आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

रिक्षा परवाना धारकांना त्वरीत अनुदान द्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे ठाणे जिल्हा युवा नेते अशोक भाऊ कांबळे यांची मागणी

ठाणे(मुनिर खान/शांत्ताराम गुडेकर) 

            कोरोना महामारी मुळे राज्य सरकारने राज्यामध्ये लॉक डाऊन जाहीर केला आहे त्यामुळे हातावर पोट भरणारे गोरगरीब जनता आणि मजूर आणि रिक्षाचालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे सरकारने जाहीर केले होते की रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी १५००( पंधराशे) रुपये अनुदान देण्यात येईल परंतु पुन्हा १५ दिवस लाँकडाऊन वाढवले  पण अद्यापही अनुदान  मिळालेले नाही ठाण्यामध्ये आत्तापर्यंत गोरगरिबांना मोफत रेशन सुद्धा मिळाला नाही त्यामुळे सरकारने सर्वसामान्यांचा विचार करून लवकरच निर्णय घ्यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा नेते तथा कामगार आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक भाऊ कांबळे यांनी  केली आहे.

गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

भविष्याच्या सुरक्षिततेसाठी करू पाण्याची बचत


    मानवी जीवनात पाण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून पाणी व मानवी जीवन यांचा अतूट सांधा संस्कृती संवर्धक म्हणून सन्मानित झालेला वारसा आहे. पाण्यामुळेच मानवी संस्कृती अधिक समृद्ध व संपन्न झाली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये निसर्गाचा लहरीपणा, काही ठिकाणी अति पाऊस तर काही ठिकाणी दुष्काळाची दाहकता अशा विचित्र परिस्थितीमध्ये पाण्याची बचत करून भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्व स्तरावरील व्यक्तींनी सर्वकाळ प्रयत्न केले तरच पाण्याच्या भीषण टंचाईवर मात करणे शक्य आहे.
पाण्याचे महत्व :-
        पाणी हे जीवन आहे. पाणी अमृत आहे.  तसेच ते धरतीचा आत्मा आहे. पाण्यामुळेच राष्ट्राची प्रगती होणार आहे. जीवसृष्टीची उत्पत्ती सुद्धा पाण्याने होत असल्याने त्या पाण्याचे रक्षण करणे, जतन करणे,  संवर्धन करणे, पुनर्भरण करणे व ते स्वच्छ शुद्ध ठेवणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.  पाणी द्रव, वायू अथवा घन असे कोणत्याही रूपात असले तरी पाणी ही एक महाशक्ती आहे. आत्ता आपले भविष्य सुरक्षित व समृद्ध करण्यासाठी जल संपत्तीच्या संवर्धनासाठी जिथे आपण आहोत तिथून जाणीवपूर्वक कृतीशील प्रयत्न करू या व पाण्याविषयी आदराची भावना जोपासू या.
पाणी बचतीचे पर्याय व घटक :-
 कौटुंबिक स्तरावर पन्हाळी व पागोळ्यातील पाणी वापरणे.
 पाणी शिळे नसते, ते कधीही फेकून देऊ नये.
 घरात तोटीचा माठ वापरावा.
 घरगुती नळ कनेक्शनला वॉटर मीटर बसवावे.
 गाड्या धुताना स्प्रे पाईप ऐवजी ओले कापड वापरावे.
 गळक्या नळाची दुरुस्ती व पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
 ठिबक व तुषार सिंचनाचा पिकांसाठी वापर करावा.
 पावसाच्या पाण्याचे संकलन करावे.
 वनराई बंधाऱ्याच्या बांधकामातून पाणीसाठवण करणे. 
 विहिरीचे पुर्नभरण करणे.
 मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे.
 कारखान्यातील सांडपाण्याचा पुर्नवापर करावा.
 अंघोळीसाठी, दात घासताना, दाढी करताना, तोंड धुताना सतत नळ चालू ठेवू नका.
 घरातील व परिसरातील नळांना तोट्या नसतील तर लगेच बसवून गळती थांबवा,
 सांडपाण्यावर फळबागा, परसबागा, फुलबागा फुलविणे.
 नद्यांच्या व  तळ्यातील गाळ काढावा. या क्रमानुसार पाणी वापराचे अधिकृत धोरण हवे.

जलसाक्षरतेतून समृद्धीकडे :-
 खरे म्हणजे जलसाक्षर समाजच पाण्याच्या बचतीसाठी पुढाकार घेईल. जलसाक्षरता ही केवळ व्यक्तीची अथवा विभागाची मर्यादित न राहता देशातील प्रत्येक राष्ट्रप्रेमी व पर्यावरणप्रेमी माणसांची ही जीवनशैलीच असावी.
 जलसाक्षरतेची चळवळ जनमानसात रुजविण्यासाठी तशी शिस्त लावण्यासाठी व माणसांची मनोवृत्ती तशी होण्यासाठी काही कडक नियम देखील बनवले पाहिजेत तरच ती तशी कृती होईल.
 आपला देश सुजलाम सुफलाम होण्यासाठी, देशातील नद्या बारमाही वाहत्या राहण्यासाठी जलसाक्षरतेची चळवळ अधिक व्यापक व्हावी यातच व्यक्ती व समाजाचे आणि देशाचे हित आहे.
 युवक-युवती व नव्या पिढीने, तरुणाईने हे देश कार्य समजून नेटाने वाटचाल केल्यास पाणीटंचाई नष्ट होऊन समृद्धीची पहाट येईल.
     पाण्याचा अतिवापर टाळा, पाणी काटकसरीने वापर असा संदेश करून उपयोग नाही.   
       तापमानवाढीच्या झळांपासून संरक्षणासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे व जिरविणे आवश्यक आहे. पाणी दूषित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पाणी वाचविण्याचे सर्व उपाय हे आपल्यापासून सुरू होतात याची जाणीव ठेवावी.     
       वापरलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाला कष्ट व किंमत लागते,हे लक्षात ठेवून पाणी काटकसरीने वापरावे. पाणी वाचविण्यासाठी सवय लावावी,अशाने फार मोठा बदल होऊ शकतो.
      आपल्या जलचक्रानुसार पाणी मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आकाशातून पडणारा पाऊस. पाऊस पाणी साठविणे, पर्जन्यजलाचा साठा करून त्याचा पुर्नवापर करावा. पाऊस मुबलक असताना जलसंचय करून पाऊस नसताना उपलब्ध पाणी याचा वापर करणे काळाची गरज आहे.  
      रायगडच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा परिषद अध्यक्षा कु.योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज्ञानदा फणसे,कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा) संजय वेंगुर्लेकर व सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी- कर्मचारी हे जलसंवर्धनासाठी आपापल्या स्तरावर प्रयत्नशील आहेतच, त्यांच्या या प्रयत्नांना सर्वांनी मिळून कृतीशील साथ देणे, हे सर्वांचे कर्तव्यच आहे.  
 “चला…पाणी बचतीसाठी कटिबद्ध होऊ या”
 “ भारत भूमीला सुजलाम् सुफलाम् करू या”

लेखन :-श्री.सुरेश राजाराम पाटील,
            माहिती शिक्षण व संवादतज्ज्ञ,
           जिल्हा परिषद, रायगड
            (मो.क्र:-9881712585)  

संपादन :-मनोज शिवाजी सानप  ,
             जिल्हा माहिती अधिकारी,                                                  रायगड-अलिबाग


मुंबई पोलीसांना जैन इरिगेशनतर्फे फेशशिल्ड

मुंबई /प्रतिनिधी - कोरोना योद्धा म्हणून सदैव कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस बांधवांना जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीने उत्तम गुणवत्तेचे फेशशिल्ड व हॅण्ड सॅनिटायझर, मास्कचे वाटप केले. मुंबईमधील दक्षिण मुंबई पोलीस स्टेशनच्या सुमारे 100 च्यावर फ्रंड लाईन पोलीस कर्मचाऱ्यांना फेशशिल्डचे वाटप झाले. परिमंडळ एकचे पोलीस उपआयुक्त शशिकुमार मिना यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. दक्षिण मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा होडगे यांच्याहस्ते जैन इरिगेशनच्या फेशशिल्ड व हॅण्ड सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

लॉकडाऊन कालावधीमध्ये गरजू व्यक्तींना कायदेशीर सल्ला व सहाय्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे मदत कक्षाची स्थापना

अलिबाग :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या पत्रानुसार लॉकडाउन कालावधीत गरजू व्यक्तींना कायदेशीर सल्ला व सहाय्य मिळण्यासाठी मदत कक्ष निर्माण करणे आवश्यक असल्यामुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड -अलिबाग यांच्या वतीने जिल्ह्यातील तीन सत्र विभागांमध्ये (Sessions Division) गरजू, पीडित व्यक्तींना भ्रमणध्वनी /व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून उत्तर देण्यासाठी किंवा कायदेशीर सल्ला व सहाय्य देण्यासाठी महिला व पुरुष वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे.
अलिबाग सत्र विभागाकरिता :- ॲड.जयंत चेऊलकर, मो.9822502011, ॲड. श्रीमती शिल्पा नागेश पाटील मो. 94233775015/  8698775015, ॲड. श्रीमती तनुष्का तुषार पेडणेकर मो. 7057881666/7083818666.
पनवेल सत्र विभागाकरिता :- ॲड.मनोहर पाटील, मो.9869056906, ॲड. विशाल ए. मुंडकर मो.9221777604.
माणगाव सत्र विभागाकरिता :- ॲड. श्रीमती एस. एस. मराठे, मो.9423806849, ॲड.व्ही.यू.घायाळ    मो.9923217733.
       जिल्ह्यातील गरजू व पीडित व्यक्तींनी कायदेशीर बाबींविषयक सल्ला किंवा सहाय्य हवा असल्यास वरील वकिलांशी संपर्क साधावा.  तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ईमेलवर अथवा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या नालसा पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी यांनी केले आहे.
०००००

औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेबपोर्टलचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

अलिबाग :- राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेबपोर्टलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले.
      याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, नियोजन व वित्त राज्यमंत्री , शंभूराज देसाई, उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे, नियोजन विभाग व उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव, केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाचे अधिकारी, उद्योग आयुक्त, अर्थ व सांख्यिकी संचालकचे प्रतिनिधी, अर्थ व सांख्यिकी संचालनालया व उद्योग संचालनालयाचे सर्व अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
      राज्याच्या औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे, राज्याचे औद्योगिक धोरण निश्चित करणे, औद्योगिक विकासाच्या योजना ठरविण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील चढ-उताराचे मोजमाप आवश्यक असते. महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये तसेच एकूण उत्पन्नामध्ये राज्याचा हिस्सा मोठा आहे.  हे निर्देशांक राष्ट्रीय व राज्यस्तरीय उत्पन्न काढणे, देशातील/राज्यातील औद्योगिक प्रगती मोजण्यासाठी तसेच नियोजन करण्याच्या उद्देशाने शासनास अत्यंत उपयुक्त आहे.  उद्योग जगतास या क्षेत्रातील संशोधन तसेच उत्पादन करणाऱ्या संस्था यांना नेहमी याची आवश्यकता भासते.  केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली अर्थ व सांख्यिकी संचालनालय व  उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे.
     राज्यातून निवडलेल्या 568 कारखान्यांकडून दरमहा विहित कालावधीत माहिती या वेबपोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी उद्योग संचालनालयाच्या महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांच्यावर सोपविण्यात आली असून माहितीचे संस्करण करून राज्याचे औद्योगिक उत्पादन निर्देशांक अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रकाशित करणार आहे, असे जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्रीमती प्रि.अ.ईश्वरे यांनी कळविले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या सूचना

मुंबई, दि. २८ - कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतूदी विचारात घेवून राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात यावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत आज निर्गमित करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविड - १९ च्या अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित वावर व इतर सर्व नियमाचे काटेकोर पालन करण्यात यावे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेवून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी (Break The Chain) व या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने १३ एप्रिल २०२१ च्या आदेशान्वये १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. या तरतूदी विचारात घेवून राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने विविध निदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी ८ वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात यावे. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती यांनी ध्वजारोहण समारंभाकरीता योग्य ती व्यवस्था करावी. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करु नये. इतर सर्व जिल्ह्यात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या नमुद ठिकाणी केवळ पालकमंत्री, विभागीय आयुक्त मुख्यालयी समारंभ असल्यास विभागीय आयुक्त, महापौर/नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एवढ्याच पदाधिकारी/अधिकारी यांनी उपस्थित रहावे. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येवू नये. तसेच कवायती/संचलन आयोजन करण्यात येवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

विधीमंडळ, मा. उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे.

ध्वजारोहण करणारे पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास, विभागीय आयुक्त मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी व जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावे, अशा सूचन देण्यात आल्या आहेत.


