आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

सरत्या वर्षाला निरोप देताना सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी बजावले रक्तदानाचे कर्तव्य

मुंबई - जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते,शिक्षक,वृत्तपत्रलेखक,पत्रकार व जॉय ऑफ गिविंग चे संस्थापक गणेश हिरवे सर यांनी आज २०२० या वर्षच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर २०२० ला ३१ साव्या वेळी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपत थर्टीफर्स्ट एका वेगळ्या  पद्धतीने साजरा कसा करता येईल याचे उत्तम उदाहरण दाखवून दिले. आजकाल थर्टीफस्ट लोक अनेक प्रकारे साजरा करीत असतात,पण हा दिवस एका वेगळ्या कारणाने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करून साजरा करण्याचं भाग्य मला मिळाले अशी भावना हिरवे सरांनी बोलून दाखविली.याआधी देखील अनेक सामाजिक उपक्रम व कामे स्वतः सरांनी अग्रेसर राहून पदरमोड करत तसेच आपल्या जॉय संस्थेच्या माध्यमातून केली आहेत.एक गुणी व्यक्तिमत्त्व म्हणून सरांना सर्वजण मुंबई व महाराष्ट्रात ओळखतात. लॉकडाउन काळातही हजारो गरजू, गोर-गरीब व वंचित कुटुंबीयांना किराणा सामान,आरोग्य व स्वच्छता किट,मास्क,अल्पोपहार,सॅनिटायझर व इतर अनेक जीवनावश्यक वस्तू वितरण केल्या,व त्यांच्या या कामाची दखल दिल्ली व महाराष्ट्रतील अनेक सामाजिक संस्थानी घेऊन त्यांना जवळपास ६३ कोविड योध्दा सन्मानपत्र देऊन गौरव केला. सर अनेक संस्था व मंडळांवर सल्लागार व मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. यापुढेही आपण करीत असलेलं हे सामाजिक काम असच सुरू राहणार असल्याचे मनोगत गणेश हिरवे यांनी यानिमित्ताने व्यक्त केले.

प्रयत्न फाऊंडेशन मार्फत कोरोना योध्यांचा सन्मान ; सामाजिक उपक्रमातून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस साजरा




मुलुंड:
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त मुलुंडमध्ये प्रयत्न फाऊंडेशन यांच्या वतीने कोरोना काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता नागरिकांची सेवा करणाऱ्या व आपले कर्तव्य निभावणाऱ्या  कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. मुलुंड वाहतुक पोलिस चौकी व मुलुंड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी व अधिकारी, महानगर पालिका सफाई कामगार, दुर्बल घटकातील कुटुंंब तसेच आशा स्वयंसेविकांना यावेळी "कोरोना योद्धा" पुरस्काराने गौरविण्यात आले. 

   कोरोना काळात कोरोना रुग्णांपर्यंत पोहचून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या तसेच अशा  प्रकारे जोखमीचे कार्य करताना,  समाजाच्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहचणाऱ्या  आशा स्वयंसेविकांना प्रयत्न फाऊंडेशनतर्फे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी या स्वयंसेविकांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पोलिस कर्मचारी व अधिकारी, महानगर पालिका सफाई कामगार, दुर्बल घटकातील कुटुंंब, इत्यादींना प्रयत्न फाऊंडेशनतर्फे स्टीमरचे वाटप करण्यात आले तसेच पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. 

   शुक्रवार दि २५ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न फाऊंडेशनचे संस्थापक अमित रणखांबे, अध्यक्ष रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली  आकाश साबळे, राजेश कलेटी, विश्वनाथ साबळे, प्रशांत धेडे, निलेश जानराव, अजिंक्य झेंडे, कुद्ंन थोरात, नितीन लोहकरे, राहुल यादव, मयुर सावंत, रवी माळी, सुशांत वाघमारे, सिधेश लोखंडे, पंकज काटे, राजु थोरात, उमेश घोसाले, अदित मन्डळ व इतर सभासदांनी मेहनत घेतली


किंगस्टार स्पोर्ट्स अकॅडमीे आयोजीत दिएगो मेरोडना फुटबॉल चॅम्पियन चषक २०२० संपन्न...!

 

मुंबई :अहमदाबाद किंगस्टार स्पोर्ट्स ग्राऊंड अहमदाबाद येथे नुकतेच 7A साईड फुटबॉल लीग आयोजित करण्यात आली होती. १५ ते १७ वयोगटातील या टुर्नामेंट मध्ये अहमदाबाद, सुरत, राजकोट आणि वडोदरा येथून जवळजवळ १२ संघांनी सहभाग दर्शवला.

    यामध्ये मुंबईची फूटी फर्स्ट टीम आणि कॉसमॉसच्या फुटबॉल संघात अंतिम सामना झाला. संपुर्ण स्पर्धेत फूटी फर्स्टच्या संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले. आणि गोल करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण कॉसमॉस संघाचा गोलरक्षक मानस याने तो गोल रोखला आणि संघाला पराभवापासून वाचवून पेनल्टी शूटआऊटसाठी नेले आणि कॉसमॉस संघाने पेनल्टी शूटमध्ये फूटी फर्स्ट संघाचा पराभव केला. प्रशिक्षक तुषार सर आणि चौहान सर यांनी आपल्या संघाला चांगले प्रशिक्षण दिले जेणेकरुन फूटी फर्स्ट संघाने अंतिम फेरी गाठली. कॉसमॉस टीम अहमदाबादचे प्रशिक्षक मयूर आणि गोल्डी सायनी यांनी आपल्या संघाला अंतिम फेरीत आणण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि कॉसमॉस संघ अंतिम विजेता ठरला. या महत्त्वपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट गोलकीपर मानस, उत्कृष्ट खेळाडू ब्रिज शहा आणि संपुर्ण संघातील उत्कृष्ट खेळाडू म्हणुन क्रिश चौहान यांना गौरविण्यात आले. क्रिश संपूर्ण स्पर्धेत एक अतिशय लोकप्रिय खेळाडू असल्याचे सिद्ध झाले. उपस्थित मान्यवरांनी त्याचे खुप कौतुक केले आणि तो पुढे जाऊन भारतीय संघाकडून खेळू शकेल, अशी ग्वाही दिली. किंग स्टार स्पोर्ट्स अकॅडमीचे हितेंद्र वाघेला म्हणाले की आम्ही जगद्विख्यात फुटबॉलपटू दिएगो मेरोडनाच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आयोजीत केली. त्यामुळे आम्हाला त्यांना श्रद्धांजली वाहण्याची संधी मिळाली आणि त्यासाठी आम्हाला मुंबईतील फूटी फर्स्ट टीमचे प्रशिक्षक चौहान सर आणि टूर्नामेंटच्या सर्व सदस्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

....तर नववर्षाचा आनंद द्विगुणित होईल!

३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत दारू पिऊन करण्याकडे युवा वर्गाचा कल असतो. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पब किंवा क्लब मध्ये जाऊन पार्टी करणे, दारू पिऊन, गाडी चालवणे, हुल्लडबाजी करणे, सायलंसरच्या पुंगळ्या काढून आवाज करणे, मोठ्या आवाजाचे फटाके उडवणे, डीजेच्या किंवा लाऊडस्पीकरच्या तालावर नाचणे यासारख्या गोष्टी केल्या जातात. यावर्षी कोरोनामुळे शासनाने यावर बंदी आणली असली तरी काही महाभाग लपून छपून का होईना या गोष्टी करणारच आहेत. नववर्षाचे अशा प्रकारे स्वागत करणे म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा भंग करणे. दारू पिऊन  नवीन वर्षाचे स्वागत करण्याची फॅशन आहे. दारू पिऊन गाडी चालवताना बऱ्याचदा अपघात होतो त्यात काही जण मृत्यू पावतात तर काही जण जखमी होतात, काही तर कायमचे जायबंदी होतात. दारू पिऊन गाडी चालवल्याने झालेल्या अपघातात घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब रस्त्यावर येते. दारू पिऊन गाडी चालवणे म्हणजे स्वतःसह दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणे. म्हणूनच नववर्षाचे स्वागत करताना स्वतःसोबत  इतरांना त्रास होणार नाही याचे भान सर्वानी ठेवावे. सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना बंधनाची ऐसीतैशी होणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. नववर्षाचे स्वागत म्हणजे चांगल्या-वाईट गोष्टी दूर सारून नववर्षाच्या सूर्योदयाच्या साक्षीने नवसंकल्पाचा अवलंब करणे, त्याचे निश्चित धोरण ठरवणे, सत्याची कास धरणे आणि नव्या जोमाने, नव्या उत्साहाने कामाला लागणे. यामुळे नव्या वर्षाचे स्वागत करताना पाश्चत्यांचे अंधानुकरण बंद करुन प्रत्येकाने चांगले काम करण्याचा संकल्प केला पाहिजे. आज जगाचा पोशिंदा संकटात आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाने बळीराजा आत्महत्या करीत आहे. देशाचे रक्षणकर्ते जवान दहशतवाद्यांच्या, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद होत आहे. २०२० या वर्षात कोरोनाच्या  महामारीने अनेकांचा रोजगार गेला. हजारो कुटुंबाने स्थलांतर केले. काहींच्या घरात कोरोनाने शिरकाव केला. काहींच्या घरातील कर्ता पुरुष कोरोनाने  हिरावून नेला. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. ऑनलाइन अभ्यासाची साधने नसल्याने हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे. दारूच्या नशेत नववर्षाचे स्वागत करण्यापेक्षा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले तसेच शहिदांच्या मुलांना मदत करुन आपण नववर्ष साजरे करू शकतो. कोरोनाने रोजगार  हिरावलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत करुन, दिव्यांग-अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन, गोरगरीब मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल, टॅब, संगणक पुरवून आपण नवीन वर्ष साजरे करू शकतो. सध्या राज्यात रक्ताचा अभूतपूर्व तुटवडा जाणवत आहे नवीन वर्षाची सुरवात जर रक्तदानाने केली तर एखादया रुग्णाचा प्राण वाचवल्याचे समाधान आपल्याला मिळू शकते. नवीन वर्षात अवयव दानाचाही संकल्प आपण करू शकतो. गोरगरीब आणि  गरजवंताना त्यांच्या गरजेच्या वेळी त्यांना हवी ती मदत केल्यास, त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आपण निर्माण करू शकतो. छोटे छोटे संकल्प आपल्याला भविष्यात मोठा फायदा करुन देणारे ठरू शकतात, त्यामुळे स्वतःचे आणि आपल्या प्रियजनांचे जीवन अधिक समृद्ध व अर्थपूर्ण होऊ शकते. 

"जुने जाऊ दया मरणालागूनी,
जाळुनी किंवा पुरुन टाका...."

या कवितेच्या ओळीप्रमाणे मागील वर्षाच्या सर्व चांगल्या-वाईट भावना पुसून नव्या वर्षाचे स्वागत करायला हवे. सामाजिक बांधीलकीचे ऋण सेवेतून व्यक्त करण्याचा तसेच अपप्रवृत्तींना आळा घालण्याचा संकल्प करीत नववर्षाचे स्वागत केले तर, नववर्षाचा आनंद द्विगुणित होईल. 

