्वच्छ कधी साफ करता.एस.टी.डेपो मधील विश्रांती घेण्याची बाकडी कधी स्वच्छ करता.एस.टी.डेपो मधील उपाहारगृहातील पदार्थ रूचकर- चवदार आहेत की नाही हे पाहिले आहे काय ? स्वच्छता असावी म्हणून ठेकेदारला समज दिली आहे का ? .एस.टी.डेपो मधील स्वच्छता गृह (महिला- पुरुष )स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी कोणाची. एस.टी.वाहतूक नियंत्रक प्रवाशांना सूचना देतात त्यांच्या सूचना स्पष्ट ऐकू येतात का ?
   एस.टी.गाड्यांचे नामफलक तुटलेल्या अवस्थेत आहेत हे अधिकारी बंधुना माहित आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे समाधान कारक असतील तर जरूर दरवाढ करा .नसतील तर मंञ्यांपासून अधिकार्यापर्यत सर्वांच्या मोफत सेवा बंद करून तूट भरून काढण्यासाठी प्रयत्न केले तर प्रवाशांना दिलासा मिळेल. डेपो व्यवस्थापक, परिवहन मंञ्यांनी डेपोंची पाहणी करावी. डेपो मध्ये टायरचा तुटवडा, नादुरुस्त गाड्या आहेत. यांच्या कोण पाहणार. 


- महादेव गोळवसकर ,कल्याण पश्चिम 

१३ व्या महिन्याचा पगार म्हणजे बोनस

स्वातंत्र्य पूर्व काळात ब्रिटिश राजवटीत आठवड्याला पगार मिळत होता.परंतु भारत स्वतंञ झाल्यावर डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांना महिन्याला पगार देण्याचा कायदा केला तेव्हा पासून महिन्याला पगार मिळू लागला.चार आठवड्याचा एक महिना म्हणजे अठ्ठेचाळीस आठवडे बाकी राहिले चार आठवडे याचा पगार बोनस म्हणून देण्यात आला.म्हणजे बावण आठवडे पूर्ण झाले. 
     यावरून असे दिसते बोनस हा कामगारांच्या हक्काचा आहे. बोनसच्या मागणी साठी १८ जानेवारी१९८२ साली मुंबईतील बासष्ट कापड गिरण्या मध्ये संप कामगारांनी केला. कामगार संपला पण ' संप ' संपला नाही. कामगार नेत्यांनी बोनससाठी संप करताना भानं ठेवणं महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील मोठ मोठे उद्योग बंद पडले.कामगार बेकार झाला याचं भान ठेवून बोनसची मागणी ताणायला हवी.
    मुंबई महानगरपालिका कामगारांना १९८५ सालापासून सानुग्रह अनुदान देण्याची झाली. शिवसेनेने याच सालात मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवली होती. शिवसेना प्रमुख वंदनीय  बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई महानगरपालिका कामगारांना बोनस सुरू झाला. म्युनिसिपल मजदूर युनियनने तत्कालीन कामगार नेते वंदनीय जाॅर्ज फर्नांडिस यांच्या लढ्याला यश आले होते. शरद राव,महाबळ शेट्टी कामगार नेते होते. तेव्हा पासून महानगरपालिका कामगारांना  बोनस  मिळतो आहे.मुंबई महानगरपालिका सेवा देणारी स्वायत्त संस्था आहे म्हणून सानुग्रह अनुदान दिले जाते.मुंबई महानगरपालिकेची पद्धत अन्य  महानगरपालिकांनी अंमलात आणली.त्याचा लाभ महाराष्ट्रातील अन्य महानगरपालिका कामगारांना होतो आहे. 

-  महादेव गोळवसकर 
     कल्याण- पश्चिम

अंबरनाथ शिवसेना पक्षातर्फे कोरोना काळामध्ये १० रुपयांमध्ये दिवाळी

अंबरनाथ / अविनाश म्हात्रे :- दि. २७ ऑक्टोबर रोजी अंबरनाथ शिवसेना पक्षातर्फे कोरोना काळामध्ये १० रुपयांमध्ये दिवाळी फराळाचे सामान वाटप करण्याचा उपक्रम पार पाडण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या पूर्वी देखील १० रुपयांमध्ये संपूर्ण जेवण, गोर गरीबांमध्ये ओपीडी सोय,अल्पदामध्ये ऍम्ब्युलन्स आणि शववाहिनी अशा सोयीसुविधा पुरविल्या आहेत. कोरोनानंतर नागरिकांनी दिवाळी आनंदामध्ये साजरी करावी या उद्धेशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. 

कोरोना नियम शिथिल केल्यानंतर नागरिकांना आनंदाने दिवाळी सण साजरा करण्यात यावा हा मुख्य  उद्देश होता, कोरोनाच्या भयंकर आठवण विसरावी प्रत्येक नागरिकांनी दिवाळी आनंदाने साजरी व्हावी हा हेतू धरून व आपले दैनंदिन दिवस सुरळलीत जावा काही काळासाठी सर्व दुःख विसरून सर्वानी आनंदामध्ये सहभागी व्हावे हाच या उपक्रमामागचा प्रार्थमिक उद्देश आहे. शिवसेना पक्ष नेहमीच आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या "८०% समाजकारण आणि २०% राजकारण" या तत्वावर कार्यरत आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या आयोजित केलेल्या उपक्रमाचा ५००० पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. या उपक्रमामध्ये मी अंबरनाथच्या माजी नागराध्यध्यक्षा सौ. मनीषा अरविंद वाळेकर, माजी नागसेवक श्री. राजेंद्र वाळेकर यांचे विशेष आभार मानतो त्यांच्या उल्लेखनीय सहकार्यासाठी. 
या कार्यक्रमासाठी आपल्या कल्याण जिल्हाप्रमुख मा. श्री. गोपाळ लांडगे साहेब यांनी खास उपस्थिती लावली होती. तसेच उपजिल्हा प्रमुख सौ. अंजली राऊत, माजी नगराध्यक्ष विजय पवार, युवासेना विस्तारक महाराष्ट्र राज्य तथा माजी नगरसेवक ऍड. निखिल वाळेकर,प्रज्ञा बनसोडे, महिला आघाडीच्या मालती पवार आणि त्यांच्या महिला आघाडी सदस्य यांच्या सोबत अंबरनाथचे सर्व शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक, संघटक, महिला पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्वप्नील जावीर आणि सर्व युवसैनिक पदाधिकारी आणि युवासैनिक यांनी उपस्थिती लावून अतिशय उत्तम प्रकारे सर्व उपक्रमाची जबाबदारी आणि कामगिरी पार पाडली.

आमदार डॉ. बालाजी किणीकर याना झी २४ तासचा पुरस्कार


अंबरनाथ / अविनाश म्हात्रे :- कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने सर्वांची झोप उडवली होती,गरीब रोजंदारीवर काम करणारे व गरीब यांची स्तिती दयनीय झाली होती,अशा स्तिथीत गरिबांना मदतीचा हात पुढे आमदार डॉ. बालाजी किणीकर केले होते, कोरोना काळात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन झी 24 तासने  भव्यदिव्य कार्यक्रमात पुरस्कार बहाल केला आहे ,कोरोना काळातील मदतकार्य हे संकटकाळात हिरीरीने पुढे येणाऱ्या, मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या आणि माझ्या पाठीशी ठामपणे उभे असणाऱ्या माझ्या अंबरनाथकर यांमुळेच हे शक्य झाले आहे, त्यामुळे झी 24 तासने दिलेला हा पुरस्कार मी समस्त अंबरनाथकरांना समर्पित करतो असे बोलून दाखवले या पुरस्कारामुळे त्यांच्या वर समाजमाध्यमांद्वारे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करणा-या कुळगांव बदलापुर नगरपालिका क्षेत्रातील को-ऑरडीनेटर सौ.भावना घोलप यांचा जनजागृती सेवा समितीच्या वतीने विशेष सन्मानपत्र देऊन सत्कार

बदलापुर- काही व्यक्तीमत्व ही असामान्य व कतृत्ववान असतात शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्तम काम करण ही त्यांची आवड व धेय्य असते. अशाच त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेने घेतली.त्याच अनुषंगाने समता साहित्य अकादमीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालालेल्या कुळगांव बदलापुर नगरपालिका क्षेत्रातील नगरपालिका शाळेच्या मुख्याध्यापिका आणि बदलापुर(पुर्व)च्या नगरपालिका को-ऑरडीनेटर सौ.भावना घोलप यांचा नुकताच त्यांच्या निवासस्थानी जाऊन जनजागृती सेवा समितीच्या वतीने विशेष सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ओम साईपुजन सोसायटीतील उत्साही कार्यकर्त्यी कु.ऋतिका पाटणकर हिने जनजागृती सेवा समितीतर्फे सौ.भावना घोलप यांना शाॅल प्रदान केली.व जनजागृती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी पुष्पगुच्छ व सन्मानपत्र प्रदान केले. आदरणीय "राष्ट्रीय आदर्श शिक्षक "पुरस्कार लाभलेल्या सौ.भावना घोलप यांना भरभरून शुभेच्छा आणि वाटचालीस प्रोत्साहन देण्यासाठी समता साहित्य अकादमीचे महाराष्ट्रचे अध्यक्ष श्री. दिलीप नारकर, समाजसेवक विलास साळगावकर,सिटीझन वेलफेअर असोशिएशनचे सेक्रेटरी राजेंद्र नरसाळे, टपाल विभाग स्थानिय लोकाधिकार समिती महाराष्ट्रचे उपाध्यक्ष विलास हंकारे तसेच सौ.भावना घोलप यांचे कुटुंबियही उपस्थित होते.

संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंती निमित्ताने चित्रकला स्पर्धा

मुंबई : संत शिरोमणी नामदेव महाराज यांची तिथीनुसार ७५१ वी जयंती यंदा १५ नोव्हेंबर २०२१ रोजी असून यानिमित्ताने जॉय सामाजिक संस्था मुंबई यांच्या वतीने इयता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धकांनी घरीच A-3 किंवा A-4 साईज पेपर वापरून संत नामदेव महाराज यांचे चित्र काढून ते रंगवून पोस्टाने किंवा कुरियरने पाठवायचे आहे.व्हाटस अप वर पाठविलेले चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य नसेल.प्रत्येक इयत्तेमधील एका सर्वोकृष्ट चित्राला रोख रु २५१/- ( दोनशे एक्कावन ) सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात येईल असे जॉय चे संस्थापक गणेश हिरवे यांनी सांगितले आहे.पत्ता-गणेश हिरवे, २/१२ पार्वती निवास, रामनगर, बांद्रेकरवाडी, जोगेश्वरी पूर्व -मुंबई-४०००६० . अधिक माहितीसाठी संपर्क -९९२०५८१८७८

शिवप्रेमी युवा प्रतिष्ठान तर्फे गड किल्ले स्पर्धा

उरण - दिवाळी सण जवळ आले की लहान बालकांसाठी गड किल्ले स्पर्धा आयोजित केले जातात. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील शिवप्रेमी युवा प्रतिष्ठान (धाकटे भोम -चिरनेर )या सामाजिक संस्थेतर्फे गड किल्ले स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून सदर स्पर्धा धाकटे भोम व भोम गावासाठी मर्यादित आहेत. स्पर्धेचे नियम व अटी याबाबत अधिक माहितीसाठी व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शिवप्रेमी युवा प्रतिष्ठान (धाकटे भोम चिरनेर )या संस्थेचे पदाधिकारी करण नारंगीकर -7710922792, प्रशांत पाटील -9930660433, शेखर नारंगीकर -9664255401 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

युवा सेनेच्या माध्यमातून गड किल्ले स्पर्धा.

उरण - लहान बालकांना, विद्यार्थ्यांमध्ये गड किल्ल्यांची आवड निर्माण व्हावी, गड किल्ल्याविषयी जनजागृती व्हावी या दृष्टी कोणातून युवा सेना उलवे नोड गव्हाण विभागातर्फे गड किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धकांनी रेडिमेड किल्ल्यांचा वापर करू नये. सदर स्पर्धा उलवे नोड व गव्हाण विभागासाठी मर्यादित असून स्पर्धेचे विविध नियम व अटी जाणून घेण्यासाठी तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, नावनोंदणीसाठी

 सुयोग कोळी -7977217398,श्याम पाटील -9773224093,रोनित भोईर -9004559889,राजेश सिंग -8928700645,

हन्नन पाटणकर -9833938000 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन युवा सेना उलवे नोड, गव्हाण विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

आम्ही पिरकोनकर समूह तर्फे गड किल्ले स्पर्धा

उरण - श्री छत्रपती शिवरायांच्या गडकिल्यांचे बीज छोट्या छोट्या मित्रांमध्ये, बालमनातच रुजावे यासाठी उरण तालुक्यातील आम्ही पिरकोनकर समूह तर्फे उरण तालुका मर्यादित गड किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धेकांनी 3/10/2021 पूर्वी नोंदणी करावयाची आहे. किल्ले स्पर्धेकांनी स्वतः बनवायचे असून इको फ्रेंडली किल्यांना प्राधान्य दिले जाईल.स्पर्धेचे नियम व अटी जाणून घेण्यासाठी व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आम्ही पिरकोनकर समूहाचे चेतन गावंड -9819759105, समीर गावंड -9920848156, विनायक गावंड -9821594243, तुषार म्हात्रे -9820344394, प्रमोद पाटील -9167230113 यांच्याशी संपर्क साधावे. असे आवाहन आम्ही पिरकोनकर समूहातर्फे करण्यात आले आहे.

डॉ नातू महाविद्यालयात कोव्हीड योध्यांचा सन्मान

मार्गताम्हाने : येथील डॉ तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयतील आऊटरिच सेंटर फॉर एक्स्टेंशन ऍक्टिव्हिटीजच्या वतीने कोव्हीडच्या काळात उल्लेखनिय काम केल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशासेविका, रुग्णवाहीका चालक प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर यांचा कोव्हीड योध्ये म्हणून प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी संस्थेचे सहसचिव श्री अजितशेठ साळवी, सचिव श्री मोहन चव्हाण , संचालक कृष्णाजी चव्हाण प्राचार्य डॉ विजयकुमार खोत उपस्थित होते. यावेळी डॉ निकिता शिर्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कोरोना लसीचे महत्व विषद केले. कोरोना काळात आऊटरिच सेंटर ने केलेल्या सामाजिक कार्याबद्धल समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आऊटरिच सेंटरचे समन्वयक प्रा डॉ सुरेश सुतार यांनी केले सूत्रसंचालन प्रा विकास मेहेंदळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ राजश्री कदम यांनी केले.

गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१

श्री.गगाराम तानू करंबेळे यांचे निधन

मुंबई (मोहन कदम /शांताराम गुडेकर )-  श्री कांडकरी विकास मंडळाचे आधारस्तंभ, वाडी प्रमुख,गावकर आणि सर्वांच्या सुख दु:खात सहभागी असणारे सर्वांना समजून घेणारे आमचे गावकर सन्माननीय श्री.गगाराम तानू करंबेळे( वय वर्षे ९५) यांचे आज पहाटे दु:खद निधन झाले. वाडीला पोरके करून गेले.गंग्यादादा म्हणून प्रख्यात होते. त्यांचे कासार कोळवण गावासाठी मोठे योगदान दिले आहे. देवाचे धार्मिक काम म्हटले की आवर्जुन उपस्थित राहून काम करायचे गावची इतिभूत म्हाहिती असणारे जाणकार व्यक्ती म्हहत्व कधीही वाडी- वाडी चा भेद त्यांनी केला नाही गावात कुठेही सुख दुःखाच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित उपस्थित राहून कार्यक्रमस्थळी पूर्ण वेळ देत असत त्यांच्या जाण्याने गावाचे मोठे नुकसान झाले आहे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना.

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

चला... अन्यायकारक पाणी बीलाची होळी करुया...

पाणीबिलात झालेल्या अन्यायकारक वाढीचा रा .जि .प च्या  पाणी पुरवठा विभागाच्या पेण येथील कार्यालयासमोर होणार तिव्र निषेध !!

पेण : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडुन खाजगी नळकनेक्शन धारकांना अन्याय कारक 2200 /- रुपये इतके पाणीपट्टीचे बिल बजावण्यात येत आहे. खारेपाट विभागाला गेली कित्येकवर्ष अशुद्ध व अपुरा पाणीपुरवठा केला जात आहे. असे असतानाही जिल्हापरिषदेने  पाणीपट्टीत दुपटीने वाढ करून खारेपाटाच्या जनतेवर खुप मोठा अन्याय केलेला आहे.

    जिल्हा परिषद रायगड ने पाणीपट्टीत वाढ केल्याच्या कृतीचा निषेध नोंदवून पाणीबिलाची होळी, रायगड जिल्हा परिषदेच्या पेण येथिल पाणी पुरवठा कार्यालयाच्या समोर बुधवार दि. २७/१०/२०२१ रोजी सका. १०.३० वाजता करण्याचा निर्णय खारेपाट विकास संकल्प संघटने मार्फत घेण्यात आलेला आहे. या कार्यकमा नंतर संघटने मार्फत तसेच विभागांतील ग्रामपंचायती मार्फत पाणी पुरवठा विभागाला निषेधाचे पत्र व निवेदन देण्यात येणार आहे . याची सर्व ग्रामस्थांनी व सहकाऱ्यांनी नोंद घ्यावी. 

   खारेपाटाला शुध्द व मुबलक पाणी मिळाल्या शिवाय हि पाणीपट्टीत करण्यात आलेली वाढ मान्य नाही यासाठीचे हे आंदोलन आहे. तरी सर्वानी या आंदोलनाची माहिती खारेपाटांतील जास्तीत -जास्त नागरिकांपर्यत  पोहचवून मोठ्या नागरीकांनी संखेने या आंदोलनात सहभागी होण्यासाठी खारेपाटांतील प्रत्येक नागरीकाने प्रयत्न करावे  अशी  विनंती प्रकाश माळी-अध्यक्ष- खारेपाट विकास संकल्प संघटना, सि.आर.म्हात्रे. (सर) सचिव- आणि या संघटनेचे सर्व पदाधीकारी व सर्व सहकारी सभासद यांनी विभागातील नागरिकांना केली आहे 


.

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड : महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ ; मंत्री, ॲड. अनिल परब यांची घोषणा

कर्मचाऱ्यांना २५०० दिवाळी भेट ;ऑक्टोबरचा पगार दिवाळीपूर्वी होणार

मुंबई – परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी एसटी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाला दिवाळीची गोड भेट दिली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमिवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यात आली असून दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना ५ हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना २५०० रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री ॲड. परब यांनी सोमवारी केली. या निर्णयाचा लाभ महामंडळाच्या सुमारे ९३ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होणार पगार यंदा मात्र नोव्हेंबरच्या १ तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी होणार आहे.

  महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. या मागणीला परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला. सध्या कर्मचाऱ्यांना १२ टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात आणखी ५ टक्के वाढ करण्याचा निर्णय मंत्री, ॲड. परब यांनी घेतला. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता १७ टक्के होणार आहे. 

एसटीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री. अजित पवार यांनी केलेल्या मदतीबद्दल ॲड. परब यांनी त्यांची आभार मानले आहेत. 

कोकणातील काजू उत्पादकांसाठी अल्प व्याजदरात कर्ज;राज्य शासनाकडून व्याज दर सवलत योजना : प्रायोगिकतत्वावर ओला काजूगर काढण्याच्या मशिन लुधियानावरुन मागविणार

अधिक उत्पन्न देणाऱ्या काजूचे वाण विकसित करण्याच्या कोकण विद्यापीठाला सूचना ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

 मुंबई : कोकणाच्या शाश्वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसायासह पर्यटन वाढीसाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काजू उत्पादकांना अल्प व्याजदरात भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून व्याज दर सवलत योजना राबविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. 

    मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार शेखर निकम उपस्थित होते. 

    उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणाच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांच्यामार्फत सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने व्याज सवलत योजना तयार करण्यात येणार आहे. तसेच ओल्या काजूगराला अधिक किंमत मिळत असल्याने प्रायोगिकतत्वावर ओला काजूगर काढण्याच्या मिशन लुधियानावरुन मागविण्यात येणार आहेत. या मशिन मागविल्यानंतर ओला काजूगराचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर अधिक उत्पन्न देणारे काजूचे वाण विकसीत करण्याच्या सूचना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. 

   या बैठकीला नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, राज्य उत्पादन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत (व्हीसीद्वारे), कुलसचिव डॉ. भरत साळवी (व्हीसीद्वारे), महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कॅश्यु प्रो. फेडरेशनचे अध्यक्ष धनंजय यादव, मिथिलेश देसाई, खालगाव काजू मद्यार्क व काजू उत्पादक सहकारी संस्थेचे संचालक पंकज दळवी उपस्थित होते. 

कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान ; अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती लवकरच होणार जाहीर

अलिबाग (जिमाका):- मा. सर्वोच्च न्यायालयाचे दिनांक 30 जून, 2021 रोजीच्या आदेशानुसार व त्यानुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दि. 11 सप्टेंबर, 2021 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड 19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रु.50,000/- (अक्षरी रु. पन्नास हजार मात्र) एवढे अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केलेले आहे. त्यानुसार, प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी त्यांचे पत्र दि. 12 आक्टोबर, 2021 अन्वये निर्देशित केल्यानुसार पुढीलप्रमाणे उक्त सानुग्रह अनुदान वाटपासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता खालीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे---

      जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, हिराकोट तलावाजवळ, अलिबाग जि. रायगड पिन-402201, संपर्क क्रमांक 02141-222097 टोल फ्री नंबर 1077, ईमेल आयडी rdcraigad@gmail.com

रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे जिल्हाधिकारी, रायगड हे अध्यक्ष आहेत. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती लवकरच अधिसूचित करण्यात येईल, त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

कोविड 19 मुळे बाधित होवून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना देय अर्थसहाय्याबाबत तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय व महानगरपालिकास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत

अलिबाग (जिमाका):- सर्वोच्च न्यायालयामध्ये दिवाणी याचिका क्र.539/2021 विविध अर्ज क्र. 1120/2021 च्या अनुषंगाने कोविड-19 मुळे बाधित होवून मृत झालेल्या व्यक्तींच्या कायदेशीर वारसांना अर्थसहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्याबाबत आदेश पारित झालेले आहेत. 

      शासन निर्णयानुसार कोविड 19 मुळे बाधित होवून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना देय अर्थसहाय्याबाबत तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय व महानगरपालिकास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्याचा निर्णय पारित झालेला आहे.     

      जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि. 13 ऑक्टोबर, 2021 रोजीच्या शासन निर्णयातील निर्देशानुसार पुढीलमाणे जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत.

      जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर -अध्यक्ष,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने- सदस्य सचिव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे-सदस्य, स्पेशालिस्ट डॉ. डॉ. विक्रमजीत पडोळे- सदस्य, डीन, अलिबाग वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. महेंद्र कुरा- सदस्य.

ही तक्रार निवारण समिती पुढील अटींनुसार संदर्भ हाताळील---

          कोविड-19 मृत्यू प्रमाणपत्राबाबतच्या तक्रारींची पडताळणी ही समिती करेल, ही समिती वस्तुस्थितीची पडताळणी केल्यानंतर अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र जारी करेल, कोविड-19 मुळे मृत झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्या रुग्णालयांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी मागणी केल्यास उपचाराची सर्व कागदपत्रे देणे आवश्यक आहे. जर रुग्णालयांनी अशी कागदपत्रे देण्यास नकार दिला तर अशा तक्रारींची दखल जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीने घेण्यास मुभा असेल, अशावेळी संबंधित रुग्णालयाने त्या व्यक्तींवर उपचार केल्याची सर्व कागदपत्रे तक्रार निवारण समितीस सादर करणे आवश्यक आहे, जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने मृत व्यक्तीचे समकालीन वैद्यकीय रेकॉर्ड तपासून 30 दिवसांच्या आत तक्रारीचे निवारण करणे आवश्यक आहे, जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या आदेशानुसार संबंधित नोंदणी प्राधिकरण मृत्यू प्रमाणपत्रामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्याची दखल घेतील, जर समितीचा निर्णय दाव्याच्या बाजूने नसेल तर त्याचे स्पष्ट कारण समितीने नोंदविणे आवश्यक आहे, असेही शासनाकडून कळविण्यात आले आहे

जिल्हाधिकारी कार्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त भ्रष्टाचार निर्मूलन प्रतिज्ञा घेवून संपन्न झाला कार्यक्रम



अलिबाग:-
जिल्हाधिकारी कार्यालय राजस्व सभागृह येथे आज  दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा सप्ताह स्वतंत्र भारत @ 75 : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे  या संकल्पनेसह दि.06 ऑक्टोबर 2021 ते 01 नोव्हेंबर 2021 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. 

       यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळै, तहसिलदार सचिन शेजाळ, तहसिलदार विशाल दौंडकर, तहसिलदार सतिश कदम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने  उपस्थित सर्वांनी भ्रष्टाचार निर्मूलन संदर्भातील प्रतिज्ञा घेतली तसेच राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी या सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचनही करण्यात आले.            

वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत वस्त्रोद्योग प्रकल्पांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

अलिबाग- वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीज अनुदान योजनेचा लाभ घेत असलेले वस्त्रोद्योग 27  शक्ती पेक्षा कमी जोडभार असलेले यंत्रमाग सोडून अन्य सर्व वस्त्रोद्योग प्रकल्प ज्यांची वीज सवलत सुरू आहे. त्याचप्रमाणे वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करीत असलेले वस्त्रोद्योग प्रकल्प या सर्व प्रकल्पांनी तातडीने पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले यांनी केले आहे.

      ज्या वस्त्रोद्योग घटकांची वीज सवलत सुरू असेल किंवा बंद आहे अथवा वीज सवलत मागणीसाठी प्रस्ताव सादर करीत आहे, त्या उद्योगांनी शासन निर्णय, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या दि.22 ऑक्टोबर 2021 या शासन निर्णयाप्रमाणे आपले प्रस्ताव आयुक्त (वस्त्रोद्योग) यांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावा.  या प्रस्तावात मागील 6 महिन्यांचे वीज देयक तसेच प्रकल्पाचा एकूण वीज वापर जसे औद्योगिक, कामगार वसाहत, त्यांचे कार्यालय व अन्य वापर यांच्या माहिती तसेच त्यासाठीच्या वीज मिटर याची माहिती सादर करावी.  ज्या वस्त्रोद्योग घटकांची वीज सवलत नियमित सुरू आहे, त्या प्रकल्पांना वरीलप्रमाणे प्रस्ताव सादर करण्यासाठी शासन निर्णयानुसार 10 दिवसांची मुदत देण्यात येत आहे. या प्रकल्पानी दि.03 नोव्हेंबर 2021 पर्यंत वरीलप्रमाणे प्रस्ताव सादर करावा. या मुदतीत ज्या प्रकल्पांचे प्रस्ताव प्राप्त होणार नाही,  त्यांची वीज सवलत बंद करण्यात येईल. तसेच हे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्या प्रस्तावांची सखोल तपासणी केल्यानंतर शासनाच्या मान्यतेने या प्रकल्पांना वीज लागू करण्यात येईल.  

       शासनास प्राप्त होणाऱ्या वीज सवलतींच्या प्रस्तावात प्रकल्पांनी सादर केलेली माहिती तसेच प्रकल्पांत प्रत्यक्षात असलेली माहिती तीच आहे किंवा कसे याची विभागाच्या दक्षता व नियंत्रण पथकाकडून नियमित तपासणी करण्यात येईल. जर पथकाच्या तपासणीत निदर्शनात आले की, प्रकल्पाने सादर केलेली माहिती तसेच प्रत्यक्षात असलेली माहिती यामध्ये तफावत आहे किंवा प्रकल्पाने चुकीची अथवा खोटी माहिती सादर केली आहे, तर त्या प्रकल्पाची वीज सवलत तसेच अन्य सवलती तात्काळ बंद करण्यात येतील. तसेच यापूर्वी दिलेल्या सर्व अनुदानाची व्याजासह वसूली करण्यात येईल.  

       ज्या प्रकल्पांनी शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टाप्रमाणे नमूद केलेल्या माहितीपैकी जी माहिती यापूर्वी सादर केलेली आहे, ती माहिती वगळून उर्वरीत माहिती सादर करावी. ज्या प्रकल्पांनी वीज सवलत स्वघोषणापत्र न सादर केल्यामुळे बंद आहे व त्यांनी प्रस्ताव सादर केलेले नाहीत, त्यांनी देखील त्वरीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त, श्रीमती शीतल तेली-उगले यांनी केले आहे.