बुधवार, २८ एप्रिल, २०२१

भारतीय खेळाडूंनी पॅट कमिन्सचे अनुकरण करावे

भारतात वाढणाऱ्या कोरोनामुळे परदेशी खेळाडू आयपीएल अर्ध्यावरच सोडून जात असताना पॅट कमिन्स नावाचा परदेशी खेळाडू भारताच्या मदतीला धावून आला आहे.  आयपीएलमध्ये कोलकता नाईट रायडर या संघाकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने  कोरोनाचा सामना करण्यासाठी  पी एम केअर निधीत  ३८ लाख रुपयांची मदत केली आहे. भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपापुढे देशातील आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. कोरोनाबाधित  रुग्णांना कोव्हीड सेंटरमध्ये बेड मिळत नसल्याने हजारो रुग्णांना गृहविलगीकरणात राहावे लागत आहे. देशात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांचे प्राण जात आहेत. कोरोनावावर प्रभावी असणारी रेमडेसिव्हर ही इंजेक्शन देखील मिळत नाही अशावेळी पॅट कमिन्स याने पी एम केअर निधीला लाखो रुपयांची मदत करून एक  आदर्श निर्माण केला आहे. "भारतामध्ये मी गेली अनेक वर्ष येत आहे आणि इथल्या लोकांनी मला खूप प्रेम दिले एव्हढ्या जणांन त्रास होत असताना मला खूप दुःख होत आहे. आयपीएलमुळे आम्हाला कोट्यवधी लोकांपर्यंत पोहचता आले यामुळेच मी पी एम केअर निधीत मदत जमा करत आहे" असे ट्विट त्याने मदतनिधी जमा करताना केले आहे. पॅट कमिन्सच्या या ट्विटमधून  त्याच्या मनात असलेली सामाजिक बांधिलकीच  दिसून येते शिवाय तो किती संवेदनशील मनाचा आहे हे ही दिसून आले. पॅट कमिन्स हा जरी भारतीय खेळाडू नसला तरी त्याने भारताला मदत करून दातृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे. आपत्तीच्या वेळी पॅट कमिन्सने जी माणुसकी दाखवली आहे तिला तोड नाही.  त्याने दिलेल्या ३८ लाखांमध्ये ४०० ऑक्सिजन सिलेंडर येतील आणि शेकडो कोरोनाबाधित रुग्णांचे  प्राण वाचतील. पॅट कमिन्स याने भारतीयांप्रति जी आपुलकी दाखवली ती वाखाणण्याजोगी जोगीच आहे. त्याचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे.  पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा असूनही त्याला भारताप्रति आपुलकी आहे या आपुलकीतूनच त्याने ही मदत केली आहे. त्याने ही मदत करून भारतीय खेळाडू आणि सिलिब्रेटींच्या सणसणीत कानशिलात मारली आहे. देशात इतकी मोठी आपत्ती आली असताना आयपीएलमध्ये करोडो रुपये कमावणाऱ्या भारतीय खेळाडूंना मात्र  आपल्याच बांधवांना मदत करावी असे वाटत नाही. ज्यांना भारतीय लोक आपला आयडॉल मानतात ते मनाने किती खुजे आहेत हेच पॅट कमिन्सने दाखवून दिले आहे. आतातरी भारतीय खेळाडूंनी आपली तिजोरी देशवासीयांसाठी खुली करावी. पॅट कमिन्सने केलेल्या आदर्श कृतीचे अनुकरण भारतीय खेळाडूंनी करावे.

-श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे


कात्रादेवी आदर्श वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजीत भव्य रक्तदान शिबीर संपन्न

मुंबई : प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी कात्रादेवी आदर्श वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबाग परेल आयोजीत भव्य असे रक्तदान शिबीर रविवार दिनांक २५ एप्रिल रोजी कात्रादेवी वसाहती मधिल प्रांगणात संपन्न झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपन्न झालेल्या यां शिबीरात जवळजवळ १२५ ते १५० रक्तदात्यानी  सहभाग घेऊन आपले दातृत्व सिद्ध केले आहे. 
सध्या कोरोना सारख्या महामारीने अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण भारत देशांत थैमान घातलेले आहे. अशा परिस्थितीत स्वतःची सुरक्षा आणि सोशल डिस्टन्स चे भान राखून कात्रादेवी आदर्श वसाहत गणेशोत्सव मंडळाने आपला पुन्हा एकदा आदर्श सिद्ध करून हा रक्तदान शिबीर सोहळा यशस्वीरित्या संपन्न केला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष गणेश तेरवणकर, सचिव सतिश कविटकर, खजिनदार अमोल डफळे, कार्याध्यक्ष हरिशंकर बारी, मनसे शाखाप्रमुख  सपान पाठारे, पत्रकार महेश्वर तेटांबे, स्थानिक नगरसेवक अनिल कोकीळ, मंडळाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. कात्रादेवी आदर्श वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे नेहमीच आपल्या सामाजिक, कला आणि क्रीडा क्षेत्रांत अग्रेसर असते. १ में पासून वय वर्ष १८ पुढील प्रत्येक व्यक्तीस लसीकरण हे बंधनकारक असून भविष्यात रक्ताचा तुटवडा भासू नये यां उद्देशाने कात्रादेवी आदर्श वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने हा रक्तदान सोहळा आयोजीत केला असून विभागातील सर्व तरुण वर्गाने यां शिबिरास चांगला प्रतिसाद दिला असे प्रतिपादन करून अध्यक्ष तेरवणकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.


कल्पना कला केंद्रा तर्फे गोर गरिबांना मोफत जेवण

मुंबई: कल्पना कला केंद्र व व्ही केअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, चिंचपोकळी ब्रिज (पश्चिम), येथे दुपारी ११ ते १२ या वेळेत रोज गोरगरीबाना मोफत जेवण चालू आहे.लॉक डाऊन काळात, गोरगरिबांचे हाल होऊ नये, ते उपाशी राहू नयेत, या दृष्टीकोणातून कल्पना कला केंद्राच्या अध्यक्षा- कल्पना धारिया, यांच्या संकल्पनेतुन  'फुडघर' साकारण्यात आले. 
        कल्पना धारिया यांचे महिला  बचत गट आहे. बचत गटातील महिलांना एकत्रित करून गोरगरिबांना मोफत रोज दुपारी जेवण देण्याचा निर्णय घेतला. दि. ८ एप्रिल रोजी, मुंबईच्या महापौर- किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. रोज मोलमजुरी करणाऱ्याना व हलाकीचे जीवन जगणाऱ्या कामगार बांधवाना मोफत व पोटभर जेवण देण्यात येते. रोज ६५ ते ७० लोकांना जेवणा चे वाटप केले जाते.त्यात भात, आमटी, भाजी, चपाती अथवा पाव यांचा समावेश असतो. हा खर्च कल्पना धारिया स्वतः करीत असतात.
         तसेच महालक्ष्मी- रेसकोर्स येथे ही संस्थेच्या वतीने मदत कार्य सुरु आहे.व लवकरच मुंबई सेंट्रल येथेही मोफत जेवण वाटपाचे कार्य सुरू करण्यात येणार असलयाचे संस्थेच्या अध्यक्षा कल्पना धारिया यांनी सर्व सांगितले. 
        साईबाबा मंदिर सेवा समिती (आर्थर रोड), कानजीभाई मारू व बाबूभाई सुमरा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेंच प्रतिक खुमाण, दिनेश महिडा, रंजना खुमाण, प्रकाश घारीया, नयना जीतया, आदी पदाधिकारी विशेष  मेहनत घेत आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोविड लसीकरण केंद्र नगरपालिका शाळेत स्थलांतरीत

अलिबाग :- सध्या केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रायगड जिल्हयातील सर्व शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविड लसीकरण सुरु आहे.   
        सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील लसीकरण कक्ष "कोविड रूग्णालय" म्हणून जाहीर केल्यामुळे तसेच या रूग्णालयाच्या आवारात कोविड पॉझिटीव्ह रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांची तपासणीसाठी, रुग्णालयात भरती होण्यासाठी, रक्त तपासणीसाठी तसेच सी. टी. स्कॅन करण्यासाठी वर्दळ असते. त्यामुळे लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना त्यांच्यापासून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे त्यांना कोविड-19 विषाणूचा होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी सामान्य रुग्णालयातील लसीकरण केंद्र नगरपालिका शाळा, सरदार कान्होजी आंग्रे स्मारकाच्या पाठीमागे, अलिबाग येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. 
      तरी नागरिकांनी या बदल झालेल्या लसीकरण केंद्राची नोंद घ्यावी व तेथे जाऊन लस घ्यावी, तसेच नव्याने कोणतेही लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले नाही, याचीही नोंद घ्यावी,असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी केले आहे.

राज्यभरातील सरपंच महाराष्ट्र सरकार बरोबर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील : बाबा साहेब पावसे पाटील

मुंबई : महाराष्ट्र राज्यात कोरोणा महामारीने थैमान घातले आहे यासाठी उध्दव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळातील सर्व घटक पक्ष अहोरात्र मेहनत घेत आहे  मंत्री ना जयंत पाटील यांच्या नुकतीच पत्रकार परिषदेत घेऊन सरपंच यांना कोरोणाच्या बाबतचे अहवानाला प्रतिसाद देत राज्यभर सरपंच गावपातळीवर सक्षम पणे काम करत आहे परंतू सरपंच यांना कोणतीही आरोग्य किट किंवा यांना कोणतेही आरोग्य संरक्षण नाही याची सरकारने दखल घ्या आम्ही जनतेची तशी पण काळजी घेतो यापुर्वी पण घेतली यापुढे घेऊन यात शंका नाही परंतू सरपंच आणि यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी सरपंच सेवा संघाच्या वतीने एका पत्रकाद्वारे मा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे यांना एका पत्रकाद्वारे दिली आहे अशी माहिती संस्थापक बाबासाहेब पावसे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व पदाधिकार्यांनी केली आहे आम्ही सरकार सोबत आहोत जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेऊन गावपातळीवर काम करत आहे यासाठी आरोग्य सेवक ,आरोग्य यंत्रणा , स्वयंसेवी डॉक्टर , ग्रामसेवक, पोलिस पाटील, तलाठी ,शिक्षक अंगणवाडी सेविका आशा वर्कर पोलिस,उघोजक , जिल्हा परिषद यंत्रणा ,पंचायत समितीची यंत्रणा  सदस्य ,जिल्हा परिषद सदस्य ,पोलिस प्रशासन तसेच स्वयमसेवी संस्था अशी अनेक घटक कोरोणा आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतं आहे ग्रामिण भागातील सर्व विकास कामे ठप्प झाली आहे उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने काही पाणी टंचाई निर्माण झाली आहे सरपंच आपल्या गावची काळजी प्रशासनाच्या सहकार्य गावातील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने गांवात करत आहे तसेच कोरोणा आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असते काही युवक कार्यकर्ते आपआपल्या परीने सुध्दा डाॅक्टराशी संपर्क साधून सेवा करत आहे याची दखल शासनाने घ्यावी याची कोरोणा योध्दा म्हणून शासनाने याची नोंद करावी भविष्यात शासनाच्या विविध विकास कामे योजना तशी कोरोणा योध्दाचा पण एक विशिष्ट प्रकारची योजना तशी तयार करावी म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत अशी योध्दा यांना बळ मिळाले आणि भविष्यात कोणतीही परीस्थिती निर्माण झाली तरी आपल्या महाराष्ट्रात कोरोणा योध्दा ची अद्ययावत माहिती शासनाकडे असलेल्यास हि लोक महाराष्ट्रात वेगळे अडचणी च्या काळात भरीव योगदान देतील यात शंका नाही तरी शासनाने केलेल्या अहवानास सरपंच सेवा संघ गंभीरपणे दखल घेऊन कोरोणा आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र भर सरपंचांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करेल अशी ग्वाही सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने बाबासाहेब पावसे संगमनेर, राज्य महीला अध्यक्षा सौ प्रमिला एखंडे राज्य महिला उपक्षा सौ लक्ष्मी चांदणे महादेव पाटील यादवराव पावसे, समन्वयक पाचभाई  उपाध्यक्ष महेश पाटील रविंद्र दोरगे भाऊ मरगळे, रविंद्र पवार, रविंद्र पावसे, रविराज गाटे ,अंजन गोस्वामी,भाग्यश्री नरवडे, नवनाथ शिंदे , शंकरराव खेमनर पंकज चव्हाण अँड भाऊसाहेब गुंजाळ, गणेश तायडे, मयुर कोरडे , रोहित पवार, निलेश पावसे, चंद्रशेखर पाटील,सौ विजया कचावार, संजय पेटकर,  राज्य कार्यकारिणी विभागीय कार्यकारणी जिल्हा कार्यकारिणी तालुका सर्व समन्वयक सह कार्यकारिणी सदस्यांनी एका पत्रकाद्वारे शासनाला दिली आहे.

