आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ३० जून, २०२१

उरण शहरात मनोरुग्णांचा मुक्त संचार ; मनोरुग्णांचा बंदोबस्त करण्याची जनतेची मागणी

उरण - पृथ्वी तलावरील प्रत्येक प्राण्याला स्वाभिमानाने, आनंदाने जगण्याचा हक्क आहे. मात्र काही जणांच्या नशिबात हे आनंदाने जगणे नाहीच. विविध समस्या, कौटुंबिक वादविवाद, इतर कारणांमुळे मनुष्याच्या बुद्धिवर ताण पडून त्या मनुष्याचे रूपांतर मनोरुग्णांमध्ये होतो.अश्या मनोरुग्णांना(वेडसर व्यक्तींना)आपल्या दैनंदिन गरजाही त्यांना पूर्ण करता येत नाही.त्यामुळे जिथे रिकामी जागा भेटेल तिथे राहणे, मिळेल ते खाणे, कपडे नसले तरी तसेच सर्वत्र फिरणे, चित्रविचित्र आवाज काढणे, सतत स्वतःशीच बोलणे असे लक्षणे असलेले मनोरुग्ण उरण शहरात फिरत असून त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना विशेषतः महिला वर्गांना होत आहे त्यामुळे त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा. मनोरुग्णांना (वेडसर व्यक्तींना )सुधारगृहात किंवा एखाद्या सेवाभावी आश्रमात त्यांची रवानगी करावी. उरण शहर मनोरुग्णमुक्त करावे अशी मागणी जनतेतून करण्यात येऊ लागली आहे.

   उरण शहरातील गणपती चौकात एक पुरुष व्यक्ती मनोरुग्ण असून ती 2,3 दिवस झाले नग्न अवस्थेत आहे. सदर मनोरुग्ण गणपती चौकातील मंदिराच्या पायथ्याशी, मेन रस्त्याच्या बाजूलाच असल्याने  बाजारात येणा जाणाऱ्या महिलांना, आबाल वृद्धाना याचा त्रास होऊ लागला आहे.याबाबत बाजूलाच रिक्षा स्टॅन्ड आहे. रिक्षा चालक तथा सामाजिक कार्यकर्ते दिनेश हळदणकर यांनी उरण नगर परिषदेत फोन केला असता तुम्ही पोलीस ठाण्यात फोन करा असे त्यांना सांगण्यात आले तर दिनेश हळदणकर यांनी उरण पोलीस ठाण्यात फोन केला असता त्यांनी तुम्ही याबाबतीत नगर परिषदेशी संपर्क साधा असे सांगितले. उरण नगर परिषद व उरण पोलीस ठाणे यांनी याबाबतीत हात झटकून आपली जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे वेडसर असलेल्या व्यक्तींचा, मनोरुग्णांचा बंदोबस्त करावा तरी कसा ? आणि कोणी करावा असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.मात्र उरण शहरात अनेक मनोरुग्ण मुक्तपणे सर्वत्र फिरत आहेत. त्यांच्या स्वतःच्या जीवालाही खूप मोठा धोका आहे. यात महिलांचाही समावेश आहे. त्यामुळे मनोरुग्णांना जगण्याचा आनंद घेता आला पाहिजे. त्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे यासाठी त्यांची त्वरित रवानगी एखाद्या सुधारगृहात करावी यासाठी उरण नगर परिषद, उरण पोलीस ठाणे व सेवाभावी संस्थानी पुढाकार घ्यावा असे जनतेतून मागणी होऊ लागली आहे.

उरण मध्ये नवीन आधार कार्ड केंद्र

उरण - नागरिकांना आधार कार्ड बद्दल होणारी गैरसोय टाळण्यासाठी व नागरिकांना सोयीस्कर होईल अशा हाकेच्या अंतरावर त्यांना जाता येईल, नागरिकांचे श्रम व वेळ याची बचत व्हावी या दृष्टीकोनातून उरण शहरातील पेन्शनर्स पार्क येथील नगर परिषदेच्या शाळेत पहिल्या मजल्यावर नवीन आधार कार्ड केंद्र सुरु करण्यात आले आहे.

एका दिवसात साधारण 30  नागरिक आधार नोंदणी करू शकतात. शनिवार, रविवार तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी हे केंद्र बंद राहील. इतर दिवशी हे केंद्र चालू असून सकाळी 10 ते दुपारी 5 या दरम्यान हे केंद्र चालू असेल. भारतातील कोणतेही व्यक्ती या आधार केंद्रावर आपले नाव नोंदणी करू शकते. आधार कार्ड नाव नोंदणी केली कि आधार कार्ड 10  दिवसात तयार होते. ज्या व्यक्तींना आधार कार्ड काढायचे आहे त्यांनी आधार कार्डचे संचालिका आशा पाटील फोन नंबर -9422875305 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.शासकीय नियमाप्रमाणे नवीन आधार कार्ड फ्री मध्ये आहे. बायोमेट्रिकला 100 रुपये तर डेमोग्राफिकला 50 रुपये शासकीय दरानुसार घेतले जातात. आधार कार्ड वरील नाव बदलणे, पत्ता बदलणे, नवीन आधार कार्ड तयार करणे आदी कामे या केंद्रावर केली जातात.

रामचंद्र म्हात्रे विद्यालय, आवरेचे मुख्याध्यापक एस.बी.गायकवाड सेवानिवृत्त

उरण -शिक्षण महर्षी स्व. बाळासाहेब म्हात्रे यांच्या ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेच्या रामचंद्र म्हात्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.गायकवाड सरांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम कोरोना संकटामुळे भेंडे सरांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सरांच्या सौभाग्यवती कल्पनाताई, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक  राजू मुंबईकर, गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष तथा पालक प्रतिनिधी सुनिल वर्तक, सामाजिक कार्यकर्ते अनिल घरत आणि सरांची सुकन्या कु. आकांक्षा अश्या मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

       विद्याधर गावंड सर यांचे ईशस्तवन, निवास गावंड सरांचे स्वागत गीत आणि नंदलाल सरांच्या देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमाची गोड सुरुवात झाली.जवळपास सर्वच शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या मनोगतातून सरांच्या सोबत त्यांच्या कठोर पण कर्तव्यदक्ष वृत्तीचा,त्यांनी सर्व स्तरावर केलेल्या मदतीचा उल्लेख करून सरांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

     गायकवाड सर, आणि स्व. बाळासाहेब म्हात्रे यांच्या आठवणींना उजाळा देताना सरांच्या सौ. कल्पनाताई आणि अनेक शिक्षक भावनाविवश झाले.प्रमुख अतिथी रायगडभूषण राजू मुंबईकर यांनी गायकवाड सरांचे अनुभवी मार्गदर्शन मिळाल्याचे सांगून यापुढेही त्यांचे मार्गदर्शन लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली.तर पालक प्रतिनिधी सुनिल वर्तक यांनी स्व. बाळासाहेबांनी आपल्या संस्थेत पारखून घेतलेले आणि संघटन कौशल्य असलेले खणखणीत नाणे असल्याचे गायकवाड सरांविषयी गौरव उद्दगार काढले.

     समारोपात गायकवाड सरांनी आपली संस्था, शाळा, आपले ज्ञानदानाचे कार्य, पालक व विद्यार्थी या सर्वांशी प्रामाणिक राहून आपले कर्तव्य पार पाडा असा संदेश सर्वांना दिला.सूत्रसंचालनातील सुमधुर वाणी आणि काव्यपंक्तीने शिवहारी गावंड सरांनी सर्वांची मने जिंकली, तर चिर्लेकर सरांनी मोजक्या शब्दांच्या प्रास्ताविकात गायकवाड सरांचा संपूर्ण जीवनपट डोळ्यांसमोर मांडला, शेवटी विद्याधर गावंड सरांनी उपस्थितांचे आभार मानले

प्राचीन लिपी मोडी प्रशिक्षण केंद्राचा ऑनलाइन मोडी लिपी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

नेरुळ (गणेश हिरवे)- प्राचीन लिपी मोडी प्रशिक्षण केंद्रातर्फे २३ मे २०२१ रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्राथमिक व प्रगत परीक्षेतील ३२ यशस्वी प्रशिक्षणार्थींचा दिमाखदार ऑनलाइन प्रमाणपत्र वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साही वातावरणात  संपन्न झाला. या सोहळ्यात ५५ जणांचा सहयोग लाभला.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. गिरीश दत्तात्रय मांडके- अभिरक्षक, मराठा इतिहास संग्रहालय, डेक्कन कॉलेज, पुणे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. संतोष यादव- अभिरक्षक, ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व संशोधन केंद्र, अहमदनगर हे लाभले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचीन लिपी मोडी प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष  रामकृष्ण बुटे पाटील-मोडी लिपी अभ्यासक/प्रशिक्षक यांनी प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या प्रदीप क्षत्रिय, प्रशांत आठल्ये, अमोघ वीरकर, पल्लवी मुजुमदार आणि स्वाती म्हात्रे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. केंद्राचे मोडी लिपी अभ्यासक/प्रशिक्षक  अरविंद कटकधोंड यांनी यशस्वी प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करुन मोडी लिप्यंतर प्रक्रियेतील शब्दतोड, अभ्यासक्रम आणि मोडी लिपीचा निरंतर सराव यांचे महत्व विशद केले. 

  प्रमुख पाहुणे डॉ. संतोष यादव प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करुन म्हणाले की, सध्या मोडीकडे आकर्षित होऊन प्राथमिक शिक्षण घेणारे खूप आहेत. आता आपल्याला मोडी लिहिता वाचता येईल व ते उपजिविकेचे साधन होईल असे त्यांना वाटते.  पण तसे नाही. मोडी आत्मसात करण्यासाठी वेळ द्यावा लागतो, सरावात सातत्य ठेवावे लागते. मोडीचा ध्यासच घ्यावा लागतो.

अध्यक्ष डॉ. गिरीश मांडके यांनी प्रशिक्षणार्थींना संबोधून, तुम्ही मोडी लिपी प्रमाणपत्र प्राप्त करुन ज्ञानाने श्रीमंत झाला आहात असे गौरवोद्गार काढले. ते पुढे म्हणाले की, विविध संस्थांमधील दस्तऐवजांची कालनिश्चिती होणे गरजेचे आहे.त्यामुळे त्या त्या काळातील संस्कृतीचा उलगडा होईल. तसेच मोडी दस्तऐवजांचे लिप्यंतर प्रसिद्ध करताना त्या त्या पत्रातील महत्वाच्या बाबी तळटीपांद्वारे अधोरेखित करणे आवश्यकच आहे.या सोहळ्याचे सुरेख सूत्रसंचालन स्मिता खोत यांनी केले. प्रीतम शेट्टी यांच्या मधुर प्रार्थना गीत गायनाने सोहळ्याचा शुभारंभ झाला. रामचंद्र पाटील यांनी खणखणीत आवाजात बोधपट वाचन केले. नरेश विचारे यांनी ह्रद्य आभार प्रदर्शन केले. वनिता साबळे यांच्या सुंदर पसायदान गायनाने सोहळ्याची सांगता झाली.

गरजूंना मिळतोय जॉय


जॉय म्हणजे आनंद व जॉय ऑफ गिविंग म्हणजे देण्यातला आनंद. इतरांना मदत करण्याचा आनंद सध्या मुंबईतील जॉय सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना लॉकडाउन काळात किराणा किट,आरोग्य किट व जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे काम अनेक वर्षपासून जॉय संस्था करीत आहे.मार्च २०२० लॉकडाउन सुरू झाला त्या काळापासून ते आजपर्यंत जवळपास सुमारे हजारो गोरगरीब,वंचित व गरजू कुटुंबाना किराणा किट देण्याच काम संस्थेतर्फे करण्यात येत असून आजही हे काम नियमितपणे सुरू असल्याचे जॉय चे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे सर यांनी संगितले. याआधी पण लॉक डाउन नव्हता तेव्हा संस्थेने पालघर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा,पाडे, मुंबईतील आदिवासी पाडे, अनाथालय,वृद्धश्रम, दृष्टीहीन कुटुंब याना मदत केलेली आहे.एक सामजिक जाणीव ठेवून हिरवे सरांनी सुरू केलेल्या या संस्थेत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील डॉक्टर, शिक्षक,पत्रकार,उच्चपदस्थ अधिकारी व सेवानिवृत्त मान्यवर असे जवळपास २०० कार्यकर्ते काम करीत असून हे सर्वजण वेळप्रसंगी पदरमोड करतात व एखादा कार्यक्रम यशस्वी करून दाखवतात.

