आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३१ मे, २०२१

आरोग्याचे रक्षण हे रोगाच्या इलाजापेक्षा नक्कीच जास्त महत्त्वाचे असते !! डॉ. सौ स्वाती गाडगीळ यांचे आडवलीतील आर. ए.यादव हायस्कूल मधील मुलींना मार्गदर्शन

सिंधुदुर्ग : मासिक पाळीस्वच्छता व व्यवस्थापन सप्ताह निमित्त रविवार दिनांक ३० मे २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, आडवली येथे आर. ए. यादव शाळेतील विद्यार्थिनींसाठी मासिक पाळीच्या दिवसातील स्वच्छता आणि आरोग्य या विषयावर डॉ. सौ. स्वाती गाडगीळ यांनी ऑनलाईन चर्चासत्र घेतले. 
Mission Menstrual Hygiene हा राज्यव्यापी कार्यक्रम त्यांनी या वर्षी हाती घेतला आहे. त्यांची एनजीओ डोंबिवली वूमेंस वेल्फेअर सोसायटी गेली दहा वर्ष अनेक सामाजिक प्रश्नांवर काम करीत आहे. वयात आलेल्या मुलींना आणि स्त्रियांना मासिक पाळीच्या दिवसात वापरण्याचे नॅपकिन्स देण्यात येतात आणि आर्थिक स्वातंत्र्याची जाणीव होण्यासाठी प्रतीकात्मक स्वरूपात पैश्याचा गल्ला दिला जातो, ज्या मध्ये अगदी एकच रूपया रोज टाकला तरी महिन्याच्या शेवटी नॅपकिन्स विकत घेता येतील एवढे पैसे जमतात असे त्या समजावून सांगतात. रोगाचा इलाज करण्यापेक्षा, आरोग्य राखण्यासाठी नक्कीच कमी पैसे खर्च होतात हे प्रबोधन त्यांनी केले. शासनाच्या मासिक पाळीतील आरोग्य या योजने अंतर्गत आशा सेविकांद्वारे घरोघरी देण्यात येणारे सहा sanitary नॅपकिन्सचे पाकीट केवळ सहा रुपयात मिळते याची माहिती मुलींना आणि वारंग मॅडम ना दिली जेणेकरून त्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन त्याची हक्काने मागणी करू शकतात. मासिक पाळीच्या काळात अंगावरून जास्त जात असेल तर हिमोग्लोबिनची मात्रा कमी होते आणि रक्ताच्या तपासणीतून ते कळू शकतं. हिमोग्लोबीन कमी असल्यास थकवा येतो, झोप येते, आणि पुढे आरोग्याच्या निरनिराळ्या तक्रारी सुरू होऊ शकतात. म्हणून लौकर निदान होणे गरजेचे असते. ओटीपोटाचा क्षयरोग किंवा अन्य जंतूंची बाधा झाली तर वंध्यत्व येणं, अनियमित पाळी येणं, पाळीच्या दिवसात असह्य वेदना होणं असे त्रास होऊ शकतात. स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला वेळीच घेतला तर शरीरावर होणारे विपरीत परिणाम टाळता येतात हे डॉ. स्वाती गाडगीळ यांनी मुलींना सोप्या भाषेत समजावून सांगितलं. 
    जास्तीतजास्त महिलांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे असं त्या म्हणतात कारण एक डॉक्टर म्हणून आणि समाजसेविका या नात्याने प्रत्येक महिलेचे आयुष्य आरोग्यपूर्ण असावे हा विडा त्यांनी उचलला आहे आणि या कामात, केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर अगदी दुर्गम आणि ग्रामीण भागातील मुली आणि महिला सुद्धा मोलाची मदत करू शकतात.
  आरोग्याचे रक्षण हे रोगाच्या इलाजापेक्षा नक्कीच जास्त महत्त्वाचे असते. हा उपक्रम मालवण तालुक्यातील आडवली गावापर्यंत नेण्याचे श्रेय श्री. सुंदर बाणावलीकर यांना जाते. आर. ए. यादव शाळेचे मुख्याध्यापक श्री. तुषार सकपाळ आणि सौ. वारंग मॅडम यांच्या पुढाकाराने आजचा कार्यक्रम यशस्वी झाला. ही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्याची सुरुवात आहे. त्यांचे सहकार्य आणि सहभाग इथून पुढे देखील खूप मोलाचा ठरणार आहे.या मार्गदर्शन वर्गासाठी प्रशालेचे माजी विध्यार्थी श्री सुंदर बाणावलीकर व डॉ. सौ. स्वाती गाडगीळ यांचे सर्वोदय एज्युकेशन सोसायटी, मुंबईचे संस्था अध्यक्ष,सर्व संस्था पदाधिकारी,सदस्य.अध्यक्ष,शाळा समिती,सदस्य,तसेच सर्व निमंत्रित सदस्य आडवली प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या तर्फे आभार मानण्यात आले.

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न

अलिबाग :- तळा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, महागाव साठी ग्रामविकास विभागाकडून व आरोग्य विभागाच्या सहकार्यातून मिळालेल्या रुग्णवाहिकेचे काल (दि.30 मे) रोजी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते सभापती अक्षरा कदम व महिला बालकल्याण सभापती गीता जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण संपन्न झाले. 
     दुर्गम व डोंगराळ भागातील महागाव विभागातील नागरिकांना रुग्णवाहिकेची गरज होती, यादृष्टीने ही गरज पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पुढाकारातून पूर्ण झाली आहे. या रुग्णवाहिकेचा लाभ या भागातील सर्वच नागरिकांना होणार आहे.
       यावेळी गटविकास अधिकारी विजय यादव, नायब तहसिलदार निलेश गावणकर, सरपंच सुषमा कजबले, नगरसेवक चंद्रकांत रोडे, ॲड.उत्तम जाधव, सचिन कदम, अनंत खराडे, डॉ. वंदन पाटील, डॉ. स्मिता पाटील, डॉ. अमोल बिरवाडकर, गणेश पवार,  आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते म्हसळा ग्रामीण रुग्णालयात 30 ऑक्सिजन बेडचे लोकार्पण ;स्वतंत्र वार्डसह 12 ऑक्सिजन बेड महिलांसाठी राखीव

अलिबाग :- करोना प्रादूर्भावावर मात करण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत व सहकार्य करीत असतानाच पालकमंत्री आदिती तटकरे सातत्यपूर्ण अविश्रांत परिश्रम घेत नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कायम प्रयत्नशील आहेत.    
      करोनाच्या दुसऱ्या लाटेत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी शासन स्तरावर जलदगतीने म्हसळा ग्रामीण रुग्णालयासाठी 30 ऑक्सिजन बेडची मंजूरी मिळवून दिली. त्याचे लोकार्पण आज (दि.31 मे) रोजी त्यांच्या शुभ हस्ते संपन्न  झाले. या 30 बेड पैकी 12 ऑक्सिजन बेड महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
     यावेळी अलीशेठ कौचाली, समीर बनकर, सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले, नगराध्यक्षा जयश्री कापरे, उपनगराध्यक्ष सुहेब हलदे, माजी सभापती उज्वला सावंत, माजी सभापती नाझीम हसवारे,  संजय कर्णिक,शाहिदभाई उकये, रेश्मा काणसे, शगुप्ता जहांगीर, सतीश शिगवण, अनिल बसवत,संतोष नाना सावंत, किरण पालांडे, भाई बोरकर, प्रकाश गाणेकर, दामोदर पांडव, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसिलदार शरद गोसावी,  नायब तहसिलदार के. टी. भिंगारे, गट विकास अधिकारी वाय. एम. प्रभे, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.मधुकर ढवळे, आरोग्य अधिकारी डॉ.महेश मेहता, प्र. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत गायकवाड, डॉ.अलंकार करंबे,  सार्वजनिक बांधकाम अभियंता श्री.गणगणे, पाणी पुरवठा अभियंता युवराज गांगुर्डे आदी मान्यवर शासकीय अधिकारी व कर्मचारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
     म्हसळा ग्रामीण रुग्णालयात अवघ्या 15 दिवसांत ऑक्सिजन बेडसह इतर सर्व आरोग्य सोयीसुविधांसह डेडिकेटेड कोविड केअर सेंटर कार्यान्वित केल्याबद्दल  म्हसळामधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
     या निमित्ताने पालकमंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, सध्या या ठिकाणी दोन मोबाईल ऑक्सिजन व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर रुग्णालयात बाधीत रुग्णांसाठी अधिक बेडची उपलब्धता करण्यात येणार आहे. येथे 4 ऑक्सिजन कॉन्स्स्ट्रेटर उपलब्ध असून अधिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अधिक  प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार असून पावसाळ्यात वीज खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन वीज खंडित होऊन येथील आरोग्य सोयीसुविधांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी 16 kv चे जनरेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रुग्ण सेवेसाठी सर्वोतोपरी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचेही पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले. 
     नुकतेच (दि.29 मे रोजी) पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी तालुक्यातील चिखलप आदिवासीवाडी येथे रायगड जिल्हा परिषद व स्वदेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल लसीकरण व्हॅनचे उद्घाटन केले होते. त्याचबरोबर त्यांच्या हस्ते म्हसळा ग्रामीण रुग्णालय आणि खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी "जननी सुरक्षा योजनेंतर्गत" 102 हा हेल्पलाईन क्रमांक असलेल्या रुग्णवाहिकांचेही लोकार्पण संपन्न झाले होते.

भांडुपच्या दवाखान्यातील औषध निर्माता पद्माकर येवले निवृत्त

भांडुप येथील दवाखान्यातील औषध निर्माता पद्माकर येवले सेवानिवृत्त झाले. त्यांना कोरोना योध्दा म्हणून प्रमाणपत्र शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह प्रदान करताना डॉ.विलास मोहोकर , युनियन सेक्रेटरी अनिल घुमाणे ,वर्षा येवले , डॉ. रंजना तामोरे , डॉ.वर्षा कर्णिक छायाचित्रात दिसत आहेत. ( छाया प्रमोद कांदळगावकर )
प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका एस विभाग अंतर्गत म. वि. रा. शिंदे मार्ग येथील दवाखान्यातील मुख्य औषध निर्माता पद्माकर चिंधू येवले हे ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. खरतर त्यांनी आपल्या कामगिरीतून ठसा उमटविला आहे. त्यांनी कोणतेही काम इमानेइतबारे करताना त्यांच्यामध्ये वेगळेपण जाणविला असे एस विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विलास मोहोकर यांनी एस विभागातील कार्यालयाच्या वतीने सेवापुरती कार्यक्रमात 'कोरोना योद्धा' प्रमाणपत्र व सेवापुरती स्मृतिचिन्ह प्रदान करताना गौरवोद्गार काढले. यावेळी म्युनिसिपल फार्मासिस्ट असोसिएशन सेक्रेटरी अनिल घुमान, दवाखान्याच्या सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्ष वर्षा कर्णिक, डॉ. विजय माली, डॉ. नितीन महाजन, सेवानिवृत्त डॉ. रंजना तामोरे, सौ. वर्षा येवले व्यासपीठावर उपस्थित होते.
   पद्माकर येवले यांनी आपली नोकरी सांभाळून म्युनिसिपल फार्मासिस्ट असोसिएशनतर्फे माध्यमातून औषध निर्मात्याच्या समस्यांची सोडवणूक चांगल्याप्रकारे करण्याचा प्रयत्न केला. पण ते एक उत्तम गायक आहेत. त्यामध्ये सकारात्मकता दिसून येते असे सेक्रेटरी अनिल घुमाणे यांनी सांगितले.
       याप्रसंगी प्रतिभा फालक, डॉ. रंजना तामोरे, समाजविकास अधिकारी बाजीराव खैरनार, विठ्ठल मोरे, संजय राठोड, डॉ. विजय वाणी आदींनी येवले यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला.
आपल्या सत्काराप्रसंगी बोलताना पद्माकर येवले भावुक झाले. आपल्याकडून प्रदीर्घ सेवा कालावधीत भरपूर प्रेम मिळाल्याने भारावून गेलो आणि कोरोना महामारीच्या काळातसुद्धा सेवा करताना यशस्वी होऊ शकलो. हे सर्व तुमच्या प्रेमाखातीर घडू शकले. याबद्दल सर्वांचा आदर करतो आणि आभार व्यक्त्त करतो. असे नमूद केले. यावेळी डॉ. शामल गोरेगावकर, स्वच्छता निरीक्षक नित्यानंद पाटील, सेवानिवृत्त तंत्र विकास प्रधान सौ. मधुरा परब आदी प्रभृती उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नमिता दामले यांनी अतिशय माफक शब्दात केले.

