आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ३१ मे, २०२०

अनाकलनीय शिथिलता

६८ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाउन नंतर प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्यत्र निर्बंध शिथिल होण्याची चिन्हे दिसत आहेत.हे होणे जरी क्रमप्राप्त असले तरी,त्यात पहिल्या टप्प्यात ८ जून पासून धार्मिक स्थळे आणि शॉपिंग मॉल्स, हॉटल्स यांना परवानगी देने अनाकलनीय असेच आहे.एक वेळीस हॉटेल्स यांना परवानगी देने समजू शकतो कारण, अन्न हे मूलभूत गरज आहे पण, शॉपिंग मॉल्स आणि धार्मिक स्थळे जिथे गर्दी होण्याची कायम शक्यता आहे.अश्या स्थळांना केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी कुठल्या निकषांचा आधारे दिली? शॉपिंग मॉल्स जिथे कायम गर्दी होण्याची शक्यता असते आणि ज्यांचा संबध  मूलभूत गरजांसाठी होऊ शकत नाही.केवळ चैनीच्या आणि अनावश्यक वस्तू मिळण्याचे ठिकाण हे कशाच्या आधारे पहिल्याच टप्प्यात उघडण्यास कसे काय योग्य आहे?या ६८ दिवसांत आतापर्यंत सर्व धर्मियांचे झालेले सण सर्व धर्मियांनी गुण्यागोविंदाने घरातच साजरे करून सर्वांनी आपली धार्मिक प्रगल्भता दाखवून दिलेली असतांना. जिथे गर्दी होते असे ठिकाण असलेल्या धार्मिक स्थळांना पहिल्याच टप्प्यात परवानगी देणे अनाकलनीय असेच म्हणावे लागेल.

-दत्तप्रसाद शिरोडकर
मुलुंड 

विक्रम गोखलेंचे दातृत्व आणि सामाजिक बांधिलकी


एकेकाळी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारे हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ  अभिनेते विक्रम गोखले हे आपल्या दातृत्वाने  चर्चेत आले आहेत.  विक्रम गोखले यांनी पुण्याजवळील नाणे गावांतील स्वतःची दोन एकर जागा दोन वेगवेगळ्या संस्थांना दान करण्याची घोषणा केली आहे.सध्याच्या बाजारभावाप्रमाणे या जागेची किंमत पाच कोटी इतकी आहे. ही घोषणा करून विक्रम गोखले यांनी समाजाला एका अनोख्या दातृत्वाचे दर्शन घडवले आहे. विक्रम गोखले यांच्या दातृत्वाची ही पहिलीच वेळ नाही, काही महिन्यांपूर्वीच विक्रम गोखले यांनी आपल्याकडील अमूल्य अशी ग्रंथ संपदा एका संस्थेला दान केली होती. आता स्वतःची दोन एकर जागा दान करून त्यांनी दातृत्वाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्याकडे असलेल्या दोन एकर जागेपैकी  एक एकर जागा सिंटा या टीव्ही आणि सिनेमा कलाकारांच्या संस्थेला ते  दान करणार आहेत तर एक एकर जागा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाला दान करणार आहेत. या जागेवर जेष्ठ व निराधार कलाकारांसाठी वृद्धाश्रम उभारण्याचा  त्यांचा मानस  आहे. आजवर जेष्ठ व निराधार कलाकारांसाठी महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नाही. आता हे वृद्धाश्रम उभे राहिल्यास देशांतील अनेक जेष्ठ व वृद्ध कलाकाकरांची राहण्याची सोय होईल. इतकेच नाही तर या जेष्ठ व वृद्ध कलाकारांना या वृद्धाश्रमात मोफत चहा, नाष्टा व जेवण तसेच कपडेलत्तेही मिळणार आहेत. कोरोनाच्या संकटात विक्रम गोखले यांनी जी सामाजिक बांधिलकी दाखवली आहे तिला तोड नाही. विक्रम गोखले यांच्या दातृत्वाचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. आज देशांत हजारो जेष्ठ व निराधार कलाकार असे आहेत की ज्यांना एकवेळचे अन्न मिळणेही मुश्किल आहे. विशेषतः लोक कलावंतांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कलाकारांसाठी विक्रम गोखले यांनी घेतलेला हा निर्णय मोठा दिलासा देणारा आहे. ज्या समाजाने आपल्याला मोठे केले, नाव, प्रतिष्ठा दिली त्या समाजाचे ऋण फेडण्याकरिता विक्रम गोखले यांनी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. चित्रपट सृष्टीत अनेक दिग्गज कलाकार आहेत पण आपल्या जेष्ठ आणि वृद्ध बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करणारे अतिशय थोडे कलाकार आहे म्हणूनच विक्रम गोखले यांचे हे दातृत्व नजरेत भरणारे आहे. विक्रम गोखले यांनी सामाजिक बांधीलकीतून हे पाऊल उचलले आहे. त्यांच्या या सामाजिक बांधीलकी आणि दातृत्वाचे अनुकरण अन्य सिलिब्रेटींनिंही करायला हवे. विक्रम गोखले यांच्या या सामाजिक बांधिलकी आणि दातृत्वाला मनापासून सलाम ! 

-श्याम बसप्पा ठाणेदार 
दौंड -जिल्हा पुणे 



गोष्ट साधी पण डोंगराएवढी.!