सेझ समस्या संदर्भात खासदार कपील पाटील यांच्यासमवेत बैठक


उरण - खासदार कपिल पाटील( राज्यमंत्री- पंचायत राज्य भारत सरकार) यांच्याकडे उरण-पेण-पनवेल येथील महामुंबई सेझ ने ज्या जमिनींचा भूसंपादन करून 45 गावातील शेतकऱ्यांची जमीन कवडीमोल भावाने व काहींची तर फसवणूक करून घेतली होती. त्यासंदर्भात केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या भिवंडी येथील निवास स्थानी मिटिंग लावण्यात आली होती. व ही मिटिंग जवळपास अर्धा तास त्यांच्या कार्यालयात चालली.खासदार तथा केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यात येईल व पुढील मिटिंग ही सह्याद्री अतिथीगृहात महसूल विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी रायगड व सर्व संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांच्या समवेत लावण्यात येईल असे सांगितले.सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल असेही खासदार कपील पाटील यांनी उपस्थितांना सांगितले. ह्या प्रसंगी पेण येथील सेझ च्या जमिनी परत शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी लढा देणारे प्रकल्पग्रस्त सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष अरुण पाटील, उपाध्यक्ष कृष्णा वर्तक, कायदेशीर सल्लागार डी. पी. म्हात्रे, कार्याध्यक्ष प्रभाकर मोकाशी व उरण पूर्व विभागातील गोरख ठाकूर,चंद्रकांत घरत, भुपेंद्र ठाकूर, सुरज म्हात्रे आदी पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हेच एकमेव उद्दिष्ट असल्याने आम्ही उरण पूर्व विभागातील शेतकऱ्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी खासदार कपील पाटील यांची भेट घेऊन सेझ ची समस्या त्यांच्या समोर मांडली असल्याचे उरण पूर्व विभागातील सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर यांनी सांगितले. या बाबतीत खासदार कपील पाटील यांची भूमिका हे सकारात्मक असल्याने लवकरच हा प्रश्न सुटेल अशी आशा उरण, पनवेल, पेण मधील प्रकल्पग्रस्त, शेतकरी, सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

रायगड भूषण मनोज पाटील यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

उरण - महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे  संस्थापक अध्यक्ष तथा उरण तालुक्यातील पाणदिव्याचे सुपुत्र मनोज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था चिरनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा तसेच चिरनेर परिसर कार्यक्षेत्रातील उरण वनविभागाच्या वनअधिकाऱ्यांचे यावेळी सन्मान करण्यात आले. वनक्षेत्रात वणवा विझविण्याचे काम असो, मानवी वस्तीतून साप पकडून वनपरिसरात सोडून त्यांना जीवनदान देण्याचे कार्य असो, किंवा वृक्षलागवड करुन येथील पर्यावरणासाठी धडपड करण्याचे कार्य लक्षात घेवुन वाढदिवसानिमित्त ३० युवकांना सन्मानपत्र व मेडल देवुन गौरव करण्यात आले. मनोज पाटील यांच्या २५ वर्षाच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सन २०१६ साली रायगड भूषण पुरस्कार, तर नेहरू युवा केंद्र भारत सरकार तर्फे २००१ मध्ये युवा पुरस्कार मिळाले आहे.मनोज पाटील हे शिक्षक आहेत, त्यांनी शैक्षणीक स्तरावर उत्तम कामगिरी करीत त्या क्षेत्रात ही २०११ मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मान प्राप्त करुन यशाच्या शिखरावर आपले नाव कोरले आहे.आजच्या वाढदिवशी महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे, स्व. संगिता मच्छिंद्र ठाकूर फाऊंडेशन धुतुम आणि वटवृक्ष सामाजिक संस्था उलवे ह्या संस्थाना एकत्र करित सामाजिक बांधिलकी जपत चांदायली वाडीतील मुलांना खाऊ वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. सदर कार्यक्रमास वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचा मोलाचा वाटा ठरला. यावेळी रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य वैजनाथदादा ठाकूर, आदीवासी विकास प्रकल्प माजी नियोजन अधिकारी श्रीधर मोकल, महिला मंडळाच्या प्रमुख संतोष बेन, वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी, उपाध्यक्ष आनंद मढवी, काशिनाथ खारपाटील, पंकज घरत,रूपेश भोईर, विशाल पाटील, प्रतिक कोळी, बंटी मढवी, जतीन मढवी, विनित मढवी आदि मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.

जे एन पी टी मध्ये दक्षता जनजागृती सप्ताहला सुरुवात ; भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली प्रतिज्ञा.

उरण -रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात असलेल्या जे एन पी टी बंदर प्रशासनाने २६  ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. 

  जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, शेवा,  येथील दक्षता जागरुकता सप्ताह- २०२१ ची थीम आहे " स्वतंत्र भारत @ ७५ सचोटीसह स्वावलंबन".यामध्ये दक्षता जागरुकता सप्ताहादरम्यान  ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍इन्फॉर्मर (पीआयडीपीआय)  दृढनिश्चय करणे,  अंतर्गत प्रक्रियेत सुधारणा आणि इतर हाऊस कीपिंग क्रिया कला, भ्रष्टाचार निर्मूलन यांवर देखील लक्ष केंद्रित केले आहे.

     "स्वतंत्र भारत@ ७५ सचोटीसह स्वावलंबन", या संकल्पनेनुसार विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. आज दिनांक २६ ऑक्टोबर रोजी  सकाळी ११.१५ वाजता जे एन पी टी येथे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत शपथ घेतली. 

    जे एन पी टी मार्फत  दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त जन जागृती केली जात आहे. यावेळी पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्य मध्ये दक्षता  मोहिमे अंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालयात लाच घेणे अथवा लाच देणे गुन्हा आहे, तसेच  अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी व सर्व  नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी होऊन लाच मागणाऱ्या विरुध्द तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले.

      तसेच कोणतेही काम हे कायद्याच्या नियमात राहून केले पाहिजे त्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमांचे कठोर व प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. कोणी पैशाची मागणी करत असल्यास त्याची तक्रार संबंधित विभागाकडे करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच पैश्याची कोणतीही मागणी न करता काम करण्याचे , भ्रष्टाचार ही किड असून त्याचा नायनाट करणे हे आपले कर्तव्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

     यावेळी विद्याधर ए मालेगावकर IRTS - मुख्य दक्षता अधिकारी ,  कुमार एम अंकलेकर - Dy.  मुख्य दक्षता अधिकारी ,   जितेंद्र आर गद्रे सहायक व्यवस्थापक (दक्षता) ,  विश्वास बी खैरनार - अधीक्षक (दक्षता), प्रशांत एस शुक्ला - सहायक अभियंता (दक्षता) व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

वाढती गुन्हेगारी थांबवण्यासाठी विशेष सभेचे आयोजन

 जोगेश्वरी  - दि. २५ ऑक्टोबर रोजी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील पोलिसांशी संबंधित असलेल्या प्रकरणाबाबत नागरिकांच्या समस्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडून त्यांना योग्य तो न्याय मिळण्यासाठी व जोगेश्वरी भागातील वाढती गुन्हेगारी थांबवण्यासाठी आमदार व माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी इच्छापूर्ती गणेश मंदिर हॉल येथे एक विशेष सभा बोलावली होती.या विशेष सभेत उपस्थित नागरिकांकडून त्यांच्या समस्या मांडण्यात आल्या आहेत.

जोगेश्‍वरीच्या सौंदर्यात भर घालणार्‍या विकास कामांचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडले उद्घाटन

जोगेश्वरी - जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून ही कामे करण्यात आली आहेत.- पश्‍चिम द्रुतगती महामार्ग येथील इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या भिंतीलगत उभारण्यात आलेल्या ‘आय लव जोगेश्‍वरी’ सेल्फी पॉईंट व सुशोभित भिंत, शिवसेना शाखा क्रमांक.५२, गोकुळधाम शाखेचे नुतनीकरण, ग्रंथालय, योगा केंद्र, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्राचे ही उदघाटन करण्यात आले.जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राच्या सौंदर्यात भर घालणारे अनेक सुनियोजित विकास कामे करण्यात आली आहे.या सौंदर्यात अधिक भर घालणार्‍या तीन कामांचे उदघाटन पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार तसेच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून ही कामे करण्यात आली आहेत.विविध विकासकामांच्या माध्यमातून वायकर यांनी जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचा कायापालट या अगोदरच केला आहे.जनतेच्या मनातील जोगेश्‍वरीच्या विकासाला त्यांनी अधिक प्राधान्य दिले आहे. पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील ईस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या भिंतीलगत रविंद्र वायकर यांनी ‘आय लव जोगेश्‍वरी’ सेल्फी पॉईंट उभारला असून भिंतीवर आकर्षक भिंती चित्रेही काढली असून या ठिकाणावरुन जाणारे  व येणारे पादचारी, वाहनधारक तसेच पर्यटक यांच्यासाठी हा भाग आकर्षणाचे केंद्र बनला आहे.गोरेगाव (पूर्व) येथील गोकुळधाम येथील शाखा क्रमांक ५२ चे नुकतेच नुतनीकरण करण्यात आले असून या ठिकाणी ग्रंथालय, योगा केंद्र, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रही उभारण्यात आले आहे.या सगळ्या वास्तु आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आल्या आहेत.या सर्व कामांच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे खासदार व नेते गजानन किर्तीकर, दिंडोशी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच विभागप्रमुख सुनिल प्रभू, उप महापौर सुहास वाडकर, नगरसेवक बाळा नर, प्रविण शिंदे, विधानसभा संघटक विश्‍वनाथ सावंत, महिला संघटक रचना सावंत, शालिनी सावंत, उपविभागप्रमुख जयवंत लाड, कैलाशनाथ पाठक, जितेंद्र वळवी, बाळा साटम, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, बावा साळवी, शाखाप्रमुख मंदार मोरे, अमर मालवणकर, बाळा तावडे, संदिप गाढवे, युवोसेनेचे अमित पेडणेकर, ईस्माइल युसुफ महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.स्वाती व्हावळ आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य व्यवसायिक पुरस्कारने महिलांचा सन्मान, खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते वितरण

पुणे - महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्र आणि व्यवसयात यशस्वीरित्या काम करत असणा-या व्यवसायिक महिलांचा ‘महाराष्ट्र राज्य व्यवसायिक पुरस्कार २०२१’ देऊन सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र राज्य महिला व्यवसायिक संघठना यांच्या वतीने हे पुरस्कार देण्यात आले. राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण पार पडले.पुण्यातील पत्रकार भवन येथे हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.

     पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा खासदार वंदना चव्हाण उपस्थित होत्या. तसेच चंदुकाका सराफ आणि सन्सच्या संचालिका डॉ. संगिता शहा आणि मृणाल वाणी आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘महाराष्ट्र राज्य व्यवसायिक संगटनेच्या वतीने व्यवसायिक महिलांना महाराष्ट्र राज्य व्यवसायिक पुरस्कार देऊन त्यांच्या व्यवसाय आणि कतृत्वाला सलाम केला ही अभिमानास्पद बाब आहे. महिला आज आपल्या विचाराच्या पलिकडच्या क्षेत्रात जाऊन व्यवसाय करीत आहेत. हा व्यवसाय त्या आंतरराष्ट्रिय स्तरावर घेऊन जात आहेत याचं कौतुक करावे तेवढे थोडं आहे. महाराष्ट्र राज्य व्यवसायिक संगटना यांच्या सोबत काम करत त्यांना मदत करत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे,’ असे त्या म्हणाल्या. वंदना चव्हाण यांनी संस्थेसोबत काम करण्याची ईच्छा व्यक्त केली तसेच, लघु उद्योगापासून मोठ्या व्यवसायापर्यंत घेउन जाण्यासाठी सहकार्य करण्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. 

