आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

ज्ञानाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आर.आर.पाटील फाऊंडेशन आयोजित वत्कृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

मुंबई(प्रतिनिधी): सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवून समाजाच्या आर्थिक,सामाजिक आणि शैक्षणिक विकासाची गुरुकिल्लीच आपल्याला दिली आहे आणि त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे.हा त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आर.आर.पाटील फाऊंडेशन संलग्न पँथर राजाभाऊ गांधळे सामाजिक संस्था,मायक्रोलिंक फाऊंडेशन या तिन्ही संस्थांनी ज्ञानाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाईन वत्कृत्व स्पर्धेसाठी आवाहन केलेल्या नंतर तसेच ही स्पर्धा सर्वच वयोगटासाठी खुली असल्यामुळे या स्पर्धेसाठी प्रचंड प्रमाणात विविध स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेत पहिले उत्कृष्ट तीन स्पर्धक तसेच दहा उत्तेजनार्थ वक्तृत्व करणारे स्पर्धक निवडण्यात आले होते.दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन या दिवशी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी वरिष्ठ शिक्षका जयश्री काशिद,समाजसेवक निलेश फलके,पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक हनुमंत सा.टाव्हरे,योगेश सर्स कॉमर्स अकॅडमीचे संचालक योगेश बुध्दगे सर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार ननावरे यांनी केले.हा  कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आर.आर.पाटील फाऊंडेशनचे केतन भोज,पँथर राजाभाऊ गांधळे सामजिक संस्थेचे शरद गांधळे, मायक्रोलिंक फाऊंडेशनचे सचिन मनवळ यांनी कठोर परिश्रम घेतले.

ज्येष्ठांचा एकत्रित वाढदिवस संपन्न!


मुंबई:
लोअर परळ (पूर्व) येथील, बी डी डी चाळ  १० जवळील, फॅमिली वेल्फेअर एजन्सी, गेली ७२  वर्षे ज्येष्ठा साठी कार्य करीत आहे. वेल्फेअर सेंटर मध्ये भजन, संगीत, वाढदिवस , योगा, आरोग्य विषयक चर्चा सत्र, विविध शारीरिक व वैचारिक स्पर्धा, आरोग्य तपासणी, व शैक्षणिक सहली विनामूल्य आयोजन करीत आहे.

   मार्च २०२० पासून कोरोना च्या महामारी मुळे सेंटर बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे ज्येष्ठांचे वाढदिवस नुकतेच सेंटर मध्ये एकत्रित साजरे करण्यात आले. एकूण ३० ज्येष्ठाचे वाढदिवस साजरे केले.

   वाढदिवसासाठी अनिता काकडे, रूपाली व्हटकर यांनी विशेष मेहनत घेतली होती.सेंटर च्या संचालिका अल्पा  देसाई  यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाची मासिक बैठक नुकतीच संपन्न...!

मुंबई : अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाची मासिक बैठक नुकतीच संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात पार पडली. या बैठकी मध्ये संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख महेश्वर तेटांबे, बाळासाहेब गोरे, गणेश पिल्लई, सतशील मेश्राम,राजू शेवाळे, राजेंद्र बोडारे, नागेश गंगावणे,संजय कांबळे आदि सभासद उपस्थितीत होते.सदर बैठकीत खालील निर्णय घेण्यांत आले.

१) सन २०२१ करिता महाराष्ट्र व मुंबईच्या कमिटीचे गठन करावे. परंतु ते करत असताना जे सभासद  स्वत: क्रियेशीलपणे संघटनेमध्ये ५० नवीन सभासद करतील अशा सभासदाला पदाधिकारी करण्यांत येईल. २) संघटनेच्यावतीने एप्रिलच्या २९ व ३० रोजी दोन दिवसीय चित्रपट संम्मेलन नाशिक मध्ये आयोजित करण्याविषयी चर्चा करण्यांत आली.३) त्याकरीता संम्मेलन आयोजन कमिटी गठीत करण्यांत येईल. त्यामध्ये तज्ञ व्यक्तिंचा समावेश असावा. ४) संघटनेचे दैनंदिन कार्य सुरळीत चालू राहण्याकरीता निधीची उभारणी करणे.५) संघटनेच्यावतीने प्रकाशित करण्यांत येणार्‍या कॅलेंडरचे अनावरण मा.मंत्रीमहोदयांच्या हस्ते येत्या ३० तारखेपर्यंत करावे. त्याबाबतची सूचना सभासदांना देण्यांत येईल. असे सर्वानुमते ठरविण्यात आले.

झोपी गेलेले नगरसेवक जागे झालेत.. पाच वर्षात काहीच कमी न करणाऱ्यांची लगबग सुरू

 किशोर गावडे, भांडुप : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे दिसून येत आहे.कामे मंजूर करण्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनवण्या करीत साहेब, निवडणुका तोंडावर आल्या आहेत. आपल्या कामाची निविदा काढा साहेब,म्हणजे लगेच कामाला सुरुवात करता येईल. आपण केलेल्या कामांची यादी काढून ठेवा .अशी लगबग सध्या सर्व प्रभागातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात सुरू आहे .त्यासाठी महापालिका क्षेत्रीय कार्यालयात नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या फेर्‍या सुरू झालेल्या आहेत .काही ठिकाणी तर मागील तीन वर्षापासून केवळ इतरांच्या उद्घाटनाला दिसणारे लोकप्रतिनिधी यावर्षी प्रभागात विकासकामांची गंगा वाहणार आहे ,अशा अविर्भावात फिरत आहेत .

    २०१७ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या .त्यामध्ये काही लाटेवर तर काही विकासकामांच्या जोरावर नगरसेवक झालेत.मात्र ,त्यानंतर विकास कामांच्या जोरावर आलेल्या नगरसेवकांनी सेवका प्रमाणे कामाला सुरुवात केली .मात्र, काही नगरसेवक केवळ उद्घाटने सर्वसाधारण सभा आणि बडेजाव करण्यातच दंग झाले पाहिले.

    आश्चर्य म्हणजे काहींना तीन वर्षे कसे गेले हे कळलेच नाहीत. त्यात मार्च २०२० मध्ये कोरोना संसर्ग सुरू झाला. आणि वर्ष झपाट्यात संपले. आता बारा महिन्यात २०२२ मध्ये पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत केलेल्या विकास कामांची यादी तयार करण्यात लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू झालीय. 

      आता मतभेद आणि श्रेयवाद एखादा प्रश्न सोडविताना नगरसेवकांमध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे.याचा प्रत्यय मागील पंधरा दिवसात अनेक घटनांतून समोर आला. एवढेच नव्हे तर तत्कालीन नगरसेवकांनी प्रस्तावित केलेल्या विकास कामांकडे दुर्लक्ष केले होते. मात्र आता ते काम मार्गी लावून श्रेय घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे .काहीनी तर बोटांवर मोजता येईल एवढीच विकासकामे केली. मात्र ,भली मोठी यादी प्रसिद्धी केली. त्यामुळे आपापसातील मतभेद वाढू लागले असून समोरचे श्रेय घेण्याआधी त्यांची उद्घाटन आणि प्रसिद्धी करून घेण्याची धडपड लोकप्रतिनिधींची सुरू झाली आहे.

    काम एकाचे श्रेय घेतात सगळे संपूर्ण पाच वर्ष आपली आहेत असे म्हणून सत्कार उद्घाटन मध्ये व्यस्त असलेल्या काही नगरसेवकांना आता आपण काही कामे केली नसल्याचे लक्षात आले आहे .मात्र प्रभागात एखाद्या नगरसेवकांनी केलेल्या कामाचे श्रेय अन्य नगरसेवक घेत असल्याचे दिसून येते. कारण बहुतांश नगरसेवकांनी त्यांच्या विकास कामाचे अहवाल प्रसिद्ध केला त्यामध्ये दोन ते तीन नगरसेवकांच्या अहवालांमध्ये एकाच विकास कामांचा उल्लेख दिसून आला. त्‍यामुळे काम एका चे तर श्रेय सगळ्यांचे  अशी गत झाली आहे.धूळ खात पडलेल्या वचननाम्यातील धूळ उडाली विकास कामे केली नाही तर जनतेला काय उत्तर द्यायचे. मागील निवडणुकीत आपल्या वचननाम्या मध्ये कोणती कमी करू असे जनतेला सांगितले त्यातील किती कमी मार्गे लागली आणि किती राहिली त्यासाठी मागील चार वर्षापासून धूळ खात पडलेल्या त्या वचननाम्यात वरील धूळ आता उडाली. मात्र कामांची यादी पाहून लोकप्रतिनिधीने गडबडले असून ही कामे कधी करायची? या विचाराने महापालिका आणि क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना साहेब तुम्हीच आमचे तारणार तुमच्याशिवाय काम होणार का? अशी विशेषणे वापरून तेवढे आपल्या कामाचं बघा! अशी कुजबूज महापालिका क्षेत्रातील कार्यालयात  केली जात आहे.

भांडुपच्या अशोक केदारे चौकात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली

भांडुप : मोकाट कुत्र्यांमुळे गाढव नाका येथे वावरताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येथे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून लहान मुलांपासून ते वाहनचालक जखमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. तीन दिवसांपूर्वीच  पिसाळलेल्या कुत्र्याने अनेक जणांना चावा घेतला होता. जखमी झालेल्या या मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या प्रशासन याबाबत कोणतीही उपायोजना करत नसल्यामुळे नागरिकांनीच सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. मनपा रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध असून कुत्र्याने चावा घेतल्यास ही लस तातडीने टोचून घेणे आवश्यक आहे.

     गाढव नाका येथे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून  मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी पॅन्टिला चावा घेतल्यामुळे नागरिकाची भीतीने गाळण उडाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना  चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे.मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांपासून धोका अधिक आहे. झुंडीने राहणाऱ्या कुत्र्यात पिसाळण्याची शक्यता अधिक असते. अस्वछ खाणे, अस्वच्छ वातावरणासह कचरा कोंडाळ्यासह मटण, चिकनची दुकाने, मच्छीमाकेट,चायनीजची दुकाने, येथे असलेल्या ठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी कायम असताना चायनीजच्या गाड्यावरील कचरा कोंडाळा किंवा अनेकदा गटारीच्या कडेला टाकतात. त्यामुळे अशा परिसरात कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मनपाच्या वतीने तात्काळ कारवाई करण्यात येत नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रजासत्ताक दिनी प्रेरणा फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

ठाणे /प्रतिनिधी : प्रेरणा फाउंडेशन रजि. ५६४/एफ३८७८४/ठाणे/महाराष्ट्र या सामाजिक संस्थेने २६ जानेवारी २०२१ रोजी  प्रजासत्ताक दिना निमित्ताने प्रेरणा फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण  सोहळा ११:०० ते ३:०० वाजता श्री. बल्लाळेश्वर हेंद्रेपाडा बदलापूर येथे धुमधडाक्यात  साजरा झाला. ह्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्रातील नामवंत सन्मानित १२० जणांना पुरस्कार देण्यात आला व या  सोहळ्याला २५०-३०० लोक  हजर होते. 

  या कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणा फाउंडेशन च्या संस्थापिका/ अध्यक्षा दीप्ती (प्रेरणा) गांवकर यांनी फाउंडेशन चे सचिव वैभव कुलकर्णी व सह खजिनदार दिव्या गांवकर यांच्या सहकार्याने आयोजित केले.प्रेरणा  फाउंडेशन हे एक सामाजिक संस्था असून प्रत्येक क्षेत्रात  कार्यरत आहे. हे फाऊंडेशन गेले तीन वर्ष सतत गोर गरीब लोकांना, रस्त्यावरील भटकी लोकांना, अनाथांना आधार  देण्याचे काम करते. अनेक आदिवासी पाडे सुधारणे,  आदिवासी गावाला रस्ता,  वीज,  पाणी व लाईट याची सोय, नदया,  चौपाटी,  एस टी डेपो, रेल्वे  स्टेशन,रस्ते,  ठिकठिकाणी स्वछता अभियान राबविणे, अनेक अनाथालय, वृद्धाश्रम, अनाथ रस्त्यावरील  भटकी  मुले यांना सहारा व सहकार्य  देण्याचे काम करते. व तसेच प्रेरणा रंगमंच नाट्यमंडळ  व प्रेरणा युट्युब अंतर्गत दिग्दर्शिका/ नाटककार दीप्ती  (प्रेरणा) गांवकर स्वतः  कॅन्सरग्रस्त लोकांना आधार देण्याचे काम करतात.