-श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे

वाढदिवस अभिष्टचिंतन

श्री संतोष घाणेकर ( संस्थापक/अध्यक्ष - श्री.पाणबुडी देवी कलामंच )

गुहागर तालुक्यातील मु.पो.पाचेरी सडा,( ता.गुहागर,जि.रत्नागिरी ) या गावातील कलाप्रेमी श्री.संतोष घाणेकर यांची जन्मभूमी....आपलं कौटुंबिक जीवन जगताना वयाच्या २० व्या वर्षापासून मुंबईत नोकरीस्थित झाल्यावर....नमन/शक्ती-तुरा/नाटक.... या कोकणातील कला पाहणे....मग एक मनात कठोर निश्चय करून...आपण या कलेचं स्वता नियोजन कराव...अनेक कलाकार यांना मुंबई रंगभूमीवर व्यासपीठ द्याव या एकमेव उद्देशाने श्री.पाणबुडी देवी कलामंच अस आपल्या ग्रामदेवता पाणबुडी आईचं मंडळाला शीर्षक देऊन एक लहानसा समूह तयार केला... अनेक मित्र सहकारी यांना सोबतीला घेऊन मुंबईत नाट्यलेखक यशवंत माणके यांचे नाटक सन २०१३ ला साहित्य संघात हाऊसफुल्ल केलं....मग त्यानंतर... कोतलुक-गुहागरचे रमेश भेकरे.... चिपळूणचे दिपक कारकर आणि रमेश कोकमकर अशी आयोजनात आवड असणारी मित्र मंडळी या समूहाला मिळाली व अनेक वेगवेगळ्या तालुक्यातील सहकारी एकत्र येऊन आज या मंडळाने या आयोजन क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे.आजवर अनेक नमन प्रयोग हाऊसफुल्ल शक्ती-तुरा / नाटक /नमन यांचे नियोजनबद्ध कार्यक्रम मुंबईत रंगभूमीवर हे मंडळ करत आहे! अनेक युवा कलाकार आज या मंडळामुळे कमी कालावधीत नावारूपाला आले....शिवाय जगप्रसिद्ध खेळ अर्थात क्रिकेट या स्पर्धेचे देखील वर्षभरात खुपच नियोजन मंडळ करते.... कौतुकास्पद म्हणजे मागील वर्षात सन २०१९ रोजी श्री.पाणबुडी चषक - २०१९ हि भव्य -दिव्य यू ट्यूब लाईव्ह प्रदर्शन असणारी स्पर्धा विरार येथे पार पडली...या स्पर्धेचे कौतुक वसई-विरार महानगर पालिका नगरसेवक/नगरसेविका यांनी केलं. मुंबई प्रीमियर लीग या क्रिकेट जगातील अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत खेळले शिवाय कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा / या कोविड - १९ च्या दिवसातील भव्य-दिव्य ऑनलाईन निबंध लेखन स्पर्धा असे उपक्रम आज मंडळ करते.... मंडळ अध्यक्ष - संतोष घाणेकर यांनी सर्वांना एकत्रित करून निर्मान केलेल्या या मंडळाचे नाव आज ४~५ वर्षात लोकप्रिय आहे......या मोसमात देखील सलग तीन नमन प्रयोग हाऊसफुल्ल केले.अशी एकापेक्षा एक भन्नाट आयोजन करून प्रत्येक सभासदांजवळ मायेने वागणारे हे दिलदार व्यक्तिमत्व आज .... प्रत्येकाच्या हृदयात दडले आहे...! 


   अशा एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा❣️


✒️ कु : दिपक धोंडू कारकर ( खजिनदार : श्री पाणबुडी देवी कलामंच )

वाढदिवस अभिष्टचिंतन!!

बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

पेणच्या बालिका अत्याचार प्रकरणी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार-पालकमंत्री कु.आदिती तटकरे : पीडित बालिकेच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजनेमधून तात्काळ मदत करण्याचे प्रांताधिकार्‍यांना दिले आदेश

 


पेण : येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आराेपीविरोधातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार असल्याची माहिती पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी पेण येथे दिली. 

     आज दुपारी त्यांनी पेण येथे पीडित बालिकेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला, त्यावेळी त्या बाेलत हाेत्या. यावेळी पोलीस महानिरीक्षक संजय माेहिते, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव उपस्थित हाेते.

धक्कादायक !!! एका अडीच वर्षांच्या चिमुरडीची बलात्कार करुन हत्या ! महाभयंकर कृत्यानंतर पेणमध्ये संतापाची लाट : नराधमाला अटक, जामीनावर बाहेर असताना केले कृत्य


पेण (देवा पेरवी/प्रदीप मोकल) :

     शहरातील मोतीराम तलावाशेजारील मळेघर वाडी येथील 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याच्या घटनेनंतर पेणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या नराधमास पेण पोलिसांनी अटक केली असून, त्याने याआधीही बलात्कार व अपहरण अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत. जामीनावर बाहेर असताना हे संतापजनक कृत्य केले.आदेश मधुकर पाटील (वय 34) असे त्या नराधमाचे नाव आहे.
 
नराधम आदेश पाटील 

या घटनेची माहिती कळताच रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे व अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी घटनास्थळी भेट दिली व या नराधमाच्या मुसक्या आवळल्या.
 
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, पेण शहरातील मोतीराम तलाव मार्गावरील पेण प्रायव्हेट हायस्कूल शाळेनजीक असलेल्या मळेघरवाडी या आदिवासी वाडीत पीडित चिमुरडी व तिचे कुटुंबीय राहत आहे. मंगळवारी (29 डिसेंबर) रात्री 11.30 वाजण्याच्या दरम्यान आदेश पाटील हा ती चिमुरडी राहत असलेल्या झोपडीजवळ गेला.
 
या आदिवासी कुटुंबियांच्या झोपडीला दार नसल्याचा फायदा घेऊन त्याने घरात झोपलेल्या 3 वर्षीय चिमुरडीला उचलून नेले. त्यानंतर सुमारे 200 ते 250 मीटर अंतरावर नेऊन चिमुरडीवर पाशवी बलात्कार केला व तिचा खून केला. यानंतर सदर मुलीचे प्रेत या नराधमाने आदिवासी वाडीतच आणून टाकले.
 
   पेण पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल झाल्याबरोबर लागलीच पेण पोलिसांनी एका तासाच्या आत आदेश पाटील याला जेरबंद केले, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली.
 
   या नराधमाला पकडण्याकरिता व अधिक पुरावे जमा करण्याकरिता अलिबाग येथील श्वान पथकाची मदत घेण्यात आली. आदेश पाटील याच्याविरोधात पोलिसांनी अपहरण, बलात्कार, अ‍ॅट्रॉसिटी, पोस्को आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, बलात्कार व खून करणार्‍या नराधमावर फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालविण्याची मागणी सामाजिक नेत्या वैशाली पाटील, आदिवासी समाजाचे नेते व समस्त पेणकरांनी केली आहे.
 
   दरम्यान, याप्रकरणी नराधमाला कडक शासन होण्याकरिता पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी विशेष पथक नियुक्त केले आहे. या पथकामध्ये पेणच्या पोलीस उपाधीक्षक विद्या चव्हाण, पेणचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव, वडखळचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, दादर सागरी पोलीस स्थानकाचे उपपोलीस निरीक्षक आव्हाड, उपनिरीक्षक पोमन, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक महेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


सीसीटीव्ही लावण्याचे पेणकरांना आवाहन...
शाळा-कॉलेज, सोसायटी, व्यापारी, बंगले, कार्यालये, घर, हॉटेल, बँका, संस्था आदी ठिकाणी नागरिकांनी सीसीटीव्ही लावावे. तसेच नगरपरिषदेने गर्दीच्या ठिकाणी व शहरात येण्याच्या मार्गांवर त्याचप्रमाणे उद्याने या ठिकाणी सीसीटीव्ही लावावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी केले आहे.



वीर गावचे सुपुत्र महेश दुर्गोळी यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन

 

मुंबई(शांत्ताराम गुडेकर) 

      चिपळूण तालुक्यातील अंतिम टोकाच्या "वीर" या खेडेगावात जन्मलेले महेश रत्नाकर दुर्गोळी यांची आज प्राणज्योत मावळली.आपल्या कौटुंबिक परिस्थितीचा संघर्ष करत उच्च शिक्षण घेऊन अगदी शिक्षक ते सामाजिक कार्यात अग्रनिय असणाऱ्या महेश यांना आज बुधवार दि.३० डिसेंबर २०२० पहाटे ०६:०० वा. सुमारास ह्रदय विकाराचा आलेला झटका आणि त्यांचा घडून आलेला क्षणीच मृत्यू या बातमीने पंचक्रोशी सुन्न झाली आहे.

               डॉ.तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय ( मांडकी -पालवण ) येथे  सहाय्यक प्राध्यापक महेश दुर्गोळी (वय- ३४ ) कार्यरत होते.एक अत्यंत हुशार,प्रेमळ स्वाभाविक शिक्षक तितकंच गावचा विकास आणि सामाजिक योगदात सक्रिय असणाऱ्या महेश यांनी दिलेलं योगदान अविस्मरणीय आहे. एक शिक्षक म्हणून कार्यरत असताना अगदी वीर-देवपाट गावची ग्रामपंचायत उपसरपंच पदी कार्यभार सांभाळला, कुणबी विकास मंडळ,वहाळ विभाग ( ग्रामीण ) चे सचिव, वीर ग्रामस्थ मंडळाचे सदस्य अशा अनेक पदावर प्रामाणिकपणे काम करून युवकांच्या ह्रदयात वसलेलं हे व्यक्तिमत्त्व अचानक सोडून गेल्याने समाजाची खूप मोठी हानी झाली आहे.

              पंचक्रोशीतील एक मन मिळावू व्यक्तिमत्त्व,विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन करणारे युवकांचे आशास्थान /मार्गदर्शक शिक्षक महेश दुर्गोळी यांच्या आठवणी आज वीर गाव किंवा वहाळ पंचक्रोशीतील प्रत्येकाच्या ह्रदयी आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे.त्यांना कुणबी विकास मंडळ,वहाळ विभाग ( ग्रामीण - मुंबई ) / वीर ग्रामस्थ मंडळ या सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


[[एक प्रेमळ शिक्षक कर्मचारी,वीर गावचे माजी उपसरपंच ते कुणबी विकास मंडळ,वहाळ विभाग ( ग्रामीण ) सचिव अशी अनेक पद भूषवणारे सर्वसामान्यांचे नेतृत्व हरपलं- दिपक कारकर, पत्रकार ]]

" नववर्ष धुंदीत नव्हे,तर शुध्दीत साजरे करा कोरोना ला प्रतिबंध करण्या साठी कटीबध्द व्हा " नशाबंदी मंडळाच्या वतीने प्राण्यांचा मानवाला व्यसनमुक्तीचा संदेश



मुबई(शांत्ताराम गुडेकर)

              समाजामध्ये वाढत चाललेली व्यसनाधिनता खूपच भयानक रुप धारण करित असल्याचे दिसुन येत आहे. यामध्ये प्रामुख्याने युवकांचे प्रमाण खूपच आहे. उद्याच्या पिढीला आरोग्यसंपन्न सदृढ व व्यसनमुक्त ठेवून शक्तीशाली राष्ट्र घडविण्याचे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. नविन वर्षाची सुरुवात आपल्या संस्कृतीनुसार आपण आनंदाने, उत्साहाने आणि नविन वर्षाचा संकल्प ठेवून करित असतो. परंतु ३१ डिसेंबर यादिवशी अनेक तरुण स्वतःच्या सुंदर आरोग्यमय जिवानाला काळीमा फासतात. इतकेच नव्हे तर वर्षाच्या अखेरचा दिवस व्यसनामुळे अनेकांच्या अनमोल जिवनाचाही अखेरचा ठरतो. क्षण मजा आणि आयुष्य ची दुर्दशा...!