-सुभाष मुळे,पुणे विद्यापीठ

कलाकारांनी कलाकारांसाठी दिलेला माणुसकीचा एक हात

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि सोशल डिस्टन्सिन्गचे भान राखून तसेच राज्यशासनाच्या नियमांचे पालन करून सिद्धी कामथ - पल्लविका पाटील - महेश्वर तेटांबे या तिघा कलावंतांनी पुढाकार घेऊन सिनेसृष्टी मधील ७५ ते ८० गरजू कलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सिनेसृष्टीवर आणि  समाजावर एक आदर्श ठेवला आहे. कठोर परिश्रम करून आपली कला प्रामाणिकपणे सादर करणाऱ्या कलावंतावर कोरोना सारख्या महाभंयकर विषाणूंमुळे आज  उपासमारीची वेळ आली आहे. जवळजवळ सर्वच क्षेत्रांतील कलावंतांवर गेले अठरा महिने हाताला काहीच काम नसल्यामुळे नैराश्याचे वातावरण पसरले आहे. अशा द्विधा परिस्थिती मध्ये जगायचे तरी कसे हा यक्ष प्रश्न उद्भवणाऱ्या उपेक्षित आणि गरजू कलावंतांसाठी त्यांना मदत म्हणून काही सेवाभावी संस्थांच्या मदतीने सिद्धी - पल्लवी - महेश्वर या त्रिकूटने जवळजवळ ७५ ते ८० गरजू कलावंतांना सेवाभावी संस्थेच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली येथे (धान्य किट) जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यात प्रामुख्याने चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन, राजेश विनायक कदम (क्लब संस्थापक - रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंडस), अजीत शाह (फेअर अग्रो), मोहम्मद सालेह हसन सनगे, नैना राणे, डिक्सन केनी , गुरुनाथ तिरपणकर (अध्यक्ष - जनजागृती सेवा समिती, बदलापूर) अशा प्रतिष्ठित व्यक्तिसंस्थानी  माणुसकीचा एक हात पुढे करून आपले दातृत्व सिद्ध केले आहे. याप्रसंगी लोकप्रिय ज्येष्ठ कलावंत डॉ. विलास उजवणे यांनी या उपक्रमाला सदिच्छा भेट देऊन भरभरून शुभेच्छा दिल्या व त्यांनी दानशूर व्यक्तींचे कौतुक केले. तसेच ज्येष्ठ अभिनेते प्रदीप कबरे, दिग्दर्शक रामदास तांबे आणि राऊत मँडम (प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह) यांचे देखील या उपक्रमास विशेष योगदान लाभले. प्रसिद्ध सिने अभिनेत्री सिद्धी कामथ यांनी या उपक्रमाचे साचेबद्ध नियोजन केले तर अभिनेत्री पल्लवी पाटील आणि पत्रकार महेश्वर तेटांबे यांनी सर्वतोपरी सहकार्य करून जीवनावश्यक वस्तू वाटपाचा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.


धी कुणबी सहकारी बँक लि.मुंबईच्या व्यवस्थापकीय मंडळ चेअरमन पदी अँड. पी. टी. करावडे यांची निवड

मुंबई(शांत्ताराम गुडेकर)-  रिझर्व बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या सहकारी बँका मार्गदर्शन तत्वानुसार धी कुणबी सहकारी बँक लि. मुंबई व्यवस्थापकीय मंडळ (Board of management) चेअरमनपदी अँड. पी. टी. करावडे (B.E.Civil, LL.B., DMS., MBA finance) यांची निवड करण्यात आली आहे. अँड.परशुराम करावडे MIDC रत्नागिरी येथून नुकतेच कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाले असून सद्यस्थितीत त्यांचा वकिली व्यवसाय सुरू आहे.निवड झालेल्या अन्य  पाच सदस्य मान्यवरांमध्ये सी. ए निलेश श्रावक,सी ए स्वेछा अंत्या करकरे,सी.ए विठ्ठल धो. चिविलकर,सी.ए उमेश आंग्रे,अँड अक्षया द. चिविलकर शर्मा यांचा समावेश आहे. सर्व निवड झालेल्या मान्यवरांना संगमेश्वर तालुक्यातील अनेक संस्था,समाज शाखा,युवक मंडळ शाखा,मंडळ पदाधिकारी व सामाजिक,शैक्षणिक,सहकार क्षेत्रातील अनेकांनी अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या आहेत.

कर्जत मधील पाथरज शासकीय आश्रमशाळेच्या इमारतीकरिता रु.11 कोटी 34 लक्ष तर पिंगळज येथील मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीसाठी रु.13 कोटी 19 लक्ष निधी मंजूर

 कर्जत- राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती सुनिल तटकरे यांच्या पुढाकारातून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाशी सतत समन्वय साधून जिल्ह्यातील आदिम जमाती, आदिवासी बांधवांकरिता विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरु आहेत.

       या पार्श्वभूमीवर नुकतेच राज्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळा वसतिगृहांच्या बांधकामांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी विभागस्तरावरील गठीत समितीची बैठक आदिवासी विकास सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.  या बैठकीमध्ये शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह अशा बांधकामांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी निकष ठरवून निकष पूर्ण करणाऱ्या एकूण 26 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. 

       यापैकी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पाथरज येथील शासकीय आश्रमशाळेची शालेय इमारत या कामाकरिता एकूण रु.11 कोटी 34 लक्ष 27 हजार इतक्या तर याच तालुक्यातील पिंगळज येथील मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीसाठी रु.13 कोटी 19 लक्ष 36 हजार इतक्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. या कामांची सुरुवात सन 2021- 22 या आर्थिक वर्षापासून सुरू होणार आहे.

     आदिवासी जमातीची कुटुंबे अतिदुर्गम व अविकसित अशा सीमाभागात राहत असल्यामुळे या कुटुंबांना जीवनावश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होणे कठीण असते.  त्यांच्या मुलांना योग्य शिक्षण, आरोग्य तपासणी व उपचार, दैनंदिन आवश्यक अन्न किंवा वापर वस्तूंचा पुरवठा, मनोरंजन व करमणूक आणि त्यांच्या उपजीविकेवर आधारित व्यवस्था निर्माण होण्यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे या अहोरात्र प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पुढाकारातून आदिवासी बहुल भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांसाठी शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सुधागड-पाली तालुक्यातील मौजे जांभूळपाडा येथे आदिम जमाती (PVTG) (कातकरी) यांच्याकरिता बहुद्देशीय संकुल उभारण्यासाठी शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कु. आदिती तटकरे यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने अर्थसंकल्पात तशी घोषणा करण्यात आली होती.  पालकमंत्री कु.तटकरे या आदिवासी बांधवांकरिता करीत असलेल्या  प्रयत्नांमुळे आदिवासी समाजाच्या प्रगतीस चालना मिळणार आहे. 


जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची ऑनलाईन बैठक संपन्न ; आगामी काळात ग्राहकांच्या हितासाठी अधिक उपक्रम राबविण्याचा केला संकल्प

अलिबाग - जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक नुकतीच वेब एक्स या प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली. या बैठकीस समितीचे शासकीय सदस्य या नात्याने जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, पोलीस उपअधीक्षक (गृह) जगदीश काकडे, सहाय्यक आयुक्त (अन्न) लक्ष्मण दराडे, जिल्हा वजनमापे नियंत्रक राम राठोड, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रतिनिधी हे शासकीय अधिकारी तर प्रा. डॉ.संगीता चित्रगोटी, विनायक तेलंगे, उद्धव आव्हाड, गणेश भोईर, विनायक सारणेकर, सचिन पिंगळे हे अशासकीय सदस्य ऑनलाईन उपस्थित होते. 

      बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले व अशासकीय सदस्यांना त्यांच्या जिल्हा ग्राहक संरक्षण संबंधीच्या अडीअडचणी तसेच काही सूचना असल्यास त्या मांडण्याबाबत विनंती केली.जिल्हा वजनमापे नियंत्रक श्री.राम राठोड यांनी समिती सदस्यांना माहिती दिली की, वस्तू खरेदी करताना दुकानदारांकडून वजनात योग्य माल मिळत असल्याची खात्री करावी.  प्रमाणित वजनाऐवजी दगडांचा वापर व्यापारी करीत असल्यास तसेच गंजलेल्या, फुटलेल्या व जुनाट वजनकाटयांचा वापर आढळल्यास अशा व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करु नये, या विषयी काही तक्रारी असल्यास या कार्यालयाशी संपर्क साधावा. 

       यावेळी समिती सदस्य श्री.उद्धव आव्हाड यांनी पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व पोलीस अधीक्षक अशोक दुधे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक उपाययोजना उत्तमरित्या राबवित असल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच यापुढेही जिल्हा प्रशासनाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. 

     त्याचबरोबर ते म्हणाले की, करोनाची दुसरी लाट संपत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता समोर येऊन ठेपली आहे .त्या संदर्भात आम्ही नागरिकांच्या जीविताचा किंवा आर्थिक नुकसानीचा संभाव्य धोका होऊ नये, यासाठी नागरिक म्हणून प्रत्येकाने काय खबरदारी घ्यावी, या विषयी माहिती तयार केली आहे.  ग्राहक संरक्षण समिती सदस्य या नात्याने आपले कर्तव्य म्हणून जनजागृती करण्यात येणार आहे तसेच लसीकरणासंदर्भातही सूचना आराखडा तयार केला आहे, त्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याशी लवकरच चर्चा करण्यात येणार आहे. ग्राहकांच्या छोट्या-मोठ्या समस्या आम्ही समजून घेऊन त्यावर समाधानकारक तोडगा देखील काढून देण्याचे काम करीत आहोत, असेही ते म्हणाले.

    या ऑनलाईन बैठकीच्या संपूर्ण समन्वयाची जबाबदारी जिल्हा पुरवठा शाखेच्या श्रीमती मयुरा घरत यांनी उत्तमरित्या सांभाळली. शेवटी जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी उपस्थित सर्व शासकीय व अशासकीय समिती सदस्यांचे आभार मानले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

अलिबाग-   कोकणामध्ये फळबागांचे क्षेत्र वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत फळबाग योजनेचा मोठा आधार झाला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना शासनाची अतिमहत्वाकांक्षी योजना आहे. वैयक्तिक लाभार्थीच्या शेतावर कृषी विभागामार्फत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येत असून जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, रायगड श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

     महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीची अंमलबजावणी रायगड जिल्ह्यात सुरु आहे. फळबाग लागवड कार्यक्रमामुळे लाभार्थ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन सहभागी लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होते. वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत शासनाने 2012 मध्ये रोहयो मधून फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. फळबाग लागवडीच्या कामाकरीता कृषी विभाग हा अंमलबजावणी यंत्रणा म्हणून कार्यरत राहणार आहे. तालुका कृषी अधिकारी यांना कार्यक्रम अधिकारी म्हणून घोषित केले असून ई-मस्टर निर्गमित करणे, भरणे, पारीत करणे, कुशल / अकुशल बाबी असे विविध अधिकार प्रदान करण्यात आले आहे. तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार तालुका कृषी अधिकारी, प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार उपविभागीय कृषी अधिकारी यांना देण्यात आले आहे.

        महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कोकणातील प्रामुख्याने आंबा, काजू, नारळ, सुपारी, चिकू, कोकम, बांबू, फणस, चिंच, आवळा, कागदी लिंबू इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे. फळपिकांचा समावेश करुन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार घनपध्दतीने लागवडीकरीता तसेच कलमे रोपे लागवडीचे प्रति हेक्टरी सुधारीत मापदंडास शासनाने मान्यता दिली आहे. या पिकांच्या लागवड, रोपे खरेदी, मजुरी, सामुग्री करीता तिसऱ्या वर्षापर्यंत अनुदान देण्यात येते.

     फळबाग लागवड कार्यक्रम या योजनेच्या लाभासाठी लाभार्थीचे नाव असलेले मग्रारोहयो योजनेचे जॉब कार्ड, शेतीचा 7/12, 8-अ, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत आदि कागदपत्रांची आवश्यकता आहे. या योजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचे ऑनलाईन सनियंत्रण केले जाते.

      वैयक्तिक लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, भू-सुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, स्री कर्ता असलेली कुटुंबे, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी (वन हक्क मान्य असलेले) अधिनियम, 2006 खालील लाभार्थी आणि वरील प्रवर्गातील पात्र लाभार्थीना प्राधान्य देण्यात आल्यानंतर कृषी कर्ज माफी व कर्ज सहाय्य योजना, 2008 यामध्ये व्याख्या केलेल्या लहान व सीमांत भूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कामांना, शर्तीच्या अधीनतेने प्राधान्य देण्यात येईल.

      या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यासाठी सन 2021 - 22 मध्ये 4 हजार 140 हेक्टर इतका फळबाग लागवडीचा लक्षांक प्राप्त झालेला असून दि. 15 जून अखेर 235 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झालेली आहे. 

      तरी या योजनेत जास्तीत जास्त भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड या योजनेत सहभागी होऊन फळबाग लागवड करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड-अलिबाग श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

रायगड जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेला राष्ट्रीय अधिस्वीकृतीकरण (NABL) मानांकन प्राप्त

आदर्श वार्ताहर वृत्तसेवा  

अलिबाग -  भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा रायगड अधिनस्त असलेल्या 6  प्रयोगशाळा पैकी एक प्रयोगशाळा जिल्हास्तरावर कार्यरत आहे. जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेस नुकतेच राष्ट्रीय अधिस्वीकृतीकरण मानांकन प्राप्त झाले आहे. 

    वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा रायगड जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळा यांच्या राष्ट्रीय अधिस्वीकृतीकरण अंतर्गत फायनल असेसमेंट ऑडीट यशस्वीपणे पार पडले. हे ऑडीट NABL संस्थेचे ऑडीटर श्री.आर.के.सोलंकी (Polymer Papers Ltd.) आणि निरीक्षक म्हणून श्री.रविंद्रनाथ ठाकूर (HPCL) यांच्यामार्फत करण्यात आले. 

     या असेसमेंट ऑडीटकरिता श्रीमती मृणालिनी लोखंडे, प्रभारी, वरिष्ठ भूवैज्ञानिक, श्रीमती स्नेहा घासे, रसायनी, श्रीमती स्वाती सकपाळ रसायनी, श्रीमती संगिता पाटील, अणुजैविक तज्ञ, श्री. संकेत पाटील, परिचर, श्री. एन. डी. पातेरे, सर्वेक्षक, श्री. एन. एम.परदेशी, श्री.आर.ए. पाटील, परिचर  या सर्वांनी त्यांची भूमिका अतिशय काटेकोरपणे व सक्षमतेने पार पाडली. तसेच वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री. एच. एम. संगनोर यांनी प्रयोगशाळेस NABL  मानांकन प्राप्त होण्याच्या दृष्टीने सुरुवातीपासूनच मोलाची भूमिका पार पाडली. 

     कोविड-19 च्या लॉकडाऊनच्या काळातही या कार्यालयाच्या प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे काम करीत प्रयोगशाळेसाठी आवश्यक संसाधनांची उपलब्धता करून घेवून ऑडिट यशस्वीरीत्या पार पाडले.यामुळे अंतिम तपासणीवर अतिशय चांगला प्रभाव पडला. असेसमेंट ऑडीटर श्री.आर.के.सोलंकी यांनी या प्रयोगशाळेबाबत असे नमूद केले की, भारतात त्यांनी 70-80 पाणी तपासणी प्रयोगशाळांचे ऑडीट केले आहे. त्यापैकी रायगड जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळा ही एक रोल मॉडेल लॅब आहे. 

     या सर्व प्रक्रियेमध्ये संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी ,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. पं.ल. साळवे, मा. उपसंचालक, भूसवियं, कोंकण विभाग यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले .श्री.एम.जी.वगारे, सहायक रसायनी कोकण यांनीही या ऑडीटसाठी जिल्हा प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांकडून आवश्यक ती तयारी स्वत: उपस्थित राहून करून घेतली. या कामामध्ये श्री.सचिन तारमळे, रसायनी, गोवेली-ठाणे यांनीही महत्वाची भूमिका निभावली.

      या प्रयोगशाळेमध्ये शासकीय पाणी नमुने तसेच खाजगी पाणी नमुन्याची विहित शासकीय शुल्क आकारून रासायनिक तसेच अनुजैविक  तपासणी करुन अहवाल दिले जातात .

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समितीचे गठन करणे अनिवार्य

अलिबाग  : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समितीचे गठन करणे अनिवार्य आहे. 

      त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, संस्था, महामंडळे, स्थानिक प्राधिकरण, शासकीय कंपनी, नगरपरिषद, सहकार, सहकारी संस्था, खाजगी क्षेत्र, संघटना किंवा खाजगी उपक्रम संस्था, इंटरप्राईझेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, सेवा पुरवठादार संस्था, वितरण व विक्री, वाणिज्य, व्यावसायिक संस्था, शैक्षणिक संस्था, आरोग्य संस्था, रुग्णालये, सुश्रुशालये, क्रीडा संस्था, प्रेक्षागृहे, क्रीडासंकुल, सेवा पुरवठा व इतर इत्यादी आस्थापना यांनी आपल्या आस्थापनेत समिती गठीत झाल्याचा तसेच तक्रार प्राप्त असल्यास प्राप्त तक्रारीचा अहवाल विहित नमुन्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी या कार्यालयास सादर करावा.  

तसेच समिती गठनाबाबत अधिक माहिती हवी असल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नीलम पुष्प बंगला, नागडोंगरी, एमआयडीसी ऑफिस समोर, अलिबाग या पत्त्यावर किंवा ईमेल आयडी wcdora@gmail.com तसेच 02141-295321 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा आणि या विषयाबाबत अधिक माहितीसाठी 201409161221081030 हा सांकेतांक क्रमांक असलेला शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वाचण्यासाठी उपलब्ध आहे,  असे  जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

जुनी वृत्तपत्र रद्दी खरेदीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

अलिबाग :-जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग या कार्यालयातील जुनी वृत्तपत्र रद्दी विक्री करावयाची आहे. त्यासाठी स्थानिक रद्दी विक्रेत्यांनी आपली खरेदी दरपत्रके बंद लिफाप्यात दि.06 जुलै 2021 पर्यंत जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशेजारी, अलिबाग येथे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे. 

नवमतदारांनी e-EPIC मतदार ओळखपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अलिबाग:- मा.भारत निवडणूक आयोगाने मतदारांना मतदान ओळखपत्र त्यांच्या मोबाइलवर डाउनलोड करण्याची सुविधा दिली आहे. मतदार पोर्टल किंवा मतदार हेल्पलाइन मोबाइल ॲप किंवा NVSP वरून नवीन मतदार हे e-EPIC डाउनलोड करू शकतात. संबंधित मतदारांनी ते डाऊनलोड करणे अपेक्षित आहे. 

      रायगड जिल्ह्यातील 12 हजार 832 नवीन मतदारांपैकी आतापर्यंत 4 हजार 366 मतदारांनी E-epic डाऊनलोड करून घेतले आहेत. उर्वरित 8 हजार 466 मतदारांनी e-EPIC डाऊनलोड करून घेण्याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. 

     ही प्रक्रिया सहजपणे पूर्ण करता येते. शिवाय e-EPIC हे मतदारांना आपल्या मोबाईलमध्ये किंवा digi locker मध्येही ठेवता येते. ते गहाळ किंवा खराब होण्याचा प्रश्न उदभवत नाही. मतदारांना आपले e-EPIC मतदार पोर्टल:  http://voterportal.eci.gov.in/  किंवा एनव्हीएसपी: https://nvsp.in/ किंवा मतदार हेल्पलाईन मोबाइल ॲप Android - https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen  

iOS-  https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004 याद्वारे डाऊनलोड करता येणार आहे. 

       या सुविधेत आपले e-EPIC मोबाईल / डेस्कटॉपवर डाउनलोड करण्यायोग्य असून डिजिटली मोबाईलवर संग्रहित करता येते. हे स्वतः मुद्रण (print) करण्यायोग्य आहे तसेच प्रतिमा आणि लोकसंख्याशास्त्रासह सुरक्षित QR कोड उपलब्ध आहे.

     e-EPIC डाऊनलोड करण्याची प्रक्रिया Register Login on NVSP/ Voter Portal, EPIC क्रमांक किंवा फॉर्म संदर्भ क्रमांक नमूद करणे, नोंदणीकृत मोबाईलवर पाठविलेला OTP तपासून घेणे, e-Epic डाउनलोड करणे अशा प्रकारे आहे.या सुविधेची कार्यपद्धती एक व्यक्ती एक मोबाईल नंबर असलेले मतदार हे मतदार हेल्पलाईन App किंवा मतदार पोर्टलवर किंवा स्वतःच्या मोबाइल क्रमांकाने नोंदणी करून e-EPIC डाउनलोड करून घेऊ शकतात, अशी आहे.माहे डिसेंबर 2020 व  दि. 15 जानेवारी 2021 या कालावधीत नोंदणी केलेल्या नवमतदारांनी वर नमूद केलेल्या माध्यमांद्वारे e-Epic आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी  श्रीमती निधी चौधरी तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती वैशाली माने यांनी केले आहे.

निवृत्त शिवप्रेमीना निरोप समारंभ संपन्न

मुंबई : वस्तू व सेवा कर विभाग  माझगाव मुंबई कार्यालयातील, शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने, सेवा निवृत्त शिवप्रेमी कर्मचा-यांचा  निरोप समारंभ, माझगाव कार्यालयातील, वाचनालयात, संतोष कोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला.

 शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सुधीर दिनकर कुंभार,( राज्यकर अधिकारी), राजेंद्र गणपत सरगडे ( राज्यकर निरीक्षक), सुरेश तुकाराम महाडिक (नोटिसवाहक) व उदय पांडुरंग साबळे ( शिपाई) या शिवप्रेमी चा वस्तू व सेवा कर विभागातून सेवा निवृत्त झाल्याने, शाल श्रीफळ व शिवराज्याभिषेक प्रतिमा देऊन  गौरविण्यात आले.

          निरोप समारंभास, समितीचे अध्यक्ष-संतोष कोरे, सचिव- रोहिदास तरे, सह सचिव - महेश कळसकर, सह रमेश गावडे, बबन गायकर, संजय सावंत, कृष्णा अंभोरे यांनी निवृत्त शिवप्रेमींना निरोप देऊन शुभेच्छा दिल्या. प्रस्तावना - लक्ष्मण पाटील व उपस्थितांचे आभार कृष्णा अंभोरे यांनी मानले. या सोहळ्यास असंख्य शिवप्रेमी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

सोमवार, २८ जून, २०२१

लोकशाहिर तुकाराम मानकर अनंतात विलीन ; कोकणच्या जाखडी नृत्याची श्रीमंत कलाकृती अजरामर ठेवणारा महाराष्ट्राचा मानकरी हरपला !

 महाराष्ट्राची लोककला शाहिरी परंपरा,कोकणची अस्मिता,कोकणची मायबोलीचा आदर राखून जाखडी नृत्याची श्रीमंत कलाकृती अजरामर ठेवणारे एक कलातपस्वी नेतृत्व म्हणजे शाहिरी कलेचा अनमोल मोती आणि "शक्ती-तुरा" कलेतील निष्ठावंत सेवक महाराष्ट्राचे मानकरी लोकशाहिर तुकाराम मानकर होय.कलेचा वारसा लाभलेल्या आणि कलेचं "माहेरघर" म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पवित्र कोकण भुमीत आज अनेक शाहिरी रत्न जन्माला आली.कोकणच्या तांबड्या मातीतील विविध कला आजही जोपासून ती टिकवून ठेवण्याचे काम अनेक शाहिर आणि कलावंत मंडळी करत आहे.माणगाव तालुक्यातील अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात  बसलेले पेण गाव हे खेडेगाव असले तरी या गावामध्ये अनेक कलावंत, शाहिर जन्माला आले.संत,कलावंत,शाहिरांच्या भूमीत नाच,तमाशा,भजन भारूड या लोककलेनं नटलेल्या भूमीत पेण-भोपळी या गावात अत्यंत गरीब कुटुंबात वडील पांडुरंग श्रीपाद मानकर व आई बबीबाई पांडुरंग मानकर या माऊलींच्या पोटी ४ जुलै १९५६ रोजी  एका गोंडस बाळाचा जन्म झाला ते म्हणजे "लोकशाहीर तुकाराम मानकर" होय.

      त्या काळच्या अतिशय खडतर जीवन प्रवासात अत्यंत गरीब परिस्थितीत आई-वडिलांनी  लोकशाहिर तुकाराम मानकर यांना शिकवले.आई-वडिलांच्या संस्कार व प्रेम-मायेनं त्यांना मोठं केले.सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म असल्याने वडिलांची स्वतःची शेती नाही.म्हणून दुसऱ्याकडे खपून-खपून किती खपायचे या मोठ्या प्रश्नावर विचार करत-करत वडील समवेत लोकशाहीर तुकाराम मानकर मायापंढरी मुंबईत आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आले.वडिल घरेलू कामगार म्हणून काम करत असत.आपल्या सोबत घेऊन आलेल्या वडिलांनी तुकाराम मानकरांना एका हॉटेल ला कामावर रुजू केले.काम करत असताना रेडिओवर गाणी ऐकणे, तमाशा नाच,कलगीतुरा पाहणे, त्यावर अभिनय करणे या गोष्टींची आवड असणाऱ्या मानकरांनी या कलेच्या गुणांवर प्रेम करायला सुरुवात केली.मग गावच्या ठिकाणी सादर होणाऱ्या गण, गवळण,फार्स,पोवाडा या कलेची आवड निर्माण होताच बारीक-सारीक भूमिका करणं, लिहणे, गायन करणे अशी ओढ लोकशाहीर मानकर यांना लागली व या कलेत त्यांचे मन रमले.

    कोकणच्या पारंपारिक जाखडी नृत्याच्या डबलबारीच्या सामन्यांची ढोलकीच्या तालावर धुंद-बेधुंद होऊन निनादू लागतात.आजवर मुंबईची नाट्यगृहे, पौराणिक ग्रंथ, पुराणाच्या आधारे शास्त्राचा आधार घेऊन कालपरत्वे चालत असलेल्या या कलगीतुरा जाखडी- नृत्याचा रंग मात्र आजच्या आधुनिक युगातही कोकणातील युवा कलाकारांनी, अजूनही कायम ठेवलेला नाही तर त्याला आधुनिक पध्दतीची धार देण्याचे कार्य सुरू ठेवले आहे.अशा या क्षेत्रामध्ये गेली ५० वर्षे प्रचंड जिद्द,चिकाटी आणि अथक परिश्रम या भगीरथ प्रयत्नांतून रंगभूमीशी एकजीव होण्यास आदरणीय लोकशाहिर तुकाराम मानकर हे शक्ती-तुरा  जोपासणारे कमालीचे खरे मानकरी ठरले आहेत.