    चंदुकाका सराफ आणि सन्सच्या संचालिका डॉ. संगिता शहा यांनी व्यवसायिक महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक केले, आणि संस्थेसाठी काम करण्याची ईच्छा व्यक्त केली.  

महाराष्ट्र राज्य महिला व्यवसायिक संघटनेच्या अध्यक्षा सौ. तृप्ती धनवटे- रामाने यांनी ‘संस्थेच्या माध्यमातून अनेक कामे सुरू केली आहेत. लघु उद्योग आणि कौशल्य विकास उद्योग याला अधिक मागणी आहे. त्यामुळे उद्योग सुरू करून देणे, शासकिय आणि केंद्रिय आर्थिक योजना उपलब्ध करून देणे तसेच, व्यवसायाचे योग्य मार्गदर्शन करून उत्पादन लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्था काम करते. पुरस्कृत केलेल्या महिला त्यांच्या उद्योगात अनुभवी आहेत, त्यामुळे त्यांच्या मदतीने राज्यात, आंतरराष्ट्रिय आणि ग्रामीण  स्तरावर विविध उपक्रम राबविले जातात.’ 

      पुरस्कृत व्यवसायिक महिलांची नावे - राजलक्ष्मी जेधे, सुजाता दहाड, श्वेता उंड्रे, स्नेहल निम्हाण, चैताली बरदीया, श्रद्धा पाटील थोरात, जोत्स्ना कलाटे, मेरी जैसवाल, अपूर्वा गुरवे, श्रद्धा दरडे, सुनिता पाटसकर, प्रिती मोरे, अनिता डफळ, किर्ती मोटे, स्मिता वाकडकर, सिमा खंडाळे, विजया मानमोडे, सिमा हिमाने, विनया तापकिर, श्वेता कापसे ,पूनम सस्ते,नेहा मराठे आणि तृप्ती निबळे. 

     प्रास्ताविक संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती धनवटे-रामाने यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सचिव अनिता डफळ आणि संस्थेच्या पदाधिका-यांनी केले.

डॉ.तात्यासाहेब नातू महाविद्यालय मार्गताम्हाने येथे मिशन युवा स्वास्थ्य कोविड-१९ लसीकरण

मार्गताम्हाने : येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयामध्ये दि. २६/१०/२०२१ व २७/१०/२०२१ रोजी “मिशन युवा स्वास्थ्य” या शासनाच्या मोहिमेअंतर्गत १८ वर्षाहून अधिक वयाच्या विद्यार्थी व युवकांसाठी कोविड-१९ लसीकरण शिबिराचे रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आयोजन केले गेले.  प्राचार्य डॉ.विजयकुमार आ.खोत यांनी विद्यार्थ्यांना लसीकरण करून घेण्याबाबत मार्गदर्शन केले. ह्या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव श्री. अजित साळवी, रामपूर प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या वैदयकीय अधिकारी डॉ. निकिता शिर्के, आरोग्यसेविका सौ. रंजना घाटे,वैशाली यादव चौधरी, दीपाली  चव्हाण  आरोग्य सेवक श्री. शंकर घाणेकर,अंबादास शिंदे, श्री. विनायक कारकर,उपक्रम प्रमुख डॉ. सुरेश सुतार, डॉ. एन.बी.डोंगरे, व प्रा.आर.एस. माने, डॉ.आर.पी.कदम उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुरेश सुतार यांनी केले तर प्रा.डॉ. एन.बी. डोंगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१

जनजागृती सेवा समितीचा प्रथम वर्धापनदिन व "समाजरत्न पुरस्कारा"सोहळा उत्साहात संपन्न



बदलापुर-
समाजाचे आपण काही देण लागतो या उद्दात्त हेतुने स्थापन केलेल्या जनजागृती सेवा समितीचा प्रथम वर्धापनदिन व समाजरत्न पुरस्कार सोहळा येथील अजय राजा हाॅल येथे उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योग श्री ग्रुप संस्था पुणे चे अध्यक्ष डाॅ. ज्ञानेशानंद शास्त्रीजी महाराज,मुंबई महानगरपालिकाच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त सुनिल गोडसे,जाणीव वृध्दाश्रम व जाणीव अन्नछत्राचे संस्थापक मनोज पांचाळ,रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड,सिनियर सेल्स मॅनेजर स्टार हेल्थ इन्शुरन्सचे राजेश विनायक कदम,कीर्तनकार,प्रवचनकार,आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक श्रीराम पुरोहीत हे उपस्थित होते, यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.सर्व प्रमुख पाहुण्यांचे कार्यकारिणीतील पदाधिका-यांनी शाल,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व आगामी येणा-या नविन वर्षात जनजागृती सेवा समिती अंतर्गत व्यावसायिकांना त्यांच्या उद्योगाला चालना देण्यासाठी,त्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी,व्यवसायाची विचारांची देवाणघेवाण होईल यासाठी "जनजागृती उद्योग क्रांतीची "घोषणा करण्यात आली.समितीच्या सविव सौ.संचिता भंडारी यांनी वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतला.त्यानंतर फक्त बदलापुर येथील विविध क्षेत्रात कार्य करणा-या संस्थाचे अध्यक्ष, संस्थापक, संचालक,सचिव,समाजसेवक, पदाधिकारी यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते "समाजरत्न पुरस्काराने"गौरविण्यात आले.समाजरत्न पुरस्कार्तींच्या वतीने समता साहित्य अकादमी महाराष्ट्रचे अध्यक्ष दिलीप नारकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता कडुलकर,तेजल तिरपणकर-उकार्डे,प्रदीप जोशी,गणेश हिरवे,श्रुती उरणकर,मिनल गावडे, भावना परब,महेश्वर तेटांबे,आत्माराम नाटेकर,प्रफुल्ल थोरात यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीप जामसांडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर यांनी केले. सुग्रास भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

अंबरनाथ राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा

अंबरनाथ (अविनाश म्हात्रे )- राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा–संवाद कार्यकर्त्यांशी,पक्षाच्या केंद्रबिंदूंशी!’राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या चौथ्या पर्वाचा (कोकण विभाग) ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचा आज आढावा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब यांना सादर केला.या वेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब,महेश तपासे, जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, अंबरनाथ शहराच्या शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील, महिला अध्यक्ष पूनम ताई शेलार व सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी उपस्थित होते!

दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर यांना समाजरत्न पुरस्कार

अंबरनाथ (अविनाश म्हात्रे )- सदैव समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या बदलापूर येथील विख्यात समाज सेविका दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर यांना समाजरत्न पुरस्कार जनजागृती सेवा समितीचा प्रथम वर्धापनदिनानिमीत्त बहाल करण्यात आला आहे, जनजागृती सेवा समितीचा प्रथम वर्धापनदिन व समाजरत्न हा पुरस्कार सोहळा येथील अजय राजा हाॅल येथे उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योग श्री ग्रुप संस्था पुणे चे अध्यक्ष डाॅ. ज्ञानेशानंद शास्त्रीजी महाराज,मुंबई महानगरपालिकाच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त सुनिल गोडसे,जाणीव वृध्दाश्रम व जाणीव अन्नछत्राचे संस्थापक मनोज पांचाळ,रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड,सिनियर सेल्स मॅनेजर स्टार हेल्थ इन्शुरन्सचे राजेश विनायक कदम,कीर्तनकार,प्रवचनकार,आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक श्रीराम पुरोहीत हे उपस्थित होते, यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.सर्व प्रमुख पाहुण्यांचे कार्यकारिणीतील पदाधिका-यांनी शाल,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले,जनजागृती सेवा समितीचा प्रथम वर्धापनदिना चे आयोजन अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी केले होते.


रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

माथेरानची जागतिक पातळीवरील ओळख अधिक ठळक करण्यासाठी कटिबद्ध होवू या !!- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून "स्वप्नातील माथेरान" साठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूया...-- पालकमंत्री कु.आदिती तटकरे

माथेरान :- निसर्गरम्य माथेरानची जागतिक पातळीवरील ओळख अधिक ठळक करण्यासाठी आज आपण सर्वांनी कटिबद्ध होवू या, असे प्रतिपादन पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज माथेरान येथे केले.

    राज्य सरकारच्या नगरविकास आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून माथेरान गिरीस्थान नगरपरिषद हद्दीमधील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा आज (24 ऑक्टोबर) रोजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि पर्यटन विभागाच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

     यावेळी मुंबई सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आणि माथेरान नगरपरिषदचे पर्यटन दूत तसेच सुप्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, उपवनसंरक्षक श्री.ठाकरे यांच्यासह माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, श्री.मनोहर भोईर, श्रीमती रेखा ठाकरे,चंद्रकांत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. 

      पर्यटन मंत्री श्री.आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, माथेरानमधील शाश्वत विकास करताना स्थानिकांचा प्राथम्याने विचार करून रोजगार निर्मिती करायची आहे. माथेरानचे नैसर्गिक वैभव जतन करण्याची गरज आहे.यासाठी राज्य सरकारच्या वतीने सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील. माथेरान पुनर्जीवित करून माथेरानची जागतिक पातळीवरील ओळख अधिक ठळक करायची इच्छा आहे.

      या ठिकाणी येताना स्थानिक नागरिकांकडून निवेदने दिली जात होती, त्यात येथील रुग्णालयाविषयी देखील समस्या मांडण्यात आली, याविषयी बोलताना श्री.ठाकरे यांनी महाबळेश्वरच्या धर्तीवर माथेरान मधील रुग्णालयाचीही सुधारणा करण्याचे काम येत्या काही महिन्यात प्राधान्याने करणार असल्याचे जाहीर केले. त्यासाठी सीएसआर फंड मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केला जाईल. 