              ३१ डिसेंबर यादिवशी अनेकजण व्यसन करणारे व पहिल्यांदाच व्यसन चाखणारे असतात म्हणुन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य च्या वतीने बुधवार, ३० डिसेंबर २०२० दुपारी ०३.३० वाजता १३८ बेस्ट बस स्टाँप बाहेर, कँपिटल सिनेमा समोर, सिएसएमटी स्टेशन बाहेर, सिएसएमटी, मुंबई येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नववर्ष धुंदित नव्हे तर शुध्दित साजरे करा असे प्रेमाचे नम्र आवाहन महाराष्ट्राच्या जनतेला प्राण्यांच्या माध्यमातून करण्यात आले. पृथ्वीतालावरील कोणताही प्राणी दारु पित नाही, तंबाखू खात नाही, चरस, गांजा यांचे सेवन करित नाहीत. र्निबुध्दी असलेले हे प्राणी त्यांच्या आरोग्यास तसेच त्यांच्या जमातीस अपायकारक असलेले व्यसनांच्या सेवनापासुन दुर असतात. परंतु मनुष्य प्राणी हा जगातील सर्वात बुध्दिमान असुनही तो र्निबुध्दी असल्यासारखा व्यसनांना जवळ करुन आपले व आपल्या समस्त मानव जातीचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी प्रयत्नशिल आहे. याच मानवावर निसर्गातील प्राण्यांची ही जबाबदारी आहे. कार्यक्रमावेळी बलुन रुपी प्राण्यांनी आम्ही कोणतेही व्यसन करित नाहीत, तुम्ही तर माणसं आहात असा उपस्थितांना संदेश दिला. यावेळी व्यसनमुक्तीची पोस्टर्स प्रदर्शनी, स्टँण्डीज हे जनतेचे लक्ष वेधुन माहिती देत होते. सेल्फी काँर्नर मध्ये उपस्थित तरुणाईने तर सेल्फी काढुन मित्र, मैत्रीणींना पाठविण्यात सहभाग घेतला. 

             २०२१ मध्ये मी व्यसनमुक्त राहीन अशा सह्यांच्या संकल्पाला लोक उस्फुर्त प्रतिसाद देत होते.एकीकडे चंगळवादी, भोगवादी संस्कृती वाढत असताना मुंबईकरांचा या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद महाराष्ट्राला नशामुक्तीकडे नेण्याचे पाऊल आहे असे मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास  यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुंबईकरांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. 

मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ईशान्य मुंबई जिल्हा सचिव केतन भोज यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन नॉलेजटेस्टचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न


मुंबई,(प्रतिनिधी) :
 राष्ट्रीय नेते पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ईशान्य मुंबई जिल्हा सचिव केतन भोज यांनी आयोजित केलेल्या नॉलेटेस्ट २०२० स्पर्धेमध्ये उत्तीर्ण झालेले कृतिका देवधरे, निकिता चव्हाण,रोशन तेलंग,अंकिता माने,रोशन बंडी,तुषार रणपिसे,भाविका जाधव,सुजय अहिरे,सायली चिले,ओंकार अनारसे,रविना निकम,रिया मोरे,राज पोल,निखिल खिलारी,मानसी मोरे यांचा मायक्रोलिंक कॉम्प्युटर सेंटर येथे सचिव केतन भोज यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी मायक्रोलिंक कॉम्प्युटरचे सचिन मनवळ सर व पँथर राजाभाऊ गांधले सामजिक संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष शरद गांधले उपस्थित होते.

ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक सुधीर कनगुटकर 'कोविड योद्धा' पुरस्काराने सन्मानित!

मुंबई : सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून  कोरोना विषाणूच्या महाभयंकर प्रादुर्भाव काळात समाजसेवेचे कर्तव्य पार पाडले. अशा विविध क्षेत्रातील समाजसेवकांनी केलेल्या उल्लेखनीय  समाजसेवेबद्दल सावली फाऊंडेशनच्यावतीने कोविड योद्धा सन्मानपत्र प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील दिवा येथील ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक सुधीर कनगुटकर यांनी कोरोना काळात केलेल्या समाजसेवेची दखल सावली फाउंडेशनचे अध्यक्ष संजय गंगाराम साळगावकर यांनी घेतली. मुंबई (कुर्ला) येथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक सुधीर कनगुटकर यांना मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ. प्रविणाताई मनिष मोरजकर यांच्या हस्ते 'कोव्हीड योद्धा' सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उद्योजक व शिवसैनिक आदरणीय मनिषजी मोरजकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन उपस्थितांना लाभले. सावली फाउंडेशनचे अध्यक्ष संजय गंगाराम साळगावकर यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले. सावली फाउंडेशनचे उपाध्यक्ष संतोष गोठणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. मुंबई व ठाणे येथील समाजसेवक, आरोग्य सेवक, पत्रकार आदि मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.


सुखाची लाट... दावी आनंदाची वाट

      जग किती सुंदर आहे हे पाहण्यासाठी चांगला दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. दुःखाचा समुद्र जरी सगळीकडे पसरलेला असला तरीही त्यावर सुखाचा वर्षाव सुद्धा कधी न कधी पडतच असतो. असेच काहिसे आपल्या मानव जीवनाचे सुद्धा आहे.२०२० हे वर्ष याचे उत्तम उदाहरण आहे. या वर्षी अनेक दुःख , संकट , समस्या अगदी एका वादळाप्रमाणे माणसाच्या समोर आल्या . कोरोना महामारी , अतिवृष्टी , वादळ , स्फोट अश्या अनेक घटनांमुळे फक्त मानवच नव्हे तर सबंध निसर्गसुद्धा घाबरला होता. कोरोना महामारी मुळे तर सगळे जग बंदिवान झाले होते. प्रत्येकाच्या मनात फक्त आणि फक्त भीती होती. परंतु या अश्या संकटसमयी सुद्धा अनेक प्रसन्नदायी बाबी सुद्धा जगात घडल्यात. ज्याने सर्वांना एक दिलासा मिळतो. या वर्षी घडलेल्या सकारत्मक घटनांची माहिती देतांना मला आनंद होत आहे , चला तर पाहूया २०२० मधील घडलेल्या सकारत्मक गोष्टी. 

प्रदूषणाने पत्करली शांतता :

    कोरोना महामारीमुळे लोकडाउन च्या काळात जेव्हा सारे जग बंदिवान झाले होते तेव्हा प्रदूषणाने शांत राहणे पत्करले. विनोद बाजुला ठेवला तर सांगण्यास आनंद होतोय की , आता प्रदूषणात तीव्र घट झाली आहे. आणि ही बाब सर्वांसाठी दिलासादायक आहे. 

निसर्गाची खुशाली :

    नाही,  त्या व्हॉट्सअप फॉरवर्ड बद्दल बोलत नाही! मी  वस्तुस्थितीवर बोलत आहे , मनुष्य बंद घराच्या आत असताना लॉकडाउननंतर भूतलावर शांतता निर्माण झाली . संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमानं 2020 ला निसर्ग आणि जैवविविधतेसाठी उत्कृष्ट वर्ष असल्याचा दावा केला आहे. कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनात 17 टक्क्यांनी घट झाली.काळाच्या सुरुवातीपासूनच मानवांवर प्राबल्य आहे. आम्ही दूर असताना वन्यजीवनाही आपल्या ‘मदर अर्थ’ ची देखभाल करायला मिळाली. डॉल्फिन्स, ऑलिव्ह रिडले टर्टल, डियर्स आणि नीलगॉईस आपला वेळ एन्जॉय करताना रस्त्यावर दिसले.

सुधारित मानसिक आरोग्य जागरूकता आणि समर्थन :

       (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला लोकांच्या मानसिक आरोग्यास त्रास देतो. चिंता आणि नैराश्य अनुभवणार्‍या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. अशा कठीण प्रसंगी, ‘द गुडविल ट्राइब’ नावाच्या संस्थेने चिंताग्रस्त लोकांशी ईमेल लिहिण्याचा प्रयत्न केला. संस्थेचे 186 स्वयंसेवक आहेत.त्याचप्रमाणे ‘टेरिबली टिनी टॅल्स’ हा ‘नोट्स ऑफ होप’ नावाचा उपक्रम पुढे आला. ते दररोज सकाळी ग्राहकांना आश्वासन ईमेल पाठवतात आणि त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करण्यास सुलभ करतात.

कोस्टा रिकामध्ये समलैंगिक विवाह कायदेशीर :

     प्रेम हे प्रेम असतं ! एलजीबीटीक्यू समुदाय बर्‍याच काळापासून समान हक्कांसाठी संघर्ष करीत आहे. आपण आनंदाने म्हणू शकतो की समाज स्वीकृती आणि सुधारण्याच्या मार्गावर आहे.2020 मध्ये, डारिट्झा अर्गुएडस आणि अलेक्झांड्रा कॅस्टिलो नावाच्या दोन स्त्रिया कॉस्ट-रिकामधील पहिले समलिंगी जोडी बनले. कॉन्ट्रीचे अध्यक्ष कार्लोस अल्वाराडो यांनी “प्रेमात अस्तित्त्वात असलेल्या कायदा तुम्ही सुरु केला आहे” असे म्हणत या जोडप्याचे स्वागत केले.

चित्याचे प्रथम शावक आयव्हीएफमार्फत जन्माला आले :

     जगातील काही देश अजूनही मानवांसाठी आयव्हीएफ प्रक्रियेच्या अटीशी बोलण्यासाठी संघर्ष करीत आहेत. अशा वेळी, कोलंबस प्राणीसंग्रहालय आणि मत्स्यालयातील सरोगेट आईने आयव्हीएफमार्फत दोन बाळ चित्ता शाकांचा जन्म झाला. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरने जाहीर केले की ही प्रजाती नामशेष होण्याची शक्यता आहे, त्यातील फक्त 7500 शिल्लक आहेत. लुप्तप्राय जातींना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी हा उपक्रम आशेचा नवीन किरण असू शकतो.

       या अश्या आनंददायक व सकारात्मक घडलेल्या गोष्टींमुळे सर्वांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आणल्या शिवाय राहणार नाही. या गोष्टींमुळे असे समोर येते की , दुःखाच्या प्रवासानंतर सुखाची भ्रमंती येतच असते. त्यामुळे हताश होऊन बसण्यात काहीही अर्थ नाही. 

     येणाऱ्या नूतन वर्षाच्या आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा .

- दिव्या प्रमोद पाटील -( घणसोली , नवी मुंबई )

वाय. एम.प्रोडक्शन प्रस्तुत नाट्यलेखक यशवंत माणके निर्मित मराठी लघुचित्रपट प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन

मुंबई :(दिपक कारकर/शांताराम गुडेकर ) 

           गुहागर तालुक्यातील मु.पो.पेवे ( खरेकोंड ) गावचे भूमिपुत्र यशवंत रामचंद्र माणके होय. नाट्यलेखन, सिनेमा कथा पटकथा, लघुपट ( शॉर्टफिल्म ),मालिका लेखन, मालिका अभिनय, नाट्य दिग्दर्शन,नाट्य अभिनय या सगळ्यातून रंगभूमीवर रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या या कोकण सुपुत्राने स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

     एक पाऊल रुपेरी पडद्याकडे

            नाट्यलेखक यशवंत माणके यांनी छोटा पडदा आणि आता रुपेरी पडद्याकडे वाटचाल सुरू केली आहे.रंगभूमीवर तिहेरी भूमिका साकारल्या नंतर फिल्मी दुनिया   या क्षेत्राचा अनुभव घेण्याकरिता "बाळू मामाच्या नावानं चांगभलं"/स्वराज्य जननी जिजामाता या मालिका द्वारे एका छोट्याशा भूमिकेने पहिलं पाऊल टाकत त्यांच्या त्या भूमिका अनेकांनाच भावल्या.सोनी मराठी वाहिनीवर पदार्पण करण्याची मला मिळालेली संधी म्हणजे माझ्यासाठी वेगळा अनुभव देणारी ठरली असे नाट्यलेखक माणके म्हणाले.मालिका चित्रपटात काम करून माझ्यासाठी सर्वस्व रसिक माय-बापांची सेवा सातत्याने करत राहीन असा माझा ठाम विश्वास आहे.मी नुकतंच माझ्या जन्मभूमीत तीन मराठी लघुचित्रपट निर्मिती केली आहे.मला मालिका आणि चित्रपट करण्याची इच्छा असली तरी रंगभूमी ही माझी पहिली निवड असेल.तिची सेवा मी कायम करत राहीन असे नाट्यलेखक यशवंत माणके यांनी सांगितले.