   या कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे ईंटेग्रेवोन कंपनी चे मॅनेजर व उत्कृष्ट समाजसेवक  श्री. संजीव सुरेशचंद्र जैन, दीनदयाळ कुष्ठरोग संस्था अंबरनाथ अध्यक्ष श्री. अविनाश म्हात्रे, सुपरस्टार ऑल सोशल मीडिया पत्रकार संघटना श्री.  बाळासाहेब भालेराव, शहर अध्यक्षा सौ. सुजाताताई भोईर,  पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष श्री. अशोक म्हात्रे अश्या प्रसिद्ध मान्यवर व प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका/ अध्यक्षा दीप्ती (प्रेरणा) गांवकर अशा  मान्यवरांच्या हस्ते सावित्री जोतिबा  वारसा पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार,  रणरागिणी पुरस्कार, साहित्यिक पुरस्कार, ई.  तसेच २०२० कोरोना च्या लॉक डाऊन काळात ज्या व्यक्ती आणि  सामाजिक संस्थांनी अहोरात्र गोर गरीब लोकांना व कोरोना च्या काळात नौकरी गेलेल्या लोकांना धान्य वस्तू स्वरूपात व आर्थिक स्वरूपात  आदिवासी लोकांना, भटकी लोकांना  मदत केली अशा  मान्यवरांना  कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका/ अध्यक्षा दीप्ती (प्रेरणा) गांवकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.  या कार्यक्रमात सुपरस्टार ऑल सोशल मीडिया पत्रकार संघटना तर्फे प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका/ अध्यक्षा दीप्ती (प्रेरणा) गांवकर यांना ठाणे पत्रकार जिल्हा महिला अध्यक्षा म्हणून नेमणूक करण्यात आली, वैभव कुलकर्णी यांना ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, दिव्या गांवकर यांना ठाणे जिल्हा सचिव, दिलेश देवडी यांना ठाणे जिल्हा सहसचिव म्हणून नेमणूक करण्यात आले.  तसेच प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका/ अध्यक्षा दीप्ती (प्रेरणा) गांवकर यांना सेवक सेवा भावी संस्था जळगांव यांच्या तर्फे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. यावेळी  सौ. वैशाली विनायक चांदेकर, माधुरी बोन्डाले, प्रतिभा केसरकर यांनी फाउंडेशन ला दिलेली  मदत एकत्रित करून जालना येथील दिव्यांग आकाश देशमुख याला मदत म्हणून देण्यात आली.

  या कार्यक्रमाचे कु. दिव्या गांवकर यांनी  पूर्ण सूत्रसंचालन अगदी जबाबदारी पूर्वक निभावले व सुंदर आवाजात गीत ही सादर केले. तसेच श्रेया शिंपी अंधत्वावर मात करणारी या लहान मुलीने सुंदर गाणं सादर केले, निकिता दीपक परब या मुलीने प्रजासत्ताक दिनाचे भाषण व गीत सादर केले.  प्रेरणा फाउंडेशन सचिव यांनी प्रेरणा फाउंडेशन च्या कार्याचे प्रास्ताविक सादर केले.प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका/ अध्यक्षा दीप्ती (प्रेरणा) गांवकर यांनी प्रेरणा फाउंडेशन या छोटयाश्या रोपट्याचे आज कल्पवृक्ष कसे झाले याची माहिती व मागदर्शन केले .याप्रसंगी  सर्व प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना थोडक्यात  मार्गदर्शन केले. 

 या कार्यक्रमास सहसचिव दिलेश रमेश देसाई, सभासद सौ. रेशमा रमेश देसाई, अवधूत शेलार, निकिता दीपक परब, दीक्षिता  दीपक परब, ऋषिकेश रमेश देसाई, सुनील गांवकर,  विकास पवार या सर्वांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. शेवटी  सर्वांचे  दिव्या गांवकर यांनी सर्वांचे आभार मानून, अल्पोउपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

शिव शक्ती विकास मंडळ, आयोजित रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य "लकी-ड्रॉ सोडत" कार्यक्रम संपन्न !

मुंबई : (  दिपक कारकर )- गुहागर तालुक्यातील अंतिम टोकाचे गाव म्हणजे "भातगाव" होय.विविधतेने नटलेलं आणि कोकणची संस्कृती जोपासणाऱ्या या गावात अनेक वाड्या-मंडळे आहेत.या भातगाव तिसंग वेलेवाडी मधील कला/क्रिडा/सामाजिक/शैक्षणिक/सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असणारे मंडळ म्हणजे "शिव शक्ती विकास मंडळ" होय.भातगाव पंचक्रोशीतील शिव शक्ती मंडळाची खास करून क्रिडा क्षेत्रातील कामगिरी देखील नेत्रदीपक ठरली आहे.मंडळाचा शिव शक्ती क्रिकेट संघ एक तालुक्यातील/पंचक्रोशीतील नावाजलेला क्रिकेट संघ असून प्रतिवर्षं तो चमकदार कामगिरी करताना दिसतो आहे.

उपरोक्त मंडळाने रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत एक यशस्वी वाटचाल केली आहे.रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्यसाधून मंडळाने "भव्य हमखास बक्षिस सोडत" कार्यक्रम हाती घेऊन तो नुकताच कोव्हिड - १९ च्या दिवसांत शासकीय नियमांचे पालन करून विद्याधर मोहनजीनी वाडी हॉल,ठाकुरद्वार - मुंबई - ०२ येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व शिव शक्ती विकास मंडळाचे प्रेरणास्थान स्व.धाकुनाथ वेले यांच्या स्मृतीला उजाळा देत करण्यात आली.

    या कार्यक्रमाला भातगाव कुणबी मंडळाचे अध्यक्ष श्री मुरलीधर आग्रे,भातगावचे मानकरी श्री.महादेव आग्रे,सुप्रसिद्ध बेंजो मास्टर कु.सुरज वेले,पंचक्रोशी मंडळाचे अध्यक्ष श्री केतन तांबडकर,वाडीचे मानकरी श्री.रमेश वेले,गावकरी श्री.प्रकाश वेले,श्री पाणबुडी देवी कलांमच सदस्य- निलेश हुमणे,राजेंद्र नेवरेकर आदींची उपस्थिती लाभली.मंडळातर्फे मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

     या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या व लकी-ड्रॉ सोडत मधील सहभागी हितचिंतकांचे शाब्दिक आभार मानण्यात आले.व बक्षिसे विजयी असणाऱ्या सर्व बक्षिस दात्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.मंडळाच्या उन्नतीसाठी या नियोजित उपक्रमाचे शिलेदार असणारे शिव शक्ती विकास मंडळाचे अध्यक्ष दिनेश वेले,उपाध्यक्ष बाबाजी वेले, सेक्रेटरी पप्पू वेले,उपसेक्रेटरी दिलीप वेले व मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्नांतुन हा सोहळा आनंदी वातावरणात पार पडला.

गवळी समाज कन्या भूषण, पद्मश्री पुरस्कार प्राप्त : सिंधूताई सपकाळ

अनाथांची माय ...थोर महिला समाजसेविका.. समाजभगिनी.' सिंधूताई सपकाळ ' यांना भारत सरकारने  अत्यंत मानाची " पद्मश्री "पदवी पुरस्काराने गौरवांकित करुन गवळी समाजाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल झाले आहे. फक्त समाज मर्यादित कार्य न करता सर्व समाज वंचितांना आपली आभाळभर माया देवून, अनाथांची माय म्हणून मातृत्वाचे आदर्श उदाहरण साऱ्या जगासमोर आणले.आजवर त्यांनी अनेक समस्यांना, प्रसंगांना समर्थपणे तोंड देत , वंचितांना मायेचा आधार देत अथक परिश्रम करून सामाजिक, शैक्षणिक , महिला सबलीकरण, अनाथालये, परित्यक्त्या महिलांना आधार, मुलामुलींची संभाळणुक करून ,त्यांना स्वतःच्या पायावर उभे करुन , त्यांना नोकरी उद्योग धंदे देऊन , त्यांची लग्ने लाऊन अनेक संसार उभे केले.आयुष्यभर त्यांच्या साठी भारतभर, जगभर वणवण भटकून भीक मागून त्यांच्या साठी अन्न धान्ये, कपडे , शैक्षणिक साहित्य गोळा करुन उदरनिर्वाह केला. प्रसंगी  स्वतः च्या तब्बेतिची ,सुखाची पर्वा न करता केलेल्या कार्याचे  या पुरस्काराने त्यांच्या मोल व श्रमाची पोचपावतीच दिली आहे.त्यांच्या या कार्य गौरवाचे गवळी सेवा फाऊंडेशन महा. सामाजिक संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन! या पुढील त्यांचे उर्वरित आयुष्य सुखसमाधानात, निरोगी , आरोग्य संप्पन्न, दीर्घायुषी जावो.हीच सदिच्छा ! सर्व गवळी सेवा फाऊंडेशन आणि गवळी समाज कायम आपल्या सोबत आहे.

- राजेश रमेश चौकेकर(गवळी)/ समाज सेवक/ पत्रकार

संपर्क :  ७३७८५९०७०२

अर्थ संकल्पात पेन्शनरांचे पैसे मिळावेत

अर्थमंत्री १ फेब्रु रोजी  अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लॉकडाऊन काळात सर्व सामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहेच, तरी भविष्य निर्वाह निधी योजना १९९५ चे ६७ लाख पेंशनरांचे केंद्र सरकार कडे २० लाख ८०हजार कोटी रु, या मध्ये ४० हजार कोटी रु अनक्लेम रक्कम जमा आहे. केंद्र सरकारला भगत सिंग कोशीयारी समितीने दिलेला अव्हाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, त्याचप्रमाणे या करीता पेंशनर संघटनांनी देशभर आणि दिल्ली पर्यंत मोर्चे आंदोलने केली आहेत. संसेदे मध्ये कित्येक खासदार या पेंशन वाढीची मागणी करत आहेत. प्रत्यक्ष मा पंतप्रधन नरेंद्र मोदी यांची खासदार श्रीमती हेमामालिनी यांनी पेंशनर पदाधिकार्यांशी भेट घेतली आहे. पंतप्रधानांनी सकारात्मकता दाखवली आहे. करोना काळातील, सध्याच्या महागई काळात अत्यंत केविलवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी अर्थ मंत्र्यांनी करोना चे कारण न देता,पेन्शनरांची स्वतःची रक्कम सरकार कडे जमा आहे ती, अर्थ संकल्पात जाहीर केल्यास, ज्येष्ठ नागरिक पेन्शनरांना पुढील काही वर्ष सन्मानाने जगता येईल.

-विजय ना कदम, लोअर परळ

सा. आजची उद्योग नगरी वृत्तपत्राच्या संपादिका यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेड नवी मुंबई ग्रुप ने दिली विशेष भेट

नवी मुंबई / विरेंद्र म्हात्रे  - आजची उद्योग नगरी साप्तहिक च्या संपादिका कु. रुपाली वाघमारे यांचा वाढदिवस होता.नवी मुंबईतील वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये त्या नेहमीच सहभागी असतात स्वतःचं साप्ताहिक असल्याकारणाने परिसरातील महिलांचे व इतर सामाजिक घटकांचे प्रश्न समस्या त्या नेहमीच      आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडून त्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतात. "पत्र नव्हे शस्त्र "या वाक्य नुसार वेळोवेळी अन्यायाला वाचा फोडण्याचं काम सुद्धा त्या करतात त्यांचे स्वतःचे यूट्यूब न्यूज चैनल आणि जागरूक महाराष्ट्र या चैनल ला सुद्धा काम करत आहेत व तसेच दैनिक हिंदूसम्राट या वृत्तपत्रात पनवेल विभागाच्या प्रतिनिधी म्हणून देखिल काम करत आहेत आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना या कार्याची प्रेरणा त्यांचे वडील श्री मोहन वाघमारे साहेब यांच्याकडून मिळाली आहे.

