आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

दलित युथ पँथरच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निलेश मोहिते यांची निवड

 

मुंबई  - ७० च्या दशकात स्थापन झालेल्या दलित युथ पँथरचे कार्य त्यावेळच्या रिपब्लिकन नेत्याच्या दुहेरी वागणुकीमुळे वाढत गेले.  संघटनेचे संस्थापक ज वी पवार व जेष्ठ नेते राजाभाऊ ढाले यांनी संघटन मजबूत केले. या संघटनेच्या संविधान दिनी झालेल्या सर्वसाधारण सभेत पँथर निलेश मोहिते यांची संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

  दलित पँथरच्या सचिव व प्रवक्ते पदी कार्यरत असताना गेली ४ वर्षे ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. त्यांनी राज्यातील शोषित,पीडित दिन दलितांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याने संघटनेच्या माध्यमातून उभ्या केलेल्या सरकारच्या चुकीच्या धोरणाबद्दल किंवा जातीवादी शक्तीच्या विरोधातील आंदोलने असो ते यशस्वीपणे पार पाडले आहे. म्हणून त्यांच्या या कार्याची कृतवाची दखल संघटनेने घेतली. आणि संघटनेला एक तरुण तडफदार नेतृत्व म्हणून संविधान दिनी सर्वसामान्यांना योग्य न्याय देईल असा चेहरा दिला आहे. पँथर निलेश मोहिते हे निष्ठावंत पँथर असल्यानेच त्याची राज्याच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे असल्याने विशेष करून तरुण वर्गासोबत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद - पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांचे गौरवोद्गार

सातारा (प्रतिनिधी) - कोरोनापासून नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून कार्य करणारे पोलीस दल. या पोलीस दलात दर महिना उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस बंधू भगिनींना "पोलिसमॅन ऑफ द मंथ" हा पुरस्कार देऊन पोलीस डिपार्टमेंट गौरव करते. त्याच पोलीस जवानांचा सन्मान रयतेचे स्वराज प्रतिष्ठानला करण्याची इच्छा आहे तरी त्यास परवानगी मागणारे  पत्र पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्षा- अश्विनी महांगडे यांनी दिले.

   रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षा अश्विनी महांगडे यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेतली.यावेळी संतोष पवार, परवेझ लाड यांनी प्रतिष्ठानच्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या कामाची त्यांना माहिती दिली. पोलिसांमुळे कायदा व सुव्यवस्था राखली जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सदकार्य केले ते पोलिसांनीच. आपण घरात सण साजरे करतो आणि पोलीस मात्र आपल्या रक्षणासाठी घराबाहेर असतात. आपण सगळे कोरोना या महामारीपासून वाचण्यासाठी घरात बसलेलो तेव्हाही पोलीस आपल्यासाठी घराबाहेर होते. रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य मधील सर्व सदस्य हे कायम पोलीस बंधू- भगिनींचा आदर करत आले आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान हे पोलीस डिपार्टमेंट कडून जाहीर होणाऱ्या "पोलिसमॅन ऑफ द मंथ" या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या पोलीस बंधू- भगिनींचा सन्मान करणार आहेत, असा मनोदय व्यक्त करत तसे पत्र दिले. तर कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्न करत आहे. त्यासाठी कोरोनाच्या काळात ऑनलाइन जनजागृती शिबीर आयोजित केले ज्यात आतापर्यंत १०० हुन अधिक महिलांनी सहभाग नोंदवला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती सांगताच पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे,असे गौरवोद्गार काढले.

प्रसिद्ध निवेदक.. द्रष्टा वक्ता कै.तपस्वी राणे यांची शोकसभा भावपूर्ण निरोपात संपन्न...!

मुंबई : जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती, जी जगण्याची प्रेरणा देत होती ..जिच्या वैखरीतून सरस्वती वदत होती अशी मूर्तीमंत पवित्र मूर्ती म्हणजे आमचे सर्वांचे लाडके निवेदक मित्रं.. चतुरस्र आणि हरहुन्नरी कलावंत कै.तपस्वी परशुराम राणे (लाडके तपूदादा) ज्यांचा मोलाचा सहवास हरवला, त्यांच्या अचानक जाण्याने राणे कुटुंबीयांत...वाद्यवृंद क्षेत्रांत , कलाक्षेत्रात तसेच सिने नाट्य सृष्टीत कमालीची पोकळी निर्माण झालेली आहे.. त्यांची आठवण हीं कायमस्वरूपी स्मरणात रहावी या हेतूने  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि सोशल डिस्टन्सचे भान ठेवून रविवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी राशी स्टुडिओ, करिरोड, मुंबई  ४०० ०१२ येथे सकाळी ११.०० ते दुपारी  २.०० च्या दरम्यान शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यां शोकसभेत अनेक दिग्गज कलावंतांनी कै.तपस्वी राणे यांना सुमनांजली वाहून श्रद्धांजलीपर आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी ज्येष्ठ संगीत संयोजक अशोक वायंगणकर, ज्येष्ठ शाहीर कृष्णा खामकर, ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे, निवेदक उमेश सावंत, दिग्दर्शक महेश्वर तेटांबे, अभिनेते विलास (बाळा) चौकेकर,  जयवंत भालेकर, प्रशांत भाटकर, निर्माता सचिन पाताडे, अभिनेत्री उषा साटम, नैना राणे, लावणी सम्राज्ञी मेघा करंगुटकर, कला दिग्दर्शक सुनिल देवळेकर, राकेश शेळके, माझगाव डॉकचे विनय आपटे, तपस्वी बंधू भगवान (सुरू) राणे आदी सर्व कलावंत..तंत्रज्ञ.. वाद्यवृंद कलावंत उपस्थित होती. 


शिक्षक साहित्य संमेलन संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. जयवंत पाटील यांची बिनविरोध निवड

 

मुंबई : शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी, भाषा आणि साहित्य अध्यापनाच्या आशय समृद्धीसाठी आमदार कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिक्षक साहित्य संमेलन संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेतला जातो. या संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. जयवंत पाटील यांची काल झालेल्या ऑनलाईन बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे विश्वस्त लोकशाहीर संभाजी भगत यांनी प्रा. पाटील यांचं नाव सुचवलं तर  तत्कालीन संमेलनाध्यक्षा प्रज्ञा दया पवार आणि विश्वस्त अशोक बेलसरे यांनी अनुमोदन दिले. प्रा. जयवंत पाटील हे दीर्घकाळ शिक्षक म्हणून सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झालेले आहेत. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केलेलं आहे. कवी, साहित्यिक म्हणूनही ते परिचित आहेत. आगरी भाषेतील त्यांच्या कथा प्रसिद्ध आहेत. पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावरही त्यांनी काम केलेलं आहे. सातव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही राहिलेले आहेत.

   प्रा. पाटील यांच्या आधी सुप्रसिध्द साहित्यिका नीरजा या संस्थेच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत मुंबई, ठाणे, बुलडाणा, रत्नागिरी, गोंदिया, विरार येथे नऊ शिक्षक साहित्य संमेलनं दिमाखात पार पडलेली आहेत. काल झालेल्या बैठकीला नवव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा सुप्रसिध्द साहित्यिका प्रज्ञा दया पवार याही होत्या. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आगामी दहावे शिक्षक साहित्य संमेलन ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत विचार सुरू आहे. याबाबत लवकर सविस्तर कळवण्यात येईल, अशी माहिती शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे कार्यवाह मारुती शेरकर यांनी दिली.

खोपटे येथे आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न.

उरण - शिवसेना शाखा खोपटे, सुअस्थ हॉस्पिटल पनवेल, प्रा. व्यंकटेश म्हात्रे प्रतिष्ठान, आगरी कोळी मेडिकोज यांच्या संयुक्त विद्यमान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ उरण तालुक्यातील गणेश मंदिर खोपटे येथे आरोग्य शिबीर मोठया उत्साहात सपंन्न झाले.

   नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, प्रत्येकाला निरोगी व आनंदी जीवन जगता यावे या दृष्टी कोणातून खोपटे गावात नागरिकांचे डायबेटीस (शुगर लेव्हल )व ईसीजी चेकअप करण्यात आले. नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठया प्रमाणात लाभ घेतला. या शिबिराला माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी भेट देऊन सदर उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी शिवसेनेचे महिला तालुका प्रमुख भावना म्हात्रे, कैलास म्हात्रे, उरण शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, शिक्षक  रमणिक म्हात्रे, B N डाकी-तालुका संघटक, तालुका प्रमुख -संतोष ठाकूर, अजीत ठाकूर,  अनंत ठाकूर,  ग्रामपंचायत सदस्य जागृती घरत, राजश्री पाटील, मीनाक्षी म्हात्रे, भावना पाटील, करिष्मा म्हात्रे, शुभांगी ठाकूर, उपसरपंच सुजित म्हात्रे,  डॉ संजीव म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना काळातही नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतल्याने सदर उपक्रमाचे नागरिकांनी आभार मानत कौतुक केले आहे.

कै मधुकर ठाकूर प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न.



उरण -
निष्ठावंत शिवसैनिक स्व. दिलीप मधुकर ठाकूर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कै मधुकर ठाकूर प्रतिष्ठान आवरे यांच्या पुढाकाराने व सर्वोदय रुग्णालय घाटकोपर(मुंबई )येथील समर्पण ब्लड बँक यांच्या सहकार्याने भोलानाथ मंदिर आवरे  तालुका उरण येथे रक्तदान शिबीर उत्तम प्रतिसादासह मोठया उत्साहात संपन्न झाले.

    रक्तामुळे कोणाचा मृत्यू होऊ नये, रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, प्रत्येक गरजू व्यक्तीला वेळेत रक्तपुरवठा व्हावा, रक्त दानाबद्दल जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जपत कै मधुकर ठाकूर प्रतिष्ठान तर्फे आवरे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात जिव्हाळा फॉउंडेशन, गोवठणे विकास मंच, शिवसेना आवरे शाखा, युवा सेना आवरे, आवरे विकास मंचचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यात हिरीरीने सहभाग घेतला.

    सदर कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार मनोहर भोईर, नरेश रहाळकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख, संतोष ठाकूर -तालुका प्रमुख, विजय भोईर -जिल्हा परिषद सदस्य, दिपक ठाकूर -पंचायत समिती सदस्य,उपसरपंच -समाधान म्हात्रे,आत्माराम गावंड -जेष्ठ शिवसैनिक, रमेश म्हात्रे -जिल्हा ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख,सुदेश पाटील -अध्यक्ष श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोली, सुभाष कडू -अध्यक्ष छावा प्रतिष्ठान चिरनेर, सुधाकर पाटील -अध्यक्ष उरण सामाजिक संस्था, उरण,रायगड भूषण -राजू मुंबईकर, सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, संपेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते -संतोष पवार,सरपंच -नीराताई पाटील, सरपंच -विश्वास तांडेल,ग्रामपंचायत सदस्य -संतोष पाटील  सामाजिक कार्यकर्ते-प्रभाकर म्हात्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    दरवर्षी आवरे येथे कै मधुकर ठाकूर प्रतिष्ठान आवरेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी  भोलानाथ मंदिर आवरे येथे मोठ्या उत्साहात  संपन्न झालेल्या या  रक्तदान शिबिरात एकूण 76 दात्यांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला असून सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी कै मधुकर ठाकूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष कौशिक ठाकूर,सदस्य -महेश गावंड, दिलेश ठाकूर, दीपेश ठाकूर, अविनाश ठाकूर, गणेश ठाकूर, अमित म्हात्रे, जिव्हाळा फॉउंडेशनचे अध्यक्ष -रुपेश पाटील, कार्याध्यक्ष -पंकज ठाकूर,सचिव -अनिल ठाकूर,  सदस्य -प्रताप म्हात्रे, गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष सुनील वर्तक, उपाध्यक्ष -अनंत वर्तक, खजिनदार -संदीप पाटील, सदस्य -प्रेम म्हात्रे, आवरे विकास मंचचे अध्यक्ष करण ठाकूर आदींनी विशेष मेहनत घेतली आहे.