पालघर येथे किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट तर्फ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पालघर : डोंगरी पाडा तांदूळवाडी सफाळे येथे  किरण मेडिकल जीवनदान ट्रस्ट तर्फ  किरण मोरे यांच्या तर्फ बौद्ध पोर्णिमेनिमत्ताने पाड्यातील व गावातील नागरिकांना व महिलांना जीवनविषयक वस्तू तसेच लहान मुलांना बिस्किटे व वही,पेन्सिल,रबर,पेन,पटी, पुस्तके किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट संस्थापक किरण  मोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी त्यांनी  उपस्थित  लोकांना  मार्गदर्शन केले. मोरे यांच्या संस्थेतर्फे करोना लोकांना अॅम्बुलन्स, दवाखान्याच बिल कमी करण्याबाबत  प्रयत्न केले जातात.  करोना काळात संस्थेमार्फत विविध प्रकारची मदत करताना अनेक गरीबांचा  जिव वाचवण्यात त्यांना यश आले आहे.याप्रसंगी गरिबांची रणरागिणी किरण मोरे यांचा गावातील महिलांकडून शाल,श्रीफळ , देऊन सत्कार करण्यात आला. 

शिवराम भुवड यांचे दुःखद निधन ; केरे गावचं एक थोर नेतृत्व हरपलं !

चिपळूण : ( दिपक कारकर ) तालुक्यातील मौजे केरे ( टोकवाडी ) गावातील भूमिपुत्र व गावचे गावकर म्हणून सर्वश्रुत असणाऱ्या शिवराम भागोजी भुवड ( वय वर्षे - ७६ ) यांचे नुकतेच २९ मे २०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. गावची परंपरा,प्रतिष्ठा जोपासतना आपल्या नम्र,प्रेमळ स्वभावाने काम करून गावचं "गावकर" हे मानाचं पद त्यांनी आजवर प्रामाणिकपणे भूषविले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,दोन मुली सूना नातवंडे असा परिवार आहे.त्यांना केरे ( टोकवाडी ) ग्रामिण-मुंबई मंडळ /महिला मंडळ व चंडिका क्रिकेट क्लब ( केरे ) तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

द्वारकानाथ सुर्यराव सेवानिवृत्त

मुंबई  : जेष्ठ समाजसेवक आणि देशमुख समाजाचे आधारवड श्री. व्दारकानाथ चंद्रकांतराव सुर्यराव (देशमुख) दिनांक ३१ मे २०२१ रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग ठाणे येथे त्यांनी अविरतपणे ३९ वर्ष निष्ठेने आणि निस्वार्थीपणे  सेवा बजावली. आपल्या सेवेच्या कालावधित सहकारी आणि व्यवस्थापन यांचेशी चांगले संबंध दृढ ठेऊन  कर्मचाऱ्यांमध्ये परस्पर विश्वास अधिक वृंध्दीगत व्हावा याद्रुष्टीने सतत प्रयत्नशील राहीले. साहजिकच त्यांनी बजावलेल्या उत्कृष्ट सेवेप्रित्यर्थ प्राधिकरणाच्या प्रत्येक विभागातून त्यांना सन्माने आदरपूर्वक सन्मानीत करून गौरविण्यात आले व त्यांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा व आशिर्वाद देण्यात आले.
      आपले कुटुंब व नोकरी  प्रामाणिकपणे सांभाळून त्यांनी समाजाप्रतीही विविध स्तरावर निशंकपणे आपले खूप मोठे योगदान दिले. प्राधिकरणाच्या सेवेत असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेत तब्बल २१ वर्षे संचालक म्हणून सांभाळलेली जबाबदारी वाखाणण्यासारखी ठरली. अगदि  शिस्तीने आणि निस्वार्थीपणे त्यांनी बजावलेल्या या सेवेदरम्यान पतपेढीच्या सदस्यांना  त्यांच्या आर्थिक गरजेसह कौटुंबिक स्तरावर असलेल्या समस्यांबाबतही सतर्क राहून , वेळेवेळी मदत करून, पतसंस्थेबद्दल सभासदांमध्ये अधिक विश्वास  निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सहाजिकच पतसंस्थेच्या  अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांचेकडे वेळोवेळी सतत चालत आली आणि सेवानिवृत्त होताना पतसंस्थेचा अध्यक्ष म्हणून निवृत होण्याचे भाग्य लाभले. 
               आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे ऋणही त्यांनी मानले. जोपासले. याच भावनेतून त्यांनी कुळगांव -बदलापूर देशमुख मराठा  समाज मंडळ या संस्थेच्या स्थापनेत सक्रीय पुढाकार घेऊन या संस्थेच्या माध्यमातून समाज उन्नतीसाठी सतत क्रियाशील राहून अनेक सेवाभावी उपक्रम राबविले. समाजातील गरजवंतांचे  विविध स्तरावरील प्रश्न, कौटुंबिक प्रश्न, लग्नकार्य, कुटुंबातील आजार पणात लागणारी विविध स्वरूपाची मदत, कौटुंबिक वाद, प्रसंगी रक्तपुरवठा, अशा स्वरूपातील मूलभूत गरजांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन  सर्वसामान्यांना आधार दिला व ते सोडविण्याचे सातत्याने प्रयत्न केले. अर्थात  हे सर्व काम करत असताना जेथे काम करतो तेथील व्यवस्थापन, सोबतचे सहकारी त्याचप्रमाणे जेष्ठ समाजसेवक कै. बाळुमामा सुर्यराव यांचे सातत्याने मिळालेले पाठबळ, सदाशीव रघुनाथ देशमुख व रमेश महादेव देशमुख यांची मिळत गेलेली प्रेरणा व सहकार्य यामुळे हे सर्व काम सुलभपणे पार पडले हे सांगतानाच सुविद्य पत्नी सौ. दिपीका हीचा पावलागणीक मिळत गेलेला सहयोग यामुळेच हे सर्व शक्य झाले हे  व्दारकानाथ प्रामाणिकपणे कबुल करतात.
   म्हणूनच निरासक्त , निरअभिमानी, वेळ काळाचे भान न ठेवता प्रसंगी पदरमोड करून उपेक्षितांना सतत मदतीचा हात पुढे करणारे व्दारकानाथ सुर्यराव यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीच्या जीवनास हार्दिक शुभेच्छा देताना मनस्वी आनंद होत आहे.

तौक्ते वादळाने घरांचे नुकसान झालेल्या आदिवासी बांधवांना सिटीझन वेल्फेयर असोशिएशन कडून मदतीचा हात

बदलापूर / प्रतिनिधी : बदलापूर शहरापासून जवळच असलेल्या आदिवासी पाड्यावरील आदिवासी बांधवांच्या घरांची तौक्ते वादळाने पडझड आणि नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर बदलापूर शहर सिटीझन वेल्फेयर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मिटिंग घेऊन संबंधित बांधवांना मदत करण्याचे ठरवले. याकामी असोसिएशनचे सरचिटणीस श्री राजेंद्र नरसाळे आणि सदस्य श्री सुहास सावंत यांनी पुढाकार घेऊन जेष्ठ सल्लागार श्री दिलीप नारकर यांच्या मार्गदर्शनानुसार रूपरेषा ठरवण्यात आली आणि रामदास सेवा आश्रमाचे पराग महाराज रामदासी यांच्या प्रमुख उपस्थितीत असोशिएशनच्या सदस्यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना घरावर झाकण्यासाठी उत्तम प्रतीच्या ताडपत्रीचे वाटप रामदास सेवा आश्रम येथे जाऊन करण्यात आले.
    याप्रसंगी रामदास सेवा आश्रमाचे स्वामी पराग महाराज यांनी उपस्थितांना अप्रतिम गोडव्याचे माधुर्य असलेले आवळा सरबत देऊन स्वागत केले तसेच सेवा आश्रमाच्या कामाचे स्वरूप सर्व उपस्थितांना सांगितले. वृद्धाश्रम आणि गोशाळेबद्दल माहिती दिली. गोशाळेतील गाईंपासून मिळणाऱ्या शेण आणि मलमूत्रापासून बनवलेल्या पर्यावरणपूरक जळाऊ लाकडांच्या उत्पादनाविषयी महिती दिली. हा उपक्रम अत्यंत सुंदर आणि शंभर टक्के पर्यावरणपूरक असल्याने जंगली लाकडाला पर्याय निर्माण होऊन जंगलसंपत्तीचे रक्षण होऊन पर्यावरणाची हानी थांबण्यास मदत होईल तसेच पारंपरिक मूळ देशी प्रजातीच्या गाईंचे रक्षण होईल असा विश्वास पराग महाराज यांनी व्यक्त केला. 
  गोशाळेतील गाईंची गोंडस वासरं आणि त्यांच्या स्पर्शाने परमेश्वरी सहवासाचा आनंद सदस्यांना घेता आला. वासरांबरोबर फोटो काढण्याचा मोह सदस्यांना आवरता आला नाही. 
   परमेश्वराचे वत्सल रूपच जणू त्या वासरांच्या किलकिल्या डोळ्यांतून अवतरल्याचा साक्षात आभास ! या कार्यक्रम प्रसंगी असोशिएशनचे उपाध्यक्ष श्री विलास हंकारे, सरचिटणीस श्री राजेंद्र नरसाळे, जेष्ठ सल्लागार श्री दिलीप नारकर, सहखजिनदार श्री मंगेश सावंत, सहसचिव श्री चंद्रकांत चिले, सदस्य श्री सुहास सावंत, सदस्या सौ. सुवर्णा इस्वलकर,सदस्य श्री विलास साळगांवकर, छोटा सदस्य कु. आर्येश नरसाळे आणि डॉ. अमितकुमार गोईलकर आदी उपस्थित होते. असोशिएशनचे अध्यक्ष श्री सुनील दळवी काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत.परतीच्या मार्गावर असोशिएशनच्या नवनिर्वाचित खजिनदार डॉ. निता पाटील यांच्या घरी/ कार्यालयास सर्वांनी सदिच्छा भेट दिली. 
एकंदरीत हा कार्यक्रम सर्व सदस्यांचा उत्साह वाढवणारा ठरला.

जनजागृती सेवा समिती तर्फे माथेरान येथील गरीब कोकणवासीय जनतेला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

माथेरान-  बदलापुर येथील जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र  या संस्थेने पुढाकार घेऊन माथेरान मधील दिडशे कुटुंबाना जीवनावश्यक साहित्य देऊन समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. यानिमित्ताने अत्यंत दुर्गम आणि पहाडी भागातील कोकणवासियांचे जीवन जवळुन पहाता आले.प्रामाणिकपणा आणि कठोर मेहनत या बळावर येथील कोकणी माणसाने आपली संस्कृती जपली आहे. जनजागृती सेवा समितीचे हे सत्कार्य कौतुकास्पद व प्रशंवसनीय आहे. या उपक्रमाबद्दल मी संपुर्ण कार्यकारिणीला धन्यवाद देतो.असे गौरवोदगार स्टार हेल्थ अॅन्ड अप्लाईड इन्शुरन्स कंपनीचे(क्लब संस्थापक-रोटरी क्लब डायमंड)सिनीयर सेल्स मॅनेजर राजेश कदम यांनी काढले.याप्रसंगी जनजागृती सेवा समितीचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत,कोकण वासीय समाजाचे अध्यक्ष शैलेंद्र दळवी,सचिव चंद्रकांत सुतार यांची समयोचित भाषणे झाली. याप्रसंगी जनजागृती सेवा समितीच्या पदाधिका-यांच्या हस्ते येथील कोकणवासीय गरीब कुटुंबाना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.यावेळी समितीचे दत्ता कडुलकर,महेश्वर तेटांबे,दीपक वायंगणकर हे पदाधिकारी उपस्थित होते.तसेच कोकणवासीय समाजातर्फे योगेश दळवी,दत्ता सणगरे आदी मान्यवर उपस्थित होते.नगराध्यक्षा सौ.प्रेरणा सावंत यांनी आपला शुभेच्छा संदेश पाठविला.समितीचे सल्लागार आत्माराम नाटेकर यांनी सुत्रसंचलन केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश कदम,समिती कार्यकारिणी व जनजागृती सेवा समिती ग्रुप सदस्यांचे विशेष योगदान लाभले.