 नाट्यलेखक यशवंत माणके यांनी नव्यानं स्थापन केलेल्या वाय एम प्रोडक्शनच्या माध्यमातून निर्मित झालेल्या तीन मराठी लघुपट यांचं प्रथमदर्शनी भव्य प्रदर्शन बुधवार दि.३० डिसेंबर २०२० रोजी गुंदवली अंधेरी ( पूर्व ) येथे सायंकाळी ०६ : ०० वाजता विविध  क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कोविड - १९ च्या दिवसात शासकीय नियमांचे पालन करून होणार असून या परिवाराला उपकृत करण्यासाठी सर्वांचे प्रेम व उपस्थिती हवी असे आवाहन नाट्यलेखक माणके यांनी केलं आहे.

सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

दैनिक जनशक्ती व लेवाशक्तीचे संपादक कुंदन ढाके यांचे निधन

पुणे :  पिंपरी चिंचवड व पुण्यात लोकमान्य पावलेले दैनिक जनशक्ती व दैनिक लेवाशक्ती चे संपादक व सिद्धिविनायक ग्रुप चे संचालक कुंदन दत्तात्रय ढाके(वय ४२ वर्षे) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या कुंदन ढाके यांनी पुण्यात बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय काम केले.भाजप मधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेणारे एकनाथ खडसे यांचे जवळचे सहकारी म्हणून ही त्यांची ओळख  होती.

  जळगांव येथील प्रसिद्ध दैनिक जनशक्ती हे त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात सुरू केले.एक दर्जेदार दैनिक कसे असावे याचे त्यांनी उदाहरण दाखवून दिले.त्यानंतर दैनिक लेवाशक्ती हेही दैनिक सुरू केले.

    कुंदन दत्तात्रय ढाके आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांना चक्कर आली. वायसीएम रुग्णालयात नेले असता मृत घोषित केले.

खासदारांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन


मुलुंड :
भाजप -सोबती फौंडेशनचे  संजय नलावडे  ह्यांच्या  २०२१ या  नवीन वर्षाच्या  दिनदर्शिकेचे प्रकाशन मा.  दिवंगत पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी आणि ईशान्य मुंबईचे अभ्यासू ,कार्यश्रम खासदार श्री. मनोज कोटक ह्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाकवी कालिदास नाट्य सभागृहात खासदार श्री मनोज कोटक ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आले . याप्रसंगी  श्री अशोक राय, जिल्हाअध्यक्ष, श्री मंगेश पवार - मंडळ अध्यक्ष, श्री. दिलीप मटकर - जिल्हा चिटणीस, संजय शुक्ला- मंडळ सरचिटणीस तसेच  नितीन चव्हाण, प्रदीप आब्रे, अमोल पोखरकर, श्रेयस आजगेकर, संजय सरवनकर, संतोष शिंदे आदी भाजप पदाधिकारी व कायकर्ते  उपस्थित होते.

पोलीस कर्मचारी व कुटुंबियांसाठी आयोजित मोफत आरोग्य शिबीर संपन्न ; ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचा स्तुत्य व सामाजिक उपक्रम

 



ठाणे /वार्ताहर  : ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे  राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा.प्रकाश डोंगळे , राष्ट्रीय उपाध्यक्ष-मा.धमेन्द्र अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष श्री. अनंत हुमणे, उपाध्यक्ष:- श्री.दाजीसाहेब थोरात,  महाराष्ट्र राज्य सहसचिव  विनायक जयकर, अंबरनाथ शहर अध्यक्ष  संतोष क्षेत्रे,ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख जनार्दन गुरव व पदाधिकारी आणि सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये दि २७  डिसेंबर रोजी  बदलापूर (पूर्व) पोलीस स्टेशनमध्ये  समस्त  पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांकरिता ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत व मेडलाईफ फौंडेशन तर्फे  मोफत आरोग्य  शिबीर राबवण्यात आले . यावेळी  पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख साहेब व पोलीस कर्मचारी यांनी चांगले  सहकार्य केले व प्रतिसाद दिला.  या शिबिराचा लाभ अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी घेऊन संघटनेचे कौतुक केले. 

     बदलापूर येथे पार पडलेल्या शिबिरानंतर  अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे  सी.पी. ऑफिस याठिकाणी  शिबीरे  घेतले जातील असे ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनंत हुमणे यांनी सांगितले. ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना  पोलीस बांधवाना नेहमी  सहकार्य करून बंदोबस्तच्या वेळी सुद्धा वेळोवेळी मदत करेल हेदेखील ते पुढे म्हणाले. 

खंडोबा सेवा मंडळाच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान

   ठाणे : लोकमान्य नगर पाडा नं ४ येथील खंडोबा मंदिरात गेली १५ वर्ष चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जातो. हा चंपाषष्ठी उत्सव फक्त खंडोबा सेवा मंडळाचा नसून संपूर्ण लोकमान्य नगर पाडा नं ४ येथील रहिवासी यांचा सण असतो. गतवर्षीपर्यंत चंपाषष्ठी उत्सव साजरा करताना देवदीपावली ते चंपाषष्ठी पर्यंत खंडोबा मंदिरात दररोज भजन तसेच शेवटच्या दिवशी महापूजा, देवाची पालखी, अन्नदान आणि जागरण गोंधळ हा कार्यक्रम असायचा. परंतु यावर्षी कोरोना सारख्या महामारीमुळे शासकीय नियमानुसार कार्यक्रम करून प्रशासनास आणि पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पालखी सोहळा व अन्नदान (भंडारा) रद्द करण्यात आले. चंपाषष्ठी उत्सव-२०२० साजरा करताना खंडोबा मंदिरात पहाटे देवाचा अभिषेक, सकाळी सत्यनारायण पूजा आणि सायंकाळी पाच नामाचा जागर हे कार्यक्रम झाले. तसेच यावर्षीच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्यांच्यामुळे आज लोकमान्य नगर मधून कोरोना हद्दपार झाला त्या डॉक्टर्स, पोलीस आणि सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला.

         कोरोना काळात ठाणे शहरात कोरोनाचे रुग्ण लोकमान्य नगर मध्ये सापडायला लागल्यावर एक भीतीचे वातावरण तयार झाले होते. तेव्हा लोकमान्य नगर मध्ये कोरोना वाढू नये किंबहुना कोरोना लोकमान्य नगर मधून हद्दपार व्हावा यासाठी डॉक्टर्स, पोलीस बांधव, सफाई कामगार आणि मराठा क्रांती मोर्चातील पोलीस मित्र यांनी चांगल्या प्रकारे कार्य केले होते. या सर्वांच्या कार्याची दखल घेऊन खंडोबा सेवा मंडळाने रविवार, दिनांक २० डिसेंबर २० रोजी चंपाषष्ठी दिनानिमित्त स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते कोरोनायोद्धा सन्मानचिन्ह देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे ठरविले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विरोधी पक्षनेते व जेष्ठ नगरसेवक श्री हणमंत जगदाळे (शेठ), स्थानिक नगरसेवक श्री दिगंबर (दादा) ठाकूर आणि माजी नगरसेवक व उपशहरप्रमुख श्री प्रदीप (भाई) खाडे हे उपस्थित होते. या मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सर्व डॉक्टर्स, पोलीस बांधव, सफाई कामगार आणि पोलीस मित्र यांना कोरोनायोद्धा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

सौ.शितल मांजरेकर "जनजागृती सेवा समितीच्यावतीने "सन्मानित

कणकवली- सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या जीवन स्त्रोत या संस्थेच्या अध्यक्षा व मनोवेधा ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ.शितल मांजरेकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना जनजागृती सेवा समितीच्यावतीने"सन्मानपत्र"देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. शितल मांजरेकर यांनी आपल्या जीवन स्त्रोत या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पणंदुर येथील अनाथ आश्रमात लाॅकडाऊनच्या काळात कपडे व खाऊ वाटप केले.पुर परिस्थितीत अन्न धान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले.इतर सामाजिक उपक्रम त्या राबवित असतात.सन्मानपत्र प्रदान करताना जीवन स्त्रोतच्या अक्षता गावडे,नम्रता सरंगले,मेघा चौघुले,पल्लवी जाधव,साक्षी पवार,हिना गावडे, समिता तांबे,शिल्पा नार्वेकर,सायली साबळे,रेखा चव्हाण या उपस्थित होत्या.सन्मानपत्राने गौरव झाल्या कारणाने शितल मांजरेकर यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

भांडूप येथील माता रमाबाई आंबेडकर नगर येथील चो-या रोखण्यासाठी वपोनि शिंदे( भांडूप पोलीस ठाणे)यांना विशाल सावंत यांचे निवेदन ;वपोनि श्याम शिंदे यांनी तातडीने केल्या उपाययोजना


मुंबई(शांत्ताराम गुडेकर/ दिपक कारकर) 

          भांडुप येथील माता रमाबाई आंबेडकर नगर परिसरात मध्यरात्रीच्या वेळी चोरी सदृश्य घटना घडल्या आहेत.युवासेनेचे मुंबई समन्वयक विशाल सावंत यांनी या संदर्भात भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पत्र देऊन पोलिसांची गस्त वाढवण्यासाठी आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी निवेदन दिले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.श्याम शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तातडीने उपाययोजना केल्या

शहापुर मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी साजरा केला १३६ वा स्थापना दिवस


शहापुर(एस.एल.गुडेकर)- 
 २८ डिसेंम्बर हा राष्ट्रीय काँग्रेसचा स्थापना दिवस असून आज शहापुर तालुका काँग्रेस कमिटीच्या जनसंपर्क कार्यालयात पक्षाचा १३६ वा स्थापना दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.महात्मा गांधी व पंडित नेहरू यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश धानके आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की देश स्वातंत्र्य करण्यासाठी योगदान देणारा आपला पक्ष असून आपण काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत याचा अभिमान बाळगला पाहिजे,जात धर्म यात वाद निर्माण करून सत्ता मिळवणे हे भाजपचे धोरण असून देशाची एकात्मता व अखंडता कायम राहण्यासाठी प्रसंगी बलिदान ही काँग्रेसची परंपरा आहे,काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या अपर्णा खाडे,लक्ष्मण घरत,तालुका उपाध्यक्ष जितू विशे,कृष्णा गोडांबे यांनीही काँग्रेस पक्षाचा इतिहास,काँग्रेस व देशासमोरील आव्हाने याबाबत आपले मनोगत व्यक्त केले,

  याप्रसंगी गजानन बसवंत,आबा देशमुख,विश्वास गोरे,पद्माकर वरकुटे,देवेन्द्र भेरे,संतोष साळवे,माया मगर,अबुल शेख,अबु ताम्हणकर,युवराज जगताप, राजू साबळे,राहुल देसले,रामचंद्र जोशी आदी मान्यवर उपस्थित होते,कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण घरत यांनी केले

चाचण्या सुरू राहणे महत्वाचे !

