आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

मैत्री व संकल्प संस्थेतर्फे सामाजिक कार्यकर्ता व मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

 मुंबई  ( प्रतिनिधी ) -मैत्री व संकल्प संस्था , सद्भावना संघ ,लेक लाडकी अभियान ,यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता व मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले असून दिनांक 4 ऑक्टोंबर 2021  रोजी संध्याकाळी ५.३०  वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ पत्रकार भवन आझाद मैदान जवळ सीएसटी मुंबई येथे कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मा. डॉ.जी. जी पारीख यांच्या हस्ते होणार असून कामगार नेते व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, समाजसेवक वासुदेव पाटील सद्भावना संघाच्या वर्षा विद्या विलास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते उद्योजक अनंत पाटील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मोनिका जगताप डॉ. चेतना दीक्षित ,तेजल  नाईक ,नसरीन शेख , रेखा हिरा, विशाल हिवाळे ,,गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे , सामाजिक कार्यकर्ता प्रज्योत मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे मैत्री चे अध्यक्ष सुरज भोईर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 

       सामाजिक कार्यकर्ता व मानवी हक्क प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यशाळेचे 10 वे वर्ष असून प्रत्येक रविवारी पूर्ण दिवसाचे प्रशिक्षण विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शनाखालील घेण्यात येणार आहे .दोन महिन्याची  प्रमाणपत्र कार्यशाळा असून अठरा वर्षाच्या वरील कार्यकर्त्याने यामध्ये सहभागी व्हायचे आहेत .या सामाजिक कार्यकर्ता व मानवी हक्क प्रमाणपत्र कार्यशाळेत भारताचे संविधान .व्यक्तिमत्व विकास ,माहितीचा अधिकार न्यायव्यवस्था मानवी हक्क पोलिस यंत्रणा, नगर राज बिल ,जनसंपर्क प्रसारमाध्यम फुले आंबेडकर विचारधारा गांधीविचारांची कार्यशाळा पर्यावरण रक्षण युवक कामगार रेशन चळवळ स्त्री पुरुष समानता गुन्हेगारी अंधश्रद्धा निर्मूलन ज्येष्ठ नागरिक अंध अपंगाचे प्रश्न झोपडपट्टी प्रश्न ग्रामोद्योग स्वयंरोजगार बालकामगार निर्मूलन  एड्स मुक्ती व गीत पथनाट्य अशा विविध विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन व संस्था भेटी कार्यक्रम  होणार असून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आत्मनिर्भर फाउंडेशन व मुंबई सर्वोदय मंडळ यांचे विशेष सहकार्य लागणार आहे .         

     तरी ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे अशा व्यक्तींनी कार्यशाळेचे संयोजक सुरज भोइर (9969686014) व प्राची कदम 8097159102 यांच्याशी संपर्क साधून आपली  नांव  नोंदणी करावी असे आवाहन  सामाजिक कार्यकर्ता समन्वय समितीचे संघटक रवी सावंत यांनी केले आहे.

राष्ट्रीय पोषक माह कार्यक्रम जल्लोषात साजरा

मुंबईः १ते ३० सस्टेंबर २०२१ बाळविकास प्रकल्प अधिकारी खार पश्चिम- सांप्ताक्रझ (पुर्व) जुना,या प्रकल्पातअंतर्गत विभागात राष्ट्रीय  पोषक माह अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम माननीय बालविकास प्रकल्प अधिकारी श्री.नितीन मस्के    सर यांच्या मार्गदर्शना खाली राबविण्यात येत आहेत.

      या कार्यक्रमांच्या माध्यमातून 0 ते 6 वर्षाची मुले, गरोदर,स्तनदा,किशोरवयीन मुली,तीव्र कमी वजनाची मुले यांचे आहार आरोग्य तसेच कोविड -१९ काळात ध्यावयाची काळजी याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच गृहभेटी पालकसभा,आहार पाककृती दाखवून आहाराबाबत  मार्गदर्शन  करण्यात येत आहे.

     तसेच पोषक माह कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य-केंद्राच्या सहाय्याने किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी करून त्यांना अँनिमियाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. व SAM/MAM(तीव्र व मध्यम कमी वजनाची मुले) त्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. व पालकांना तसेच परसबागेचे महत्त्व पालकांना पटवून देण्यात आले. व माझी कन्या भाग्यश्री व सुकन्या योजना या योजनांबाबत विभागात पालकांना माहिती देण्यात आली.


कामगारांच्या उन्नती व प्रगतीसाठी सदैव कार्यरत - संदेश आयरे

कोल्हापूर / प्रतिनिधी: राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व निर्मिती प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगार व त्यांच्या पाल्यांचा सत्कार, आदित्य सभागृह येथे आयोजित करणेत आला होता. यावेळी बोलताना कोल्हापूरचे सहा. कामगार आयुक्त संदेश आयरे म्हणाले, कामगारांच्या हिताच्या विविध योजना व उपक्रम शासन राबवत आहे. त्याचा लाभ पात्र कामगारांना व्हावा, यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करत असतो. शासनाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ संबंधित घटकांना मिळावा यासाठी, सर्वच क्षेत्रातील पात्र कामगार वर्गाने जागरूक असणे गरजेचे आहे. लाभार्थी कामगारांच्या सर्वांगीण उन्नती व प्रगतीकरीता आम्ही नेहमीच बांधील आहोत. कामगार वर्गाने बदलते कामगार कायदे व त्या अनुसंगाने कार्यरत असणे गरजेचे आहे.

   अध्यक्षीय मनोगतामध्ये करवीरचे शिक्षण विस्तार अधिकारी व सुप्रसिद्ध लेखक विश्वास सुतार यांनी, पृथ्वी कोणत्याही तथाकथित भ्रामक गोष्टींवर तरलेली नाही, तर ती राबणाऱ्या कष्टकरी श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. मेहनत करणारा समाजच याचा तारणहार आहे, प्रशासकीय अधिकारी आणि कामगार वर्ग यांच्यात सुसंवाद व्हायला हवा. यामुळे कामगार वर्गाचे प्रश्न लवकर सुटतील. कामगार हा इथल्या व्यवस्थेत नेहमीच उपेक्षित राहणारा घटक आहे. अहोरात्र कष्ट करणाऱ्या कामगार वर्गाच्या व्यथा, वेदना प्रशासनाने जाणून घ्यायला हव्यात, असे प्रतिपादन केले.

    कोल्हापूरचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे, कल्याण निरीक्षक राजेंद्र निकम म्हणाले कि, कामगार हा इथल्या व्यवस्थेमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यासाठी शासन नेहमीच तत्पर आहे. जिल्ह्यातील कामगार सतर्क व अभ्यासू असल्यामुळे, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कामगार निधी कोल्हापूरला मिळतो. यावेळी सुरेश पोवार, सात्ताप्पा सुतार, श्रीकांत पाटील, बाळासाहेब कांबळे यांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच गुणवंत कामगारांच्या पाल्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल योगेश केसरकर, पौर्णिमा चौगुले, संकेत सासणे यांचा सन्मानचिन्ह, पुस्तके व प्रमाणपत्र  देऊन सत्कार करण्यात आला.

   यावेळी मानवाधिकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी सुरेश केसरकर यांची निवड झाल्याबद्दल तसेच भगवान माने, संभाजी थोरात, महादेव चक्के, शिवाजी चौगुले, अनिता काळे, कलावती जनवाडे यांचा राज्य व जिल्हा कमिटीवर निवड झालेबद्दल सन्मानचिन्ह व पुस्तके भेट देऊन सत्कार करणेत आला. यावेळी निर्मिती प्रकाशनचे प्रमुख अनिल म्हमानेे, गुणवंत कामगार अनिता काळे, बाळासाहेब कांबळे, सात्ताप्पा सुतार यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी कामगार अधिकारी यशवंत हुंबे उपस्थित होते.

      सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रताप घेवडे यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी केले. आभार भगवान माने यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे उपाध्यक्ष नरेंद्र रहाटे, सचिव अच्युतराव माने यांचे सहकार्य लाभले. यावेळी गुणवंत कामगार सेवा संघ कोल्हापूरचे सर्व पदाधिकारी व कोल्हापूर जिल्ह्यातील  गुणवंत कामगार व त्यांची पाल्ये उपस्थित होती.

मा.नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा जे.एन.पी.टी.-सिडको परीसरामध्ये पाहणी दौरा संपन्न

उरण -ठाणे-बेलापूर-जे.एन.पी.टी. रस्त्यावर वाहनांची होणारी ट्राफिक कोंडी व पार्किंग प्रश्न यावर लवकरात लवकर उपाययोजना करून सदर प्रश्न सोडविण्या संदर्भात संबधित विभागाला मंत्री महोदयांनी दिले आदेश बुधवार दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री, मा.एकनाथजी शिंदे यांनी  उरण तालुक्यातील शिवस्मारक, जे.एन.पी.टी. येथे भेट दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उरण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह मा.मंत्री महोदयांचे स्वागत केले.

    सदर पाहणी दौरा हा ठाणे-बेलापूर रस्त्यावरील सिडको व जे.एन.पी.टी. कडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची होणारी ट्राफिक कोंडी तसेच पार्किंग प्रश्न यावर कशाप्रकारच्या  उपाययोजना करण्यात याव्यात ज्यामुळे ट्राफिक व पार्किंग प्रश्न सुटेल यावर मंत्री महोदयांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

  यावेळी माजी जिल्हाप्रमुख/विश्वस्त जे.एन.पी.टी. दिनेश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, विधानसभा संघटक  सदानंदराव भोसले, तालुकासंघटक बी.एन.डाकी, शिवसेना गटनेता गणेश शिंदे, शिवसेना शहरप्रमुख विनोद म्हात्रे, उपतालुकाप्रमुख प्रदिप ठाकूर, उपतालुकासंघटक के.एम. घरत, उपतालुकासंघटक अमित भगत, विभागप्रमुख संदेश पाटील, जि.प.सदस्य विजय भोईर, पं.स.सदस्य दिपक ठाकूर, पं.स.सदस्य हिराजी घरत, युवासेना विधानसभा अधिकारी नितेश पाटील,  तालुका युवासेना अधिकारी हितेश पाटील, वैद्यकीय कक्षप्रमुख रमेश म्हात्रे, महिला उपजिल्हा संघटिका ममता पाटील, महिला विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, तालुका संघटिका भावना म्हात्रे, तालुका संघटिका(शहर) सुजाता गायकवाड, तसेच सिडको चे अधिकारी वर्ग, जे.एन.पी.टी. चे अधिकारी वर्ग, पोलीस अधिकारी वर्ग, तहसिलदार, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख, उपतालुकासंघटक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, सरपंच, ग्रा.पं. सदस्य तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.मंत्री एकनाथ शिंदे यांनी उरण तालुक्यातील जे एन पी टी परिसरातील वाहतूक व इतर समस्यांची पाहणी केली त्यामुळे उरण तालुक्यातील महत्वाची असलेली वाहतूक कोंडीची समस्या सुटणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

समता साहित्य अकादमी आयोजित "आदर्श शिक्षक" पुरस्कार समारंभ संपन्न

प्रतिनिधी :  समता साहित्य अकादमी, यवतमाळ, महाराष्ट्र तर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून सन २०२०-२१ या वर्षातील "आदर्श शिक्षक पुरस्कार " समारंभ नुकताच नागपूर येथील हॉटेल हरदेव सभागृहात दिनांक २४ सप्टेंबर २०२१ रोजी पार पडला. या समारंभात ४ आंतरराष्ट्रीय व ३६ राष्ट्रीय पातळीवरील शिक्षक आणि सामाजिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना "समता पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री मा. श्रीयुत नितीन राऊत, खासदार श्रीयुत रामदास तडस, राज्यसभा खासदार व पद्मश्री पुरस्कारप्राप्त श्रीयुत विकास महात्मे, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवकसेवा आयुक्तालयाचे सहसंचालक श्रीयुत जयप्रकाश दुबळे साहेब आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

        देशातील २४ राज्यातील मर्यादित मंडळी या कार्यक्रमात उपस्थित होती. महाराष्ट्र राज्यातील सहाजणांना संपुर्ण सेवकाळात त्यांनी बजावलेल्या उत्कृष्ठ सेवकार्यामुळे राष्ट्रीय समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई मालाड येथील उपमुख्याध्यापिका सौ. सुषमा राऊळ, कुळगाव बदलापूर(पूर्व) नगरपालिका शाळांच्या कोऑरडींनेटर आणि मुख्याध्यापिका सौ. भावना घोलप यांना "आदर्श शिक्षिका समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच जे एन पी टी उरण येथील क्रिडा शिक्षक श्रीयुत मनोहर टेमकर सर यांना "आदर्श क्रीडारत्न" समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