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मौजे कुरुळ येथील जुनी शाळा,सहा इमारती तसेच सहा एकर जागा भाडेकराराने घेण्यास शासनाची मंजूरी

अलिबाग :- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अलिबाग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 500 रुग्णखाटांचे रुग्णालय सुरु करण्यास शासनाकडून  मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. 
      शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,अलिबाग सुरु करण्याकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा अपुरी असल्यामुळे राष्ट्रीय केमिकल्स अॅन्ड फर्टिलायझर्स लिमिटेड, थळ,अलिबाग या संस्थेच्या मौजे कुरुळ येथील वसाहतीतील जुनी शाळा , टाईप ए रेसिडन्सी क्वॉर्टरच्या सहा इमारती तसेच शाळेजवळची सहा एकर मोकळी जागा प्रति विद्यार्थी रु.2 हजार प्रति सेमिस्टर ( शासकीय वसतीगृह शुल्क ) इतक्या भाडेकराराने 3 वर्षाकरिता* घेण्यास व त्यानुषंगाने संचालक , वैद्यकीय शिक्षण व आणि संशोधन यांनी सादर केलेल्या सामंजस्य कराराच्या मसुद्यास शासनाने मान्यता दिली आहे . 
     या करारानुसार राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी ज्या महिन्यात प्रथम निरीक्षण होईल त्या महिन्यापासून भाडेपट्टी करार अंमलात येईल. या भाडेकराराची मुदत 3 वर्ष राहील. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची ( NMC ) मान्यता मिळाल्यानंतरच या जागेबाबतचे भाडे अदा करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. 

राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा ; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सर्वानुमते निर्णय

मुंबई : राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले

 यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून आपण कोविडची लढाई लढतो आहोत. जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्याने राज्यात लसीकरण सुरु आहे. आजतागायत ४५ च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे.

लस पुरवठ्याप्रमाणे लसीकरण कार्यक्रम घोषित करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळेच १८ ते ४४ च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.

जास्तीत जास्त लस मिळविण्याचे प्रयत्न
सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तील जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल.

उत्तम नियोजन करावे
18 ते 44 वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे

कोविन एपवर नोंदणी करा
या वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाईल एपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये
लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील असेही मुख्यमंत्री म्हणतात🔴

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार रवींद्र मालुसरे यांना जाहीर

फलटण : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या राज्यस्तरीय पत्रकारांच्या प्रातिनिधीक संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणार्‍या २८ व्या सन २०२० च्या ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केली असून त्यातील सन्मानाचा मुंबई विभागातून रविंद्र तुकाराम मालुसरे, संपादक, साप्ताहिक पोलादपूर अस्मिता व मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईचे अध्यक्ष यांना प्रदान करण्यात येणार आहे. 

   याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार ‘दर्पण’ पुरस्कार मुंबई येथील उत्कृष्ट समाज माध्यम पत्रकारिता करणारे मुक्त पत्रकार श्री.योगेश वसंतराव त्रिवेदी व धाडसी पत्रकार, कोविड योद्धा म्हणून ‘दर्पण’ पुरस्कार श्री.मंगेश चिवटे (मुंबई)यांना जाहीर करण्यात आला आहे.

 रवींद्र मालुसरे हे मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष असून गेल्या अनेक वर्षात त्यांनी अनेक उपक्रम कल्पकतेने राबविले आहेत. मुंबई आणि महाड पोलादपूर तालुक्यातील अनेक सामाजिक-सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आहे. गेली ३२ वर्षें ते विविध विषयांवर वर्तमानपत्रातून सातत्याने लेखन करीत असतात. 

 जाहीर केलेले पुरस्कार ‘कोव्हिड-2019’ च्या परिस्थितीत राज्य शासनाच्या निर्देशानुसार बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी पोंभुर्ले ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ‘दर्पण’ स्मारक प्रकल्पातील ‘दर्पण’ सभागृहात समारंभपूर्वक देण्यात येतील. सर्व पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव (सातारा) व कृष्णा शेवडीकर (नांदेड) तसेच कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके (सातारा) यांनी अभिनंदन केले आहे.

आगरी साहित्यिक सर्वेश तरेंची मायेची सावली हरवली ; अश्विनी तरे यांचे दुःखद निधन

दिव्या पाटील / नवी मुंबई - आगरीकोळी भाषेची गोडी ज्यांनी जगाला नव्याने दाखवली असे आगरी कोळी साहित्यिक सर्वेश तरे यांच्या आईचे म्हणजेच अश्विनी रवींद्र तरे यांचे दुःखद निधन झाले. अश्विनी तरे ह्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते त्यातील शासनाचा हिरकणी नवोद्योजिका पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. 

अश्विनी तरे ह्या अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या होत्या. समाजाबद्दल त्यांच्या मनात नेहमीच ओढ होती. 

  त्यांनी अनेक सामाजिक कार्ये देखील केली आहेत. त्यांना पाककलेची देखील फार आवड होती. कुटुंबात व कुटुंबा बाहेर सुद्धा त्या नेहमी दुसर्यांना मदत व पाठिंबा देत असत. त्यांच्या अश्या अचानक जाण्याने सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सगळी कडे हळहळ व्यक्त केली जात आहे. आदर्श वार्ताहर तर्फे अश्विनी रवींद्र तरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सोमवार, २६ एप्रिल, २०२१

कातळवाडीतील कर्तव्यदक्ष,मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड ; जयराम सखाराम तांबे यांचे दुःखद निधन !

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी गावचे भूमिपुत्र जयराम सखाराम तांबे ( वय वर्षे - ७६ ) यांचे नुकतेच रविवार दि.२५ एप्रिल २०२१ रोजी आकस्मिक निधन झाले.

कातळवाडीतील सामाजिक,शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रनिय असणारे हे नेतृत्व होते.कातळवाडी येथील अनेक वर्षे प्रसिद्ध असे साज श्री कला केंद्र यांचे मालक तसेच विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसा.लि.गाव ( कळंबट,केरे, पिळवली, मुर्तवडे ) या संस्थेचे माजी चेअरमन म्हणून कार्यभार संभाळला.कातळवाडी ग्रामीण मंडळाचे सल्लागार व श्री तांबे नवतरुण हनुमान भक्त मंडळ,( तांबेवाडी ) मंडळाचे मार्गदर्शक व श्री हनुमंतरायाचे पुजारी होते.

जयराम तांबे ( बाबा ) म्हणजे कातळवाडीतील एक सर्वश्रुत नाव होते.त्यांच्या अचानक जाण्याने वाडीत शोककळा पसरली आहे.आपल्या प्रेमळ,शांत,नम्र स्वभावाने ते अनेकांच्या ह्रदयी दडलेलं एक व्यक्तिमत्त्व होतं.

त्यांच्या निधनाच्या बातमीने अगदी सगळ्यांनाच धक्का बसला.बाबांनी अथक परिश्रमाने कातळवाडीतील अनेकांना आदर्श म्हणजे श्री हरिश्चंद्र तांबे ( भाई ) यांना त्याकाळी अगदी आर्थिकदृष्ट्या कमकुवत परिस्थिती,अपुरी दळणवळण साधने या समयी देखील बाबांनी त्यांचा मुलगा आमच्या हरी भाईंना उच्च शिक्षण दिले.

  बाबांच्या पोटी हरी भाई,चंदू दादा,प्रभा दादा, राजा दादा,योगेश,नीलम ताई ही त्यांची मुलं आज या साऱ्यांना चांगले संस्कार देत,मायेने वाढवत आज हा परिवार सुखी-समाधानात जीवन जगत आहे.मात्र आजच्या बाबांच्या जाण्याने,या दुःखद घटनेने या कुटुंबावर दुःखाचे सावट कोसळले आहे.त्यांना कातळवाडी ग्रामीण-मुंबई मंडळ व श्री तांबे नवतरुण हनुमान भक्त मंडळ ( तांबेवाडी ) तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

शरद पवार यांनी १९०-साखर कारखान्यांना दिले ऑक्सीजन निर्मितीचे आदेश

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस वेगाने covid-19 कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणा आणि पोलिस शासन तसेच कोरोना महामारी संबंधित इतर सर्व यंत्रणा आणि संबंधित लोक यांच्यावर प्रचंड प्रमाणात ताण आला आहे 

कोरोना लसीकरणावर भर दिला जात असला तरी लसीचा तुटवडा रेमेडीसीवर इंजेक्शन आणि बेडच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे 

यातच राज्यात गेल्या-२४ 24 तासात-६७-हजारज-१३जनांची चाचणी सक्रिय आली असून-६२-हजार-२९७-जण या साथीत मुक्त होऊन घरी परतले आहेत तर काल दिवसभरात राज्यातील-५६८ बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे दुसरीकडे राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमावल्याच्या धक्कादायक घटना घडत आहेत दरम्यान ऑक्सिजनच्या निर्माण झालेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा मा-शरद पवार  सरसावले असून त्यांनी राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्यातील तब्बल-१९०-साखर कारखान्यांना ऑक्सिजनची निर्मिती करण्याचे आदेश वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने साखर कारखान्यांना पत्र पाठवून दिले आहेत जे कारखाने बंद आहेत त्यांना ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयाना पुरवावे असेही आव्हान पवार यांनी  पत्रात केले आहे


ऑक्सिजन, रेमडीसीवीर, रुग्ण व्यवस्थापनाचा मुख्य सचिवांकडून आढावा : राज्यातील सर्व रुग्णालयांचे ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडीट’ करा ;जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांचे निर्देश

 मुंबई, दि. २३: नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट करतानाच ऑक्सिजन ऑडीट करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज जिल्हा यंत्रणेला दिले. ऑक्सिजन टॅंकरना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला असून पोलिस संरक्षणात त्याची वाहतुक करावी आणि परस्पर टॅंकर वळवू नयेत, अशा सूचनाही मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या.

  राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतानाच ऑक्सिजन, रेमडीसीवीरची उपलब्धता, रुग्ण व्यवस्थापन याबाबींचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग यांच्यासह विशेष कार्यधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले सचिंद्र प्रताप सिंह, अमीत सैनी, अश्वीन मुदगल (ऑक्सिजन उपलब्धतेसाठी), दीपेंद्र कुशवाह (ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी) आणि विजय वाघमारे (रेमडीसीवीर उपलब्धतेसाठी) उपस्थित होते.

*टास्क फोर्सच्या सूचनेनुसार रुग्णांना ऑक्सिजन द्यावा*

राज्यातील सर्व रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडीट करतानाच आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. यासोबतच सर्व रुग्णालयांचे ऑक्सिजन ऑडीट करण्याचे निर्देश मुख्य सचिव श्री. कुंटे यांनी दिले. त्यामध्ये रुग्णाला शास्त्रशुद्ध पद्धतीने ऑक्सिजन दिला जात आहे का, तो वाया जावू नये यासाठी टास्क फोर्सच्या सूचनांचे पालन होत आहे याबाबींची तपासणी करावी आणि रुग्णालयांमधील ऑक्सिजनच्या नलिका, साठवणुक यंत्रणा याठिकाणी ऑक्सिजन गळती होत नाहीये ना तो वाया जात नाहीये याची पाहणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

*जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर घ्या*

सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर घेण्यात यावे जेणेकरून सिलेंडर आणि लिक्विड ऑक्सिजनवरील अवलंबत्व कमी करता येईल, असे मुख्य सचिवांनी सांगितले. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी पीएसए तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सिजन प्लांट उभारावेत, असेही त्यांनी सांगितले.

ऑक्सिजन टॅंकरला रुग्णवाहिकेचा दर्जा*

राज्यात ऑक्सिजन टॅंकरची वाहतुक कुणीही रोखू नये त्यासाठी त्याला रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे. पोलिस संरक्षणात या टॅंकरची वाहतुक करण्यात यावी कुठल्याही प्रकारे ऑक्सिजन टॅंकर वळविण्यात येऊ नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाला सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात नियोजनबद्धरित्या ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा असे सांगतानाच आज रात्री (शुक्रवारी) विशाखापट्टणम् येथून रेल्वेद्वारे ऑक्सिजन टॅंकर येणार असून त्यातील चार नागपूर आणि नाशिक येथे पाठविण्यात येतील, असे मुख्य सचिवांनी सांगितले.

यावेळी मुख्य सचिवांनी राज्यातील उपलब्ध ऑक्सिजनचा आढावा घेतला. राज्यात अन्य ठिकाणांहून जो ऑक्सिजन आणला जात आहे त्याच्या साठवणुकीची सुविधा तयार करावी, असे निर्देशही श्री. कुंटे यांनी यावेळी दिले. रेमडीसीवीर उपलब्धतेबाबत प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, कोविड रुग्णालये, कोविड केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी तातडीने अग्निशमन दल व्यवस्था तैनात करण्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

 अलिबाग,:- रायगड जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागातील जिल्हा रुग्णालय, कोविड रुग्णालये, कोविड केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र, यापासून १०० मीटर अंतरावर तातडीने अग्निशमन दल तैनात करण्याचे निर्देश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

      पालकमंत्री कु.तटकरे यांनी जिल्हाधिकारी व पनवेल महानगरपालिका आयुक्त हे या निर्देशाचे पालन करतील व सर्व संबंधिताना  आवश्यक ते आदेश जारी करतील, असे सांगून सध्याच्या परिस्थितीत आपण शक्य तितकी सावधगिरी बाळगून नागरिकांची आणि रुग्णांची सुरक्षा यास सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे, असेही म्हटले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून "रायगड जिल्हास्तरीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली" कार्यान्वित ; एका क्लिकवर मिळणार जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमधील उपलब्ध बेड्स ची माहिती

अलिबाग,:- जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे, या पार्श्वभूमीवर रुग्णांना कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडस् ची,तसेच इतर अनुषंगिक बाबींची माहिती होण्याची गरज निर्माण झाली आहे. 