मुंबई शहरात एकेकाळी करोना बाधित होणार्‍यांच्या वाढीची संख्या सुमारे तीस ते पस्तीस टक्क्यावर गेलेली होती परंतु आज ती केंद्र, राज्य शासन, आरोग्य सेवेतील, पोलिस दलातील, समाज सेवक, नागरिक आदि सर्व करोना योद्ध्यांच्या अथक परिश्रमातून, तीन ते चार टक्क्यावर आल्याचे एक समाधान देणारे वृत्त वाचनात आले. मात्र करोना पुर्णपणे हद्दपार झालेला नाही हे ध्यानी ठेवून दक्षता आणि नियम पाळणे आजही आवश्यक आहेच. नाईलाजस्तव म्हणावं लागतय की आजही कांही करोनादृश्य लक्षणांकडे दुर्दैवाने लोक गांभीर्याने पाहत नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात अस म्हटल्यास ते चुकीचे होईलच असे नाही आणि म्हणूनच बाधितांच्या संख्येत घट होत असली किंवा दिसत असली तरी करोना संपूर्णपणे हद्दपार झाल्याची खात्री होई पर्यंत चाचण्यांची जी संख्या तो आहे ती कायम राहणे आवश्यक असून त्यामध्ये मात्र घट करू नये, घट करून चालणार नाही. किंबहुना ग्रामीण भागातील छोट्या छोट्या शहरांमध्ये चाचणी केंद्रे उभारली जावयास हवीत. बधितांचा शोध चाचण्यातूनच मिळत राहतो त्यामुळे त्यांच्या संपर्कातील नागरिकांना विलगीकरण वगैरे करून साखळीला अटकाव करण्यास मदत होते म्हणून चाचण्या सुरू राहणे महत्वाचे आहे त्यात घट नको. करोनाची हद्दपारीला चाचण्या हा एक प्रथम क्रमांकाचा मार्ग ठरू शकतोय.

-विश्वनाथ पंडित, ठाणे 


'अजिंक्य'तारा चमकला

    भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान चालू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर दुसऱ्या कसोटीत भारताने दमदार कामगिरी करीत पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर  ( एमसीजी ) चालू असलेल्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी घातक गोलंदाजी करुन ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावात रोखला. भारतीय फलंदाजांनीही पहिल्या डावात अप्रतिम कामगिरी करीत १३१ धावांची आघाडी घेऊन ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले आहे. भारतीय संघाच्या या अप्रतिम कामगिरीचे श्रेय हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे याला जाते. अजिंक्य रहाणे याने या कसोटीत संघाची धुरा सांभाळताना अप्रतिम नेतृत्व केले आहे. दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना २०० च्या आत रोखण्याचे श्रेय जितके गोलंदाजांना जाते तितकेच कर्णधार अजिंक्य रहाणे याला जाते. अजिंक्य रहाणे याने आपल्या नेतृत्वगुणाची चुणूक दाखवत क्षेत्ररक्षकांची रचना केली. त्याने लावलेल्या क्षेत्ररक्षणाप्रमाणेच गोलंदाजांनी गोलंदाजी केली त्यामुळे ऑस्ट्रेलिया फलंदाजांनी चुका केल्या. स्टीव्ह स्मिथ आणि लाबुशाने हे भरवशाचे फलंदाज त्याने रचलेल्या जाळ्यात अडकल्यानेच बाद झाले. त्याने गोलंदाजांचाही योग्य वापर केला. त्याच्या नेतृत्वगुणाचे अनेक दिग्गज माजी खेळाडूंनी कौतुक केले. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, व्ही व्ही एस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, हरभजनसिंग या माजी खेळाडूंनी त्याची प्रशंसा केली. फलंदाजीतही त्याने कमाल केली.संघ अडचणीत असताना त्याने कर्णधाराला साजेशी खेळी करीत शतक झळकावले. २ बाद ६१ अशी संघाची अवस्था असताना हनुमा विहिरी, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा या युवा खेळाडूंना हाताशी धरुन त्याने किल्ला लढवत भारताला महत्वपूर्ण अशी आघाडी मिळवून दिली. आपल्या संयमी खेळीने त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना जेरीस आणले. ११२ धावांची त्याची खेळी दुर्दैवाने धावबाद झाल्याने समाप्त झाली नाही तर भारताला आणखी आघाडी मिळाली असते. अजिंक्य रहाणे याने जी संयमी खेळी केली ती युवा खेळाडूंसाठी आदर्श अशी होती. खडतर परिस्थितीत कशा प्रकारे फलंदाजी करावी याचा वस्तुपाठच त्याने युवा खेळाडूंना घालून दिला.  त्याच्या शतकी खेळीने भारताला सामन्यावर वरचष्मा मिळवता आला. आता दुसऱ्या डावात भारतीय खेळाडूंनी पहिल्या डावाची पुनरावृत्ती केली तर भारत ही कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधू शकतो त्यासाठी  भारतीय खेळाडूंनी कर्णधार अजिंक्य रहाणेचा आदर्श ठेवून संयमी खेळ करायला हवा. 

-श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे 

रविवार, २७ डिसेंबर, २०२०

भारताचे संविधान उद्देशिका वाचन स्पर्धेचा निकाल जाहीर

मुंबई  : राज्यस्तरीय "आम्ही तंत्रस्नेही शिक्षकमंच" समूहाच्या प्रमुख व मुख्य प्रशासिका वृषाली सुरेश खाड्ये (मुंबई) यांनी संविधान दिनाचे औचित्य साधून "भारताचे संविधान उद्देशिका वाचन स्पर्धा" आयोजित केली होती. महाराष्ट्रातील सर्व भाषिक माध्यमांतील इयत्ता ५ वी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाठ्यपुस्तकातील संविधान उद्देशिका वाचन करतानाचा व्हिडिओ गुगल फाॅर्मद्वारे स्पर्धक विद्यार्थ्यांनी आयोजकांना पाठविले. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती या माध्यमांतील बहुसंख्य विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. व्हिडिओंच्या परीक्षणानंतर "साहित्यमंच" या यू ट्यूब चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करण्यात आले.

शुक्रवार दि.२५/१२/२०२० रोजी व्ह्यूज व लाईक्स यावरून निकाल घोषित करून रोख रक्कम व ई-प्रमाणपत्र देऊन विजेत्या स्पर्धकांना गौरवण्यात आले. या स्पर्धेचे "सकाळ माध्यम प्रायोजक" होते. 

   ऑनलाईन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश चर्‍हाटे (सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका-शिक्षण विभाग) हे होते. प्रमुख अतिथी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका-शिक्षण विभागातील वीणा सोनावणे (प्रशासकीय अधिकारी शाळा), संगीता डोईफोडे (विभाग निरीक्षिका), मीरा सुरेश डहाळे (मुख्याध्यापिका), मंदा नारायण लोहारे (मुख्याध्यापिका) तसेच मिलिंद काशिनाथ पगारे (निवृत्त मेकॅनिकल मेंटेनन्स इंजिनिअर, रिलायन्स इंडस्ट्रीज लि. जामनगर, गुजरात) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

 प्रकाश चर्‍हाटे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या भारताचे संविधान उद्देशिका वाचन स्पर्धेत विजयी व सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून 'आम्ही तंत्रस्नेही शिक्षकमंच' या समूहाशी विविध उपक्रमांच्या माध्यमांतून मी जोडलो गेलो असल्याचे सांगितले. तसेच लाॅकडाऊनचा काळात 'आम्ही तंत्रस्नेही शिक्षकमंच'  समूहाने शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम व सुप्त कलागुणांना वाव देणार्‍या अभिनव स्पर्धा, याबरोबरच तंत्रज्ञान कार्यशाळा, विषयनिहाय बुद्धीवर्धक सामान्यज्ञान चाचण्यांचे आयोजन, समूहाचे उल्लेखनीय कार्य नियोजन व शिस्तबद्धता इ. बाबींचा उल्लेख करून समूहाचे हे कार्य वाखाणण्याजोगे आहे असे गौरवोद्गार काढले. आम्ही तंत्रस्नेही शिक्षकमंच (महाराष्ट्र राज्य) या समूहामार्फत नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात याचे कौतुक करून संविधान दिनानिमित्त इ. ५ वी ते १० सर्व भाषिक विद्यार्थ्यांसाठी भारताचे संविधान उद्देशिका वाचन स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना एक नविन दालन उघडून दिल्याबद्दल वीणा सोनावणे यांनी संयोजकांचे अभिनंदन केले. संविधान उद्देशिका वाचन असल्याने अनेक विद्यार्थी या स्पर्धेत अत्यंत उत्साहाने सहभागी झाले. समूहाने त्या सर्व स्पर्धकांचे व्हिडिओ यू ट्यूबवर अपलोड करून स्पर्धकांना एक प्रकारे प्रोत्साहन दिले आहे असे मत संगीता डोईफोडे यांनी मांडले. मीरा सुरेश डहाळे यांनी अनेक स्पर्धक समूहाच्या पुढील उपक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात हे जाणवले असल्याचे मत मांडले. आम्ही तंत्रस्नेही शिक्षक समूहाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी व समूहाच्या पुढील उपक्रमास मंदा लोहारे यांनी शुभेच्छा दिल्या. मिलिंद काशिनाथ पगारे यांनी प्लास्टीक प्रदूषण, कचरा व्यवस्थापन इ. सामाजिक बाबीवर प्रबोधन करत असतांना या समूहाशी जोडलो गेल्याची भावना आपल्या मनोगतात व्यक्त केली.

    अंजू यशवंत पालवे (ए.बी.गोरेगावकर इंग्लिश हायस्कूल, गोरेगाव, मुंबई), विराजित उत्तम कुंदे (सरस्वती सेकंडरी स्कूल, ठाणे),आश्लेशा सुनील पूर्वा पाटील (ए.बी.गोरेगावकर इंग्लिश हायस्कूल, गोरेगाव, मुंबई) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले. समृद्धी विजय चव्हाण, ऋतुजा रवींद्र फर्डे, शिवानी समीर पटवर्धन, प्रांजल  निलेश गायकवाड, देवयानी राजेंद्र चव्हाण, श्रुती सुरेश बधे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.

    प्रकाश चर्‍हाटे यांच्या सौजन्याने बक्षीसाची रक्कम देय झाली असून विजयी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. संदीप सोनार (जळगाव) यांनी तयार केलेल्या आकर्षक ई-प्रमाणपत्राने सर्व विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.

      ऑनलाईन कार्यक्रमात ऋतुजा रवींद्र फर्डे (स्वातंत्र्यसैनिक किसन बाबा विद्या मंदिर, धसई, शहापूर), समृद्धी विजय चव्हाण (श.जा.ति.म.जी. परिषद हायस्कूल व ज्यू. कॉलेज, गोरेगाव, गोंदिया) सिद्धांत मनोज साळगाकर (सरस्वती सेकंडरी हायस्कूल, ठाणे) दर्पण अशोक भिरमोडे, (पराग विद्यालय, भांडूप) वेदिका प्रशांत वर्मा (आर. एस. टी. माध्यमिक विद्यालय, भांडूप) आयेशा रणजित घुगरवाल (धनाजी नाना विद्यालय, डोंबिवली) मिताली काणेकर (पराग विद्यालय, भांडूप) अनुजा यशवंत पाल्ये (ए.बी.गोरेगावकर इंग्लिश हायस्कूल, गोरेगाव, मुंबई), सिद्धी रविंद्र निचिते (स्वातंत्र्यसैनिक किसन बाबा विद्या मंदिर, धसई, शहापूर) अथर्व विजय गवस (पराग विद्यालय,भांडूप) यांनी मनोगत व्यक्त केले. 

    वृषाली खाड्ये यांनी अध्यक्ष व प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. उपस्थितांचे स्वागत स्वरूप सावंत (मुंबई), गजानन पुंडे (बुलढाणा), सुनिता अनभुले (मुंबई), सुनील द्रविड (कोल्हापूर), प्रास्ताविक दिलीप यशवंत जाने (जळगाव), आभारप्रदर्शन अंजली ठाकुर (यवतमाळ), सूत्रसंचालन साईली राणे (मुंबई) यांनी केले.