ते दोघे करोनाच्या दहशतीने पुण्याहून आपल्या गावाला आले. ज्या शाळेने अक्षर ओळख दिली, शिक्षणाचे दरवाजे उघडे केले, जिथ अभ्यास केला, मौज, मजाही केली त्याच शाळेत एक खबरदारी, सावधगिरी म्हणून क्वारंटाईन व्हायची वेळ आली. मिळालेल्या या वेळेचा काहीतरी उपयोग करावा हा करोनाच्या काळातही एक सकारात्मक विचार करून ज्या शाळेने आपणास अक्षरज्ञान दिले, तिचे काहीतरी आपण देणे लागतोय या उदात्त भावनेतून त्या दोघांनी गेली दोन अडीच महीने बंद असलेली शाळा, शाळेचे आवार, बगीचा श्रमदानाने स्वच्छ, चकाचक करण्याचा उपक्रम राबवून क्वारंटाईन काळातही ईच्छाशक्तीच्या बळावर समाज कार्य करू शकतो, एखादा विधायक उपक्रम राबवू शकतो हे दाखऊन  दिले. अशा या जबर इच्छाशक्ति असणार्‍या कोलोलीच्या नंदकुमार जाधव आणि सतीश चौगुले यांचे कार्य फार मोठे आहे, अनुकरणीय आहे, प्रेरणा देणारे आहे. इच्छाशक्ति, सकारात्मक मानसिकता आणि समाजिक कार्याची मुळात आवड हवी. बातमी  साधी, सोपी पण खूप काही सांगणारी, अनेकांना सांगून जाणारी.

-विश्वनाथ पंडित
जिजामाता मार्ग, ठाणे 

टोळधाडीचे नवे संकट

संकट कधीच एकटे येत नाही असे म्हणतात त्याचा प्रत्यय आता भारताला  येत आहे. सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करीत असलेल्या भारतासमोर आता टोळधाडीचे नवे संकट उभे ठाकले आहे. पाकिस्तान मार्गे भारतात शिरकाव करणाऱ्या या टोळधाडरुपी किड्यांच्या समूहाने राजस्थान, गुजराथ, मध्यप्रदेश मधील  हजारो एकर शेती फस्त केली आहे. आता ही टोळधाड महाराष्ट्रातही आली आहे. महाराष्ट्रातील विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला,,नागपूर  या जिल्ह्यात आता टोळधाड आली आहे.

 टोळधाडीने या जिल्ह्यातील हिरव्यागार पिकांवर हल्ला केला आहे. भाजीपाला, तृणधान्ये व संत्री मोसंबी सारख्या फळबागा या टोळधाडा फस्त करीत आहे. टोळधाडांचा या हल्ल्याने या भागातील बळीराजाचे अपरिमित नुकसान  झाले आहे. टोळधाडीच्या या हल्ल्याने बळीराजा हतबल झाला आहे. आधीच दुष्काळ, अवकाळी पाऊस, आणि कोरोनाने हतबल झालेल्या बळीराजापुढे   टोळधाडीचे नवे संकट उभे ठाकले आहे. अस्मानी आणि सुलतानी संकट बळीराजाची पाठ सोडायला तयार नाही. आता ही  टोळधाड हटवण्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलायला हवीत. कीटकनाशकांची फवारणी, तीव्र क्षमतेच्या केमिकलची धुराळणी, आवाजाचा वापर, ड्रोनद्वारे कीटकनाशकांची फवारणी असे उपाय करुन टोळधाडीला परतवून लावता येऊ शकते. टोळधाडीचे सध्याचे उग्र रूप पाहता हे उपाय तकलादू ठरू शकतात पण टोळधाड रोखण्यासाठी या उपायांशीवाय दुसरा कोणता उपायही समोर दिसत नाही. सरकारने टोळधाडीचे  संकट गांभीर्याने हाताळून बळीराजाला दिलासा द्यायला हवा. 

-श्याम बसप्पा ठाणेदार
 दौंड जिल्हा पुणे 

शासनाचा योग्य आदेश !


करोनाच्या संकटामुळे राज्याला मिळणार्‍या महसुलाच्या वाटा बंद असल्यामुळे त्याचा राज्याच्या अर्थ व्यवस्थेवर साहजिकच परिणाम होत आहे. परंतु आज करोनाला मुकाबला देण्यासाठी आणि प्रामुख्याने सर्वप्रथम त्यालाच प्राधान्य देणे महत्वाचे आहे यात वाद नाही म्हणूनच त्या साठी निधि कमी पडता कामा नये, करोनाविरुद्ध लढण्यासाठी निधि अभावी कोणत्याच आयुधांची कमतरता जाणवू नये. जीवापेक्षा लाख मोलाचे या जगात काहीच नाही. या विचारातून २०१९च्या अर्थसंकल्पात समविष्ट असलेल्या अत्यंत अत्यावश्यक कामे सोडून जी फक्त कागदावर आहेत, कार्यारंभाचा ज्या कामाना आदेश दिला गेलेला नाही, जी कामे सुरू झालेली नाहीत त्यांना कात्री लावणार शिवाय सरकारी विभागातील, महामंडळे अथवा अन्य खात्यांकडे अखर्चिक रक्कम पडून आहे ती त्यांनी सरकारी खात्यात जमा करावी हा दिलेला शासनाचा आदेश वाचनात आला, एकंदरीत प्राप्तस्थिती, करोंनाच्या लढतीसाठी लागणारा निधि वगैरे विचार करता शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य, स्तुत्य असाच आहे. विकास कामे होत राहतील, पुढे मागे करताही येतील.

-विश्वनाथ पंडित
जिजामाता मार्ग, ठाणे 

शनिवार, ३० मे, २०२०

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचे निधन


ठाणे -(प्रतिनिधी )

 शनिवार दि. ३० मे रोजी सकाळी ठाणे येथे,ज्येष्ठ सिने पत्रकार व लेखिका ललिता ताम्हणे यांचे दीर्घ आजारामुळे  दुःखद निधन झाले . लोकप्रभा , आणि अनेक साप्ताहिक , मासिक , दिवाळी अंकात आणि  लोकसत्ताच्या लोकमुद्रा या पुरवणी साठी त्यांनी लेखन केले आहे . ललिता ताम्हणे अत्यंत मृदूभाषी व लाघवी स्वभावाच्या होत्या , त्यामुळे सिनेपत्रकारितेत  गॉसिप पासून त्यांनी लेखणी दूर ठेवली होती. त्यांनी सतत वास्तव आणि सत्याचा पुरस्कार बातम्यात केल्याने , त्यांचे अनेक अभिनेत्री बरोबर मैत्री व स्नेहाचे संबंध निर्माण झाले होते ‌. विशेषतः त्यांनी  स्मिता पाटील , प्रिया तेंडुलकर , नूतन अशा लोकप्रिय अभिनेत्रीवर लिहिलेल्या पुस्तकांना चित्रपट रसिकांनी प्रचंड दाद दिल्या मुळे प्रकाशन संस्थांना या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या काढाव्या लागल्या. तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री नूतन ,रेखा,माधुरी दीक्षित यांच्याशी त्यांची खुप मैत्री होती. सध्या तर त्या दीप्ती नवल हीच चरित्र लिहीत होत्या. उजळल्या दाही दिशा, झाले मोकळे आकाश या दोन कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या होत्या. सिनेमा विषयासह त्यांची २९ पुस्तके प्रकाशित झाली आहेत . त्यांच्या जाण्याने सिनेमा व साहित्य क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