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२०

भारतासाठी खडतर दौरा

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन वन डे, तीन टी२० आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. कोरोनामुळे मागील आठ ते नऊ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळणाऱ्या भारतासाठी हा दौरा खडतर ठरणार आहे याचा प्रत्यय पहिल्याच वन डे सामन्यात आला. सिडनी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६६ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांची पिसे काढत तब्बल ३७५ धावांची मजल मारली. कर्णधार ऍरॉन फ्लिच आणि माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ यांनी धमाकेदार शकते झळकावली तर डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी आक्रमक खेळ  करून त्यांना उत्कृष्ट साथ दिली. भारताचे सर्वच गोलंदाज अपयशी ठरले. भारतीय क्षेत्ररक्षकांनी चार झेल सोडून त्यांच्या धावा वाढवण्यात हातभारच लावला.  भारतीय फलंदाजांनी देखील निराशा केली. सुरवात चांगली होऊनही मधली फळी कोलमडली. मयांक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर हे लवकर बाद झाल्याने भारतीय संघ दबावात आला त्यातून हार्दिक पांड्या व शिखर धवन यांनी सावरण्याचा प्रयत्न केला पण तोवर खूप उशीर झाला होता. या सामन्यात भारतीय संघ सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरला. १९९१-९२ साली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला गेला असताना जी जर्सी  वापरली तीच जर्सी यावेळी  भारतीय संघाने वापरून स्वतःला  रेट्रो लूक देण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यावेळी भारतीय संघाचा जो परफॉर्मन्स होता तसा होऊ नये हीच क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे कारण हा दौरा भारतीय संघासाची परीक्षा पाहणारा ठरणार आहे. मागील ऑस्ट्रेलियन दौऱ्यात भारताने वन डे आणि कसोटी मालिकेत विजय मिळवला होता पण त्यावेळी त्यांच्या संघात स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर नव्हते यावेळी ते संघात आहेत त्यामुळे त्यांची फलंदाजी  मजबूत बनली आहे याचा प्रत्यय पहिल्याच सामन्यात आला आहे. भारतीय संघ देखील मागील वर्षीप्रमाणे बलवान राहिलेला नाही. धोनी, युवराज, रैनाच्या निवृत्तीनंतर आधीच कमकुवत झालेला भारतीय संघ रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे खूपच अडचणीत आला आहे. रोहित शर्मा हा भारताचा मुख्य फलंदाज आहे त्याची ऑस्ट्रेलिया विरुद्धची कामगिरी देखील  अप्रतिम अशीच आहे त्याची अनुपस्थिती भारताला मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे त्यात पहिल्या कसोटीनंतर विराट कोहली पितृत्वाच्या रजेवर जाणार आहे त्यामुळे भारतासाठी कसोटी मालिका जिंकणे मोठ्या जिकरीचे ठरणार आहे. ऑस्ट्रेलिया मधील खेळपट्ट्याही भारतीय खेळाडूंना पोषक नाहीत. तिथे उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्या असल्याने भारतीय फलंदाजांच्या मर्यादा उघड होतात. तंत्रशुद्ध फलंदाजच तिथे यशस्वी होतात हा इतिहास आहे त्यामुळे भारतीय संघाची यावेळी मोठी कसोटी लागणार आहे. 

-श्याम ठाणेदार,दौंड जिल्हा पुणे

११व्या भारतीय अवयवदान दिनानिमित्त महाराष्ट्राचा गौरव

मुंबई : ११व्या भारतीय अवयवदान दिनाच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२० रोजी केंद्र शासनाचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण संस्था (NOTTO) यांच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अवयवदानाच्या मोहिमेत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या संस्थांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे, प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, अतिरिक्त अभियान संचालक डॉ सतीश पवार, सहाय्यक संचालक डॉ अरुण यादव आदी मान्यवर राज्य शासनाच्या वतीने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. अवयवदान मोहिमेत कार्यरत असणाऱ्या देशाच्या विविध राज्यांतील संस्थांनी या कार्यक्रमास ऑनलाइन उपस्थिती लावली. तसेच महाराष्ट्रातील ROTTO-SOTTO या अवयवदान उपक्रमातील अग्रगण्य संस्थेने अवयवदान करणाऱ्या दात्यांच्या कुटुंबांचा सत्काराचा कार्यक्रम मुंबईच्या केईएम रुग्णालयात एका छोटेखानी कार्यक्रमाद्वारे आयोजित केला होता व सदर कार्यक्रमदेखील केंद्र शासनाच्या मुख्य कार्यक्रमास ऑनलाईन जोडण्यात आला होता. याप्रसंगी मेंदूमृत दात्यांचे नातलग सौ रंजना राजकुमार भोईर, श्री गणेश कुमार जाधव आणि श्री महेश विजय येरूनकर यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. केंद्र शासनाच्या वतीने यावेळी महाराष्ट्रातील दोन संस्थांना (ROTTO आणि SOTTO) त्यांच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुरस्कृत करण्यात आले. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ राजेश टोपे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ज्यात त्यांनी प्रथमतः अवयवदान मोहिमेत काम करणाऱ्या डॉक्टर्स, हॉस्पिटल्स व योगदान देणाऱ्या इतर सर्वांचेच अभिनंदन केले. तसेच अवयव प्रत्यारोपण कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून त्यासाठी मार्गदर्शक सूचना व ग्रीन कॉरिडोअर सुविधा राज्यात पूर्ण क्षमतेने उपलब्ध आहेत असेदेखील त्यांनी विषद केले. अवयवदान पार पडल्यानंतर गरीब रुग्णांची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेण्यासाठी, अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच ५०० किमी पेक्षा अधिक अंतरासाठी हवाई मार्गे अवयव स्थानांतरासाठी केंद्र शासनाकडून आर्थिक साहाय्य राज्याला उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे मत अत्यंत यावेळी मांडले. महाराष्ट्राला अवयवदानातील दोन पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी केंद्र शासनाचे आभारदेखील मानले. केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी डॉ सुनील खापर्डे यांनी केईम रुग्णालयात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात महाराष्ट्रातील पुरस्कार प्राप्त दोन संस्थांना केंद्र शासनाच्या वतीने पुरस्कार दिले. यावेळी राज्याच्या आरोग्य विभागाचे अवयव प्रत्यारोपण शाखेचे सहाय्यक संचालक डॉ अरुण यादव, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख, ROTTO SOTTO च्या संचालिका डॉ सुजाता पटवर्धन, माजी संचालक डॉ रोबो गाजीवाला, सहसंचालक डॉ आकाश शुक्ला, ZTCC चे प्रतिनिधी, ROTTO SOTTO चे सल्लागार समितीचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. 


द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे जिल्हास्तरीय युवा महोत्सव.

उरण- कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध 'द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन' या संघटने तर्फे खेळाडू , कलाकार,गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना,कौशल्यांना वाव देण्यासाठी,स्पर्धेतुन उतमोत्तम  गुणीजण खेळाडू, कलाकार तयार करण्याच्या अनुषंगाने बुधवार  दि 20/01/2021 ते रविवार  24/01/2021 दरम्यान वीर सावरकर मैदान, उरण शहर ता:उरण, जिल्हा-रायगड येथे सोशल व फिसिकल डिस्टन्स ठेवून शासनाचे आदेश पाळत जिल्हा स्तरीय 20 वा युवा महोत्सव 2021 चे आयोजन करण्यात आले आहे.

     द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक गुणवंत राज्यस्तरीय, राष्ट्रीय खेळाडू, कलावंत, कलाकार तयार झाले आहेत. खेळाडू, कलाकार आदि स्पर्धकांसाठी एक उत्तम व्यासपीठ(प्लेटफॉर्म) मिळवून देण्याचे काम द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनने केले आहे. दरवर्षी या स्पर्धेस या युवा महोत्सवाला सर्व राजकीय पक्षाचे नेते,सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते,सिने अभिनेते आवर्जून भेट देत असतात. कोणताही भेदभाव न करता राजकीय पक्ष विरहित असा हा महोत्सव असल्याने दरवर्षी या युवा महोत्सवाला जनतेचाही उत्तम प्रतिसाद मिळतो.दरवर्षी होणाऱ्या युवा महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिंना द्रोणागिरी पुरस्काराने सन्मानित केले जाते.यंदाही विविध व्यक्तिंना द्रोणागिरी पुरस्काराने गौरविले जाणार आहे. यंदा 20 ते 24 जानेवारी  2021 दरम्यान वीर सावरकर मैदान उरण येथे 20 व्या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये डान्स, आर्चरी स्पर्धा, एथलेटिक्स स्पर्धा, देशी खेळ, मैदानी खेळ आदि 110 हुन वेगवेगळ्या स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे.कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सोशल व फिसिकल डिस्टन्स पाळून, शासनाचे नियम पाळून हा युवा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.विशेष म्हणजे या रायगड जिल्हास्तरीय युवा महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत खेळाडू कलाकार, विविध क्षेत्रातील व्यक्ति यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी द्रोणागिरी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक आदि क्षेत्राशी सबंधित विविध स्पर्धांचा समावेश असतो. अश्या या जिल्हा स्तरीय स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडू, कलाकार व स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी केले आहे.

      स्पर्धेसाठी प्रवेशिका स्विकारण्याची अंतिम तारीख 16 जानेवारी 2021 असून स्पर्धकांनी आपले अर्ज व नाव नोंदणी गौरीनंदन अपार्टमेंट, शॉप नंबर 7,चारफाटा उरण जि-रायगड पिन 400702,

ऑफिस फोन नंबर-02227224498 येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 यावेळेत करायचे आहे dronagiri.sports@gmail.com या ईमेल द्वारेही प्रवेशिका स्वीकारण्यात येईल.अधिक माहितीसाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे खजिनदार शिवेंद्र म्हात्रे-8291616826,क्रीडा प्रमुख भारत म्हात्रे-9619596456

फारुख खान-8652603405 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन.


उरण - 
उरण तालुक्यातील  कोटनाका-काळाधोंडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पा करिता रेल्वे व सिडको प्रशासन मार्फत संयुक्त रित्या  संपादित करण्यात आली त्याबदल्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कोणतेही नुकसान भरपाई मिळाले नाही.त्यामुळे आक्रमक झालेल्या संतप्त शेतकऱ्यांनी आज दि 27/11/2020 रोजी  कोटनाका येथे रेल्वे प्रकल्पाचे काम बंद केले आहे. जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत काम सुरु होऊ देणार नाही.तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास साखळी उपोषणाचा इशारा स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाचे पदाधीकारी कार्यकर्त्यांनी दिला आहे.यावेळी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नवनीत भोईर,  हेमदास गोवारी,  निलेश पाटील, सुनील भोईर,  सुरज  पाटील, भालचंद्र भोईर,  महेश भोईर,  कृष्णा जोशी,  निलेश पाटील, पुरषोत्तम पाटील, सुरेश पाटील,  चेतन पाटील,  प्रसाद गोवारी, अजित भोईर, राजेश भोईर आदी  स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोनावर लॉक डाऊन हे उत्तर नाही

मुंबई, दादासाहेब येंधे: राज्यातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाउन ३१ डिसेंबर पर्यंत वाढवण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने घेतला. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यात यापूर्वी जाहीर केलेल्या सवलती कायम राहणार आहेत. १६ नोव्हेंबर रोजी धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तोही कायम राहणार आहे. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये बंधने असतील. ३१ डिसेंबर नंतर पुढील स्थिती पाहून योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.

रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी पनवेल संघर्ष समितीचा 45 रस्त्यांचा प्रस्ताव ; जिल्हा परिषदेने पनवेल-उरण तालुक्यातील रस्त्यांचा आराखडा मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना केला सादर

 पनवेल: दळणवळणाचे साधन असलेल्या पनवेल-उरण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 45 रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. ते रस्ते नव्याने तयार करण्यात यावेत म्हणून पनवेल संघर्ष समितीने जिल्हा परिषदेकडे तगादा लावला होता. जिल्हा परिषदेने अंदाजे 18 कोटी 68 लाखांचा आराखडा करून ते रस्ते जिल्हा नियोजन समितीतून करण्यात यावेत, म्हणून प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला आहे. त्याची एक प्रत पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांना पाठविण्यात आली आहे.

      11 जुलैला जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्यासोबत पनवेल संघर्ष समितीने पनवेल येथे महत्वपूर्ण बैठक घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी कोरोनाचा कहर माजल्याने कामांना खीळ बसली.

      गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याशी सातत्याने संवाद साधून कडू यांनी पाठपुरावा केला. डॉ. पाटील यांनी हे रस्ते लवकरच उत्तमरित्या करण्याचे आश्वासन कडू यांना दिले. त्यानुसार बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता के. वाय. बारदेस्कर यांना निर्देश देवून जिल्हाधिकारी तथा नियोजन समितीच्या सदस्य सचिव असलेल्या निधी चौधरी यांच्याकडे निधी आणि मंजुरीकरिता प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.

      हे 45 रस्ते ग्रामिण रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेंतर्गत लेखाशीर्ष 3054/5054 सन 2020-2021 मध्ये समाविष्ट करण्यात यावेत असे म्हटले आहे.

पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी शहरांच्या तुलनेत ग्रामिण भागातील दळणवळणाचा दर्जा असणारे रस्ते व्हावेत असा संकल्प करून पनवेल आणि उरण तालुक्यातील 45 रस्त्यांसाठी कंबर कसून नागरिकांना दिलासा दिला आहे.

रस्त्यांची नावे पुढील प्रमाणे असून कंसात अंदाजे लाखात खर्च नमूद केले आहे.

1) कल्हे ते रानसई (64 लाख), 2) अरीवली-आष्टे, भाताणपाडा नारपोली ते राज्य महामार्ग (48.15)

3) वाकडी-चिंचवली तर्फे वाजे, दुंदरे-शिवणसई-आंबे तर्फे वाजे- गाडे (20. 55),4)चिखले-मोहो-विहिघर (20)

5) रिटघर- खानाव (48.60),6) शिवकर-पाली रस्ता (36.60),7) वावंजे ते राज्य महामार्ग (32.30)

8) आदई जोड रस्ता (34.60),9) शांतीवन ते इतर जिल्हा मार्ग (45),10) चिंचवळी ते वाजे जोड रस्ता (15.30)

11) पारपुंड जोड रस्ता (20),12) भिंगार भेरले-कातकरी वाडी जोडरस्ता (29.60),13) पोयंजे ते मोहपे रस्ता (34.60),14) खानावळे ते कातकरवाडी रस्ता (20.30),15) बारवई-कातकर वाडी मार्ग (12.30),16) सोमटणे-दहीवली ते राज्य मार्ग (40.60), 17) कसळखंड जोडरस्ता (39.60), 18) नांदगाव जोडरस्ता (75), 19) कुडावे- वाडवली रस्ता (40.60), 20) तुरमाळे- बुद्धवाडी रस्ता (35), 21) शिरढोण ते शिरढोणपाडा रस्ता (54.60)

22) चिंचवण कातकरवाडी जोडरस्ता (18.80), 23) गुलसुंदे-आकुळवाडी जोडरस्ता (54.60), 24) बारापाडा जोडरस्ता (69.60), 25) लाडिवली जोडरस्ता (13.30), 26) कुंडेवहाळ जोडरस्ता (18), 27) पनवेल डोंबाला कॉलेज जोडरस्ता (37.50), 28) डांगरण कातकरी वाडी (22.10), 29) घोसालवाडी जोडरस्ता (29.60), 30) दुंदरेपाडा तामसई रस्ता (75), 31) पनवेल वावंजे ते एमआयडीसी तळोजा रस्ता (30), 32) तुराडे कातकरवाडी रस्ता (22.10), 33) अजिवली पीएससी जोडरस्ता (18), 34) हेदुटणे जोडरस्ता (96.60),. 35) वावंजे कातकरवाडी रस्ता (29.60),  36) केळवणे-बौद्धवाडी रस्ता (5.53), 37)दिघाटी जोडरस्ता (32.60), 38) सारसई- माडभोम रस्ता (64.60), 39) भोकरपाडा जोडरस्ता (29.60), 40) ठोंबरेवाडी जोडरस्ता (29.60), 41) विचुंबे-उसर्ली रस्ता (54.60), 42) अरीवली जोडरस्ता (29.60), 43) साई जोडरस्ता (21. 60), 44) तारा हायस्कूल जोडरस्ता (24.60), 45) सारसई जोड रस्ता (46.70)

   असे 18 कोटी 68 लाख रुपयांच्या रस्त्याची कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव देण्यात आला असून यातील काही रस्यांचे कॉंक्रीटीकरण, डांबरीकरण, पेव्हर ब्लॉक बसविण्यात येईल अशी माहिती डॉ. किरण पाटील आणि बारदेस्कर यांनी कांतीलाल कडू यांना दिली आहे.

संघटनेच्या कामकाजाबाबत चर्चा


मुंबई :
ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना ( भारत ) संस्थापक अध्यक्ष श्री. प्रकाश डोंगळे  यांच्या उपस्थित बुधवार दि-२४ नोव्हेंबर  रोजी मुंबई पायधुनी पोलीस स्टेशन नजीक  भेट घेण्यात आली.या भेटीदरम्यान  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. अनंत हुमणे , महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. दाजिसाहेब थोरात ,  पालघर जिल्हा अध्यक्ष श्री. राजेंद्र वेदांत उपस्थित होते.यावेळी संघटनेच्या काही ठराविक मुद्यावर चर्चा करण्यात आली. 

डोंगळे सर यांनी पुढील कामकाज कसा करायचा ह्या विषयवार सविस्तर चर्चा केली. तसेच अनंत हुमणे, दाजिसाहेब थोरात व राजेंद्र वेदांत यांनी सुद्धा संघटने संदर्भात मार्गदर्शन केले.साधारण दीड तास चाललेल्या या चर्चेत लवकरच जिल्हा अंतर्गत संघटनेच्या पदाधिकारी व सदस्य यांचे मेळावे घेण्यात येतील असे  निर्णय घेण्यात आले.

"आईची सावली बालभवन"अनाथ आश्रमाला"जनजागृती सेवा समितीच्यावतीने"मास्क, सॅनिटायझर,हॅन्ड वाॅश व खाऊ वाटप.

 


टिटवाळा
 -कोरोना संसर्गामुळे सर्वच त्रस्त आहेत.कोविड-१९ नुसार मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड वाॅश ही त्रिसुत्री सर्वानांच अनिवार्य आहे.त्याच अनुषंगाने टीटवाळा येथील आईची सावली बालभवन अनाथ आश्रमातील मुलांना जनजागृती सेवा समितीच्यावतीने मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड वाॅश व खाऊ वाटप नुकताच करण्यात आले. याप्रसंगी अखिल भारत हिंदु महासभा, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अॅड.रणधिर सकपाळ,स्वराज्य रणरागिणी मंडळ सदस्या व श्रावणी बेबी सेटींगच्या संचालिका सौ.सुप्रिया आचरेकर,प्रथमेश कडव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांच्याच हस्ते मुलांना मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड वाॅश व खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी सीमा गुरुंग,हेमलता कोरडे, राधा गुप्ता या कार्यकर्त्या  उपस्थित होत्या.या उपक्रमासाठी कार्यकारिणी सदस्या सौ.श्रुती उरणकर, राहुल अॅकॅडमी ऑफ डायनॅमिक अॅक्टीव्हीटीजचे संचालक व विद्यार्थी मित्र दिपक राणे,कार्यकारिणी सदस्य महेश्वर तेटांबे, समाजसेविका सिंधुताई वायचळ काकु,अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांचे राईटस ऑफ वुमेन फाऊंडेशनच्या संचालिका दिपा गांगुर्डे यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. व शेवटी सर्वांचे आभार मानले.


गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

जातिनिहाय जनगणना झाली तर ओबीसींची सर्वांगीण उन्नती निश्चित

        बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार असणारा ओबीसी समाज गेली नव्वद दशके संविधानिक हक्क, अधिकारांपासून कायम दूर राहिला आहे. हातात विविध कला कौशल्ये आणि प्रचंड अंगमेहनतीची तयारी असलेला हा समाज ३,७४३ जातीत विभागला आहे. एकंदरीत ओबीसी समाजाचे सामाजिक,शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक बाबतीत पूर्णपणे शोषण झालेचे चित्र स्पष्ट आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार, राहणीमान, अन्नपुरवठा, औद्योगिक उत्पादन आणि कृषीउत्पादन इ.क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी असंख्य प्रलंबित मागण्या घेऊन ओबीसी समाज आज आपल्या अस्तीत्वाची लढाई लढत आहे.


    यामध्ये ओबीसींचा स्वतंत्र जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असून जर जातिनिहाय जनगणना झाली तर निश्चितच ओबीसी समाजाला सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही असे मत ओबीसी संघर्ष समन्वय समिती दापोली तालुका संपर्क प्रमुख विशाल मोरे यांनी व्यक्त केले आहे. धर्म,स्त्री-पुरुष, जात, कुटुंब-रचना, शिक्षण, स्थलांतर, वैवाहिक स्थिती,उदरनिर्वाह सारख्या अत्यंत अत्यावश्यक बाबींची सखोल माहिती आपल्याला जनगणनेतून कळते. जनगणना हा देशाच्या विकासाच्या बाबतीतला सर्वात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. घटनेप्रमाणे लोकसंख्येनुसार देशातील प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व देण्याचे हे माध्यम आहे. जातिनिहाय जनगनणेसहित,विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळावी,नॉन क्रिमिलीअर अट रद्द व्हावी,मराठ्यांचे ओबीसीकरण करु नये,एमपीएससी व इतर स्पर्धा परिक्षा तात्काळ सुरु कराव्यात, केंद्राप्रमाणे सुधारित बिंदू नामावली लागू करणे,मेगा भरती, ओबीसी महामंडळ व महाज्योती संस्थेस भरीव निधी व पदोन्नती आरक्षण यासारख्या असंख्य मागण्यांसाठी ओबीसी समाज आक्रमक झाला असून आपल्या भावी पिढीसाठी प्रचंड संघर्ष करत आहे.

     देशातील ओबीसी समाज आता जागृत झाला असून संवैधानिक हक्क अधिकारांसाठी तो रस्त्यावर उतरला आहे. ओबीसींच्या मुख्य नेत्यांची राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्ववजी ठाकरे यांच्या समवेत नुकतीच बैठकही पार पडली असून मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या मागण्यांना हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र यामध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणी किती होते याकडे ओबीसी समाजाचे लक्ष लागले आहे. 