    श्री.ठाकरे पुढे म्हणाले, माथेरान शहराचा पर्यावरण पूरक विकास करण्याचा सरकारचा मनोदय असून तो विकास शाश्वत असला पाहिजे आणि स्थानिकांना बरोबर घेऊनच तो विकास साधावयाचा  आहे. स्थानिकांना रोजगार देणारा हा शाश्वत विकास माथेरानमध्ये केला जाणार असून नावीन्यपूर्ण उपक्रमांतून रोजगार निर्मिती करण्यावर राज्य सरकार भर देणार आहे. 

      पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी बोलताना माथेरान मध्ये पर्यटक अधिक संख्येने यावेत, यासाठी पर्यटन विभागाने अनेक प्रकल्प आणण्याची गरज होती आणि त्यासाठी पर्यटन विभागाबरोबर नगरविकास विभाग आणि एमएमआरडीएकडून अधिक निधी मिळावा, अशी मागणी पालकमंत्री या नात्याने आपण केली असून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यटन विभागाच्या अखत्यारीतील एमटीडीसी च्या रिसॉर्टला गतवैभव देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, श्री.आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून होत असलेले हे काम महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन क्षेत्रातील माईल स्टोन ठरत आहे. 

     पर्यटन मंत्री आणि पर्यटन राज्यमंत्री म्हणून आम्ही करीत असलेल्या प्रयत्नांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे मोठे पाठबळ मिळत आहे. यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आभार मानले.

    त्या पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यात पर्यटनाचा विकास करताना त्या त्या भागातील पारंपरिक व्यवसाय सुरू ठेवून इतर व्यवसायांनाही चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. माथेरान विकास पॅटर्न हा सर्वांसमोर आदर्श मॉडेल असेल, यात शंकाच नाही,असे सांगून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून "स्वप्नातील माथेरान" साठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूया, असे आवाहन शेवटी त्यांनी केले.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माथेरान गिरीस्थान नगराध्यक्ष सौ.प्रेरणा सावंत यांनी यावेळी माथेरानचा खऱ्या अर्थाने विकास श्री.उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्याने सुरू होऊ शकला आहे. माथेरान मधील सिम्पसन टॅंकला पुन्हा जिवंत करण्यासाठी राज्य सरकारने लक्ष देण्याची विनंती त्यांनी केली.

        या कार्यक्रमाच्या निमित्ताने "माझी वसुंधरा" हे अभियान पालकमंत्री कु.आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्मिती केलेल्या घडीपत्रिका,बॅचेस,मानचिन्ह, स्टिकर्स यांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

      यावेळी माथेरान मधील 100 वर्षे जुन्या असलेल्या व आता नूतनीकरण केलेल्या करसनदास मुळजी वाचनालयाचे लोकार्पण तसेच पालिकेच्या सभागृहाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृह असे नाव देण्यात आले असून या सभागृहाचे नामकरण आज पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व पालक मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर येथील हॉटेल उषा एस्कॉट च्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात माथेरान मधील नऊ विकासकामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण ऑनलाईन पध्दतीने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. लोकार्पण आणि भूमीपूजन करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये ऑलम्पिया मैदानाचा पुनर्विकास करणे,माथेरान शहरातील मुख्य रस्ता ते लॉर्ड पॉईंट रस्ता विकसित करणे, मुख्य रस्ता ते बिग चौक पॉईंट रस्ता विकसित करणे, हॉटेल प्रीती ते हॉटेल पॅनोरमा रस्ता विकसित करणे, क्ले पेव्हर ब्लॉक लावणे, स्लॉटर  हाऊसचे नूतनीकरण करणे, पंचशील नगर येथील एमएमआरडीए शौचालयजवळील जागेचे सुशोभीकरण करणे, मुख्य रस्ता ते मंकी पॉईंटकडे जाणारा रस्ता विकसित करणे, मुख्य रस्ता ते कोरोनेशन पॉईंट रस्ता विकसित करणे तसेच माथेरान नगरपरिषद हद्दीत बसविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण डस्टबिन चे लोकार्पण झाले. 

     कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत नगराध्यक्ष प्रेरणा सावंत आणि मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मल्हार पवार आणि आभार प्रदर्शन मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी केले.

     हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माथेरानमधील सर्व लोकप्रतिनिधी, कर्जत प्रांत अधिकारी अजित नैराळे, तहसिलदार सचिन शेजाळ, तहसिलदार विक्रम देशमुख, महसूल विभागातील इतर अधिकारी कर्मचारी, माथेरानचे पोलीस निरीक्षक श्री.बांगर, नगरपरिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी, स्थानिक संस्था, संघटना यांनी अथक परिश्रम घेतले.

मधुमेही रोगीसाठी मोफत आरोग्य शिबीर

उरण- हयातूल इस्लाम गरीब नवाज चॅरिटेबल ट्रस्ट उरण यांच्या माध्यमातून द ब्रदरहूड मेडिकल ऐड ऍण्ड वेलफेअर फॉउंडेशन यांच्या सहकार्याने उरण मधील मस्जिद मोहल्ला, उरण पोलीस स्टेशन जवळ, उरण शहर येथे मधुमेही (डायबेटीस ) रुग्णांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शिबिरा अंतर्गत मधुमेही (डायबेटीस )रुग्णांचे HBA1C,लिव्हर प्रोफाइल, एलक्ट्रॉलयटीस, युरीनालायसिस, सी क्रीटीव्ह, इन्फेकशन पॅनल (3 H,VDRL, MALARIA )आदी तपासण्या मोफत करण्यात आले. खास मधुमेही रोगांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.100 हुन अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला. यावेळी हयातूल इस्लाम गरीब नवाज चॅरिटेबल ट्रस्ट उरणचे हाफिज फहद, हाफिज अर्शद, शानू मुकादम, नईम करवेकर, इरफान शेख, गुलजार भाटकर तर द ब्रदरहूड मेडिकल ऐड ऍण्ड वेलफेअर फॉउंडेशनचे इम्रान गुजराथी, अब्दुल पठाण, हरून गिरनारी आदी पदाधिकारी सदस्यांनी आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. यावेळी उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र मढवी,सरचिटणीस संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते आयाझ फकिह यांनी भेट दिली. सदर आरोग्य शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

उरण केगाव मुख्य रस्त्याच्या कामाचे शुभारंभ

उरण - उरण तालुक्यात भारतीय जनता पार्टी तर्फे विविध विकासकामे सुरु असून भारतीय जनता पार्टीचे नेते तथा उरण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेश बालदी यांनी उरण केगाव मुख्य रस्त्याचे दुसऱ्या टप्प्याचे मजबुती करण्याकरिता 49,99,542 रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून  मंजूर करून घेतले होते. त्या रस्त्याच्या कामाचे शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य रीना घरत यांच्या हस्ते करण्यात आले.

   आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली बोरी नाका ते आवेडा पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.या रस्त्याचे आज उदघाटन झाले.रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर नागरिकांना, ग्रामस्थांना, प्रवाशी वर्गांना प्रवास करणे सोप्पे, सुलभ, आरामदायी होणार आहे.असे रीना घरत यांनी उदघाटन प्रसंगी सांगितले.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर, नगरसेवक कौशिक शहा,नगरसेवक राजू ठाकूर,जिल्हा परिषद सदस्य रीना घरत,उद्योजक देवेंद्र पाटील, चिरनेर पंचायत गण अध्यक्ष प्रशांत ठाकूर,केगाव भाजपा अध्यक्ष अंकित म्हात्रे,ग्रामपंचायत सदस्य अविनाश पाटील,उपाध्यक्ष गणेश पाटील,विभागप्रमुख विलास काठे, प्रभारी विभागप्रमुख अरविंद पवार, सचिव विनेश पाटील,बूथ अध्यक्ष अक्षय पाटील, युवा अध्यक्ष मिथुन पुरव,युवा सचिव विराज म्हात्रे आदी भाजपाचे पदाधिकारी सदस्य, ग्रामस्थ अतिष हुजरे, हिराजी कांबळे, गजानन म्हात्रे, चंद्रकांत पाटील, गजानन पाटील आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.सदर रस्त्याचे काम सुरु झाल्याने ग्रामस्थ,नागरिकांनी आमदार महेश बालदी, जिल्हा परिषद सदस्य रीना घरत व केगावच्या भाजपच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे आभार मानले आहे.

विविध शासकीय कार्यालये उरण शहरातच राहावेत यासाठी निवेदन

उरण - उरण शहरातील टपाल कार्यालय, तलाठी कार्यालय, सर्कल कार्यालय, कृषी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय इत्यादी सरकारी आस्थापना ज्या सुरुवातीपासून गेल्या अनेक वर्षांपासून उरण शहरात कार्यरत होत्या मात्र हे शासकीय कार्यालय आता उरण शहराबाहेर स्थलांतरित झाल्याने नागरिकांची खूप मोठी गैरसोय होत आहे सदर शासकीय कार्यालय पुन्हा उरण शहरात स्थलांतरित करण्यात यावेत यासाठी उरण सामाजिक संस्थेतर्फे उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे,गटविकास अधिकारी पंचायत समिती नीलम गाडे यांना निवेदन देण्यात आले आहे.

 उरण तालुक्यातील गावातील नागरिक जेंव्हा एक काम घेऊन शहरात येतो त्यावेळी वेळ आणि पैसा वाचावा म्हणून तो त्याच दिवशी इतर सरकारी, खाजगी कामे, बाजाराहाट इत्यादी कामे उरकून घेत असतो. शेतकरी वर्ग आणि इतर नोकरदार, व्यावसायिक सुद्धा आपापल्या कामाचे नियोजन करून शहरात येत असतात. शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी असल्यास शहरातील नागरिकांना व लांबून आलेल्या नागरिकांना कामे करणे सुलभ होते. परंतु उरण शहरातील अनेक महत्त्वाची कार्यालये उरण शहराबाहेर स्थलांतरित झाले आहेत.काही कार्यालये दोन-तीन किलोमीटरवर तर काही कार्यालये 5-6 किलोमीटर अंतरावर स्थलांतरित  झाल्याने नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. महत्वाची कार्यालये उरण शहराबाहेर स्थलांतरित झाल्याने वेळ श्रम पैसा जास्त खर्च लागत आहे.भर ऊन,पावसात इकडेतिकडे हेलपाटे मारावे लागत आहे. अनेकदा नागरिकांना एकाच कामासाठी अनेकदा फेऱ्या मारावे लागतात. त्यामुळे जास्त वेळ पैसा श्रम खर्ची घालावे लागत आहे.त्यात ज्येष्ठ नागरिक, महिला,अपंग,विद्यार्थी वर्गाची खूप अडचण होत आहे.त्यामुळे सदर विविध शासकीय कार्यालयांसाठी उरण शहरांमध्येच त्वरित जागा उपलब्ध करून देण्यात यावी. या बाबतीत नवीन इमारत/ इमारती बांधण्यासाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी शासन स्तरावर पत्रव्यवहार करावा अशी मागणी उरण सामाजिक संस्थेने तहसीलदार, गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे पत्र व्यवहाराद्वारे केली आहे. त्यासाठी उरण सामाजिक संस्थाही पुढाकार घेईल. व आवश्यक ते सर्वतोपारी मदत करण्यास तत्पर असल्याचे उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांनी सांगितले.