भांडुपच्या खाजगी रुग्णालयात उपचारास नकार दिल्यास डॉक्टरांची मान्यता रद्दच करा ! - अजिंक्य भोसले


मुंबई -(प्रतिनिधी )

सामान्य व्यक्तिला  खाजगी रुग्णालय सेवा देत नाही.त्यांच्याबाबत तर असंख्य तक्रारी  वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारचा तणाव निर्माण झालेला आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तातडीने लक्ष घालावे. सर्व डॉक्टरांनी नियमीत रुग्ण सुविधा द्याव्यात. यासाठी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी लक्ष द्यावे. ज्या रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना दाखल करून उपचार करणार नाहीत त्यांची मान्यताच रद्द करून कठोर कारवाई करावी. अशी, मागणी,भारतीय माथाडी कामगार सेना संयुक्त सरचिटणीस व प्रभाग क्रमांक  114 चे शिवसेना समन्वयक अंजिक्य सिताराम भोसले यांनी केली आहे .
    सदर काळात कोरोना रुग्णाला घाबरून, इतर रुग्णांकडे दुर्लक्ष करणे हे  निश्चितच योग्य नाही. बिगर  कोविड रुग्णांना रुग्णालयात वेळेवर दाखल करून घेतले जात नाही. त्यांच्यावर वेळेत उपचार होत नाही. औषध उपचार दिले जात नाही .अगदी हृदयविकार असलेल्या रुग्णांनाही दाखल करून घेतले जात नाही.बिगर कोविड  रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार नाकरण्यात येत आहे .ही परिस्थिती जनमानसात  भीती निर्माण करणारी आहे. असे लेखी निवेदनात अजिंक्य भोसले यांनी म्हटले आहे.

कुणबी विकास मंडळ ग्रामीण - मुंबई (वहाळ विभाग) मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम ; आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेले होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बम- ३० या औषधाचे मोफत वाटप


चिपळूण-( शांताराम गुडेकर / दिपक कारकर )    

      जगभरात लक्षावधी लोकांचा बळी घेणारा कोरोना व्हायरस दिवसेंदिवस वाढत आहे.या संकटाची झळ आज सर्वसामान्य लोकांना पोहचली आहे.कोरोना संसर्ग झालेल्या लोकांचा आकडा कमी व्हावा म्हणून सर्वत्र लहान-मोठ्या संस्था/मंडळे सामाजिक उपक्रम हाती घेऊन यावर मात करण्यासाठी जनजागृती करत आहेत.नुकताच उपरोक्त मंडळातर्फे इंग्लिश स्कूल,खांडोत्री - सभागृह येथे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेले होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बम- ३० या औषधाचे मोफत वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.अरुण पाटील उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमासाठी कुणबी विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष अनंत कोदारे,कुणबी विकास मंडळ ग्रामीणचे अध्यक्ष प्रा. हरिश्चंद्र भागडे, माजी पंचायत समिती सभापती सुरेश खापले सर,कु.वि.मंडळ माजी अध्यक्ष काका भुवड,संजय कोकाटे ( लायन्स क्लब अध्यक्ष - सावर्डे ), बाळू कोकाटे ( ए.बी.पी माझा रिपोर्टर ), तसेच पंचक्रोशीतील आबिटगाव,खांडोत्री,  कळंबट,केरे गावचे सरपंच तसेच,वहाळ विभागातील पंधरा गावातील प्रत्येक गावातील २ ते ३ प्रतिष्ठित नागरीक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.  
     मुख्य कार्यक्रमाची सुरुवात होण्यापूर्वी कुणबी समाजाचे नेते कुणबी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कै.बुरटेसाहेब यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली,त्यानंतर प्रा. हरिश्चंद्र भागडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. यामध्ये कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात माहिती दिली.उपयुक्त असं आर्सेनिक अल्बम- ३० हे औषध वाटप करताना प्रत्येक गावातील मग त्यात कुणबी समाज व्यतिरिक्त देखील सर्व समाजबांधवांना मंडळाचे पदाधिकारी त्या गावामध्ये याचे वाटप करणार आहेत. पंधरा गावातील सुमारे ८००० कुटुंबांना याचे मोफत वाटप होणार असून त्याचा फायदा सर्व समाजातील लोकांना होणार आहे.
      कार्यक्रम प्रसंगी माजी पं. स. सभापती खापले सरांनी आपले विचार मांडताना म्हणाले की, सद्य परिस्थितीचा विचार करून सरकारने लाॅकडाऊन उठविल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल की नाही याचा विचार न करता आलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपली प्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज आहे. याकरिता आपली प्रतिकार शक्ती व मानसिकता वाढावी व येत्या काळामध्ये कोरोना बरोबर घेऊन लढण्यासाठी समाजाच्या वतीने हा कार्यक्रम करून समाजाचे ऋण फेडण्याची संधी मिळाली.अशा शब्दांत आपले विचार व्यक्त केले.            कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. अरुण पाटील यांनी आर्सेनिक अल्बम- ३० या औषधाचे महत्त्व विशाद करून दिले व त्याबद्दल माहिती दिली. यावेळी उपस्थित सर्व लोकांनी या औषधाच्या बाबतीतल्या शंका निरसन केले. मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत खांडोत्री बौद्धवाडी या ठिकाणी या औषधांचे वाटप करण्यात आले व इतर सर्व गावांमध्ये वाटप करण्यासाठी हे औषध प्रत्येक गावातील प्रमुख व्यक्तीकडे देण्यात आले.सामाजिक कार्यात नेहमीच तप्तर असणाऱ्या जणू कोरोना योद्धेच असे कुणबी विकास मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत व प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे केलेलं सर्वांनी सहकार्य यातूनच हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने महाराष्ट्र घेणार LIVE तंबाखू मुक्तीची शपथ