       विविध कार्यक्षेत्रात अनन्यसाध:रण कार्य करणाऱ्या राज्यातील, देशभरातील आणि देशाबाहेरील विविध मंडळींचा सन्मान समता साहित्य आकादमीतर्फे करण्यात येतो. यावर्षी विशेषतः बदलापूर, मुंबई आणि उरण येथील गुणवंत तीन शिक्षकांना समता पुरस्काराने सन्मानित केले असल्याने सगळीकडे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

रमजान गोलंदाज यांची उक्षी ग्रामपंचायतच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदावर बिनविरोध निवड

कोकण(एस.गुडेकर)- रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते, नवनिर्मिती फाउंडेशन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमजान गोलंदाज याची उक्षी ग्रामपंचायतच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.विविध क्षेत्रात रमजान गोलंदाज यांचे काम असून सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. अनेक प्रश्न त्यानी मार्गी लावले आहेत. सामाजितील विविध प्रश्न त्यानी मार्गी लावले आहेत. उक्षी गावाच्या विकासासाठी त्यांची अनेक वेळा धडपड सुरु असते. गेली १५ वर्षा पेक्षा जास्त वर्ष त्यांनी तंटामुक्ती कमिटीच्या कार्यकारणीत सदस्य म्हणून काम करून अनेक विषय हाताळले आहे. गावातील वाद गावातच मिटतील आणि शक्यतो वाद होणार नाही दक्षता घेईन असे मत रमजान गोलंदाज यांनी मांडले आहेत. त्यांना मिळालेल्या पदा बद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.)चेंबुरतर्फे महाडमधील मु. मौजे तांबडभुवन व मु. मौजे किंजलघर येथे गृहपयोगी साहित्याचे मोफत वाटप



मुंबई(शांत्ताराम गुडेकर) -
सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था. या संस्थांची संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली असते आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींत सापडलेल्यांना साहाय्य करतात; प्रसंगी आर्थिक मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळतर्फे गेली अनेक वर्षे केले जात आहे.सामाजिक बांधिलकीचा वारसा अखंडपणे जपत आलेल्या पंचरत्न मित्र मंडळातर्फे मु.मौजे तांबडभुवन व मु.मौजे किंजलघर ता.महाड,जि.रायगड येथे मोफत ब्लँकेट,चादर,बेडशिट,चटईसह अन्य गृहपयोगी साहित्य वाटप कार्यक्रमपार पडला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे  म्हणून कार्यकारी संचालक आर.सी.एफ मा.सुहास शेलारसाहेब,श्री.अश्विन कांबळे साहेब (वरिष्ठ प्रबंधक मा.स. -आरसीएफ), तसेच तसेच पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.अशोक भोईर, सचिव श्री प्रदीप गावंड तसेच मंडळाचे पदाधिकारी उप सचिव वैभव घरत, सल्लागार  हनुमंता चव्हाण,उपाध्यक्ष रमेश पाटील,एम डिसोझा, डी. एम. मिश्रा, रहीम शेख, संतोष नाईक,जालिंदर इंगोले,प्रकाश मांडवकर,सुशील मिस्त्री,संजय वडाळ आदी मान्यवर   उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील मिस्त्री यांनी तर आभार प्रदर्शन अशोक भोईर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाला मदत करणारे देणगीदार, शुभचिंतक, तसेच सर्व कार्यकर्ते यांचे मंडळाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.

सततची अतिवृष्टी,करोना महामारी, लाँकडाउन व सरकारची अनास्था यामुळे कोकणी व्यापारी देशोधडीला - सचिन नाटेकर ; ३० सप्टेंबर पर्यंत जाहीर केलेली मदत तात्काळ अदा करावी : सचिन नाटेकर-व्यापारी/ सामाजिक कार्यकर्ते - बांदा

व्यापारी सचिन नाटेकर 
मुंबई(समीर खाडिलकर /शांत्ताराम गुडेकर )- सर्वात जास्त कर आकारणी महाराष्ट्रात होते.देशातील प्रमुख विकसित राज्यापैकी महाराष्ट्र आहे.राज्य व देशातील विकासात उद्योग व्यापर क्षेत्राचे मोठे योगदान असतानाही मग अडचणी च्या वेळी व्यापार क्षेत्राला मदत देताना हात आखडता का घेता.आत्मनिर्भर असलेला कोकणी व्यापारी सततची अतिवृष्टी,करोना महामारी, लाँकडाउन व सरकारची अनास्था यामुळे देशोधडीला लागेला आहे.३० सप्टेंबर पर्यंत जाहीर केलेली  मदत अदा करावी अशी मागणी सचिन नाटेकर(व्यापारी/ सामाजिक कार्यकर्ते - बांदा) यांनी केली.अतीवृष्टी व महापुर आल्यावर राज्याच्या डझनभर मंत्र्यांचे पहाणी दौरे कोकणात  झाले.आश्वासनांचा महापुर आला.मा .मुख्यमंत्र्यांनी  तर मी पँकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नसुन प्रत्यक्षात मदत करणारा मुख्यमंत्री असल्याचे जाहीर केले. विरोधी पक्षाचे दिग्गज नेतेही आपल्या कार्यकर्ते च्या फ़ौजफाट्यासह कोकणात आले. सरकार वर टिकेची झोड उठवली.सरकारला मदत देण्यास भाग पाडू असे सांगितले.जसा महापुर ओसरला तसा सरकार व विरोधी पक्षांनी दिलेल्या आश्वासनांचा महापुरही ओसरला. प्रत्यक्षात व्यापारीच्या पदरात काहीच पडले नाही.आता काय व्यापारीच्या आत्महत्या होण्याची वाट पहाता काय.लवकरात लवकर व्यापारीना मदत द्या.अन्यथा व्यापारीना आंदोलन करावे लागेल.२०१९ व २०२१ चा महापुर, करोना महामारी, सततचे लाँकडाउन यामुळे कोकणातील व्यापारी चे कंबरडे मोडले आहे.व्यापारी बांधवाना पक्षीय राजकारणात स्वारस्य नाही.तरीही सरकार व विरोधी पक्ष यांना एकमेकांवर कुरघोडी करून वेळ मिळाल्यास व्यापारी, कष्टकरी, शेतकरी यांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा.सरकारकडून व्यापारी च्या काही माफक अपेक्षा आहेत.त्या पुर्ण कराव्यात आशी मागणी सचिन नाटेकर व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते (बांदा)यांनी केली आहे.

बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई-  राज्यात काही जिल्ह्यात  गेली दोन दिवस  अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्वाची  सीईटी प्रवेश परीक्षा  जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येईल.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

          सतत दोन दिवसांपासून राज्यात  अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत.  यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. याबाबत नव्याने तारखा जाहीर करण्यात येथील.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहनही श्री. सामंत यांनी केले.

राज्यस्तरीय वृत्तपत्रलेखन स्पर्धा २०२१

मुंबई- जॉय सामाजिक संस्था मुंबई च्या वतीने मराठी वर्तमानपत्रात वाचकांच्या सदरात लिखाण करणारे वृत्तपत्रलेखक यांच्यासाठी ( बातम्या देणारे पत्रकार नव्हे ) वृत्तपत्र लेखन स्पर्धा २०२१ चे आयोजन करण्यात आले असून १ जानेवारी २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या दोन पत्रांची झेरॉक्स प्रत ( व्हाट्स अप वर नाही ) पाठवून देण्यात यावी असे आवाहन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश हिरवे यांनी केले असून पहिल्या तीन उत्कृष्ट पत्रलेखकाना व दोन उत्तेजनार्थ अशी एकूण पाच पारितोषिक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.पत्रलेखकानी आपली पत्रे  स्पीड पोस्ट किंवा कुरिअरनेच (साध्या पोस्टाने नाही) गणेश हिरवे, २/१२ पार्वती निवास,रामनगर, बांद्रेकरवाडी, डॉ देशमुख जवळ,जोगेश्वरी पूर्व येथे २५ ऑक्टोबर पर्यत पोहचतील अशा रीतीने पाठवावीत. व्हाट्स अप व  इ-मेल वर आलेल्या पत्रांचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही..परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल,असे आवाहन जॉय च्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाची वार्षिक सभा संपन्न...!

 

इचलकरंजी- (गुरुनाथ तिरपणकर)  इचलकरंजी-येथील देवांग मंदीरामध्ये नुकतीच महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ,मुंबई या राज्यव्यापी विणकरांच्या शिखर संस्थेची ४१वी वार्षिक सर्व साधारण सभा संस्थेचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रारंभी समाजाचे युवा नेते कोल्हापुरचे राजेंद्र ढवळे यांनी सर्वांचे स्वागत केले. मिलिंद कांबळे यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला. तर अजेंड्यावरील विषयांचे वाचन करुन उपस्थितांकडुन सर्व ठरावांना मंजुरी मिळाली.यावेळी अध्यक्षीय अहवालांमध्ये बोलताना श्री.प्रकाशराव पाचपुते यांनी सांगितले की मी अध्यक्ष झाल्यापासून कराड,मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील प्रत्यक्ष ऑफलाईन सभा झाल्यावर कोरोना महामारीमुळे ऑनलाईन झूमच्या माध्यमातून चार वेळा बैठका झाल्या. विणकर दिनानिमित्त शहरातील यशश्री वस्त्रोद्योगातील उद्योजकांना 'वस्त्रोद्योग पुरस्कार,देऊन सन्मानित करण्यात आले. तर कोकणातील खेड व चिपळुण येथील पूरग्रस्त समाजबांधवांना आर्थिक मदत देण्यात आली. तसेच खेळाडुंना प्रोत्साहन म्हणुन त्यांना आर्थिक सहाय्य दिले असुन भविष्यामधे शिक्षण व क्रिडा,आरोग्य व औषधोपचार, नैसर्गिक आपत्ती सहाय्य व समाज उन्नतीकरता देवांग व चौंडेश्वरी मंदीर सहाय्य निधी इ.योजना राबविणार असल्याचे सांगितले. सभेस उपस्थित असणारे विश्वस्त उत्तमराव म्हेत्रे यांनी देवांग समाजाचे नेते संस्थेचे मार्गदर्शक विठ्ठलाराव डाके यांचा सत्कार केला. तसेच श्रीकांतराव फाटक, रामदास चौगुले, सौ.सुधा ढवळे, सौ.प्राजक्ता होगाडे, सौ.सुशिला फाटक यांचेसह कोल्हापुरचे महादेवराव इदाते, शशिकांत हावळ यांचा सत्कार केला. शेवटी महादेवराव सातपुते यांनी आभार व्यक्त केले.यावेळी ऑनलाईनच्या माध्यमातून मुंबईहून विश्वस्त प्रकाशशेठ कांबळे, अरविंदराव तापोळे, अंकुशराव उकार्डे, भास्करराव रोकडा,ट्रेझरर विश्वनाथ पोयेकर, कोकणातुन माजी अध्यक्ष चंद्रकांत बाईत,पुण्याहून सुरेशराव तावरे, दत्तात्रय ढगे,कणकवलीहून रविंद्र मुसळे, खेडहून प्रविण दिवटे यांचेसह अनेक सदस्य सहभागी झाले होते.तर समक्ष श्रीनिवास सातपुते, दिलीपराव भंडारे,शिवाजीराव रेडकर, शिरीषराव कांबळे, शितल सातपुते,मोहनराव हजारे मनोज खेतमर यांचेसह अनेक सदस्य ऑफलाईन ऑनलाईन हजर होते.

कोकण भवन बेलापूर येथील सहकारी संस्था निबंधकाची कार्यालये बृहन्मुंबई मनपाच्या हद्दीत स्थलांतरीत करण्याची गुणवंत कामगार प्रभाकर कांबळेची मागणी

मुंबई (शांत्ताराम गुडेकर) - नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत  सी बी डी बेलापूर कोकण भवन इथे असलेली सहकारी संस्था निबंधकाची कार्यालये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत स्थलांतरीत करण्याची मागणी मुंबई पूर्व उपनगरातील सहकारी संस्थाधारक  व सभासदांच्या वतीने सहकारातील निष्ठावान कार्यकर्ते व सहकार रत्न श्री प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रान्वये केली आहे.

    या संदर्भात अधिक माहिती अशी की, बृहन्मुंबई महानगर पालिकेतील एल, एम, एन व एस वार्ड आलेल्या कुर्ला , चेंबूर , मानखुर्द , घाटकोपर , विद्याविहार , विक्रोळी , कांजूरमार्ग , भांडुप भागातील सहकारी गृहनिर्माण , सहकारी पतसंस्था व सेवा सहकारी संस्थाची प्रशासकीय जिल्हा निबंधक व उप निबंधक यांची कार्यालये बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीत असण्याऐवजी ते कोकणभवन बेलापूर येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत १९८१ पासून कार्यरत आहेत.