    श्री मोहन वाघमारे साहेब हे अग्रलेखाचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असलेल्या "नवाकाळ" या वृत्तपत्राचे  संस्थापक "स्वर्गीय नीळकंठ खाडिलकर साहेब" यांच्यासोबतही  त्यांनी काही काळ पत्रकारितेचं काम केलेले आहे .नुकताच त्यांना पत्रकार संघाकडून "ज्येष्ठ पत्रकार " म्हणूनही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आणि आताही ते "आजचा सातारा सांगली " हे  साप्ताहिक चालवत आहेत.

  अशाप्रकारे एक उत्कृष्ट वातावरणात पत्र पत्रकारितेची आवड जोपासलेल्या रूपाली वाघमारे मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, शिवश्री मारुती शंकर (खुटवड, जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड नवी मुंबई), शिवश्री जनार्दन चंद्रकांत (शिरावले, महानगर अध्यक्ष संभाजी ब्रिगेड नवी मुंबई), शिवश्री संतोष किसन (शिरावले, जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड नवी मुंबई), शिवश्री गणपत भिमाजी पोळ (जिल्हा संघटक संभाजी ब्रिगेड नवी मुंबई), शिवश्री संतोष सिंह परदेशी (जिल्हा संघटक संभाजी ब्रिगेड नवी मुंबई) आणि समाजसेविका कार्यकर्त्या सौ. सीमा पाटील उपस्थित होत्या.याचवेळी रूपाली वाघमारे मॅडम यांनी या दिवसाचं औचित्य साधून आजची उद्योग नगरी हा दीपावली व नववर्ष  २०२१ चा अंक भेट दिला.

प्रेरणा फौंडेशनच्या वतीने जेष्ठ समाजसेवक, कुष्ठमित्र- डॉ. चिंतामण रामदास म्हात्रे, डॉ.अशोक म्हात्रे- अध्यक्ष पत्रकार उत्कर्ष समिती, कार्यकारी अध्यक्ष श्री.अविनाश म्हात्रे प्रेरणा पुरस्कार- २०२१ ने सन्मानित

अंबरनाथ  / श्री अविनाश म्हात्रे- अतिशय उत्कृष्ट समाजसेवा करणाऱ्या प्रेरणा फौंडेशनच्या वतीने समाजउपयोगी भरीवकार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक समाजसेवकांचा आज दि.२६ जानेवारी २०२१ रोजी  बदलापूर येथे समाजसेवा पुरस्काराने  व कोविड योद्धा पुरस्काराने गौरव करण्यात आले, या प्रसंगी अनेक मान्यवरांनी प्रेरणा उर्फ दीप्ती गावकर यांनी त्या करत असलेल्या कार्याची स्तुती केली व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेछया दिल्या, या प्रसंगी प्रत्येकाच्या मुखी प्रेरणा फौंडेशनच्या दीप्ती गावकर यांचाच जयजयकार होताना दिसत होते.

     या सोहळ्याला  प्रमुख पाहुणे समाजसेवक श्री संजीव जैन इंटेप्रोव्हेन कंपनी मॅनेजर, डॉ.अशोक म्हात्रे, अध्यक्ष पत्रकार उत्कर्ष समिती, कार्यकारी अध्यक्ष पत्रकार उत्कर्ष समिती श्री.अविनाश म्हात्रे,अंबरनाथ,भाजप महिला अध्यक्ष  सुजाताताई भोईर, श्री.बाळासाहेब भालेराव अध्यक्ष सुपरस्टार ऑल सोशल मीडिया व इतर मान्यवर उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे सुंदर नियोजन व प्रस्थापना कुमारी दिव्या गावकर यांनी केली, विशेष म्हणजे दीप्ती गावकर अध्यक्ष प्रेरणा फौंडेशन व त्यांचे सहकारी अनंता पवार, वैभव कुलकर्णी, रेश्मा देसाई, दिलेस देसाई, विनायक चांदेकर व इतर सहकारी यांनी छान नियोजन करून पुरस्कार सोहळा सुंदर रित्या पार पाडला.

साई एकदंत रहिवाशी सेवा संघाने ७२ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त सफाई दूतांच्या सत्काराची दिली सलामी

नालासोपारा: ( दीपक मांडवकर/शांत्ताराम गुडेकर) 

               नालासोपारा नागीनदास पाडा येथे सातत्याने रहीवाश्यांच्या असुविधे साठी प्रथम प्राधान्य देणारी संघटना म्हणून नाव लौकिक आहे. ऐकून २१ इमारती संघटित होऊन प्रथम   विभागातील रहिवाश्यांच्या वयक्तिक वैद्यकीय व शैक्षणिक सुविधेला प्राधान्य देत आहे. या काळात नगरसेवक, सभापती, आमदार यांच्या सहाय्याने इमारतींच्या इत्तर सुविधांवर भर देत एक वेगळे परिवर्तन या संघटनेने केल्याचे सांगितले जात आहे.तरी ७२ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त विभागातील इमारतींच्या आजूबाजूला असलेला कचरा सातत्याने सफाई करून कोरोना काळ ते आज पर्यंत येणाऱ्या विविध रोगराई पासून स्वच्छतेच्या माध्यमातून रक्षण करण्यात आले. म्हणून या शुभ दिनी येथील वसई विरार महानगर पालिकेच्या दहा सफाई दूतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  संघा चे अध्यक्ष  प्रकाश नाडकर तथा माजी. नगरसेवक  किसन मामा बंडागळे, समाज सेवक संतोष कदम, खजिनदार  सतेश कदम, बाळा नारकर, सल्हागार अनंत गोरीवले, निलेश भक्कम, मंगेश गोरीवले, तानाजी मोडक, सचिन चिपटे, संदेश गोरीवले, खेराडे साहेब , शिर्के साहेब , सकपाळ साहेब, गुरव साहेब, पांडुरंग शेलार व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला.

गुहागर प्रतिष्ठानच्या वतीने विरार मानवेल पाडा जिल्हा परिषद शाळा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

विरार(दीपक मांडवकर / शांत्ताराम गुडेकर) 

           रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असे मानले गेले आहे तसा संदेशही दिला जातो.नवीन  वर्षाच्या सुरुवातीला  गुहागर प्रतिष्ठानच्या वतीने विरार मानवेल पाडा जिल्हा परिषद शाळा येथे भव्यदिव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकुण ५६ रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिरासाठी शताब्दी ब्लड बँकने सहकार्य केले.तर या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून गुहागर अडुर मुंबई मंडळाचे सचिव  दिलीप हळवे, जनशक्ती दबावचे विषेश प्रतिनिधी (पत्रकार) दीपक मांडवकर, गुहागर पाटपन्हाळे मुंबई जागृती  विकास मंडळाचे माजी अध्यक्ष  भालचंद्र भेकरे, गुहागर अडुरवावडगाणेश्वर मिरुल विकास मंडळाचे अध्यक्ष  दिलीप मांडवकर, साई एकदंत रहिवाशी सेवा संघाचे अध्यक्ष  प्रकाश नाडकर व प्रतिष्ठाचे सर्व सभासद उपस्थिती होते. सुरवातीला मिलिंद पवार  यांच्या हस्ते दीप प्रवजवलीत करण्यात आले. तर गुहागर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष योगेश कदम यांच्या हस्ते शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सचिव  गणेश हळये यांच्या अस गुहागर प्रतिष्ठानच्या सर्व शिलेदारांच्या नेतृत्वाखाली हा सुवर्ण भवैदिव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम पार पडला. गुहागर वाशीयांसाठी खंबीरपणे उभे राहू आणि कधीही रक्ताची गरज भासल्यास ते त्वरित त्यांच्या पर्यंत पोचवू असे मत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष  योगेश कदम यांनी व्यक्त केले.

बुधवार, २७ जानेवारी, २०२१

विक्रोळीत पार पडले "आमदार चषक" ; घाटकोपरच्या गणपती मंडळाने मारली बाजी

मुंबई : आजच्या तरुणाईला क्रीडा क्षेत्रात योग्य ते स्थान मिळावे तसेच तरुणाईला या क्षेत्रात उंच उंच शिखरे गाठता यावे या हेतूने सलग ३७ वर्ष विक्रोळी येथील महाड तालुका क्रीडा मंडळ अस्सल मातीतला खेळ कबड्डीचे आयोजन करते.यंदा या कबड्डी स्पर्धेचे वैशिष्ट्य सांगायचे तर विक्रोळी येथील शिवसेना पक्षाचे कार्यसम्राट व डॅशिंग  आमदार सुनिल राऊत यांच्या सहकार्यातून ,मार्गदर्शनातून आणि आर्थिक सहकार्यातून भव्य दिव्य आमदार चषक सामने दिनांक २४ जानेवारी ते २६ जानेवारी पर्यंत भरविण्यात आले होते.प्रामुख्याने पुरूष गटाचा  या सामन्यांमध्ये सहभाग होता.मंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष येरुणकर,उपाध्यक्ष शंकर पेडामकर, दगडू म्हामुणकर, क्रीडा प्रशिक्षक सहदेव मालुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा कमिटी अध्यक्ष संजय येरूणकर, उपाध्यक्ष सुनील गायकवाड, सिद्धेश जाधव, खजिनदार कमलेश वनगुळे , सेक्रेटरी राकेश साळुंके , उप सेक्रेटरी मनोज गायकवाड  यांच्या नियोजनाने हे सामने अगदी शिस्तबद्ध पद्धतीने सलग तीन दिवस पार पडले. या चषकासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.या चषकासाठी प्रथम क्रमांक रोख रु.७,७७७ आणि आमदार चषक, द्वितीय क्रमांक रोख रु.  ५,५५५  व आमदार चषक आणि उत्कृष्ट खेळाडू  ,उत्कृष्ट पक्कड , उत्कृष्ट चढाई असे व्यक्तिगत पारितोषिक ठेवण्यात आले होते.तसेच निवृत्त सुभेदार सहदेव मालुसरे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्ताने प्रत्येक कबड्डी संघास सन्मान चिन्ह व मेडल  (पदक) देण्यात आले. आपली सांघिक खेळाडू वृत्ती दाखवून यंदाचा आमदार चषकाचा मान गणपती क्रीडा मंडळ , घाटकोपर यांनी पटकावला तर उपविजयी संघ जय हनुमान क्रीडा मंडळ, विक्रोळी  तसेच उत्कृष्ट खेळाडू व्यक्तिगत चे पारितोषिक अशोक माईन ,  उत्कृष्ट चढाई स्वप्नील जगताप व उत्कृष्ट पक्कड चंदू बावलेकर यांनी मिळवला. विजयी संघातील आदेश सावंत याच्याशी बातचित केली असता त्यांनी पुढीलप्रमाणे प्रतिक्रिया दिली.

   " दहा वर्षांपासून मी कबड्डी खेळत आहे या मंडळात सलग पाच वर्षे मी येऊन खेळत आहे.खूप बरं वाटत आहे की अखेर पाच वर्षांनी का होईना आपल्या परिश्रमाचे फळ मिळाले.नियोजनाच्या बाबतीत हे मंडळ खूप उत्तम आहे. त्यांची ही शिस्तबद्ध पध्दतच आम्हाला येथे येऊन खेळण्यासाठी प्रोत्साहित करते."

व्हेंटीलेटरची ग्रामीण भागात गरज !