मुंबई -प्रतिनिधी 

  नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य ,मुंबई च्या वतीने 31मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने मंडळाच्या फेसबुक पेज च्या माध्यमातून सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 या वेळेत राज्यभरातील जिल्हा  संघटक व कार्यकर्ते तंबाखू मुक्ती ची शपथ देणार आहे.
   नशाबंदी मंडळाच्या वतीने विविध उपक्रम द्वारे व्यसनी पदार्थ ( दारु,गुटखा,तंबाखू , अमली पदार्थ )चे सेवन व त्याचे दुष्परिणाम या विषयावर मोठ्या प्रमाणात जन जागृती करण्यात येते.तंबाखू च्या सेवनाच्या चक्रव्यूहातून तरुण पिढीला बाहेर काढून ,निकोटीन व तंबाखू च्या व्यसनापासून प्रतिबंध करणे.ही यावर्षी ची जागतिक आरोग्य संघटनेची मुख्य संकल्पना आहे.अनेक दशकापासून तंबाखू उद्योग समूहाने युवा पिढीला याच्या सेवनाकडे आकर्षित करण्यासाठी विविध जाहिराती देऊन ,आपल्या विळख्यात ओढले आहे.यामुळेच युवक तंबाखू सेवनाच्या आहारी जात आहे.याचाच परिणाम म्हणून भारतात 5500 युवक दरवर्षी दर दिवशी पहिल्यांदा तंबाखू चे सेवन करतात .दर दिवशी भारत देशात 2500 लोक केवळ तंबाखू च्या सेवनाने मृत्यूमुखी पडत आहे हि चिंताजनक बाब आहे.
     या विषयी मोठ्या प्रमाणात जागृती व्हावी यासाठी 31 मे या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने राज्यातील संघटक सर्व जिल्ह्यात तंबाखू मुक्ती ची शपथ फेसबुक या सोशल मिडीयाच्या माध्यमातून देणार आहे.
    सध्या देशात कोरोना या आजाराच्या प्रभावामुळे सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध असल्यामुळे  प्रचार व प्रसाराचे प्रभावी माध्यम म्हणजे सोशल मिडीया यामुळेच सदर कार्यक्रम मंडळाच्या फेसबुक पेजवर घेण्यात येणार आहे.राज्यातील सर्व जिल्हा संघटक तंबाखू मुक्ती ची शपथ घेऊन , तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याची मोठ्या प्रमाणात जागृती करणार आहे.असे एका प्रसिद्धी पञका द्वारे मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास,मुख्य संघटक अमोल स.भा.मडामे व पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील यांनी केले आहे .

लाईट बिल माफ व्हावे


करोनाच्या अस्मानी संकटात लॉकडाऊन मुळे जनता घरी बसली आहे. उत्पातनाचा मार्ग बंद झाला आहे. परंतु परप्रांतीय नोकरदार वर्ग, नोकरी नाही म्हणून आपल्या कुटूंबीय सह आपल्या मूळ गावी जातांना, त्यांना मोफत जेवण देण्यात येत असून, त्यांना श्रमिक एक्सप्रेस तर्फे मोफत प्रवास मिळत आहे. अशा परिस्थितीत मुंबई महाराष्ट्रातील सर्व सामान्य मध्यम वर्गीय भूमी पुत्राला कोणत्याही प्रकारची आर्थिक माफी, सवलत मिळू शकत नाही. त्यात लोकडाऊन मुळे उन्हाळ्यात घरात बसून पंखे, AC, वेळ घालवण्यासाठी बातम्या ,टीव्ही चालू आहेत. अशा परिस्थितीत लाईट बिल मध्ये वाढ होत आहे. त्यातही मागील २ महिन्याचे घरपोच इलेक्ट्रिक बिल मिळू शकलेले नाही. आणि पुढे कधी मिळेल सांगता येत नाही. थकबाकी वाढू शकणार आहे. ते एकदम देण्यास सर्व सामान्य शासकीय नियम पाळून घरी बसलेल्या मध्यम वर्गीय नोकरदारांना एकदम बिल भरणे महाग होणार आहे. तरी शासनाने मार्च ते ऑगस्ट पर्यंत ६ महिन्याचे घरगुती इलेक्ट्रिक बिल पॅकेज च्या मार्फत माफ करावयास हवे. त्यामुळे काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळू शकेल.

-विजय ना कदम
लोअर परळ

माणसातला देव जाणा...


आज संकटाच्या काळात माणसातच देव असतो याची जाणीव सर्वाना झाली,हे ही नसे थोडके.देव देवळात नसून अनेकवेळा तो आपल्याला वेगवेगळ्या रुपात भेटत असतो.माणसावर आपदा अली की तो निराश होतो,हताश होतो,सर्व दुःख माझ्या वाट्याला असे बोलू लागतो व आता सर्व संपले असे बोलू लागतो व त्यातच एखादा त्याच्या पाठीमागे उभा   डॉक्टरसारखा,मित्रासारखा व इतर अनेक रुपात उभा राहतो व तो माणूसच असतो.तेव्हा संकटग्रस्त माणूस म्हणतो,अरे अगदी देवासारखा धावून आला.तेव्हा आपण निदान देव नाही तर देवाचा मित्र म्हणून या धरतीवर नक्कीच चांगले कार्य करू शकतो जे आज कोरोनात होताना आपण सर्वत्र पाहतोय व हेच कार्य अनेकजणांनी विविध अवतार घेऊन या भूमीवर केले आणि हेच शाश्वत आहे.
देव एक...रूप अनेक
तेव्हा या एकत्र मिळून माणुसकीचे कार्य करू या व ही धरती सुंदर बनवूया.