         अशा या महान विभूतीला दि.२६ ऑगस्ट २००४ रोजी अखिल भारतीय शाहिर परिषद मुंबईतर्फे मा.अध्यक्ष पद्मश्री शाहिर साबळे यांच्या शुभहस्ते "महाराष्ट्र शाहिर गौरव भुषण" हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले."रायगड भूषण पुरस्कार","कोकण रत्न पुरस्कार","कुणबी समाज गौरव पुरस्कार","जीवन गौरव पुरस्कार","महाराष्ट्र लोकगौरव पुरस्कार","आदर्श शाहिर पुरस्कार",भजन सम्राट गणपतराव बुवा जीवन गौरव पुरस्कार अशा अजून अनेक विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या वयाच्या १४ व्या वर्षापासून लोककलेला नवी पालवी देत वयाच्या साठी पर्यंत लोककलेला वृक्ष करताना आणि जोपासताना खडतर प्रसंगांना परिश्रमाने,जिद्दीने सामना करत लोकशाहिर तुकाराम मानकर यांनी मोलाची कामगिरी केली आहे.

काळाचा महिमा काळच जाणे...!!

कठिण तुमचे हे अचानक जाणे...!!

आजही घुमतो पहाडी आवाज तुमचा कानी...!!

वाहतांना श्रद्धांजली नयनी येते पाणी...!!

    अशा उत्तुंग कलावंताचे नुकतेच रविवार दि.२७ जून २०२१ रोजी त्यांच्या मुंबईतील मालाड ( पूर्व ) येथील राहत्या घरी सकाळी ०९ :०० वाजण्याच्या सुमारास निधन झाले.गेले काही महिने मानकर बुवा आजारी होते.त्यांच्या निधनाच्या बातमीने कोकणची सारीच कलावंत मंडळी सुन्न झाली.त्यांच्यावर बाणडोंगरी,तानाजी नगर,कुरार व्हिलेज मालाड ( पूर्व ) येथे अंतिम संस्कार करण्यात आले.त्यांच्या पाठोपाठ सोमवार दि.२८ जून २०२१ रोजी त्यांच्या पत्नी गुलाबबाई मानकर यांना देखील हृदय विकाराचा तीव्र झटका आला त्यात त्यांची देखील प्राणज्योत मावळली.दुःखाचा मोठा डोंगरच मानकर कुटुंबीय वरती कोसळला आहे. मानकर बुवांच्या अंतिम दर्शनाला त्यांची सर्व शिष्यगण मंडळी,कोकणातील शाहिर वर्ग,मित्र-परिवार मोठया संख्येने उपस्थित होता.त्यांना कोकणातील अनेक नमन मंडळे, कलगी-तुरा उन्नती मंडळ,( मुंबई ), सर्व शक्तीवाले-तुरेवाले शाहिर,श्री पाणबुडी देवी कलामंच,तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


-शब्दांकन : कु दिपक धोंडू कारकर

मु.पो.मुर्तवडे कातळवाडी ता.चिपळूण,जि.रत्नागिरी

मोबा.९९३०५८५१५३

शिवसेनेचे आमदार वायकर यांनी घेतला प्रभाग क्रमांक ७८ मधील महत्वांच्या नागरी कामांचा आढावा


मुंबई  - जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी प्रभाग क्रमांक. ७८ मधील महत्वांच्या नागरी कामांबाबत घेतला आढावा.यात प्रभागातील अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठ्याची समस्या, अनधिकृत पार्कींग, वाहतुकीची होणारी कोंडी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला नगरसेवक बाळा नर, विधानसभा संघटक विश्‍वनाथ सावंत, उपविभागप्रमुख कैलाशनाथ पाठक, शाखाप्रमुख / नितेश म्हात्रे, मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता / विनय मोरे, सहाय्यक अभियंता रस्ते / संदीप कोल्हे, सहाय्यक अभियंता (जलकामे) / शांताराम राणे, जोगेश्‍वरी वाहतुक विभागाच्या वरिष्ठ अधिकारी लता शिरसाठ, मेघवाडी पोलिस ठाण्याचे रविंद्र कुडपकर, प्रकल्प अधिकारी सचिन थोरात, साईप्रसाद गायकवाड, महेश पडवळ, नब्बनचाचा, निसार नाखवा, निजाम आदी अधिकारी उपस्थित होते. 

नागाव म्हातवली बेरोजगार संघटनेचे उपोषण : लेखी आश्वासानाशिवाय मागे न हटण्याचा संघटनेचा निर्धार ; सर्वच राजकीय पक्षांचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा

उरण : उरण तालुक्यातील नागाव म्हातवली ग्रामपंचायत हद्दीत ONGC हा राष्ट्रीय प्रकल्प कार्यरत आहे.उरण नागाव ONGC प्रकल्पामध्ये गेले काही वर्ष सातत्याने विविध कंत्राटाद्वारे नोकर भरती होत असताना नागाव म्हातवली येथील प्रकल्पग्रस्त, बेरोजगारांना जाणून बुजून डावलले जात आहे. सुमारे 500 एकर जमीन संपादित होऊन अनेक वर्षे झाले. प्रकल्प सुरु होऊन अनेक वर्षे होऊन आजही गावातील सुशिक्षित बेरोजगार ONGC तील नोकरी पासून वंचित आहेत. बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व बेरोजगारांच्या या महत्वाच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागाव म्हातवली बेरोजगार संघटनेतर्फे आज दि 28/6/2021 रोजी उरण तालुक्यातील ONGC कंपनी गेट समोर उपोषण सुरु झाले आहे.

   स्थानिक भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी लढत असलेल्या नागाव म्हातवली बेरोजगार संघटनेचे  बेमुदत आंदोलनचा आज पहिला दिवस आहे.पहिल्याच दिवशी विविध राजकीय पक्षांचा , सामाजिक संघटनेचा बेरोजगार युवकांचा उत्स्फूर्त पाठिंबा पाहायला मिळाला. द्रोणागिरी भवन, ए पी यु गेट, ओ एन जी सी गेट जवळ सुरु असलेल्या या बेमुदत आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस -प्रशांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस -भावनाताई घाणेकर,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदेश ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष गणेश नलावडे, शेतकरी कामगार पक्षाचे  तालुका चिटणीस -मेघनाथ तांडेल, शेकापचे जेष्ठ नेते काका पाटील,काँग्रेस पक्षाचे उरण तालुका उपाध्यक्ष -दत्तात्रेय म्हात्रे,शिवसेना पश्चिम विभाग प्रमुख तथा जेष्ठ शिवसैनिक एस के पुरो, रायगड जिल्हा मनसे संघटक -रामदास पाटील, उपरायगड जिल्हा मनसे संघटक -रितेश पाटील,उरण तालुका मनसे संघटक -सतीश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य -वैजनाथ ठाकूर,विद्यमान सरपंच -चेतन गायकवाड,माजी सरपंच अनंत घरत,माजी सरपंच -मोहन काठे,ग्रामपंचायत सदस्य -रंजना पाटील,ग्रामपंचायत सदस्य -जितेंद्र नाईक, जेष्ठ पत्रकार तथा ग्रामस्थ प्रवीण पुरो,आदी विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग घेत आपला जाहीर पाठींबा दिला.

   नागाव म्हातवलीतील सर्व बेरोजगारांना ONGC कंपनीत (प्रकल्पात )काम मिळावे, ONGC कंपनीत, प्रकल्पात नागाव म्हातवलीतील बेरोजगारांना कॉन्ट्रॅक्ट मिळावे अशी आमची प्रमुख मागणी असून जोपर्यंत याबाबतीत आम्हाला ONGC कंपनी प्रशासनाकडून लेखी पत्रक मिळत नाही. तोपर्यंत आमचा हा लढा आम्ही असाच पुढे सुरु ठेऊ.नोकरीं दिल्या नाही तर थेट गेट मध्ये घुसू. आमच्यावर गोळ्या झाडल्या तरी आम्ही मागे हटणार नाही.उद्या जर कोणाचे बरे वाईट झाले तर त्या परिणामास सर्वस्वी ONGC प्रशासनच जबाबदार राहील असा आक्रमक इशारा नागाव म्हातवली बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष वैभव कडू यांनी ONGC प्रशासनाला दिला आहे.

वाढदिवसानिमित्त मनसे पक्ष वाढविण्याचा राहुल पाटील यांचा संकल्प.


उरण : पनवेल, बेलापूर जवळ असलेल्या उलवे शहरात व परिसरात मनसेचे विविध उपक्रम राबविणारे, गोरगरिबांच्या अडीअडचणीत मदत करणारे ऍक्टिव्ह पदाधिकारी राहुल पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या राहत्या घरी कोरोनाविषयक सोशल, फिजिकलं डिस्टन्स पाळून अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित्त प्रत्येक व्यक्ती काहीना काही संकल्प करते मात्र राहुल पाटील यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त मनसे पक्ष तळागाळात पोहोचविण्याचा,वाढविण्याचा व गोर गरिबांना न्याय देण्याचा संकल्प केला आहे.

मनसे ऊलवे शहर अध्यक्ष राहुल बाबूराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे पदाधिकाऱ्यांनी राहुल पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत,ऊलवे शहर सचिव मनोज कोळी, गव्हाण विभाग उपाध्यक्ष प्रितम तांडेल,  ऊलवे शाखाध्यक्ष विशाल भोईर,गणेशपूरी शाखाध्यक्ष चेतन कोळी,उपशाखाध्यक्ष सुनिल कोळी,अनिकेत ठाकूर,मनसैनिक -विशाल पाटील, आगरी कोळी सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष विनोद कोळी, सभासद विनायक कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

उरण पनवेल रस्त्यावरील साकवसाठी मनसेचे निवेदन

उरण : उरण पनवेल रस्त्यावरील सा क्र. 4/00 वरील पूल कमकुवत झाल्यामुळे येणाऱ्या, जाणाऱ्या नागरिकांना यामुळे धोका असून तेथे तातडीने दुरुस्ती करण्यात यावी किंवा नवीन साकव करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी उपविभागीय अभियंता -सार्वजनिक बांधकाम उपविभाग उरण यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून एका निवेदना द्वारे केली आहे.

  उरण पनवेल रस्त्यावरील सा क्र. 4/00 वरील पूल कमकुवत झाल्यामुळे पनवेल कडे जाण्याकरिता भेंडखळ BPCL मार्गाचा वापर करा असे सूचना फलक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात आले. मात्र ज्या ठिकाणी साकव कमकुवत झाला आहे तिथे कोणत्याही प्रकारची सूचना अथवा फलक लावलेला नाही. ह्या अगोदर फुंडे येथील सिडको अंतर्गत असणारा पूल कोसळला होता त्यात दुर्दैवाने एका तरुणाचा मृत्यू झाला.पण उरण पनवेल रस्त्यावर मात्र मोठया प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु आहे. त्यामुळे जर तो साकव पडून अपघात घडला आणि त्याच्यात कोणाची जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल मनसेचे तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी दिलेल्या निवेदनद्वारे उपस्थित केला आहे.

    सदर उरण पनवेल रस्त्यावर तातडीने नवीन साकव बांधण्यात यावा किंवा त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सत्यवान भगत यांनी केली आहे. जर त्या ठिकाणी साकव पडून काही जीवितहानी झाली तर सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा सत्यवान भगत यांनी प्रशासनाला दिला आहे

महाड येथील ग्रामीण रुग्णालयातील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनच्या प्रस्तावास शासनाची "विशेष बाब" म्हणून मान्यता

अलिबाग - जिल्ह्यातील महाड येथील सध्या ३० बेड्स रुग्ण क्षमता असलेल्या ग्रामीण रुग्णालयातील प्रस्तावित १०० खाटांची  रुग्ण क्षमता असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याबाबतच्या प्रस्तावास "विशेष बाब" म्हणून शासनाने मान्यता दिली आहे.

    याबाबतचा दि.28 जून 2021 रोजीचा शासन निर्णयच जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात वैद्यकीय व आरोग्य विषयक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी सकारात्मकरित्या केलेल्या पाठपुराव्याला मिळालेले हे मोठे यश आहे.

     कोकण रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग या वाहतुकीच्या सुविधा तसेच जिल्ह्यातील वाढते औद्योगिकरण यामुळे महाड येथील ग्रामीण रुग्णालयास संलग्नतेने कार्यरत असलेले ट्रॉमा केअर युनिटसह ग्रामीण रुग्णालयाचे १०० रुग्ण क्षमता असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होणे गरजेचे असल्याची बाब राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांच्यासमोर मांडली होती. तसेच, महाडचे आमदार भरत गोगावले यांनी देखील पालकमंत्री कु.तटकरे यांच्याकडे या संदर्भात मागणी केली होती.    