-- विशाल मोरे

आम्ही शिवभक्त परिवार तर्फे अनाथ बालकांना दिवाळी फराळ ,अन्नधान्य ,दैनंदिन वस्तूंचे वाटप

मुंबई : अनाथ व गरजू  बालकांची सर्वांगीण उन्नती साठी सदैव असलेले सत्कर्म आश्रम बदलापूर येथील  बालकांसाठी "आम्ही शिवभक्त परिवारा" तर्फे दिवाळी फराळ, अन्नधान्य, दैनंदिन वापरातील वस्तू, व काही रोख रक्कम देण्यात आली. 

 आश्रमात वय वर्ष ६ ते १४ वयोगटातील मुले आहेत,  खरंतर आई वडिलांच्या सानिध्यात १४ वर्षापर्यंत खेळणं, बागडणं, मस्ती करणं हेच वय असतं.परंतु आश्रमातील ही  मुले आज आई - वडिलांचं छत्र हरपल्यामुळे स्वतः कठोर  होऊन मिळेल त्या गोष्टीत आनंद घेत आपलं आयुष्य घालवत आहेत. इथे प्रत्येक मुलाला जबाबदारीची जाणीव आहे. या मुलांबद्दल खूप सारं लिहण्यासारखं आहेच, पण मी बोलेन तिथे जाऊन प्रतक्ष अनुभव घ्या, त्या मुलांसोबत  बोला, त्यांचे एक दिवसाचे मित्र बना.....

तसेच सालाबादप्रमाणे "आम्ही शिवभक्त परिवारातील" छोटे सदस्य माझा मुलगा कु.#देवांश #दीपेश #दळवी याचा वाढदिवस सत्कर्म आश्रमातील मुलांसोबत करण्यात आला.या कार्यक्रमाला आलेल्या परिवारातील सर्व  शिवभक्तांचे आभार व मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवासाला काही शिवभक्तांना  सरकारी नियमानुसार परवानगी नसल्याने इच्छा असूनही उपस्थितीत राहू शकले नाहीत. त्यांचे सुद्धा आभार. तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी या उपक्रमात आर्थिक व  वस्तुरूपात मदत केली त्यांचे सुद्धा आभार.

ओबीसींची संघर्ष वारी.. आमदारांच्या दारी मोहिमेअंतर्गत मुलुंड विधानसभा क्षेत्राचे आमदार मिहीर कोटेचा यांना निवेदन सादर

मुलुंड :  ओबीसी संघर्ष समन्वय समिती आणि व्हिजेएनटि मार्फत राज्यातील २८८ विधानसभा सदस्य व ६६ विधान परिषद सदस्यांना होऊ घातलेली जातिनिहाय जनगणना तसेच ओबीसी समाजाचे असंख्य प्रलंबित प्रश्नांबाबत विधानसभेत आणि विधानपरिषदेत ओबीसींची प्रामुख्याने बाजू मांडण्याकरीता गुरुवार दि.२६ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यातील सर्व आमदारांच्या कार्यालयावर तसेच घराबाहेर निवेदन देण्याकरिता ओबीसी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 सदर निवेदनातील तपशील वाचून ओबीसींची निवडक प्रतिनिधी समवेत सकारात्मक चर्चा करुन आगामी विधानसभेच्या अधिवेशनात तांत्रिक बाबींना अधिन राहून ओबीसींची बाजू नक्कीच लावून धरु असे मा.आमदार मिहीर कोटेचा यांनी ओबीसींच्या शिष्टमंडळास आश्वस्त केले.

 यावेळी मुलुंड कुणबी समाजाचे अध्यक्ष विनायक घाणेकर, कुणबी समाज विकास संघ १८ गाव उन्हवरे विभागाचे सरचिटणीस नरेश घरटकर, युवाध्यक्ष विशाल मोरे,पांडुरंग गावडे,शंकर बाईत,विनायक मांडवकर,सुनील मांजरेकर,जिगर पाटील,अशोक पानकर, मनेश मोरे, सुलक्षणा घाणेकर, संजिवनी भुवड,स्मिता भागणे, विनोद टेमकर,रविंद्र मांडवकर,चंद्रकांत घडशी, चेतन मांडवकर, हरेश घावट,बबन रहाटे आदी ओबीसी प्रतिनिधी उपस्थित होते.

एन.जी पार्क येथील मुलांनी उभारलेल्या तोरणा किल्ला बघण्यास नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद

 

मुंबई(समीर खाडिलकर/शांत्ताराम गुडेकर  )

        दिवाळीची चाहूल लागताच लहानग्यांपासून ते अगदी थोरामोठ्यांपर्यंत सर्व जण अनेक जण फटाके फोडण्याचे फराळावर ताव मारण्याची त्यासोबत किल्ले बांधण्याचे वेध लागते. दिवाळी निमित्ताने किल्ले बांधण्याची स्पर्धा देखील आयोजित केली जाते. दिवाळी किल्ले बांधण्याची परंपरा आजही जीवत आहे.  मुंबई उपनगरात ठिकठिकाणी किल्ले बांधण्यात आले आहे.दिवाळी म्हणजेच आनंद मांगल्याचा आणि रोषणाईचा सण परंतु या सोबतच आपली प्राचीन परंपरा प्राचीन इतिहास जपण्याचा प्रयत्न देखील या सणाच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येत आहे. खरे तर दिवाळीच्या काळात ज्या सुट्ट्या पडतात त्या वेळेला लहान मुलांना वेध लागतात ते किल्ले बनवायचे आणि सुट्टीत फावल्या वेळेत ही मुले एकत्र जमून किल्ले बनवताना ठीक ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत या महाराष्ट्राची शहान असलेले जंजिरा, शिवनेरी, राजगड आदी किल्ले बच्चेकंपनी सकारतात.

             मुंबईतील बोरीवली पूर्व विभागातील  एन.जी पार्क संकुल येथेही तोरणा किल्ला उभारण्यात आला होता. शिवाजी महाराज यांचा इतिहास व गडकिल्ले यांची सखोला माहीती येणाऱ्या पिढिला मिळावी शिवाय आपली संस्कृती पिढ्यान पिढ्या जपली जावी हा एकमेव उद्देश किल्ले उभारण्यामागचा असतो.एन.जी पार्क संकुल येथील तोरणा किल्ला उभारण्यासाठी तेजश सोड्ये,हेमंत नेवगी,हेमंत गुप्ता,शुभम आरेकर,दिपक सोड्ये,सुशील सिंह,हर्षद निकुले,हर्षल हिलेकर,आदेश आनगरे,संदेश डोके,यश गोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.शिवाय यासाठी एन.जी पार्क संकुल पदाधिकारी व रहिवाशी यांनी मोळाचे सहकार्य केले.हा तोरणा किल्ला पहाण्यासाठी नागरिकांकडून व स्थानिक रहिवाश्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.किल्ले हे महाराजांचे कर्तृत्वाचे प्रतीक आहे. यामुळे प्रत्येकांनी हा इतिहास जाणून घेतला पाहिजे. येणाऱ्या पिढीला या किल्ला बांधणीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम सांगता येतात. किल्ला बांधणीमुळे आम्हाला महाराष्ट्रतील किल्ल्याचा अभ्यास करायला मिळतो. गेल्या  ४ वर्षांपासून आम्ही हे किल्ले बनवत आहोत असे मुलांनी सांगितले.

१ जानेवारी २०२१ च्या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर ; उरण तालुक्यात मतदार नाव नोंदणी पुनरिक्षण कार्यक्रम.

 उरण -भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी, २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादीचा पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

  दि.१७ नोव्हेंबर २०२० ते १५ डिसेंबर २०२० दरम्यान हरकती व दावे स्विकारले जातील. मतदारयादीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी  नागरिकांनी फॉर्म नं.०६ भरुन देणे आवश्यक आहे. मयत व स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्यासाठी फॉर्म नं.०७ भरावे,  मतदारयादीत वय, लिंग, नाव यामध्ये दुरुस्ती असेल तर फॉर्म नं.०८ भरुन दयावयाचा आहे.राहण्याचा पत्ता बदली करावयाचे असेल तर  ८ अ फॉर्म भरावे.अशी माहिती आश्विनी पाटील मतदार नोंदणी अधिकारी उरण यांनी दिली आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून नाव  नोंदणी अथवा संबंधित ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी www.nvsp.in या पोर्टलचा वापर करता येईल. अंतिम मतदार यादी दि.१५ जानेवारी २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. मतदार यादीत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे अथवा नोंदी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन आश्विनी पाटील, १९०- उरण मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी(भूसंपादन )मेट्रो सेंटर क्र- १, उरण यांनी नागरिकांना केले आहे.

उरण मधील माणकेश्वर मंदिराची यात्रा रद्द

उरण - आता उरणमध्ये विविध भागात यात्रा सुरु होणार आहेत त्याची सुरवात माणकेश्वर यात्रेपासून सुरु होते. दरवर्षी होणारी उरण तालुक्यातील केगाव येथील प्रसिद्ध शिवमंदिर अर्थातच माणकेश्वर मंदिराची यात्रा यंदा रद्द करण्यात आलेली आहे. कोरोना विषाणू संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तसेच उरणचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी भाऊसाहेब अंधारे यांच्या कार्यालयीन दि २३/११/२०२० रोजीच्या आदेशानुसार रविवार दि २९/११/२०२० रोजी साजरा करण्यात येणारी माणकेश्वर मंदिराची वार्षिक यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन माणकेश्वर मंदिर शनिवार दि २८/११/२०२० व रविवार  दि २९/११/२०२० रोजी दर्शनाकरिता  बंद ठेवण्याचा निर्णय श्री माणकेश्वर देव ट्रस्ट केगाव तर्फे घेण्यात आला आहे. श्री माणकेश्वर देव ट्रस्ट तर्फे घेण्यात आलेला निर्णय स्तुत्य व स्वागतार्ह व आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा असला तरी यात्रेचा आनंद लुटणारे हवसे, नवसे, गवसे यात्री, भाविकभक्त, पर्यटकांमधून या निर्णयाबाबत नाराजीचा सुरु उमटत आहे.दरवर्षी भरणाऱ्या या यात्रेत मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक,रायगड जिल्हा आदी विविध भागातून भाविक भक्त येत असतात यंदा मात्र यात्राच रद्द झाल्याने  या भाविकभक्तांना यात्रेत सहभागी होता येणार नाही. यात्रेचा आनंद लुटता येणार नाही.भाविकभक्तांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची काळजी घेत उरणमध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये या अनुषंगाने ही माणकेश्वराची यात्रा रद्द करण्यात येत असल्याचे श्री माणकेश्वर देव ट्रस्ट केगाव तर्फे सांगण्यात आले आहे.

मुंबई लोकलचा निर्णय १५ डिसेंबरनंतरच

मुंबई, दादासाहेब येंधे : सर्वांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी होत असली तरी १५ डिसेंबरनंतरच त्याबाबत विचार होणार आहे. अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी माध्यमांशी बोलताना तीन ते चार आठवड्यानंतर लोकल सर्वांसाठी खुली करण्याचा विचार केला जाऊ शकतो, सांगितले.

रोजच्या व्यवहारांना मिळालेली परवानगी आणि थंडीमुळे कोविड चा संसर्ग वाढण्याच्या शक्यतेमुळे लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी तूर्तास सुरू होणार नाही. राज्याच्या टास्क फोर्सने दिवाळीच्या तीन आठवड्यांनंतर लोकल सेवेबाबत निर्णय घेण्याची शिफारस केली आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येईल असे इक्बाल सिंह यांनी स्पष्ट केले.

सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणे येथे २६/११ ला शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली



मुंबई, दादासाहेब येंधे : 
२६/११/२००८ रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी सायंकाळचे सुमारास सीएसएमटी रेल्वे स्टेशन येथे व मुंबई शहरात केलेल्या भ्याड हल्ल्यात, सीएसएमटी  रेल्वे पोलीस ठाण्याचे तत्कालीन  पोलीस निरीक्षक कै. शशांक शिंदे हे ऑन ड्युटी असताना शहीद झाले होते.

 त्यांचे फोटोस पुष्पचक्र व श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आज सकाळी ठीक १०.३० वाजता पोलीस ठाणे समोरील आवारात पार पडला.यावेळी मा. पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई, सहाय्यक पोलीस आयुक्त, सीएसएमटी विभाग, लोहमार्ग, मुंबई, पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे, ०३ पोलीस उप निरीक्षक व ४५ पोलीस अंमलदार तसेच मुख्यालय घाटकोपर येथील बँड पथक असे हजर होते. अशी माहिती सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.आर.पाल यांनी दिली आहे.

जोगेश्वरी येथे संत नामदेव यांची ७५० वी जयंती साजरी

मुंबई : जोगेश्वरी पूर्व येथील नामदेव शिंपी समाजाच्या वतीने आज संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ७५० वी जयंती जोगेश्वरी पूर्व,दुर्गा नगर येथे असलेल्या नामदेव महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.यावेळी संत नामदेव यांच्या मूर्तीची अध्यक्ष उल्हास मोळातकर यांच्या शुभहस्ते यथायोग्य पूजाअर्चा करून मग नामदेवांची आरती गाऊन सर्वाना प्रसाद देण्यात आला. तसेच जोगेश्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांच्यातर्फे सर्व उपस्थितांना आरोग्यदायी असे तुळशीचे रोपटे भेट देण्यात आले.विशेष म्हणजे सोशल डिस्टनसिंग व इतर सर्व गोष्टींचे  पालन करून हा कार्यक्रम साजरा करण्यात आल्याचे मंडळाचे सहसचिव गणेश विंचू यांनी सांगितले तर सचिव नरेंद्र माळवदे यांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल सर्व समाजबांधवांचे आभार मानले.


संत नामदेव महाराज यांच्या ७५० व्या जयंती निमित्त वृक्षारोपण संपन्न...


मुंबई : संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ७५० वी जयंती आज सर्वत्र मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली व याचेच औचित्य साधून सांगली येथील संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने आज येथील नामदेव मंदिरात नामदेव महाराज व विठ्ठल रूक्मिणी यांची यथायोग्य पूजाअर्चा व अभिषेक करून नंतर आसपासच्या परिसरात एकंदर चाळीस वृक्षरोपण करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष विनायक तांदळे यांनी दिली.सदर कार्यक्रमास नितीन पेठकर,राजू माळवदे,आप्पा करंजकर,महादेव मोहोतकर,धनंजय दाभोळे,चेतन कांबळे,प्रमोद गोंदकर, कुमार वर्ण,अमोल डंबे आदी मान्यवर उपस्थित होते.


यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार जेष्ठ नागरिक संघास प्रदान

नेरुळ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नवी मुंबई केंद्रातर्फे चव्हाण साहेबांच्या ३६ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून " जेष्ठ नागरिक संघ नेरुळ" यांना ' यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार - २०२०', नेरुळ येथील जेष्ठ नागरिक भवनातील श्री गणेश सभागृहात दिनांक २५.११.२०२० रोजी प्रदान करण्यात आला. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाचे सामाजिक भान ठेवून अनौपचारिक व साधेपणाने प्रतिष्ठानचे नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड व सचिव डॉ. अशोक पाटील यांनी संघास मानपत्र व रुपये १५०००/- चा धनादेश गौरवार्थ प्रदान केले. संघाच्या वतीने अध्यक्ष अरविंद वाळवेकर, कोषाध्यक्ष विकास साठे, उपाध्यक्ष प्रभाकर गुमास्ते व नंदलाल बैनर्जी, सल्लागार प्रकाश लखापते यांनी त्याचा स्वीकार केला. 

        जेष्ठ नागरिकांचे स्वास्थ्य आणि सर्वांगीण विकासासाठी गेली २५ वर्षे अविरतपणे कार्य करत असलेले तसेच जेष्ठ नागरिकांचे प्रेरणास्थान व आधारस्तंभ ठरलेल्या या संघास हा पुरस्कार मिळाल्याने एक वेगळाच उत्स्फूर्त उत्साह कार्यक्रमात होता.

       जेष्ठ नागरिक संघाचे रुग्ण सेवा केंद्राचे कार्य लक्षात घेऊन आवश्यक त्या विविध प्रकारच्या वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यासाठी रुपये एक लाख ( रु. १,०००००/- ) चा धनादेश प्रतिष्ठान तर्फे देण्याचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांनी जाहीर केले व सचिव डॉ. अशोक पाटील यांनी सदर धनादेश संघाच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केला. या छोटेखानी समारंभाला मा. सभागृह नेते व नगरसेवक रविंद्र इथापे, प्रा. व्रुषाली मगदूम,  सुभाष हांडे देशमुख, आबा रणवरे, भालचंद्र माने, आदी मान्यवर व मोजकेच जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

          प्रतिष्ठानच्या अमरजा चव्हान यांनी संघास दिलेल्या मानपत्राचे सुंदरपणे वाचन केले. शेवटी अजीत मगदूम यांनी उपस्थितांचे यथोचित आभार मानले.कोरोनाच्या प्रादुर्भावाचे  भान ठेवून आणि योग्य ती काळजी घेऊन सर्वश्री दत्ताराम आंब्रे, दिपक दिघे, दिलीप जाधव, विलास सावंत, दत्तात्रय म्हात्रे, सीमा आगवणे, सुचित्रा कुंचमवार यांनी अपूर्व मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.


संविधान : भारताचा राष्ट्रीय ग्रंथ

      संविधान दिनानिमित्त विशेष लेख...... 


आज २६ नोव्हेंबर, आजचा दिवस संपूर्ण देशात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. भारतीय संविधानाला यावर्षी ७१ वर्ष पूर्ण होत आहे. गेली ७१ वर्ष संविधानाने देशाला एकसंध ठेवण्याचे काम केले आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही संविधानामुळेच जिवंत आहे. संविधान हा देशाचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. देशाचे अखंडत्व संविधानामुळेच टिकून आहे. भारतातील विविधता, अनेक भाषा, संस्कृती, धर्म, जात, पंथ, वंश, वेगवेगळ्या चालीरीती, रूढी-परंपरा या सर्वांन एका सूत्रात बांधणारा गुरुमंत्र म्हणजे संविधान.

     आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही घडविण्याच्या व त्याचा सर्व नागरिकांस; सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता; निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्यासर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून ; आमच्या संविधानसभेत आज  दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. 
ही  भारतीय संविधानाची उद्देशिका आहे. संविधानाची उद्देशिका हाच संविधानाचा आत्मा आहे. संपूर्ण संविधान याच उद्देशिकेवर आधारित आहे. भारतीय संविधानात नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य यांना फार महत्त्व देण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा हक्क, समतेचा हक्क, शैक्षणिक हक्क, सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क हे मूलभूत हक्क घटनेने नागरिकांना बहाल केले आहेत. त्याच बरोबर प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रीय प्रतीकांचा मान राखणे, संविधानाने घालून  दिलेल्या नियमांचे पालन करणे, देशाचे सार्वभौमत्व कायम राखणे, देशाची  अखंडता कायम राखणे, सार्वजनिक मालमत्तांची काळजी घेणे, देशासाठी नेहमी तत्पर राहणे ही मूलभूत कर्तव्यही संविधानात दिली आहेत. आपल्या हक्कांसोबत आपल्या कर्तव्याचीही जाणीव करुन देणारे व जगातील सर्वात मोठे असणाऱ्या भारतीय संविधानाच्या निर्मितीचा इतिहास जाणून घ्यायला हवा. 
     २६ जानेवारी १९३० ला लाहोर येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झाले.  या अधिवेशनात पंडित नेहरूंनी तिरंगा फडकावून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली. त्याच महत्वपूर्ण दिवसाचे स्मरण म्हणून २६ जानेवारी हा दिवस संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी निवडण्यात आला. ९ डिसेंबर १९४६ ला घटना समितीचे कामकाज सुरू झाले. ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. बी एन राव हे या समितीचे सल्लागार होते. या समितीत पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल,  गोविंद वल्लभ पंत, मौलाना आझाद, डॉ बाबासाहेब आंबेडकर, एस. आर. जयकर, सरोजिनी नायडू, हंसाबेन मेहता, राजकुमारी कौर यांचा मान्यवर सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता. घटना समितीच्या ११४ बैठका झाल्या होत्या. घटना समितीने ११ उपसमित्या देखील नेमल्या होत्या. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. मसुदा समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६  नोव्हेंबर १९४७ रोजी स्वीकारण्यात आला. तोच २६ नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. ४ नोव्हेंबर १९४७ रोजी भारताच्या संविधान समितीच्या मसुदा समितीने संविधानाचा कच्चा मसुदा तयार करून तो चर्चा विनिमयासाठी सभागृहात ठेवला. त्यावर २ वर्ष ११महिने १८ दिवस इतकी प्रदीर्घ चर्चा झाली आणि त्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी तिचा स्वीकार करण्यात आला. 
     संविधान समितीने मसुदा समितीवर सात सदस्यांची नियुक्ती केली होती. त्यापैकी एक मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यांच्यानंतर अलादी कृष्ण स्वामी अय्यर, के. एम मुन्शी, गोपाल अय्यंगार, एम. माधवराव, मोहम्मद सादुल्ला, डी. सी. खेतान हे  इतर सदस्य होते. असे जरी असले तरी त्यापैकी एकाचे निधन झाले होते, एक  अमेरिकेत निघून गेले होते, एकाने राजीनामा दिला होता आणि एक सदस्य पूर्णवेळ राजकारणात व्यस्त होते. त्यामुळे संविधानाचा मसुदा तयार करण्याची पूर्ण जबाबदारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आली व त्यांनी ती जबाबदारी अत्यंत निष्ठेने आणि तन्मयतेने पार पाडली आणि एकट्यानेच संपूर्ण संविधानाचा मसुदा तयार करून तो घटना समितीचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद यांच्याकडे २६ जानेवारी १९४९ सुपूर्द केला. शेवटी २४ जानेवारी १९५० रोजी अंतिम बैठक झाली आणि २६ जानेवारी १९५० पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक राज्य बनले त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस आपण मोठया उत्साहात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. संविधान निर्मितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. जगातील विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास करुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसमावेशक अशी राज्यघटना तयार केली म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते.

- श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे 
९९२२५४६२९५

आमचा मान..सन्मान.. संविधान ! संविधान !!


       तोडून भेदाभेद सारे 

       दिला आम्हा सन्मान 

       माणूस झालो आम्ही 

       जय हो संविधान 

       जय हो संविधान 

    हजारो वर्षाच्या अज्ञानयुगात  खितपत पडलेल्या मुक्याना ज्याने वाचा दिली,  माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला,  विविध जाती धर्मात विभागलेल्या देशाला एका माळेत  गुंफले त्या भारतीय संविधानाचा विजय असो असा आशय वरील ओळीमधून  व्यक्त होत आहे.ज्या संविधानाचा  गौरव साऱ्या विश्वात होतो त्या  भारतीय संविधानाचे  शिल्पकार,  विश्वरत्न , भारतरत्न , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम.