SERVE MEN...SERVE GOD

Peace not Pieces,Let's works for it
जय हिंद

-गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व

शुक्रवार, २९ मे, २०२०

दत्तक वस्ती योजना : स्वच्छतेबाबत समन्वय आणि पारदर्शकतेचा अभाव ; लोकप्रतिनिधींचा पैसे खाण्यात हातभार ..?


मुंबई  :(विशेष प्रतिनिधी  )

       गलिच्छ वस्ती तसेच  झोपडपट्टी  विभागातील घाण , कचरा  स्वच्छ  करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून  दत्तक  वस्ती  योजना मुंबई शहर उपनगरात सुरु करण्यात आली विभागातील  लोकसंख्येनुसार  सदर  दत्तक  वस्ती  योजना  तिथले मंडळ, स्वयंसेवी संस्था  यांच्याकडून चालवली  जात  असते . दत्तक वस्ती योजने  अंतर्गत  परिसरातील कचरा वेळच्या  वेळी उचलला जात असल्याने ही  योजना प्रभावशाली ठरून जनतेला  सुद्धा सोयीची  वाटू  लागली  होती  
मात्र मध्यंतरी  योजनेचे प्रत्यक्ष  काम , नेमलेले  तेच  तेच  ठेकेदार,  लोकप्रतिनिधी  हस्तक्षेप  ह्या गोष्टींबद्दलचे  गैरप्रकार उघडकीस  आले होते. यासंदर्भात  संबंधितांवर कारवाई देखील करण्यात  आली होती. परंतु  सध्याच्या  स्थितीमध्येसुद्धा  या  दत्तक  वस्ती योजनेत पारदर्शी कारभाराची  वानवा  दिसते . तसेच  ही योजना  राबवणाऱ्यांकडून परिसर  स्वच्छ करण्याबाबत  समन्वयाचा  अभाव  दिसून येत  आहे 
     सध्या  कोरोनाचा  प्रादुर्भाव मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे .विविध  ठिकाणचा  रुग्णालय  परिसर , रस्ते,  नगरे  , गल्ल्या -मोहल्ले  साफ ठेवण्यात  सफाई  कामगार महत्वाची भूमिका बजावत  आहेत. मात्र दुसरीकडे लॉक  डाऊन  असल्यामुळे तसेच  कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांना  घराबाहेर पडता येत नसल्याने   घरातील कचरा नेण्यासाठी सध्याच्या  परिस्थितीत दत्तक  वस्ती योजनेतील  कामगार मात्र  कामचुकारपणा  दाखवत आहेत. 
    कांजुरमार्ग (पूर्वेतील )मिराशी नगर, शास्त्री नगर, राम नगर, इंदिरा नगर,  अशोक  नगर व इतर  चाळवजा  नगरांमध्ये  हा  कचरा  रोज उचलून  घेऊन जाण्यासाठी  कामगार प्रतिसाद  देत नसल्याचे  एका राजकीय पक्षाच्या  माजी पदाधिकाऱ्याने  नाव  न  सांगण्याच्या  अटीवर वार्ताहर  शी  बोलताना सांगितले. योजना राबवणारे संबंधित व्यक्ती आणि कर्मचारी  वर्ग यांच्यात  समन्वय  -सहकार्य नसल्याचेही त्यांनी  बोलून  दाखवले. 
  त्याचबरोबर  त्यांनी आणखीन  एका गोष्टीचा गौप्यस्फोट केला . प्रत्यक्षात  कमी मात्र कागदोपत्री  जास्त कामगार दाखवून महापालिकेला  लुबाडण्याचे काम  सुरु  असल्याचे म्हणाले . शेवटी त्यांनी  ही  योजना राबवणाऱ्यांकडून  स्थानिक  लोकप्रतिनिधी पैसे  घेत  असल्याची धक्कादायक बाब उघड  केली.
 एकंदरीत स्वच्छतेसाठी राबवली जाणारी दत्तक वस्ती  योजना  आतून बाहेरून   अधिक स्वच्छ कशी दिसेल याकडे  लक्ष देण्याची  जास्त गरज आहे.


श्री फाउंडेशन मार्फत गरजू कुटुंबांना मोफत धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


प्रतिनिधी

मुंबई -  
श्री फाउंडेशन या संस्थेमार्फत भांडुप पश्चिम  येथील ६५०  हून अधिक  गरजू  कुटुंबांना मोफत धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
अधिक दुर्बल महिला आणि मोलमजुरी करणाऱ्या गरिब  
कुटुंबांना किराणा कीटसह, मोफत धान्य वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच सामान्य जनतेच्या अडचणी वाढत आहेत. सर्वात मोठी अडचण दररोज पोट भरण्याची असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी भांडुप मधील एक अग्रगण्य संस्था श्री फाउंडेशन च्या माध्यमातून  दुर्बल महिला आणि मोलमजुरी करणाऱ्या गरिब लोकांसाठी पुढे सरसावली आहे.
श्री फाउंडेशनच्या अध्यक्षा, व समाजसेविका दिक्षा कदम त्याचप्रमाणे तृप्ती गावडे,मनोज सुवरे,महेश माने,दिप्ती कदम,रूपेश चव्हाण व इतर सभासद यावेळी उपस्थित होते.
यावेळी वाटप करण्यात आलेल्या साहित्यामध्ये किराणा कीट, तूरडाळ, कांदे, बटाटे, तेल, मसूर, हरभरे, रवा, मीठ, कपडे साबण, अंगाचा साबण, साखर, चहा पावडर, तिखट, हळद, इत्यादी वस्तू देण्यात आल्या.

आर्थिक नियोजनानुसार ६५० गरजू कुटुंबियांना धान्य वाटप करण्यात आले. श्री फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गेल्या १५ दिवसांत भांडुप मधील झोपडपट्टीचा सर्व्हे करून मोलमजुरी करणाऱ्या ८५० कुटुंबांची यादी तयार केली. या सर्वांना आवश्यक किराणा मिळेल असे कीट तयार करून ते वाटप करण्याचे ठरविले. त्यानुसार आर्थिक नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात  ६५० कुटुंबाना संस्थेने धान्याचे वाटप केले.