अंबरनाथ मध्ये भाजपा कार्यकर्ता मेळावा

अंबरनाथ( अविनाश म्हात्रे) :- भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहर भाजपा कार्यकर्ता  मेळावा आयोजित करण्यात आला दिनांक २२ऑक्टोबर २०२१ रोजी सायं. ४ वाजता  स्वानंद हॉल बि के बिन रोड अंबरनाथ पुर्व येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रमुख अतिथी मार्गदर्शक मा.खासदार श्री.किरीटजी सोमय्या, मा. मंत्री रवींद्रजी चव्हाण, (प्रदेश सरचिटणीस भाजपा) मा. नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील, (प्रदेश सचिव भाजपा) ,मा.शशिकांत कांबळे (कल्याण जिल्हा अध्यक्ष भाजपा),अंबरनाथ भाजपा महिला अध्यक्षा सौ सुजाता दिलीप भोईर व इतर अनेक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्तित होते.

शिवसेनेच्या स्वस्त दरात दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाला अंबरनाथकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



अंबरनाथ (अविनाश म्हात्रे ):- शिवसेना शहर शाखा व आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या वतीने आयोजन, ५००० हुन अधिक नागरिकांनी घेतले दिवाळी फराळ साहित्य,जांभिवली ठाकुरपाडा व मिरची वाडी या आदिवासी भागात मोफत दिवाळी फराळ वाटप वैश्विक महामारी ठरलेल्या कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून सर्वत्र आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याची दखल घेत शिवसेना शहर शाखा व आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी यंदा सर्वांची दिवाळी गोड व्हावी या सामाजिक बांधिलकीतुन रविवार २४ ऑक्टोबर रोजी अंबरनाथ पूर्व येथील गावदेवी मैदानात स्वस्त दरात दिवाळी फराळ साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला अंबरनाथकरांनी उत्स्फूर्त दिला.  यावेळी जवळपास ५००० हुन अधिक नागरिकांनी स्वस्त दरात दिवाळी फराळ साहित्य वाटपाचा लाभ घेतला कार्यक्रमाचा लाभ घेतला. तसेच जांभिवली ठाकुर पाडा, मिरची वाडी या आदिवासी भागातील नागरिकांना शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख श्री. गोपाळजी लांडगे साहेब व महिला जिल्हा संघटक सौ. विजयाताई पोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी मोफत दिवाळी फराळ साहित्याचे वाटप केले. 

      या कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख श्री. चंद्रकांत बोडारे, माजी नगराध्यक्ष श्री. विजय पवार, उपशहरप्रमुख श्री. परशुराम पाटील, श्री.संदीप मांजरेकर, श्री.संजय सावंत,  माजी नगराध्यक्ष श्री. सुनिल चौधरी, माजी उपनगराध्यक्ष श्री. अब्दूलभाई शेख, शिवसेना जळगाव उपजिल्हाप्रमुख श्री.उमेश गुंजाळ, महिला उपजिल्हा संघटक सौ.अंजलीताई राऊत, माजी नगराध्यक्षा सौ.प्रज्ञा बनसोडे, उत्तर भारतीय शहर अध्यक्ष श्री. प्रमोदकुमार चौबे, माजी नगरसेवक श्री.सुनिल सोनी, श्री.सुभाष साळुंखे, श्री.रवींद्र पाटील, महिला उपशहर संघटक सौ.निताताई परदेशी, माजी नगरसेविका सौ.रेश्मा काळे, विभागप्रमुख श्री. पद्माकर दिघे, श्री.सचिन गुडेकर, श्री. विनोद जाधव, श्री.संतोष शिंदे, श्री.शिवाजी साळुंखे, श्री.संदीप तेलंगे, तसेच शिवसेनेचे उपविभागप्रमुख, शाखा प्रमुख महिला आघाडी, शिवसैनिक व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


माजी नगरसेवक आत्माराम हरी तांबे यांचे पुन्हा पाण्यासाठी उपोषणाचा इशारा

अंबरनाथ (अविनाश म्हात्रे ):-  अंबरनाथ पश्चिम येथे एक दिवसाआड पाणी येथे ते देखील अपुरा आणि कमी दाबाने येते यासाठी अंबरनाथ पश्चिम येथील अनेक नगरसेवक यांनी वेळोवेळी मजीप्रा अधिकाऱ्यांबरोबर पत्रव्यवहार,चर्चा,भेटीगाठी,आंदोलन,उपोषण केले आहे परंतु कुठल्याही प्रकारचे पाण्याचे योग्य नियोजन होताना दिसत नाही या पावसाळयात मुबलक पाणीसाठा आहे म्हणून येथील नागरिक आनंदित होते परंतु नुकताच पावसाळा संपून काही दिवस होत नाहीत आणि कुठल्याही प्रकारचे योग्य नियोजन नसल्यामुळे पुन्हा नागरिकांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे, कमलाकर नगर, महात्मा फुलेनगर,जावसई,अंबरनाथ पश्चिम येथे काही दिवसापासून पाणी टंचाईमुळे झळ नागरिकांना सोसावी लागत आहे,काही वेळा ३-४ दिवसातून एक वेळ पाणी येते ते देखील कमी दाबाने आणि वेळेचे देखील नियम नाहीत.

  नेहमीच नागरिकांच्या समस्थ्यां लक्षात घेऊन त्यांना मदतीला धावणारे येथील माजी नगरसेवक आत्माराम हरी तांबे यांनी या परिसरातील नागरिकांना रोज पाणी मिळावे आणि  पाणी संकट दूर करण्यासाठी व महेंद्र नगर मधील वॉर्ड क्रमांक २ मध्ये विविध ठिकाणी नवीन पाईप लाईन टाकण्यासाठी व व्यवस्थित पाण्याचे नियोजन व्हावे यासाठी १५ दिवसाची मुदत दिली आहे जर १५ दिवसानंतर सदर पाणी टंचाई आणि पाण्याचे व्यवस्थित नियोजन झाले नाही तर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे तसे पत्र मजीप्रा अधिकारी श्री बसनगर याना दिले आहे.

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

गवणीचा गोविंदा पथकामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन

मुलुंड- सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून तसेच एका महान कार्याच्या उद्देशाने मुलुंड याठिकाणी भव्य रक्तदान शिबिर होणार आहे. कै जितेंद्र चव्हाण यांच्या स्मरणार्थ हे रक्तदान शिबीर रविवार दि ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत गवणीपाडा मुलुंड (पश्चिम ) , मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे . या शिबिराचे मुख्य आयोजक गवणीचा गोविंदा पथक असणार आहे. तेव्हा सदर शिबिरास उपस्थित राहून जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे व या  सामाजिक कार्यास हातभार लावावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे . 

रायगड जिल्ह्यातील महत्वपूर्ण प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी -- विभागीय आयुक्त विलास पाटील

अलिबाग :- रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या महत्वपूर्ण प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला अधिक गती द्यावी, याकामी येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करुन भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश कोकण विभागाचे विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन अधिकाऱ्यांना दिले.   

        कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात (दि.22ऑक्टोबर 2021) रोजी विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील डीएफसीसीआयएल उरण, मुंबई-गोवा नॅशनल हायवे पनवेल ते इंदापूर व इंदापूर ते झारप, विरार-अलिबाग मल्टीपर्पज कॉरिडॉर, डीएमआयसी, पनवेल-कर्जत रेल्वे लाईनचे दुपदरीकरण या विकास प्रकल्पांबाबतचा आढावा घेतला. 

      यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्रीमती सुषमा सातपुते तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, भूसंपादन अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, डीएफसीसीआयएल प्रकल्पांशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

      रायगड जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे हे महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्प असून त्यांच्या कामांना गती मिळण्यासाठी वेळेत भूसंपादन होणे आवश्यक आहे. भूसंपादनाअभावी कोणत्याही प्रकल्पाचे काम रखडू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी  भूसंपादनात येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढावा, असेही विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच हे विकासाभिमुख पायाभूत प्रकल्प असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी भूसंपादनात येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

     यावेळी पनवेल, उरण, पेण, माणगाव, महाड, अलिबाग येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकल्पांसाठी त्या-त्या तालुक्यात भूसंपादन झालेल्या  कामांचा सविस्तर आढावा सादर केला.

शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

रोहा-माणगाव स्थानकांवर अनेक एक्सप्रेसना लवकरच लाल झेंडा दिसणार ; खासदार सुनिल तटकरे यांची मध्य रेल्वेकडे आग्रही मागणी

अलिबाग:- रेल्वेसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आज रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. सुनिल तटकरे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. अनिल कुमार लाहोटी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दिवा-रोहा (MEMU) ट्रेन पुन्हा सुरू करण्याची तसेच रोहा स्थानकावर रोहा-पनवेल, रोहा-दिवा पॅसेंजर यासह नेत्रावती एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेस, मत्स्यगंधा तसेच मांडवी एक्सप्रेसला व माणगाव स्थानकांवर ओखा एक्सप्रेस, बिकानेर एक्सप्रेस व मरुसागर एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी प्रामुख्याने केली.