    सहकारी क्षेत्र हाच देशाचा त्याचबरोबर सर्वसाधारण सभासदांचा आर्थिक कणा असून देश अधिक बलवान आणि आर्थिक दृष्ट्या सशक्त होण्यासाठी सहकार क्षेत्राखेरीज अन्य पर्याय नाही आणि हे कार्य बसहकारी पतसंस्थाच्या माध्यमातून सुरू आहे. सहकारी पतसंस्था टिकल्या तरच मोठं - मोठ्या बँका टिकतील व सर्वसामान्य सभासद आणि सहकारी संस्थाचालकही जिवंत राहतील. यासाठी महाविकास आघाडी सरकारने कुर्ला, चेंबूर , मानखुर्द , घाटकोपर , विद्याविहार , विक्रोळी , कांजूरमार्ग , भांडुप येथे राहणाऱ्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थाच्या सभासदांना इतर वार्डाच्या तुलनेत दुजाभाव झालेला आहे. त्यामुळे मुंबईच्या पूर्व उपनगरातील लाखो सभासदांना मोठ्या प्रमाणात मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे ही वस्तूस्थिती आहे. इतर वार्डाची सहकारी निबंधकाची कार्यालये बृहन्मुंबईतच आहेत.  त्याचप्रमाणे वरील वार्डाची सहकारी निबंधकाची कार्यालये मुंबईच्या हद्दीत स्थलांतरीत करून अनेक वर्षांपासून अन्याय सहन करणाऱ्या सहकारी संस्थाच्या संस्थाधारकांना सहकार चळवळीची जाणीव असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सहकारी संस्था चालकांनी व सभासद वर्गानी केली आहे.

नालासोपारा येथे हेल्थ केअर पॅथॉलॉजी आणि निर्भय जन संस्थेने राबवले रक्त तपासणी शिबीर

नालासोपारा- (दिपक मांडवकर/शांत्ताराम गुडेकर )- नालासोपारा पश्चिम नाळा गाव येथे वसई तालुक्यात परिचित असलेली निर्भय जन संस्था विविध वैद्यकीय व अन्य उपक्रम राबवत असताना नालासोपारा येथे हेल्थ केअर पॅथॉलॉजी आणि निर्भय जन संस्थेच्या वतीने अल्पदरात रक्त तपासणी शिबीराचे आयोजन केले. यात प्रामुख्याने नाळा गावातील नागरिकांनी भरगोष प्रतिसाद देऊन तब्बल १४६ नागरिकांनी तपासणी करून घेतली. तर हेल्थ केअर पॅथॉलॉजी ल्याबचे प्रमुख श्री. ओमकार राणे यांनी तपासणीसाठी आलेल्या प्रत्येक नागरिकांची कोरोना नियमांचे पालन करून अत्यावश्यक सहकार्य केले. सकाळी सात वाजल्या पासून दुपारी दोन वाजे पर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.निर्भय जन संस्थेचे अध्यक्ष श्री. कॅलिस ब्रास, सरचिटणीस श्री नितिन दोनतलावकर, माजी कार्यध्यक्ष श्री. जॉन परेरा, विशेष कार्यकारी सदस्य श्री. रुकसान तुस्कनो आणि हेल्थ केअर पॅथॉलॉजी ल्याबचे श्री. ओमकार राणे यांनी नागरिकांचे आभार मानले.

राज्य उत्पादन शुल्क विभाग रायगड-ठाणे पथकाच्या संयुक्त कारवाईत रु.3 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

रोहा  :- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्य आयुक्त श्री.कांतीलाल उमाप यांच्या आदेशानुसार कोकण विभाग ठाणे चे विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे, ठाणे उपअधीक्षक श्री.चारुदत्त हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.25 सप्टेंबर 2021 रोजी रोहा तालुक्यातील कोपरी व कोपरी दापोली येथील खाडी किनारी व खाडीमधील बेटावर अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुरुड, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक अलिबाग, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क  अलिबाग यांचे  दुय्यम निरीक्षक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक  व जवान स्टाफसह यांनी छोट्या बोटी मधून जावून केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल 3 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

      या धाडीदरम्यान एकूण चार गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी (0 वारस) गुन्हे आहेत. तसेच नवसागर मिश्रित रसायन - 14000 लिटर हातभट्टी दारू, एकूण मुद्देमाल किंमत- रु.3 लाख 41 हजार सर्व नवसागर मिश्रीत रसायन जागीच नाश करण्यात आले आहे, अशी माहिती श्री.आनंद अं.पवार, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,मुरुड विभाग यांनी दिली आहे.

"आजादी का अमृत महोत्सव" व "स्वच्छताही सेवा" स्वच्छ भारत अभियानासाठी सायकल रॅली कार्यक्रम संपन्न

रायगड :- इंफिनिटी फाउंडेशन पनवेल, महानगरपालिका, रायगड जिल्हा परिषद, आदई ग्रुप ग्रामपंचायत व नेहरू युवा केंद्र संघटन अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमानाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीचे उद्दिष्ट “आजादी का अमृत महोत्सव” व “स्वच्छता ही सेवा” स्वच्छ भारत अभियान हे होते.

       या सायकल रॅलीमध्ये पनवेल क्षेत्रातील पाच सायकलिंग क्लब म्हणजे पनवेल सायकलिंग क्लब, पुश न पेडल, पेडल सिटी, के के सी सी व रनथॉन क्लबने सहभाग घेतला. या कार्यक्रमांमध्ये 100 सायकलींनी सहभाग घेतला.    

        या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री.विधाते, पनवेल पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती मोहिते,  पनवेल महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, इंफिनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.आयुफ अकुला, उपाध्यक्ष मुगदा म्हात्रे, सरचिटणीस पवित्र शेरावत व आदी मान्यवर उपस्थित होते.

       या कार्यक्रमाची सुरुवात पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयापासून होवून सांगता जिल्हा परिषद शाळा आदई या ठिकाणी सहभागी क्लबना सर्व सायकलिस्टला सन्मानचिन्ह, मेडल व ट्रॉफी देऊन झाली.

रायगड जिल्ह्यात 01 ते 07 ऑक्टोबर या कालावधीत अन्न परवाना व नोंदणी विशेष मोहीम

अलिबाग :- अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार दि. 01 ते 07 ऑक्टोबर 2021 या कालावधीत संपूर्ण राज्यात अन्न परवाना व नोंदणी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातही दि. 01 ते 07 ऑक्टोबर 2021  कालावधीत अन्न परवाना व नोंदणी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 

दि.05 ऑगस्ट 2011 पासून अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 संपूर्ण राज्यामध्ये लागू झालेला असून त्याची अंमलबजावणी या प्रशानातर्फे यशस्वीपणे करण्यात येत आहे. सर्व जनतेस सकस, ताजे गुणवत्तापूर्ण व निर्भेळ अन्न पदार्थ उपलब्ध झाले पाहिजे, हा या कायदयाचा मुख्य उद्देश आहे. 

       कोणत्याही प्रकारच्या अन्न पदार्थाचे उत्पादन/साठवणूक/वितरण/आयात/विक्री करण्यापूर्वी अन्न व्यावसायिकाने अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006, नियम व नियमन 2011 चे कलम 31 (1) व (2) सहवाचन कलम अन्न सुरक्षा व मानदे ( अन्न व्यवसाय परवाना व नोंदणी ) नियमन 2011 चे विनियम 2.1.2(1) नुसार अन्न परवाना/नोंदणी घेणे बंधनकारक आहे. कोणत्याही अन्न व्यावसायिकाने विनापरवाना/विनानोंदणी व्यवसाय केल्यास विषयांकीत कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षापात्र असून कलम 63 नुसार त्यासाठी कमाल 06 महिने कारावास व रूपये 5 लाखापर्यंत दंडाचे प्रावधान आहे.

       रायगड जिल्हयातील सर्व अन्न व्यावसायिकांना अन्न व औषध प्रशासन म.राज्य, रायगड-पेण या कार्यालयातर्फे कायद्यातील तरतुदीनुसार आपण आपला अन्न व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अन्न परवाना/नोंदणी घेवूनच करावा. ज्या अन्न व्यावसायिकाची वार्षिक उलाढाल रूपये 12 लाखापेक्षा कमी आहे, त्यांनी प्रति वर्ष रूपये 100/- व ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल रूपये 12 लाखापेक्षा जास्त आहे. त्यांनी प्रति वर्ष रूपये 2 हजार उत्पादकासाठी प्रतिदिन उत्पादन क्षमता 01 टनापेक्षा कमी असल्यास प्रतिवर्ष रूपये 3 हजार व प्रतिदिन उत्पादन क्षमता 02 टनापेक्षा कमी असल्यास प्रतिवर्ष रूपये 5 हजार याप्रमाणे ऑनलाईन शुल्क भरून foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर आपआपल्या क्षेत्रातील "आपले सरकार सेवा केंद्र” यांच्याकडून ऑनलाईन अर्ज करावेत. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन म.राज्य, रायगड पेण या कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नाही. 

       परवाना/नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या संदर्भात कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन दूरध्वनी कमांक 02143-252085 यावर संपर्क साधावा. या प्रशासनातर्फे विनापरवाना/विनानोंदणी अन्न पदार्थाचा व्यवसाय करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. 

      तरी पुढील संभाव्य कार्यवाही टाळण्यासाठी जिल्हयातील सर्व उत्पादक/साठवणूक/वितरक/आयातदार/घाऊक विक्रेत/ किरकोळ विक्रेते/फळे-भाजीपालाविक्रेते/पानटपरीधारक/हातगाडीवाले/फेरीवाले/हॉकर्स तसेच जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारे भाजी मंडईवाले आठवडी बाजारातील स्टॉलधारक, यात्रेतील स्टॉलधारक, देवस्थान परिसरातील स्टॉलधारक ईत्यादी सर्व लहान-मोठे अन्न पदार्थाचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी तात्काळ अन्नपरवाने/नोंदणी करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न) पदावधित अधिकारी, अन्न्‍ व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, रायगड-पेण लक्ष्मण अं.दराडे यांनी केले आहे.

खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रासाठी कुस्ती खेळाडूंची निवड व मार्गदर्शकाची नियुक्ती यासाठी सूचना जाहीर

अलिबाग :- जिल्हयातील कुस्ती मार्गदर्शकाच्या नियुक्तीसाठी दि.30 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 01.00 वा. जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली संगम, ता.अलिबाग येथे निवड चाचणी होणार आहे.  तसेच कुस्ती खेळाडूंच्या निवड चाचणी करिता बुधवार, दि.29 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.00 वा.कै.भाऊसाहेब कुस्ती संकुल, खोपोली ता. खालापूर, या ठिकाणी कुस्ती खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राकरिता निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. 

       कुस्ती खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राकरिता निवड चाचणीसाठी वयोमर्यादा 8 ते 12 वर्षे (मुले,मुली) असून खेळाडूंनी चाचणीला येताना संपूर्ण कुस्ती किट सोबत आणणे आवश्यक आहे. 

        प्रशिक्षक नियुक्ती निवड चाचणीकरिता वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे असून यामध्ये अति उच्च कामगिरी / गुणवत्ता असल्यासच समितीच्या मान्यतेने 50 वर्ष पर्यंत उमेदवारांना संधी देण्यात येईल. ऑलिंपिक / एशियन गेम्स/ जागतिक अजिंक्यपद अधिकृत स्पर्धा सहभाग / पदक प्राप्त व प्रशिक्षण, जागतिक करंडक स्पर्धा / एशियन चॅम्पियनशिप / साऊथ एशियन स्पर्धा / संबधित खेळातील अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग / पदक प्राप्त खेळाडू प्रशिक्षण, राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कारार्थी – प्रशिक्षण, एनआयएस पदविका किंवा संबंधित खेळाचे अधिकृत स्तरावरील कोर्सेस किंवा बीपीएड, एमपीएड सह राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त किंवा राष्ट्रीय खेळातील पदक प्राप्त प्रशिक्षणाच्या अनुभवासह तसेच राज्यस्तर खेळाडू, बीपीएड, एमपीएड सह कमीत कमी 10 वर्षे प्रशिक्षणाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

       दिलेल्या मुदतीत कोणत्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही. तरी याबाबत सर्व मुख्याध्यापक/प्राचार्य, माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी शासनाने दिलेल्या कोविड-19 च्या नियमांचे पालन करण्याबाबतही सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. 

तसेच अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक श्री. संदिप वांजळे, मो. क्र. 9850954237 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती अंकिता मयेकर यांनी केले आहे.