रेशन दुकानातील काळाबाजाराला चाप : भाजपकडून रेशन दुकानदार वठणीवर ; रेशन ग्राहकांना मिळाला न्याय




मुंबई -(विशेष प्रतिनिधी )

    कांजूरमार्ग येथील रेशन दुकान नंबर U-mum३०-ई-२६ रिटा थॉमस चाळ, येथे असणाऱ्या ह्या रेशन दुकानात होणारा घोटाळा आणि काळाबाजाराची बातमी कांजुर गावात सगळीकडे चर्चेत आली होती. पीडित लोकांमध्ये असणारा राग,आणि त्यांच्या हक्काचा जाब हे कोठेतरी वाट पाहताच होते, पण कोणीच पुढे येऊन ह्या अन्यायाला वाचा फोडत नव्हते.पण सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन कांजुरमार्ग येथील भाजपा विक्रोळी विधानसभा 117 चे महामंत्री श्री संजय  नलावडे ह्यांनी  कार्यक्षम   खासदार श्री.मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या पीडित जनतेचे आव्हान स्वीकारले.करोनाच्या ह्या कठीण परिस्थितीमध्ये स्वतःच्या हक्काच्या अन्नासाठी झगडणाऱ्या पीडित जनतेला न्याय देण्यासाठी स्वतः संजय जी भाजपाच्या कार्यकर्त्यां सोबत त्यांच्या पाठीशी ढाल बनून उभे राहिले.त्यांनी  त्वरित सीनियर रेशनिंग लोकल ऑफिसर हुंगर्गे आणि रेशनिंग ऑफिसर कांबळे तसेच तक्रारदार रेशनिंग ग्राहक ह्यांना वेळीच संपर्क करून त्यांना गुरुवार, 28 मे रोजी  ह्याच रेशनिंग दुकानावर बोलावून घेतले होते .
        यावेळी  तक्रारदार रेशनिंग ग्राहकानी आपल्या समस्या संजय नलावडे  आणि संबंधित रेशनिंग ऑफिसर  यांच्या समोर मांडल्या.प्रत्येका च्या विविध प्रश्नाला सामोरे जात,रेशनिंग दुकानदार व ग्राहक यांमधील वाद पूर्णपणे मिटवण्यात  यशस्वी झाले. त्यानंतर  रेशन ग्राहकांच्या बाजूने उभे राहत रेशन दुकानदारास, ग्राहकाशी बेपर्वा वागणुकीसाठी,दुकानाच्या वेळेसाठी, ग्राहकांच्या धान्यवाटपांच्या सूचनांसाठी तंबी देण्यात आली व अशा चुका भविष्यात पुन्हा होणार नाही याची हमी रेशन दुकानदारा कडून घेण्यात आली. तसेच स्थानिक जनतेकडून श्रेयस आजगेकर युवा  महामंत्री वॉर्ड ११७ व प्रवीण सरवणकर कोकण विकास आघाडी अध्यक्ष यांना वेळोवेळी ग्राहकांच्या तक्रारी वर लक्ष ठेवण्यास सांगितले.
     सदर रेशन बाबतच्या तक्रारीचे निवारण केल्याबद्दल रेशन धारकांनी भाजपा खासदार श्री मनोज कोटक,विक्रोळी विधानसभा महामंत्री संजय नलावडे, विक्रोळी विधानसभा मंत्री प्रदीप आंब्रे,नितीन चव्हाण (वॉर्डमहामंत्री ११७),महेश चव्हाण (उपाध्यक्ष- युवा वॉर्ड ११७),अनिल नार्वेकर (उपाध्यक्ष वॉर्ड ११७), सुरेखा आजगेकर( महिला उपाध्यक्ष वॉर्ड ११७),संतोष पाटील,वंदना जोशी, व उपस्थित कार्यकर्त्यांचे खूप आभार मानले. 

ऋषीतुल्य व्यक्तीमत्व लोपले !


 काविळ उतरवणे ही अंधश्रद्धा वाटते आजही, काहींना. पण ज्याचे शरीर खंगते, गुडघे वेदना ओकत असतात. जेवणावरची इच्छा उरते आणि कधी कधी जगण्याची आशाही सुटते, तेव्हा हजारो विज्ञानवादी अंधश्रद्धा बाजूला सारून धुतुमला येत असतात. त्यात काही सिनेकलाकारही असत. एकेकाळचा सुपरस्टार राजेश खन्ना हे सुद्धा अनुभव घेण्यासाठी आले होते. जिथे विज्ञानाशी सीमा येते तेव्हाच अध्यात्म सुरू होतो. काविळ उतरवणे ही आध्यात्मिक शक्ती आहे, तो दिक्षेतील उत्तम प्रकार आहे.
 ...................................................................