करोना काळात उपलब्ध झालेले साधारण सात हजाराहून अधिकचे व्हेंटीलेटर शहाजी राजे संकुल व नायर हॉस्पिटल या ठिकाणी पडून असल्याचे वाचनात आले. अश्या या महागड्या आणि अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या यंत्राचा वापर होणे गरजेचे आहे मात्र ते नुसतेच वापरा ऐवजी पडून राहिल्यास नादुरुस्त अथवा खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरे, पुन्हा कधी ते दुरुस्त करावयाचे म्हटले तर त्याचा अवाढव्य खर्च आहेच शिवाय ते दुरुस्त होतीलच असे काही सांगता येत नाही.

 खर तर मुंबईसह राज्यातील बहुसंख्य ग्रामीण भागातील शासकीय, निमशासकीय, खाजगी जिल्हा, तालुका रुग्णालयातून व्हेंटीलेटरचा मोठ्या प्रमाणात अभाव जाणवतो किंबहुना बहुतेक इस्पितलात सुविधाच उपलब्ध नसतात असे म्हटल्यास वावगे होणार नाही. त्यामुळे गरजू रुग्णाची परवड होते तर व्हेंटीलेटरची सोय असलेल्या हॉस्पिटलच्या शोधात नातेवाईकांना वणवण करावी लागते. या सार्‍या पार्श्वभूमीवर व्हेंटीलेटर पडून राहून नादुरुस्त होण्यापेक्षा शासनाने, संबधित यंत्रनेणे हे सारे ग्रामीण भागातील जिल्हा, तालुका स्तरावर शासकीय, निमशासकीय रुग्णालयांना अटी, शर्तीवर वापरण्यास दिल्यास ते चांगल्या प्रकारे सुस्थितीत, कार्यरत राहतील आणि नागरिकांनाही एक उत्तम सोय, सुविधा प्राप्त झाल्याचे समाधान मिळेल.   

-विश्वनाथ पंडित,
जिजामाता मार्ग, ठाणे

' विचार क्रांती बदलणे आवश्यक ' .....

   नववर्षातील पहिला गोड सण म्हणजे " संक्रांत'. आणि ती रथसप्तमी पर्यंत असते. या दिवसात थंडीचे प्रमाण जरा जास्त असल्याचे रूक्ष त्वचेला तिळातील स्निग्धता, गुळातील गोडवा आणि तुपातील पौष्टिकता  हवी यासाठी तिळाचे लाडु व विविध पदार्थ करुन खाल्ले जातात. त्याचबरोबर सुवासिनींना वाण लुटण्याचे दिवस असतात. प्रत्येक सुवासिनीला दर वर्षी काय वाण वाटावे हा मोठा गहन प्रश्नच असतोचं.  पंधरा ते वीस रुपयांची टाकाऊ वस्तू देण्यापेक्षा लक्षात राहील व विशेष म्हणजे उपयोगी पडेल अशीच वस्तू दयावी.  वाण देताना सामाजिकतेचा विचार करायला हवा. जसे - थोरा मोठयांची आदर्श पुस्तके,  चांगल्या कवितांचे पुस्तक,  शब्दकोश, आदर्शांचे चरित्र,  ज्ञान वाढविणारी पुस्तके, तसेच लहान मुलांचे निबंध व व्याकरणाचे पुुस्तके असेच वाण दयावे.  जेणे करून सर्वांना उपयुक्त होईल.  संक्रातीला वाण लुटण्याचा आनंद मिळतो.  मग देणारीला व घेणारीला आनंद व समाधान नक्कीच  मिळायला हवा.. संक्रांतीला विचारांची नवक्रांती व्हायला हवी.  चांगले आचार व विचार दयावे व घ्यावेंत.  हळदी कुंकू हा स्त्रियांचा आवडता विषय आहे त्यामुळे त्यात नाविन्य हवेच. टाकाऊ वस्तू पेक्षा टिकाऊ वस्तूूचं कधीही श्रेष्ठ आहे.  टिकाऊ म्हणजे उपयुक्त अशी वस्तू.  कारण टाकाऊ वस्तूला किंमत नसते. आणि टिकाऊ ला कायमच डिमांड असते. महिलांनी हळदीकुंकू जरूर करावा. सौभाग्याचे लेणंच आहे ते.. पण याच निमित्ताने स्त्री भृण हत्या रोखण्यासाठी काही तरी स्लोगन लिहिलेले ग्रीटिंग कार्ड दयावे.  किंवा मुलगी शिकली आणि प्रगती झाली तसेच बेटी बचाओ  असा अमूल्य संदेश ही द्यावा. मुली वाचावावी व शिकवावी ही काळाची गरज आहे मग त्यासाठी आपण महिलांनी पुढाकार घयायला हवा .. विचार बदलून नवीन क्रांती घडवून आणली पाहिजे तरच देशाची प्रगती होईल.  असे वाण लुटण्याचे समाधान ही निराळेच असते. 

  -सौ. स्नेहा मुकुंद शिंपी  
   नाशिक 

देश बलशाली होईल!

   स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले दोन राष्ट्रीय सण आहेत. हे दोन्ही सण संपूर्ण भारतात मोठया उत्साहात साजरे केले जातात. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच जण या दिवशी तिरंग्यांला मानवंदना देऊन देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत असतात ; पण दुर्दैवाने अनेक लोकांना स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन यातील फरक सांगता येत नाही. भारताला  ब्रिटिश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. देश स्वातंत्र्य झाला तेंव्हा आपल्या देशाला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यांवर ( कलमावर ) आधारित होते. स्वतंत्र देशाला स्वतःचे संविधान असावे,  त्या संविधानात देशाचा कारभार कसा चालवायचा या संबंधी नियम आणि कायदे असावेत तसेच नागरिकांचे  हक्क आणि कर्तव्यांचाही त्या संविधानात समावेश असावा असे सर्वांचे मत होते. हे संविधान तयार करण्याचे शिवधनुष्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विद्वानाने  पेलावे असे आव्हान करण्यात आले  तेंव्हा ते संविधान तयार करण्याचे आव्हान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारले. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करुन तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला.  डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या नेतृत्वाखालील या समितीने दोन वर्ष, अकरा महिने, अठरा दिवसात संविधानाचा मसुदा तयार केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर  २४ जानेवारी १९५० रोजी विधानसभेच्या ३०८ सदस्यांनी हा मसुदा मान्य केला. संविधानाच्या दोन हस्तलिखित प्रति तयार करण्यात आल्या. इंग्रजी व हिंदी भाषेत या प्रति होत्या. दोन दिवसांनी म्हणजे २६ जानेवारी १९५० पासून या संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले.  संविधानेने आपल्याला मूलभूत हक्कांसोबत मूलभूत कर्तव्ये देखील दिली आहेत. हक्क आणि कर्तव्ये एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण जितके हक्कांबाबत जागरूक असतो तितके आपण आपल्या कर्तव्याबाबत जागरूक नसतो. जर प्रत्येक नागरिकाने आपल्या संवैधानिक हक्कांसोबत संवैधानिक कर्तव्ये देखील प्रामाणिकपणे बजावली तरच भारत बलशाली होईल.

-श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे

डॉ जयंत नारळीकर यांची निवड सर्वार्थाने योग्य

     

नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक पद्मविभूषण डॉ जयंत नारळीकर यांची झालेली निवड सर्वार्थाने योग्य आहे. डॉ जयंत नारळीकर हे रुढार्थाने साहित्यिक नसले तरी त्यांनी केलेले लेखन हे दर्जेदार साहित्यिकापेक्षा कमी दर्जाचे नाही.  विज्ञानकथेसारखा वेगळा प्रवाह मराठी साहित्यात रुजविण्याचे मोठे काम त्यांनी केले. विज्ञानासारखा  रुक्ष आणि अवघड विषय  ललित साहित्याच्या अंगाने मांडून त्याला सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहचवण्याचे अवघड व महत्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांनी केलेले विज्ञानविषयक लेखन व सुरस विज्ञान कथा यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागली. खगोल शास्त्रात सातत्याने संशोधन करत असताना डॉ जयंत नारळीकरांनी लेखनही चालू ठेवले. त्यांनी अनेक विज्ञानकथा लिहिल्या. त्यांची यक्षाची देणगी, अंतराळवीर, भस्मासुर, टाइम मशीनची किमया, प्रेषित, अभयारण्य, याला जीवन ऐसे नाव, वामन परत आला, गणितातील गमतीजमती, नभात हसरे तारे, नव्या सहस्त्रकाचे नवे विज्ञान, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेचे अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाचे रयचिते ही पुस्तके गाजली. त्यांनी लिहिलेले  आकाशाशी जडले नाते व  अंतराळ आणि विज्ञान  ही पुस्तके  प्रचंड गाजले. ही  पुस्तके म्हणजे त्यांच्या दर्जेदार साहित्याचे उत्तम उदाहरण आहेत. तीन नगरातील माझे विश्व हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिध्द आहे. यक्षाची देणगी या त्यांच्या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. सामान्य माणसाला खगोल शास्त्र समजवण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष प्रयत्न केले. आपल्या लेखनातून त्यांनी अंधश्रद्धा दूर करण्याचाही प्रयत्न केला. बहुविध प्रतिभेचे धनी असलेले डॉ जयंत नारळीकर यांच्यासारख्या व्रतस्थ व्यक्तीमत्वास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे हा त्यांच्या बहुविध प्रतिभेचा गौरव आहे. डॉ जयंत नारळीकर  यांच्यासारखे जेष्ठ विज्ञानविषयक लेखक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यामुळे यापुढे विज्ञान साहित्याला अधिकाधिक प्रतिष्ठा लाभेल तसेच विज्ञानाचा प्रसार तर होईलच पण तरुण पिढीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास खूप मदत होईल. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ जयंत नारळीकर यांचे मनापासून अभिनंदन! 

-श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे 

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

स्वप्निल मालाडकर ला हवयं "ईच्छामरण"

मुंबई / प्रतिनिधी  - अतिशय दुर्मिळ आजारामुळे त्रस्त असलेल्या स्वप्निल मालाडकर याची हालाखीची अवस्था पाहता त्याला त्याच्या आजारावर होणा-या खर्चांची तजवीज करताना खूप दमछाक होत आहे. अस जगण्यापेक्षा स्वेच्छेने मरण स्वीकारलेले चांगले यासाठी तो "ईच्छामरण" याचना करताना दिसत आहे. 

     श्री स्वप्निल सुरेश मालाडकर. वय, वर्षे-३०, मागील ५ वर्षांपासून  Iron deficiency Anemia/ EHPVO / Ascites with Umblical hernia / Partial SVT / Splenomegaly.

ह्या दुर्मिळ आजाराशी संघर्ष करतो आहे. ह्या आजारात यकृताकडून हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा अतिशय बारीक होत जातात. त्यामुळे रक्तपुरवठ्याच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी रुग्णाचे पोट फुगते, शरीराच्या काही भागांवर सूज येते. या आजारामुळे  माझ्या शरीरातील शुद्ध रक्त हृदयापर्यंत जात नसून, यकृताचे कार्यही त्यामुळे बिघडले आहे. या आजारावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी तो अनेक सरकारी योजना आणि संस्थांकडे त्या अवस्थेमध्येही पायपीट केली. मात्र, हा आजार सरकारी योजनांमध्ये न बसणारा असल्यामुळे अनेक संस्था, न्यास, ट्रस्ट, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यांच्याकडून निधी उपलब्ध होऊ शकला नाही. हा आजार त्या कक्षेमध्ये येत नाही, असे कारण त्याला देण्यात येत आहे. आतापर्यंत लोकवर्गणीतून त्याचे उपचार सुरू असून आता ती ही मदत मिळणे कठीण होऊन बसले आहे. 