आर्मी स्पोर्टस इन्स्टिटयूट बॉईज स्पोर्टस कंपनी पुणे यांच्याकरिता क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन

अलिबाग:- जिल्हयातील आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करणे आवश्यक आहे. याचबरोबर क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी लहात वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, आर्मी स्पोर्टस इन्स्टिटयूट व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने बॉईज स्पोर्टस कंपनी पुणे येथील प्रवेशाकरिता क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे:-

     जिल्हास्तरीय चाचण्या दि.04 ऑक्टोबर 2021 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली संगम, ता.अलिबाग येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.  वयोगट :- 8 ते 14 वर्षाखालील (फक्त मुले) (दि. 1.1.2022 रोजी वय 8 ते 14 वर्ष असणे आवश्यक राहील), खेळ- ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, तलवारबाजी, वेटलिफ्टिंग, मुले- वयोगट 10 ते 14 वर्षे.  

        दिलेल्या मुदतीत कोणत्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही. तरी याबाबत सर्व मुख्याध्यापक/प्राचार्य, माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी शासनाने दिलेल्या कोविड-19 च्या नियमांचे पालन करण्याबाबतही सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक श्री. संदिप वांजळे, मो.क्र. 9850954237 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती अंकिता मयेकर यांनी केले 

1 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन

आ. वा वृत्तसेवा, कर्जत  :- जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार- 2020-21,2021-22 साठी जिल्हा पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना दि.01 ऑक्टोबर 2021 रोजी कर्जत शेळके हॉल, नेरळ-किरवली रोड येथे गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि. 01 ऑक्टोबर 2021 रोजी दु.12.05 वा. नियोजित आहे. 

      या कार्यक्रमाबाबत करोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा विचार करता संवर्गनिहाय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी वेळेचे नियोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम राज्यमंत्री, उदयोग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कु.आदिती सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते व रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष कु.योगिता पारधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

       तरी रायगड जिल्हा परिषदेतील व पंचायत समितीतील सर्व सन्माननीय पदाधिकारी, सदस्य तसेच सर्व अधिकारी, शिक्षणतज्ञ, सर्व पुरस्कारमूर्ती प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन सभापती, शिक्षण, क्रीडा व आरोग्य समिती, रायगड जिल्हा परिषद श्री.सुधाकर घारे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीम.ज्योती शिंदे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. ज्ञानदा फणसे यांनी केले आहे.

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

कणकवली तालुक्यातील शिवडावचे सामाजिक कार्यकर्ते श्रीधर तुकाराम जाधव यांचे पूणे येथे आकस्मित निधन; रविवारी शोकाकूल वातावरणात पार्थिवावर अंतिम संस्कार!

आ. वा वृत्तसेवा. मुंबई -प्रतिनिधी- समाजाचे आपण काही देणे लागतो, समाजाचे दुःख हे आपले दुःख समजून जनसेवा करीत रहा, अशा शब्दात वेळोवेळी मार्गदर्शन करणारे भांडुप मधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कणकवली तालुक्यातील शिवडावचे सामाजिक कार्यकर्ते श्रीधर तुकाराम जाधव यांचे रविवारी मध्यरात्री १ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास पुणे येथील खासगी रुग्णालयात आकस्मित निधन झाले .मृत्यूसमयी वर्षांचे ६८ होते .

त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी भांडुप स्मशानभूमीत नातेवाईक व मित्र परिवार, आप्तेष्ट यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी दुपारी १२.१५  पर्यंत त्यांचे पार्थिव भांडुपच्या मयुरेश सृष्टी मधील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते .तेव्हा भांडुपसह पनवेल, वाशी, ठाणे, मुलुंड, येथील हजारो आप्तेष्ठ नातेवाईक, राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेतले.

   गणेश जाधव यांचे संपूर्ण कुटुंबीय प्रतिवर्षी प्रमाणे कणकवली तालुक्यातील शिवडाव गावी  श्री गणेश चतुर्थी निमित्त गावी आले होते .सात दिवसाच्या  विसर्जनानंतर  शनिवारी ते कोल्हापूर मार्गे मुंबईकडे येण्यासाठी निघाले होते. पुणे येथे येताच त्यांना श्वास घेताना त्रास जाणवू लागला. त्याचक्षणी गणेश जाधव यांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचे ठरविले.गणेश जाधव यांनी शेवटच्या टप्प्यात सर्वतोपरी मदत करण्यासाठी खुप प्रयत्न केले. मात्र,डॉक्टर्स व रुग्णवाहिका सेवा वेळेत उपलब्ध न झाल्याने पूणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करताच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. 

   शनिवारी त्यांना कणकवली येथील रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले जात होते. त्यांनी मुंबईत निघून मुंबईत उपचार करूया,असे त्यांनी गणेश यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी मुंबईत जाण्याचे निश्चित केले होते. यापूर्वी,  मुलुंडच्या किमया किडनी केअर येथील डायलिसिस सेंटर मध्ये डॉक्टर निखिल केडीया ( MD Nephrologist) यांच्या निरक्षिकतेखाली डायलेसिसचे उपचार सुरू होते.

    त्यांच्या दुःखद निधनाची बातमी शिवडाव मध्ये समजताच मा.जि.प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांनी दुःख व्यक्त भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात पत्नी ,तिन विवाहित मुलगे, गणेश, मंगेश, योगेश, सूना, व नातवंडे असा मोठा परिवार आहे.भांडुप मध्ये दुःखद बातमी कळताच रविवारी व सोमवारी सायंकाळपर्यंत अनेकांनी जाधव कुटुंबांची भेट घेऊन  सांन्तवन केले.

नवघर येथे लसीकरण

उरण - मु.नवघर ता.उरण जिल्हा रायगड येथे ए.पी.एम टर्मिनल कंपनी नवघर यांच्या वतीने कोवीड-१९ प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे नवघर व नवघर परिसरातील नागरिकांना पालवी हाॅस्पीटल उरण यांच्या मार्फत शेखर प्रकाश तांडेल नवघर यांच्या कार्यालयात मोफत देण्यात आले असता ए.पी.एम टर्मिनल कंपनीचे मॅनेजर योगेश ठाकुर व पालवी हाॅस्पीटल उरणचे सुरेश पाटील आणि त्यांची टीम तसेच नवघर गावातील ए.पी.एम.टर्मिनलचे कर्मचारी राजेश श्रीराम पाटील, जयप्रकाश नारायण पाटील,धमेंद्र भालचंद्र तांडेल,कु.प्रितम कृष्णा बंडा,विनोद सदानंद बंडा,दिनेश वसंत बंडा,अनिल महादेव पाटील,चंद्रलाल पुरूषोतम तांडेल,वैभव मधुकर भोईर,अमित जोशी,कु.हार्दिक हसुराम भोईर,कु.रोशन सदानंद भोईर इत्यादी तरूणांनी योग्य प्रकारे नियोजन करून  ३५० नागरिकांना पहिला व दुसरा लसीचा डोस देण्यास सहकार्य केले.

उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जांभूळ पाडा येथे झालेल्या कातकरी आदिवासी समाजाच्या बैठकित अनेक महत्त्वाचे निर्णय

उरण -शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे तयार करण्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे , तहसील कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण आणि उरण सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या मोहीमे अंतर्गत 300 जातीचे दाखले , 500 नवीन रेशन कार्ड, 1000 रेशन कार्ड अद्ययावत करणे, 500 बँक पास बुक, 200 मतदानाचे कार्ड काढण्यात आले आहेत. तरी उर्वरित 2000 जातीचे दाखले, नवीन रेशन कार्ड वर धान्य आणि घरपट्टी तातडीने मिळण्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे  आणि गट विकास अधिकारी निलम गाडे मॅडम यांना विनंती अर्ज करण्याचे  उरण सामाजिक संस्थेच्या आयोजित जाभूळपाडा येथील आदिवासी बांधवांच्या बैठकीत ठरले.यावेळी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी, प्रत्येक वाडी वरील सुशिक्षित दोन पुरुष आणि दोन महिला प्रतिनिधी यांना संघटित करून भविष्यात सर्व जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सुपूर्द करण्याच्या हेतूने, चिरनेर जंगल सत्याग्रहात विरमरण आलेल्या  नाग्या महादू कातकरी यांच्या नावाने उरण तालुक्यातील पहिली सामाजिक  संस्था बनविण्याचे सर्वानुमते ठरले, जी संस्था भविष्यात सर्व आदिवासी बांधवांना एक आधार असेल.आधार कार्ड , बँक पास बुक, मतदानाचे कार्ड, पॅन कार्ड, गॅस कनेक्शन, जातीचे दाखले तयार करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यातील कातकरी बांधवानकडेच निश्चित केली.शासनाकडून ग्रामपंचायत ला मिळणारा 15% निधी, घरकुल योजनेचे लाभार्थी, 14-15 वित्त आयोगाने मंजूर केलेला निधी, वन हक्क दावे दाखल करण्यासाठी वन हक्क समिती गठित करणे इत्यादी संदर्भात माहिती अधिकार अंतर्गत सर्व आदिवासी वाड्या असलेल्या ग्रामपंचायतीन कडून मागील पाच वर्षाचा लेखा जोखा मागविन्याचे ठरले

   एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या सहकार्यामुळेच आदिवासी बांधवांचे 300 जातीचे दाखले तयार करू शकलो. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या कडून अनेक योजना राबविल्या जातात परंतु  सदर विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या काही योजनांचा लाभ हा उरण तालुक्यातील आदिवासी बांधवांना मिळत नाही. त्या  योजनांचा लाभ  मिळण्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अहेरराव मॅडम यांच्या सोबत चर्चा करण्याचे ठरले.लवकरच डाउर नगरवाडी, पीर वाडी, भवरावाडी, बेलवाडी सारडे, पूणाडे वाडी, कोप्रोलि वाडी वरील प्रतिनिधींची अजून एक बैठक निश्चित करण्यात आली तहसीलदार भाऊसाहेब अंधारे , नायब तहसीलदार नरेश पेडवी यांचा आदिवासी समाजाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोणामुळे आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या सर्व स्टाफ ने केलेल्या मदतीमुळे हे अशक्य असे काम शक्य झाले आहे आणि भविष्यात देखील होत राहील असे मत प्रा. राजेंद्र मढवी यांनी मांडले.

    नामदेव ठाकूर यांनी सर्वांचे उपस्थित राहिल्या बद्दल आभार मानले आणि गेले दोन वर्ष आदिवासी बांधवांचे आवश्यक कागदपत्रे बनवण्याची चालू असलेल्या मोहीमे साठी प्रा.राजेंद्र मढवी सर यांनी कोणाचाही एक रुपया देखील न घेता स्वखर्चाने हे काम करत आहेत हे नमूद केले.सदर बैठकीस उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र मढवी सर, वेश्र्वी ग्राम पंचायत सरपंच  संदीप कातकरी, रायगड भूषण दत्ता गोंधळी, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, चिरले ग्राम पंचायत माजी सरपंच विश्रांती म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले.बैठकीस वेश्र्वी वाडी वरील किरण कातकरी, जांभूळ पाडा वाडी वरील सुनील नाईक, दशरथ कातकरी, विंधने वाडी वरील आशीर्वाद कातकरी, दीपक कातकरी (सदस्य) , विष्णू कातकरी, सचिन कातकरी तसेच लिंबाची वाडी वरून मनीष कातकरी आणि कोल्हापूर वाडी वरून रवी कातकरी उपस्थित होते

गोशीन रियूच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरावर निवड

उरण - अलिबाग मधील कर्णिक हॉल मध्ये 10 वी जिल्हास्तरीय ट्रेडिशनल बेल्ट /मास रेसलिंग स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पाणदिवे (उरण )व केळवणे(पनवेल )क्लासच्या मुलांनी घवघवीत यश मिळविले व त्यांची निवड शिर्डी येथे होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे .अनिश पाटील गोल्डमेडल, मंथन म्हात्रे गोल्डमेडल, रोहित घरत दोन गोल्डमेडल, श्लोक ठाकूर ब्रॉन्झ मेडल, योग म्हात्रे एक गोल्ड व एक सिल्व्हर मेडल, श्रेया म्हात्रे गोल्डमेडल, अमिषा घरत गोल्डमेडल, यश पाटील गोल्ड मेडल, गायत्री म्हात्रे गोल्डमेडल, आयुष पाटील गोल्डमेडल, अमिता घरत  गोल्ड मेडल,अमर घरत गोल्ड मेडल,समीक्षा पाटील गोल्डमेडल,सेजल पाटील गोल्ड मेडल  पटकाविले . या स्पर्धेचे अध्यक्ष संतोष कवळे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस इन्स्पेक्टर जिया चव्हाण रायगड पोलीस उपस्थित होत्या. संतोष मोकल, रोहन गुरव,राकेश म्हात्रे व गोपाळ म्हात्रे उपाध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विजेत्या सर्व स्पर्धेकांचे कौतुक होत आहे. विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अपघात रोखण्यासाठी भाजपतर्फे प्रशासनाला निवेदन