      जिल्ह्यातील नागरिकांची ही गरज  तातडीने लक्षात घेऊन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या पुढाकारातून आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या raigad.gov.in  या वेबसाईटवर www.covid19raigad.in  ही url लिंक संलग्न केली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांना जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमधील उपलब्ध बेडस् ची संख्या व इतर अनुषंगिक माहिती तात्काळ समजू शकणार आहे.    

     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या शासकीय वेबसाईटवर जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या करोना उपाययोजनांबाबतची,  शासन निर्णयाची, विविध शासकीय आदेशांची इत्यंभूत माहितीही उपलब्ध आहे.

     तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, वरिष्ठ तांत्रिक संचालक व जिल्हा सूचना- विज्ञान अधिकारी चिन्ता मणि मिश्रा, तहसिलदार विशाल दौंडकर यांनी केले आहे.

एमजीएम कामोठे,रुग्णालयासोबत २०० आयसीयू बेड व दररोज ३०० आरटीपीसीआर टेस्ट मिळण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचा झाला करारनामा

पनवेल, दि.22 : पनवेल महानगरपालिकेने दिनांक २० एप्रिल च्या सभेत घेतलेल्या निर्णयानुसार आज एमजीएम रुग्णालय, कामोठे व पनवेल महानगरपालिका यांच्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी जास्तीजास्त मोफत वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याच्या दृष्टीने २०० आसीयू बेड मिळण्यासाठी करारनामा करण्यात आला. सध्या एमजीएम रुग्णालय कामोठे येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत (MJPJAY) २५० बेड सुविधा उपलब्ध असून नवीन करारामुळे आणखी २०० आयसीयू बेड उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पनवेल मधील नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल. सदर बेड १ मे २०२१ पासून टप्प्याटप्प्याने महापालिकेला प्राप्त होतील. 

    पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना बाधित किंवा कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींच्या दररोज ५०० आरटीपीसीआर चाचण्या जे जे रुग्णालयात तर २०० चाचण्या अलिबाग येथील प्रयोगशाळेत केल्या जात जात आहेत. चाचण्या करण्याची सुविधा अपुरी पडू लागल्यामुळे कोरोना बाधित किंवा कोरोनाची लक्षणे असलेल्या नागरिकांची मोफत आरटीपीसीआर टेस्ट करण्याकरिता दररोज ३०० टेस्ट एमजीएम रुग्णालयामार्फत मिळण्याकरिता सुद्धा यावेळी करार करण्यात आला. त्याच प्रमाणे तेरणा मेडिकल कॉलेज यांच्याकडून सुद्धा दररोज ३०० आरटीपीसीआर टेस्ट मिळण्याकरिता करारनामा करण्यात आला. त्यामुळे पनवेल महापालिकेतील नागरिकांना उद्यापासून अधिकच्या ६०० आरटीपीसीआर टेस्ट मोफत करून मिळतील. त्यासोबतच आवश्यकतेप्रमाणे ॲटीजीन टेस्ट करण्यात येत आहेत. 

   सध्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जास्तीत जास्त मोफत टेस्ट उपलब्ध करून देण्याकरिता पनवेल महापालिका प्रयत्न करत असून एमजीएम व तेरणा मेडिकल कॉलेज यांच्यासोबत प्रत्येकी ३०० आरटीपीसीआर टेस्ट मिळण्याकरिता करारनामा केल्यामुळे पनवेलमधील नागरिकांना दररोज १३०० आरटीपीसीआर टेस्ट मोफत करून मिळतील. 

    पनवेल मधील वाढती कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने ८०० बेडचे जम्बो फॅसिलिटी सेंटर सिडकोच्या मदतीने उभे करण्याकरीता मान्यता दिली असून कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या गोडाऊनमध्ये कळंबोली येथे २०० आयसीयू बेड व ६००ऑक्सीजन बेडचे जम्बो फॅसिलिटी सेंटर निर्माण करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात महापालिकेला एमजीएम कडील २०० आयसीयू बेड व जम्बो फॅसिलिटीतील ८०० बेडस् असे एकूण १००० बेड कोरोना उपचारासाठी उपलब्ध होतील. याशिवाय एमजीएम मध्ये २५० बेड महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना (MJPJAY) या अंतर्गत पनवेल करांसाठी मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध राहतील.

  आज एमजीएम सोबत करारनामा करतेवेळी मा. महापौर श्रीमती कविता किशोर चौतमोल,मा. उपमहापौर श्री जगदीश गायकवाड, मा.आयुक्त श्री सुधाकर देशमुख, मा. सभागृहनेते श्री परेश ठाकूर, मा.स्थायी समिती सभापती श्री संतोष शेट्टी ,नगरसेवक श्री गणेश कडू,उपायुक्त श्री संजय शिंदे,वैद्यकीय अधिकारी श्री आनंद गोसावी

एमजीएम रुग्णालयाचे ट्रस्टी मा.श्री सुधीर कदमडीन श्री नरशेट्टी ,श्री सलगोत्रा उपस्थित होते.

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या पुढाकारातून पेण येथील जेएसडब्लू कंपनीच्या हॉस्पिटलमध्ये लवकरच सुरू होणार अद्ययावत जम्बो कोविड केअर सेंटर


 अलिबाग:- जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असलेल्या पेण-डोलवी येथील जे.एस.डब्ल्यू कंपनीच्या हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधायुक्त अद्ययावत जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करणेबाबत मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी विनंती केली होती. त्यानुषंगाने ही विनंती तात्काळ मान्य करीत याबाबतचे आदेश शासनाकडून निर्गमित करण्यात आले आहेत. 

      जिंदाल गृपचे संचालक श्री.सज्जन जिंदाल यांनी देखील कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्याच्या सूचना येथील कंपनी प्रशासनास दिल्या आहेत. 

      या ठिकाणी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी प्रत्यक्ष भेट देवून माहिती घेतली व संबंधितांना आवश्यक त्या सूचनाही केल्या. टप्याटप्याने जवळपास आठशे बेडस् चे आरोग्यविषयक सर्व सुविधायुक्त हे जम्बो कोविड केअर सेंटर सुरू होऊन नागरिकांना आरोग्यसंबंधी सर्व सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

    यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार डॉ.अरुणा जाधव व स्थानिक प्रशासनातील इतर अधिकारी तसेच जेएसडब्ल्यू कंपनीचे प्रकल्प प्रमुख गजराज सिंग राठोड, राजेश कुमार रॉय , मुकेश कुमार, जेएसडब्ल्यू रुग्णालयाचे प्रमुख शुभंकर शहा, नारायण बोलगुंडा, प्रज्वल शिरसेकर मगरखान आदी उपस्थित होते.

लॉकडाऊन काळात पात्र लाभार्थ्यांना मिळणार मोफत अन्नधान्य तसेच शिवभोजन केंद्रावरून मोफत जेवण

अलिबाग -करोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावास प्रतिबंध व्हावा, याकरिता महाराष्ट्र राज्यामध्ये टाळेबंदी तसेच संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.     

        या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या आर्थिक सहाय्यातर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम,2013 अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंब योजनेच्या सुमारे 7 कोटी लाभार्थ्यांना 1 महिन्याकरीता मोफत अन्नधान्य (गहू व तांदूळ) वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा जिल्ह्यातील सुमारे 17 लक्ष लाभार्थ्यांना होणार आहे.

       या शासन निर्णयानुसार रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील पात्र लाभार्थ्यांना 1 महिन्याकरीता प्रति शिधापत्रिका 35 किलो अन्नधान्य (तांदूळ 25 किलो व गहू 10 किलो) मोफत वितरण करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती 05 किलो अन्नधान्य (तांदूळ 3 किलो व गहू 2 किलो) 1 महिन्याकरीता मोफत वितरण करण्यात येणार आहे.

       राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी माहे एप्रिल 2021 चे अन्नधान्य रास्तभाव दुकानातून घेतलेले नसेल त्यांना माहे एप्रिल 2021 मध्येही मोफत अन्नधान्य उचल करता येईल व वरीलप्रमाणे ज्या लाभार्थ्याचे माहे एप्रिल 2021 मधील त्याच्या कोटयाचे अन्नधान्य उचल केले असल्यास त्या लाभार्थ्यांना माहे मे 2021 मध्ये मोफत धान्य घेता येईल. 

     पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण करताना शिधापत्रिकेतील किमान एका व्यक्तीचा बायोमेट्रीक पध्दतीने अंगठा ई-पॉस मशिनवर ठेवूनच अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे.(पात्र शिधापत्रिककेतील लाभार्थ्याचे आधारकार्ड प्रमाणीकरण करून)

      जिल्हयात दि.15 एप्रिल 2021 रोजीपासून जिल्हयातील सर्व 88 शिवभोजन केंद्रातून गरीब व गरजू व्यक्तींना मोफत शिवभोजन थाळी वितरण सुरू केले आहे. शिवभोजन थाळी घेताना शिवभोजन ॲपव्दारे लाभार्थ्यांचा फोटो , संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक अपलोड करणे आवश्यक आहे.

       सर्व रास्तभाव दुकानदार व पात्र लाभार्थी यांनी शासन नियमानुसार अन्नधान्य वितरण/उचल करताना शासनाने ठरवून दिलेल्या मास्क वापरणे, सॅनिटाईजरचा वापर करणे, साबणाने स्वच्छ हात धुणे, दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी 2 मीटरचे अंतर ठेवणे, या सर्व करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावयाचे आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी कळविले आहे.

अल्पशा आजाराने एक वादळ शमलं ; मोहनराव पुतळजी येलवे यांचे निधन


रायगड
- म्हसळे तालुक्यातील बौद्ध समाजाचे एक थोर आणि धुरंधर नेते मोहनराव पुतळजी येलवे यांचं निधन वयाच्या सत्तरव्या वर्षी दि. 15 एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरी कांदिवली येथे झालं. येलवे साहेबांची थोरवी गावी तेव्हढी कमीच असेल. समाजासाठी केलेलं कार्य आणि त्यांचं योगदान हे केव्हाही सर्वश्रेष्ठच असेल. म्हसळे तालुका बौद्धजन समितीची स्थापना करुन हरिश्चंद्र स. मोहिते साहेबांनंतर अनेक वर्ष ते ह्या समितीचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची स्थापना करुन भव्य असं सभागृह उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. येलवे साहेबांचा स्वभाव हा परिस्थितिनूरुप असे. प्रसंगी ते खुप कठोर भुमिका घेत असंत, ते तितकेच शांत आणि संयमीही होते. कार्यकर्त्यांमधे त्यांचा दबदबा नेहमीच असे. कोणतेही काम हाती घेतले की ते पूर्णत्वला नेई पर्यंत थांबणे हे त्यांच्या स्वभावातच नसे. राजकारणातल्या बड्या-बड्या नेत्यांशी त्यांची उठक बैठक असे. संपुर्ण जंजीरा विभागामधे ते प्रसिद्ध होते, पंचक्रोशीत त्यांचा बोलबाला होता. बृहन्मुंबई महानगर पालिकामधून ते प्रथमश्रेणी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या स्वभावामधे नेहमी आपलेपण दडलेले होते म्हणून ते नेहमी त्यांच्या कार्यकर्त्यांकडे बोलतना एकेरी भाषेचा उल्लेख असे. समाज, राजकारण, नोकरी अश्या अनेक बाबी त्यांने मोठ्या जबाबदारीने पाडल्या होत्या. संपुर्ण समाज आज शोकाकुल अवस्थेत असुन त्यांचं निरंतर स्मरण करेल. त्यांच्या तालमित त्यांने अनेक कार्यकर्ते घडविले. त्यांच्या कारकिर्दीत त्याने अनेक कार्यक्रम राबवले मग  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर असो वा आरोग्य शिबिर असो असे अनेक कार्यक्रम त्यांने जबाबदारीने व अथक  परिश्रमाने पार पाडले. लोकांप्रती आणि समाजाप्रती एक जाज्वल्य अभिमान असणारा नेता येलवे साहेबांसारखा पुन्हा होणे नाही. 