रविवार, ३० मे, २०२१

निर्धार संस्थेच्या वतीने कूपर इस्पितळात इंजेक्शन भेट

मुंबई-(गणेश हिरवे) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील निर्धार (एक हात आपुलकीचा) या जोगेश्वरीतील अरविंद गंडभीर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी काढलेल्या सामाजिक संस्थेच्या वतीने नुकतंच अंधेरी येथील कूपर रुग्णालयात गरीब व गरजू रुग्णांसाठी आवश्यक इंजेक्शन भेट म्हणून देण्यात आली.ही इंजेक्शन रुग्णालयातील परिचारिका शलाका वैद्य यांनी निर्धार तर्फे कूपर रुग्णालयातील डॉक्टराना सुपूर्द केली. याआधी देखील निर्धाराने अनेक सामाजिक उपक्रमाद्वारे गरीब गरजू वंचित यांच्यासाठी लॉकडाउन काळात धान्य वाटप, चष्मा शिबीर,वृक्ष लागवड, सुमुद्र किनारे स्वच्छता मोहीम,नेत्र चिकित्सा शिबीर अशा कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केलेले आहे.१३ जून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी आईच्या वर्षश्राद्धा निमित्त केले गरजूंना सहकार्य

घणसोली-(वैभव पाटील)
  कोविड-१९ या महामारी काळात प्रत्येकजण आपआपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करत होता.गणेश हिरवे जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या आईच्या चौथ्या वर्षश्राद्धा  निमित्ताने पंचवीस गरजू कुटुंबियांना तांदूळ, डाळ,साखर,पीठ,पोहे,रवा,कोलगेट व साबण असा किराणा किट भेट म्हणून दिले.त्यांनी आवश्यक तेथे जी-जी गरज होती तेथे तेथे गरजेनुसार यापूर्वेही मदत दिली होती. दि.२ डिसेंबर २०२० रोजी ईशान्य मुंबईतील घाटकोपर येथील जेष्ठ नागरिकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व 22 डिसेंबर रोजी मुलीच्या वाढदिवस निमित्ताने अशी दोन वेळा मदत केली होती.तसेच त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या जॉय ऑफ गिविंग ग्रुपच्या माध्यमातून  सतत किराणा किट,आरोग्य किट,सॅनिटायझर व मास्क याचे देखील ते नियमितपणे वाटप करीत असतात.रक्तदानाची निकड लक्षात घेऊन हिरवे सरांनी आतापर्यंत 31वेळा रस्क्तदान केलेलं असून शंभरहून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.एक अभ्यासू व्यतिमत्व अशी त्यांची ओळख सर्वत्र आहे.

दादर लोहमार्ग पोलिसांनी वाचवला महिला आरोपीचा जीव

मुंबई, दादासाहेब येंधे : दादर रेल्वे स्थानकात थरार घडल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. एक महिला आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली. त्यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने धाडस दाखवत या महिलेचा जीव वाचवला.  
  पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, हि महिला गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म चारवरून पोलीस महिला आरोपीला घेऊन जात होते. त्यावेळी महिला आरोपीने समोरून येणारी लोकल गाडी पाहून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा हात झटकून या आरोपी महिलेने प्लॅटफॉर्मवरून ट्रॅकवर उडी मारली. पण, अचानक उडी मारल्यामुळे तोल जाऊन ती खाली पडली. त्यावेळी समोरून लोकल येत होती. तेव्हा आपल्या जीवाची पर्वा न करता सहाय्य्क पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट यांनी सावधगिरी बाळगत ट्रेन  तिच्याजवळ येण्यापूर्वीच खाली उडी मारून तिला बाजूला केले. संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. 

ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू ; कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार

मुंबई : ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून  त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. 
  २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.

  *पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील*
  
२०११ च्या जणगणनेनुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील.

*पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :*
 
वरील ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (१२ मे २०२१ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील. 
सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील. 
सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा ( केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती
 व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार , रविवार ती बंद राहतील 
अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील 
दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील
कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल. 
कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते  

*पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :*

वरील ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे १२ मे २०२१ब्रेक दि चेन आदेशातील निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील.

अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल. 
उपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी १२ मे २०२१ चे ब्रेक दि चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील. 
दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच १२ मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.

-------------------------------

*१२ मे २०२१ चे ‘ब्रेक दि चेन’ चे आदेश आपल्या माहिती व संदर्भासाठी*

Ø  कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त 48 तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.

Ø  यापूर्वी 18 एप्रिल आणि 1 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.

Ø  मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त 48 तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.

Ø  स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज  बंद करण्याचा निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.

 Ø  दूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दूध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.

Ø  कोविड-19 व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.

Ø  स्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (एसडीएमए) द्यावी लागेल आणि हे निर्बंध लागू करण्याच्या 48  तास अगोदर त्याची जाहीर घोषणा करावी लागेल.

भारती कदम यांचा पहिला स्मृतिदिन संपन्न

मुंबई  : बौध्दजन हितवर्धक समिती, शाखा गुडे, या शाखेचे सन्मानिय सभासद राजेंद्र कदम यांच्या सुविद्य पत्नी भारती कदम गाव गुडे, ता. चिपळूण यांच गेल्या वर्षी आकस्मिक दुःखद निधन झाल्याने त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाचे आयोजन "जय भवानी गृहनिर्माण सोसायटी" या कमिटीचे अध्यक्ष विजय मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करीत एलपिस्टन येथील समाज मंदिर हॉल मध्ये संपन्न झाला.
   सदर ठिकाणी बौद्धाचार्य जितेंद्र कांबळे गुरुजींनी धार्मिक विधी यथायोग्य पार पाडून कार्यक्रमाला सुरवात केली, भारती कदम यांना आदरांजली अर्पण करण्यास मुंढर, मढाळ, मळन, गुडे, धामण इत्यादी गावचे गमरे, कदम, तांबे, जाधव इत्यादी प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते, मान्यवरांनी भारती कदम या मनमिळाऊ, उत्साही, प्रेमळ आणि ध्येयवादी व्यक्तिमत्व होत्या अशी शब्दसमुने अर्पण करीत आपले मत व्यक्त करून त्याना श्रद्धांजली वाहिली.
  जय भवानी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष विजय मोहिते यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

पेणचे विद्यार्थी होणार उच्च अधिकारी - ऍड. मंगेश नेने ;ऍड.मंगेश नेने याच्या हस्ते न्यु व्हिजन महाविद्यालयाच्या कार्यालयाचे उद्घाटन

पेण (विनायक पाटील):- पेण येथे ऍड.मंगेश नेने याच्या हस्ते न्यु व्हिजन महाविद्यालयाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.कोरोनाचे संकट असल्याने शासकीय नियमांचे पालन करण्यात आले.कोविड काळात राज्यातील शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.मात्र येणाऱ्या काळात सामाजिकदृष्ट्या आपल्या मनाशी खूणगाठ बांधून न्यु व्हिजन महाविद्यालयातून पेण तालुक्यातील विद्यार्थी उच्च अधिकारी होतील असे प्रतिपादन ऍड.मंगेश नेने यांनी केले.
     यावेळी पुढे बोलतांना मंगेश नेने म्हणाले की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरीता पेणमध्ये अधिक सोईस्कर शिक्षण मिळविण्यासाठी न्युज व्हिजन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली असून येथील विद्यार्थी आपले भवितव्य घडविताना संस्थेसह आई-वडिलांचेही नांव उज्वल करणार आहेत.
      न्यु व्हिजन महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या पाठीशी ही संस्था खंबीरपणे उभी राहणार असून त्यांना सवलत सुध्दा देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष राजु पिचिका यांनी सांगितले. यावेळी संचालक प्रविण कदम, शशिकांत दिघे, सुजित काठे, मिलिंद कांबळे, संचालिका प्रतिक्षा कदम, निता रामधरणे, गौरव रामधरणे प्रणाली कांबळे आदी उपस्थित होते.

भाजपच्या दिव्या ढोले यांच्या वतीने गरजू कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

मुंबई(शांत्ताराम गुडेकर)
         पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या ७ वर्षाच्या यशस्वी कार्यकाळाला सलामी देत कोरोनोच्या कठीण काळाच्या पार्श्वभूमीवर या दुसऱ्या टप्यातील लॉकडाऊन मध्ये कष्टकरी कुटुंबाना ज्यांची कामे या काळात हातून गेली अशा गरजू कुटुंबाना भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र सचिव तसेच संकल्प सिद्धी ट्रस्टच्या विश्वस्त श्रीमती दिव्या ढोले यांच्या  व  यूनिफाईड डेटा - टेक सोल्युशन्स प्रा. लिमिटेड" यांच्या संयुक्त विद्यमाने अंधेरी पश्चिम येथील साथ बंगला- वर्सोवा ह्या परिसरात १००० कुटुंबियांना राशन किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला  यूनिफाईड डेटा टेक सोल्युशन्स कंपनी चे संचालक  हिरेन मेहता आणि  त्याचे सर्व कर्मचारी, पियुष विभाकर , संकल्प सिद्धी ट्रस्ट च्या ट्रस्टी श्रीमती राज्यश्री खोपकर, संस्थेचे सहकारी भारत शर्मा , कमल कक्कर , मोहन नैनानी, अखील मेहता, गोपी नायर, ऍड घनश्याम मुलानी, झुबेर शेख , सलमा शेख, जी ७  मॉलचे कर्मचारी आणि वर्सोवा येथिल सर्व टीम लीडर्स ज्यांनी गरजू कुटुंबांची यादी संस्थेपर्यंत पोहचवली. त्यामुळे सर्व गरीब गरजू  एक हजार कुटूंबियांना एक महिना पुरेल एव्हढे रेशन किट देऊन थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिव्या ढोले यांनी सांगितले.

शनिवार, २९ मे, २०२१

कोविड १९ -मोबाईल लसीकरण व्हॅनचे पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांचे हस्ते माणगाव तालुक्यामधील तासगाव आदिवासी वाडी येथे उद्घाटन

अलिबाग :- जिल्हा परिषद आरोग्य विभाग,रायगड व स्वदेस फाउंडेशन यांच्या वतीने मोबाईल लसीकरण मोहिमेची सुरुवात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते माणगाव तालुक्यामधील तासगाव आदिवासीवाडी व म्हसळा तालुक्यातील चिखलप आदिवासीवाडी येथून करण्यात आली.
    यावेळी रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व स्वदेस फाउंडेशन चे उपसंचालक तुषार इनामदार यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन कार्यक्रम पार पडला.
     रायगड जिल्हा परिषद व स्वदेस फाउंडेशन यांच्यामध्ये मोबाईल लसीकरण व्हॅनच्या माधमातून रायगड जिल्ह्यामधील माणगाव तळा, म्हसळा, श्रीवर्धन, पोलादपूर, महाड व सुधागड तालुक्यामधील ४५ वर्षावरील दुर्गम भागांमध्ये राहणारे आदिवासी,अपंग व वयोवृद्ध ग्रामस्थांसाठी  लसीकरण मोहीम राबवण्याविषयी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे.
     स्वदेस फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, उपसंचालक तुषार इनामदार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी या सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत.
      मोबाइल लसीकरण उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, स्वदेस फाउंडेशन व जिल्हा परिषदेच्या मार्फत दुर्गम भागातील व  आदिवासी वाड्यांमधील ४५ वर्षावरील ग्रामस्थांचे लसीकरण त्यांच्या गावांमध्येच करण्यात येणार आहे, तसेच या गावांमध्ये असणारे दिव्यांग यांचेही लसीकरण करण्यात येणार आहे.
      दुर्गम भागातील लोकांना लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी जायला लागत होते व त्यासाठी त्यांचा वेळ व पैसाही खर्च होत होता आता मोबाईल लसीकरण व्हॅनच्या माध्यमातून या दुर्गम गावातील लोकांना कोरोना प्रतिबंधक लस त्यांच्या गावामध्येच  मिळणार आहे त्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद  सर्व अधिकारी , आरोग्य कर्मचारी  तसेच स्वदेस फाऊंडेशनचे  रॉनी स्क्रूवाला झरीना स्क्रूवाला व  मंगेश वांगे यांचे आभार मानले व टीम चे  कौतुक केले तसेच जास्तीत जास्त लोकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
   मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मोबाईल लसीकरण मोहिमेमध्ये सात तालुक्यामधील दुर्गम भागात लसीकरणात करण्यात येणार आहे असे सांगून स्वदेस फाऊंडेशन  व  आशा, अंगणवाडी ताई व सर्व आरोग्य कर्मचारी ,अधिकारी यांच्या मदतीतून आदिवासी, अपंग, वयोवृद्ध यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार असल्याचे नमूद केले व  मोबाईल लसीकरण व्हॅनच्या माध्यमातून दररोज तीनशे ते चारशे लोकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
     स्वदेस फाऊंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार यांनी लसीकरणासाठी तीन मोबाइल व्हॅनचा वापर करण्यात येणार असल्याचे सांगून जास्तीत-जास्त अतिदुर्गम भागातील लाभार्थीपर्यंत ही मोहीम घेऊन जाणार असल्याचे सांगितले. 
     कार्यक्रमासाठी तासगाव सरपंच प्रकाश जंगम, विकास समिती तासगाव आदिवासीवाडी अध्यक्ष अंकुश जाधव, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र जगताप, गटविकास अधिकारी सतीश गाढवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.परदेसी, ग्रामसेवक बाळाराम जाधव, बाबूशेठ खानविलकर, सुभाष केकाणे, आशा वर्कर कीर्ती कडू, प्राथमिक शिक्षक अर्चना शेळके  व स्वदेस फौंडेशन चे विनोद पाटील अविनाश रेवणेनयन पोटले, राहुल टेंबे, सुधीर कांबळे, अनिल सिंग उपस्थित होते.