    आमची वसई रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे यांनी सरकार दरबारी दुर्धर व दुर्मिळ आजारांचा समावेश करण्यात यावा यासाठी पाठपुरावा सुरु आहे. कुटूंब फाउंडेशन श्री सचिन जगदाळे यांनी स्वप्निल ची व्यथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली असता तिथेही निराशाच हाती पडली आहे. अपवादात्मक परिस्थितीत अशा रुग्णांना नियमांबाहेर जाऊन मदत करावी अशी मागणी रुग्णमित्रांतर्फे केली आहे. स्वप्निल मालाडकर ला वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे यावर ठोस उपाय म्हणजे "ईच्छामरण" हाच आहे अस ठाम मत स्वप्निल ने मांडले आहे. शासकीय योजनांमध्ये अशा दुर्धर व दुर्मिळ आजारांचा समावेश करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. स्वप्निल-  ९९६९०७७०८९

सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न ; कोरोनाच्या काळात अतिशय चांगले कार्य केलेल्या बद्दल चा सन्मान

मुंबई : सरपंच सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा " मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा " राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २२ जानेवारी २०२१ रोजी दुपारी १ वा हाँटेल जे के पॅलेस साई गोल्ड परीसरात शानदार सोहळा संपन्न झाला. संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील संगमनेर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष यादवराव पावसे होते. सरपंच हा ग्रामविकासाचा घटक आहे यांनी असे कार्यरत करावे कि ते काम अस्मणिय राहील असे आवाहन समाजप्रबोधनकर निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी केले शिडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखडे ग्रामसेवक युनियन चे राज्यध्यक्ष एकनाथ ढाकणे ,भाऊ मरगळे, विक्रम भोर, हरीप्रिया शुगर चे अध्यक्ष जयदिप वानखेडे कार्यकारी संचालक अंनत ऊर्फ बाळासाहेब निकम स्वागतध्यक्ष सरपंच प्रदीप हासे, सरपंच रविंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्रात सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र भर कार्यरत राहुन सरपंच यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्यावर सरकार सोबत सातत्याने पाठपुरावा करून महाराष्ट्र एक आगळावेगळे उपक्रम राबवून सरपंच यांना एक आधार म्हणून सरपंच सेवा संघ कार्य करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संपुर्ण महाराष्ट्रात आदर्श गावे निर्माण करण्यासाठी एक मोठा आराखडा तयार करून महाराष्ट्रात काही गावे निवडुण ग्रामविकासाचे काम गावोगावी जाऊन सुरू करणार आहे.विविध क्षेत्रातील पुरस्कार मानकरी कार्यकर्त्याचे भरीव योगदान कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले याबद्दल यंदाचे राज्यस्तरीय पुरस्कार आदर्श सरपंच, उद्योग भुषण,पत्रकारीता, युवारत्न, प्रशासकीय सेवा, सामाजिक, शैक्षणिक,कोरोना योद्धा, मिडीया ,कृषी ,व्यापार, कला,राजकीय, महसुल , वैद्यकीय, अध्यात्मिक, ऐतिहासिक,दिंव्याग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुत्रसंचालन प्रा.सोनाली म्हरसाळे ,इंजि युवराज सातपुते यांनी केले . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सरपंच सेवा संघाचे समर्थक युवा सामाजिक कार्यकर्ते शरदराव देवकाते यांनी केले.

दिशा वेल्फेअर ग्रुपतर्फे स्वच्छ भारत व जलशुध्दीकरण अभियान

ठाणे /प्रतिनिधी : दिशा वेलफेअर ग्रुप या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भास्कर बैरिशेट्टी तसेच ठाण्याच्या कार्य सम्राग्नी नगरसेविका सौ. रागिणी ताई बैरिशेट्टी यांच्या सहकार्यातून शिवाई नगर ठाणे येथे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्यविषयक सल्ला देणाऱ्या संजीवनी हेल्थ केअर चॅरीटेबल ट्रस्टच्या सचिव मनिषा गांगुर्डे यांनी सुचवलेले समीक्षा व्हेचर्स या आयएसओ मानांकन असलेल्या अत्याधुनिक उपकरण, हर्बल लिक्वीड तसेच भारतात प्रथमच अँटीब्याक्टेरिया फॉगींग अश्या 7 स्टेप ने सोसायटीची टाकी क्लीन करून देणाऱ्या कंपनी कडून शिवाई नगरच्या नागरिकांच्या सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी दिशा वेलफेअर चे अध्यक्ष भास्कर बैरिशेट्टी यांनी संस्थेच्या माध्यमातून जलशुद्धीकरण अभियानचे दिनांक 23/1/2021 रोजी सकाळी शिवाई दर्शन या पहिल्या सोसायटीच्या पाणी पिण्याच्या टाक्या क्लीन करण्यासाठी शुभारंभ केला याप्रसंगी सोसायटी मधील नागरिकांनी बैरिशेट्टी यांचे आभार मानून सन्मान केला तसेच भास्कर शेट्टी यांनी आपले मनोगत मांडताना या जलशुद्धीकरण अभियानात संपूर्ण शिवाई नगर मधील सोसायट्यांचे पाणी पिण्याच्या टाक्या मोफत क्लीन करणार असून येथील नागरिकांना शुद्ध पाणी मिळून नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी शुभकामना दिल्या तसेच मागील आठवड्यात जलशुद्धीकरण अभियानची घोषणा केली होती त्यावेळेस सर्व सोसायटी मध्ये कोरोणा विषाणू आपल्या प्रभागात पुन्हा शिरकाव करू नये यासाठी अत्याधुनिक फवारणी मशीन वाटप करण्यात आले होते तसेच जलशुद्धीकरण केलेली घोषणेचा आज शुभारंभ करून वचनपूर्ती करून शिवाई नगर नागरिकांचे व संजीवनी हेल्थ केअर चॅरीटेबल ट्रस्टच्या आरोग्यविषयक सल्लागार मनिषा गांगुर्डे यांचे ही आभार मानून जलशुद्धीकरण अभियानास उत्साहाने सुरुवात झाली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी


प्रतिनिधी / उदय वाघवणकर

जोगेश्वरी - पुर्व येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा ट्रॉमा केअर रुग्णालयात दि.२३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक / डॉ. प्रमोद नगरकर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी / डॉ. राजेंद्र बच्छाव, शिवसेना स्थानिक शाखाप्रमुख / अमर मालवणकर, आमदार व माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे स्वीय सहाय्यक व शाखा समन्वयक / उमेश कदम, भारतीय कामगार सेना सहचिटणीस संजीव राऊत, सुजीत कारेकर, पदाधिकारी दशरथ (बाबू) केरकर, संतोष सावंत, समीर राणे / विलेपार्ले शिवसेना उपशाखा अधिकारी, शिवसेना महिला पदाधिकारी, भारतीय कामगार सेना प्रणित ट्रॉमा केअर युनिट अध्यक्ष / राजेश राणे, शिवसैनिक उमेश राणे, रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, सुरक्षारक्षक व स्थानिक शिवसैनिक तसेच भारतीय कामगार सेना प्रणित ट्रॉमा युनिटचे पदाधिकारी उपस्थित होते.

गर्व हिंदूत्वाचा या व्हाँट्सअप ग्रुप आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

मुंबई(शांत्ताराम गुडेकर)-  शिवसेनाच्या माध्यमातुन आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाँट्सअप ग्रुपच्या माध्यमातुन एक हात मदतीचा हा महत्वपुर्ण उपक्रम गोरगरिबांसाठी सुरु करुन कोवीड-१९ काळात या समुहाने अनेकांना मदतीचा हात दिला. रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन या समुहातर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहन नुसार श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजे शिवाजी विद्यालय संकुल, हिंदू कॉलनी, दादर पुर्व येथे पार पडलेल्या भव्य रक्तदान शिबिराला राक्तदात्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.रक्तदान शिबिरास उद्घाटन प्रसंगी मराठी सिने अभिनेत्री दीपाली जगताप खासदार विनायक राऊत, मुंबई उपमहापौर सुहास वाडकर,माजी महापौर महादेव देवळे, नितिन नांदगांवकर यांची उपस्थिती लाभली.रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचे कमेटी मेंबर यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.संतोष पाटील, सूर्यकांत कडू , रवींद्र जाधव, यशवंत खोपकर,अवि राऊत, दिलीप गावडे,अनिल कांबळे, वसंत सोनावणे, रमेश वागावकर, दत्तात्रय घुले, सुरेश कोरगावकर ,सौ समिता बागकर, विशाल कोर्लेकर यांनी हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. याअगोरही ग्रुपतर्फे डोंबिवली येथील जोशी काका यांना २१,०००/- रु.मदत कोरोना काळात करण्यात आली.आता मुंबई मध्ये रक्तपुरवठा कमी असल्या मुळे हे रक्तदान शिबिर घेण्यात आल्याचे ग्रुपचे पदाधिकारी संस्थापक संतोष पाटील,संचालक सुर्यकांत कडू,अध्यक्ष  रविंद्र जाधव,उपाध्यक्ष, यशवंत खोपकर यांनी सांगितले.कारण रणभूमीवर जाऊन देशासाठी रक्त साडणे प्रत्येकाला शक्य नाही.मात्र तेवढेच पुण्यकार्य सहज शक्य आहे रक्तदान केल्याने मिळू शकते.शिवाय जी लाहान मुले थँलिसिमीया या आजाराने त्रस्त आहेत त्यांना आयुष्यभर दर १५ दिवसांनी रक्त घ्यावे लागते.त्यांना हे रक्त प्राप्त झाले तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होऊ शकतो.म्हणून "रक्तदान...सर्व श्रेष्ठ दान.."रक्तदान करा..जीवन वाचवा..असा संकल्प करत हे शिबिर आयोजकांतर्फे घेण्यात आले.

समृद्धी बामणे हीचे राज्यस्तरीय उंच उडी स्पर्धेत उत्तुंग यश !

कोकण : (  दिपक कारकर )- सह्याद्री शिक्षण संस्थेचे शावजीराव लक्ष्मणराव निकम माध्यमिक विद्यालय कोसबी-फुरूस,ता.चिपळूण,जि. रत्नागिरी या विद्यालयाची विद्यार्थीनी कु.समृद्धी संतोष बामणे हीने नुकत्याच पुणे येथे झालेल्या राज्य स्तरावर ॲथलेटिक्स स्पर्धेत उंच उडी प्रकारात सहभागी होऊन द्वितीय क्रमांक पटकावला आहे.तसेच तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड देखील झाली.सदर स्पर्धा महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन मार्फत घेण्यात आली होती.अतिशय गरीब परिस्थितीशी सामना करुन समृद्धीने हे यश मिळवले आहे. 

या तिच्या उत्तुंग यशामागे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. सुनिल गुढेकर व सर्व शिक्षक, तसेच सौ.भंडारी मॅडम, श्री. अवघडे सर व सहकारी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल समृद्धी हिचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. आमदार शेखरजी निकम,सचिव मा.महेश महाडिक सर,सर्व संचालक, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कल्पेश दळवी सर,केंद्र प्रमुख श्री.विचारे सर, शालेय समिती व पालक-शिक्षक संघ सर्व सदस्य,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,कोसबी केंद्रातील सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले.तसेच तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.समृद्धीच्या नेत्रदीपक कामगिरी बद्दल तिचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

सहयाद्री कुणबी संघ पुणे शहर ( महाराष्ट्र राज्य ) संस्थेचा १३ वा वर्धापन दिन सोहळा थाटामाटात संपन्न !