बुधवार, २१ एप्रिल, २०२१

पेन्शनरांना अनुदान मिळावे

राज्यात मोठ्या प्रमाणात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कडक निर्बंध जाहीर झाले आहेत. त्यामुळे उपेक्षित घटकांचे उत्पादनांचे साधन बंद झाले आहे. अशा परिस्तिथीत काही उपेक्षित घटकांना, या मध्ये परवानाधारक रिक्षा चालक ही आले. अशांच्या बँक खात्यात थेट ऑनलाईन पैसे जमा करण्यात येणार आहेत. या बद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानताना. तरी महाराष्ट्र मध्ये खासगी क्षेत्रातील E P S १९९५ चे पेंशनर असून, पेन्शनर्स समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी २१ जून २०१९ रोजी शिवसेना भवन मध्ये शिवसेना पक्षप्रमुख व विद्यमान मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे यांना पेन्शनरांच्या मागणीचे निवेदन सादर केले आहे. या मध्ये केंद्र शासनाच्या भविष्य निर्वाह निधीचे ६८ लाख पेन्शनरांचे २० लाख ८० हजार कोटी रु जमा आहेत. या जमा रक्कमे करता महाराष्ट्र शासनाने आग्रह धरावयास हवा. त्यामुळे निदान करोना लॉकडाऊन काळात होरपळलेल्या पेन्शनरांना काही प्रमाणात महाराष्ट्र शासनातर्फे अनुदान जाहीर केल्यास आर्थिक दिलासा मिळू शकेल. 

-विजय कदम ,लोअर परळ

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू

नाशिक  : राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून गंभीर परिस्थिती असतानाच नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे. दरम्यान अजून काही रुग्ण गमावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालयातील काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे.

   नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टाकीतून गळती झाली होती. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाली. टाकीमधील गळती रोखण्यासाठी तसंच दुरुस्तीसाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. दरम्यान रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ पैकी २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना लसीबाबत शासनाने नियोजन करावे.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत, केंद्र सरकारने, १ मे पासून १८ वर्षा  वरील सर्वांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला असून, देशातील जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे.

  देशात जानेवारी २१ पासून लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी , बँक कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता. १ मार्च पासून सुरू झालेल्या दुस-या टप्प्यात ४५ वर्षा वरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना चा वाढता उद्रेक लक्षात घेऊन मोदी सरकारने १८ वर्षा वरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला.
    दुसऱ्या टप्प्यात सर्वच लसीकरण केंद्रात गर्दी होती. काही केंद्रावर लसीचा साठा कमी आल्याने, असंख्य नागरीकांना निराश होऊन परतावे लागले. १ मेपासून, १८ वर्षा वरील सर्वांना लस देण्यात येणार असल्याने,सर्वच केंद्रावर  खूपच गर्दी होणार आहे.व प्रशासनाला गर्दी आटोक्यात आणणे कठीण होईल.महाराष्ट्र शासन व पालिका प्रशासनाने याचा अभ्यास पूर्वक विचार विनिमय  करून व पूर्ण लसीचा कोठा उपलब्ध झाल्या नंतरच सर्वांना लस देण्यात यावी.

 -बाळ पंडित, चिंचपोकळी (प)

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण


पनवेल / प्रतिनिधी : पत्रकार उत्कर्ष समिती नवी मुंबई सदस्य डॉ. रत्नदीप गवळी यांच्या सहकार्याने व समिती अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे , सचिव डॉ. वैभव पाटील, नवी मुंबई अध्यक्ष लालचंद यादव  यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आले. 

ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांसाठी अतिशय माफक दरात ही सुविधा उपलब्ध राहणार असून कोविड 19 च्या या संक्रमण काळात पत्रकार उत्कर्ष समितीने समाजाप्रती आपल्या सेवेचा खारीचा वाटा उचलला आहे. यावेळी  उद्योगपती राजेश बी. टेलर , पटवर्धन हॉस्पिटलचा प्रशासकीय वर्ग उपस्थित होता. या सेवेचा अधिकाधिक जनतेने लाभ घ्यावा.खोपोली, पेण व नवी मुंबईत ही  रुग्णवाहिका उपलब्ध राहणार आवश्यकतेनुसार   9922012359 - 7507239999 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील ७ लाख १५ हजार रिक्षा परवानाधारकांना सानुग्रह अनुदान जाहीर - परिवहनमंत्री अनिल परब

मुंबई - राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून घातलेले निर्बंध व त्या अनुषंगाने राज्य शासनाने राज्यातील रिक्षा परवानाधारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानासंदर्भात आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि.२०) परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचे अध्यक्षतेखाली मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी यांचे समवेत मंत्रालयात बैठक झाली.

   राज्यात सात लाख पंधरा हजार रिक्षा परवानाधारक असून त्यांना प्रत्येकी १५०० रुपये प्रमाणे एकूण १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यावर थेट ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.याकरीता परिवहन विभागामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना आपले आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती क्रमांक याची ऑनलाईन नोंद करावी लागेल व याची खातरजमा झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे.

   या प्रणालीची माहिती विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याकरीता रिक्षा परवानाधारकांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘सर्व रिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करुन घ्यावे. जेणेकरुन या सानुग्रह अनुदानाची रक्कम वेळेवर अदा करता येईल,’ असे आवाहन परिवहन मंत्री ॲड. परब यांनी केले.

साई वेताळ स्पोर्ट्स ग्रुप कळंबुसरे आयोजित रक्तदान शिबिरात 55 रक्तदात्यांसोबत हळदी लागलेल्या नवरीने ही केले रक्तदान.

उरण /विठ्ठल ममताबादे -कोविडच्या कठीण परिस्थितीमध्ये शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत समर्पण ब्लड बँक-घाटकोपर मुंबई यांच्या सहाय्याने सलग दुसऱ्या वर्षीही  रामनवमीचे औचित्य साधून कळंबुसरे-उरण  येथील साई मंदिराच्या प्रांगणात रक्तदान शिबीर आयोजित केले होते.शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे साई वेताळ ग्रुप ची सदस्य आरती पाटील हिने आज स्वतःच्या  लग्नाच्या हळदीच्या दिवशी रक्तदान करून समाजाला एक वेगळा संदेश दिला.

   या रक्तदान शिबिरात एक उत्कृष्ट डान्स कोरिओग्राफर तथा सिनेकलाकार पपन पाटील, स्टेप आर्टचे अध्यक्ष पप्पू सूर्यराव आणि 29 वेळा रक्तदान करणारे रुपेश म्हात्रे व सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर यांच्या सहित 55  रक्तदात्यांनी रक्तदान केले.यामध्ये तब्बल 14 महिलांनीही रक्तदानाचा हक्क बजावला.

   रक्तदान शिबिरासाठी स्वतःच्या बहिणीची हळद असतानासुद्धा साई वेताळ स्पोर्ट्स ग्रुपचे अध्यक्ष नंदकुमार पाटील, नरेश पाटील,स्वप्निल पाटील, डॉ.शैलेश पाटील, हर्षद पाटील, रणजित पाटील, अभि पाटील, शुभम पाटील, सुयोग पाटील, यतीश भेंडे, प्रतिक म्हात्रे, क्षितिज म्हात्रे, ऋतिक म्हात्रे, जितेंद्र भेंडे, विलास भेंडे, रमेश म्हात्रे,  प्रभुश्वर म्हात्रे या बंधूंनी खूप मेहनत घेतली.रक्तदान शिबिरास गोवठणे विकास मंच चे अध्यक्ष  सुनिल वर्तक यांचे मोलाचे सहकार्य यावेळी लाभले.

   शिबिरादरम्यान उपसरपंच  सुनील पाटील, उद्योगपती कुलदीप नाईक, ऍड.निनाद नाईक, ग्रामपंचायत सदस्य महेश राऊत, पत्रकार अजित पाटील,पत्रकार सुभाष कडू आणि पत्रकार महेश भोईर यांनीही भेट देऊन रक्तदात्यांचं आणि आयोजकांचे कौतुक केले.सदर रक्तदान शिबिरामुळे अनेक गरजू गोर गरिबांना वेळेत रक्त उपलब्ध होऊन यामुळे गोरगरिबांना  जीवनदान मिळणार आहे.

वाढदिवसाचे औचित्य साधून विटभट्टी मजूरांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप ; सामाजिक कार्यकर्ते राजेश भोईर यांच्याकडून गरजूंना आधार !

उरण (विठ्ठल ममताबादे )- कोरोनाच्या संकटांत जनतेला मोठ्या आर्थीक बाबीला सामोरे जावे लागत आहे.कोरोनाच्या महामारीत अनेकांच्या हातच्या नोकऱ्या गेल्या आहेत.त्यातच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठी उसली घेतली आहे.अशातच गोरगरीब आणि मोलमजुरी करणाऱ्या म्हणजे ज्यांचे संसार हातावर चालते अशांना थोडा आधार मिळावा या हेतूने उरणचे माजी आमदार तथा शिवसेना  रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या आदेशाने मोठीजुई गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे युवा कार्यकर्ते राजेश जगदिश भोईर यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त दर वर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या वाढदीवशी सत्कर्माचा योग घडावा या दृष्टीने चिरनेर गावा शेजारी असणाऱ्या विटभट्टीवर  मजुर म्हणुन काम करुन झोपडीतच आपले जिवन जगत असलेल्या गरीब कुटूंबांना जिवानवश्यक वस्तू वाटप करण्याचा निर्धार केला आणि त्या गरीब कूटूंबांना तांदूल,गहू,कांदे,साखर,मुगडाळ,चणाडाळ,चहापावडर,मसाले,हळद,गोडेतेल,साबण,डीटर्जन पावडर,कोळगेट,बिस्कीट,चाँकलेट आदि जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली.या वेळी सकाळचे पत्रकार सुभाष कडू,मोठीजुई सामाजिक विकास मंचचे राजेश भोईर,नागेश भोईर,प्रियाल पाटील,स्वप्निल पाटील,बाळु पाटील,कुंदन पाटील,मनिष पाटील,प्रशांत पाटील,प्रविण कामोठकर,पवन जोशी सह एंजाँय ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

उरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी ; उरणच्या कोविड सेन्टरला हॉट अँड कोल्ड डीस्पन्सर, फॅन, बेडशीट, सॅनिटायझर, ओडोनिल क्रीम बॉक्स दिले भेट

उरण (विठ्ठल ममताबादे ) - महाराष्ट्र राज्यात कोरोना आजाराच्या दुसऱ्या लाटेमुळे  अनेक नागरिक बाधित झाले असून राज्यात विविध रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.त्यांना शिवसैनिकांनी सर्वतोपरी मदत करा असे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  यांनी  आदेश दिले त्या आदेशाचे पालन करत खासदार श्रीरंग आप्पा बारणे,रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली उरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते  गणेश शिंदे यांनी उरणच्या कोविड सेन्टरला  हॉट अँड कोल्ड डीस्पन्सर, फॅन, बेडशीट,  सॅनिटायझर, ओडोनिल क्रीम बॉक्स भेट देऊन कोरोना रुग्णाबद्दल आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. 

   उरण मध्ये नगरविकास मंत्री  एकनाथ शिंदे  यांच्या  सहकार्याने  व माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांच्या सततच्या प्रयत्नाने  तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्या पाठपुराव्यामुळे सिडको च्या माध्यमातून हे हॉस्पिटल उभारले नसते तर आज  वाढत्या कोरोना रुग्णांमुळे उरण तालुक्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली असती.

  आपली प्रतिक्रिया देतांना शिवसेना गटनेते गणेश शिंदे म्हणाले की, उरण कोविड सेन्टर मध्ये बऱ्याच आरोग्य विषयक साहित्यांची कमतरता आहे, हे आम्हाला कळल्यावर शिवसेनेच्या  माध्यमातून 42 बेड तयार करून आवशक  साहित्य मोफत उपलब्ध करून दिले आहेत. 

 शिवसेना माजी जिल्हाप्रमुख  दिनेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश राहाळकर, तालुका प्रमुख  संतोष ठाकूर, शहर संपर्कप्रमुख  गणेश म्हात्रे, शहरप्रमुख  विनोद म्हात्रे, शहर संघटक भूषण घरत, दिलीप राहाळकर व सर्व आजी माजी प्रमुख पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नगरसेवक अतुल ठाकूर, अक्षय ठाकूर व साजन कांबळी  यांनी हे साहीत्य उरण चे तहसीलदार  भाऊसाहेब अंधारे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार व राजेंद्र मढवी यांच्याकडे सुपूर्द  केले.  यावेळी वैद्यकीय अधिकारी, प्यारामेडिकल स्टाफ व  आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.शिवसेनेतर्फे कोरोना काळात विविध प्रकारे सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात सुरु असून हॉस्पिटल प्रशासन व उरणच्या जनतेने शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे,  शिवसैनिकांच्या या कार्याचे कौतुक करत आभार मानले आहे.

ONGC कर्मचारी क्रेडिट सोसायटी उरण तर्फे कोविड रुग्णांना हल्दी कफ औषधांचे वाटप : रुग्णांना मिळाला औषधांमुळे आराम ; क्रेडिट सोसायटीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक. हॉस्पिटल प्रशासनाने मानले ONGC कर्मचारी क्रेडिट सोसायटीचे आभार.