    स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नरेंद्र कांबळे (परभणी), राजेश चायंदे (अमरावती), सुनीलकुमार बडगुजर (जळगाव), वर्षा चोपदार (मुंबई), राहुल मुंढे (ठाणे) यांचेही सहकार्य लाभले.

भीमा नदीत सापडली १ टन वजनाची पुरातन मूर्ती


पुणे -
येथील भीमा नदी पात्रातील २८ मोऱ्यांच्या रेल्वे पूलाजवळ शंकराचे मुख असलेली जवळपास १५० वर्षांपूर्वीची दगडी मूर्ती खोदकामात सापडली आहे.मूर्तीचे तोंड पाच फुट असून वजन एक टनाच्या आसपास आहे.

दौंड-नगर रेल्वे लोहमार्गासाठी गेल्या १५० वर्षांपूर्वी इंग्रजांनी दगडी कामातील पूल उभारला आहे. या पूलाच्या बाजूलाच दुसरा रेल्वे पूलाच्या पायाभरणीचे काम सध्या सुरु आहे. या ठिकाणी शनिवारी खोदकाम सुरू असतांना एका खड्यात ही मूर्ती सापडली. कामागारांनी ही मूर्ती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला ठेवली आहे.

स्थानिकांच्यामते ही मूर्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेली आहे. मात्र, मूर्तीचे वजन जास्त असल्याने ही मूर्ती वाहून येऊ शकत नाही. ती या ठिकाणची असल्याची माहिती काही तज्ञांनी व्यक्त केली. मूर्तीच्या मुखाचा भाग सापडला असून याच परिसरात इतर अवशेषही सापडण्याची शक्यता आहे.

रंगभूमीचे सेवक - कोकण सुपुत्र सुभाष बांबरकर

 

रत्नागिरी जिल्हातील धामणसे( चौकेवाडी) चे सुपूत्र मुंबई येथे वास्तव्यास असणारे समाजसेवक/रंगभूमी सेवक सुभाष बांबरकर अतिशय दिलदार,निस्वार्थी,कष्टाळू, भितभाषी,मनमिळावू  आहेत. 

सर्वगुणसंपन्न,प्रतिभाशाली गरजवंतांच्या हाकेला घरच्या माणसासारखा धावून जाणारा जनसेवक सुभाष बांबरकर म्हणजे एक आदर्शवत जीवन मानावे लागेल.अशा या प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या चैतन्यमय व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रमाणित प्रयत्न ....

            कोकणच्या मातीत जन्मलेली अनेक हिरे-माणके आज आपल्या कर्तृत्ववान नेतृत्वाने ठसा उमटविताना दिसतात असच एक एका गरीब कुटुंबात जन्मलेले रत्नागिरी जिल्हयातील धामणसे ( चौकेवाडी ) गावचे भूमिपुत्र सुभाष यशवंत बांबरकर होय.लहानपणापासून समाजसेवा व कोकणातील लोककलेच वेढ असणाऱ्या सुभाष बांबरकर यांचं नाव मुंबई रंगमंचावर शक्ती-तुरा/नमन आयोजक म्हणून लोकप्रिय ठरलं आहे. कोकणातील नमन/भारुड/जाखडी नृत्य या लोककला सादरीकरण करणाऱ्या कोकणातील नमन मंडळे व कलाकार यांना व्यासपीठ देण्याचं मोठं कार्य बांबरकर यांनी केलं आहे.आयोजक बांबरकर यांचे प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळा, धामणसे गावी तर माध्यमिक शिक्षण धामणसे गावी व पुढील महाविद्यालयीन शिक्षण भाई मयेकर ज्युनियर कॉलेज,मालगुंड येथे केले. त्या काळात शिक्षण हे फार क्वचितच लोक घेत असत मात्र शिक्षणाची आवड असणाऱ्या बांबरकर यांनी आपलं शिक्षण मोठ्या परिश्रमाने व जिद्दीनं पूर्ण केलं.

           मुंबईत आल्यावर आपलं कौटुंबिक जीवन जगताना रंगभूमीचे वेढ त्यांना लागले. अगदी कोकणातील दिग्गज शाहिर मंडळी व नमन मंडळे यांना आपल्या आयोजनात चमकवत अनेक प्रयोग हाऊसफुल्ल केले.कुटुंब जबाबदारी सांभाळत असताना बांबरकर यांनी आपल्या नोकरीची सुरुवात सन - १९९४ साली बायडींग प्रेस नंतर १९९५ ते१९९९  लेदर वर्क तद्नंत १ जानेवारी २००० ते आजही डाबर इंडिया लिमिटेड या कंपनीत अँडमिन असिस्टंट म्हणून कार्यरत आहेत. आमच्या कोकणात असा सर्वांगीण सुंदर, गुणवान, सच्चा माणूस जन्मला आणि अशा माणसा साठी मला काहीतरी लिहिण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. हे माझे भाग्यच... माझ्या  कोकणच्या या कर्मयोग्याला मी इतकेच म्हणू शकेन.... निस्वार्थी रंगभूमी सेवक बांबरकर,

 सूर्याचे तेज येऊ द्या,तुमच्या कर्तृत्वात

चंद्राची शितलता,बहरावी स्वभावात 

कस्तुरीचा सुगंध,दरवळावा सहवासात 

मकरंदाचे माधुर्य,असावे मुखात.....

कोकणची लोककला शक्ती-तुरा,नमन या कलेतुन लोकजागृतीसाठी झटणा-या सुभाष बांबरकर यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...!


लेखन- दिपक कारकर

संकलन- शांत्ताराम गुडेकर 

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) च्या दिनदर्शिका- २०२१ चे शानदार प्रकाशन सोहाळा संपन्न


मुंबई(शांत्ताराम गुडेकर)

        महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक, पर्यावरण, आरोग्य , व सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे पंचरत्न मित्र मंडळाचा वार्षिक दिनदर्शिका २०२१ चे उद्घाटन कॅबिनेट मंत्री  नवाब मलिक ( कोशल्य विकास ' अल्पसंखांक ) यांच्या शुभहस्ते मुंबईत पार पडला.मंडळाचे कार्य तत्पर अध्यक्ष अशोक भोईर ,सचिव प्रदीप  गावंड , सहसचिव स्नेहा नानिवडेकर ,खजिनदार सचिन साळुंके ,वैभव  घरत ,निलम  गावंड ,डॉ.विनित गायकवाड,रहिम शेख,जालिंदर इंगोले,रमाकांत गवळी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.आरसीएफ मधील नोकरीधंदा सांभाळून सामाजिक बांधिलकी जपत  स्वःखर्चातून गोरगरीब जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी मंडळ सतत झटत आहे. विषेशतः मूक-बधिर ,अंध विद्यार्थी ,वृद्धाश्रम ,व अतिदुर्गम भागातील आदिवासी पाड्यातील निराधारांना सतत १५ वर्षे अन्नधान्य ,कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आले आहेत. रोजगार मेळावे ,आरोग्य शिबिरे, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाते. त्यांच्या समाजकार्याची दखल माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील श्री अण्णा हजारे, सिंधुताई संकपाळ, इत्यादी मान्यवरांसाहित अनेक दैनिक वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. 

 

मुंबईसह कोकणात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.)चेंबुरच्या दिनदर्शिका-२०२१ चे प्रकाशन आर. सी. एफ चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  श्रीनिवास मुडगेरीकर  यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अशोक भोईर , सचिव  प्रदीप गावंड तसेच मंडळाचे अन्य पदाधिकारी,सदस्या व सभासद उपस्थित होते.यावेळी  मा. सी एम डी यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

(छाया- शांत्ताराम गुडेकर )

कांजूरमार्ग येथे "जनेरीक औषधालय"चे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न ; मा.सौ.शर्मिलाताई ठाकरे यांच्याहस्ते उद्घाटन


मुंबई( समीर खाडिलकर/शांत्ताराम गुडेकर)

            मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट आणि मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या आशिर्वादाने कांजूरमार्ग पूर्व येथे जनरिक औषधालय समाजहितासाठी स्वस्त व गुणकारी असे औषधांचे दुकान "जनहित केमिस्ट व मेट्रोपलिस् " चे भव्य उद्घाटन मा.सौ.शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे यांच्याहस्ते शाँप नं.६,राम रहिम चाळ,नेहरु नगर,कांजूर व्हिलेज रोड,अनिकेत हाँस्पीटलच्या बाजूला,कांजूरमार्ग (पूर्व),मुंबई-४२ येथे राजकीय,सामाजिक,कला,क्रिडा,सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.या जनेरिक औषधालयमुळे जनतेला  बँडेड जेनेरिक औषधांवर १०% ते ८०% पर्यंतची बचत होणार असून या संधीचा लाभ रहिवाशांना होणार आहे.तरी रहिवाशांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त- मा.से.ट्रस्टचे मनोज चव्हाण यांनी केले आहे.

वाढदिवस अभिष्टचिंतन !!

शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ईशान्य मुंबई जिल्हा सचिव केतन भोज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व कोरोना योद्धा सन्मान सोहळा संपन्न

मुंबई(प्रतिनिधी ):  आर.आर.पाटील फाऊंडेशन संलग्न समता प्रतिष्ठान व पँथर राजाभाऊ गांधले सामाजिक संस्था,मायक्रोलिंक फाऊंडेशन आयोजित श्री.केतन दत्ताराम भोज( ईशान्य मुंबई जिल्हा सचिव-राष्ट्रवादी युवक काँग्रेस ) यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा गांधी सेवा मंदिर ब्लड बँक यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर शुक्रवार दि.२५ डिसेंबर रोजी समता बुद्ध विहार,इंदिरा नगर नं.०२ घाटकोपर(प.)मुंबई/४०००८६ याठिकाणी आयोजित करण्यात आले होते.यावेळी रक्तदात्यांनी उस्फूर्त पणे सहभाग नोंदवून स्वइच्छेने रक्तदान केले.तसेच कोरोनाच्या अटीतटीच्या काळात आपल्या कर्तव्याचे निष्ठेने पालन करून,सामजिक दायित्व प्राणपणाने जपले त्याबद्दल त्यांच्याप्रती अभिमान व्यक्त करण्यासाठी आर.आर.पाटील फाऊंडेशनच्या वतीने श्री.विशाल गांधले,मा.श्रीमती.नयन ताई पारकर,प्रकाश भेकरे,पत्रकार शंत्ताराम गुडेकर,सुभाष कोकणे या कोरोना योद्धयांचा कोरोना वीर,वीर छत्रपती शिवाजी महाराज सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी रक्तदान शिबीराला अनेक मान्यवरांनी भेट देऊन रक्तदात्यांचे मनोबल वाढवले.

    हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी समता प्रतिष्ठान व पँथर राजाभाऊ गांधले सामजिक संस्थेचे संस्थापक शरद गांधले,मायक्रोलिंक फाऊंडेशनचे संस्थापक सचिन मनवळ सर तसेच इंदिरा नगर येथील अनेक युवकांनी कठोर परिश्रम घेतले.

कै वीर लक्ष्मणराव अण्णाजी राणे पत्रभूषण व समाजभूषण पुरस्कार सोहळा

मुंबई : अभिजित राणे युथ फौंडेशन,महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने ऑगस्ट २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या वृत्तपत्र लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवार दि २ जानेवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात आला आहे.केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉल,

गोरेगाव (पश्चिम)  मुंबई ( स्टेशन पासून ५ मिनिटं अंतर) याठिकाणी सायंकाळी सायंकाळी ५.०० वा. हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.  यावेळी स्पर्धेतील विजेते पत्रलेखक, निवडक पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या निवडक गुणीजनांना प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते कै वीर लक्ष्मणराव अण्णाजी राणे पत्रभूषण व समाजभूषण पुरस्कार २०२० देऊन सन्मान करण्यात येणार आहे . तेव्हा  पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी    वेळेवर उपस्थित रहावे  असे आवाहन व विनंती स्पर्धाप्रमुख गणेश हिरवे यांनी केली आहे. 