 

     जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इंग्लंंडचे पंतप्रधान राहिलेले  विन्स्टन चर्चिल असे म्हणाले होते "india is not nation it is geographical expression" म्हणजे भारत देश हा एक भौगोलिक जमिनीचा  तुकडा असून हा देश जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा भारतातील लोक एकमेकांवर तुटून पडतील त्यावेळच्या भारताच्या एकूण  परिस्थितीनुसार त्यांचा हा अंदाज बरोबरच असावा असे मानले पाहिजे  कारण त्यावेळची स्थिती वेगळी होती.  अनेक प्रकारची विविधता , सामाजिक विषमता , प्रचंड प्रमाणात गरिबी व निरक्षरता  , संस्थानिकांचे सवते सुभे या सर्वांमधून  मार्ग काढून एक राष्ट्र म्हणून लोकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करणे, राष्ट्रीय एकात्मता साधणे या गोष्टी त्यावेळी तरी अशक्यप्राय वाटत होत्या. स्वातंत्र्याच्या चळवळीमुळे देशात  ऐक्य तयार होण्यासाठी हळूहळू सुरुवात झाली होती पण याला एका गुलदस्तत्यात बांधणे व एकसंघ देश म्हणून प्रगती साधणे आवश्यक होते आणि  हेच महत्वाचे काम भारतीय संविधानाने  केले  आहे. आज विचार केल्यास  देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७३ वर्षानंतर भारत एक प्रबळ लोकशाही  राष्ट्र म्हणून तसेच सर्वच  क्षेत्रात अग्रेसर व प्रगतीशील राष्ट्र म्हणून जागतिक विश्वात उदयास येते आहे. याचे सारे श्रेय  भारतीय संविधान आणि संविधानाचे शिल्पकार  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जाते.

  घटनेचा शिल्पकार तू 

  दिनदुबळ्यांंचा  मुक्तीदाता। 

  अजोड तुझी बुद्धी 

  नतमस्तक हा माथा। । 

 महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अथक परिश्रमातून ,कुशाग्र बुद्धीमत्तेच्या  जोरावर भारतीय घटनेची निर्मिती केली. आज त्याच लोकशाहीची  गोड फळे आपण चाखत आहोत.

     भारतीय संविधान निर्मितीची  प्रक्रिया ही सन १९०९ च्या मोर्ले मिण्टो सुधारणा कायद्याने  सुरू होऊन शेवट हा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अंतिम मसुदा सादर करण्यापर्यंत व २६ जानेवारी १९५० ला देशभर लागू करण्यापर्यत चालली.९ डिसेंबर १९४६ साली संविधान सभेचे पहिले सत्र सुरू झाले.११ डिसेंबरला  डॉ. राजेंद्रप्रसाद यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवड  करण्यात आली.पुढे २९ ऑगस्ट रोजी बाबासाहेबांची  संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. २ वर्ष ११ महिने १७दिवस अखंड परिश्रम करून भारतीय संविधान तयार झाल.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधान मसुद्याला  मान्यता देण्यात आली.  त्यामुळे हा दिवस  संपून देशात संविधान दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

   भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून  समता, बंधुता, स्वातंत्र्य, लोकशाही,न्याय, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, राष्ट्रीय एकात्मता  या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे . मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत.नागरिकाचे मूलभूत हक्क -अधिकार कर्तव्य , संघराज्य प्रणाली, मार्गदर्शक तत्वे , प्रशासकीय रचना, विधिमंडळ, न्यायव्यवस्था, पंचायत राज,सामाजिक न्याय, आरक्षण,निवडणुका, आणीबाणीची परिस्थिती इत्यादी विविध बाबींचा अंतर्भाव आहे. एक सार्वभौम, प्रजासत्ताक,  लोकशाहीप्रधान,धर्मनिरपेक्ष, समाजवादी राष्ट्रासाठी वरील बाबी  आवश्यक  असून यावरच भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्या असलेल्या विविधरंगी देशाला एका धाग्यात गुंफण्यात आले आहे.परकीय आक्रमण,देशातील आणीबाणीची परिस्थिती,नैसर्गिक आपत्ती,गरीबी , बेरोजगारी, निरक्षरता, इत्यादी विविध संकटे येवून सुध्दा देश सक्षमपणे उभा राहिला आहे आणि वेगाने प्रगती करीत आहे.देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मान देणारे,त्याच्या मूलभूत हक्कांना अधिकारांना संरक्षण देणारे, नागरिकांच्या प्रगतीसाठी विविध कायदे करणारे आपले भारतीय संविधान चिरायु होवो हीच आपल्या सर्व भारतीयांची भूमिका असली पाहिजे.

    आमचा मान ..

    आमचा सन्मान ...

    संविधान !संविधान  !!

आमचा मान, सन्मान,शान  हे आमचे संविधान आहे.त्याच्याशी कटिबद्ध राहण्याचा आम्हा भारतवासीयांचा अखंड प्रयत्न राहिल.

      -प्रा.प्रदीप महादेव कासुर्डे 

        घणसोली नवी मुंबई 

             मो.7738436449

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०

स्त्री शक्ती फाऊंडेशन तर्फे कुर्ला येथील बैलबाजार मधिल ज्येष्ठ नागरिकांना वॉर्म स्ट्रीम वेपॉरायझर मशीन चे वाटप...!


मुंबई :
कोरोना च्या पार्श्ववभूमी वर आणि सततच्या लॉक डाऊन मुळे जनसामान्यांवर उद्भवलेल्या कोरोना वायरसचा वाढता प्रसार पाहता, तसेच मा.शिवसेना प्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार , माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेचे पालन करून, विभाग क्र.१६६ मध्ये रहाणारे रहिवाशी आणि ज्येष्ठ नागरीक जे कुर्ला पश्चिम येथील बैलबाजार सारख्या वर्दळ ठिकाणी राहतात ज्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचे रिपोर्ट पॉज़िटिव आले हे कळताच विभागातील जेष्ठ नागरिकांना "स्त्री शक्ती फाऊंडेशन" तर्फे "वॉर्म स्ट्रीम वेपॉरायझर" मशीन चे वाटप करण्यात आले, वाटप करण्यात आले याप्रसंगी

  "स्त्री शक्ती फाऊंडेशन" च्या अध्यक्ष निशा राहुल मौजे, कार्याध्यक्षा रेश्मा सुभाष बनसोडे ताई शिवसेना शाखा क्र.१६६ च्या उपशाखा संघटिका पुजा गणेश तावडे तसेच विभागातील ज्येष्ठ शिवसैनिक प्रेमा पितांबर साठले आदी मान्यवर उपस्थित होते.अध्यक्ष निशा मौजे यांनी स्थानिक रहिवाशी तसेच ज्येष्ठ नागरिकांना आपले कुटुंब हीं आपली नैतिक जबाबदारी आहे तेव्हा ती प्रत्येकानी पाळली पाहिजे त्यासाठी प्रत्येक रहीवाश्याने सतर्क राहुन मास्क आणि सनीटायझरचा योग्य तऱ्हेने वापर केला पाहिजे असे सांगून उपस्थित रहिवाश्यांचे आभार मानले.

लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व आरविंद मिरा संस्था कडून सफाई कामगारांना व मलेरिया कामगार मास्कचे वाटप ; संस्थापक अध्यक्ष विरेंद्र (गुरु) म्हात्रे व नयन पवार यांचा स्तुत्य उपक्रम

 



नवी मुंबई / प्रतिनिधी : कोविड १९ चा जास्त प्रमात प्रदुरभाव वाढूनये म्हणून लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व आरविंद मिरा संस्था यांच्या तर्फे नवी मुंबईत ठिकठिकाणी मलेरिया कामगार व सफाई कामगारांना मास्कचे वाटप  बुधवार दि २५ नोव्हेंबर रोजी  करण्यात  आले.

       या वाटपाच्या कार्यक्रमासाठी विशेष मान्यवर म्हणून लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई संस्थापक अध्यक्ष विरेंद्र ( गुरु) म्हात्रे व आरविंद मिरा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सिनेअभिनेत्री नयन पवार तसेच जयश्री फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव जाधव व नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस गुरुनाथ नाईक, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे वार्ड क्रमांक ९६ अध्यक्ष सोमनाथ बारवे  व  सफाई कामगार चे सुपरवायझर विलास ताडेंल व तुसीराम भोईर लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व आरविंद मिरा संस्थेचे इतर सदस्य उपस्थित होते

शासकीय कर्मचाऱ्यांनो उद्याच्या संपात सहभागी होऊ नका,अन्यथा कारवाई

मुंबई - राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी उद्या (गुरुवारी) पुकारलेल्या संपात शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे.

संपात राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र ही संघटना सहभागी आहे. संपामध्ये राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियम 6 च्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यास संप करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

त्यामुळे संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. केंद्र शासनाचे ‘काम नाही, वेतन नाही’ हे धोरण राज्य शासनही अनुसरत आहे. याकडेही सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

संप मागे घेण्याचे सरकारचे आवाहन!

राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा, जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये.याकरिता शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहन शासनाने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले आहे.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू : जासई गावातील ग्रामस्थ आक्रमक ; दिघोडे -दास्तान रोडवरील अवजड वाहने बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी.

 

उरण -जासई गावातील दत्तात्रेय जनार्दन ठाकूर वय वर्षे ५६ यांचा सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता जासई गावालगत असलेल्या रेल्वे फाटकाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने त्यांचे अपघाती निधन झाले.त्यांचे निधन झाले समजताच जासई ग्रामस्थांतर्फे  तीन तास  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  हे आंदोलन चालू असताना उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी,  सहाय्यक पोलीस निरीक्षक कवले साहेब यांनी संबंधित वाहन शोधून त्याच्यावर कारवाई करून मयत कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन दिले.यावेळी दिगोडा दास्तान रोडला अवजड वाहनांची  बंदी करावी अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली या आंदोलनासाठी ग्रामस्थ मंडळ संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, गाव आघाडीचे अध्यक्ष यशवंत घरत, इंटकचे संजय ठाकूर, माजी सभापती नरेश घरत, जासईचे सरपंच संतोष घरत, धर्मा शेठ पाटील, जासई भाजपचे अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे,  ग्रामपंचायत सदस्य योगिता म्हात्रे,  कामगार नेते दत्ता घरत,  अमृत ठाकूर, आदित्य घरत, गणेश पाटील, विवेक म्हात्रे,  रघुनाथ म्हात्रे, गोपीनाथ म्हात्रे, ठाकूर कुटुंबिय तसेच जासई गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते

हनुमान कोळीवाडा या गावाचे कायदेशीररीत्या पुनर्वसन करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश ; रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली होती गावाच्या पुनर्वसनाची मागणी

उरण -  रायगड जिल्ह्यातील हनुमान कोळीवाडा या गावाचे पुनर्वसन जवाहरलाल नेहरू पतन न्यासाने करावी अशी मागणी पालकमंत्री तथा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केल्यानंतर त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावक-यांवरील अन्याय दूर करण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या केंद्राच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी गावक-यांची जमिन संपादित करण्यात आली होती. कायदेशीररित्या घेण्यात आलेल्या निर्णयानुसार १६.८०   इतक्या जमिनीत त्यांचे पुनर्वसन करण्याबाबतचा सकारात्मक प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिका-यांना दिले.