मुंबई : (  दिपक कारकर / राज भागणे ) पुणे शहरातील विविध उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असणारी व अनेक पुरस्काराने सन्मानित सहयाद्री कुणबी संघ पुणे शहर ( नोंदणीकृत ) या संस्थेचा १३ वा वर्धापनदिन सोहळा व या नेत्रदीपक सोहळ्याचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर,कोविड योद्धा सन्मान सोहळा आणि महिला मंडळ हळदी कुंकू समारंभ सर्वांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात रविवार दि.२४ जानेवारी २०२१ रोजी,शास्त्रीनगर कोथरूड पुणे या ठिकाणी संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कऱण्यात आली.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष- श्री बापूसाहेब डाकले,पुणे म.न.पा.कार्यक्षम नगरसेविका सौ.श्रध्दाताई प्रभुणे(पाठक),पुणे म.न.पा. नगरसेविका सौ.वासंती ताई नवनाथ जाधव,पुणे म.न.पा. नगरसेविका सौ.अल्पना ताई वरपे,नगरसेवक दिलीप आण्णा वेडेपाटिल,राहुल दादा पाठक,कुणबी समाज संघ सरचिटणीस-गोरिवले,कुणबी समाज संघ- कुणबी शिक्षण मंडळ अध्यक्ष-श्री. मनोहर जोशी,कुणबी समाज संघ-उपाध्यक्ष-अशोक डाफले,मासिक संपादक-राजेश कदम,मुंबई सामाजिक कार्यकर्ते-संदीप तांबट,शिवसेना पर्वती विभाग प्रमुख-श्री.सुरज लोखंडे,स्वराज्य कोकण संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक आणि पत्रकार-श्री. प्रकाश यादव,शाहीर संदीप मोरे,युवा शाहिर रोहितजी तुपट,सहयाद्री कुणबी संघ महाराष्ट्र प्रांत-कार्याध्यक्ष-श्री.गणपतदादा घडशी,महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष-श्री. विलास दादा घडशी,पुणे शहर-अध्यक्ष-दिपक फणसळकर महिला आघाडी अध्यक्षा-सौ.वैष्णवी ताई भोज,रत्नागिरी संपर्क प्रमुख-श्री. राजेंद्र,मुंबई शहर अध्यक्ष-दीपक कारकर,उपाध्यक्षा महिला आघाडी मुंबई शहर-वेदीकाताई आलीम अशी मान्यवर मंडळी  उपस्थित होते.रक्तदान सर्वश्रेष्ठ दान,करुनि दान रक्ताचे ऋण फेडू समाजाचे या भावनेने अनेक रक्तदात्यानी रक्तदान करत एकूण ६१ बॉटल रक्तदान करून सामाजिक हित जोपासण्याचे महत्त्व पूर्ण काम केले आहे.या उपक्रमाला ओम ब्लड बँक शाखा,मंगळवार पेठ यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर सरचिटणीस-श्री. छगन(राज) भागणे यांनी केले,प्रस्तावना प्रांत-उपाध्यक्ष-श्री.प्रवीण भोज आणि आभार प्रदर्शन प्रांत सरचिटणीस-श्री. अजित शिगवण यांनी केले.कोव्हिड १९ च्या दिवसांत शासकीय नियमांचे पालन करून सहयाद्री कुणबी संघाच्या सर्व शिलेदार यांनी पार पाडलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

नेरुळ येथील कै. पंडीत रामा भगत उद्यानात हायमास्ट बंद अवस्थेत; नागरिकांची गैरसोय, चोरीचे व गर्दुल्लाचे प्रमाण वाढले

 

नवी मुंबई (प्रतिनिधी) :- उद्याने ही शहराचे वैभव असल्याने उद्यान विभागातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून झोकून देऊन काम करावे व उद्यानांच्या स्थितीत आमुलाग्र सुधारणा घडवून आणावी असे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी  सूचित केले होते.

   दरम्यान, सेक्टर 12 नेरुळ येथील कै. पंडीत रामा भगत या उद्यानात हायमास्ट बंद अवस्थेत असल्यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळेस खुप गडद अंधार होतो आणि याचाच फायदा घेऊन काही भुरटे चोर या प्रभागात चोरी करत आहेत त्यामुळे चोर्‍यांचे व गर्दुल्लाचे प्रमाण देखील विभागात वाढत आहे तसेच या अपुऱ्या प्रकाशामुळे जेष्ठ नागरीक, लहान मुले व महिला वर्गाला ये-जा करण्यास होणारा नाहक त्रास सहन करावा लागत आहे यावर महापालिकेने गांभीर्याने लक्ष देवून लवकरात लवकर कै. पंडीत रामा भगत उद्यानात हायमास्ट बनवून येथील नागरिकांना होणारा त्रास थांबवावा. तसेच, या बद्दल लेखी निवेदन नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांना दिले आहे 

  उद्यानांची नियमित स्वच्छता आणि देखभाल तसेच तातडीने आवश्यक दुरूस्ती या महत्वाच्या बाबींची दक्षता घेत उद्यान सहाय्यकांनी आपापल्या क्षेत्रातील उद्यानांची स्थिती सुधारण्याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे, त्यासाठी दररोज उद्यानांना भेटी द्याव्यात व आवश्यक सुधारणा करून घ्याव्यात असे निर्देश या आधी ही महानगरपालिके चे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले होते. यापुढील काळात उद्यानांची स्थिती पाहण्यासाठी कुठेही अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असून कामात निष्काळजीपणा आढळल्यास जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे देखील स्पष्ट संकेत देण्यात आले होते.

कांजूरमध्ये आजी माजी सैनिकांचा आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते यथोचित सन्मान

मुंबई - भारतीय सैनिक स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता आपलं संरक्षण करतात हि अभिमानास्पद गोष्ट असून आज देशाची परिस्थिती बिकट आहे. चीन, पाकिस्तान डोके वर काढतय. याही परिस्थिती मध्ये कौतुकास्पद कामगिरी करीत आहेत. म्हणून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून सैनिक हो, तुमच्यासाठी असा आजी माजी सैनिकांचा भव्य सत्कार आयोजन महापौर मैदान, कांजूरमार्ग येथे दि. २४ जानेवारी रोजी करण्यात आले होते. त्यावेळी आमदार सुनील राऊत यांनी सैनिकांच्या सत्कारादाखल मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले.

   प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मांसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केले व दीपप्रज्वलन आमदार राऊत आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी आमदार सुनील राऊत म्हणाले कि या कार्यक्रमाचे आयोजक योगेश रमेश चव्हाण यांनी माझ्या मतदार संघात असा पहिला कार्यक्रम घेतला आहे. याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. कारण अशाप्रकारे विधायक कार्यक्रम राबविण्याचे कार्यकर्त्यांना नेहमीच सूचित करीत असतो. आपलं नेहमी यासाठी सहकार्य राहील असे विषद केले.

  चिपळूण गावचे रहिवाशी आयोजक योगेश चव्हाण यांनी सांगितले कि, बालविकास मंडळ, श्रद्धा विकास मंडळ आदी मंडळासोबतचे कार्यकर्ते आपल्या सोबत असल्याने काही तरी माझ्या सैनिकांसाठी करावे या हेतूने आमदार सुनील राऊत याना भेटलो. त्यांनी संकल्पना उचलून धरली आणि आजचा कार्यक्रम साजरा करता आल्याचे सांगितले.

  यावेळी नगरसेविका सुवर्ण कारंजे यांनी खरंच हा स्तुत्य असा उपक्रम राबविण्यात आल्याचे नमूद करून देशाप्रती प्रेम करण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित योगेश चव्हाण कार्यरत आहेत. माझ्या कांजूरमध्ये प्रथमच ९६ सैनिकांचा सत्कार सोहळा हे काम शिवसैनिक करू शकतो याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले.

म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी महापौर मैदान माझ्या काळात झाले. त्यामुळे या कार्यक्रमात साजरा होतोय म्हणजे महापौरांचे आशीर्वाद आजच्या सत्कारमूर्ती सैनिकांच्या मागे आहेत. कदाचित आज मी सुद्धा तुमच्यासारखा सैनिक असलो असतो अशा आठवणी जाग्या करून तुम्हा सर्वाना वंदन करतो असे सांगितले. प्रारंभी गीता केरकर आणि गायक यांनी देशभक्तीपर गीते सादर केलीत. याप्रसंगी शाखाप्रमुख दीपक सावंत, उपविभागप्रमुख आनंद पाताडे, सुधाकर पेडणेकर, माजी शाखाप्रमुख तानाजी मोरे, विजय तोडणकर, बाबू ठाकूर, संघटक भरती शिंगोटे, प्रतिभा राणे आदी प्रभृती उपस्थित होत्या.

अयोध्या नगरीत प्रजासत्ताक दिन संपन्न

विरार ( पालघर ): पालघर जिल्ह्यात विरार पूर्व येते अयोध्या नगरीत सामाजिक अंतर ठेवत प्रजासत्ताक दिन संपन्न झाला.यावेळी सोसायटीचे सर्व रहिवाशी,महिला वर्ग,छोटी मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना  सर्वांनी एकमेकांमध्ये सामाजिक अंतर ठेवले होते.सर्वांनी मास्क लाऊन या सोहळ्यासाठी उपस्थिती दाखविली.सकाळी ९:०० वाजता सोसायटीचे अध्यक्ष दीपक गुरव यांच्या हस्ते भारतीय ध्वज फडकविण्यात आला.यावेळी मोठ्या उत्साहाने सर्व छोट्या मुलांनी देशभक्तीवरील गीत गायन केले.

       कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज पवार यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व,तसेच आपल्या जीवनातील संविधानाचे महत्त्व आपल्या वक्तव्यातून सर्वांसमोर मांडले. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे अंकुश सावंत,जय पवार यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना जिलेबी देऊन तोंड गोड करण्यात आले.

नवीमुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची दुर्गा फाउंडेशनची मागणी

नवी मुंबई /प्रकाश संकपाळ- कुळ कायद्याचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व नारायण नागु पाटील यांनी देशात पुकारलेल्या आंदोलनामुळे १९५७-६० या काळात कष्टकरी गरीब शेतकऱ्यांना 'कसेल त्याची जमीन' या कुळकायद्यानुसार जमिनीचा हक्क मिळवून दिला होता.नवी मुंबईतीलआगरी, कोळी,कराडी,कुणबी व आदिवासी या समाजाचे शेती व मासेमारी हेच पारंपरिक व्यवसाय होते.कुळ कायद्यानुसार मिळालेल्या हक्काच्या जमिनी १९७० च्या दशकात शासनाने सिडकोमार्फत कवडीमोलाच्या बाजारभावाने संपादीत केल्या त्यामुळे नवीमुंबईतील प्रकल्पग्रस्त भूमिहीन झाले,पर्यायाने प्रकल्पग्रस्ताचे रोजगार,व्यवसाय,उत्पन्नाचे साधन नष्ट झाले.

  शासनाने सिडकोमार्फत प्रकल्पग्रस्ताना देशोधडीला लावले असताना नवी मुंबईतून तत्कालीन खासदार दि.बा.पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली  पुकारलेल्या आंदोलनाची व या आंदोलनात शेतकऱ्यांनी दिलेल्या बलिदानाची शासनाने गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्यात विकास योजना राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला.प्रकल्पग्रस्ताना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार दि.बा. पाटील यांचे मोठे योगदान असल्यामुळे त्यांना प्रकल्पग्रस्ताचे कैवारी म्हणून संबोधले जाते.

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्ताच्या संपादित जमिनीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आलेल्या विमानतळास 'दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नाव देण्यात यावे अशी मागणी दुर्गा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा शोभाताई भोईर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दि. भाई जे. डी. पवार यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई  (प्रवीण रा. रसाळ) : खेड्यापाड्यातील गरीब, मागासवर्गीय होतकरू मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून "नूतन माध्यमिक विद्यालयाची" निर्मिती करणारे संस्थापक, सरचिटणीस, उत्तम वक्ता, अगणित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आधारवड, कर्तृत्व, नैतृत्वाचे पुरस्कर्ते, कोकणातील लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते कालुस्तेचे (ता. चिपळूण) भूमिपुत्र मा. भाई तथा जे. डी. पवार यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दि. २८ जानेवारी २०२० रोजी दुःखद निधन झाले होते तरी त्यांचा प्रथम स्मृतीदिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम गुरुवार दि. २८ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता शंकेश्वरनगर नालासोपारा येथे भाई परिवारातर्फे आयोजित करण्यात येत आहे.