नवी मुंबई येथील ज्ञानेश्वर शैलार समाज मंदीरामध्ये ७९ बाटल्या रक्तसंकलन

नवी मुंबई – राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईने विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईच्या सदस्यानी यांनी शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला. त्यामुळे एका दिवसात  ७९ बाटल्या रक्त संकलित झाले आहे.

लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे,लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई,  उपाध्यक्ष अक्षय पाचारणे. लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईसचिव सचिन कोकरे ,लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई खजिदार रोशन पाटील,  लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई उपखजिदार आलताफ शेख,लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई सदस्य प्रशांत पाटील, सोपनिल सोनवणे, किरण पंतगे,सोमनाथ बारवे,विक्की वांडे यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

[[ "रक्तदान"- राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक नैसर्गिक संकट आणि राष्ट्रीय आपत्ती यांमध्ये लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईमधील सदि आणि अन्य घटक नेहमीच साहाय्यासाठी पुढे येत असतात. त्यामुळे रक्तदानाचा तुटवडा भरून काढण्यासाठी आवाहन केल्यानंतर लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईमध्ये रांगा लागल्या होत्या.]]

शेतकरी प्रबोधिनीच्या उपाध्यक्षपदी रामदास पाटील.

उरण (विठ्ठल ममताबादे )-
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई परिसरातील मूळ भूमीपुत्र असलेल्या आगरी कोळी कराडी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी समाजाचे अस्तित्व सध्या विविध कारणांनी धोक्यात आले आहे. त्यामुळे कोळी बांधव, कामगार, शेतकरी वर्गांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी प्रबोधिनी ही संस्था शेतकऱ्यांना, कोळी बांधवांना, कामगारांना विविध माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. अश्या या संस्थेच्या उपाध्यक्ष पदी नुकतीच रामदास हरिश्चंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  मु -नितळस तालुका पनवेल येथील रहिवाशी असलेले रामदास हरिश्चंद्र पाटील यांचे आजपर्यंतचे कार्य व गोरगरिबांविषयी, कामगार, कोळी, शेतकरी बांधवांविषयी असलेली तळमळ पाहता कामगार, कोळी बांधव, शेतकऱ्यांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शेतकरी प्रबोधन या संस्थेच्या उपाध्यक्षपदी रामदास हरिश्चंद्र पाटील यांची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी दिली. रामदास पाटील यांची निवड संस्थेच्या उपाध्यक्ष पदी झाल्याने सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जिल्हा परीषद शिक्षकांची चटोपाध्याय-वरीष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात शिक्षक सेनेला यश.

उरण (विठ्ठल ममताबादे )- रायगड जिल्हा परीषद शिक्षकांचे वरीष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मागील अनेक महिने प्रलंबित होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या प्रयत्नांमुळे तसेच माजी उपाध्यक्ष तथा जि.प. सदस्य चंद्रकांत कळंबे पोलादपूर, जि.प. सदस्य रविंद्र देशमुख पाली, जि.प.सदस्य विजय भोईर उरण यांनी केलेल्या सततच्या पाठपूराव्यामुळे शिक्षक/पदविधर शिक्षक/मुख्याध्यापक यांचे वरीष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. ह्यासाठी शिक्षक सेना कोकण कार्याध्यक्ष कौशिक ठाकूर, शिक्षक सेना रायगड अध्यक्ष-रोशन तांडेल, सरचिटणीस-हितेंद्र म्हात्रे यांनी वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूरीसाठी जिल्हास्तरावर प्रयत्न केले.

या यशाबद्दल शिक्षक सेनेच्या टीमचे रायगड जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.येत्या काळात शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तालुका, जिल्हा तसेच राज्य स्तरावर शिक्षक सेनेकडून आवाज उठविण्यात येईल. असे शिक्षक सेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

खोपटा ते कोप्रोली चौक रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी ; मनसेचे सत्यवान भगत यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार

उरण (विठ्ठल ममताबादे )- उरण तालुक्यातील खोपटे ते कोप्रोली  गावांदरम्यान असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले शिवाय रस्त्यात खूप मोठे खड्डे पडले असून हे खड्डे डांबरीकरण करण्याऐवजी खड्डे मातीने भरून बुजविले जात आहेत. त्यामुळे या गैरकारभारा विषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालूका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल यांच्याकडे तक्रार केली असून या कामाचे बिल थांबविण्यात यावे अशी मागणी केली आहे.

खोपटे गाव ते कोप्रोली गाव रस्त्यावर खड्यांच्या संदर्भात गेली 2 वर्षे त्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती निकृष्ट दर्जाची झाली आहे. ह्याच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी NHAI  ने अंदाजे 30 ते  40 लाखाचा निधी पावसाळी पडलेले खड्डे आणि दुरुस्तीसाठी मंजूर करून ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी जे. ई. बांगर हे ठेकेदाराला पाठीशी घालून निकृष्ट दर्जाच्या कामांना सहकार्य करून जनतेच्या आणि शासनाच्या पैश्याची लूट करण्याचे काम करत आहेत. सदर रस्त्याचे नव्याने डांबरीकरण झाले तरी रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडणार आहेत. कारण ह्या रस्त्यात पडलेल्या खड्यात मातीचा भराव टाकून खड्डे बुजविण्यात आले आहेत. खड्ड्यात डांबर न टाकता केवळ खडी पसरवून नंतर माती वरवर डांबर टाकली जात आहे. त्यामुळे ह्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडू लागले आहेत. सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेता निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करून अधिकारी जे.ई.बांगर आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करून कामाचे बिल त्वरित थांबविण्यात यावे अशी मागणी पत्रव्यवहारा द्वारे मनसेचे तालूका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

दहाव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. राजन गवस

मुंबई : दहाव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजन गवस यांची निवड झाली आहे. या संमेलनाला राज्यभरातून मराठी साहित्यावर प्रेम करणारे शिक्षक, मान्यवर हजेरी लावतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, अशी माहिती शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे अध्यक्ष जयवंत पाटील यांनी दिली आहे. 

   डॉ. राजन गवस हे मराठीतील एक ख्यातनाम लेखक आहेत. त्यांच्या 'तणकट' या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार 2001 मध्ये मिळाला आहे. त्यांची 'चौंडकं' ही कादंबरीही खूप गाजली आहे. या कादंबरीच्या कथेवर 'जोगवा' हा मराठी चित्रपट निघाला. या चित्रपटाला देशातील विविध मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. कादंबऱ्या, कथासंग्रह, कवितासंग्रह, संशोधनग्रंथ,संपादित ग्रंथ असं विपुल लेखन त्यांनी केलेलं आहे. अनेक वर्तमानपत्रातून ते सातत्याने लिहत असतात. शिक्षकी पेशातही त्यांनी अनेक वर्ष कार्य केलेलं आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापिठाच्या मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. लेखक, कवी, शिक्षणावरील अभ्यासक आणि समीक्षक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. साहित्यातील योगदानाबद्दल अनेक नामवंत पुरस्कारांनी त्यांचा गौरव झालेला आहे. डॉ. राजन गवस यांची राष्ट्र सेवा दलाच्या चळवळीत जडणघडण झालेली आहे.

  शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी त्याचबरोबर भाषा आणि साहित्याचे अध्यापन आशय समृद्धीसाठी आमदार कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून हे शिक्षक संमेलन सुरु झाले. आजपर्यंत अशी नऊ संमेलनं यापूर्वी मुंबई, ठाणे, बुलढाणा,रत्नागिरी, गोंदिया, विरार येथे मोठ्या दिमाखात पार पडली आहेत. कवयित्री नीरजा, डॉ. सदानंद मोरे, नाटककार शफाअत खान, रमेश इंगळे उत्रादकर, लोकशाहीर संभाजी भगत, प्रविण बांदेकर, जयवंत पाटील, प्रा. वामन केंद्रे, प्रज्ञा दया पवार यांनी यापूर्वीच्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. खासदार शरद पवार, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, हिंदूकार डॉ. भालचंद्र नेमाडे, ख्यातनाम विचारवंत प्रा. पुष्पा भावे, ज्येष्ठ नाट्यकर्मी सुलभा देशपांडे, नितीन वैद्य, वसंत आबाजी डहाके, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, रंगनाथ पठारे, जावेद अख्तर, निखिल वागळे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी यापूर्वीच्या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.

केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा २०२० संपन्न

पवई / प्रतिक कांबळे : पवईत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने २५ डिसेंबर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा २०२० चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे पारितोषिक विजेत्या संघाला देण्यात आले.

 या स्पर्धेत सहभागी १२ संघामधील निटी येथील टक्कर लेव्हन हा संघ या स्पर्धेत विजेता संघ व ओम साई इलेव्हन पवारवाडी हा संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघाला सन्मानचिन्ह व अकरा हजार रोख रक्कम व उपविजेता संघाला सन्मानचिन्ह व आठ हजार रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

 या कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री अविनाश महातेकर देखील उपस्थित होते.रिपाई मुंबई चे अध्यक्ष गौतम भाऊ सोनावणे यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देण्यात आली.या कार्यक्रमासाठी विनोद लिपचा, बाळ गरूड, भाऊ पंडागळे, किशोर गायकवाड, विनोद गाडे, राहुल गाडे, मोहित शिरसाट, जनक कोल्हे, प्राशिक गरूड, सतिश मिसाळ इत्यादी कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.

शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठान,सावर्डेच्या वतीने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.

रत्नागिरी / वार्ताहर :  शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठान, सावर्डे यांच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या  चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा तसेच जिल्हा परिषद शिक्षकांच्या शिष्यवृत्तीधारक पाल्यांचा गुणगौरव समारंभ सावर्डे येथे संपन्न झाला. 

        सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य तथा शिक्षण समिती सदस्य बाळशेठ जाधव ,चिपळूण  पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्य मा. सौ. पूजाताई निकम, एबीपी माझा चे न्यूज रिपोर्टर मा. श्री. रवींद्र ऊर्फ बाळू कोकाटे, न्यू इंग्लिश स्कूल खेर्डी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. अरविंद सकपाळ, केंद्रीय प्रमुख मा. श्री. दीपक खेतले सर आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक श्री. राष्ट्रपाल सावंत,प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. उद्धव साळवी,कार्याध्यक्ष श्री.प्रकाश ठोंबरे, सचिव श्री. अरविंद भंडारी , खजिनदार श्री. सुरेश बागवे , प्रसिद्धी प्रमुख श्री. संजय घाग, उपक्रम समिती प्रमुख श्री.मनोज घाग तसेच प्रतिष्ठान सल्लागार , संचालक उपस्थित होते.

     कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलन करण्यात आले. तर उपस्थित सर्व मान्यवरांचे सल्लागार श्री. दशरथ बांबाडे, श्री. सुभाष फुटक,श्री. बाबाजी मते, श्री. मुकुंद नरोटे, श्री. रविंद्र घाणेकर ,श्री. दत्तात्रय बरकडे, श्री.संतोष जाधव यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

    प्रास्ताविकामध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष  श्री. सतीश सावर्डेकर यांनी प्रतिष्ठानची धेय्य आणि उद्देश सांगून त्या उद्दिष्टांप्रत पोहचण्यासाठी राबविले जाणारे उपक्रम सांगितले. तसेच हे प्रतिष्ठान आपली सर्व उद्दिष्ट पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न  करेल अशी ग्वाहीदेखील दिली. तसेच शिष्यवृती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.         