उरण (विठ्ठल ममताबादे )- ONGC कर्मचारी क्रेडिट सोसायटी उरण यांच्या तर्फे कोविड हॉस्पिटल उरण येथे दाखल होणाऱ्या सर्व रुग्णांना  खोकल्यावर प्रभावी औषध हल्दी कफ हे देण्यात आले. सदर औषध हे प्रख्यात डॉक्टर प्रफुल्ल सामंत यांनी सुचवले होते. ते औषध  खोकल्या वर अत्यंत गुणकारी आहे. सोसायटी तर्फे एकूण 417 बॉटल्स देण्यात आल्या. सदर औषधाच्या बाटल्यांची किंमत 25000/- इतकी होती. सर्व रुग्णांना सदर औषध घेतल्यावर खुप बरे वाटले आणि त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच ONGC कर्मचारी क्रेडिट सोसायटी उरण यांचे आभार मानले. या आधी सोसायटीने कोविड हॉस्पिटल साठी पाणी पिण्यासाठी दोन डिस्पेन्सर, दोनशे वाफारा मशीन, दहा ओक्सी मीटर, पि पि ई किट, ग्लोव्हज इत्यादी साधन सामुग्री दिलेली आहे. 

     सोसायटी चे चेअरमन इक्बाल शेख, सेक्रेटरी  एकनाथ ठाकूर, माजी चेअरमन  अरविंद घरत आणि  दिनेश घरत उपस्थित होते. उरण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज भद्रे, वैद्यकीय अधिकारी स्वाती म्हात्रे , फार्मसिस्ट संपदा घाणेकर, नर्स स्नेहल पाटील यांच्या कडे औषधे सुपूर्द केली. सदर प्रसंगी उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील,सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक राजेंद्र मढवी,  उरण नगरपालिकेचे इलेक्ट्रिशियन सुनील कुंभार उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार  यांनी तसेच हॉस्पिटल प्रशासनाने  ONGC उरण कर्मचारी क्रेडिट सोसायटीच्या या कार्याचे कौतुक करत आभार मानले.

मूल्यांकनाचे काय ?

सर्व बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा यंदा कोरोनाच्या उद्रेकामुळे रद्द झाल्या असून बारावीच्या परीक्षा भविष्यात घेणार असल्याचे सर्वांनीच म्हटलं आहे.अस असलं तरी इयत्ता अकरावी प्रवेश घेताना तो कोणत्या आधारावर घेणार ? याची चिंता पालक व विधर्थ्यना आहे.प्रवेश परीक्षा घेता येतील का ? याची चाचपणी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.विद्यार्थ्यांचे  मूल्यांकन न करता त्यांना वरच्या वर्गात पाठविणे कसे शक्य आहे ? असं मत अनेक पालकांचे,शिक्षकांचे हुशार विद्यार्थ्यांचे आहे.तेव्हा परीक्षा जरी रद्द झाल्या असल्या तरी अकरावी प्रवेशाचा प्रश्न कायम असून त्याबाबतीत शिक्षण विभागाने लवकरात लवकर सुस्पष्टता आणावी असे मत सर्वांचेच आहे.

गणेश हिरवे,जोगेश्वरी पूर्व

करोनाच्या नियंत्रणासाठी सर्वांनी राजकीय मतभेद विसरून प्रामाणिकपणे प्रयत्न करायले हवेत– मोहन चिराथ यांनी केले आवाहन

मुंबई /विशेष प्रतिनिधी : मागील  एक वर्षापासून करोना महामारीच्या काळात  संपूर्ण देश विळख्यात सापडला आहे. मृत्यूची  संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोना महामारीच्या काळात योग्यतो समन्वय साधून भांडुप मध्ये करोनावर कशी मात करता येईल, याबाबत कोणत्या प्रकारच्या तातडीने उपाययोजना कराव्या लागतील.

    मनपा व पोलीस प्रशासनाला कोणत्या पद्धतीने सहकार्य करावे लागेल. याकरिता भांडुप विभागातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, व राजकीय पक्षांचे सर्व पदाधिकारी व नागरिकांनी मनभेद व  मतभेद विसरून एकत्र पुढे येऊन या परिस्थितीचा आढावा घेऊन योग्यतो समन्वय साधावा.असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा क्रमांक 110 शाखाध्यक्ष मोहन चिराथ यांनी सर्व पक्षीयांना केले आहे.ते माध्यमांशी बोलत होते.शाखाध्यक्ष मोहन चिराथ म्हणाले की, आजमितीला भांडुपमध्ये सुसज्ज  सर्व सुविधा योग्य स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्यात आलेले नाही. तसेच लसीकरणाची क्षमता वाढवणे, व लसीकरण मोहीम राबवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे, हे महत्त्वाचे आहे. तसेच संपूर्ण विभाग निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.व  विभागातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूसह अन्नधान्यांचे मोफत वाटप करून त्यांना वेळेत मदत पुरविणे. अशा विविध प्रमुख मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येऊन करोना परिस्थिती नियंत्रणात राहण्यास मदत होईल.असे शाखाध्यक्ष मोहन चिराथ यांनी सूचित केले आहे.

   कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी  आरोग्य केंद्रे, कोविड केअर केंद्रांवर स्वच्छतेचे सर्व उपाय योजना यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे व सकारात्मकरीत्या प्रयत्न करावेत, अशीही सूचना शाखाअध्यक्ष मोहन चिराथ यांनी  यावेळी केली.कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती  शोधण्यासाठी सर्व यंत्रणांनी अग्रक्रम ठेवावा.   अँटीजन चाचण्या वाढविण्यात याव्यात. अचानकपणे रुग्ण संख्या वाढते व घटते, त्यामुळे येथील यंत्रणेने अधिक सजग राहून रुग्णांची काळजी घ्यावी.  

   यासाठी  सर्व लोकप्रतिनिधी,  खाजगी डॉक्टर्स,  शासकीय डॉक्टर्स,  सर्व यंत्रणांतील अधिकारी, माध्यमकर्मी  यांना विश्वासात घ्यावे. तसेच  प्रत्येक व्यापारी व्यावसायिक, फिरते व्यावसायिक, भाजी विक्रेते आदी व्यापार्‍यांची चाचणी करण्यास प्राधान्य द्यावे. बहुतांश लोक बरे झाले आहेत, परंतु बरे होण्याचा दर अधिक चांगला असला तरी या आजाराबाबत सर्व नागरिकांनी दक्ष राहणे आवश्यक आहे.असे सांगून चिराथ पुढे म्हणाले की, कोरोना या संकटकाळात सर्व यंत्रणेने अधिक सजग राहून कोरोना रुग्णांची  संख्या अधिक वाढणार नाही, यासाठी सर्वतोपरी उपाययोजना कराव्यात.  ज्यांचे काम उत्तम आहे त्यांची दखलही घेण्यात येईल, असे यावेळी श्री.मोहन चिराथ यांनी सांगितले.

पार्वतीपुत्र निर्मित अविअनिल कलामंचतर्फे आँनलाईन गायन स्पर्धेचे आयोजन

मुंबई/शांत्ताराम गुडेकर :    कोकण म्हणजे नररत्नांची खाण आणि पारंपरिक लोककलेची शान,कोकणातील अनेक लोककला काळानुसार लोप पावत चालल्या आहेत.त्यातील काही लोककला फक्त सणासुदीपुरत्याच मर्यादित न ठेवता त्या मध्ये पारंपरिक आणि आधुनिक समतोल साधून त्या जिवंत राहिल्या पाहिजेत, व्यावसायिक झाल्या पाहिजेत, कोकणातील कलाकारांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे यासाठीच कोकणातील बरेच लोककलाकार आप-आपल्या प्रमाणे प्रयत्न करीत आहेत. त्यापैकीचं एक कमी कालावधीत नावलौकिक मिळवलेलं पार्वतीपुत्र निर्मित अविअनिल कलामंच होय.कोकणातील लोककला सर्वांना ज्ञात राहाव्यात यासाठीच पार्वतीपुत्र निर्मित अविअनिल कलामंच विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असते.नमन,जाखडी-नृत्य अर्थात शक्तीतुरा,भारूड,नाटक या सारखे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कोकणातील पारंपारिक संस्कृती नवीन पिढीला आपल्या कुटुंबसमवेत पाहवयास यावे,यासाठी प्रयत्नशील राहत आहेत.

                 पार्वतीपुत्र निर्मित अविअनिल कलामंच नेहमीच नवनवीन कलाकारांना संधी उपलब्ध करून देत आला आहे. परंतु आज कोव्हिड मुळे सर्व जनता आणी प्रामुख्याने  कलावंत मंडळी घरात बसलेली आहेत. कलावंताना आपली कला शांत बसू देत नाही, म्हणून आम्ही पार्वतीपुत्र निर्मित अविअनिल कलामंच आँनलाइन गायन स्पर्धेचे आयोजन करीत आहे. या स्पर्धेमध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो. आपली कला असंख्य लोकांपर्यंत पोहोचवु शकतो. स्पर्धेच्या अधिक माहीती व व्हीडिओ पाठवण्यासाठी अनिल गराटे- ९७०२१३७७८० अविनाश गराटे- ९५९४९४७९१२ या व्हाटसअप क्रमांकवर संपर्क करावा.तसेच avianilkalamanch@gmail.com या ईमेलवर व्हिडिओ पाठवावा.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५ ते १२ या वयोगटासाठी ३०/- रु.प्रवेश फी असून १३ ते १८ व १९ ते ३५ वयोगटासाठी ५०/- रु.प्रवेश फी असून ती अंकीता गोणबरे- ८९२८७६७९४७ / पवन पाटमसे- ७०२१०५५०१४ या गुगळ पे नंबरवर पाठवावी.या स्पर्धेच्या नियम व अटीमध्ये १) गाण्याचा कालावधी ३ ते ४ मिनींटांचा असावा व स्पर्धकाला व्हिडिओच्या सुरुवातीला आपले संपूर्ण नावं व स्पर्धक क्रमांक सांगणे अनिवार्य आहे. २) व्हिडिओ स्वीकारण्याची अंतिम तारीख २३/०४/२०२१ असेल. ३) व्हिडिओ अविअनिल कलामंच या  युट्यूब चॅनेलवर प्रसारित झाल्यावर स्पर्धकांना गाण्याच्या लिंक  २४/०४/२०२१ ते ३०/०४/२०२१ या कालावधीत शेअर करता येतील .४)स्पर्धेचा निकाल  ६० टक्के  हा स्पर्धकांच्या मिळालेल्या  लाइक्स , व्हिडिओ अपलोड केल्यापासून ते अंतिम तारीख (२४/०४/२०२१ ते ३०/०४/२०२१ )यावर अवलंबून असेल व ४० टक्के निकाल हा परिक्षकांवर अवलंबून असेल .५) स्पर्धा व्हिडिओ मध्ये कोणत्याही प्रकारचे एडिटिंग चालणार नाही, तसे आढळल्यास तो स्पर्धक बाद करण्यात येईल. ६)स्पर्धेचा अंतिम निकाल आयोजकांतर्फे कळवण्यात येईल व कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विचार करून पारितोषिक व सन्मानपत्र लोककला सेवक संस्था महाराष्ट्र, या संस्थेकडून मुंबईतील संस्थेच्या कार्यक्रमात सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र  देण्यात येईल.या स्पर्धेचे परिक्षक म्हणून शाहिर संदिप मोरे,रुदाली दळवी काम पहाणार आहेत.स्पर्धेत सहभाग घेण्याकरता खालील लिंकवर क्लिक करून माहीतीभरा. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfzVP3Ore-qN_lme_lazfMzdY5voiT9Fghvxsgjdaeh_sgC_g/viewform?usp=sf_link अअसे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

आराधना कोकाटे यांनी राम नवमीनिमिताने जेष्ठ नागरिकांना दिला मदतीचा हात

मुंबई/शांत्ताराम गुडेकर:  कोविड-१९ या महामारी काळात प्रत्येकजण आपआपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करत होता. बोरीवली येथील रहिवाशी आराधनाताई कोकाटे याही याला अपवाद नाहीत.त्यांनी आवश्यक तेथे जी-जी गरज होती तेथे तेथे गरजेनुसार मदतीचा हात दिला. आज दि.२१ एप्रिल २०२१ रोजी राम नवमीचे औचित्य साधून  ईशान्य मुंबईतील घाटकोपर पश्चिम अमृत नगर सर्कल, बंबखाना  व पार्क साईट येथील जेष्ठ नागरिकांना अन्नधान्य किट देऊन मदतीचा हात देण्याची महत्वपुर्ण कामगिरी बजावली. किटचे वाटप(वाटप करताना फोटो सुध्दा न घेता) कोकाटे मँडम यांनी  केले. नव्या जुन्या पिढीतला बेबनाव अनेक घरातून दिसून येतो.आणि बऱ्याचदा ज्येष्ट नागरिकांच्या वाट्याला दुःख निराशा येते.आयुष्याच्या संध्याकाळी ते व्यथित होतात.ते सुखी कसे होतील हे पहाणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे मत आराधना कोकाटे यांनी बोलताना व्यक्त केले.आज राम नवमी निमिताने ईशान्य मुंबईतील घाटकोपर,विक्रोळी येथे गरजवंत जेष्ठ नागरिकांना अन्नधान्य किटचे वाटप केल्याबद्दल अनेकांनी आराधना कोकाटे यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा व आशिर्वाद दिले.तर अमृत नगर,बंबखाना व पार्क साईट येथील जेष्ठ नागरिकांकडून कोकाटे मँडम यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असे आशिर्वादही दिले.