  दिवंगत भाई जे. डी. पवार यांच्यामागे त्यांचा मुलगा, सून, पत्नी, नातवंड असा परिवार आहे,  तरी समाजातील सर्वच स्तरातील मान्यवरांनी बहुसंख्येने उपस्थित राहून मानवंदना द्यावी असे नम्र आव्हान कुणाल पवार यांनी केले आहे.

पाते पिलवली गावचा सुपुत्र कु.सुरज मांडवकर "सरस्वती पुरस्काराने" सन्मानित !

चिपळूण : ( दिपक कारकर )चिपळूण तालुक्यातील कुणबी शिक्षण मंडळ,चिपळूण संचलित न्यू इंग्लिश स्कूल,कळंबट या विद्यालयातर्फे एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत विद्यालायतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विदयार्थ्यास "सरस्वती पुरस्कार" या विद्यालयाच्या मानाच्या पुरस्काराने प्रतिवर्ष गौरविण्यात येते.गेली ४ वर्षे या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. विदयार्थ्यांना प्रेरणादायी असा हा उपक्रम आहे.नुकताच हा पुरस्कार सोहळा आज दि.२६ जानेवारी २०२१ भारताच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधून विद्यालयाच्या झेंडा वंदन कार्यक्रम प्रसंगी देण्यात आला.या पुरस्काराचा मानकरी ठरला तो सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी. बोर्ड परीक्षेत विद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला पाते पिलवली ( विठ्ठलवाडी ) येथील सुपुत्र कु. सुरज तुकाराम मांडवकर होय.शालेय उपक्रमात नेहमीच अग्रेसर व अभ्यासात अत्यंत हुशार असणाऱ्या सुरजने अतिशय गरीबीतून आपल्या कौटुंबिक परिस्थितीचा सामना करून हे यश मिळवलं आहे.सुरज पुढील शिक्षण कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे कनिष्ठ महाविद्यालय,मांडकी-पालवण येथे इयत्ता ११ वी. ( वाणिज्य ) शाखेतून घेत आहे.

   आजच्या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एल.बी.डांगे सर,पुरस्काराचे सौजन्य श्री सखाराम कोकमकर,विद्यालयाचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी गावचे ग्रामस्थ व विदयार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.सरस्वती पुरस्काराचा मानकरी सुरज मांडवकर यांस सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक श्री पांडे सर यांनी केले.सुरजच्या या उत्तुंग यशाबद्दल व विद्यालयाच्या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

सारडे विकास मंच तर्फे प्रजासत्ताक दिनी पुनाडे वाडी येथे कपड़े वाटप

उरण (विठ्ठल ममताबादे )-

सारडे विकास मंच तर्फे स्नेहित रोहित पाटील यांचे वाढदिवस तसेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उरण तालुक्यातील पुनाडे आदिवासी वाडीवर आदिवासी बांधवांना नवीन आणि जुने कपड्याचे वाटप करण्यात आले. सारडे विकास मंचच्या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातुन नवीन आणि जुन्या कपडयाची जनतेला हाक दीली आणि बघता बघता एक टेम्पो भरेल एवढे कपडे जमा झाले हे सर्व कपडे आदिवासी बांधवां मध्ये वाटण्यात आले.  या कार्यक्रम प्रसंगी  वशेणी गावचे माजी सरपंच प्रसाद पाटील, सह्याद्रि प्रतिष्ठानचे मावळे प्रतिश कोळी,अक्षय कोळी,  सामाजिक कार्यकर्ते विनायक  गावंड ,गोल्डन जुबलीचे अनिल घरत, नवनीत पाटील,  पुनाडे वाडीवरिल शिक्षक भोपाले सर,  सहशिक्षक,आंगन वाडी सेविका तसेच स्नेहीत चे वडील रोहित पाटील ,आई स्नेहाताई पाटील, जोशनाताई पाटील , रिया म्हात्रे, सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, उपाध्यक्ष संपेश पाटील, खजिनदार रोशन  पाटील ,सभासद मंगेश पाटील,कांतिलाल म्हात्रे, अल्पेश  जोशी, नितेश पाटील, मिलन  पाटील, अमर भोईर, धर्माजी पाटील, परशुराम पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.  वाडीवरिल जेष्ठ नागरिक आणि अनेक लहान थोर महिला भगिनी यांच्या सर्वांच्या उपस्थितीत स्नेहितचा  वाढदिवस आणि कपड़े वाटपचा कार्यक्रम मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादासह  संपन्न  झाला. कार्यक्रमा प्रसंगी उत्तम म्हात्रे यांनी सारडे विकास मंच ला दिलेल्या नोंद वह्या (डायरी) सर्व मान्यवरांना भेट स्वरुपात देण्यात आले.सर्वांना नास्ता व्यवस्था नितेश जी पाटील ( टट्या)यांच्या  कडून करण्यात आली.ज्या ज्या लोकांनी जूने नवीन कपडे दिले अश्या सर्वाचे मनपूर्वक आभार या कार्यक्रमा प्रसंगी मानण्यात आले. सदर पुनाडे येथील शाळेला रोहित पाटील यांच्याकडून भिंतिवरिल घड्याळ भेट स्वरुपात देण्यात आले.कपडे वाटपाच्या कार्यक्रमामुळे आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.एक वेगळा आनंद आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर दिसून आले.


कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न.

उरण (विठ्ठल ममताबादे )-कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग, लायन्स क्लब उरण, मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक संस्था उरण, माजी विद्यार्थी संघ उरण महाविद्यालय, टायगर ग्रुप उरण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच  एम जे एफ लायन सदानंद सखाराम गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एमजीएम ब्लड बँक कामोठे, नवी मुंबई यांच्या सहकार्याने कोकण ज्ञानपीठ  महाविद्यालय उरण येथे रक्तदान शिबिर मोठया उत्साहात संपन्न झाले.

या रक्तदान शिबिरात एकूण 102 रक्तदात्यांनी रक्तदान केले महाविद्यालयाचे प्राचार्य के.ए.शामा सर यांनी याप्रसंगी रक्तदानाचे महत्त्व सांगून कोविड-19 च्या संकटकाळात रक्ताची कमतरता असताना रक्तदान शिबिराची अत्यंत आवश्यकता असल्याचे सांगितले. व विद्यार्थ्यांनी अशा सामाजिक उपक्रमात सहभाग घेऊन लोकोपयोगी कार्य करावे असे ते म्हणाले. याप्रसंगी लायन्स क्लबचे सचिव लायन डॉ. साहेबराव ओहोळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नवीन राजपाल (सदस्य, महाविद्यालय विकास समिती),  एम जे एफ लायन सदानंद सखाराम गायकवाड, लायन डॉ. प्रीती गाडी ( झोन चेअरमन, लायन्स क्लब) लायन प्रकाश नाईक (अध्यक्ष, लायन्स क्लब उरण),  विशाल पाटेकर (अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ), आकाश पांडुरंग जोशी (अध्यक्ष, टायगर ग्रुप उरण तालुका),  विशाल घरत (टायगर ग्रुप नवीन सेवा),  हर्षल सुभाष जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम एस एस प्रमुख प्रा.डॉ.डी पी हिंगमिरे, प्रा. डॉ.ए.आर. चव्हाण महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.या रक्तदान शिबिराला यावेळी उत्तम प्रतिसाद मिळाला.

२६ जानेवारी यां प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस कर्मचारी, बस चालक-वाहक, भाजी विक्रेते व गरजू लोकांना मास्क वाटप



मुंबई : युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स कौन्सिल भारत यांच्या सौजन्याने शिवाजी मंदिर, दादर येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पाडून कोरोनाच्या काळात ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले अशा पोलीस दलातील कर्मचारी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बस चालक-वाहक, भाजी विक्रेते व गरजू लोकांना मास्क वाटप करण्यात आले . याप्रसंगी युनिव्हर्सल ह्यूमन राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.तरुण बाकोलिया सर, राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ सुमन मौर्य मॅडम,  याचा मार्गदर्शन  नुसार   कार्याध्यक्ष महाराष्ट्रप्रदेश जितेंद्र दगडू सकपाळ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुहास सावर्डेकर, महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा सौ.सुवर्णा कदम, ओमकार शिवाजीराव खानविलकर महा.राज्य संघटन मंत्री, सौ.ममता सावंत मॅडम महा.संघटन मंत्री महिला, मुंबई महासचिव अमोल वंजारे मुंबई शहराध्यक्ष सौ.स्नेहा भालेराव मॅडम तसेच श्याम भिंगारदिवे मुंबई उपाध्यक्ष, सचिन जोईजोडे दादर ब्लॉक अध्यक्ष संदीप मोहिते मुंबई उपसचिव, अँड.संतोष आंबेडकर वडाला ब्लॉक अध्यक्ष, सौ.वसुधा वाळुंज चिंचपोकळी ब्लॉक अध्यक्ष, आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. तसेच सचिन जोईजोडे यांच्या प्रयत्नाने

   महाराष्ट्रातील मानवधिकार परिषदेचे भारत येथील दुसरे जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आले त्याचे देखिल याप्रसंगी उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने सौ.सुवर्णा कदम मॅडम, ओंकार खानविलकर, अमोल वंजारे यांनी संघटनेच्या तत्वप्रणाली बद्धल मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


नवीन पत्रीपुलाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण

कल्याण - येथील जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या व कल्याण पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या नव्या पत्री पुलाचे लोकार्पण आज मा. मुख्यमंत्री ना.श्री. उद्धव ठाकरे यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पद्धतीने तसेच राज्याचे पर्यावरण, पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री ना.श्री.आदित्य ठाकरे तसेच नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

   या लोकार्पण सोहळ्यासमयी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या नेत्तृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या पत्री पुलाचे बांधकाम पुर्णत्वास नेण्याकरिता अनेक समस्या आणि अडचणींवर मात करत अहोरात्र मेहनत करणारे एमएसआरडीसी विभाग तसेच रेल्वे प्रशासन अधिकारी व कर्मचारी, पोलीस दल, कंत्राटदार आणि कामगार यांचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मन:पूर्वक आभार व्यक्त केले.

   कल्याण व डोंबिवली शहरांतर्गत वाहतुकीच्या दृष्टिने अतिशय महत्वाचा असलेला हा पूल नागरिकांकरिता खुला झाल्याने आता पूल परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

    याप्रसंगी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, खासदार कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, आमदार प्रमोद पाटील, आमदार डॉ. बालाजी किणीकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.राधेश्याम मोपलवार, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, रेल्वे प्रशासन तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

शिवभक्त संजय दत्तात्रय भालेराव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या "आपले घाटकोपर सेल्फी पॉइंट" चे उद्घाटन संपन्न

 


मुंबई(शांत्ताराम गुडेकर)   

          शिवसेना नगरसेविका सौ अर्चना ताई भालेराव यांच्या प्रयत्नाने व तसेच माजी नगरसेवक व घाटकोपर पश्चिम समन्वयक शिवभक्त संजय दत्तात्रय भालेराव यांच्या संकल्पनेतून साकारलेले आपले घाटकोपर सेल्फी पॉइंट उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला.यावेळी समन्वयक पदी नियुक्ती झाल्याबद्दल आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाँट्सअप ग्रुप तसेच ग्राहक संरक्षण कक्ष च्या वतीने संजय भालेराव यांचा सत्कार  सुनील बागवे, यशवंत खोपकर, राजु केलशीकर , सुरेश पांचालकर यांच्याहस्ते करण्यात आला.