याबद्दल मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी अनुकूलता दर्शविली असून रोहा-अष्टमी तसेच निडी खारपडी येथील दोन्ही पूलांच्या कामासाठी तात्काळ निधी देण्याचेही निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीस उपमहाव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर, मुंबईचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. शरद गोयल, महाव्यवस्थापकांचे सचिव श्री. साकेत मिश्रा उपस्थित होते.

अत्याधुनिक “जिल्हा माहिती भवन” उभारण्यासाठी शासनाकडून तत्वत: मान्यता

 अलिबाग(जिमाका) :- आधुनिक काळाच्या गरजेनुसार जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती व  तंत्रज्ञानावर आधारीत अत्याधुनिक इमारत व सुसज्ज मनुष्यबळ असणे आवश्यक आहे.  भविष्याचा अचूक वेध घेवून दूरदृष्टी ठेवून कार्यरत असणाऱ्या माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी ही गरज ओळखली आणि त्यादृष्टीने त्या अद्ययावत “जिल्हा माहिती भवन” उभारण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्नशील होत्या.

     त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून जिल्हा माहिती भवन उभारण्याकरिता जागा उपलब्ध करून देणे व पुढील कार्यवाही करण्यासाठी तत्वत: मंजूरी देण्यात आली आहे. 

     पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे नियोजित “जिल्हा माहिती भवन” विषयी असे मत आहे की, आधुनिक काळात माहिती व तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करुन विविध प्रसारमाध्यमांपर्यंत तसेच जनतेपर्यंत शासनाच्या योजनांची तसेच शासनाच्या विविध कामांची माहिती तत्परतेने पोहोचविणे, ही एक अत्यावश्यक बाब बनली आहे.  “जिल्हा माहिती कार्यालय” नेमके हेच काम करते. त्यांच्या या कार्याला अधिक सुसूत्रता येण्यासाठी, त्यांचे कार्य अधिक गतिमान होण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन प्रसिध्दीविषयी कामकाज अधिक उत्तमरित्या होण्यासाठी त्याचबरोबर प्रसारमाध्यम प्रतिनिधींना जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून माहिती प्रसारणाच्या कामाच्या दृष्टीने अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळण्यासाठी हे अद्ययावत “जिल्हा माहिती भवन” निश्चित उपयुक्त ठरेल. 

     या प्रस्तावित जिल्हा माहिती भवनामध्ये जिल्हा माहिती कार्यालय, मिनी थिएटर, मिनी स्टुडियो, माहिती व तंत्रज्ञान कक्ष, मीडिया सनियंत्रण कक्ष, प्रदर्शन दालन, विविधोपयोगी सभागृह, डिजिटल वाचनालय, प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता अद्ययावत प्रसारमाध्यम कक्ष,आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र  अशा विविध बाबी नियोजित आहेत.

      पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या दूरदृष्टीमुळे रायगड जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे भूषण ठरेल असे अद्ययावत “जिल्हा माहिती भवन” उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक पुढील कार्यवाही लवकरच गतिमान होईल.


महिला किसान दिनानिमित्त महिला किसान मेळावा संपन्न



अलिबाग (जिमाका):-
अलिबाग येथे महिला किसान दिनानिमित्त कृषी मूल्यवर्धन आणि विपणन साखळी व्यवस्थापन यामध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या महिलांचे जिल्ह्यातील इतर महिलांना मार्गदर्शन होण्यासाठी आज (दि.22 ऑक्टोबर) रोजी जिल्हास्तरीय महिला किसान मेळावा आयोजित करण्यात आला होता.

      यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय डॉ.सुरेश भारती, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक श्रीमती वर्षा पाटील, आंबा प्रक्रिया उद्योजक डॉ. मकरंद आठवले, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेचे जिल्हा संसाधन अधिकारी श्री. राहुल जोशी, भात प्रक्रिया उद्योजक प्रमिला गावडे, गहू-तांदूळ प्रक्रिया उद्योजक शिल्पा भोसले, मत्स्य पालन व्यवसाय व्यावसायिक पूनम भोईर, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) श्री. बोराडे, कृषी उपसंचालक श्री. काळभोर, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

      या कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उपस्थित महिला शेतकऱ्यांना कृषी, मत्स्यव्यवसाय, महिला आर्थिक विकास महामंडळ या विभागाकडील विविध योजनांबद्दल तसेच आंबा, काजू, कोकम, औषधी वनस्पती, भात, नाचणी, दूध, मासे इत्यादी प्रक्रिया उद्योगांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

     या मेळाव्याचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले तसेच कृषी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला, उपस्थित शेतकरी महिलांना शेती बियाणांचे वाटपही करण्यात आले. या मेळाव्यास महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.


क्लिन इंडिया अभियानांतर्गत वडखळ येथे “प्लास्टिक कचरा संकलन” मोहीम संपन्न

 

पेण- क्लिन इंडिया अभियानांतर्गत नेहरू युवा केंद्र, अलिबाग-रायगड, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग, पेण तालुक्यातील ग्रामपंचायत वडखळ, रूरल अँड यंग फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “प्लास्टिक कचरा संकलन” मोहीम  (दि.21 ऑक्टोबर) रोजी राबविण्यात आली.

      नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक परेश म्हात्रे, पूजा खाडे, स्वयंसेवी संस्थांचे 20 सदस्य आणि वडखळ पंचायतीचे सरपंच श्री. मोकल, उपसरपंच, महिला प्रतिनिधी, कर्मचारी वृंद, प्रदीप म्हात्रे, सखाराम भगत, समिक्षा मलव, ग्रामसेवक श्री. धोत्रे या सर्वांनी सकाळी 8 ते 10 या वेळेत वडखळ बस स्थानक, ग्रामपंचायत परिसर, पेट्रोल पंप परिसर, महामार्गावरील सर्व दुकाने आणि बाजारपेठ या परिसरातील जवळ जवळ 850 किलो  फक्त प्लास्टिक कचरा गोळा करून जे.एस.डब्ल्यू कंपनीच्या वाशी येथील पुनर्निर्माण केंद्रावर पंचायतीच्या गाडीने पाठविला. यासाठी जे.एस.डब्‍ल्यू कंपनीचे सामाजिक कार्य अधिकारी श्री.रसिक काळे आणि किरण म्हात्रे यांनी मोलाचे सहकार्य केले.

      यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी श्री.निशांत रौतेला, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा समन्वयक श्री.जयवंत गायकवाड, रूरल अँड यंग फौंडेशनचे अध्यक्ष कमलेश ठाकूर हे या मोहिमेत सहभागी झाले होते.

      या प्रसंगी श्री.जयवंत गायकवाड यांनी आपल्या मनोगतात वडखळ पंचायतीच्या या उपक्रमातून “एक दार आठवड्याला एक दिवस प्लास्टिक कचरा संकलन” ही संकल्पना राबविण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर विविध बचतगट, संस्था, युवा मंडळांचा सहभाग वाढावा म्हणून वार्षिक कॅलेंडर च्या माध्यमातून नियोजनाची नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्याची तसेच प्लास्टिकमुक्त पंचायतीकडे वाटचाल कशी करता येईल, यासाठी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे, असे विचार मांडले.  

     हा उपक्रम प्रत्यक्ष राबविताना स्वतः सरपंच संस्थेच्या प्रतिनिधींबरोबर सर्व व्यापारी वर्गाला मेगा फोन वरून प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे आवाहन करीत होते.त्याचबरोबर ते स्वत:ही स्वयंसेवकांबरोबर खांद्याला खांदा लावून कचरा गोळा करताना दिसले. यात पंचायतीच्या सर्व महिला प्रतिनिधींनी देखील पुढाकार घेतला.


उलवे नोड मध्ये फिरत्या वाहना द्वारे लसीकरण

 

उलवे - कोरोना रोगाचा प्रादुर्भावाचा विचार करता नागरिकांना वेळेत लस मिळावी. नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे या दृष्टीकोणातून शिवसेना व युवासेना उलवे नोडच्या माध्यमातून उलवे नोड मध्ये फिरत्या वाहना द्वारे नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शासनाचे अनेक लसीकरण केंद्र असूनही नागरिकांना लस घेण्यासाठी विविध समस्या येत होत्या. त्यामुळे नागरिकांच्या विविध अडचणी, समस्या लक्षात घेऊन शिवसेना व युवा सेना उलवे नोडच्या वतीने उलवे नोड मधील अनेक विविध भागात लसीकरण करण्यात आले.

    शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना व युवासेना उलवे नोड शहराच्या वतीने मोफत कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस 18 वर्षावरील  नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण शहरात सेक्टर वाईज फिरत्या वाहना द्वारे लसीकरण करण्यात आले.फिरता लसीकरण कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी युवासेना तालुका अधिकारी गौरव म्हात्रे, युवासेना उलवे नोड शहर अधिकारी निलेश पाटील, ऋषिकेश म्हात्रे उप विभाग अधिकारी, शिवसेना शाखा प्रमुख शान पाटील, युवासेना उलवे नोड संघटक राजेश सिंग, उलवे नोड सोशल मिडीया प्रमुख हन्नन पाटणकर,शाखा अधिकारी अंकीत वाढवाना, प्रकाश वाडकर, अरुण जाधव, देव तुरे, शिवसेना तालुका संघटक मर्फी क्रियाडो , उप तालुका प्रमुख हनुमान भोईर, शहर प्रमुख मनोज घरत, उप शहर प्रमुख अशोक घरत , शाखा प्रमुख विनोद पाटील,पंकज पाटील आदी पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.उलवे नोड मध्ये प्रत्येक सेक्टर मध्ये फिरते वाहणाद्वारे लसीकरण करण्यात आल्याने वृद्ध महिला पुरुष, जेष्ठ नागरिक, अपंग, गरोदर महिला, आजारी रुग्ण तसेच परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत शिवसेना व युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.

समाजसेवक कृष्णा कदम यांचा हभप विठोबाआण्णा मालुसरे स्मृती सन्मान पुरस्काराने गौरव

मुंबई (शांताराम गुडेकर )स्वातंत्र्यसेनानी आणि तत्कालीन कुलाबा जिल्हा कृषी सभापती वै.हभप विठोबाआण्णा मालुसरे यांच्या जन्मशताब्दी ...