अंध माता मुलासह वांगणी स्थानकात गेलीच कशी ? आर .पी. एफ ,जी .आर .पी, पोलिस यंत्रणा काय करत होती ? मनसे शाखाअध्यक्ष मोहन चिराथ यांनी रेल्वे प्रशासनाला विचारला जाब

मुंबई / किशोर गावडे- वांगणी रेल्वे स्थानकात उद्यान एक्स्प्रेस प्रचंड वेगाने येत होती. हि अंध  माता  फलाटावर मुलासह गेली, आणि तेवढ्यात होणारा अपघात अनर्थ  सुदैवाने आणि  रेल्वे पॉईंटमंन मयूर शेळके यांच्या  धाडसी कामगिरीने टळला.हे सत्य नाकारता येणार नाही.मयूर शेळके यांचा पुनर्जन्म  म्हणावा लागेल. त्यांच्या धाडसाचं कौतुक करावे लागेल. हृदय पिळवटून टाकणारा तो क्षण होता.परंतु, कोरोना काळातील आपत्कालीन परिस्थितीत सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाचे निर्बंध असताना ते मायलेक  स्थानकात गेले कसे काय ?

पोलिस यंत्रणा काय करत होती? असा सवाल  महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा क्रमांक ११० चे शाखाध्यक्ष  मोहन चिराथ यांनी विचारला आहे.मयूर शेळके हा रेल्वे पॉईंटमंन जर तेथे नसता प्रसंगावधान राखून त्यांनी त्या बालकाचा जीव वाचवला नसता, तर होत्याचे नव्हते झाले असते. याची गंभीर नोंद रेल्वे प्रशासन घेईल का? असाही सवाल  मोहन चिराथ यांनी केला आहे.

   शेळके यांचे कौतुक करायलाच हवे. वांगणी रेल्वे प्रवासी संघटनेने ते केलेच. परंतु दुसऱ्या मुद्द्याकडे लक्ष द्यायला हवे की महिला व मुलगा आत फलाटावर आलेच कसे? त्यांना कोणी अडवले नाही का?आर .पी. एफ ,जी .आर .पी, पोलिस यंत्रणा काय करत होती? कार्यरत होती की नव्हती .आणि असेल तर कोण कोण होते?.

    त्यावेळी ते फलाटावर काय करत होते? याचीही चौकशी  कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे मत चिराथ यांनी व्यक्त केले.दरम्यान, रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात  मयूर शेळके यांच्यासारखे सतर्क कामगार असतीलच असे नाही. त्यामुळे धोरणात्मक कार्यपद्धतीनुसार या अपघाताचा केवळ सत्कार करण्यापर्यंत आनंद व्यक्त न करता, हे नेमके घडलेच कसे?  याच्या मुळापर्यंत जायला हवे. शेळके यांची पदोन्नती व्हायला हवी. असे मत मोहन चिराथ यांनी  व्यक्त केले.

मंगळवार, २० एप्रिल, २०२१

रेल्वेच्या विलगिकरण कक्षाचा वापर करावा

  राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढतच चालला आहे. दररोज साठ हजार लोकांना कोरोनाची बाधा होत आहे.  अशा परिस्थितीत राज्यातील आरोग्यव्यवस्था देखील अपुरी पडत आहे.  वाढत्या रुग्णसंख्येपुढे  प्रशासन हतबल ठरत आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णालयात बेडची संख्या अपुरी पडू लागली आहे. अनेक रुग्णांना बेड मिळत नसल्याने रुग्णालयाच्या आवारातच रुग्णांना खुर्चीवर बसवून उपचार केले जात आहेत काही ठिकाणी एकाच बेडवर दोन तीन रुग्णांना ठेवले जात आहे काही रुग्णांवर जमिनीवर गादी टाकून उपचार केले जात आहे इतके करुनही  रुग्णालयात जागा नसल्याने सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना घरीच विलगिकरणात ठेवून त्यांच्यावर टेली मेडिसिनद्वारे उपचार केले जात आहे. घरीच उपचार घेणारे हे कोरोना बाधित रुग्ण सुपर स्प्रेडर ठरत आहे. एकीकडे अशी बिकट अवस्था असताना दुसरीकडे रेल्वेचे हजारो विलगिकरण कोच धूळ खात पडले आहेत.  मुंबईतच असे २५०० विलगिकरण कोच धूळ खात पडले आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान रेल्वे मंत्रालयाने रेल्वे गाड्यांमध्ये हजारो विलगिकरण कक्ष तयार केले होते जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत त्यांचा वापर करता येईल. रेल्वे कोचचे विलगिकरण कक्षात रूपांतर करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने करोडो रुपये खर्च केले. सध्या मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये १० टक्के म्हणजे ४८ विलगिकरण कक्ष तयार आहेत. यामध्ये प्रत्येक डब्यात १६ बेड  उपलब्ध आहेत ; तर पश्चिम लोहमार्गावरील १०७ विलगिकरण कक्षांमधील १ हजार ७१२ बेड म्हणजेच एकूण २ हजार ४८० बेड पडून आहेत. आता या रेल्वेच्या विलगिकरण कक्षाचा वापर  करण्याची वेळ आली आहे.  सरकारने  आतातरी या  रेल्वेच्या विलगिकरण कक्षाचा वापर करावा. ज्या रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाही त्या रुग्णांना रेल्वेच्या या विलगिकरण कक्षात दाखल करून त्यांच्यावर  उपचार केले तर  ते लवकर बरे होतील तसेच आरोग्य व्यवस्थेवर पडणारा ताणही कमी होईल.  रेल्वेच्या या विलगिकरण कक्षात गंभीर आजारी रुग्णांवर जरी उपचार करता आले नाही तरी कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर येथे उपचार करता येऊ शकेल त्यामुळे सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना या विलगिकरण कक्षात दाखल केले तर या रुग्णांवर  घरीच उपचार करावे लागणार नाही. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना जर या विलगिकरण कक्षात दाखल केले तर त्यांच्यापासून इतरांना होणारा धोकाही कमी होईल.

-श्याम बसप्पा ठाणेदार,दौंड जिल्हा पुणे 

लसीची किंमत सर्वत्र सारखीच असावी

केंद्राच्या  नव्या  लसीकरण  धोरणानुसार  लसनिर्माते मासिक ५० टक्के  लशी  केंद्र  सरकारला  आणि  ५० टक्के  लशी  राज्य  सरकारला  व  खुल्या  बाजारात  विकू  शकतील.  हे  धोरण  स्वागतार्ह  असले  तरी खुल्याबाजारातील  औषधे  व  लशींचा  काळाबाजार  रोखण्यासाठी  केंद्र  सरकारने  सर्वत्र  एकच  समान  छापील  किंमत  ठरवून  द्यावी.  छापील  किंमती पेक्षा एक  रुपया  जरी  जास्त  घेण्यात  आल्याचे  आढळले  तर  त्या  विक्रेत्याचा  परवाना  त्वरीत  जप्त   करून    विक्रेत्याला  शिक्षा  ठोठावण्यात  यावी. तरच  काळाबाजाराला  आळा  बसेल. गरजूंनीही  जास्त  किंमत   देऊन  औषधे  किंवा  लस  विकत  घेऊ  नये.

- अनंत  आंगचेकर , भाईंदर

मान्सूनचा सुखद सांगावा

मागील काही वर्षात दुष्काळाने पिचलेल्या महाराष्ट्राला भारतीय हवामान खात्याने सुखद धक्का दिला आहे. भारतीय हवामान खात्याने यावर्षी पडणाऱ्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज बळीराजासाठी सुखावणारा आहे कारण यावर्षी सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यावर्षी देशाच्या उत्तर भारतात काही ठिकाणी, तसेच ईशान्य भारतात  कमी पाऊस पडेल पण देशाच्या इतर भागात मात्र सरासरी इतका पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याआधी स्काय मेट या संस्थेनेही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता हा अंदाज बळीराजासाठी जितका सुखावणारा आहे तितकाच तो उद्योग जगतासाठी देखील सुखावणारा आहे कारण कोरोनामुळे गेले वर्षभर उद्योग जगताचे चाक अडकून पडले आहे. भारताची अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे शेती हाच भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आजही देशाची  ६० टक्के लोकसंख्या ही शेतीवरच अवलंबून आहे त्यामुळे तिच्या स्थैर्यासाठी आणि विकासासाठी शेतीचे विशेष महत्व आहे. मागील काही वर्षात देशात दुष्काळ पडला होता त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला होता. मागील वर्षी चांगला पाऊस झाला पण  कोरोनामुळे देशभर लॉक डाऊन लागल्याने देशातील उद्योगधंदे ठप्प झाले त्यामुळे जीडीपी घसरला अशा वेळी शेती क्षेत्राने देशाला वाचवले. यावर्षीही कोरोनाची दुसरी लाट आल्याने देशावर पुन्हा लॉक डाऊनचे संकट ओढवले आहे राज्यात तर कडक निर्बंध लागू झाले असून लवकरच पूर्ण लॉक डाऊन होण्याची शक्यता आहे अशा वेळी देशाची अर्थव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी पुन्हा एकदा शेती क्षेत्रावर आली आहे त्यामुळेच हवामान खात्याच्या पावसाच्या अंदाजाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यावर्षी सरासरी एव्हढा पाऊस पडणार असल्याने भरघोस पीक येऊन रान आबादानी होणार आहे. महाराष्ट्रात लागू झालेल्या संचारबंदीतुन आणि कठोर निर्बंधातून शेती क्षेत्राला वगळले आहे याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानावे लागेल. कारण शेतीच्या कामासाठी हा काळ खूप महत्वाचा आहे. शेतीचे सर्व कामे वेळेतच करावे लागतात. खते, बी बियाणे, कर्जपुरवठा, पीक विमा यासारख्या कामात कोरोनामुळे खंड पडणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी. हवामान खात्याने जाहीर केलेल्या अंदाजानुसार  जर पाऊस पडला तर कोरोनाच्या महामारीच्या दुसऱ्या लाटेतूनही भारतीय अर्थव्यवस्था तग धरेल.

-श्याम ठाणेदार,दौंड जिल्हा पुणे

माणसा माणसा जागा हो,आरोग्य व्यवस्थेचा धागा हो !!

 कोवीड - १९ पहिला टप्पा संपला, दुसर्या टप्पा सुरू असताना दैनंदिन रूग्णालयात रुग्णांची संख्या वाढते आहे. वर्षभराने कोवीड-१९वर लस आली.केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार कोवीड - टप्पा दोन वर नियंत्रण मिळविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लाॅकडाऊन सूरू झाले आहे.पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे.

   महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे स्वतः परिस्थिती वर लक्ष ठेवून आहेत. सर्व शासकीय यंत्रणा कोनावर मात करण्यासाठी युद्ध पातळी वर काम करीत आहेत. माञ, महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते प्रामाणिकपणे सरकारच्या कामकाज पद्धतीवर सडकून टिका करीत आहेत. जनता माञ, खरे काय आणि खोटे काय यावर लक्ष ठेवून आहे.प्रसार माध्यमातून विरोधीकांची मते कायम प्रसारित करण्यात येतात त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होतो आहे.कोरोनाची नैसर्गिक आपत्ती महाराष्ट्र सरकारने ओढून आणलेली नाही. की,केंद्र सरकारने ओढून आणलेली नाही. परिस्थिती वर मात करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दोन्ही सरकारांना सहकार्य करण्याची गरज आहे. म्हणून प्रत्येक माणसाने आपण आणि आपल्या कुटुंबियांना नैसर्गिक आपत्तीतून वाचविले पाहिजे. सरकारने आलेल्या निर्बंधांचे पालन केले पाहिजे तेव्हा आपले आरोग्य चांगले ठेवून कोरोनावर मात करता येईल. 

 हाताला सेनीटायझर, तोंडावर मास्क , व्यक्ती मधील अंतर हे नियम पाळले तर कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवा येईल. मागील वर्षी कोनामुळे प्रत्येक व्यक्ती पासून देशाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत अतोनात नुकसान झाले, मनुष्य हानी झाली. याचे भान ठेवून कोवीड- टप्पा दोन चा मुकाबला केला पाहिजे. आरोग्य सेवेत काम करणार्या सर्व देवदूतांच्या धैर्याला सलाम. 

  -महादेव गोळवसकर , वृत्तपत्र लेखक,  लांजा रत्नागिरी .
                    

फडणवीस व दरेकर यांच्यावर कारवाई करावी!