लॉकडाउनमध्ये प्रेरणा फाउंडेशनचा बदलापूर येथे २०० लोकांना अन्नदानाचा विशेष कार्यक्रम

बदलापूर न्युज / अविनाश म्हात्रे:  नेहमीच प्रेरणा फौंडेशनचा गोरगरीब जनतेबद्दल समाजसेवेचा प्रेरणादायी विशेष कार्यक्रम असतो,सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक, कला वगैरे मध्ये नवीन काहीतरी करण्याची धडपड जिद्द सौ. प्रेरणा गावकर यांची असते, नुकताच बदलापूर शांतीनगर तेथे दि. २८/५/2020 . ३०० / ४०० लोकवस्तीअसलेल्या गोरगरीब मोलमजुरीकरून जगणाऱ्या  बंजारा समाजाला अन्नदानाचा  कार्यक्रम करून तेथील लोकांचा समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला, प्रेरणा फाउंडेशन गेली कित्येक वर्ष समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत आहे ,सामाजिक , कला क्षेत्र ,स्वच्छता अभियान , शैक्षणिक क्षेत्र , जनसेवा व लोक कल्याणासाठी कार्यरत असलेले बदलापूरचे  प्रेरणा फाउंडेशन लॉकडाउन चा काळात २०२० पासून ते आजपर्यंत ह्या बिकट परिस्थितीत जवळपास 1000 हुन हि जास्त लोकांचे अन्नदाता बनून आधारस्तंभ ठरले आहेत, त्यांच्या या  समाजकार्याबद्दल समजावून अनेक लोकांनी त्यांना नेहमी प्रोत्साहन देऊन त्यांच्या या स्तुत्य कार्यक्रमाचे अभिनंदन केले आहे.स्वतः  प्रेरणा  गावकर सस्थापिका यांचा मोलाचा  पुढाकार असतो त्यांना  साथ देणारे सहखजिनदार दिव्या  गावकर ,वैभव कुलकर्णी, सभासद् संजीव जैन मा ,रेखा राठोड  माननीय सभासद सुनील इंगळे,परेशा परब यांचे मोलाचं सहकार्य  लाभले 




घरकाम करणाऱ्या 300 महिलांना आमदार व माजी राज्यमंत्री रविंद्र दत्ताराम वायकर यांच्या हस्ते शाखा क्र. ७२ च्या वतीने मोफत कांद्याचे वाटप

मुंबई :  विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र दत्ताराम वायकर यांच्या हस्ते उपविभागप्रमुख जयवंत लाड यांच्या वतीने घरकाम करणाऱ्या ३०० महिलांना मोफत कांद्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी शालिनी सावंत (जो.म. वि. संघटक), जयवंत लाड (उपविभागप्रमुख) )दिपाशा पवार (उप.वि.संघटक) अमर मालवणकर (शाखाप्रमुख),समीक्षा माळी (शाखासंघटक) शीला येरागी, उमेश कदम (शाखा समन्वयक), छाया राणे, उमेश राणे, विशाल येरागी, गणेश गुंडाळ, नरेश राठोड, सावली शेलार, व शाखेचे सर्व पदाधिकारी हे शासनाने घालून दिलेले नियम पाळून उपस्थित उपस्थित होते.

अदाणी इलेक्ट्रिसिटी दक्षिण विभाग मुखकार्यालय येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना

मुंबई(समीर खाडिलकर / शांत्ताराम गुडेकर)
           महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुनर्स्थापना  सोहळा ४ था मजला, एल एँन्ड टी, सिटी -२, कुर्ला कलिना रोड, सांताक्रूझ (पूर्व) येथील अदाणी इलेक्ट्रिसिटी दक्षिण विभाग मुखकार्यालय येथे करण्यात आली.यासमयी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना खासदार श्री.गजानन कीर्तिकर तसेच  मानव संसाधन विभागप्रमुख श्री. मनोज शर्मा तसेच आमदार श्री. विलास पोतनीस व अदानी एच.आर प्रमुख श्रीमती चंदा वनमाळी,शिवसेना प्रणित महाराष्ट्र विद्युत जनरल कामगार सेना अध्यक्ष मान.श्री.कुणाल सरमळकर यांची उपस्थिती होती.

शुक्रवार, २८ मे, २०२१

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून काम करणारे वनिता फांऊंडेशनचे खजिनदार मिलिंद निकाळे काळाच्या पडदयाआड.....!

विक्रोळी टागोरनगर येथील ज्येष्ठ समाजसेवक तक्षशिल मित्र मंडळाचे अध्यक्ष व वनिता फांऊंडेशन या सामाजिक संघटनेचे खजिनदार मिलिंद दामोदर निकाळे यांचे नुकतेच ४९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांचा जलदान विधीचा कार्यक्रम रविवार दि. ३० मे २०११ रोजी विकोळी कन्नमवार नगर येथील राहत्या घरी आयोजित केला असून त्यानी सामाजिक बांधिलकाची जाण ठेवून केलेल्या कार्याची ओळख करून देणारा लेख प्रसिध्द करत आहोत.

"सत्कर्माच्या दिव्य फुलांनी देव पुजिला ज्याने "अनंत त्यांची जीवनयात्रा कधी न सरे मरणाने || "

    विक्रोळीतील टागोरनगरचे रहिवाशी असलेले मिलिंद निकाळे यांचा जन्म १ सप्टेंबर १९७२ मध्ये एका गरीब कुटुंबात झाला असून त्यांचे वडील दामोदर निकाळे एका प्रायव्हेट कंपनीत नोकरीला होते. तर आई लक्ष्मीबाई दामोदर निकाले । होत्या. भाऊ व बहिणीसह पत्नी मृण्मयी निकाले, मुले गौरी, रिथ्वी, सिध्दांत व सर्वेश यांच्यासह विक्रोळी टागोरनगर येथील ग्रुप नं. ८ येथील हॉसिंग बोडांच्या बैठया चाळीत सन २०१४पास होते. सन २०१४- नंतर बैठया पुनर्विकास करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन दि सिचर टॉवर' या नावाने २० ते २५ माळयाच्या बिल्डींगचे काम सुरु आहे. त्यांच्या कार्याची ही एक पोचपावतीच असल्याचे समजते.
    मिलिंदचे प्राथमिक शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण विदयामंदीर शाळेत झाले. आठव्या इयतेत असताना त्यांनी कामाला सुरुवात केलेली होती. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे कोणतेही पडेल ते काम करून शिक्षणाबरोबर नोकरीही करत. एस.एस.सी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी शिक्षणाकडे पाठ फिरवून कन्स्ट्रक्शन / बांधकाम क्षेत्रात त्यांना आवड निर्माण झाली. प्रथम त्यांनी RNA डेव्हलपर्स ग्रुपमध्ये लायझनिंग पदावर काम करू लागले या क्षेत्राचा त्याचा मोठा अभ्यास होता. वयाच्या १४ ते १५ व्या वर्षापासून कामाला सुरुवात केली होती. पदवी / डिप्लोमा घेतलेल्या व्यक्तींना हे काम जमत असे काम फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेऊन सहजरिया करणारा अवलिया म्हणजे मिलिंद निकाळे होते. मोठा भाऊ सुनिल निकाळे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पुर्ण केले तसेच छोटा भाऊ मनोज निकाळे यांनासुध्या त्यांनी RNA डेव्हलपर्स ग्रुपमध्ये लावले असून बहिण वनितालाही महाराष्ट्र शासनातंर्गत असणाऱ्या एकात्मिक बालविकास प्रकल्पामध्ये 'अंगणवाडी सेविका म्हणून कामाला लावले. भाऊ सुनिल यांच्या सहकार्याने मुलगी गौरी व रिध्दी यांनी दहावी व नववीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून सिध्दांत व सर्वेश ही जुळी मुले सातव्या इयत्तेत पदार्पण करणार आहेत. असा त्यांचा कौटुंबिक परिवार सांभाळत विक्रोळी परिसरात कोणत्याही ठिकाणी जयंती व इतर उपक्रमात ते हिरीरीने सहभाग घेऊन अडलेल्या नडलेल्या गरजूना मदतीचा हात पुढे करणारे सर्वांचे लाडके प्रेमळ असे मनमिळाऊ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने विक्रोळी नगर परिसरात हळ व्यक्त करण्यात येत आहे.
     कोणतेही काम करत असताना ते काम मी केले असे कधीही बोलून दाखवत नव्हते. प्रसिध्दीपासून ते चार हात लांब होते. चाळीमध्ये असो वा बिल्डिंगमध्ये असो, कोणत्याही कामाला किंवा कार्यक्रमाला मदत करून बाजूला होत असे. जमेल तशी मदत करणारा दिलदार चळवळीचा कार्यकर्ता होता. मिलिंदचे वैयक्तिक जीवन फक्त स्वतःच्या घरापुरते मर्यादित नव्हते. त्यांचे निकाळे कुटुंब म्हणजेच वडीलाचे गाँव, आईचे माहेर, पत्नीचे माहेर, बहिणीचे व भावाचे सासर असण मोठा परिघ त्यांच्यासमोर होता. या सगळ्याकडे त्यांचे जाणे येणे होते. सगळ्यांना बरोबर घेऊन चालणे मिलिंदचा फार मोठा गुण होता. सर्वांना आपुलकीने व बरोबरीच्या नात्याने वागविणे हा त्याचा सहज स्वभाव होता. सहकारी गृहनिर्माण म्हणजे मोठमोठ्या इमारतीचे / / बैठया चाळींचे पुनर्विकास करणे हाच त्याचा ध्यास होता. रात्रंदिवस त्यांच्या मनीमानसी हाच विषय असे. शेकडो सोनावटयाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे व त्या सोडविण्यासाठी कार्यप्रवण होण्याची त्यांना संधी वाटायची, मी कमी शिकलो आहे. मोठया साहेबाशी / अधिकाऱ्याशी कसे काय बोलू शकती असे त्यांना कधीच वाटले नाही. पदवी / डिप्लोमा घेतलेल्या तरुणांना लाजवेल असे से काम करत होते. फक्त एस. एस. सी पर्यंत शिक्षण घेऊन अनुभवातून कन्स्ट्रक्शनलाईनचे कामे अगदी चुटकीसरशी करत असायचे. ऑफिस मधील सर्व कामगारांना कार्ड  पंचिंग केल्याशिवाय प्रवेश नाही, मग मिलिंदला नियम लागू नव्हता. कारण ते ऑफिसची सर्व बाहेरची कामे करत असून संध्याकाळी सहापर्यंत घरी येऊन सातच्या आत रात्रीचे जेवण घेत होते, थोडाजरी जेवायला उशीर झाला तरी ते न जेवत जायचे जेवण झाल्यावर टी बसता बाहेर राऊंड मारुन येत होते. त्याचे मोठेपण हे अथवा अविष्काराद्वारे अभिव्यक्त करण्याचे साधेसुधे नव्हते. अनेक मोठमोठया व्यक्ती त्यांच्या परिचित होत्या, ते कामानिमित्ताने अनेक व्यक्तिीची ओळख करून घेऊन सर्वांचे भले कसे होईल. या विचाराने प्रेरित झालेले असे महान व्यक्तिमत्व होते. आयुष्यभर त्यांची राहणी साधेपणाचीच होती. आजच्या काळात असे व्यक्तिमत्व असू शकते यावर कोणाचा विश्वास बसणार हा पैलू मला विचार करणारा ठरला असून आयुष्याकडे वेगळ्या नजरेने बघायचे. ते सर्वार्थाने मेहनती, बुध्दीमान, सत्वशील कुटुंब सदस्य होते. वयाच्या चौदा ते पंधराव्या वर्षापासून कामाला सुरुवात करून स्वतःला वाहून घेऊन आपल्या कार्यकर्तृत्वाची कायमची मुद्रा स्थानी उमटविली हे कळलेच नाही. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकानी काम करायला पाहिजेत.मिलिंद स्वभावत: सात्विक होते, म्हणूनच त्यांची धार्मिकताही होती, पण त्यांनी कधी कर्मकांडाचा बाऊ केला नाही. सोवळे ओवळे नाही की जातपात जुमानली नाही,  अनेक देवास्थानी जात पण त्याची भौगोलिक ऐतिहासिक माहितीही करून घेत असत. कोणत्याही प्रथेचा अगदी धार्मिकदेखील आजच्या सामाजिक समस्या सोडविण्याच्या संदर्भात उपयोग व्हायला हवा असे त्यांना मनापासून वाटत असे. ते सतत वर्तमानकाळात रमायचे, सुजनशीलता, शालीनता, बुध्दीमता आणि तत्परता याचे मूर्तिमंत प्रतिक म्हणजे मिलिंद .....!
    'पानी का रंग कैसा रंग मिलाणे तैसा' अशा प्रकारे शांत समईची ज्योत असा त्याचा स्वभाव होता. अनेक वेळा त्याना झालेल्या त्रासाबद्दल कधीच कुणाकडे तक्रार करत नव्हते. मी ठिक आहे. 'I am ok' असे म्हणून ते पुढे जात होते. काही तक्रार असल्यास बहिणीला हक्काने सांगत असायचे. त्यानी अनेकवेळा ऑफीसच्या कामानिमित्त दिल्लीवारीसुद्धा केलेली होती. ऑफिसला जाण्यासाठी व ऑफिसची बाहेरची कामे करण्यासाठी चार चाकी गाडी घेतलेली होती ती चालविण्यासाठी ड्रायव्हर होता. त्याचा पगार ते स्वतः देत होते. प्रत्येक ऑफिसरशी / अधिकाऱ्याशी गोडी गुलाबीने बोलून काम करुन घेत होते. मिलिंद म्हणजे सर्वसामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबवत्सल घरातील सर्वाचे लाडके व्यक्तिमत्व होते. त्याच्या आयुष्याच्या वेध घेण्याची संधी मिळाली हे काम तडीस नेताना मिलिंदच्या आयुष्याचे विविध रंग व रुप संपर्कात आलेल्या लोकांनी, मित्रांनी पाहिलेले आहे. एका महासागरात उडी मारल्यानंतर तुमच्या हाती विविध रंगाचे, आकाराची रत्ने सापडतील, त्याच्या अनुभवाचे / आयुष्याबद्दलचा नवा विचार तुम्ही करु लागाल ? असा हा अवलिया सगळयाना सोडून अवघ्या ४९ व्या वर्षात निघून जाणे, कुणाच्याही हातात नव्हते. प्रत्येकाची वेळ आल्यानंतर जाणे महत्वाचे असते, थांब म्हटल्यानंतर तो थांबू शकत नाही.
    कुटुंबातील प्रत्येकावर त्याचे बारीक लक्ष असायचे. प्रत्येकाशी त्याचा व्यक्तिगत संवाद होता. त्यांची आपुलकी व प्रेमळ वागण्यामुळे कोणताही आडपडदा न ठेवता मनातली प्रत्येक गोष्ट त्यांच्यासमोर सहज प्रवृत्तीने पुढे यायची, सर्वांच्या मनात त्यांच्या विषयी प्रेम होते. आपुलकी होती, त्याची साधी राहणी त्यांच्या खाण्यापिण्याचे फारसे चोचले नव्हते. घरात केलेला स्वयंपाक ते न कुरकुरता खायचे, त्यांचे जगण्यावर प्रचंड प्रेम होते. समृध्द व्यक्तिमत्वाने ओतप्रोत भरलेला कल्पवृक्ष उन्मळून पडला आहे. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कुणीतरी अज्ञात शक्तीने आमच्यामधून कायमचा हिरावून गेला असे वाटते आहे. मिलिंद आपल्यात नाहीत पण त्यानी बांधकाम क्षेत्रात दिलेले योगदानच आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहील यात निळमात्र शंका नाही. त्याचे कर्तृत्व इतके मोठे होते मात्र त्याना मोठेपणाचा हव्यास कधीही नव्हता, मनाने मोठे होते, मात्र त्याचा कुठेही गाजावजा नसे. दिवसभर ते एका विलक्षण ऊर्जेने भारलेले असत. त्याचं व्यक्तिमत्व व बुध्दीमता, स्मरणशक्ती कामाची तळमळ एवढी प्रखर होती की, कोणी अधिकारी वा मित्रपरिवार व कुटुंबातील व्यक्तिीशी खोटे बोलून त्यांची दिशाभूल करण्याचं धाडस करु शकत नव्हते, तीस ते पस्तीस वर्षे त्यांनी अपार कष्ट केले. जे जे शक्य ते ते सर्व केले, घरच्यांनी त्यांच्या कार्यात कधीही आडकाठी आणली नाही, तो मनाचा राजा होता, दिलदार व्यक्तिमत्व होते. तसेच तक्षशिल मित्र मंडळाचे आधारस्तंभ व वनिता फांऊंडेशन या सामाजिक संघटनेचे खजिनदार म्हणून काम पहात होते. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून काम करणारे युवा नेतृत्व दि. २१ मे २०२१ रोजी काळाच्या पडदयाआड गेल्याने विक्रोळी टागोरनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विक्रोळी येथील ज्येष्ठ पत्रकार व गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे यांचे ते मेहूणे होते.
     वटवृक्षाच्या सावलीखाली छोटी छोटी रोपे वाढतात, मोठी होतात, पण आम्ही त्या वृक्षाचा आधार मात्र सोडत नाही. तशी अवस्था आम्हा सर्वाची झालीय. मिलिंद हा वटवृक्षच सर्वांना सोडून गेला. आम्ही सर्वजण त्यांच्या जाण्याने पोरके झालो इतकेच त्याच्या जलदान विधी कार्यक्रमाच्या निमित सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना महामारीच्या काळात सर्वांनी घरातूनच नतमस्तक होऊन आंदराजली वाहून दुःखात सहभागी व्हावे. हीच मिलिंदला श्रध्दांजली.