भारतीय संविधानाची प्रास्ताविका

       
       तोडून भेदाभेद सारे 
       दिला आम्हा सन्मान 
       माणूस झालो आम्ही 
       जय हो संविधान 
       जय हो संविधान

 .९ डिसेंबर १९४६ साली संविधान सभेचे पहिले सत्र सुरू झाले. २वर्ष ११महिने १७दिवस अखंड परिश्रम करून भारतीय संविधान तयार झाले.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी  संविधान मसुद्याला  मान्यता देण्यात आली आणि २६ जानेवारी १९५०पासून संविधान अंमलात आले आणि आपला देश प्रजासत्ताक झाला. 
   भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून  समता, बंधुता, स्वातंत्र्य, लोकशाही,न्याय, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, राष्ट्रीय एकात्मता  या मूल्यांची घटनेत बीजे रोवून  संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे . मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत.
 आपल्या संविधानचा आत्मा कशात आहे असे म्हटल्यास संविधानाचा  आत्मा हा  प्रास्ताविकेत आहे  असे म्हणता येईल जसे एखाद्या मंदिराचे सौंदर्य  त्याचा कळस पाहिल्यावर आपण ठरवतो त्याचप्रमाणे beauty of indian constitution असे म्हटल्यास premble असे म्हणता येईल.
माझ्यामते आपले  प्रास्ताविक हे वेगळे  आणि वैशिष्ट्यपूर्ण असे  आहे मग प्रश्न पडतो ही घटना  कुणाची आहे तर ही आम्हा भारतीय लोकाची आहे.आम्ही म्हटल्यावर  आपलेपणा एकजूटपणा निर्माण होतो.कोणताही धर्म या प्रेषित याचे नाव न घेता व्यक्तीला सर्वोच्च स्थान देणारी ही घटना आहे.मग ही कोणत्याही देशाची आहे तर जो देश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य आहे अशा आमच्या भारत देशाची आहे. प्रास्ताविकेतून देशाची वाटचाल, ध्येयधोरणे, इच्छा आकांक्षा प्रतिबिंबीत होतात.देशातील नागरिकाला ही घटना स्वातंत्र्य, समानता , न्याय,एकता, बंधुता या मुल्याची हमी देते आहे आणि त्यानुसार घटनेत  विविध कलमाद्वारे  तरतुदी करण्यात आल्या आहेत.व्यक्तीला मुक्त व विकासाला  पोषक असे वातावरण हवे असेल तर  ही चार ही तत्व  आवश्यक आहेत.यात सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय आहे. दर्जा  व संधीची समानता आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य आहे तसेच व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता अबाधित राखणारी बंधुता अपेक्षित असून या सर्व तत्वाची पूर्तता करण्याचा निर्धार केला जात आहे. शेवटी  संविधानाचा आम्ही स्वीकार करीत असून स्वताप्रत अर्पण करीत आहोत. म्हणजेच या प्रास्तविकेची सुरुवात ही आम्ही पासून होऊन शेवट हा स्वतः पर्यंत होत आहे आणि मला वाटतं हेच आपल्या प्रास्ताविकेचे वैशिष्ट्य आहे.
.देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मान देणारे,त्याच्या मूलभूत हक्कांना अधिकारांना संरक्षण देणारे, नागरिकांच्या प्रगतीसाठी विविध कायदे करणारे आपले भारतीय संविधान चिरायु होवो हीच आपल्या सर्व भारतीयांची भूमिका असली पाहिजे.
    आमचा मान 
    आमचा सन्मान 
    संविधान, संविधान 
आमचा मान, सन्मान,शान  हे आमचे संविधान आहे.त्याच्याशी कटिबद्ध राहण्याचा आम्हा भारतवासीयांचा अखंड प्रयत्न राहिल.

- प्रा.प्रदीप महादेव कासुर्डे 
  घणसोली नवी मुंबई 
  मो.7738436449








 







  
  
     .

प्‍लॅस्टिकमुक्‍तीचा नारा

 स्‍वतंत्र भारताचा ७२वा प्रजासत्‍ताक दिन आज सर्वत्र माेठया उत्‍साहात साजरा होत आहे. प्रभात फेरी, ध्वजारोहन, वक्तृत्व व इतर क्रीडा स्पर्धांची रेलचेल, शाळा, महाविद्यालयांत पाहायला मिळेल तर आपल्या परीसरात अवतीभोवतीदेखील सर्वत्र सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची नांदी असणार आहे. मात्र प्रजासत्‍ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र प्लॅस्टिकच्या ध्वजांची दयनीय अवस्था बघितली तर आपल्या बेगडी राष्ट्रप्रेमाची किव येते. प्लास्टिक हा अविघटनशील घटक असल्यामुळे निसर्गात त्याचा निचरा होत नाही. यामुळे जमा झालेले प्लास्टिक रसायनाचे रूप धारण करते व ते मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. निसर्गदेखील त्याला पचवू शकत नसल्याने त्याचा अतिरिक्त भार पर्यावरणावर पडतो व त्याचे देखील संतुलन बिघडते. प्रजासत्‍ताक दिनाच्या दिवशी मोठ्या अभिमानाने मिरवणाऱ्या राष्ट्रध्वजाचा इतर वेळी मात्र आपण नको तितका अवमान करतो. खरेतर प्‍लॅस्टिकजन्‍य पदार्थांपासुन बनवलेल्‍या राष्ट्रध्वजावर बंदी असतानादेखील असे ध्वज सर्रास रेल्वे स्टेशन, बाजार, बस थांबे, रस्त्यारस्त्यांवर कसे उपलब्ध होतात हा प्रश्न पडतो, त्यामुळे असे राष्ट्रध्वज खरेदी न करण्याची जबाबदारी भारतीय नागरिकांचीच आहे. कापडी किंवा कागदी राष्ट्रध्वजच वापरावेत, त्यांची योग्य प्रकारे हाताळणी करावी व वापर झाल्यावर उचित मार्गाने विघटन करावे अथवा जपून ठेवावेत. प्लास्टिक राष्ट्रध्वज न वापरता राष्ट्रसन्मानाला तसेच पर्यावरण संतुलनाला हातभार लावणे हि प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. तसेच प्‍लॅस्टिकमुळे होणारे दुष्‍परिणाम पाहता आपण आपल्‍या दैनंदिन जिवनातुन  हददपार केले पाहिजे. प्‍लॅस्‍टीकबंदीचा कायदा सरकारने काढलेला असतानादेखील मोठया प्रमाणावर प्‍लॅस्‍टीक बाजारात सर्रास विकले जात आहे. कायदा अंमलबजावणीच्‍या सुरुवातीच्‍या काळात तिव्र करण्‍यात आलेली मोहिम सध्‍या थंड झाल्‍याचा हा परिणाम आहे. त्‍यामुळे प्‍लॅस्टिकच्‍या पिशव्‍या, सामान, खेळणी, वस्‍तू विकत न घेता पर्यावरणाला हातभार लावण्‍याचा संकल्‍प प्रत्‍येकाने करायला  हवा. या प्रजासत्‍ताक दिनी आपण सर्व 'प्लॅस्टिकमुक्त भारत' हि संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करू या. जय हिंद ।।


-वैभव मोहन पाटील
घणसोली,नवी मुंबई
























 

शनिवार, २३ जानेवारी, २०२१

वृत्तपत्र लेखकांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन

मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई च्या वतीने सर्व वृत्तपत्र लेखकांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यापैकी सर्वोत्कृष्ट पत्रलेखन स्पर्धा यासाठी  दि. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या दरम्यान वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेले पत्राची फोटो कॉपी (फक्त एक),सर्वोत्कृष्ट लेख स्पर्धा यासाठी  दि. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या दरम्यान वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेले लेखाची  फोटो कॉपी (फक्त एक),तर  सर्वाधिक पत्रलेखन स्पर्धंसाठी  दि. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या दरम्यान वर्तमानपत्र  अथवा मासिके/पाक्षिके यातून  झालेल्या पत्रांची यादी फुलस्केपवर लिहून (क्रमांक/विषय/वर्तमानपत्राचे नाव/ दिनांक ) अशाप्रकारे विषयाचे नाव व दिनांक न चुकवता दि. १ ते १० फेब्रुवारी २०२१ या कालावधीत रवींद्र मालुसरे-(अध्यक्ष ,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई )यांच्या ९३२३११७७०४ या  व्हाट्सअप"नंबर  वर पाठवण्यात यावी असे प्रशांत घाडीगावकर(प्रमुख कार्यवाह- मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई) )यांच्याकडून कळविण्यात आले आहे. 

लसीकरणासाठी नोंदणी महत्त्वपूर्ण ! मात्र नागरिकांनी सायबर जाळ्यात फसू नका : वपोनी शाम शिंदे -भांडुप पोलीस ठाणे यांचे आवाहन

 भांडुप-किशोर गावडे : कोरोनाच्या लसीकरणाला मुंबईत प्रारंभ झालेला आहे .पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांना  लस देण्यात येत आहे .पुढे काही दिवसानंतर ती सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येईल. त्याचे योग्य पद्धतीने वरिष्ठ पातळीवर  नियोजन सुरू आहे. मात्र लसीकरणासाठी नोंदणीही आवश्यकच आहे. नोंदणी करताना नागरिकांनी सायबर जाळ्यात अडकू नये, असे आवाहन  भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाम शिंदे यांनी केले आहे.

  गेल्या काही वर्षात सायबर गुन्हेगारांकडून अनेकांना ऑनलाइन गंडा घातला जात आहे. कर्ज  मंजूर झाल्याचे आमिष दाखवून किंवा एटीएम ब्लॉक झाल्याची  थाप मारून नागरिकांना गंडावून  त्यांचे लाखो रुपये  सायबर भामट्यांनी लंपास केले आहेत. त्यासाठी बनावट कस्टमर केअर सर्विस नंबरही तयार केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे .कोरोना लसीकरण  ही  सायबर भामट्यांसाठी लूट करण्याची संधी असू शकते .नोंदणी प्रक्रियेत ते सर्वसामान्यांना गंडा घालू शकतात.फोन किंवा मेसेज पाठवून शासकीय एजन्सीचे कर्मचारी असल्याचा बनाव रचून लवकरच   लस उपलब्ध होणार आहे, अशी थाप मारत आधार कार्ड, किंवा आपल्या बॅक खात्याचा तपशील मागून आॅनलाईन फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. बनावट पोर्टल तयार करून कोरोनाची लस होम डिलिव्हरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक होण्याची शक्यता आहे.तसेच कॅशबॅक डिस्काउंट आॅफर देऊन  फसवणूक होऊ नये, यासाठी सजगता बाळगा. सावध रहा. सतर्क रहा. गोड आवाजात बिलकुल  फसू नका. काळजी घ्या. असे आवाहन भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाम शिंदे यांनी केले आहे.

महिला उत्कर्ष समिति कडून तिळगुळ वाटप



ठाणे : पत्रकार उत्कर्ष समिति महाराष्ट्र अंतर्गत स्थपित महिला उत्कर्ष समिति च्या प्रदेश कार्याध्यक्ष श्रुती उरणकर यांच्या नेतृत्त्वाखाली नागालँड मधून आलेल्या  पूर्वांचल विकास प्रकल्प अंतर्गत आश्रमातील मुलांना तिळगुळ, फळे, खाऊ,  लाडू, यासह सेनेटायजर ,  सुनीता मिश्रा यांनी स्वतः तयार केलेल्या मास्क चे वाटप करण्यात आले. यावेळी श्रुती उरणकर,तन्मयी उरणकर,सविता ठाकूर,प्रीती ठाकूर, प्रतीक्षा पवार,आश्विनी मुजुमदार,आरती राव,फातिमा अक्षय चौधरी उपस्थीत होते.

सिने-नाट्य कलावंतांच्या उपस्थितीत रंगणार आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण आणि विशेष गौरव प्रदान सोहळा .. !

मुंबई-परळ ( गुरुनाथ तिरपणकर) आर्यारवी एंटरटेनमेंटच्या पहिल्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेच्या अभूतपूर्व यशानंतर निर्माते महेश्वर भिक...