उरण - उरण तालुक्यात अपघात होऊन मृत्युंची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वसामान्य व्यक्तीला प्रवास करताना अनेक संकटाना तोंड द्यावे लागत आहे. काही दिवसापूर्वी वशेणी येथील घरातील तरुण कर्ता असलेल्या संदीप पाटील याचा अपघातात नाहक बळी गेला. घरातील कर्ता पुरुषच गेल्याने अख्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते.उरण तालुक्याचा विचार करता आजपर्यंत रस्ते अपघातात 800 पेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.या सर्व गोष्टीचा विचार करून रस्ते वाहतूक करताना होणाऱ्या अपघात संदर्भात उरण तालुक्यातील पुर्व विभागाचे काही प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभाग उरण येथे भाजपा उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभागाचे अधिकारी ए.आर.सांगळे ,सी.बी.बांगर यांच्या समोर मांडून त्या समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आले. वाहतूक व अपघात संदर्भात तसे निवेदनही देण्यात आले.यात प्रामुख्याने 1)खोपटे पुला खाली गतिरोधक बांधणे.2) globicon कंपनी जवळ गतिरोधक बांधणे.3)सिद्धी विनायक हॉस्पिटल येथे गतिरोधक बांधणे 4)कॉन्टिनेंटल जवळील पुलाला लागून असलेले डिवायडर बंद करणे.कॉन्टिनेंटल ब्रिज जवळील वळण बंद करणे. 5)मुख्य रस्त्यावर विजेचे खांब, डीवायडर येथे तसेच मुख्य रस्त्यावर वाढलेली झाडी झूडपे त्वरित तोडणे.असे विविध मागण्या निवेदनद्वारे करण्यात आले.या वेळी भारतीय जनता पार्टी पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील,वाहतूक सेल तालुकाध्यक्ष सुदेश पाटील,युवा सचिव विभाग  कल्पेश म्हात्रे,कोप्रोली कार्याध्यक्ष  निलेश पाटील,कोप्रोली शाखा चिटणीस प्रितम म्हात्रे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

उरणमधील लसीचा साठा वाढविण्याची आयाज फकिह यांची मागणी

उरण - उरण तालुक्यात अनेक विविध ठिकाणाहून व्यक्ती लस घेण्यासाठी येत आहेत त्यामुळे उरण मधील स्थानिक नागरिक लसीकरणापासुन वंचित राहत आहेत. त्यामुळे तिसरी लाट येण्या अगोदरच लसीकरणाचे साठे वाढवावेत.लसीकरणाचे प्रमाण वाढवावेत अशी मागणी उरणमधील सामाजिक कार्यकर्ते आयाज फकिह यांनी केली आहे.

   उरण येथे गेल्या सात ते आठ महिन्यापासून लसीकरणाचे काम चालू आहे.सदरच्या लसीकरण केंद्रावर आजूबाजूच्या परिसरातील व लांबून लोक येत आहेत.त्यामुळे लसी कमी पडत आहेत.लसीकरण केंद्रावर अलिबाग,पनवेल, उलवे नोड येथून व्यक्ती लस घेण्यासाठी उरण मध्ये येत आहेत. लसीकरणाची ऑनलाइन नावनोंदणी असल्याने कोणीही कुठूनही ऑनलाईन नोंदणी करतो. त्यामुळे उरण मधील स्थानिक नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत.दररोज पहिला डोस 100 ते 150 तर दुसरा 70 ते 100 इतका आहे.यात वाढ होणे गरजेचे आहे.तिसरी लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांची लोकसंख्या, लसीकरण केंद्राची संख्या लक्षात घेता लसीचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी यात लक्ष घालावे व लसीकरणाची समस्या दूर करावी अशी मागणी आयाज फकिह यांनी केली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना दिवसा वाहतूक बंदी

उरण - उरण तालुक्यासह नवी मुंबई,मुंबई,ठाणे,रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे. नवी मुंबई ते ठाणे तसेच मुंबईच्या रस्त्यावर प्रचंड रहदारी, ट्रॅफिक असते त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत दिवसा अवजड वाहनांना प्रवेश बंदी म्हणजेच वाहतूक बंदी करण्यात आली आहे.

 जेएनपीटी बंदरातून कंटेनर वाहतूक करणारी वाहने व इतर जड वाहने नवी मुंबई हद्दीतून ठाणे जिल्ह्यातील हद्दीत प्रवेश करून गुजरात तसेच नाशिक जिल्ह्याच्या दिशेने जात असल्याने ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात दैनंदिन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन सदर वाहतूक कोंडीचा सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे .सदर वाहतूक कोंडी समस्या संदर्भात नागरिकांचे शासन दरबारी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने ठाणे जिल्ह्यातील सदर वाहतूक समस्येची दखल घेतली आहे. यावर आम जनतेच्या सोयीसाठी वाहतूक सुरळीत राहणे आवश्यक असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील जेएनपीटी बंदरातून कंटेनर वाहतूक करणारी वाहने व इतर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना सकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन गृहविभाग क्र.MVA 116/CR /37/7R/ दि 27/9/96 चे अधिसूचने नुसार मोटार वाहन कायदा कलम 115,116(1), (अ) (ब ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करत बिपीनकुमार सिंह-पोलीस आयुक्त नवी मुंबई यांनी तसे आदेश पारीत केले आहेत .

    मोटार परिवहन कायद्याचे कलम 2(16) अन्वये परिभाषित नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील जेएनपीटी बंदरातून कंटेनर वाहतूक करणारी वाहने व इतर सर्व प्रकारची जड अवघड वाहनांना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सर्व शहराचे मार्गावरून वाहतुकीस दररोज सकाळी 6 ते रात्री 11 दरम्यान पूर्णतः बंदी करण्यात येत असून सदरच्या जड अवजड वाहनांना रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत वाहतुकीस परवानगी(मुभा) देण्यात येत आहे.सदरची वाहतूक नियंत्रण अधीसूचना ही जीवनावश्यक वाहने,पोलीस वाहने,फायर ब्रिगेड,रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही.सदरचे अधिसूचना 25/9/ 2021 रोजी पासून ते पुढील आदेश येईपर्यंत अंमलात राहील असे वाहतूक नियंत्रण अधिसूचना (GR )द्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

   सदरच्या अधिसूचनेमुळे दैनंदिन प्रवास करणार्‍या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आजपर्यंत उरण मध्ये वाहनांच्या अपघातात 800 हुन अधिक व्यक्तींचा बळी गेला आहे. रस्ते अपघातात मृत्युंची संख्या अधिक आहे.मात्र नवीन काढलेल्या अधिसूचनेमुळे  नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील वाहतूक कोंडी आता कमी होणार असून अपघाती मृत्यूची संख्या देखील कमी होणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी,जनतेने या निर्णयाचे स्वागत करून प्रशासनाचे आभार मानले आहेत.

आरेमध्ये बिबट्याचा बालकावर जीवघेणा हल्ला

मुंबई(गणेश हिरवे)-  आरे मध्ये युनिट नंबर 3 येथिल आरे च्या सरकारी निवासस्थान येथे रहात असलेल्या कुमार आयुष यादव वय 4 वर्ष याच्या वर बिबट्याने हल्ला   केला व त्याला बाजुला असलेल्या जंगलात घेऊन जात असताना मुलांचे मामा विनोद कुमार यादव यांनी बघता क्षणी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिबट्या च्या तोंडातून आपल्या भाचा कुमार आयुष यादव यांना वाचवले

  हि बाब स्थानिक शिवसेनिकांनी श्री रविंद्र वायकर साहेबांना कळवताच संदीप गाढवे शाखाप्रमुख 52 व स्थानिक शाखासमन्वयक अर्चना भुरटे उपशाखाप्रमुख शेखर व युनिट 3  मधिल स्थानिक नागरिक घटनास्थळी दाव घेतली आरे पोलीस खाडे साहेब व त्यांचे सहकारी व स्थानिक नागरिकांनी आयुष ला ट्रामा हॉस्पिटल  ला घेऊन त्यावरती उपचार करण्यात आले त्याला ह्या हल्या मध्ये डोक्याला 7 टाके लागले आहे त्याला घरी घेऊन आल्या नंतर माननीय श्री रविंद्र वायकर साहेबांनी त्याच्या मामा विनोद यादव यांना फोन वरून विचारणार करण्यात आली व उद्या ह्या वर तातडीने उपाययोजना करण्यात येईल असे त्यांना सांगितले वनविभागचे अधिकारी व संदीप गाढवे यांनी त्यांचा पंचनामा करत असताना संदीप गाढवे यांना पुन्हा एक कॉल आला कि बाजूच्या एकता नगर मध्ये उपशाखाप्रमुख शेखर यांच्या घराच्या बाहेर बिबट्या आहे. हे कळताच वनविभागाला घेऊन संदीप गाढवे हे त्या ठिकाणी पोहचले असता घराच्या बाजुला बिबट्याच्या पायाचे ठसे बघण्यात आले व त्याच वेळी तेथील सर्व नागरिकांनी बिबट्याला रस्ता क्रॉस करताना बघितला असे नागरिकांनी सांगितले असे कळताच बिबट्या ज्या दिशेला गेला आहे त्या युनिट 32 : युनिट 31 इकडे स्वतः वनविभाग आरे पोलिस खाडे साहेब यांना शाखाप्रमुख संदीप गाढवे यांनी गस्त घालुन लोकांना जागरूक केले तरी सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी  कशी घ्यावी व त्यावर काय कठोर पावले उचलण्यात यावे यासाठी वनविभागाच्या सर्व उच्च अधिकाऱ्यांसोबत व आरे पोलिस निरीक्षक जाधव मॅडम यांच्या सोबत माननीय आमदार रविंद्र वायकर यांनी  आरे पोलिस स्टेशन येथे सभा आयोजित केली होती 

राष्ट्रीय ओबीसी महासंघ, महाराष्ट्र प्रदेशची महासभा संपन्न

मुंबई(गणेश हिरवे)- राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेशचे पुणे शहर व जिल्हातील नवनिर्वाचित पदाधिकारी यांची पहिली  सभा रविवार दि. २६ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४.०० वा. उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, खजिना विहीरीजवळ, सदाशिव पेठ, पुणे  आयोजित केली होती. 

    यावेळी ओबीसींची राष्ट्रिय जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे व ओबीसी विद्यार्थ्यांची दरवर्षी शिक्षवृत्ती मिळालीच पाहिजे, नाॅन क्रीलीमिअरची मर्यादा २० लाख करावी यासंदर्भात प्रसंगी आंदोलन करून राज्य व केंद्र सरकारला संपूर्ण महाराष्ट्रातून पोस्ट कार्ड द्वारे निवेदन देण्याचा एकमताने निर्णय झाला. या प्रमुख मागणीसह सर्व जातीना प्रतिनिधित्व व संघटना बांधणीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, डाॅ. प्रल्हाद वडगांवकर, सरचिटणीस श्री. रघुनाथ ढोक यांचेसह महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष, अॅड. डाॅ. पी. बी. कुंभार, जनरल सेक्रेटरी, श्री. सुभाष मुळे उपस्थित होते. याप्रसंगी सर्व नुतन पदाधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

   यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य कार्याध्यक्ष श्री. संदीप लचके, वरीष्ठ उपाध्यक्ष श्री. भगवान शिंदे, उपाध्यक्ष श्री. कैलास नेवासकर, सचिव श्री. सुधाकर कुंभार,  सहसचिव श्री. रणजीत माळवदे, संपर्क प्रमुख विजय कुंभार,  समन्वयक श्री. दीपक महामुनी,  पुणे शहर अध्यक्ष, प्रा. उमेश गवळी, जेष्ठ ओबीसीचे नेते श्री  शरद ताजणे यांचेसह विभागीय पदाधिकारी श्री. दिगंबर क्षीरसागर, श्री. बाबुराव लष्करे, श्री. सिद्धेश्वर हिरवे, श्री. सुभाष पांढरकामे, श्री. ज्ञानेश्वर पाटेकर, ज्योतीराम कुभार, श्री. राकेश खडके, राहुल सुपेकर, श्री. रजनीकांत निखळ, मदन लंगडे, सौ.वडगांवकर व इतर पदाधिकारी व बहुसंख्य मान्यवर हजर होते. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जनरल सेक्रेटरी श्री सुभाष वासुदेव मुळे यांनी दिली.