-प्रभाकर कांबळे (गुणवंत कामगार / संस्थापक वनिता फाऊंडेशन विक्रोळी)
संपर्क :९५९४२९३७३४

राज्य गुणवंत कामगार असोसिएशन"च्यावतीने - आॅनलाईन प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ; वीज वितरण, बँकिग व इतर सार्वजनिक क्षेत्रात खाजगीकरणामुळे, सर्वच क्षेत्रातील कामगार व ग्राहकांवर होणारे गंभीर परिणाम या विषयांवर विस्तृत चर्चा व मार्गदर्शन

मुंबई : राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांचेवतीने, गुगल मिटच्या माध्यमातून आॅनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. 
    प्रथम सत्रात मा. कृष्णाजी भोयर सर यांनी, महाराष्ट्रातील वीज निर्मितीच्या इतिहासापासून आजअखेर देशामध्ये घडलेल्या घडामोडींची इत्यंभूत माहिती दिली. वीज निर्मितीमध्ये खाजगी कंपन्या आल्या. केंद्र सरकारने नवीन कायदा आणला. पण खाजगी विज निर्मितीचा उदात्तीकरणाचा उद्देश व हेतू आजही सफल झाला नाही. वीजनिर्मितीबाबत २०२१ पर्यंत अनेक नवीन कायदे आणले. विजेचे दर ठरविण्याचे अधिकार केंद्र सरकारने स्वतःकडे घेतले. सबसिडी देण्याचे अधिकार केंद्र सरकारने स्वतःकडे घेतले. विज उद्योगातील कामगारांना पुढे संरक्षण मिळणे आवश्यक आहे, याबाबत त्यांनी स्पष्ट मत मांडले. वीज उद्योगाचे खाजगीकरण झाल्यास, समाजातील वंचित व उपेक्षित घटकांवर होणारे परिणाम आदी.बाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
     दुस-या सत्रात मा. गिरीश भावे सर यांनी, सार्वजनिक सेवेमधील मुलभुत गरजा, शिक्षण, आरोग्य, परिवहन सेवा, इत्यादी बाबत सडेतोड मत व्यक्त केले. शिक्षण व आरोग्य सेवेमध्ये खाजगीकरण होवून मिळणाऱ्या सेवा, सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या झाल्या आहेत. सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची रा. प. परिवहन (एस. टी.) सेवा खाजगीकरण करण्याकडे वाटचाल करीत आहे. या सर्व सेवांमधुन कामगारांचे हित जपले गेले पाहिजे. सर्वच सार्वजनिक सेवांचा भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्कांमध्ये समावेश असून, केंद्र सरकारचे धोरण हे भांडवलशाहीस अनुकूल असलेने एकंदरीत देशाच्या प्रगतीसाठी, समाजातील सर्वच घटकांनी, याविरूद्ध आवाज उठविणे आवश्यक असलेचे प्रतिपादन केले.     
       तिसऱ्या सत्रात मा. विश्वास उटगी सर यांनी, बँकेच्या खाजगीकरणाकडे असलेली सरकारची वाटचाल हि, कामगार विरोधी व भांडवलदार यांना मोठे करण्याकडे असल्याचे सडेतोड मत व्यक्त केले. सुरूवातीच्या काळातील बँकांच्या निर्मितीबाबतचे धोरण व सध्याचे केंद्र सरकारचे भांडवलदारांना पोषक धोरण, यामुळे गोरगरीब जनता व सर्वसामान्य कामगार वर्गाचा बँकेतील जमा असणारा पैसा हा, खाजगी मालक वर्गांच्या ताब्यात जाणार असलेचे नमूद करून, भविष्यात हे मोठे संकट निर्माण होण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला. कारण यापूर्वी अनेक भांडवलदार देशातील संपत्ती घेऊन, देश सोडून पळून गेलेचे त्यांनी स्पष्ट केले. देशातील अनेक खाजगी बँकांना नफा होवूनही भागधारकांना लाभांश वाटत नाहीत, हि अतिशय खेदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. बँकांचे झालेले विस्तारीकरण व सध्याचे खाजगीकरणापर्यंतची कार्यवाही याबाबत अत्यंत मौलिक व अभ्यासपूर्वक माहिती त्यांनी दिली. यापुढील काळात आपले व पुढील पिढीचे भवितव्य सुद्धा बँकांवरतीच अवलंबुन असलेचे त्यांनी स्पष्ट केले. कामगार विरोधी धोरणांबाबत शिक्षण, बँका, रेल्वे, परिवहन सेवा इत्यादी सार्वजनिक क्षेत्रातील कामगारांच्या हितासाठी मोठी चळवळ उभी करणे आवश्यक असल्याचे स्पष्टपणे सांगितले.
    विषयपत्रिकेनुसार प्रश्नोत्तरांच्यावेळी, मान्यवर श्रोत्यांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांची - सन्मा. वक्त्यांनी समाधानकारक व अभ्यासूपूर्वक माहिती देऊन उपस्थित सर्वांचे समाधान केले.अध्यक्षीय मनोगतामध्ये - राज्यातील ३६ जिल्ह्यातील प्रमुख गुणवंत कामगार विधायक कार्यासाठी एकत्र येवून, "राज्य गुणवंत कामगार असोसिएशन"ची स्थापना केली असलेचे स्पष्ट करून, गेल्या वर्षभरात कोरोनामुळे लाखोंच्या नोक-या गेलेल्या आहेत. ज्यांच्या उरल्या आहेत, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सातत्याने पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहेत. कोरोनाच्या काळात समाजातील सर्वच घटकांना केंद्र सरकारकडून दिलासा मिळण्याऐवजी, संविधानातील नमूद कायद्यांची पायमल्ली होताना दिसत आहे. कामगार कायद्यातील बदल, शेतकरी आंदोलन, सेवानिवृत्त पेन्शनधारकांबाबत अन्यायकारक धोरण, देशातील आरोग्य सुविधांचा बोजवारा, बी. एस. एन. एल, जे. एन. पी. टी, एअर पोर्ट आदींचे खाजगीकरण यामुळे देशासमोर मोठे संकट आवासून उभे आहे, त्याचा निकराने मुकाबला न केलेस आपले भविष्य अंधकारमय आहे, याबाबत समाजातील सर्वच घटकांचे प्रबोधन व्हावे, समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, कारण कोरोनामुळे देशात लाॅकडाऊन सुरू आहे. या कारणास्तव कोणालाही आंदोलने करता येत नाहीत, जमावबंदी आहे. या आपत्ती काळाचा केंद्र सरकार गैरफायदा घेऊन, देशात हुकूमशाही धोरण राबवित आहे. यासाठी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या माध्यमातून, सातत्याने आॅनलाईन कार्यक्रमांचे नियोजन करीत असलेचे, त्याचबरोबर राज्यातील ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या काळात समाजाभिमुख व उल्लेखनीय कार्य केलेले आहे, त्यांना "कोरोना योद्धा गौरव सन्मानपत्र" देवून गौरविणार असलेचे, असोसिएशनचे अध्यक्ष - मा. सुरेश केसरकर यांनी, आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. 
कार्यक्रमाच्या सुरूवातीला मा. भगवान पाटील (धुळे) यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. प्रस्ताविक मा. शिवाजीराव इंगवले (सातारा) यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी मा. सुधीर मुंडे (बीड) यांनी आभार मानले. तर मा. देवराव कोंडेकर (गडचिरोली) यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.
    यावेळी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सर्वच जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यध्यक्ष यांनी कार्यक्रम यशस्वी होणेकरीता योगदान दिले. यावेळी म. का. क. मंडळाचे मा. प्र. क. आयुक्त - मा. सतीश दाभाडे, म. का. क. मंडळाचे मा. सदस्य - मा. दत्तात्रय चौगले, विविध क्षेत्रातील तज्ञ व जाणकार मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी, गुणवंत कामगार बंधू - भगिणी व सर्वच क्षेत्रातील कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.