    त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत  सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थी फातिमा हिलाल ईनामदार , आदित्य प्रदिप कांबळे, प्रेम अजित चाळके, कृपा अमोल मयेकर, अध्याय अरविंद सकपाळ, आर्या तुकाराम नवरंग, हर्ष प्रविण शिवडे, गार्गी पराग पुरोहित, ओम विश्वास पाटगावकर , अनामेय पर्शुराम देवरुखकर, अल्फाज शामुवेल रांगोळे, हर्ष राजेश पवार या गुणवंतांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र ,भेटवस्तू, मास्क  व पुष्पगुच्छ देऊन गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला.

    विद्यार्थी मनोगत मध्ये अनामेय  देवरुखकर,ओम पाडगावकर आणि गार्गी पुरोहित यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तद्नंतर मान्यवरांच्या मनोगतामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य बाळशेठ जाधव पंचायत समितीच्या सदस्या पूजाताई निकम ,केंद्रप्रमुख दीपक घेतले मुख्याध्यापक अरविंद सकपाळ  यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव करून हे प्रतिष्ठानने यापुढेही  असेच उपक्रम राबवावेत. आणि त्याला आम्ही  संपूर्ण सहकार्य करू असे आश्वासन दिले. तसेच उपस्थित मान्यवर व शिक्षकांनी  प्रतिष्ठानसोबत काम करण्याची ईच्छा व्यक्त केली. व सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.मा. श्री. राष्ट्रपाल सावंत यांनी आपल्या  काव्यात्मक शैलीतून  विद्यार्थ्यांना सुंदर मार्गदर्शन केले व उपस्थितांचे मनोरंजन केले. 

     सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठानचे   संचालक श्री. चंद्रशेखर राऊत , श्री. दिपक खुनम,श्री. प्रकाश भुवड,  श्री. संभाजी निर्मळ,श्री.सुधिर डिके, श्री.अनंत घवाले, श्री. कृष्णा निर्मळ,श्री. बाळू निर्मळ, श्री. विजय सावंत, श्री. अविनाश जाधव श्री. बाबूराव सोळंकी, श्री.विश्वास सोनवलकर श्री. अंकुश चांगण, श्री. अजय जाधव तसेच इतर संचालक पालक,शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव श्री. अरविंद भंडारी ,तसेच सहसचिव श्री. विजय सावंत यांनी आभार मानले

खा. मनोज कोटक यांच्या वाढदिवसानिमित्त मुलुंडमध्ये रक्तदान शिबिर


मुलुंड - 
भूतपूर्व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त तसेच ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा गटनेते व मुलुंड पूर्व प्रभाग क्र १०६ चे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार दि २५ डिसेंबर रोजी मराठा मंडळ सभागृह, मुलुंड पूर्व येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी ईशान्य मुंबई खासदार मनोज कोटक, आमदार मिहीर कोटेचा तसेच सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदात्यांनी यावेळी उस्फुर्त प्रतिसाद करून हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात हातभार लावला.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न



मुंबई:
शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री- उद्धव ठाकरे यांच्या आवाहना नुसार, आणि मुंबईच्या महापौर- किशोरी पेडणेकर यांच्या वाढदिवसा निमित्त, शिवडी विधानसभा अवजड वाहतूक सेना व शिवसेना शाखा क्र १९९ , यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर, नुकतेच शिवसेना शाखा क्र १९९,  ना. म.  जोशी मार्ग, आर्थर रोड नाका  येथे, शाखा प्रमुख-  गोपाळ खाडये  यांच्या मार्गदर्शनाखाली, संपन्न झाले.

       शिबिराचे उद्घाटन प्रमुख अतिथी- ज्येष्ठ पत्रलेखक, मुक्त पत्रकार- बाळ पंडित यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शिवडी विधानसभा अवजड वाहतूक सेनेचे अध्यक्ष- अभिषेक पाटील, सचिव- अनिरुद्ध केळसकर सह, सुशांत पाटील, अमित घाडी, प्रसाद जेधे, मनीष पारधी, कृनाल भोईर, भारत भावे, प्रशांत वाळके, करण पाटील, आदर्श म्हस्के, अक्षय गावकर, दिपक जाधव व शिवसेना शाखेचे विश्वनाथ पांचाळ, रवींद्र रेवडेकर , समृद्धी कोयडे, अंकिता चव्हाण, सिद्धी रेवडेकर, प्रदीप पाटील, व उज्वला    मोरवणकर उपस्थित होत्या. रक्त दात्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते  प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या. शिबिरासाठी, जगजीवन राम हॉस्पिटल ( पश्चिम रेल्वे) चे मोनिका ढोलपुरे, राकेश यादव, हरमीत सिंग कोहली, अन्सारी शिरीन व मन्सूरी सबरुणीसा  यांचे विशेष सहकार्य लाभले.ना.म जोशी मार्ग परिसरातील नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेमार्फत मुंबई पोलिसांना पाणी वाटपाचा कार्यक्रम संपन्न

मुंबई :  ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना (भारत) राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष -मा.प्रकाश डोंगळे साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष,मा.धर्मेंद्र आगरवाल  यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.अनंत हुमणे व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.दाजिसाहेब थोरात   यांच्या मार्गदर्शनाने शुक्रवार दि.२५ डिसेंबर रोजी  मुंबई पोलीसांना  सहकार्य करून एक  सेवा देण्याच्या उद्देशाने  पाणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी  दुपारी  दादर -शिवसेना भवन येथून या  कार्यक्रमास  सुरवात करण्यात आली. याप्रसंगी  संघटनेचे मुंबई अध्यक्ष -हर्ष कौ. जाधव  यांच्या उपस्थितीमध्ये व इतर सर्व पदाधिकारी आणि सभासद यांच्या मदतीने  मुंबईतील  विविध पोलीस स्टेशनला  पिण्याच्या पाण्याच्या बॉटलचे  वाटप करण्यात आले  . असा कार्यक्रम आयोजित करून  ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला . पोलीस बांधवांनी सुद्धा सदर कार्यक्रमास चांगला  प्रतिसाद देऊन संघटनेच्या कामाचे कौतुक केले  व  यात आनंदाने सहभागी झाले.

डॉ. अनिरुद्ध पाटील 'यंग असोसिएट महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्स पुरस्काराने' सन्मानित

रायगड / पेण :  यावर्षी देण्यात आलेल्या 'यंग  असोसिएट  महाराष्ट्र  अकादमी  ऑफ  सायन्स  पुरस्काराने ' रायगड जिल्हा व  पेण  तालुक्यातील उच्चशिक्षित तसेच  तरुणांचे रोल मॉडेल  डॉ. अनिरुद्ध पाटील  यांचा सन्मान करण्यात आला आहे .  रसायनशास्त्र  विषयातील  उल्लेखनीय  संशोधनासाठी  त्यांना  हा  पुरस्कार  देण्यात  आला आहे .  रसायनशास्त्र विषयातील  या  पुरस्कारासाठी  या वर्षी  महाराष्ट्रभरातून ८ तरुण संशोधकांची  निवड करण्यात आली होती. सध्या  स्थितीत  कोरोना प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम घेणे शक्य नसल्याने  ऑनलाईन माध्यमातून   संपन्न  झालेल्या या  सोहळ्यामध्ये  डॉ. पाटील यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला. सदर   पुरस्कार  सोहळा प्रोफेसर  यादव  (अध्यक्ष  महाराष्ट्र  असोसिएशन  ऑफ  सायन्सेस) ह्यांच्या  प्रमुख  उपस्थितीत  पार  पडला.  डॉ. अनिरुद्ध  पाटील  ह्यांनी  ह्या  यशाचे  श्रेय  आपल्या  कुटुंबियांना  व  महर्षी  दयानंद  महाविद्यालयाला  दिले आहे.या  पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नववर्षाचे स्वागत करताना जनतेने कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे- जिल्हाधिकारी निधी चौधरी

अलिबाग,जि.रायगड :- रायगड जिल्हा पर्यटनदृष्ट्या प्रसिध्द असून मुंबई, पुणे, ठाणे सारख्या महानगरांच्या नजिक असल्याने दरवर्षी नाताळ व ३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या स्वागताकरिता मोठ्या प्रमाणात पर्यटक जिल्ह्यात येतात. 

    शासन, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभागाकडील दि.२१ डिसेंबर २०२० रोजीच्या आदेशान्वये राज्यात दि.२२ डिसेंबर २०२० ते दि.०५ जानेवारी २०२१ या कालावधीकरिता सर्व महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

    या पार्श्वभूमीवर संबधित जिल्हाधिकाऱ्यांना कोविड-१९ विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी त्यांच्या कायक्षेत्रात रात्रीची संचारबंदी मुख्य सचिवांच्या पूर्वपरवानगीने लागू करण्याकरिता प्राधिकृत करण्यात आले आहे.

       दि.२५ डिसेंबर २०२० ते दि.०२ जानेवारी २०२१ या कालावधीत असलेल्या सुट्टया तसेच शासनाकडून महानगरपालिका क्षेत्रामध्ये रात्री ११.०० ते सकाळी ६. ०० वाजेपर्यंत लागू करण्यात आलेली संचारबंदी विचारात घेता मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या महानगरातून पर्यटक नवीन वर्षाच्या स्वागताकरिता जिल्ह्यात दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. ही बाब तसेच पोलीस अधीक्षक, रायगड यांनी दि.२१ डिसेंबर २०२० रोजीच्या पत्रान्वये सादर केलेला प्रस्ताव विचारात घेता, रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात कोविड-१९ विषाणूचा प्रादूर्भाव व संक्रमण रोखण्याच्या दृष्टीने गर्दी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता दि.२५ डिसेंबर २०२० ते दि.०५ जानेवारी २०२१ या कालावधीत पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत:- 

१) दि.२८ डिसेंबर २०२० ते दि.०१ जानेवारी २०२१ या कालावधीत मांडवा, रेवस, खारपाडा, वडवली टोल नाका, माथेरान, वाकण फाटा, ताम्हाणी घाट, वरंध घाट व छ. शिवाजी महाराज चौक, पोलादपूर अशा ९ ठिकाणी चेक पोस्टची स्थापना करण्यात येणार आहे. या  चेकपोस्टवर आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे जिल्ह्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांची कोविड-१९ च्या अनुषंगाने प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. 

२) मुरुड तालुक्यातील जंजिरा किल्ल्यावर दि.२५  डिसेंबर २०२०  ते दि.०२ जानेवारी २०२१ या कालावधीत पर्यटकांना प्रवेशास मनाई करण्यात आलेली आहे.

3) शासन, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत  व पुर्नवसन विभागाकडील दि.२१ डिसेंबर २०२० रोजीच्या आदेशान्वये दिलेल्या निर्देशानुसार रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात दि.२५ डिसेंबर २०२० ते दि.०५ जानेवारी २०२१ या कालावधीत रात्री ११.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. 

      ही संचारबंदी रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक स्थळी, नदी, समुद्रकिनाऱ्यावर लागू राहील, जेणेकरुन नववर्षाच्या आनंदमयी क्षणी दुर्घटना घडू नयेत. हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंट इत्यादीं मध्ये कोविड अनुषंगिक नियमांचे पालन करुन नववर्ष साजरा करण्यास प्रतिबंध असणार नाही. 

      तरी ही संचारबंदी नागरिकांची सुरक्षा, पर्यटकांचे हित आणि कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अत्यावश्यक असून नागरिकांनी त्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा २४ एप्रिलला , गावक-यांकडून जय्यत तयारी ; यात्रेचा लाभ घेण्याचे अशोक भोईर यांचे आवाहन

मुंबई(शांत्ताराम गुडेकर ) देवाप्रति श्रद्धा ज्यांच्या मनात वास्तव्य करते अशा व्यक्तीना आपण आस्तिक म्हणून ओळखतो,खरे पाहिले तर मनात भाव व देवा...