आरे कॉलनीतील बिरसामुंडा चौक येथील पोलिस बीट चौकी व परिसर लवकरच सुशोभित : जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार. माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या निधीतून सुशोभिकरण

आ. वा वृत्तसेवा. मुंबई - जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणार्‍या पोलिस स्थानकांना उत्तम सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या आमदार निधीतून आरे कॉलनीतील पिकनिक पॉईंट येथील बिरसामुंडा चौकाजवळ असणार्‍या बिट चौकी व सभोवतालील परिसर सुशोभित करण्यात येणार आहे.जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणार्‍या पोलिसांना आरे कॉलनीतील रहिवाशांसाठी पिकनीक पॉईंट येथे बिट चौक बांधण्यात आली आहे.या चौकीलगतच शौचालय बांधून देण्याची मागणी आरे पोलिसांकडून करण्यात आली होती.या शौचालयाच्या भुमीपुजनासाठी आमदार रविंद्र वायकर सोमवारी तेथे गेले असता, नव्याने बांधण्यात आलेल्या या चौकीच्या अंतर्गत भागातील गळती बघून या चौकीच्या संपुर्ण भागात शौचालयाबरोबरच चांगली शेड, चांगल्याप्रतीच्या लाद्या व प्रवेशद्वार बांधून देण्याच्या आश्‍वासन यावेळी दिले. 

   आरे पोलिस ठाण्याला लागून असलेल्या ५ एकर जागेत आरे पोलिस ठाणे नव्याने बांधण्यासाठी आमदार रविंद्र वायकर यांनी शासनाकडे पाठपुरावा करून आवश्यक त्या सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्या असून जागेची मोजणी झाल्यानंतर ही जागा गृहविभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. लवकरच या जागेवर आरे पोलिस ठाण्याची नवी इमारत उभारण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री, पर्यटन, पर्यावरण मंत्री मा.ना.श्री. आदित्यजी ठाकरे तसेच पशु व दुग्ध विकास मंत्री मा.ना.श्री. सुनील केदारे यांच्या समवेत याप्रश्नी वायकर यांनी बैठकाही घेतल्या.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  यांच्या समवेत पार पडलेल्या बैठकीनंतर आरेतील ५ एकर जागा गृहखात्याच्या ताब्यात देण्याचे आदेश पशु व दुग्ध विभागाला देण्यात आले.

  एवढेच नव्हे तर आरे कॉलनीतील नागरमोडी पाडा येथील पायवाटा व शौचालय, श्री स्वामी समर्थ मठ सेवा मंडळ, युनिट क्र. ६ येथे लादीकरण कामांचे भूमीपुजन यावेळी करण्यात आले. यावेळी नगरसेविका रेखा रामवंशी, आरे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षिका ज्योती देसाई, महिला विभाग संघटक शालिनी सावंत, उपविभागप्रमुख जितेंद्र वळवी, उपविभाग संघटक मयुरी रेवाळे, शाखाप्रमुख संदिप गाढवे, बाळा तावडे, महिला शाखा संघटक हर्षदा गावडे, सुरेखा गुटे, पुजा शिंदे तसेच शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. 

सौ.सुरेखा गावंडे या स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

आ. वा वृत्तसेवा. मुंबई -अखिल भारतीय पत्रकार संघातर्फे शनिवार दि.२५ सप्टेंबर  रोजी नाशिकच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहात कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानार्थ स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार समारंभ मोठ्या दिमाखात अतिशय नियोजनबद्ध व शिस्तबद्ध  पद्धतीने आणि करोनाचे सर्व नियम पाळून शांतपणे पार पडला.संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना हा पुरस्कार देण्यात आला.

   कल्याण पूर्व मधून कवयित्री,लेखिका सौ. सुरेखा अशोक गावंडे यांना अ.भा.पत्रकार संघाचे अध्यक्ष महेन्द्र देशपांडे,अभिनेता चिन्मय उदगिरकर आणि मिसेस ग्लोबल युनिव्हर्स २०२१ संगीत खैरनार यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अत्यंत मानाचा हा पुरस्कार मिळालेल्या सर्व पुरस्कार्थी महिलांना मानाचा फेटा बांधण्यात आला होता.यावेळी देशपांडे सर,चिन्मय उदगिरकर आणि संगीत खैरनार या मान्यवरांनी आपले मनोगत मांडताना मोलाचे मार्गदर्शन केले.

   सुरेखा गावंडे यांची पाच पुस्तके प्रकाशित आहे.इयत्ता आठवीच्या सुगमभारती या पाठ्यपुस्तकात त्यांची *कोळ्याची पोर* ही कविता सामाविष्ट आहे. मराठी गाण्याचा अल्बम तसेच मराठी चित्रपट गीत लेखनही त्यांनी केले आहे.नवीन काव्यसंग्रह तसेच कथा,पटकथा,संवाद, शिर्षक गीत लिहीलेला *ऑक्सिजन *हा त्यांचा लघुचित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सेवा इंटरनॅशनल तर्फे आरोग्य शिबिर

आ. वा वृत्तसेवा. मुंबई - सेवा इंटरनॅशनल ह्या सेवाभावी संस्थेतर्फे नवभारत नूतन विद्यालय,मुलुंड येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. पौगंडावस्थेतील मुलींना पाळी दरम्यानची स्वच्छता ह्या विषयावर स्त्री रोग तज्ञ डाॅ. अंजली टिल्लू ह्यांनी मार्गदर्शन केले व मुलींच्या शंकांचे निरसन केले. ह्या प्रसंगी  आहाराविषयीची एक शाॅर्ट फिल्म दाखविण्यात आली. सर्व मुलींना संस्थेतर्फे पुन्हा वापरता येणारे कापडी सॅनिटरी नॅपकिन भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. श्वेता शेजवळ ह्यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.हेमाली गाला व शिक्षिका सौ अल्पा पोतदार ह्याचे मोलाचे सहकार्य लाभले. शालेय स्तरावर आरोग्य विषयक विविध कार्यक्रम करण्याचा संस्थेचा मानस आहे

सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

'गुगल' गुरू चा वाढदिवस!

     

आजचे युग हे इंटरनेटचे युग आहे. इंटरनेट म्हणजे माहितीचा खजिना. इंटरनेटवर  कोणतीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध असते. कोणतीही माहिती शोधायची असेल तर गुगलवर सर्च केले जाते. अभ्यासाच्या काही नोट्स काढायच्या असतील किंवा काही संदर्भ शोधायचे असेल तर गुगलला सर्च केले जाते. गुगलही क्षणात हवी ती माहिती पुरवते म्हणूनच गुगलला गुरु असे म्हटले जाते. गुगल गुरूमुळे माहितीचा महास्फोट झाला आहे. गुगल म्हणजे इंटरनेट वरील एक विश्वच आहे. आज त्याच गुगल गुरू चा वाढदिवस आहे. 

         अमेरिकेतील मेनलो पार्कमधील सुसान वेजोसिकी गॅरेजमध्ये लॅरी पेज व सर्जेई  ब्रिन यांनी ७ सप्टेंबर १९९८ साली गुगल कंपनीची स्थापना केली. लॅरी पेज व सर्जेई ब्रिन यांनी सुरवातीला या कंपनीचे नाव 'बॅकरब' असे ठेवले होते. मात्र नंतर ते बदलून गुगल असे ठेवण्यात आले. त्याचे कारणही रंजक आहे. गुगल ही एक गणिती संज्ञा आहे. एकावर १०० शुन्ये दिल्यावर जो आकडा येतो त्याला गुगल म्हटले जाते. मिल्टन सिरोट्टा या गणित तज्ज्ञाने ही संज्ञा शोधून काढली व वापरली. जगातील प्रचंड माहितीच्या साठ्याचे व्यवस्थापन करणे व जगातील कोणालाही ही माहिती सहजगत्या उपलब्ध करून देणे हा हेतू असल्याने कंपनीचे नाव गुगल असे ठेवण्यात आले.   गुगल कंपनीची स्थापना ७ सप्टेंबरला झाली असली तरी २००५ पासून कंपनीने २७ सप्टेंबर हा दिवस वाढदिवसासाठी जाहीर केला. या पाठीमागचे कारण म्हणजे २७ सप्टेंबर रोजी गुगलला सर्वात अधिक पेज व्ह्यू मिळाले. २७ सप्टेंबर या दिवशी सर्वात जास्त पेज व्ह्यू मिळाल्याने  हाच दिवस गुगलचा  वाढदिवस म्हणून साजरा करण्यात यावा  असा अट्टाहास गुगलमधील  कर्मचाऱ्यांनी धरला. कंपनीने तो मान्य केला तेंव्हापासून म्हणजे २००५ पासून २७ सप्टेंबर याच  दिवशी गुगलचा वाढदिवस  साजरा केला जातो. ७ सप्टेंबर १९९५ रोजी स्थापन झालेल्या  गुगल कंपनीच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. गुगल ही आज जगातील सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक कंपनी आहे. गुगल कंपनी  केवळ भूतकाळात रमत नाही तर भविष्याचा वेध घेऊन नवीन नवीन फीचर्स आपल्या ग्राहकांना देते. गुगलने त्यांच्या मुख्य शोध यंत्रात अनेकदा सुधारणा केली असून, इतर अनेक उपकरणांवर त्याचा वापर कसा वाढवता येईल याचा विचार केला आहे. १९९८ साली गुगलने तंत्रज्ञानाचे जग नाट्यमयरित्या बदलून टाकले व सर्च इंजिन कायमचे सुधारून टाकले. गुगलने जग बदलून टाकले. गुगलने इंटरनेट विश्वात क्रांती केली. आज गुगल हे नाव माहीत नसणारा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. गुगलमुळे इंटरनेटची विक्रमी वाढ झाली. जगातील अब्जावधी लोक गुगलचा वापर करतात. गुगल हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. गुगलवर आपण आपल्याला पडलेल्या कोणत्याही प्रश्नांचे उत्तर शोधू शकतो म्हणूनच आज ज्याच्या त्याच्या तोंडी गुगल गुरू हा शब्द रूढ झाला आहे. जगातील कोणतीही माहिती अथवा प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास गुगल गुरूला विचारा तो क्षणात ती माहिती किंवा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देईल. गुगल गुरूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

-श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

आदर्श वार्ताहर - काव्यांगण

 काक घास ठेविता...


गहिवर येतो, श्राद्धदिनी पितरांच्या

               काळात हरवलेल्यांच्या

ऋणबंध किती, अल्प दीर्घ दिवसांचे

                सोडीताही ना सुटण्याचे


तो तरुवर पाहून काक

विनवितो मारुनी हाक

मधुरसा ठेवुनी घास

तव आवडीचे भोजन तुज खाण्याला

                     लाविले अन्न पानाला


कधी पिता पती तू जननी

असतोस कुणाची भगिनी

स्मरण हे साश्रू नयनांनी

अनमान नको करु अशा या घडीला

                 सोडीतो उदक वाडीला


तू वासी त्या नगरीचा

पाहुणा तू या भवानीचा

घे समजून भाव मनीचा

चिरशांती मिळो सदैव तुझ्या आत्म्याला

                     प्रार्थना ही परमात्म्याला


 -भूपाल चव्हाण

मोबाईल -9702378090

पांडुरंग म्हात्रे यांचे निधन

वढाव  - : पेण तालुक्यातील दिव गावचे रहिवासी पांडुरंग पोशा म्हात्रे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.  मृत्यू समयी त्यांचे वय 80 वर्षांचे होते.  राजकीय सक्रिय कार्यकर्ते, उत्तम समाजसेवक, गावातील न्याय निवाडा,  आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती. यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.   पांडुरंग म्हात्रे याच्या रुपाने समाज एका कर्तृत्ववान समाज कार्यकर्त्याला मुकला आहे. समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमातून,  स्पर्धांमधून घुमणारा झंझावाती आवाज आज कायमचा बंद झाला आहे. गरजूंना मदत करणारा एक उमदा, धडाडीचा व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने आज समाज अपंग झाला आहे . यांच्या जाण्यानं परीसरात शोकाकुल पसरली आहे अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाला ईश्वर चिरशांती देवो. हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

वाशी - सरेभाग रस्त्याच्या खांडीला तडा, युद्ध पातळीवर उपाययोजना न केल्यास ग्रामस्थ करणार उपोषण, शेकडो एकर जमीन नापीक होण्याच्या मार्गावर

वढाव  (प्रकाश माळी) - :पेण खारेपाट भागाला मुलभूत सुविधा पासुन वंचित राहणे हे ग्रामस्थांच्या पाचवीला पुजली आहे. कोणत्यान कोणत्या तरी मूलभूत सुविधांचा भावामुळे चर्चेत येतो. 