आरे सबवेतील अस्वच्छता ; रोगराई वाढून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता

मुंबई : गोरेगाव पूर्व-पश्चिम जोडणारा आरे प्रवासी सब-वे खूपच अस्वच्छ असून येथे ठिकठिकाणी प्लास्टिक,कागद,तुटलेल्या वस्तू दिसुन येतात.अनेक फेरीवाले व भिकाऱ्यांचे येथे वास्तव्य असून काही रोगीही निदर्शनास येतात.अनेक ठिकाणी ओला कचरा असल्याने त्याचा कुबट वास येतो.यामुळे रोगराई पसरण्याची अधिक शक्यता आहे.येथील काही लाईट नादुरुस्त अवस्थेत असून काही ठिकाणी काळोख पसरलेला आहे.एकट्या महिलेला येथून सुरक्षित प्रवास करणे धोक्याचे असून कधीही येथे अनुचित प्रकार घडू शकतो.तेव्हा या सर्व गोष्टींची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी व स्थानिक सर्वपक्षीय लोकप्रतीधींनी घेणे जरुरीचे असून लावकरच याठिकाणी सुधारणा करण्यात यावी अशी मागणी स्थनिक सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी केली आहे.

ग्लोबल हेलपिंग हँडस संस्थेतर्फे गरजूंना सहकार्य...

मुंबई(प्रतिनिधी)- कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्रच चिंतेचे आणि भीतीचे वातावरण असताना सर्वांनी स्वच्छ आणि नीट राहणे गरजेचे आहे. प्रत्येक सामाजिक संस्था आणि राजकीय पक्ष आपल्या आपल्या परीने, सर्वांना ह्या कठीण काळी  मदतीचे हात पुढे करत आहेत व याच अनुषंगाने मुंबई अंधेरी पूर्व पंपहाउस येथील ग्लोबल हेलपिंग हॅण्ड्स फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने सर्वांनी नीटनेटके आणि स्वच्छ राहावे ह्या हेतूने वापरण्यायोग्य स्वच्छ आणि नीटनेटके असे कपडे मुंबईतुन अनेक ठिकाणाहून गोळा करून आरे कॉलनी येथील आदिवासी समजामध्ये ए. के. फाउंडेशनचे अध्यक्ष अथर्व कदम ह्यांच्या सहाय्याने जवळपास 300 गोर-गरीब व गरजू कुटुंबीयांना वाटप करण्यात आले जेणे करून ते सुद्धा आपल्या सारखे सुरक्षित राहू शकतील.या कठीण काळात सर्वांनीच आपल्याला जस शक्य होईल तस आपल्या सभोवताली असलेल्या गरजू लोकांना सामाजिक जाणीव ठेऊन सर्वांना मदत करत राहिले पाहिजे असे यानिमित्ताने ग्लोबल हेलपिंग फॉउंडेशन चे अध्यक्ष शुभम मेणे ह्यांनी सांगितले.

मत्स्य व्यावसायिकांना ठेका रक्कम भरण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ ;मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख


मुंबई  : कोरोना (COVID-19) संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव/जलाशयाची चालू वर्षाची ठेका तलाव रक्कम भरण्यास तसेच मत्स्य बोटुकली संचयनाची आगाऊ रक्कम भरणे आणि मत्स्य बीज केंद्राची रक्कम भरणे आदीसह विविध उपक्रमाच्या शासकीय भरणा करण्यास सहा महिने मुदतवाढ दिली असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
     कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सध्या कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना क्षमतेनूसार मासेमारी करता आलेली नाही. तसेच उत्पादीत मासळीची विक्री करण्यास देखील पुरेसा वाव  मिळालेला नाही. त्यामुळे राज्यातील मच्छिमारांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. 
    ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहेत. यानुसार, राज्यातील मासेमारीकरीता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव/जलाशयांची चालू वर्ष सन 2021-22 ची वार्षिक तलाव ठेका रक्कम भरणा करण्यास व इष्टतम मत्स्य बोटुकली संचयनाची 10 टक्के आगाऊ रक्कम भरणा करण्यासाठी ठेका रक्कम भरणा करण्याचा अंतिम दिनांक 31 मे, 2021 पासुन पुढे सहा महिने (दि. 30 नोव्हेंबर, 2021) पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच भाडेपट्टीने देण्यात आलेल्या मत्स्यबीज केंद्रांची चालू वर्षाची भाडेपट्ट्याची रक्कम भरणा करण्यास ठेका रक्कम भरणा करण्याच्या अंतिम दिनांकापासुन पुढे सहा महिने मुदतवाढ  देण्यात येत आहे.
    पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धनासाठी १% व 0.5% क्षेत्र ठेक्याने दिलेल्या क्षेत्राची ठेका रक्कम भरणा करण्यास ठेका रक्कम भरणा करण्याच्या अंतिम दिनांकापासुन पुढे सहा महिने  मुदतवाढ  देण्यात  आली आहे.
   संकटकाळात राज्य शासन नेहमीच मच्छिमार बांधवांच्या पाठीशी उभा आहे.  या निर्णयामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या राज्यातील मत्स्यव्यवसायिक, मत्स्यव्यवसाय संस्था तसेच मच्छिमारांना दिलासा मिळणार आहे, असे श्री. शेख यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या महिला आणि बालविकास मंत्रालयांतर्गत “संवेदना” दूरध्वनीद्वारे कोविड-19 मुळे प्रभावित मुलांना समुपदेशन ; 1800-121-2830 या टोल फ्री क्रमांकावरुन कोविड-19 मुळे तणावग्रस्त असलेल्या मुलांना दिला जातो मानसिक आधार

अलिबाग : कोविड-19 मुळे प्रभावित  मुलांना मानसिक प्रथमोपचार आणि भावनिक आधार देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) संवेदना  (भावनिक विकासाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत  संवेदनशील कृती) दूरध्वनीद्वारे समुपदेशन केले जात आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) ही एक वैधानिक संस्था असून महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकारच्या अखत्यारीत कार्यरत आहे.
      कोविड-19 महामारीच्या काळात पीडित मुलांसाठी मनोवैज्ञानिक -सामाजिक मानसिक आधार देण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे. कोविड - 19 संदर्भात विविध मनोविकार विषयक मुद्द्यांना बालक आणि किशोरवयीन मानसोपचार विभागाचे प्रा.डॉ.शेखर शेषाद्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित पात्र तज्ञ/समुपदेशक/मानसशास्त्रज्ञांच्या नेटवर्कद्वारे दूरध्वनीवरून हे समुपदेशन दिले जात आहे.
       महामारीच्या संकटात तणाव, चिंता, भीती आणि इतर समस्या सोडवण्यासाठी मुलांना मानसिक आधार देणारी संवेदना ही समुपदेशन सेवा  आहे. ही सेवा टोल-फ्री क्रमांक: 1800-121-2830 वर सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि दुपारी 3  ते  संध्याकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध आहे.  ही सेवा केवळ अशा मुलांसाठी आहे जे बोलण्यास इच्छुक आहेत आणि ज्यांना समुपदेशनाची आवश्यकता आहे. जेव्हा एखादे  मूल /  पालक SAMVEDNA 1800-121-2830 डायल करतात, तेव्हा त्यांना सुरक्षित वातावरणात एखाद्या व्यावसायिक सल्लागाराशी बोलायला मिळते. 
     *तीन श्रेणी अंतर्गत  मुलांना हे  समुपदेशन केले जातेः-*
1.अलगीकरण/विलगीकरण  / कोविड  केअर सेंटरमधील मुले.
2.अशी मुले ज्यांचे  पालक किंवा कुटुंबातील सदस्य आणि प्रिय व्यक्तींना करोनाची लागण झाली आहे
3.कोविड 19 आजारामुळे आई-वडील गमावलेली मुले.
   हे टोल फ्री टेलिसमुपदेशन संपूर्ण भारतातील मुलांना तामिळ, तेलगू, कन्नड, उडिया, मराठी, गुजराती, बंगाली इत्यादी विविध प्रादेशिक भाषांमध्ये केले जाते.  ही सेवा सप्टेंबर, 2020 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि  कोविड महामारीच्या काळातही  मुलांना मदत पुरवित आहे. 
00000000

सुयोग्य बदलासह पीक स्पर्धा खरीप हंगाम 2021 साठी नव्याने स्पर्धा जाहीर ;शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकासाठी दि.31 जुलै पूर्वी तर इतर खरीप पिकासाठी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन

अलिबाग : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्याचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. 
       हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या खरीप हंगामापासून पूर्वीच्या पीकस्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करून नव्याने स्पर्धा राबविण्यात आहे.      
       *सध्याच्या पीक स्पर्धेतील महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत :-*
  पीक स्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल.     
      खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी). तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशी एकूण 11 पिके आहेत. 
       प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5,पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांचे शेतावर त्या पिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यकआहे.
     पुरेसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीक स्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. 
      तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी 05 व आदिवासी गटासाठी 04, स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. 
     प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम रुपये 300/-आहे.
  *अर्ज दाखल करण्याची तारीख:-*
1) मूग व उडीद पीक-31 जुलै, 2021, 2) भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल- 31 ऑगस्ट 2021 
       पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकाचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, 7/12, 8अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास या कागदपत्रांची पूर्तता करून कृषी
कार्यालयात द्यावे.
     *पीक स्पर्धा विजेत्यांसाठी बक्षीस स्वरूप :-*
स्पर्धा पातळी, तालुका पातळी, सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षीस रुपये-पहिले बक्षीस रुपये 5 हजार, दुसरे बक्षीस रु.3 हजार, तिसरे बक्षीस-रु.2 हजार 
स्पर्धा पातळी-जिल्हा पातळी, सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये-पहिले बक्षीस रुपये 10 हजार, दुसरे बक्षीस रु.7 हजार, तिसरे बक्षीस-रु.5 हजार 
स्पर्धा पातळी-विभाग पातळी, सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षीस रुपये-पहिले बक्षीस रुपये 25 हजार, दुसरे बक्षीस रु.20 हजार, तिसरे बक्षीस-रु.15 हजार 
स्पर्धा पातळी-राज्य पातळी, सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षीस रुपये-पहिले बक्षीस रुपये 50 हजार, दुसरे बक्षीस रु.40 हजार, तिसरे बक्षीस-रु.30 हजार 
      पीक स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक / कृषी पर्यवेक्षक / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच रब्बी हंगाम 2020 मध्ये पीक स्पर्धेसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याप्रमाणे खरीप हंगाम 2021 साठी देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकासाठी दि.31 जुलै पूर्वी तर इतर खरीप पिकासाठी 31 ऑगस्ट 2021 पूर्वी सादर करून पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्त, धीरज कुमार व कृषी संचालक विकास पाटील यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.