     त्यानुषंगाने महाड ग्रामीण रुग्णालयाच्या १०० खाटांची रुग्णसंख्या असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे "विशेष बाब" म्हणून मंजूरी मिळाली आहे. यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री ना.श्री. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांचे विशेष आभार मानले आहेत.

    महाड येथे १०० खाटांची रुग्णक्षमता असलेले उपजिल्हा रुग्णालय सुरु झाल्याने येथील सामान्य जनतेची मोठी सोय होणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती, रस्ते व रेल्वे अपघात इत्यादींमुळे बाधित व अपघातग्रस्त रुग्णांवर तातडीने उपचार करणे सुकर होणार आहे. करोना संकटामुळे आरोग्य यंत्रणेवर विशेष भर देताना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा सामान्य रुग्णालय येथे अत्याधुनिक आरोग्यसुविधा, रुग्णालयांची क्षमता वाढविण्यासाठी व बळकटीकरणासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे सदोदित प्रयत्नशील आहेत.

राष्ट्रीय स्तरावरील "स्वच्छता फिल्मों का अमृत महोत्सव" लघु चित्रपट स्पर्धेत इच्छुकांनी सहभाग घ्यावा

अलिबाग: केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 च्या प्रचार व प्रसिद्धीसाठी राष्ट्रीय स्तरावरील लघु चित्रपट स्पर्धा "स्वच्छता फिल्मों का अमृत महोत्सव" आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दि.15 ऑगस्ट 2021 पर्यत सुरु असणार आहे.

    लघु चित्रपट स्पर्धा ही दहा वर्षावरील सर्वासाठी आहे तसेच ग्रामीण भागातील शाळा, संस्था, स्वयंसेवी संस्था, सामुदायिक स्तरावरील संस्था, फिल्म मेकर यांच्यासाठी खुली आहे.

     लघु चित्रपट नोंदणी ही दोन गटात होणार आहे.

अ) गट-1 मध्ये (thimetik category ) odf plus चे सहा पायाभूत घटक म्हणजे जैविक व्यवस्थापन, गोबर धन प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, मैलामिश्रीत पाणी व्यवस्थापन,  मैला गाळ व्यवस्थापन, वर्तणूक बदल या घटकांसंबंधी संदेश देणे अपेक्षित असून ब) गट- 2 (भौगोलिक श्रेणी) या गटातील फिल्ममध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी डोंगरी क्षेत्र, वाळवंटी क्षेत्र, समुद्रकिनारी प्रदेश, मैदानी आणि पूरग्रस्त क्षेत्रामध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यासंबंधीचे संदेश देणे अपेक्षित आहे.

     लघु चित्रपटाचा कालावधी हा एक ते पाच मिनिटे असा असणार आहे. स्पर्धेत सर्व प्रमाणित भारतीय भाषेमधील लघु चित्रपटांचा समावेश असेल. पारितोषिक प्राप्त लघु चित्रपटाची निवड पेयजल व स्वच्छता मंत्रालयाची ज्युरी कमिटी करणार असून दोन्ही गटातील विजेत्यांना या वर्षअखेरीस रोख रक्कम व प्रमाणपत्र देवून स्वच्छ भारत मिशन समारंभात गौरविण्यात येईल. वेगवेगळ्या गटांसाठी अंदाजे रक्कम रुपये 35 लक्ष ची बक्षिसे वितरण होणार आहे.

      या स्पर्धेबाबतच्या मार्गदर्शक सूचना व इतर सविस्तर माहिती   https://innovateindia.mygov.in/sbmg-innovation-challenge/  या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

      तरी इच्छुकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) डॉ.ज्ञानदा फणसे यांनी केले आहे.

सुधागड-पाली ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी रु.20 कोटी 27 लक्ष चा निधी मंजूर ; पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आरोग्य मंत्री श्री.राजेश टोपे यांच्याकडे केलेली मागणी फलद्रूप

 सुधागड - सुधागड तालुक्यातील पाली येथे 30 खाटांची रुग्ण क्षमता असलेल्या ग्रामीण रूग्णालयाची मुख्य इमारत व निवासी गाळे बांधण्याकरीता रू. 20 कोटी 27 लक्ष 33 हजार 315  इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 

      पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी शासनाने सन 2008 मध्ये मान्यता दिली होती त्या अनुषंगाने या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत उभी राहून येथे येणाऱ्या रुग्णांना आरोग्यविषयक अद्ययावत सुविधा मिळाव्यात, याकरिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या संदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री ना. श्री.राजेश टोपे यांच्याकडे झालेल्या बैठकीत मागणी केली होती. त्यानुषंगाने आज (दि.28 जून) रोजी  शासनाने शासन निर्णयाद्वारे रू.20 कोटी 27 लक्ष 33 हजार 315  इतक्या रक्कमेच्या बांधकाम अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

    पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला बळकट करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आवश्यक आरोग्य सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी त्या कसोशीने प्रयत्न करीत आहेत, शासनास सादर केलेल्या प्रस्तावांचा सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

     या पार्श्वभूमीवर त्यांनी आरोग्य सोयीसुविधांविषयक गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी धडाडीने निर्णय प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयांच्या बांधकामासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देणे, यासाठी पालकमंत्री कु. आदिती तटकरे या विविध शासकीय जमिनींच्या स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करीत आहेत व त्याप्रमाणे जनतेला सोयीस्कर ठरेल, अशा ठिकाणाची शासकीय जागा प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयासाठी देण्याचे निर्णय घेत आहेत.

    वाकण-पाली-खोपोली हा  राष्ट्रीय महामार्ग तयार होत आहे, आदिवासी वाड्या-वस्त्या, औद्योगिक पट्टा, जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण, आजूबाजूची ग्रामीण वस्ती, अष्टविनायक देवस्थानापैकी हे एक देवस्थान, अशा सर्व तऱ्हेने सुधागड-पाली या तालुक्याला वेगळे महत्व प्राप्त आहे. सध्या या परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनाही अद्ययावत आरोग्य सोयीसुविधांची नितांत गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या या भागातील नागरिकांना हे मंजूरी मिळालेले ग्रामीण रुग्णालय निश्चितच उपयुक्त ठरेल, यात शंकाच नाही. तसेच सुधागड  तालुक्याच्या विकासासाठी हे ग्रामीण रुग्णालय वरदान ठरेल. यामुळे येथील मानव निर्देशांकातही सुधारणा होऊ शकेल. याशिवाय पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून सुधागड-पाली तालुक्यातील नाडसूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तर रासळ, राबगाव, दहिगाव आणि पेडली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठी शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

     भविष्यात या व आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरणास व नागरीकरणास वाव आहे. त्यामुळे भविष्यातील या परिसराचा विकास लक्षात घेता येथे आरोग्य सोयीसुविधा उत्तम असणे, ही काळाची गरज आहे,अशी अभ्यासपूर्ण दूरदृष्टी ठेवून रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणाचा ध्यास घेतलेल्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून पुढील निर्णय प्रक्रिया तातडीने राबविली. या ग्रामीण रूग्णालयाच्या बांधकामामुळे लवकरच सुधागड-पाली भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.

शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबध्द -पालकमंत्री अदिती तटकरे

पेण:  पेण शासकीय तंत्रनिकेतन संस्थेस भेट देण्याची अनेक वर्षांपासून इच्छा होती. इमारत, विद्यार्थी, संस्था चालक यांची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी, दुरुस्तीचे प्रस्ताव याबाबत सविस्तर चर्चा होऊन एक स्वतंत्र बैठक संबधीत विभागाकडे घेण्यात येईल. जिल्ह्यातील शासकीय शैक्षणिक संस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पालकमंत्री या नात्याने मी कटिबध्द आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज पेण येथे केले.

    पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी पेण येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेस आज भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, नायब तहसिलदार सुनिल जाधव, प्रा.डॉ.भामरे, दयानंद भगत, उदय जवके, संतोष शृंगारपुरे, नगरसेविका वसुधा पाटील, बंड्याशेठ पाटील, जि.प. सदस्य हरिओम म्हात्रे, नगरसेवक निवृत्त पाटील, प्रतिभा जाधव, पांडुरंग जाधव, जितू ठाकूर, वडखळ चे सरपंच राजेश मोकल, दुष्मी च्या सरपंच रश्मी भगत आदि उपस्थित होते.

     पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, या संस्थेत 800 पेक्षा जास्त विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेऊन बाहेर पडतात, ही चांगली गोष्ट आहे. विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांच्या समस्या जाणून त्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री म्हणून आवश्यक ते सर्व प्रयत्न निश्चित केले जातील.

      शासकीय तंत्रनिकेतन पेण चे प्राचार्य डॉ.भामरे यांनी संस्थेच्या अडीअडचणींबाबत पत्रव्यवहार केला होता. त्या पार्श्वभूमीवर येथील अडीअडचणी जाणून घेण्यासाठी पालकमंत्री कु.तटकरे यांनी आज शासकीय तंत्रनिकेतन संस्थेस भेट दिली.

कोविड-19 मृत्यू पावलेल्या वारसांना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळामार्फत व्यवसाय कर्ज

अलिबाग:  राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली (National Scheduled Castes and Development Corporation)  यांच्यामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी Support for Marginalized Individuals for Livelihoods and Enterprise (SMILE) ही नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे.

 कोविड-19 या महामारीमुळे ज्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती (Breadearner) मृत्यू पावली आहे, अशा कुटुंबातील प्रमुख वारसदारास राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली (एन.एस.एफ.डी.सी.), यांच्या मार्फत रु. 5 लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना प्रस्तावित आहे.त्याचा सविस्तर तपशील यामध्ये खालीलप्रमाणे आहे.

    एन.एस.एफ.डी.सी. कर्ज रक्कम रु. 4.00 लाख, व्याज दर 6 टक्के, भांडवली अनुदान रक्कम  रु. 1.00 लाख.

मयत व्यक्तीची आवश्यक माहिती :-

      मयत व्यक्तीचे नाव, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, जात/पोटजात, मृत्यूचा दिनांक, रेशनकार्ड, मयत झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला. कुटुंबातील व्यक्तींची एकूण संख्या, कुटुंबातील प्रमुख वारसदार, कुटुंबातील व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न   रु. 3.00 लाखाच्या आत).

      कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने या योजनेच्या माहितीकरिता महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास भेट द्यावी तसेच दि.30 जून 2021 पर्यंत  http://forms.gle/7mG8CMecLknWGt6K7  या लिंकवर माहिती भरावी, असे जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले विकास महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. रायगड यांनी कळविले आहे.                   


आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाटसअप ग्रुपतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश सुपुर्द

मुंबई(शांत्ताराम गुडेकर) -आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाटसअप ग्रुपतर्फे शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न फक्त (रू.५५,५५५/- ) रूपयाचा धनादेश  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी शिवसेना सचिव खासदार श्री.विनायक राऊतसाहेब , शिवसेना सचिव श्री.अनिल देसाईसाहेब उपस्थित होते. तसेच ग्रूपचे संस्थापक,संचालक श्री.संतोष पाटील,संचालक श्री.सुर्यकांत कडू,अध्यक्ष श्री.रविंद्र जाधव,उपाध्यक्ष श्री.अवि राऊत व श्री.यशवंत खोपकर,सेक्रेटरी श्री.दिलीप गावडे,उपसेक्रेटरी श्री.वसंत सोनावणे व श्री.अनिल कांबळे,खजिनदार श्री.गणेश काळे,उपखजिनदार श्री.दत्तात्रेय घुले व श्री.बाळासाहेब निकम,कार्यालय प्रमुख श्री.रणजीत नरवणकर,उपकार्यालय प्रमुख श्री.प्रविण कोरपे व श्री.दिपक चौधरी, सल्लागार सौ.समीता बागकर,सौ.वासंती गोताड,श्री.अशोक कोळंबकर इत्यादी सदस्य उपस्थित होते.

आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाटसअप ग्रुप मार्फत मु.पो.वशेणी ता.उरण जि.रायगड या गावातील गरजु लोकांना धान्य वाटप


मुंबई(शांत्ताराम गुडेकर)-शिवसेना ५५ वा वर्धापनदिनाचे औचित्य साधून आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाटसअप ग्रुप मार्फत मु.पो.वशेणी ता.उरण जि.रायगड या गावातील गरजु लोकांना धान्य वाटप करण्यात आले तसेच आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या ग्रुपचे सभासद श्री.लवेश म्हात्रे यांना ग्रुपच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांना या व्हाटसअप ग्रुपतर्फे एकत्र आणण्याचे काम केले ते या ग्रूपचे संस्थापक, संचालक श्री.संतोष पाटील यांचा देखील ग्रूप सदस्यांकडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ग्रूपमधील सुर्यकांत कडू,रविंद्र जाधव,दिलीप गावडे,यशवंत खोपकर,वसंत सोनावणे,अनील कांबळे,गणेश काळे,दत्तात्रेय घुले,प्रविण कोरपे,अशोक कोळंबकर,हेमंत पाटील,दिलीप पाटील,प्रविण कुडेकर,जितेंद्र जैन,आप्पा कुलकर्णी यांच्यासह सदस्य व सभासद  तसेच शिव सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

मनसे उपविभाग अध्यक्ष पदी संदेश मोरे यांची निवड


मुंबई(शांत्ताराम गुडेकर)- महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगर पालिकेची पूर्व तयारी सुरू केली असून अनेक प्रभागात सक्रिय कार्यकर्त्यांना पदावर बढती देऊन पक्ष बळकट करण्याची संधी दिली आहे. घाटकोपर विधानसभा क्षेत्रात ही नव्या नियुक्त्या करण्यात आल्या असून विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष संदेश पांडुरंग मोरे यांची प्रभाग क्रमांक १२६ आणि १२७ या प्रभागाकरिता उपविभाग अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक १२६ व १२७ च्या उपविभाग अध्यक्ष पदी संदेश पांडुरंग मोरे यांची नियुक्ती करून राज ठाकरे यांनी नुकतेच कृष्णकुंज येथे संदेश मोरे यांना नियुक्ती पत्र देऊन मिळालेल्या संधीचे सोने करून पक्ष वाढवाल अशी आशा व्यक्त केली. निष्ठावंत कार्यकर्त्याची उपविभाग अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल संदेश पांडुरंग मोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.

संतोष अगबुल प्रतिष्ठानच्या वतीने नालासोपारा आणि विरार येथे महिलांच्या मोफक्त हिमोग्लोबिन तपासणी शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद


नालासोपारा-विरार - (दिपक मांडवकर/शांत्ताराम गुडेकर )- नालासोपारा- विरार येथे संतोष अगबुल प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दिव्य आणि महिलांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर या कार्यक्रमात ३१५ महिलांनी सहभाग घेतला.  तर गेल्या दोन वर्षान पासून संतोष अगबुल प्रतिष्ठाण कोरोना काळात  अहोरात्र प्रत्येक नागरिकांना विविध सेवा पुरवत आहेत. प्रतिष्ठाणच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असताना कोरोना रुग्णांना प्लाझ्मा सुवीधा सुद्धा पुरणव्यात येत आहे. आजच्या महिलांच्या हिमोग्लोबिन तपासणी साठी विविध ठिकाणा वरून महिलांनी सहभाग घेतला तर मुलुंड येथील महिलांचा देखील मोठा प्रतिसाद लाभला.  प्रतिष्ठाणचे संस्थापक श्री. संतोषजी अगबुल यांच्या विचाराने प्रेरित होऊन आज प्रत्येक सभासद अगदी उत्सुकतेने आपले काम आणि जबाबदारी पार पाडत असताना सर्वाना पाहायला मिळाले. तर सर्व उपस्थित मान्यवर आणि हिमोग्लोबिन शिबिरात सहभागी झालेल्या भगिनींचे आणि या आयोजित शिबीर सहकार्यास सहभाग देणारे साथीया ब्लड बँकचे सर्व डॉ. आणि सहकाऱ्यांचे प्रतिष्ठाणचे संस्थापक श्री. संतोषजी अगबुल यांनी आभार मानले.

मुजोर संस्थाचालकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान ; फी साठी सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई व्हावी -- दिव्या ढोले

मुंबई(शांत्ताराम गुडेकर )    राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या समोर काही मुजोर शिक्षणसंस्था आणि संस्थाचालकांमुळे एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोरोनामुळे खालावलेली आर्थिक किंवा इतर कारणांमुळे ज्या पाल्यांचे शालेय शुल्क बाकी आहे अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी मागील वर्षाची फी भरलेशिवाय आवश्यक असणारी कागदपत्रे देण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे अनेक तक्रारी  राज्यात उघडकीस आल्या आहेत. मागील दीड वर्षापासून राज्यात थैमान घातलेल्या कोरोनामुळे राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या होत्या. मात्र काही दिवसांपूर्वी शिथील करण्यात आलेल्या नियमांमुळे सगळी परिस्थिती पुन्हा एकदा सुरळीत होऊ लागली आहे अशी चिन्ह दिसत आहेत.काही संस्थांमध्ये शालेय शुल्क जमा न केल्याने विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश न देणे किंवा आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यात टाळाटाळ करणे असे काही प्रकार उघडकीस आल्यानंतर अशा खाजगी संस्थांवर सरकारने कारवाई  करावी अशी मागणी पालक वर्ग करताना दिसत आहेत.त्यामुळे याबत भाजपच्या महाराष्ट्र सचिव दिव्या ढोले यांनी आवाज उठवल्याने सरकारमधील मंत्री आणि प्रशासन जागे झाले. इयत्ता ९ वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांना जर वरील अडचणींचा सामना करावा लागत असेल तर त्यांना राज्यातील शासकीय/महापालिका-नगरपालिका अंतर्गत शाळा किंवा अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्यात यावा असे आदेश राज्य सरकारतर्फे देण्यात आले. मात्र देर आये दुरुस्त आये या म्हणीप्रमाणे राज्य सरकारने ऊशीरा घेतलेल्या या निर्णयावर समाधान व्यक्त करतानाच राज्यातील पालकांनी यावर काही आक्षेपही नोंदवले आहेत.

"मागील वर्षीपासुन सुरु असलेल्या लॉक डाऊनमुळे आम्हाला आधीच अनेक आर्थिक संकटांंना तोंड द्यावे लागते आहे. त्यातच खासगी शाळांनी विद्यार्थ्यांकडे बाकी राहिलेले शालेय शुल्क जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांची अशा प्रकारे अडवणूक करणे चूक आहे असे संतप्त सवाल पालकांनी म्हटले आहे.विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलताना भाजपच्या प्रदेश सचिव दिव्या ढोले म्हणाल्या की, " खासगी शाळांनी प्रलंबित राहिलेल्या शालेय शुल्काबाबत संयम आणि समजुतीची भुमिका घ्यावी असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले होते, मात्र काही मुजोर खासगी शाळा पुर्णपणे दुर्लक्ष करत आपला असंवेदनशीलपणा दाखवून देत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेसोबतच आता डेल्टा प्लस या नव्या व्हायरसचा धोका दिवसागणिक बळावतो  आहे, त्यामुळे शाळा सुरु न करता ऑनलाईन शिक्षणाचा अवलंब करावा लागणार आहे. मात्र जरा काही शाळा अशाप्रकारे विद्यार्थ्यांना अडचणीत आणू पाहत असतील तर ते नक्कीच खपवून घेतले जाणार नाही. सरकारने ९ वी, १० वी च्या विद्यार्थ्यांच्या निर्णय घेतला आहे, मात्र त्या निर्णयातुन पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना यातून का डावलले आहे ? " असा सवालही त्यांनी सरकारला विचारला आहे.

          "खासगी शाळा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना घरातच बसवणार असतील तर राज्य सरकारने अंतर शिक्षण उपक्रमाअंतर्गत राज्य शिक्षण मंडळाच्या मदतीने ऑनलाईन शिक्षनाचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा. वंचित आणि गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ द्यायचे नसेल तर अशा मुजोर शाळा आणि संस्था चालकांची दादागिरी मोडून काढली पाहिजे" असे दिव्या ढोले यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

रविवार, २७ जून, २०२१

छाया हॉस्पिटल आणि कमलधाम वृद्धआश्रम ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट

अंबरनाथ ( अविनाश म्हात्रे)- माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नातून अत्याती  टेकनॉलॉजि व  बागरी  फाऊंडेशन यांच्या सहकार्यातून अंबरनाथ मधील  सुभाष नारायण साळुंके शासकीय छाया हॉस्पिटलला  दोन व कमलधाम वृद्धआश्रम यांना  एक अशी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर  मशीन   सेवारुपी भेट मिळाली कोरोना काळात रूग्णांना व नागरीकांना मदत व्हावी, याकरिता विविध प्रकारची मदत, सहकार्य,अपक्रम राबवित आहोत. माझ्या ८ मे वाढदिवसानिमित्त विभागातील नागरिकांसाठी अडचणीच्या वेळी ऑक्सिजन सुरळीत मिळावा, याकरिता ३- ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन नागरीकांच्या सेवेत मोफत उपलब्ध करून दिले आहेत, गरुजू रुग्ण लाभ घेत आहेत हिच भावना लक्षात घेऊन अत्याती  टेकनॉलॉजि व  बागरी  फौंडेशन  यांच्या सहकार्याने अंबरनाथ मधील जुने व महत्वाचे बी.जी.छाया हॉस्पिटल अडचणीच्या वेळी रुग्णांस तातडीने ऑक्सिजन मिळावा, याकरीता २-  ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर  मशीन   आज उपलब्ध करून देण्यात आल्या, 

  याप्रसंगी रुग्णालय अधिक्षक डॉ. शशिकांत दोडे, अत्याती  टेकनॉलॉजि  कं.चे महाराष्ट्र हेड  निजामुद्दीन पिरजादे, नगरसेवक श्री.रविंद्र पाटील,संवाद फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके, जॉगर्स क्लब चे पदाधिकारी श्री.राजकुमार जमखंडीकर, गिरीष चौधरी, मंगेश पाडगांवकर, निलेश झांजे,व्यापारी संघाचे श्री. रूपसिंग धल, डॉ. शुभांगी वाडकर, नर्स व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी वैदकीय पथक  व   पॅरामेडिकल  स्टाफ यांनी विशेष आभार व्यक्त केले.

पुनाडे धरण परिसरात साफसफाई

उरण -उरण तालुक्यातील पूर्व विभागातील प्रसिद्ध पुनाडे धरण येथे सध्या कचरा, दारूच्या बाटल्या,काच तुकडे यांचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात कचरा झाल्याने हा परिसर विद्रुप दिसत होता . हा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोली यांच्या माध्यमातून रविवार दि 27/6/2021 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत पुनाडे धरण परिसरात साफसफाई करण्यात आली. विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोलीच्या माध्यमातून करण्यात  आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत उरण मधील विविध सामाजिक संस्थाचे प्रतिनिधिनी या उपक्रमात सहभाग घेतला.यावेळी काच, प्लास्टिक बाटल्या, दारूच्या बाटल्या गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या स्वच्छतेविषयक जनजागृती कार्यक्रमात श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष -सुदेश पाटील, कार्याध्यक्ष -विठ्ठल ममताबादे, उपाध्यक्ष -हेमंत पवार, संपर्क प्रमुख -ओमकार म्हात्रे, सल्लागार -ऍड गुरुनाथ भगत, जिव्हाळा फॉउंडेशन अध्यक्ष रुपेश पाटील, पंकज ठाकूर, गोवठणे विकास मंचचे सुनील वर्तक,पुनाडे ग्रामपंचायतचे सरपंच हरेश्वर ठाकूर, हेमंत ठाकूर, गोल्डन ज्यूबली मित्र मंडळचे माजी अध्यक्ष दिनेश म्हात्रे, प्रेम म्हात्रे ,कुमार ठाकूर, हेमंत म्हात्रे, पंकज शर्मा तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोलीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

केंद्र सरकार विरोधात काँग्रेसची निदर्शने ; केंद्र सरकारने केले ओबीसी आरक्षण रद्द , काँग्रेसने केला निषेध

उरण - अत्यंत महत्वाचा असलेला ओबीसी आरक्षण कोर्टात टीकावे यासाठी योग्य तो पाठपुरावा केंद्र सरकारने केले नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टा द्वारे आरक्षण रद्द करण्यात आले. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे आता ओबीसी संवर्गांना मिळणारे आरक्षण रद्द झाल्याने महाराष्ट्रात ओबीसी संवर्गात तीव्र संताप पसरला आहे. आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकार ओबीसीची बाजू मांडण्यात अपयशी ठरले आहे .त्यामुळे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या आदेशानुसार आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उरण शहरातील काँग्रेस कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

उरण शहरात काँग्रेस कार्यालय समोर केंद्राने ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने निषेध करत जोरदार निदर्शने केली यावेळी जे डी जोशी -उरण तालुकाध्यक्ष, मिलिंद पाडगावकर -जिल्हा उपाध्यक्ष, गणेश म्हात्रे -उपाध्यक्ष, किरीट पाटील -शहराध्यक्ष, रेखाताई घरत -महिला तालुकाध्यक्ष, अफशा मुकरी -शहर अध्यक्ष महिला, उमेश भोईर -ओबीसी प्रदेश सरचिटणीस, कमळाकर घरत -सेवादल अध्यक्ष,लंकेश ठाकूर -युवक उपाध्यक्ष उरण विधानसभा मतदार संघ, सदानंद पाटील-केगांव अध्यक्ष , सुनील काठे, जयवंत पडते, रामकृष्ण म्हात्रे, भालचंद्र घरत, उमेश ठाकूर, प्रवीण पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी -कार्यकर्ते उपस्थित होते.ओबीसीची जणगणना करून केंद्राने ओबीसी संवर्गांना पूर्वीचे आरक्षण लागू करावे, केंद्र सरकारने ओबीसीचे आरक्षण टीकावे यासाठी न्यायालयात सक्षम बाजू मांडावी अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी -कार्यकर्त्यांनी केली.