  पेण तालुक्यातील वाशी सरेभाग येथील कार्यरत असलेली खाडीच्या बाजुने रस्त्यावर  दोन दिवसापूर्वी मोठ मोठ्या तडा जाऊन खालच्या बाजूने रस्ता खचण्यस सुरुवात झाली आहे. जर काही या नविन तयार करण्यात आलेल्या खाडी लगत च्या रस्त्याला खांड गेली तर येणाऱ्या काही दिवसांत शेकडो एकर जमीन पाण्याखाली जावुन जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे. 

   रस्त्यालगत आज पर्यंत शेतकऱ्यांनी हजारो एकर पिकवलेली शेती कापणी करता आलेले असताना या शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. वडलोपार्जित असणारी जमीन ही शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचा असरा आहे तो या होणाऱ्या मोठ्या दुर्घटनेमुळे  शेतकऱ्याच्या नशीबात आलेले पिक वाया जाण्याची शक्यता आहे हजारो कुटुंबे या दुर्घटनेमुळे उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे 

समुद्राचं खारं पाणी या भागातून वाशी, बोरी, शिर्की, वडखल पर्यंत जाऊन तेथील जमीन नापीक होऊ शकते व घरे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.  मागील काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी अशीच प्रकारचे दुर्घटना घडली होती. त्यावेळी जि प सदस्य हरी ओम म्हात्रे यांनी स्वखर्चाने खचलेल्या बंदिस्ती चे काम केले होते. परंतु त्यावेळी उन्हाळी हंगाम असल्यामुळे व मालवाहतूकीस शेतातून दुसरा मार्ग उपलब्ध असल्यामुळे त्या वेळच्या परिस्थितीवर नियंत्रण करणे सोपे झाले. परंतु आता वाहतुकीकरिता मार्ग उपलब्ध नाही व त्यामुळे  खचलेल्या रस्त्यावर वेळीच नियंत्रण झाले नाही तर मोठी दुर्घटना होऊ शकते तसेच खचण्यास सुरुवात झालेल्या रस्त्याला तातडीने उपाययोजना करून आटोक्यात आणले नाही तर येथील खारेपाट भागातील बहुतेक गावाचे व वाड्यांचे भयंकर मोठ्या प्रमाणात नुकसान   होऊ शकते. तसेच येथील शेतकरी बांधवांनी एक मातीनं ठरवले आहे की जर आमच्या वाशी सरेभाग रस्तावरील खचलेल्या रस्त्यांची बंदिस्ती चे  तातडीने उपाययोजना करून दुरुस्त झाले नाही तर आम्ही वाशी  विभाग मध्ये सर्व ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत असे पत्र उपअधिकारी पेण यांना दिले आहे. 

[[ सदर रस्त्यांच काम चालु आहे या बाजुला खाडी आहे या खाडीच्या पाण्याचा प्रवाहाला दोन्ही बाजुला गर्गे (दगडी भिंत) नसल्याने रस्ता जागोजागी खचत चालला आहे. गर्गे टाकण्याचे काम युद्धपातळीवर केले तर सरेभाग येथील कित्येक वर्ष रखडलेल्या रस्त्यांचे ग्रामस्थांचे स्वप्न साकार होतील ]] -गोरख पाटील -संरपच वाशी

इ-पिकपहाणी नोदणी अॅपमध्ये मत्स्यशेतीचा पर्याय नसल्याने मत्स्यशेतकरी चिंतेत...

वढाव वार्ताहर (प्रकाश माळी) - :शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पिक पेरा स्वतःच नोंदवण्यासाठी शासनाने इ-पिकपहाणी अॅपच्या माध्यमांतुन पिकपहाणी नोंदवण्याचे आवाहन केले असतांनाच या अॅपमध्ये असणाऱ्या त्रुटी व हा अॅप वापरण्याचे अज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यामध्ये असल्याने मोठा शेतकरी वर्ग  पिकपहाणी नोंदणी पासून वंचित रहाण्याची शक्यता आहे. पेण तालुक्यांतच जवळ-जवळ विस हजार शेतकरी प्रत्यक्ष लागवड करीत आहेत. शासनाने शेतकऱ्यांना पिकपहाणीच्या नोंदीचे आवाहन करूनही व पिकपहाणी नोंदीसाठी मुदतवाढ देवूनही तालुक्यांत आज पर्यन्त फक्त पाच  टक्केच्याच आसपास पिकपहाणीच्या नोंदी शासनाने केल्या आहेत. याचे कारण म्हणजे कित्येक शेतकऱ्यांकडे अन्ड्रॉईड मोबाईल नाहीत, मोबाईल असलेल्यांना  देखील ई -पीक पहाणी अॅपव्दारे आपल्या  स्वतःच्या पिक पेऱ्याची माहिती व इत्तर माहीती भरण्याचे काम करता येत नाही, बहुसंख्य शेतकऱ्यांना अन्ड्रॉईड मोबाईल वापरताही येत नाही. महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावयाचे पिकपहाणी नोंदीचे कामं शेतकऱ्यांनी करण्यासाठीचा सरकारने घेतलेला हा निर्णय, शेतकऱ्यांना पेलणारा नाही, तो शेतकऱ्यांना नुकसान दायी ठरू शकतो. पिकपहाणी झाली पाहीजे, पिकपहाणीच्या नोंदी वेळच्यावेळी होणे तितकेच गरजेचे आणि  आवश्यक आहे, मात्र हे काम शेतकऱ्यांच्या अंगावर लोटल्याने शेतकऱ्यांचे भविष्यांत प्रचंड नुकसान होण्याची शक्यता वाढणार आहे. पिकपहाणी आणि  पिकपहाणीच्या नोंदी या महसुल विभागाच्या अधिकाऱ्यां मार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर, शेतकऱ्यांच्या घरी जावून त्यांना विचारून किंवा शेतकऱ्यांना ऑफीसमध्ये बोलवून शेतकऱ्यांकडून पिक पेऱ्याची माहिती घेवून करण्यात याव्यात. कोणीही शेतकरी पिकपहाणी नोंदी पासुन वंचित रहाणार नाही याची काळजी घेण्याची अवश्यकता आहे.

    शेतकऱ्यांची भातशेती खालील तसेच इत्तर पिकाखालील पावसाळी एकपिकी जमीन ही 8अ व 7/12 ला खरीप लागवड म्हणून गणली जाते, मात्र या भातशेती इत्यादी पिकांच्या जमीन मध्ये कोकण, रायगडसह महाराष्ट्रांतील अनेक शेतकरी स्वतःच्या जमिनीत शेततलाव बनवून, मत्स्यशेती करून मत्स्योत्पादन घेत आहेत. पिक विमा भरताना 8अ मधले सर्व क्षेत्र भातशेती इत्यादी पिकांच्या अंतर्गत गणले जात आहे आणि  मत्स्यशेत तलावांची  7/12 वर मत्स्यशेती अशी नोंद वारंवार मागणी करून, आंदोलन करून अद्यापही केलेली नाही.

    शासनाने पिकपाण्याची नोंद करण्यासाठी इ-पिकपहाणी अॅप तयार केले आहे. या इ-पिकपहाणी अॅपमध्ये त्रुटी आढळून येत आहेत. इ-पिकपहाणी अॅपमध्ये पिकपहाणी नोंद करण्या करता असणाऱ्या पिकांच्या पर्यायांच्या रकान्यात मत्स्यशेती हा पर्याय (ऑप्शन) उपलब्ध नाही त्यामुळे पिकपहाणी सदरी मत्स्यशेती अशी नोंद करणे मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शक्य होत नाही. इ-पिकपहाणी अॅपच्या माध्यमांतुन मत्स्यशेतकऱ्यांना त्यांच्या मत्स्यशेतीची नोंदणी करता येत नसल्याने मत्स्यशेती करणाऱ्या मत्स्यशेतकऱ्यांचे भविष्यांत फारमोठे नुकसान होणार असुन त्यांची मत्स्यशेतीची जमिन आपोआपच नापिक ठरली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मत्स्यशेतकऱ्यांना नुकसान भरपाई, बॅन्ककर्ज, शासकीय अनुदान अथवा इतरत्र प्रकारची कोणतीही मदत सहकार्य अथवा मार्गदर्शन तसेच मत्स्य विभागामार्फत मत्स्यतलावांचे रजिस्ट्रेशन यापुढे होणे कठीण होणार आहे. तरी इ-पिकपहाणी अॅपमध्ये मत्स्यशेतीची नोंदणी करण्यासाठी मत्स्यशेती हा पर्याय (ऑप्शन) नव्याने जोडण्यात यावा. सोबतच मत्स्यशेतीत कोणत्या माशांची मत्स्यशेती केली जाते याचीही माहिती भरता येण्याची व्यवस्था व दुरुस्ती या इ-पिकपहाणी अॅपमध्ये करण्याची अवश्यकता असल्याचे पेण तालुका शेतकरी विकास मंच चे सदस्य व मत्स्यशेतकरी श्री. राजेंद्र झेमसे वाशी ता. पेण यांनी सांगितले. पेण तालुक्यांत मागील अतिवृष्टी व पुरामुळे मत्स्य तलावांचे झालेल्या नुकसानीचे सुमारे दोन हजारपेक्षा अधिक पंचनामे झाले असुन तशी नोंद शासन दरबारी आहे. मागील  काही वर्षात रायगड, कोकणसह संपूर्ण महाराष्टांत अनेक शेतकऱ्यांनी मत्स्यशेतीचा पर्याय निवडला असुन महाराष्ट्रांत बर्‍यापैकी मत्स्यशेती केली जात आहे. मात्र इ-पिकपहाणी अॅपमध्ये या मत्स्यशेतकऱ्यांना पिकपहाणी नोंदण्याचा पर्यायच उपलब्ध नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रांतील मत्स्यशेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मत्स्यशेतकऱ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने मत्स्यशेतकऱ्यांच्या 7x12 वर मत्स्यशेती अशी नोंद करून इ-पिकपहाणी अॅपमध्ये पिकपहाणी नोंद करण्यासाठी मत्स्यशेती हा पर्याय उपलब्ध करून देण्याचा व शेतकऱ्यांना इ-पिकपहाणी नोंदवण्याची माहीती व मार्गदर्शन महसुल व कृषी विभागा मार्फत, पिकपहाणी नोंदणीच्या मुदतीपूर्वी करून देण्याची मागणी पेण तालुका शेतकरी विकास मंचने प्रसिद्ध केलेल्या पत्रकांत करण्यात आली आहे.

[[ इ-पिकपहाणी अॅपमध्ये मत्स्यशेतीची नोंदणी करण्यासाठी मत्स्यशेती हा पर्याय (ऑप्शन) नव्याने जोडण्यात यावा. सोबतच मत्स्यशेतीत कोणत्या मास्यांची मत्स्यशेती केली जाते याचीही माहिती भरता येण्याची व्यवस्था व दुरुस्ती या इ-पिकपहाणी अॅपमध्ये करण्याची अवश्यकता आहे.]] 