    उरण तालुक्यातील ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा  यांच्या कायदेशीर पुनर्वसनाबाबत आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री ना. श्री. विजय वडेट्टीवार, खासदार सुनिल तटकरे, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे उपसचिव अजित देशमुख, जेएनपीटीचे उपाध्यक्ष श्री वाघ, रायगड जिल्हाधिकारी श्रीमती निधि चौधरी आदिसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

     राज्यमंत्री तटकरे यांनी सांगितले, रायगड जिल्ह्यातील उरण येथील हनुमान कोळीवाडा हे गाव जेएनपीटी बंदराच्या विकासासाठी विस्थापित करण्यात आले होते. ३५ वर्षांपूर्वी उरण शहराजवळ बोरी-पाखाडी (भवरा) गावाजवळ चिखल व वाळवीग्रस्त मातीत भराव टाकून या गावाचे पुनर्वसन करण्यात आले होते. ग्रामस्थांना पुनर्वसनासाठी सोई-सुविधांसह १६.८० हेक्टर जागेची आवश्यकता होती. मात्र जेएनपीटीने २ हेक्टर जागेत पुनर्वसन केल्याने येथे अनेक वर्ष ग्रामस्थ दाटीवाटीने रहात आहेत. या संपूर्ण गावालाच वाळवीने पोखरले असून तेथील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने त्यांना न्याय मिळावा अशी मागणी पालकमंत्री आदिती तटकरे व खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती.

       या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी गावक-यांवरील अन्याय दूर करण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले असून त्यांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासह कायदेशीररित्या घेण्यात आलेल्या निर्णयानुसार १६.८० हेक्टर इतक्या जमिनीचे अधिग्रहण करून त्यांचे पुनर्वसन करण्याबाबतचा सकारात्मक प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना दिले आहेत. पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच संबंधित मंत्री महोदयांनी यात जातीने लक्ष घातल्याने हनुमान कोळीवाडा गावातील ग्रामस्थांनी यांचे आभार व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावचे कायदेशीर पुनर्वसन करण्याचे आदेश दिल्याने आता हा अनेक वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला प्रश्न निकाली लागणार आहे.

रा . जि .प शिक्षक संजय जयराम होळकर गुरूजी छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय सन्मान २०२० च्या दोन पुरस्काराचे मानकरी


उरण - श्री अमरदिप पंढरीनाथ मखामले (उर्फ दादासाहेब ) ,कवी शायर गीतकार लेखक यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारचे ऑनलाईन स्पर्धा भरवून  स्पर्धकांना ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. जगभरातील २६ देशाने सहभाग घेतला होता एकूण १ हजार ८२३ स्पर्धेकांनी यात  सहभाग नोंदवला होता साधारण ३ महीन्यापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती  मराठी साहित्यिक, कवी, लेखक, चिञकार, दिग्दर्शक, कथाकार, कवी लावणी नृत्य, विनोद, काव्याचे व साहित्याचे सर्व प्रकार तसेच लाईव्ह सादरीकरणाची संधी साहित्यिकांना स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. तसेच एकाच वेळेस साहित्यिकांना आपले सादरीकरण विदेशापर्यत पोहोचविण्याचे व मराठी साहित्याचा प्रवास व मराठी भाषेतील कला गूणांचा झेंडा या स्पर्धेच्या उपक्रमातून अटकेपार रोवला गेला.सर्व साहित्यिकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे महान कार्य  अमरदिप पंढरीनाथ मखामले (उर्फ दादासाहेब )यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून केले.त्यामध्ये रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठी जुई  ता.उरण येथे कार्यरत असणारे शिक्षक संजय जयराम होळकर  यांनी आपले स्वरचित साहित्यिक व कला तसेच झूम मुलाखतीद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर सादरीकरण केले होते त्या करिता त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील "छंदगोमात्य संमेलन मनस्पर्शी मानकरी" तसेच "छंदोगामात्य साहित्य साधक मानकरी" असे आंतरराष्ट्रीय स्तरावरील विशेष  दोन पुरस्कारांनी संजय होळकर गुरुजी यांना आंतरराष्ट्रीय सन्मान २०२० समूहाकडून सन्मानित करण्यात आले आहे .हा सन्मान शिक्षक संजय होळकर यांना मिळाल्याने त्यांच्यावर  आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि सर्व सामाजिक शैक्षणिक स्तरातील मान्यवरांकडून तसेच विविध सामाजिक संघटना व शिक्षक बंधू,  भगिनींकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

वाढीव वीज बिल रद्द करण्यासाठी भाजपचे नवी मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन


दिव्या पाटील / नवी मुंबई -
कोरोना महामारी मुळे नागरिकांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. आणि त्यातीलच एक धक्का देणारे संकट म्हणजे " वाढीव वीजबिल " . या मुळे अनेकांना या त्रासातून जावे लागत आहे . रोजगार नाही काम नाही आणि अशातच सरकारने दिलेल्या वाढीव वीजबिलामुळे संतप्त झालेल्या जमावाने आता उठाव करायला सुरुवात केली आहे. नवी मुंबई येथील विविध परिसरात भाजपा नेत्यांनी याचा निषेध करत राज्यातील महा आघाडी सरकारच्या विरोधात " हाय व्होल्टेज आंदोलन "केले. दि.२३ नोव्हेंबर रोजी हे आंदोलन करण्यात आले होते. या वेळी अनेक भाजप नेते उपस्थित होते. " अशा सरकारचे करायचे काय , खाली डोके वर पाय " , असे नारे देत आंदोलकांनी हे आंदोलन चालू ठेवत , वाढीव वीजबिल जाळून सरकार वर टीका केली . त्याचप्रमाने , " जर कोणाची वीज कापली गेली तर गणेश नाईक तिथे उभा राहील " , असा इशारा देखील आमदार गणेश नाईक यांनी यावेळी दिला.

संविधान दिनाच्या दिवशीच देशातील कामगार संघटनेचा संप का ? दुसरा दिवस उजाडला नसता का ..? - बाबासाहेब पावसे

पालघर : संपुर्ण महाराष्ट्रात सरपंचांच्या मनामनात रुजलेली सरपंच संघटना महाराष्ट्रभर कार्यरत करत प्रशासनाला सहकार्य करून एका दिलाने सर्व संघटनेच्या कर्मचारी यांना आदराने सहकार्य गांव पातळीवर सतत करत करतात परंतू महाविकास आघाडी सरकारच्या निदर्शनासया निवेदनाद्वारे आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो की दिनांक 26 नोव्हेंबर 2020 हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून शासकीय पातळीवर साजरा होत असताना त्याच दिवशी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने एक दिवसीय संप पुकारला आहे व त्यामध्ये राज्यभरातील अनेक संघटना सहभागी होणार आहेत

 आपल्या न्याय मागण्यासाठी संप करण्यास सरपंच सेवा संघाची काही हरकत नाही मात्र संविधान दिनाच्या दिवशी संप पुकारला गेल्यामुळे जाणीवपूर्वक संविधानाचा अवमान करण्याचा यांचा हेतू  आहे की काय अशी शंका मनात येते. सदर  संघटनाना  एक दिवसीय संप करायचा होता तर तो इतर कोणत्याही दिवशी करता आला असता मात्र त्या॑नी  सविधान दिनाची निवड का केली याबद्दल आम्ही  सरपंच सेवा संघाच्या वतीने या निवेदनाद्वारे ग्रामसेवक संघटनेच्या या कृतीचा निर्देशास आणून देत आहे संप दुसरे किंवा इतर दिवशी करावा  अशी राज्यभरातील संघटना यानी विचार करून आजचा संप रद्द करावा काही राजकीय पक्षांनी देखील याच दिवशी एकदिवशीय संप पुकारून बंद पुकारून संविधान दिनाचा नकळत अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचा देखील आम्ही निषेध व्यक्त करतो

       सविधान दिन राष्ट्रीय दिन असून या दिवशी शासकीय कर्मचाऱ्यांनी तो साजरा करणे अभिप्रेत असताना ग्रामसेवक संघटनेचे ही कृती निंदनीय आहे, कृपया वरील सर्व बाबींचा विचार करून संबंधित संपास तूर्तास संविधान दिनी तात्पुरती स्थगिती देण्यात यावी अशी मागणी सरपंच सेवा संघाच्या वतीने सरकार कडे दिली आहे सरकारने या संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करू दि 26 नोहेंबरचा संप मागे घेण्यात यावी अशी मागणी बाबासाहेब पावसे पाटील संगमनेर राज्य सरचिटणीस सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश यांनी महाविकास आघाडी ला एका पत्रकाद्वारे दिली आहे.

तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात कु.काव्या मनीष लोंढे तालुक्यात प्रथम..!

दापोली :   युवासेना दापोली तालुका आयोजित हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे १७ नोव्हेंबर स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली त्याचा निकाल जाहीर झाला.व या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ लोकप्रिय युवा आमदार माननीय श्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झाला.या वक्तृत्व स्पर्धेत गट क्र. १ ( १ ली ते ३ री), गट क्र २ (४ थी ते ६वी), गट क्र. ३ (७वी ते ९वी), गट क्र. ४(९वी ते ११वी)  अशा वेगवेगळ्या गटात अनेक स्पर्धक यांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा युवासेना दापोली तालुक्याने युवासेनेच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त मंगळवार दि. १७ नोव्हेंबर २०२० रोजी ऑनलाईन स्पर्धा संपन्न झाली. 

     या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत गट क्र.१ पहिली ते तिसरी या गटात दापोली तालुक्यात उन्हवरे जाधववाडीची सुकन्या कु. काव्या मनिष लोंढे इयत्ता २री हिने प्रथम क्रमांक पटकावून तिला आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते एक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. काव्या लोंढे ही रवींद्र विद्यालय टिटवाळा मुंबईच्या ठिकाणी इयत्ता २ री मध्ये शिकत आहे. तिला नृत्य करणे, वक्तृत्व करणे व अनेक कलेमध्ये भाग घेऊन कला सादर करण्याची आवड ही लहान पणापासून आहे. तिने अनेक ठिकाणी वाडी, गाव व विभागातील सांस्कृतिक कार्यक्रम व शाळेमधील वार्षिक कार्यक्रमामध्ये तसेच स्पर्धेत भाग घेत असे. कल्याण मधील टिटवाळा शहरातील प्रसिद्ध टिटवाळा महोत्सव या भव्य मोठ्या व्यासपीठावर सुद्धा तिने दरवर्षी कला सादर केली आहे.

      युवासेना दापोली तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत कु.काव्या मनिष लोंढे उन्हवरे जाधववाडी हिचा प्रथम क्रमांक आल्याने सर्वच स्तरावर शिवसेना उन्हवरे पंचायत समिती गण उन्हवरे विभाग,असोंड जिल्हा परिषद गट, कुणबी समाज विकास संघ १८ गाव उन्हवरे विभाग, कुणबी समाज दापोली तालुका या अशा अनेक स्तरावर तिचे तोंड भरून कौतुक करताना बाप तशी बेटी अशा शब्दालंकाराने शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. कारण युवासेना युवाधिकारी उन्हवरे विभाग, कुणबी युवा उपाध्यक्ष तालुका दापोली, सहयाद्री युवा प्रमुख,राजे श्री शिवछत्रपती कोंकण प्रतिष्ठान टिटवाळा सरचिटणीस मनिष दत्ताराम लोंढे हे सुद्धा आज सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे प्रयत्न सध्या व भविष्यात काव्या नक्की करेल असे सर्वजण भावना व्यक्त करत आहेत. कु.काव्या लोंढे हिने मिळविलेले यश हे उन्हवरे विभाग, उन्हवरे व जाधववाडीचा सन्मान व गौरव असून काव्याने उन्हवरे गावाचे  व विभागाचे नाव दापोली तालुक्यात तसेच कोंकण प्रतिष्ठान टिटवाळाचे नाव तालुका व  महाराष्ट्रभर रोशन केले आहे. काव्याला मार्गदर्शन हे मनीष लोंढे यांनी करून काव्याची आई मिलन लोंढे हिने त्यासाठी मेहनत घेतली. 