एक प्रयत्न समाजाच्या सत्कार्यासाठी ; मुलुंडमधील प्रयत्न फाऊंडेशन मार्फत रिक्षाचालकांना मोफत धान्य वाटप




मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) संलग्न प्रयत्न फाऊंडेशन यांच्या वतीने शनिवार दि . २६ जुन रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रिक्षा चालकांना मोफत धान्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . हा कार्यक्रम मुलुंड (पश्चिम ) येथील  विश्व सहकार सोसायटी हॉलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वीपणे पार पडला. प्रयत्न फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अमित रणखांबे व युवा नेते रोहित पवार यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी परिसरातील  अनेक गरजू रिक्षा चालकांनी या मोफत धान्य वाटप कार्यक्रमाचा लाभ घेतला. याप्रसंगी व्यासपीठावर श्रीकांत भालेराव (आर.पी.आय महाराष्ट्र नेते),उत्तम गीते ( कॉंग्रेस नेते),दादासाहेब झेंडे (आर.पी.आय नेते),अजित भाऊ रणदिवे (आर.पी.आय नेते),योगेश शिलवंत ( आर.पी.आय मुलुंड तालुका अध्यक्ष),अंबर केदारे  (आर.पी.आय नेते),अमित पाटील   (राष्ट्रवादी मुलुंड अध्यक्ष),जगदीश शेट्टी   (शिवसेना नेते),विठ्ठल भाऊ सातपुते  (कॉंग्रेस वॉर्ड अध्यक्ष),मंगेश पवार (राष्ट्रवादी वॉर्ड अध्यक्ष),प्रकाश डोळस (आर.पी.आय वॉर्ड अध्यक्ष),प्रभाकर कांबळे।  (आर.पी.आय वॉर्ड अध्यक्ष),अनिल कदम (आर.पी.आय वॉर्ड अध्यक्ष)एन.जे.वावळे ,(आर.पी.आय),अनिल झेंडे (आर.पी.आय),अजिंक्य झेंडे ,(आर.पी.आय.युवा नेते),सुरेश कांबळे(आर.पी.आय मुलुंड),संतोष  खरात(आर.पी.आय मुलुंड)शिवा शिंदे   (आर.पी.आय मुलुंड),गौतम भद्रीके (आर.पी.आय मुलुंड),शिवाजी खडताळे (राष्ट्रवादी नेते),नितीन फुलपगार(आर.पी.आय मुलुंड) , बाळा भाई शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. फाऊंडेशनच्या  या स्तुत्य कार्यक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. 

      हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी इलेव्हन ब्रदर्स आणि फाऊंडेशन  च्या सभासदांचे सहकार्य लाभले. 

डॉ.डेनिस नाडार यांचा राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरव

ठाणे :  पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये अत्यंत प्रमाणिकपणे रुग्णांची सेवा अत्यल्प दरामध्ये केली,कोरोना लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना चाचणी करण्याचा सल्ला दिला व धीर दिला,कोरोना काळामध्ये एकही दिवस दवाखाना बंद न ठेवता अविरत सेवा बजावली, या कालावधीत काही विघ्नसंतोषी लोकांकडून डॉक्टर पॉझिटिव्ह असल्याच्या अफवा देखील उडवल्या गेल्या तेव्हा डॉ.नाडार यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून मी व माझे कुटुंब पॉझिटिव्ह नाही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका अशा आशयाचा व्हिडिओ देखील प्रसारित केला होता तरी देखील डॉक्टरना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, घरी येणाऱ्या लोकांची येजा थांबली, त्यांना अत्यावश्यक सेवा देखील त्या काळात मिळाली नाही त्यांची पत्नी सौ. सुषमा नाडार यांच्या खंबीर साथीने आणि नर्स प्रगती सावंत, मयुरी वाघाटे यांच्या सहकार्याने कुटुंबाचा व स्वतःच्या जीवाचा विचार न करता अहोरात्र सेवा बजावून असंख्य रुग्णांवर उपचार केले या त्यांच्या समाजसेवेची दखल घेऊन जनजागृती सेवा समिती मुंबई महाराष्ट्र राज्य व श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज सांगली महाराष्ट्र राज्य,एन.बी. एस. चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली आणि शिवभवानी,संतोषी महिला ग्रुप बांधकरवाडी, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड योद्धा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन डॉ. नाडार यांचा सपत्नीक भव्य सत्कार त्यांच्या सुखायु क्लिनिक येथे करण्यात आला करण्यात आला यावेळी राजू मानकर,सुरेखा भिसे, प्रा.हरिभाऊ भिसे, सुषमा नाडार,विजय चव्हाण,जगन्नाथ पावसकर,रेश्मा वडार, शालन पवार, ज्योती पावसकर ,विजया चव्हाण, उर्मिला वर्दम,माधुरी पवार, निकिता सावंत, अनिता देसाई, ममता पवार,रिया गवंडी,सुवर्णा कुलकर्णी, साक्षी खांदारे,शोभा शिंदे,अमिता पारकर,अदिती बुचडे,आशा बुचडे,संगीता बुचडे,सौ. रेडेकर,मयुरी वाघाटे उपस्थित होते हा पुरस्कार देण्यास श्री.गुरुनाथ तिरपणकर साहेब( जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र राज्य),श्री.पुरूषोत्तम तांदळे(अध्यक्ष संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज महाराष्ट्र राज्य)श्रुती उरणकर(समाजसेविका) यांचे विशेष सहकार्य लाभले

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन निमित्त रॅलीचे आयोजन ; अंमली पदार्थांबाबत पत्रक वाटून प्रबोधन

मुंबई :  शनिवार दि. २६ जून २०२१ रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन निमित्त अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा यांच्या वतीने पोलीस दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रॅलीचे  आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा पोलीस उप आयुक्त श्री दत्ताजी नलावडे, पोलीस सहा. आयुक्त श्री राजेंद्र चिखले तसेच आझाद मैदान, वरळी, वांद्रे, कांदिवली, घाटकोपर या सर्व युनिटचे पदाधिकारी यांचे सोबत मिरॅकल फाऊंडेशन मुंबई व्यसनमुक्ती केंद्राचे समन्वयक रमेश सांगळे उपस्थित होते.

   आयोजकांनी या रॅलीचे  नियोजन अतिशय अभ्यासपूर्ण केल्यामुळे ती यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. .विशेषतः ज्या विभागातून या रॅलीचे   मार्गक्रमण झाले. त्या विभागांमधून अंमली पदार्थांबाबत प्रबोधन होणे गरजेचे होते.  त्यासाठी यावेळी  मराठी, हिंदी, उर्दू  भाषेमधील पत्रकं वाटण्यात आली. त्यामुळे आजच्या दिनाचे महत्त्व व अंमली पदार्थांबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदतच झाली. या सर्व कार्यक्रमाचे श्रेय अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा मा. पोलीस उप आयुक्त श्री दत्ताजी नलावडे साहेब व त्यांचे सहकारी यांना द्यावे लागेल . तसेच आझाद मैदान, वरळी, वांद्रे, कांदिवली, घाटकोपर या सर्व युनिट च्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही रॅली ली यशस्वी होण्यास मदत झाली.

[[ " मिरॅकल  फाऊंडेशन -मुंबई व्यसनमुक्ती केंद्रास या  कार्यक्रमात सहभागी करून घेतले. याकरिता आयोजकांचे  मनःपूर्वक धन्यवाद व आभार !" ]]

-रमेश भिकाजी सांगळे.(समन्वयक-मिरॅकल  फाऊंडेशन मुंबई)

कोकण युवा क्रांती संघटना ; ध्यास समृद्ध कोकणाचा

 

आपण आता पर्यंत बघत आलो आहे,ज्यापद्धतीने कोकणचा विकास पाहिजे होता तसा नाही झालाय त्याला आपणसुद्धा कारणीभूत आहोत कारण आपण कोणत्या गोष्टींचा विरोध अथवा मागणी केलीच नाही पण यापुढे अस होणार नाही.या हेतूने कोकण युवा क्रांती संघटनेने समृद्ध कोकणाचा ध्यास मनी धरला आहे.आता कोकणात समाजिक आणि औद्यागिक क्रांती घडवण्याचा निश्चय करून लवकरच मैदानात उतरत आहे पण ते शक्य कधी होणार जेव्हा आपण सर्व युवा पिढी एकवटेल तेव्हा पक्ष कोणतेही असोत एक कोकणी म्हणून संघटीत व्हा असे आवाहन कोकण युवा क्रांती संघटना करत आहे. 

तुम्ही अनुभवलात की नाही हे मला माहित नाही पण वास्तविक उदाहरण आहे, एक परप्रांतीय काहीही जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना आपल्याच प्रांतीयाकडूनच करतो त्यामागच सर्वात मोठ कारण म्हणजे आपल्या माणसाला ४ पैशाचा फायदा होतो आणि असेच सर्व परप्रांतीय पैसा कमवतात वेळ आली तर एकमेकाना मदत करतात.आपण पण तेच करायचे आपल्याच माणसाकडून खरेदी करा म्हणजे आपण आपल्या कोकणातील पैसा कोकणातच ठेवू जेणेकरून कोकणाच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडेल.तसेच मोठा प्रश्न जमिनीचा आहे रोजच्या शेकडो जाहिराती बघतोय आम्ही जमिनी विकायच्या आहेत आणि जमीनी विकून करणार काय तर मुंबईत स्वतःच घर घ्यायचं आहे.मित्रांनो आम्ही ज्या चूका केल्यात त्या तुम्ही नका करू आम्हाला मार्गदर्शन करणार कोणी नव्हत पण आम्हाला आमच्या चुका कळल्या आहेत आम्ही गावाकडे परत आहोत बांधवानो गाव नका सोडू गावातच आपण नवे प्रकल्प,उद्योग चालू करू म्हणजेच फायदा झाला तरी सर्वांचा आहे,आणि जर नुकसान झाल तरी जास्त नाही होणार आपण अस केल तरच लवकर क्रांती घडवू.ही माझी निश्चितच सफल होणारी विचारधारा आहे.आपण जमिनी विकतो आणि शहरात येतो पण परप्रांतीय या गोष्टीचा फायदा घेतात ते आपण विकायला काढलेल्या जमिनी खरेदी करतात आणि उद्योगधंदे चालू करतात आणि मग आपण त्यांच्याकडून खरेदी करतो हे कीती दिवस चालणार आपण जर ठोस पाऊले उचलली नाहीत तर आपल्या येणाऱ्या पिढीला कोकण फक्त नकाशात दखवाव आणि गोष्टीत सांगाव लागेल.जमिनी विकू नका त्या भाड्याने द्या किंवा त्यांच्या सोबत भागीदारीत व्यवसाय करा पण अपल्या कोकणी माणसासोबतच.कोकणातील जमिनीवर कोकणी माणसाशिवाय कोणाचाच अधिकार नाही.हे आपण दाखवून देवू.माझ्या या संकल्पित विचारांना अगदी सगळ्यांची अनमोल साथ आणि प्रत्येक्षपणे सहकार्य हवंय,येणाऱ्या काळात एक वेगळं परिवर्तन करण्याचा माझा मनी ध्यास आहे.

"जय महाराष्ट्र !! जय कोकण"

आपलाच कोकणी बांधव,

                                                


अभिजित कोटकर, 

(संस्थापक/अध्यक्ष -कोकण युवा क्रांती संघटना )

संपर्क - ८८९८४४८०५३/८१६९६०२२२१

उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई ; देशी दारू निर्मिती केंद्रावरील 4 लाख 74 हजारांचा माल जप्त करून 7 गुन्हे दाखल


पेण:- पेण तालुक्यातील रावे या गावी देशी दारू निर्मिती केंद्रावर उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत मोटारसायकलसह 39 हजार 200 रुपयांचा माल जप्त केला तर 4 लाख 74 हजार 720 रुपयांचा मुद्देमालही जप्त करून नष्ट केला. या प्रकरणी एकूण 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

     मुरुड विभागातील राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक श्री.आनंद पवार, दुय्यम निरीक्षक अंकुश बुरकुल, निरीक्षक श्री.गोगावले, खालापूर निरीक्षक श्री.चाटे, पनवेल शहर दुय्यम निरीक्षक श्री.माझगावकर, दुय्यम निरीक्षक श्री.मानकर, सहाय्यक निरीक्षक श्री.मोरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीमती नरहरी व जवान निमेष नाईक, अपर्णा पोकळे, श्री.पालवे, संदीप पाटील, महिला जवान रमा कांबळे, वाहनचालक श्री.हाके, श्री.कदम यांनी पेण तालुक्यातील रावे या गावातील देशी दारू निर्मिती केंद्रावर 500 लिटर क्षमतेचे भट्टीवरील 9 लोखंडी बॉयलर, 100 लिटरच्या 157 व 200 लिटरच्या 27 ड्रम मधील एकूण 19 हजार 50 लिटर रसायन व इतर साहित्य जप्त करून नष्ट केले.