 ( पेण तालुका शेतकरी विकास मंच चे सदस्य श्री. राजेंद्र झेमसे वाशी - पेण)

वाशीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पावसाची गळती ; संबंधित बांधकाम खात्याकडून जाणिवपूर्वक कानाडोळा

वढाव वार्ताहर (प्रकाश माळी) : शासनाने कोरोना काळात आरोग्य यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेश दिले असल्याने महाराष्ट्रातील सर्व आरोग्य यंत्रणा तत्परतेने काम करीत आहे.मात्र पेण तालुक्यातील वाशी प्राथमिक आरोग्य केंद्राची दैनिय अवस्था झाली असून पावसाळा सुरू झाल्यापासून उपकेंद्रात पावसाची गळती होत असल्याने उपकेंद्रात येणाऱ्या रुग्णांना या गळत होणा-या पावसाचा सामना करावा लागत आहे.पेण तालुक्यातील वाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात मागच्या एक वर्षापूर्वी इमारतीच्या सर्व भागातील पत्रे बदलण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून जवळपास ३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला त्यानुसार अलिबाग येथील ठेकेदाराला काम देण्यात आले मात्र सदर ठेकेदारांनी इमारतीच्या वरील पत्रे बदलून न घेता त्याच जुन्या पत्रांची डागडुजी करून बसविले पण पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच चांगल्याप्रकारे काम न केल्यामुळे मागच्या सात आठ महिन्यांपासून उपकेंद्रात पावसाचे पाणी येत आहे.त्यामुळे उपकेंद्रात लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना यांचा त्रास होत आहे.याबात वाशी उपकेंद्राच्या अधिकारी यांनी वारंवार संबंधित बांधकाम विभागाकडे पत्र व्यवहार केले मात्र याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी नेहमीच कानाडोळा केल्याने या अधिका-यांसह ठेकेदाराचा फावला आहे.त्यामुळे अशा ठेकेदाराची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

[[ वाशी आरोग्य केंद्राबाबत आम्ही सातत्याने बांधकाम तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केले आहे मात्र याकडे संबंधित अधिकारी  कानाडोळा करीत असून येथे लसीकरणासाठी येणाऱ्या नागरीकांना आमच्या पद्धतीने त्यांची उपाययोजना करीत आहोत.मात्र संबंधित ठेकेदारांनी या इमारतीच्या बाबत चांगले काम केले नाहीत त्यामुळे आमच्या कडून त्यांना काम पूर्ण झाल्याचा दाखला देण्यात आला नाही.]]- डॉ.मनिषा म्हात्रे - वाशी आरोग्य अधिकारी 

[[ याबाबत आम्ही स्थानिकांच्या माध्यमातून अनेकदा आवाज उठविला मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही.तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम राहणे महत्त्वाचे आहे यामुळे आपण आवाज उठविला तर नक्कीच वाशीची आरोग्य यंत्रणा जागी होईल.]]- हेमंत पाटील - सामाजिक कार्यकर्ते

[[याबाबत तत्काळ आम्ही दुरूस्ती करुन घेणार आहोत मात्र याकरीता ठेकेदाराचे पैसे ठेवले आहेत ]]-तेलंगे - अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग

अखिल भारतीय साहित्य परिषद ( कल्याण शाखा) आयोजित कवी संमेलन संपन्न

कल्याण - अखिल भारतीय साहित्य परिषद कल्याण शाखेच्या वतीने शनिवार दि. २५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी महानगरीय कवी संमेलनाचे आयोजन कल्याणातील बालक मंदिर सभागृहात करण्यात आले होते.त्यात कल्याण-डोंबिवली परिसरातील ३० प्रतिथयश कवींनी आपल्या कवितांचे बहारदार सादरीकरण केले. कार्यक्रमाला, अ.भा.साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रांताध्यक्ष प्राचार्य नरेंद्र पाठक, संघटनमंत्री मा. सुनील वारे, शब्द सुमनेच्या संस्थापिका मा. सौ. अनिता कळसकर, काव्य रसिक मंडळाचे अध्यक्ष मा. महेश देशपांडे, काव्य किरण मंडळाचे कार्याध्यक्ष मा. प्रवीण देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कवी ज्योतीताई शेटे, आनंद पेंढारकर, सागरराजे निंबाळकर, जयंत कुलकर्णी, दया घोंगे, वैदेही जोशी, अरुण गवळी, राजीव जोशी, स्वाती नातू व इतर प्रसिद्ध कवींनी गझल, मुक्तछंद, पोवाडा, रँप साँग, अष्टाक्षरी अशा विविध स्वरुपात आपल्या कवितांचे सादरीकरण केले. सर्व कवींचा प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देवून सन्मान करण्यात आला. जवळजवळ दोन वर्षांनी प्रत्यक्ष सादरीकरण करता आल्याने सर्व कवी व रसिकांनी आनंद व्यक्त केला. कल्याणचे साहित्यिक राम स्वरुप साहू अध्यक्षस्थानी होते. मराठीतून उत्तम सूत्रसंचालन हिंदी भाषी कवी, सचिव श्री संजय द्विवेदी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री मदनकूमार उपाध्याय, श्री रजपूत सर यांनी मेहनत घेतली.

इशिकाचे कौतुकास्पद यश ; ऑनलाईन लोक नृत्यस्पर्धेत व्दितीय क्रमांक

मुंबई - पदन्यास एंटरटेनमंट प्रस्तुत यांनी आयोजित केलेल्या 'इंडिया'स इंटरनॅशनल   ग्रूवफेस्ट (International Dance Championship) या ऑनलाईन नृत्य स्पर्धेत लोकनृत्य विभागात (Folk - Style)  जोगेश्वरी - बांद्रेकरवाडी मधील कु. इशिका मानसी महेश इनामदार हिने उत्तम नृत्य सादर करून द्वितीय पारितोषिक मिळविले.या स्पर्धेत १२ देशातील ८०० च्या वर स्पर्धकांचे ऑडिशन घेण्यात आलेले, आणि त्यामधून ४९५ स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले होते. त्यामध्ये लोकनृत्य विभागात द्वितीय क्रमांक मिळवून  कु. इशिका मानसी महेश इनामदार हिने जोगेश्वरीचे नाव उंचावले असून समाजातील सर्व स्तरातून तिच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

आ.राजूदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूना ब्लॅंकेट व खाऊ वाटप

उरण - दिनांक 26/9/2021 रोजी मा.राजसाहेब ठाकरे यांच्या अंत्यत जवळचे विश्वासु , निष्ठावंत दोन शिलेदार आमदार राजुदादा पाटील आणि सचिन मोरे या दोन्ही समाजसेवी व्यक्तिमत्व असलेल्या नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण यांच्या वतीने उरण उपतालुकाध्यक्ष सत्यवान भगत ,विभाग अध्यक्ष दिपक पाटील यांच्या आयोजनाने उरण येथील रानसई मार्गाचीवाडी येथे आदिवासी कुटूंबियांना ब्लॉकेट ,टॉवेल आणि मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. ह्या कार्यक्रमासाठी  मराठी कामगार सेनेचे उपाध्यक्ष संदेश भाई ठाकूर , मनसे  उपतालुकाध्यक्ष  सत्यवान भगत ,उपतालुका अध्यक्ष राकेश भोईर ,  रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक रितेश पाटील , विभाग अध्यक्ष दिपक पाटील ,एड.ओमकार पाटील, भार्गव म्हात्रे , ठाकूर , शेखर म्हात्रे , मेनन म्हात्रे  ,नामदेव बरतोड, संजोग माळी  आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. सदर कार्यक्रम हा अशा आदिवासी बांधवांसाठी आयोजित केला होता की ज्यांना खरोखरच कोणत्याही प्रकारची मदत पोचत नाही.ज्या ठिकाणी जाण्यासाठी जीवाची पराकष्टा करावी लागते.ज्या दुर्गम भागात येण्या जाण्यासाठी पक्की रस्ते नाहीत कोणत्याही प्रकारचे सुविधा नाहीत अश्या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची गरज ओळखून हा कार्यक्रम मार्गाची वाडी रानसई चिरनेर या ठिकाणी आयोजित केला .या कार्यक्रमाला गावातील लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.त्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद होता.गावातील विजय शिंगवा या तरुणाने सर्वांना धन्यवाद दिले. "आपण मनसेचे सर्व पदाधिकारी सदस्य या ठिकाणी आलात आणि ब्लॅंकेट देऊन या बांधवांना मायेची ऊब दिलीत त्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी राहू.आपल्या टीमच्या सर्व सदस्यांना निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना.ही वाडी डोंगरात आहे. आणि येथे यायला-जायला खूपच त्रास आहे तरी आपण आमच्या वाडीवर आलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार" या शब्दात तेथील आदिवासी बांधवांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

भाजपा व युवा मोर्चा तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

उरण - कोविड 19 या वैश्विक महामारीशी लढणाऱ्या भारतीयांसाठी आणि महाराष्ट्रातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा उरण तालुकाच्या वतीने उरण शहरातील तेरापंथी सभागृह वाणीआळी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला.एकूण 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

  विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी,शहाणवाज मुकादम -कोकण विभाग प्रमुख अल्पसंख्याक मोर्चा,जितेंद्र पाटील -जिल्हा उपाध्यक्ष,चंद्रकांत घरत -रायगड जिल्हा चिटणीस,जसीम इस्माईल गयास -अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष,नगराध्यक्ष-सायली म्हात्रे,रवीशेठ भोईर -भाजपा उरण तालुकाध्यक्ष,प्रकाश ठाकूर -तालुका उपाध्यक्ष,सुनील पाटील -तालुका सरचिटणीस,शेखर पाटील-उरण तालुका युवा मोर्चा अध्यक्ष,नगरसेवक -कौशिक शहा,हितेश शहा -संयोजक भाजपा व्यापारी आघाडी,अजित भिंडे-सहसेक्रेटरी व्यापारी आघाडी,मनोहर सहातीया -सह संयोजक व्यापारी आघाडी,हस्तीमल मेहता -सेक्रेटरी व्यापारी आघाडी,कुणाल शिसोदिया-व्यापारी आघाडी सदस्य,शशी पाटील -पूर्व विभाग अध्यक्ष,कल्पेश म्हात्रे -युवा सचिव पूर्व विभाग, सुरज ठवले -युवा मोर्चा सदस्य,अविनाश भोईर -बूथ प्रमुख कोटनाका,प्रीतम पाटील -बूथ प्रमुख,सदानंद गायकवाड -लायन्स क्लब उरण चेअरमन,सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील, प्रसाद मांडेलकर, बाबुलाल सांखला आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा उरण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉ डी वाय पाटील ब्लड बँक यांच्या सहकार्याने सामाजिक बांधिलकी जपत ह्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी भाजपा उरण तालुका व युवा मोर्चा उरण तालुक्याचे पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी घेतले सिडको कॉलनीतील श्री गणेशाचे दर्शन

उरण- शनिवार दिनांक 25 सप्टेंबर 2021 रोजी  सिडको कॉलनी बोकडविरा येथे "मनोज पाटील शिवसेना 3201" मंडळाच्या आमंत्रणाला मान देऊन माजी आमदार तथा रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर,उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे तसेच मनोज पाटील यांनी बालगोपाल साखरचौथ गणपतीचं सिडको कॉलनी येथे जाऊन दर्शन घेतले. या वेळी शुभेच्छा देताना माजी आमदार  मनोहरशेठ भोईर म्हणाले की आपण कोणत्या तालुक्यातील वा जिल्ह्यातील आहात हा विचार न करता वेळ प्रसंगी शिवसेना मदतीला तत्पर असते.सिडको कडे कॉलनीतील समस्या मांडून त्या सोडवण्याचे अभिवचन मी देत आहे. त्याच बरोबर "मनोज पाटील शिवसेना 3201 मंडळाने" कोरोना काळात केलेल्या तेथील कामाचे त्यांनी कौतुक केले. ह्या वेळी स्वराज तोटे,राहुल पाटील,रोहित साळुंखे,निलेश महाजन,दीपक काळे,विकास सावंत, गणेश चव्हाण,अमोल पोळ,सुनील पाटील,विशाल पाटील,निवेश पाटील,विकास रा.सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

भारत बंदला १९ प्रमुख राजकीय पक्षांसहित सामाजिक ,विद्यार्थी -युवक संघटनांचा पाठिंबा

मुंबई - संयुक्त किसान मोर्चानी २७ सप्टेंबर रोजी घोषित केलेल्या भारत बंदला देशातील प्रमुख १९ पक्षांनी,कामगार संघटना कृति समिती,किसान संघटना,विद्यार्थी,युवक संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे.मुंबईमध्ये २७ तारखेला अंधेरी स्टेशन( पश्चिम) सकाळी ११ वाजता, राणी लक्ष्मीबाई चौक,सायन सकाळी ११:३० वाजता,रत्ना हॉटेल गोरेगाव( पश्चिम) सकाळी ११ वाजता प्रखर निदर्शने करून केन्द्र सरकारचा निषेध केला जाईल.

ह्या निदर्शनात,कॉग्रेस,राष्ट्रवादी,भारतीय कम्युनिस्ट पक्ष,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,समाजवादी पार्टी,आप,लाल निशान ( लेनिनवादी) ,एसयुसीआय,भाकप माले,जनता दल (सेक्युलर),श्रमिक मुक्तिदल,एनएपीएम,हम भारत के लोग,सेव्ह डेमॉक्रॅसि,सेन्ट्रल विस्टा विरोधी भारत,विविध कामगार ,युवक,विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते सामील होतील.बीजेपीच्या केन्द्र सरकारने केलेले कॉर्पोरेट धार्जिणे तीन कृषी कायदे रद्द करावेत,एमएसपीचा कायदा करावा,२०२० चा वीज कायदा रद्द करावा,केन्द्राने केलेले कामगार विरोधी कायदे रद्द करावेत,डिझेल पेट्रोल,घरगुती गॅस दरवाढ मागे घ्यावी,महागाईला आळा घालावा,नवी शिक्षण निती हाणून पाडा इत्यादी बंदच्या मागण्या आहेत.या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


समाजसेवक कृष्णा कदम यांचा हभप विठोबाआण्णा मालुसरे स्मृती सन्मान पुरस्काराने गौरव

मुंबई (शांताराम गुडेकर )स्वातंत्र्यसेनानी आणि तत्कालीन कुलाबा जिल्हा कृषी सभापती वै.हभप विठोबाआण्णा मालुसरे यांच्या जन्मशताब्दी ...