मतदार राजाने राजेश मोकल यांच्या बाजूने कौल देऊन इतिहास घडविला ;13 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी ठरावाच्या विरोधात केले मतदान

पेण (विनायक पाटील) :- पेण तालुक्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश मोकल यांच्याविरुद्ध ग्रामपंचायतीच्या 13 विद्यमान सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. या अविश्वास ठराव प्रस्तावाच्या अनुषंगाने वडखळ ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा व गुप्त मतदान जय किसान विद्या मंदिर वडखळ येथे आयोजित करण्यात आले होते. मतदार राजाने राजेश मोकल यांच्या बाजूने  कौल  देऊन इतिहास घडविला. 
     यावेळी ग्रामपंचायत हद्दीतील  २१८१ मतदारांनी गुप्त मतदान केले.पहिल्या फेरीत 1000 मतांपैकी ठरावाच्या बाजूने 464 तर विरोधात 524 व 12 मते बाद झाली. पहिल्या फेरीत राजेश मोकल यांनी 60 मतांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत 1000 मतांपैकी ठरावाच्या बाजूने 521, विरोधात463 व 16 मते बाद झाली. या फेरीत 58 मते कमी पडल्याने राजेश मोकल यांच्याकडे 2 मतांची आघाडी होती. तिसऱ्या फेरीत 181 मतांपैकी ठरावाच्या बाजूने 85, विरोधात 91 व 5 मते बाद ठरल्याने अखेर 8 मतांनी राजेश मोकल यांना निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय कांबळे यांनी विजयी घोषित करून पुन्हा सरपंच पदावर तेच राहतील असे जाहीर केले.
      वडखळ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच वगळता एकूण पंधरा सदस्य असून त्यातील तेरा सदस्यांनी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल केला होता. यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे, विकास कामे वेळेवर न करणे व दुर्लक्ष करणे, सरपंच यांचा मनमानी कारभार  या मुद्यावर अविश्वास ठराव घेण्यात आला होता. त्यामुळे विशेष ग्रामसभा घेऊन गुप्त मतदान घेण्यात आले. यात १० केंद्रात मतदान होऊन पाच टेबलवर  मतपत्रिका मोजण्यात आल्या.
 एकूण २१८१ मतदानापैकी 1078 मतदारांनी राजेश मोकल यांच्या बाजूने कौल दिल्याने ते ८ मतांनी विजयी झाले. यावेळी शासकिय यंत्रणे बरोबर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शांततेत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. विजयी झालेले सरपंच राजेश मोकल यांचे माजी सभापती संजय जांभळे,नगरसेवक निवृत्ती पाटील,मिलिंद पाटील,अनिलशेठ म्हात्रे,अमृत म्हात्रे यांनी अभिनंद केले. राजेश मोकल यांच्या विजयात संजय जांभळे यांचे मोलाचे योगदान आहे. हा विजय माझा नसून जनतेने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाचा  विजय असून सरपंच राजेश मोकल यांनी सर्व मतदार,कार्यकर्ते,सहकारी तसेच नातेवाईक या सर्वांचे मनापासून आभार मानले.

जोहे येथे भात बियाणे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक

 पेण ( विनायक पाटील ) : पेण तालुक्यातील जोहे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या अंतर्गत काशिनाथ जनार्दन पाटील व इतर  शेतकरी यांच्या उपस्थितीत भात बियाणे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक  घेण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना 3 टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया ,रासायनिक बीजप्रक्रिया व जैविक बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून  दाखवण्यात आले असून बीजप्रक्रिया केल्यामुळे होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.सदर कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी लांडगे ,मंडळ कृषी अधिकारी पाटील,कृषी पर्यवेक्षक देशमुख व कृषी सेवक गुंजाळ मॅडम यांच्यासह शेतकरी दिनकर पाटील,जगन्नाथ पाटील,शिवदास मोकल,अविनाश पाटील, ज्ञानेश्वर पाटील,सदानंद पाटील उपस्थित होते.

दक्षिण मुंबईतील कुंभारवाडा विभागातील संत सेना महाराज मार्गाची दुरावस्था ; स्थानिक रहिवाशी त्रस्त

मुंबई : कित्येक वर्षे पासून पेव्हर ब्लॉग असलेल्या या मार्गावरील पेव्हर ब्लॉग उखडले गेले असून संपुर्ण मार्ग खड्डेमय झालेला दिसून येत आहे. येथे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या गटारातील सांडपाणी रस्त्यावर वहात येत असून त्या खड्यांमध्ये साचते अश्या साचलेल्या घाण पाण्यातून काही वेळा रहिवाश्याना मार्गक्रमण करावे लागते. सदर मार्ग भाजी गल्ली आणि मुख्य वर्दळीचा असल्यामुळे या रस्त्यावरून दररोज शेकडोंनी वाहने आणि अवजड माल भरलेल्या हाथगाडया ये - जा करत असतात. तसेच या मार्गावरून विभागातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मिरवणुका , लग्नांच्या वराती , दहीहंडी कालावधीत गोविंदा पथकाचे गोविंदा त्याचप्रमाणे गणेशोत्सवात विभागातील मोठं- मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या आणि घरगुती गणेश मूर्ती त्याचप्रमाणे  नवरात्रोत्सवात देवींच्या मूर्तीचे आगमन , विसर्जन सोहळे पार पडत असतात. मुंबईतील प्रख्यात "लालबागच्या राजा", उमरखाडी , चिंचबंदर, जे जे रुग्णालय अश्या मानाच्या  सार्वजनिक  मंडळांच्या भव्यदिव्य गणेश मूर्ती सदर मार्गावरून गिरगांव चौपाटीला विसर्जनासाठी मार्गस्थ होतात.रस्त्यावर  पडलेल्या अश्या खड्यांमुळे स्थानिक रहिवाश्याना , दुकानदारांना आणि वाहनचालकांना  त्रास होतो आहे. अनेक छोटे- मोठे अपघात या रस्त्यावर झाले आहेत. साधारणतः पाच वर्षापूर्वी  नागरिकांनी केलेल्या तक्रारीमुळे  संत सेना महाराज मार्ग ( भाजी गल्ली ) मार्गाचे डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले परंतु ते काही कारणास्तव अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले. परंतु आता आम्हाला असे निदर्शनास येत आहे की विभागातील  आसपासच्या मार्गांचे कॉन्क्रीटीकरण करण्यात येत असताना विभागातील मुख्य मार्ग असलेल्या संत सेना महाराज मार्गाकडे जाणूनबुजून दुर्लक्षित केले जात आहे का असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे ?
      तेव्हा संबधित प्रशासकिय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने दखल घेऊन लवकरात लवकर या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरणाचे काम चालू करावे अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी प्रा.एल.बी पाटील यांची नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी ज्येष्ठ साहित्यिक, रायगड भूषण प्रा. एल.बी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
       प्रा. एल.बी. पाटील यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर तीन वर्षाच्या कालावधीसाठी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली आहे.
     ज्येष्ठ साहित्यिक प्रा. एल.बी पाटील यांची आतापर्यंत चौतीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत.काव्य, नाट्य, कादंबरी ,कथा अशा साहित्यावर त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. प्रा. एल .बी पाटील हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेचे तीन वर्षे त्यांनी कार्याध्यक्ष पद भूषवले आहे.
     जेष्ठ साहित्यिक प्रा. एल.बी पाटील हे मनमिळावू व सर्वांना सोबत घेऊन जाणारे, सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्व असून प्राध्यापक एल.बी पाटील यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त अभिवादन

अलिबाग : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी(रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार (सर्वधारण) सतिश कदम आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत तसेच शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे जून 2021 करिता सवलतीच्या दराने अनुदानाचा लाभ

अलिबाग :- राज्यातील करोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत तसेच शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे मे 2020 ते ऑगस्ट 2020 महिन्यांच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने (गहू 8/- रुपये प्रति किलो  व तांदूळ रुपये 12/- प्रति किलो)  प्रति माह प्रति व्यक्ती 3 किलो गहू  व 2 किलो तांदूळ याप्रमाणे 5 किलो अन्नधान्याचा लाभ देण्यात आलेला आहे.
       मात्र बऱ्याच जिल्ह्यांमध्ये या योजनेतील अन्नधान्य शिल्लक असल्यामुळे शासन, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडील दि.25 मे च्या पत्रान्वये जिल्ह्यातील शासकीय गोदामांमध्ये तसेच         रास्तभाव धान्य दुकानांमध्ये शिल्लक अन्नधान्याचे (गहू व तांदूळ) वाटप प्रति किलो राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत तसेच शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी)
शिधापत्रिकाधारकांना प्रति माह प्रति व्यक्ती 1 किलो गहू व 1 किलो तांदूळ याप्रमाणे 2 किलो अन्नधान्य माहे जून 2021 करिता सवलतीच्या दराने (गहू 8/- रुपये प्रति किलो व तांदूळ रुपये 12/- प्रति किलो) प्रथम मागणी करणाऱ्यास देणे (FIRST COME,FIRST SERVE) या तत्त्वानुसार वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
        त्यानुसार एपीएल (केशरी) शिधापत्रिका ज्या रास्तभाव दुकानास संलग्न आहे, त्या दुकानातून आपणास देय असलेले शासन अनुदानित दराने शिधाजिन्नस लवकर प्राप्त करून घेण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून करण्यात आले आहे.
00

सामाजिक कर्तव्य भावनेने हिंदाल्को कंपनीने जिल्हा प्रशासनास दिले 20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर्स

अलिबाग :- कोविड-19 या आपत्कालीन काळात कोविड रुग्णांसाठी उपयोगी पडावेत यासाठी आदित्य बिर्ला ग्रुपच्या तळोजा येथील हिंदाल्को कंपनीने जिल्हा प्रशासनाला 20 माक सीजन सिलेंडर्स देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी आज (दि.28 मे) रोजी 20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर्स जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकड़े जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द केले. 
    यावेळी तहसिलदार सचिन शेजाळ, हिंदाल्को इंडस्ट्रीजचे सीएसआर चे लहू रौधल उपस्थित होते.
    हिंदाल्को इंडस्ट्रीजचे  युनिट सीएसआर चे लहू रौधल यांनी यावेळी सांगितले की, आमचे युनिट हेड सोमोजीत डॉन, युनिटचे एच. आर. हेड सुधीर मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली  काही दिवसांपूर्वी आरसीएफ येथील कोविड केअर सेंटरला 20 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर देण्यात आले होते. त्यावेळी सांगितल्याप्रमाणे  20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर्स आज जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अलिबाग तालुक्यात करोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला. तो ताण कमी व्हावा व रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, या हेतूने हे ऑक्सिजन सिलेंडर्स देण्यात आले आहेत.   
    जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सूचनेनुसार हे ऑक्सिजन सिलेंडर्स जिल्हा सामान्य रुग्णालयास देण्यात आले आहेत.
0000000

म्हापण ग्रामपंचायततर्फे झाले दुसऱ्यांदा लसीकरण

मुंबई(समीर खाडिलकर/शांत्ताराम गुडेकर)

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यामधील म्हापण ग्रामपंचायत सरपंच अभय ठाकुर व उपसरपंच अशोक पाटकर तसेच आरोग्यसेवक प्रविण परब,आरोग्य सेविका शलाका वालवलकर यांच्या विशेष परिश्रमातून नुकतेच दुसऱ्यांदा यशस्वी लसीकरण करण्यात आले.यावेळी १०० डोस देण्यात आले. स्थानिक रहिवाश्यांकडून सरपंच अभय ठाकुर व उपसरपंच अशोक पाटकर,आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानण्यात आले.