 ‘सेवेशी तत्पर, हरिश्‍चंद्र ठाकूर’, अशी अविरत जीवनधारा जगून सुख, समाधानाने जगाचा शांतपणे निरोप घेताना धुतूम येथील एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाला दाटलेल्या कंठाने आणि डबडबलेल्या अश्रू नयनांनी काल निरोप देण्यात आला. तेव्हा काही क्षणांसाठी स्वर्गलोकही हळहळले असेल. आयुष्यभर ज्या भगवान दत्तात्रेयांवर दृढ श्रध्दा ठेवून लाखो लोकांना मृत्यूच्या दाढेतून परत आणले आणि त्याचा हिशेब ठेवताना चक्क चित्रगुप्तही गडबडले असतील, ते सेवाव्रती हरिश्‍चंद्र कृष्णा ठाकूर उर्फ आप्पा यांचे काल देहावसन झाले. तेव्हा खरंच त्यांच्यासाठी भगवंताने पुष्पक पाठविले असेल.
 ऋषीतुल्य माणसं जेव्हा वानप्रस्थाला निघतात तेव्हा यमराज त्यांना नेण्यासाठी येत नसतो, तर ती आपत्कालीन व्यवस्था साक्षात वैकुंठपती स्वतः हाताळत असतात. तेच पुष्पकाची यंत्रणा कार्यान्वित करतात आणि स्वतः सारथ्य करतात. इतक्याचसाठी, ‘मरावे परी कीर्तीरुपी उरावे’, असे सत्कार्य हातून घडावे असा जीवनाचा साधा सरळ अर्थ आहे.
   मोह, मायेसारख्या षड्रिपुंना कोहळून प्यालेली ही माणसं सत्कार्य आणि परोपकाराकरिता जन्माला येतात. त्यांना स्वतःसाठी काहीच नको असते. समाज म्हणून ते गुलमोहरासारखे सदैव टवटवीतपणे फुलत असतात आणि इतरांना तो टवटवीतपणा, ती प्रसन्नता देत असतात. चंदनाच्या वनात विषासोबत राहूनही लाखो लोकांच्या आयुष्यात सुगंध वाटणारे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते.
   धुतुमचे काविळ उतरवणारे आप्पा, हे नाव खरं तर एव्हाना गिनिज बुकमध्ये असायला हवे होते. इतकी कार्याची विशालता. पण अंगी विरक्तपणा आला की, ही सारी सुखे त्या व्यक्तित्वाला विषासारखी भासू लागतात. त्यात ते दत्तभक्त, म्हणजे विरक्तीचे परमोच्च शिखर असल्याने प्रसिद्धीच्या वावटळीपासून दूर राहून दारासमोर नदीसारख्या वाहणार्‍या खडकावर चुन्याच्या माध्यमातून माणसांचे मळे पिवळ्या पानातून फुलवत राहिले, निर्व्याजपणे.
   आप्पा यांचे वडील कृष्णाजी ठाकूर यांच्या तरुणपणाच्या काळात, माणसं आज जशी पृथ्वीतलावर कोरोनाने मरत आहेत तशी पटकी, काविळने मरत होती. ते दृश्य पाहून ते कासाविस झाले. त्यांनी काविळ उतरवून घेण्याचे मंत्रोंपच्चार अंगिकारले. ज्याला काविळ झाली आहे, त्याच्या हाताला साधा चुना लावून आपल्या मनगटावरुन ओढून काविळ उतरवण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. तोपर्यंत भारतात काय जगाच्या पाठीवर कुठेच हेपीटायसीस-बी ची लस उपलब्ध नव्हती. तेव्हा हा अवलिया हे सत्कार्य करत होता. त्यांच्यानंतर आप्पांनी वडिलांकडून दीक्षा घेतली. आज आप्पांचे चिरंजीव दत्ता हा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहेत.
 आप्पा अलीकडे वार्धक्याकडे झुकत चालले होते, तरीही त्यांची सेवा सुरूच होती. वयाच्या 81 व्या वर्षांपर्यंत म्हणजे जवळपास त्यांनी साठ वर्षांहून अधिक काळ हा यज्ञ मांडला आहे.
 ज्ञानेश्‍वर माऊलीने भिंत चालवली, रेड्याच्या तोंडून मंत्रघोष करून घेतला. काशी येथे गेल्यावर तेथील पुजार्‍याने माऊलीच्या हाती पेंढा दिला आणि मंदिरातील पाषाणाच्या नंदीच्या मुर्तीला तो भरविण्यास सांगितले. तेव्हा माऊली म्हणाली असले काही चमत्कार आपल्याला जमत नाही. यावर त्या पुजार्‍यांनी गुरु निवृत्तीनाथांना विनंती करून, भिंत चालविणार्‍या, रेड्याला बोलते करणार्‍या योग्याला हे अशक्य कसे असेल? आपणच आज्ञा करावी असे सुचविले. तेव्हा गुरूच्या आज्ञेनुसार माऊलीने ते सुके गवत नंदीच्या तोंडाशी धरले आणि हलक्याशा स्पर्शाने दीक्षा दिली नंदीला. ... आणि आश्‍चर्य वर्तले, नंदीने ते गवत सर्वांसमक्ष खाल्ले. माऊलीच्या डोक्यावर पगडी असलेला आपण एक फोटो पाहतो, ती पगडी काशीच्या ब्राह्मणांनी देऊन आळंदीच्या लेकरांचा केलेला तो सन्मान होता. तोच हा स्पर्श दिक्षेतील प्रकार आहे. यात थोतांड नाही, अंधश्रद्धा तर मुळीच नाही. यात निखळ त्याग आहे.
 नेहमी विडा खाणारे असले तरी एखाद दिवशी चुकून विड्याला चुना जास्त लागला तरी तोंडाची आग होते. इथे दररोज हजारो माणसं मुंगी सारखी रांग लावून चुना त्यांच्या मनगटावरुन दोन्ही हाताने जोर लावून घासून ओढत असतात. त्याची वेदना आप्पा कधी कुरवाळत बसले नाही, त्यांची चिंता त्या भगवंताने वाहिली होती. सकाळपासून दुपारपर्यंत आणि संध्याकाळी हे सत्कार्य अव्याहतपणे न थकता सुरूच होते.
 आप्पांनी जर प्रत्येकाकडून एक-एक रुपया जरी घेतला असता तरी आप्पांच्या घरावर सोन्याची कौले पडली असती. ते त्यांच्या हातून घडणे शक्य नव्हते. घडले नाही. म्हणूनच लाखो लोकांना आप्पांच्या जाण्याची बातमी कळत गेली तशी ती हळहळली. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा.
 आप्पांचे आयुष्यच गोड होते, तोच गोडवा त्यांची पुढची पिढीसुद्धा ‘कर्मण्येवाधीकारस्ते’ या गीतेतील तत्वाने जगत आहे. तेव्हा आप्पा समाधानाने पुढच्या प्रवासाला निघाले. त्यांच्या जाण्याने एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाचा अस्त झाला असला भौतिकदृष्ट्या तरी ते कार्याने चिरंजीवी राहतील.
 त्यांच्या चरणी आम्ही नतमस्तक आहोत!