रेमेडीसिविर या महाराष्ट्र राज्यात कोरोनवरील तुटवडा असणाऱ्या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्याला पोलिसांनी अटक करताच, त्याला सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. प्रवीण दरेकर यांनी तत्काळ पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन त्याची बाजू घेतली. राजकीय पक्ष दानधर्म करू शकत नाही, असा आरोप आप पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन शर्मा यांनी फडणवीस व दरेकर या नेत्यांवर केला आहे. पोलिस चौकशीत हस्तक्षेप केला म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजन व रेमेडिसिविर यांची अत्यंत टंचाई भासत असून, त्यामुळे रुग्ण दगावत आहेत. याचे खापर विरोधी पक्ष मुख्यमंत्र्यांवर फोडत आहे. असे असताना , विरोधी पक्ष नेत्यांनी साठेबाज करणाऱ्या व्यापाऱ्यांना पाठीशी घालावे हे कितपत योग्य आहे? अशा दुतोंडी विरोधी पक्ष नेत्यांवर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी तात्काळ कारवाई करावी व विरोधी पक्षनेत्यांना धडा शिकवावा!        

 - संगीता जांभळे,  नाशिक रोड.

जिगरबाज मयूर शेळके

मध्य रेल्वेचा पॉइंटमन मयूर शेळके याने काल वांगणी येथे ट्रॅकमध्ये पडलेल्या बाळाचा जीव आपल्या जिवाची पर्वा न करता वेळेचं भान व प्रसंगावधान राखून वाचविल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.एखाद्या संकटात एखाद्याने मदत केली तर तो त्यावेळी देवदूतच असतो.मयूर कर्तव्यवर होता व त्याने ट्रेनच्या वेगापेक्षाही जास्त जोरात धावून बाळाचे प्राण वाचविले.जर क्षणाचाही विलंब झाला असता तर ? पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी !

मयूरच्या या धाडसाची रेल्वे प्रशासना कडूनदेखील लागलीच दखल घेऊन डीआरएम कार्यालयाकडून त्याचा सत्कार करण्यात आला तर केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील मयूरला स्वतः फोन करून तुझा अभिमान वाटतो असे सांगितले व त्याला बक्षीस देऊ केले.मयूरनेही मिळणाऱ्या बक्षिसातील काही रक्कम त्या मुलाच्या शिक्षणासाठी देऊ केली आहे व आजही मयूरने रक्तदान व प्लाझमा दान करून एकप्रकारे कोविडकाळात याची किती आवश्यकता आहे हे दाखवून दिले.तेव्हा मयूर तुझे कौतुक करावं तेवढं कमी आहे.

-गणेश हिरवे,जोगेश्वरी पूर्व

जेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन


मुंबई - जेष्ठ विनोदी अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन झाले आहे. अनेक सुप्रसिद्ध मराठी, हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत. तसेच, कित्येक मालिका आणि नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांनी बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश केला होता. त्यानंतर ‘जिस देश में गंगा रहता है’ (गोविंदा), ‘तेरा मेरा साथ है’ (अजय देवगण), ‘खाकी’ (अमिताभ बच्चन) यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली.

‘जान जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नव्याने शासनाचे काही निर्बंध व मार्गदर्शक तत्वे निर्गमित

मुंबई : कोविड-१९ चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत, जे १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. परंतु महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर  निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत. साथीचे रोग कायदा १८९७ च्या कलम दोन, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या तरतुदीनुसार सदर बदल करण्यात येत असल्याची माहिती पत्रकाद्वारे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे. हे बदल खालीलप्रमाणे असतील व २० एप्रिल २०२१ संध्याकाळी आठ वाजेपासून १ मे २०२१ रोजी सकाळी  ७ वाजेपर्यंत अस्तित्वात राहील.

   सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांचे दुकान (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी सह) त्याचप्रमाणे कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांचे खाद्याची दुकाने, पावसाच्या हंगामासाठी साहित्य (वैयक्तीक व संघटनात्मक) सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत उघडे राहतील.

    वरील नमूद दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 8 पर्यंत मुभा असेल, परंतु आवश्यक वाटल्यास स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये फेरबदल करू शकते.स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला वाटल्यास कलम दोन अंतर्गत काही गोष्टींना व सेवांना, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संमती घेऊन आवश्यक सेवा म्हणून घोषित करू शकते.  या आदेशामध्ये नमूद केलेल्या गोष्टीं व्यतिरिक्त इतर सर्व अटी व नियम 13 एप्रिल 2021 रोजी राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकानुसारच असतील.


दादरच्या शाखाप्रमुखाचे माणुसकीचे दर्शन ; कोविड रुग्णाचे वाचवले प्राण

प्रतिनिधी - शिवाजी पार्क येेथिल एम.बी. राऊत रोड वरील देसाई कॉटेज इमारतीतील जुन्नरकर या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला,कुटूंबाला कोविडने ग्रासले होतेे.कुटूंबात चार व्यक्ती भाऊ युरोप मध्ये, आई कोविडने नायर हॉस्पिटलमध्ये प्रकृती चिंताजनक, वडिलांचे कोविडने पहाटे घरीच मृत्यु झाला. त्यांची मुलगी सुप्रिया जुन्नरकर (वय- ४२ )घरीच पॉझिटीव्ह, 3 दिवस तापाने हैराण झाली होती. वडिलांना कोण सांभाळणार, या विवंचनेत,तिचीही परिस्थिती दुपारी चिंताजनक झाली, कोणीही शेजारी मदतीला आले नाही,पैसा असून काही उपयोग नाही,कोणीही माणुसकीही दाखविली नाही,  . मात्र शिवसेेेना शाखाप्रमुख यशवंत विचले यांनी माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी भेट देऊन फोनाफोनी करून त्यांची रवानगी रुग्णालयात करून त्यांचे प्राण वाचवले.

   सविस्तर माहिती अशी शिवसेना नेते दिवाकरजी रावते व श्रीमती.विशाखा राऊत यांना त्यांच्या हितचिंतकाने फोन केला असता,घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याांनी शाखाप्रमुख  यशवंत विचले यांना संपर्क करून घटनास्थळी जाण्यास सांगितले.व  माहिती घेण्यास सांगितले,ती महिला एकटीच घरी तिला बोलवत नव्हते. चालता येत नव्हतं, अंगात ताप, ऑक्सिजन लेवल 85 ते 90 ,तब्येत चिंताजनक होती कोणीही धीर द्यायला नव्हते ,नातेवाईक ही नाही,मोठया फ्लॅट मध्ये  एकटी असल्याने आई हॉस्पिटलमध्ये, वडील सकाळी वारले होते, ही सर्व माहिती रावते साहेब व विशाखाताई राऊत यांना धक्कादायक घटनेची माहिती देताच लागलीच महानगर पालिकेची यंत्रणा कामाला लागली ककांनी(अतिरिक्त आयुक्त मनपा)पासून हेल्थ डिपार्टमेंट मधील सर्व कामाला लागले, त्या महिलेला लागलीच तयारी करायला सांगितले, रुग्णवाहिका दहा मिनिटात आली, पंधरा मिनिटात नायर हॉस्पिटल दहा मिनिटात बेड,एक्सरे रिपोर्ट कडून सक्षम उपचाराला सुरवात झाली,कोणीही नातेवाईक नसल्याने पुर्ण जवाबदारी मला घ्यावी लागली,तिची तब्येत ठीक आहे, तिला बेड तिच्या आईच्या बाजूला करून देण्यात आला,मायलेकीची तब्येत ठीक आहे या मोहिमेत श्री.दिवाकर रावते साहेब, श्रीमती. विशाखाताई राऊत यांचे मार्गदर्शन श्री. विजय नंदिवडेकर(शिवसैनिक),श्री.अक्षय शिंगरे (गटप्रमुख),यांची साथ मिळाली.मोहीम फत्ते झाली त्या महिलेचे प्राण वाचले. ही माहिती सर्वांना मिळताच शाखाप्रमुख यशवंत विचले आणि त्यांच्या टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

अपघातग्रस्तांचे देवदूत कल्पेश ठाकूर यांचा सर्वांनी आदर्श घ्यावा ---जिल्हाधिकारी निधी चौधरी ; "साई सहारा प्रतिष्ठान"च्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

पेण:-  मुंबई-गोवा महामार्गावर मागील 16 वर्षांपासून अपघातग्रस्तांना विनामूल्य मदत करणारे, अपघातग्रस्तांचे देवदूत  कल्पेश ठाकूर यांचा आदर्श जिल्ह्यातील सर्वांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज येथे केले.

     जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते मुंबई-गोवा महामार्गावरील आंबिवली फाटा,पेण येथील साई सहारा हॉटेल येथे साई सहारा प्रतिष्ठानच्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पेण उपविभागीय पोलिस अधिकारी विभा चव्हाण, तहसिलदार डॉ.अरुणा जाधव, वरिष्ठ माजी पोलीस निरीक्षक आय.एस.पाटील, पेण पोलीस निरीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ, दादर सागरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील, उपनिरीक्षक के.आर.भौड, डॉ. किशोर देशमुख, महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अभियंता संजय ठाकूर आदी उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी निधी चौधरी पुढे म्हणाल्या की, देशात व महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट सुरु आहे. मी पेण प्रांताधिकारी असताना कल्पेश ठाकूर यांच्या सामाजिक कार्याची माहिती होती. मुंबई-गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातग्रस्तांसाठी त्यांचे मदतकार्य गेली अनेक वर्षे सुरू आहे. मुख्य म्हणजे त्यांनी आपल्या या मदतकार्यात मागील सोळा वर्षांपासून सातत्य ठेवले आहे. ही बाब निश्चितच गौरवास्पद आहे. ज्या प्रकारे अनाथांच्या आई पद्मश्री सिंधूताई सपकाळ निरपेक्ष भावनेने कार्य करीत आहेत, त्याप्रमाणेच कल्पेश ठाकूर यांनीही कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता नि:स्वार्थी भावनेने हे मदतकार्य असेच चालू ठेवावे.पेण प्रांताधिकारी असताना माझ्या हातून त्यांच्या या समाजसेवी कार्याचा गौरव करण्यात आला होता,  आज जिल्हाधिकारी म्हणून त्यांना पुन्हा गौरविताना एक विशेष समाधान मिळत आहे.

    करोनाची भयंकर लाट संपूर्ण जगात, देशात व राज्यात निर्माण झाली आहे. या काळात रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातील तरुणांनी कल्पेश ठाकूर यांचा आदर्श घेवून गरजूंना मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. करोना पासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, वारंवार हात धुणे व सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे, या त्रिसूत्रीचे पालन जनतेने काटेकोरपणे करावे, सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप अशा कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, करोना रोगावर प्रतिबंधक लस देण्याची मोहीम जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून वय वर्ष 45 वरील सर्वांनी दोन्ही डोस घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना यावेळी केले.

    जिल्‍हाधिकारी श्रीमती चौधरी पुढे म्हणाल्या, राज्यात करोना आजारावरील  उपचार म्हणून देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी अधिक वाढल्याने तुटवडा जाणवत आहे. मात्र ज्या रुग्णाला खरोखरच या औषधाची गरज आहे, त्यालाच डॉक्टरांनी ते इंजेक्शन देणे गरजेचे असून सरसकट सर्वच रुग्णांना हे औषध देणे चुकीचे आहे. तरी डॉक्टरांनी सरसकट सर्वच रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचा निर्णय घेऊ नये.    

        पेण मधील करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पेण मध्ये 200 खाटांचे हॉस्पिटल लवकरात लवकर उभे करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने कल्पेश ठाकूर यांच्या नि:स्वार्थी सेवेबद्दल त्यांचा उपस्थित सर्व मान्यवरांनी यथोचित गौरव केला. करोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे काटेकोर पालन करीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायक संतोष पाटील तरणखोपकर यांनी केले.

रक्तदानाचा उत्सव साजरा करावा...

सध्या कोविडच्या उडालेल्या हाहाकारामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे व अशावेळी सामाजिक संस्था,क्रीडा मंडळे, गणेशोत्सव व दहीहंडी पथक व वैयक्तिकरित्या रक्तदान शिबीर आयोजित करून हा तुटवडा भरून काढण्याच आवाहन मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी केले आहे.रक्तदानासारखे पवित्र कार्य नाही व आपण केलेल्या रक्तदानामुळं कोणाचे प्राण वाचत असतील तर यासारखं समाधान नाही.रक्ताला जात पात,धर्म प्रांत असा भेदभाव नाही व सर्वांचं रक्त एकाच रंगाचं आहे.एकमेकांना मारून,मारामारी करून रक्त रस्त्यावर सांडवून वाया घालविण्यापेक्षा रक्तदान करून ते गरजूंच्या नसानसातून वाहन केव्हाही चांगलं.तेव्हा सध्याची बिकट परिस्थिती व रक्ताची गरज लक्षात घेता रक्तदानासाठी सर्वानी पुढाकार घ्यायला हवा.

-गणेश हिरवे,जोगेश्वरी पूर्व

समाजसेवक कृष्णा कदम यांचा हभप विठोबाआण्णा मालुसरे स्मृती सन्मान पुरस्काराने गौरव

मुंबई (शांताराम गुडेकर )स्वातंत्र्यसेनानी आणि तत्कालीन कुलाबा जिल्हा कृषी सभापती वै.हभप विठोबाआण्णा मालुसरे यांच्या जन्मशताब्दी ...