निशा परूळेकर(उपाध्यक्षा- चित्रपट कामगार आघाडी महाराष्ट्र) तर्फे मदतीचा हात

मुंबई(समीर खाडिलकर/ शांत्ताराम गुडेकर)
                भारतीय जनता पार्टी (मागाठाणे विधानसभा)प्रभाग  क्र.२५ तर्फे निशा परूळेकर(उपाध्यक्षा-महाराष्ट्र)भाजपा चित्रपट कामगार आघाडी यांना जानूपाडा येथील काही रहिवाशांनी संपर्क करून नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने घराचे पत्रे उडून गेल्याचे सांगितले. झालेले नुकसान लक्षात घेऊन परुळेकर यांनी त्यांना या बिकट परिस्थितीत हातभार म्हणून स्वखर्चाने पत्र्यांसाठी आर्थिक मदत केली. त्यांनी केलेल्या या मदतीबद्दल लाभार्थीने निशा परुळेकर यांचे आभार व्यक्त केले.तर लक्ष्मण  यादव(वाॅर्ड अध्यक्ष) यांच्यासह स्थानिकांनी परळेकर यांना धन्यवाद देत पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

गुरुवार, २७ मे, २०२१

बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने बौद्ध पौर्णिमा मोठ्या थाटात संपन्न

मुंबई : बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर,  जिल्हा रत्नागिरी तसेच संघाच्या संस्कार समितीच्या संयुक्त विद्यमाने संघाचे कार्याध्यक्ष दिपकजी मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली भगवान गौतम बुद्धांचा २५६५ वा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात ऑनलाइन पद्धतीने मुंबई येथे संपन्न झाला.
     सदर कार्यक्रमाची सुरुवात संघाचे सरचिटणीस संजयजी तांबे यांनी पुष्प, गंध अर्पण करून व दीप प्रज्वलन करून केला कोरोना महामारीत दिवंगत झालेल्या जगातील सर्वच मृतात्म्याना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात झाली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार समितीचे मनोजजी पवार यांनी केले असून धार्मिक विधी ही त्यांनीच पठण केला.
   संस्कार समितीचे आदर्श बौद्धाचार्य संदीप गमरे यांनी गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण यावर उत्कृष्ट असे माहितीपर मार्गदर्शन केले, तसेच अमित पवार यांनी आपल्या सुमधुर आवाजात बुद्ध गीतगायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले
   या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संघाचे प्रमुख विश्वस्त संजयजी पवार, विश्वस्त राजाभाऊ गमरे त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष दिपकजी मोहिते, सरचिटणीस संजयजी तांबे, कोषाध्यक्ष संदीपजी पवार तसेच विभाग क्र. ३ चे संदेश जाधव, विभाग क्र. ४ चे विभाग अधिकारी अजयजी जाधव, विभाग क्र. २चे संजयजी पवार, संतोष जाधव त्याचप्रमाणे मनोज पवार, अमित पवार आदींनी बहुमूल्य मार्गदर्शन केले.
    सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास संघाची मध्यवर्ती कमिटी, विश्वस्त मंडळ त्याचबरोबर विभाग अधिकारी व सर्व शाखा त्यांचे पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
    कोरोना वायरस कोव्हिड १९ चे गांभीर्य लक्षात घेता सदर कार्यक्रम ऑनलाइन व्हीडिओ कॉन्फरन्स पद्धतीने घेण्यात आला, सरतेशेवटी सर्वांचे आभार व्यक्त करून सरचिटणीस संजयजी तांबे यांनी आभारप्रदर्शन व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.

वॉर्ड क्रमांक ५४ गोरेगाव येथे लसीकरण केंद्र सुरू...

मुंबई(गणेश हिरवे)- शिवसेना नेते उद्योग मंत्री सुभाष देसाई , शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर , आमदार विभाग प्रमुख सुनील प्रभू ,यांच्या मार्गदर्शना खाली  नगरसेविका सौ साधना माने यांच्या प्रयत्नाने आधार केंद्र घा स बाजार रोड  गोरेगाव पूर्व येथे कोविड १९ चे  नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले .
   खासदार शिवसेना नेते गजानन किर्तीकर व आमदार विभाग प्रमुख सुनील प्रभू , विभाग संघटक  नगरसेविका सौ साधना माने  यांच्या हस्ते या लसीकरण केंद्राचे उद्घाटन झाले . या वेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी , युवा सेना आणि युवती सेनेचे सर्व पदाधिकारी व इतर अंगीकृत संघटना  व कार्यकर्ते शिवसैनिक  , व नागरिक उपस्थित होते.या केंद्रात सोमवार , मंगळवार ,बुधवार या दिवशी ४५  वरील सर्व नागरिकांना रजिस्ट्रेशन शिवाय पहिला डोस  व दुसरा डोस  (८४ दिवसा नंतर ) घेता येईल.
   गुरुवार , शुक्रवार ,शनिवार या दिवशी फक्त रजिस्ट्रेशन करून अपोईमेंट मिळालेल्या नागरिकांना डोस घेता येणार आहे.फक्त १०० डोस च दर दिवशी दिले जातील अशी माहिती शाखाप्रमुख अजित भोगले यांनी दिली.

कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यात बहुउद्देशिय निवारा केंद्रे, भूमीगत वीज वाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसह लाईटनिंग अरेस्टर उभारणार :कोकणातील धोकादायक दरडग्रस्त गावांचेही होणार पुनर्वसन ;कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना चक्रीवादळासह नैसर्गिक आपत्तीचा वारंवार सामना करावा लागतो. या नैसर्गिक आपत्तीत कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यात जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी आवश्यक ठिकाणी बहुउद्देशीय निवारा केंद्रे, भूमीगत वीज वाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधारे, लाईटनिंग अरेस्टर उभारण्यात येणार आहेत. यासाठी कोकण किनारपट्टीवरील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच या भागातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनांची कामे मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोकण किनाऱ्यावर आदळणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्यादृष्टीने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबतच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
     यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (व्हीसीव्दारे), राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सिताराम कुंटे, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह कोकण विभागाचे विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
    उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गेल्या काही वर्षात कोकण किनारपट्टीला चक्रीवादळासह नैसर्गिक आपत्तीचा वारंवार सामना करावा लागत आहे. या चक्रीवादळ, नैसर्गिक आपत्तीत जीवित व वित्त हानीची तीव्रता कमी करण्यासाठी किनारपट्ट्यांवरील जिल्ह्यात आवश्यक ठिकाणी बहुउद्देशीय निवारा केंद्र उभारण्यात यावीत, ही बहुउद्देशीय निवारा केंद्रे दर्जेदार आणि चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सक्षम असावीत. नैसर्गिक आपत्तीच्या कालावधी व्यतिरीक्त इतर वेळी या निवारा केंद्रांचा उपयोग लोकोपयोगी कामांसाठी करण्यात यावा. याची कायमस्वरुपी देखभाल, दुरुस्तीचेही नियोजन करण्यात यावे. या जिल्ह्यातील सर्व वीज वाहिन्या प्राधान्यांने भूमीगत कराव्यात. चक्रीवादळाच्यावेळी निर्माण होणाऱ्या समुद्राच्या मोठ्या लाटांनी जमिनीची धूप होऊ नये, यासाठी धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्यात यावेत. चक्रीवादळासह इतर नैसर्गिक आपत्तीच्यावेळी वीज कोसळून जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी आवश्यक अंतरावर लाईटनिंग अरेस्टर उभारण्यात यावेत. ही सर्व कामे दर्जेदार, मजबूत, गुणवत्तापूर्ण असली पाहिजेत, यासाठी कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे अथक परिश्रम

अलिबाग :- सन 2001 च्या लोकसंख्येच्या आधारे आरोग्य संस्था मंजूर करण्यासाठी बृहत आराखडा तयार करुन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत.तसेच विशेष बाब म्हणून त्यानंतरही काही संस्था मंजूर करण्यात आल्या आहेत. 
      जिल्ह्यामध्ये पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या विशेष प्रयत्नांनी मंजूर प्राथमिक आरोग्य व उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, पशुवैद्यकीय दवाखाने व वैद्यकीय महाविद्यालये यांच्या इमारतीच्या बांधकामासाठी तालुकानिहाय शासकीय जमिनी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
      अलिबाग तालुक्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 
    खालापूर व सुधागड  तालुक्यातील ग्रामीण  रुग्णालयाच्या बांधकामासाठी प्रत्येकी एक अशा एकूण दोन जागांचे वाटप करण्यात आले आहे.
       प्राथमिक आरोग्य केंद्र पेण-2, मुरुड-1 रोहा-1,  माणगाव-1, श्रीवर्धन-1,   कर्जत-1, खालापूर-1,  पोलादपूर-1 अशा एकूण 9 जागांचे वाटप करण्यात आले आहे.
     आरोग्य उपकेंद्रासाठी अलिबाग-2, मुरुड-1,  रोहा-2,   माणगाव-2,  महाड-5,  पोलादपूर-2,  म्हसळा-3,  श्रीवर्धन-3,  पनवेल-4,  खालापूर-4,  कर्जत-4,  तळा-2 अशा एकूण 34 जागांचे वाटप करण्यात आले आहे.  
     पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी अलिबाग-1, माणगाव-1,  महाड-3, श्रीवर्धन-1,  पनवेल-1,  अशा एकूण 7 जागांचे वाटप करण्यात आले आहे.  
        रायगड जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, पशुवैद्यकीय दवाखाने व वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासकीय जमिनी उपलब्ध करुन दिल्यामुळे सार्वजनिक आरोग्य विषयक सोयी-सुविधांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे, गोरगरीब व ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागणार नाही. तसेच जिल्ह्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग सक्षम होण्यास नक्कीच मदत होईल, अशी आशा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना रॅपिड अँटीजेन चाचणी प्रशिक्षण

अलिबाग :- जिल्ह्यात करोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुढील कालावधीत करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून, याचा संसर्ग विशेषतः लहान मुलांमध्ये होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना रॅपिड अँटीजेन चाचणी प्रशिक्षण व करोना वैयक्तिक सुरक्षितता किट उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना दिले आहेत.
      ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जातात. जिल्हयात सद्य:स्थितीत 1 हजार 727 आशा स्वयंसेविका कार्यरत असून, त्यांच्यामार्फत मागील वर्षात जिल्ह्यात “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेमध्ये व्यापक जनजागृती करून प्राथमिक तपासणीचा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. कोविड विषाणूचा ग्रामीण भागात होणारा प्रसार थोपविण्यासाठी मोठया प्रमाणावर कोविड चाचणी व लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आशा स्वयंसेविकाना रॅपिड अँटीजेन चाचणी प्रशिक्षण व करोना वैयक्तिक सुरक्षितता किट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
      ज्या गावात करोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून येत आहेत, अशा गावात ग्रामसेवक, सरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेकरिता गाव पातळीवर गठीत केलेल्या ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने विशेष चाचणी कॅम्प व लसीकरण कॅम्पचे आयोजन करावे व जिल्ह्यातील सर्व गावे कोविड मुक्त ठेवण्याचा प्रयत्न कसोशीने करावा, असेही डॉ. किरण पाटील यांनी आवाहन केले आहे.
     यानुषंगाने तालुका अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना सर्व तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या अखत्यारीतील आशा सेविकांना रॅपिड अँटीजेन चाचणी प्रशिक्षण द्यावे, तसेच प्रत्येक आशांना करोना वैयक्तिक सुरक्षितता किट उपलब्ध करून देण्यात यावे, आशा स्वयंसेविकांनी गावातील ताप, खोकला, सर्दी सारखी कोविडची लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांचा शोध घ्यावा व त्यांची तत्काळ अँटीजेन चाचणी करावी, ज्या नागरिकांची करोना टेस्ट पॉझिटीव्ह येईल त्यांची पूर्ण माहिती आशांनी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ कळवावी, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना आशा स्वयंसेविककडून करोना पॉझिटीव्ह रुग्णांसंदर्भात जी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरविली जाईल ती माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राकडून Cv Analytic या संकेतस्थळावर भरली जाईल याची प्रत्येक दिवशी शहानिशा करावी, जे नागरिक करोना पॉझिटीव्ह आलेले आहेत, त्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन व सल्ला देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रामधून त्यांच्या रक्तांचे नमुने घेऊन चाचणी करावी व तालुक्यातील कोविड केअर सेंटर मध्ये भरती होण्याच्या
सूचना द्याव्यात, आशा सेविकांनी आपल्या मोबाईलमध्ये ई-संजीवनी ॲप डाऊनलोड करून आपल्या कार्यक्षेत्रातील रुग्णांना ॲपच्या लिंकद्वारे तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेण्यासाठी मदत करावी, तसेच कोविड-19 मुळे प्रभावित मुलांना संवेदना मार्फत दूरध्वनीवरून मोफत समुपदेशन पुरवले जाते, त्याचा टोल फ्री क्रमांक 1800-121-2830 असून सोमवार ते शनिवार सकाळी 10.00 ते 1.00 वाजेपर्यंत मोफत समुपदेशन केले जाते, याबाबत आशा सेविकांनी जनजागृती करावी, ज्या रुग्णांची अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आलेली आहे.परंतु  करोनाची ताप, खोकला, सर्दी इत्यादी लक्षणे आढणाऱ्या सर्व रुग्णांनी संबंधित तालुका स्तरावरील उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय स्तरावर जाऊन आरटीसीपीआर चाचणी करण्याचा सल्ला देण्यात यावा, आरटीसीपीआर तपासणी करीता रुग्णांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
   या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

नवभारत हायस्कूल कुसूर* येथे मोफत ई लर्निग किट, लॅपटॉप आणि प्रिंटर वाटप कार्यक्रम संपन्न ; साई एज्युकेअर फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम...!

वैभववाडी - कुसूर गावातील माध्यमिक शाळा, नवभारत हायस्कूल येथील विद्यार्थ्यांसाठी साई एज्युकेअर फाउंडेशन (रजि.) या संस्थेतर्फे (CSR Initiative...