      सदर कार्यक्रमास कार्यसम्राट युवा आमदार माननीय श्री.योगेशदादा कदम, पंचायत समिती सभापती रउफ हजवानी, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, तालुका युवा अधिकारी सुमित जाधव, शिवसेना तालुका संघटक उन्मेष राजे,शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र पेठकर,पंचायत समिती सदस्य वृषाली खडपकर, नगरसेवक केदार परांजपे, माहिती व संपर्क युवा अधिकारी ऋषिकेश सुर्वे, युवासेना तालुका सचिव अमित पारदुले, शहर युवती अधिकारी कीर्ती परांजपे, विभाग युवा अधिकारी किशोर काटकर,किशोर पावसे, शहर सचिव मयूर शेठ, युवसैनिक सुफीयान दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. 

          प्रत्येक गट प्रमाणे विजेत्यांची नावे ही गट क्र. १ - विजेता - काव्या मनीष लोंढे, उपविजेता - वेदांत प्रशांत झगडे. गट क्र.२ - विजेता - मिहीर संदेश चव्हाण, उपविजेता - श्रुतिका सुहास मिसळ, गट क्र. 3 विजेता मुक्ता केदार पतंगे, उपविजेता - आरुषी अमोल साबडे या सर्व विजेत्यांना दापोली येथील पंचायत समिती सभागृह येथे कार्यक्रमात सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

'बड चिआरी सिन्ड्रोम' ह्या दुर्मिळ आजाराशी तरुणाचा संघर्ष ; महागडया उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन

कांजुरमार्ग : जगातील  काही आजार विज्ञान व तत्सम संशोधकांस आव्हान देणारे असतात . या आजारांवर कायस्वरूप उपचारपद्धती नसल्यावर  तो आजार   जडलेल्या व्यक्तीसमोर या आजाराचा त्रास ,पुढील खर्च व इतर गोष्टी पेलण्याचे मोठेच आव्हान असते . 

 असाच एक  आजार स्वप्निल सुरेश मालाडकर. वय, वर्षे-३० या   कांजुरमार्ग मध्ये राहणाऱ्या तरुणाच्या वाट्याला आला आहे .  मागील ५ वर्षांपासून 'बड चिआरी सिन्ड्रोम' ह्या दुर्मिळ आजाराशी हा तरुण  संघर्ष करतो आहे.  विशेषतः हा आजार १० लाखामध्ये १ व्यक्तीला होतो. 

     'बड चिआरी सिन्ड्रोम' आजारात यकृताकडून हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा अतिशय बारीक होत जातात. त्यामुळे रक्तपुरवठ्याच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी रुग्णाचे पोट फुगते, शरीराच्या काही भागांवर सूज येते. या आजारामुळे   शरीरातील शुद्ध रक्त हृदयापर्यंत जात नसून, यकृताचे कार्यही त्यामुळे बिघडले आहे. या आजारामध्ये यकृत प्रत्यारोपण हा शेवटचा पर्याय असल्याचे यकृतप्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टरांचे स्पष्ट मत आहे.

     या आजारावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी  त्याने अनेक सरकारी योजना आणि संस्थांकडे  अशा  अवस्थेमध्येही पायपीट केली. मात्र, हा आजार सरकारी योजनांमध्ये न बसणारा असल्यामुळे अनेक संस्था, न्यास, ट्रस्ट, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यांच्याकडून निधी उपलब्ध होऊ शकला नाही. हा आजार त्या कक्षेमध्ये येत नाही, असे कारण त्याला  देण्यात आले. गेली अनेक महिने  COVID 19 (कोरोना) मुळे देशात लॉकडाउन चालू आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे .त्यामुळे कोणत्याही गोष्टीची पूर्तता वेळेवर होत नाही .  सध्या  त्याच्या   हिमोग्लोबिन पुन्हा कमी झालेला  आहे.   तसेच रेड ब्लड सेल्स (RBC) तुटत असून  त्यामुळे नवीन रक्त तयार होत नाही. 

        आत्तापर्यंत त्याच्या आजारासाठी   मित्रपरिवार, गाववाल्यांनी, त्याने शिक्षण घेतलेल्या  कॉलेज ने आर्थिक स्वरूपात वेळोवेळी मदत केली असल्याने  आजाराशी यशस्वीपणे लढा दिला आहे. पण  सध्याच्या परिस्थितीत त्याच्या  ट्रीटमेंट साठी आर्थिक मदतीचे  मार्ग बंद आहेत. सध्या या आजारात रक्त पातळ करण्यासाठी ५००/- रुपयाची  दोन महागडी  इंजेक्शन घ्यावी लागतात . पुढील पाच वर्षे इंजेक्शन घ्यावी लागतील असे त्याचे डॉक्टर सांगतात . परंतु  पैशाअभावी हि इंजेक्शन व औषधें घेणे शक्य नसल्याने स्वप्नील व त्याच्या कुटुंबियांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे . त्यामुळे त्याच्या या दुर्मिळ आजारासाठी  मदत करण्याच्या हेतूने समाजातील  दानशूर व्यक्तींनी, संस्थांनी  पुढे यावे असे आवाहन त्याच्यामार्फत  करण्यात येत आहे .     मदत करण्यासाठी बँक डिटेल्स पुढीलप्रमाणे आहेत.         

Bank Detail's :

Sarika Suresh Maladkar: 

Contact no- 9969077089                 

Kotak mahindra bank

Account no- 1713444228

Ifsc code- KKBK0001346

Paytm, phone pe, google pay no- 9969077089.

लोकलमध्ये सामाजिक अंतराचे स्टिकर

मुंबई, दादासाहेब येंधे :  राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर मध्य रेल्वेने लोकलमध्ये सामाजिक अंतराचे पालन व्हावे यासाठी आसनांवर स्टिकर लावल्याचे दिसून येत आहे अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू होऊन तब्बल पाच महिने झाल्यानंतर रेल्वेने या संदर्भात उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली आहे यासंदर्भात उपाययोजना करण्याची उशीर झाला असला तरी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे लोकल प्रवाशांचे म्हणणे आहे. 

   मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकलच्या असनांवर मंगळवारी प्रवाशांना 'कृपया इथे बसू नका' अशा आशयाचे  स्टिकर दिसून आले. त्यामुळे काही डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी कमी असल्याने प्रवाशांनी स्टिकर लावलेली जागा सोडून प्रवास केला.

भांडुपच्या "राजाराम शेठ विद्यालय" रौप्य महोत्सव कॉफी टेबल बुक "वादळवाट" चे मा. राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन



मुंबई : 
भांडुप (पश्चिम ) मुंबई ७८ येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचा "राजाराम शेठ विद्यालय ज्युनियर कॉलेज "चा रौप्यमहोत्सव वर्षाच्या सांगता समारंभाच्या वेळी संस्थेचे संस्थापक संचालक रमेश खानविलकर यांच्या जीवनपटावर शैक्षणिक संस्था, शाळा,- महाविद्यालये उभी करताना गेल्या पंचवीस वर्षात आलेल्या विविध संकटांवर मात करून यशस्वी झाल्यानंतर  शाळेचा रौप्यमहोत्सव सोहळ्याच्यावेळी सुप्रसिद्ध लेखिका मराठी विश्वकोशाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड लिखित नवचैतन्य प्रकाशनाचे प्रकाशक श्री. शरद मराठे यांनी "वादळवाट " पुस्तकाचे प्रकाशन केले होते.

         "वादळवाट " पुस्तकाची प्रथम आवृत्ती संपून दुसऱ्या आवृत्तीकडे वाटचाल करत असल्याने त्यावर तयार झालेल्या "वादळवाट" राजाराम शेठ विद्यालय रौप्यमहोत्सव कॉफी टेबल बुक चे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनावर मोठ्या थाटात नुकतेच पार पडले.

    याप्रसंगी राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांनी रमेश खानविलकर यांच्या जीवनपटावरील "वादळवाट" पुस्तकाचे कौतुक केले तसेच सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ राजारामशेठ विद्यालयाच्या प्रकाशित झालेल्या स्मरणिकेचे  शैक्षणिक प्रगतीबद्दल बोलताना मा. राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी म्हणाले की

        याप्रसंगी मा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी "वादळवाट" पुस्तक संपूर्ण पाहिल्यानंतर रमेश खानविलकर यांच्या हृदयापासून केलेल्या शैक्षणिक कार्यचा समाजासाठी उपयोग होईल त्याचं त्यांनी कौतुक केलं कोणतेही काम मनापासून आणि हृदयापासून आत्मीयतेने केलं तर ते यशस्वी होतं असही राज्यपाल महोदय म्हणाले राजाराम शेठ विद्यालय रौप्यमहोत्सव कॉफी टेबल बुक चे प्रत्येक पान आणि पान राज्यपाल महोदयांनी पाहिल्यानंतर "अतिसुंदर "या दोन शब्दात  कौतुक करून ही आठवण कायम स्वरूपी जपा असेही ते म्हणाले .तसेच त्यांनी वादळवाट कॉफी टेबल बुक्स गौरव करताना मराठी भाषेत संभाषण केले . हे विशेष ते असेही म्हणाले की संस्कृत भाषा ही देववाणी आहे आपल्या सर्वांच्या मातृभाषेचा उगमस्थान ही संस्कृत भाषा आहे.  त्यामुळे संस्कृत  भाषेचा अभ्यास  विकास सर्वांनी करणे आवश्यक आहे. भारत सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण अतिशय चांगलं असून आपली संस्कृती जपण्यासाठी मातृभाषेचा विकास करण्यासाठी या शैक्षणिक धोरणाचा निश्चितपणे उपयोग होणार आहे .

               शेवटी ते असे म्हणाले की रमेश खानविलकर यांच्या जीवनपटाचे शब्दांकन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर विजया वाड यांनी केल्याने त्या पुस्तकाला" अमृतवाणी" प्राप्त झालेली आहे. माझा आशीर्वाद सदैव तुम्हा सर्वांच्या पाठीशी राहील असेही ते म्हणाले. याप्रसंगी माननीय राज्यपाल महोदयांना मराठी विश्वकोश डॉक्टर विजया वाड यांनी भेट दिल्यानंतर माननीय राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी म्हणाले की मराठी विश्वकोश म्हणजे मराठी भाषेतील खरे अमृत आहे. हे अमृत प्रत्येकाची मातृभाषा जिवंत ठेवेल मराठी विश्वकोश म्हणजे महाराष्ट्रासाठी अजरामर असे अमृत आहे. हे अमृत मला आज मिळाले मला आनंद झाला.

        या प्रसंगी सुप्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड ,संस्थेचे संचालक संस्थापक रमेश खानविलकर, शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी खानविलकर,  संस्थेचे पदाधिकारी रिद्धेश खानविलकर हे देखील राजभवनात उपस्थित होते.

आठवणीत रंगला १९८८-८९ च्या दहावीच्या बॅचचा ३५ वर्षांनी स्नेह मेळावा

        आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा..!शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई -वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याच...