    रायगड राज्य उत्पादन शुल्क च्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्री.आनंद पवार यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने ही सलग तिसरी धडक यशस्वी कारवाई केली आहे.

पेण तालुक्यातील विविध तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांकरिता जागा हस्तांतरित ; महसूल प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने पालकमंत्र्यांचे धडाडीचे निर्णय

पेण :- तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालये ही नागरिकांसाठी ग्रामीण स्तरावरील अत्यंत महत्त्वाची कार्यालये मानली जातात. या कार्यालयातून जनतेची महसूलविषयक सर्व प्रकारची महत्त्वाची कामे केली जातात.

  ग्रामीण भागातील जनतेची महसूलविषयक कामे सुलभ व्हावीत, प्रशासन गतिमान व्हावे तसेच येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या व या कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने या तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाची इमारत सुसज्ज व अद्ययावत असणे, ही काळाची गरज होती, या दृष्टीने पालकमंत्री या नात्याने कु.आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष देण्यास सुरुवात केली.

    या पार्श्वभूमीवर कामार्ली, वढाव, वाशी, खार दुतर्फा बोर्ली-सोनखार, कोलेटी, खारपाडा-दुष्मी, गागोदे बुद्रुक, जिर्णे या तलाठी व मंडळ कार्यालयांच्या इमारतींच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी केली होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

    त्यानुसार मंडळ अधिकारी कार्यालय कामार्लीसाठी क्षेत्र 0.04.00 हे.आर., तलाठी सजा वढावसाठी क्षेत्र 0.06.00 हे.आर., तलाठी सजा वाशी व मंडळ अधिकारी कार्यालय वाशीसाठी क्षेत्र 0.01.00 हे.आर.,तलाठी सजा सोनखारसाठी क्षेत्र 0.04.00 हे.आर., तलाठी सजा कोलेटीसाठी क्षेत्र 0.02.00 हे.आर.,तलाठी सजा दुष्मीसाठी क्षेत्र 0.03.04 हे.आर., तलाठी सजा गागोदे बुद्रुकसाठी क्षेत्र 0.01.00 हे.आर., तलाठी सजा जिर्णेसाठी क्षेत्र 0.00.40 हे.आर., ही जमीन महसूल मुक्त व सारामाफीने संबधित तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.

      यामुळे खऱ्या अर्थाने महसूल प्रशासन गतिमान होऊन जनतेला महसूल विषयक सोयी सुविधा सुलभतेने मिळतील. विविध प्रशासकीय कार्यालयांच्या नव्या इमारतीसाठी व अद्ययावतीकरणासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे करीत असलेल्या पाठपुराव्यामुळे प्रशासन निश्चितच गतिमान होण्यास मोठा हातभार लागणार आहे.जिल्ह्यातील जनतेमध्ये पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या कामाविषयी सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.


केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून अंबरनाथ मध्ये निदर्शने


अंबरनाथ :-
 केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून सामाजिक न्याय दिनीअंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने अंबरनाथ पश्चिम  येथे ब्लॉक अध्यक्ष श्री प्रदीप नाना पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.


अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने परिचारिका यांचा गौरव

अंबरनाथ (अविनाश म्हात्रे ):- अंबरनाथमध्ये २२व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांचा  कोरोना योध्दा ' सन्मानपत्र देऊन गौरव*

कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय अधिकारी यांनी मानवतेच्या दृष्टीने जी अविरत सेवा केली, त्या सेवेला कुठले मोल नाही. या उल्लेखनीय जनसेवेबद्दल हार्दिक अभिनंदन करत या सेवेची दखल घेऊन २२ व्या वर्धापन दिनानिमित्त अंबरनाथ शहरात वैद्यकीय सेवकांना अशीच सेवा आपल्या हातुन घडत राहो अशा शुभेच्छा देवुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील यांनी सर्व कोरोनाशी लढा देणा-या वैद्यकीय कर्मचारी यांना ' कोरोना योध्दा ' सन्मानपत्र प्रदान करून  सन्मानित करण्यात आले. अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम मधील CT हॉस्पिटल, बी.जी. छाया हॉस्पिटल, डेंटल कॉलेज, येथे भेट देऊन   सामाजिक अंतराचे भान राखून सुमारे १३० वैद्यकीय कर्मचारी यांचा कोरोना योद्धा '  सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २२ वा वर्धापनदिन संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमानदिन म्हणून साजरा केला जातो. या विशेष दिनाचे औचित्य साधुन अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कोरोना काळात वैद्यकीय कार्याची दखल घेवुन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष सदामामा पाटील, प्रदेश सरचिटणीस प्रेसिल्वा डिसल्वा मॅडम, महिला शहराध्यक्ष सौ.पूनमताई शेलार, जेष्ठ नेते कमलाकर सुर्यवंशी, युवक जिल्हा सरचिटणीस हेमंत जाधव, युवक अध्यक्ष प्रमोद बोऱ्हाडे, शहर सरचिटणीस धनंजय सुर्वे, सोशल मीडिया अध्यक्ष मिलिंद मोरे, ओबीसी सेलचे अध्यक्ष विनोद शेलार, युवती अध्यक्ष गौतमी सुर्यवंशी,युवक उपाध्यक्ष रमेश बाजरी, सरचिटणीस रविंद्र शिंदे, महिला उपाध्यक्ष सो. योगिता गायकवाड, सौ. स्वाती पवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

शनिवार, २६ जून, २०२१

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश

कोपरखैरणे - कोपरखैरणे येथील एक तरुणी आत्महत्या करण्यासाठी इमारतीच्या धोकादायक ठिकाणी जाऊन बसली असता, अग्निशमन दलाला ह्या मुलीला वाचवण्यात यश आले आहे.   सुमारे दोन तास ही तरुणी इमारतीच्या कडेच्या ठिकाणी उभी होती तिची मनधरणी करूनही ती ऐकायला तयार नव्हती अखेर जवानांनी तिला सुखरूपपणे बाहेर काढली व तिचे प्राण वाचवले.

     कोपरखैरणे सेक्टर २ येथील इमारतीच्या दुसऱ्या बाजूला मजल्यावर राहणाऱ्या तरुणी बाल्कनी बाहेरील धोकादायक ठिकाणी जाऊन तिथे बसली होती.ह्याबाबतची माहिती मिळताच ऐरोली व कोपरखैरणे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्या मुलीची समजूत काढू लागले. तिची अनेकदा समजून काढून सुद्धा ऐकत नसल्याने अग्निशमन दलाची दुसरी टीम इमारतीच्या खाली राहून तिला धीर देत होते.  वाशी अग्निशमन दलाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी पुरोषात्तम जाधव ह्यांनी त्या तरुणीकडे झेप घेतली व तिची समजूत काढली. त्यांच्या पाठोपाठ कोपरखैरणे अग्निशमन दलाचे विवेक कलगुटकर व ऐरोली दलाचे महादेव गावडे यांनी धोकादायक ठिकाणी जाऊनत्या तरुणीला धरून ठेवले व तिचे प्राण वाचण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले. घरात सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे तिने हा प्रकार केला असल्याचे सांगितले आहे.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज !

   

आज २६ जून, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती. आजच्याच दिवशी १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई असे होते. कोल्हापूर ( करवीर )  संस्थानचे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर महाराणी आनंदीबाई यांनी कोल्हापूरच्या गादीचे वारसदार म्हणून त्यांना १७ मार्च १८८४ रोजी दत्तक घेतले कारण चौथे शिवाजी महाराज यांना मुलबाळ नव्हते. दत्तक घेतल्यावर त्यांचे छत्रपती शाहू महाराज असे नामकरण करण्यात आले. शिक्षण पूर्ण झाल्यावर २ एप्रिल १८९४ रोजी ते कोल्हापूरच्या गादीवर विराजमान झाले. राज्यभिषेक झाल्यावर १९२२ पर्यंत म्हणजे २८ वर्ष ते कोल्हापूर संस्थानचे राजे होते. छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे चालवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी राज्यकारभार केला म्हणूनच ते राजर्षी बनले. ते खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. बहुजन समाजाला मानसिक गुलामीतूम बाहेर काढून, तत्कालीन रूढी परंपरा नाकारुन त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये अनेक सामाजिक सुधारणा केल्या. शाहू महाराजांनी बहुजन समाजामध्ये शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. शिक्षणाचे महत्व ओळखणारे देशातील पहिले राजे हे छत्रपती शाहू महाराज हेच होते. राज्यातील निरक्षर,  गरीब, अस्पृश्य, दलित या बहुजन समाजातील लोकांना शिक्षण दिले तरच त्यांचा सर्वांगीण विकास होईल हे ओळखून त्यांनी समाजातील वंचित, दुर्लक्षित वर्गातील मुलांसाठी वसतिगृहे काढली. विविध जातीधर्मातील मुलांसाठी त्यांनी २२ वसतिगृहे स्थापली त्यात शेकडो मुले शिकली. शिक्षण क्षेत्रात मुलींची संख्या वाढली पाहिजे या हेतूने त्यांनी मुलींना ४० रुपये स्कॉलरशिप सुरू केली. ब्रिटिश सरकार शिक्षणावर वार्षिक ८०  हजार रुपये खर्च करत असताना कोल्हापूर संस्थानचा शिक्षणावरील वार्षिक खर्च हा एक लाख रुपये इतका होता. यातच शाहू महाराज यांची शिक्षणाविषयी किती तळमळ होती हे दिसून येते. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी सुवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दृष्ट पद्धत रद्द केली. गावच्या पाटलाने  कारभार चांगला करावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, तंत्र व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा त्यांनी सुरू केल्या. 

       मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे हा व्यापक विचार  डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव ठेवल्या म्हणूनच त्यांना आरक्षणाचे जनक असे म्हणतात. शाहू महाराजांच्या या निर्णयाला तेंव्हा खूप विरोध झाला पण विरोधाला न जुमानता त्यांनी या आरक्षणाची कठोर अंमलबजावणी केली. शाळा, दवाखाने, पाणवठे अशा सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांशी समतेने वागावे, त्यांच्याशी कोणीही भेदभाव करू नये असा आदेश त्यांनी काढला. १९१७ साली विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता  मिळवून दिली. त्यांनी देवादासींची घातक प्रथा बंद केली. बहुजन समाजाला राजकीय प्रवाहात सामावून घेण्यासाठी १९१६ साली निपाणी येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. जातिभेदाची प्रथा नष्ट व्हावी म्हणून त्यांनी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. इतकेच नाही तर आपल्या चुलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. छत्रपती शाहू महाराजांनी स्पिनिंग अँड व्हीविंग मिल, शाहूपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देणे असे अनेक उपक्रम आपल्या संस्थानात राबवले. त्यांनी शेतीच्या आधुनिकीकरणासाठी संशोधनाला पाठिंबा दिला. नगदी पिके आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी किंग एडवर्ड ऍग्रीकल्चर इन्स्टिट्यूटची स्थापना केली. चित्रकला, लोककला, संगीत, साहित्य, नाट्य, कुस्ती या क्षेत्रातील कलावंतांना त्यांनी राजाश्रय मिळवून दिला. शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रुत आहे. बाबासाहेब मॅट्रिकमध्ये असताना आणि नंतर कोलंबिया युनिव्हर्सिटीत शिकत असताना त्यांनी बाबासाहेबांना स्कॉलरशिप दिली. २० आणि २१ मार्च १९२० रोजी माणगाव येथे अस्पृश्यता निवारण परिषदेत शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करून कोल्हापूरच्या राजवाड्यात त्यांना जेवणाचे निमंत्रण दिले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे साप्ताहिक सुरू केले पण आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद करावे लागले जेंव्हा हे शाहू महाराजांना समजले तेंव्हा त्यांनी २५०० रुपयांची आर्थिक मदत देऊन हे साप्ताहिक पुन्हा सुरू केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा समर्थपणे पुढे  घेऊन जाण्याचे कार्य करणारा एक मानवतावादी राजा म्हणून शाहू महाराजांची इतिहासात नोंद आहे. व्यापक दूरदृष्टीच्या या राजाने त्याकाळी राजेशाही असूनही सामाजिक बंधुभाव, दलित व उपेक्षितांचा उद्धार, शिक्षण, उद्योगधंदे, कला, क्रीडा, आरोग्य या क्षेत्रांमध्ये जे कार्य केले आहे तसे कार्य  आजवर कोणीही केले नाही. त्यांचे कार्य आजच्या आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे. आज त्यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो ही एकप्रकारे त्यांच्या कार्याला दिलेली मानवंदनाच आहे. जयंतीदिनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन!

  -श्याम बसप्पा ठाणेदार,
  दौंड जिल्हा पुणे

नवभारत हायस्कूल कुसूर* येथे मोफत ई लर्निग किट, लॅपटॉप आणि प्रिंटर वाटप कार्यक्रम संपन्न ; साई एज्युकेअर फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम...!

वैभववाडी - कुसूर गावातील माध्यमिक शाळा, नवभारत हायस्कूल येथील विद्यार्थ्यांसाठी साई एज्युकेअर फाउंडेशन (रजि.) या संस्थेतर्फे (CSR Initiative...