- कांतीलाल कडू (संपादक -दै. निर्भीड लेख )

आदर्श वार्ताहर -"काव्यांगण "

जगबुडी झाली तरी...!
.............................

यंदा नाही पडणार दुष्काळ
नाही येणार आणीबाणी
डोळ्यांत इतकं साचलय...
काळजाचंही झाले पाणीपाणी

यंदा महागाईही नाही जाणवणार
अन्नधान्याचा तुटवडा नाही भासणार
पदराची गाठच सुटलीय...
तिथे पैसे तरी कुठून आणणार?

यंदा सावकार, बँक नाही ओरडणार
कर्जही नवे नाही घ्यावे लागणार
पाठीवर आसुडाचे वळ ओलेच आहेत
फुंकर तरी कुणाला मारायला सांगणार

घरात नाही होणार मंगलकार्य
अंत्यविधीही अर्धवट रहाणार
सगळे शास्त्र ठरले थोतांड
मनाला कायमची सल बोचणार

काहीही घडत असले तरी...
धीर नाही सोडायचा
जगबुडी जरी झाली तरी
लाटा वेचत किनारा गाठायचा !

- कांतीलाल कडू

लाॅकडाऊनमुळे उपासमार !


लॉक डाऊन वाढवित जाणे केवळ अर्थव्यवस्थेसाठी घातक नाही तर त्यामुळे आरोग्याचे इतर प्रश्‍न निर्माण होतात, असे जेष्ठ उद्योजक आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे. लाॅकडाऊनमुळे निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीचा विचार करता उद्योजक आनंद महिंद्रा यांचे विधान रास्तच आहे. लॉक डाऊन वाढविल्यामुळे कोरोना विषाणूला काही प्रमाणात आळा बसेल. परंतु,  पूर्णपणे निर्मूलन होईल ह्याची काही शाश्वती देता येत नाही. त्यासाठी खात्रीलायक रामबाण उपाय अद्याप मिळालेला नाही. प्रदिर्घ लॉक डाऊनुळे मानसिक आरोग्याचे इतर मोठे प्रश्‍न निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर करोना व्यतिरिक्त इतर रोगाच्या उपचाराकडे इतका काळ दूर्लक्ष कल्यास ते महागात पडू शकते अशा प्रकारचा एक अहवाल जारी झाल्याचे वृत्त आहे. आगामी काळातही करोनाचे रुग्ण वाढत राहणार आहेत. त्यासाठी उपचाराच्या सुविधा विस्तारीत करण्याची गरज आहे. सरकारने अनेकदा लॉक डाऊनचा कालवधी वाढविला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. परीस्थिती खूप भयानक होत चालली आहे. कामधंदा बंद आहे. जे रोजंदारीवर काम करतात त्यांची कामे बंद असल्याने पैसे नाहीत अशा लोकांची अन्न पाण्यावाचून उपासमार होत आहे. भाड्याने राहतात ते भाडे सुद्धा भरू शकत नाहीत. आगामी महिन्याचे विजबिल, पाणी पट्टी  तसेच निवासी जागेचा कर व केबल वगैरे इतर देणी सुद्धा भरू शकणार नाहीत. विचार करू शकत नाही अशी भयंकर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यांना घरातील कुणाचा आधार किंवा मदत आहे तेच कसंतरी पोट भरत आहेत.
  बाकी ज्यांना कोणाचाच आधार किंवा मदत नाही त्यांच्यापुढे प्रत्येक दिवस कसा जगायचा असा प्रश्न समोर आहे. तरी केंद्र व राज्य सरकारने कोरोनाला आळा घालण्यासाठी अन्य पर्याय निवडावा. कारण सर्वसामान्य जनतेसाठी लाॅकडाऊन कोरोना पेक्षाही महाभयंकर ठरण्याची वेळ आता समीप आली आहे. 

            - सुधीर कनगुटकर 
            १/९, संतोष भगत चाळ,
            बी. आर. नगर,
            दिवा (पूर्व), ४०० ६१२.

मुलीचे टिकटॉक वर बदनामी करणाऱ्या विकृताला नालासोपारा पोलिसांनी ठोकल्या बेड्या पोलीसांकडून गतीमान कारवाई अपेक्षित...शीतल करदेकर


 नालासोपारा : 
    गोरेगाव येथील एका मुलीचे टिक टॉक वर बनावट अकाऊंट बनवून तिची बदनामी करणाऱ्या विकृतास नालासोपारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पूर्वी गोरेगाव येथे राहणाऱ्या १८ वर्षाच्या मुलीसोबत संजू नागनाथ पवार २२ याने मैत्री केली होती. त्यानंतर संजूचे इतर मुलींशी असलेले संबंध पिडीत मुलीने स्वतः पाहिल्या नंतर त्या मुलीची तिने समजूत घालून तिला संजूला सोडायला सांगितले मात्र तिने आपले संबंध कायम ठेवले. पिडीतेने दोघांनाही समजावल्या नंतर ऐकत नसल्याने तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.  संजू हा पिडीतेला जीवघेणी मारहाण करत असे, संशय घेत असे. विकृत नराधमाच्या असल्या त्रासाला कंटाळून पिडीतेने त्याला सोडायचा निर्णय घेतला व माझ्यापासून लांब राहा असे सांगितले. पण संजू हा तिला सोडायला तयार नव्हता. त्याने तिला प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. आणि पिडीतेने त्याला सोडल्या नंतर त्याने तिला बदनाम करण्यासाठी टिक टॉक वर तिच्या नावाचे बनावट अकाऊंट तयार करून तिच्या छायाचित्राचे व्हिडिओ बनून त्यावर पिडीत मुलीचे अनेक मुलांशी संबंध असल्याचे बदनामीचा मजकूर लिहून पोस्ट केले होते.
   या प्रकरणी नालासोपारा पोलीसांकडून विलंब होतहोता.त्रस्त झालेल्या मुलीने  पत्रकार विजय देसाई यांना मदत मागितली. 
एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी ही बाब तातडीनं मार्गी लागून मुलीला त्रासमुक्त करणे व इतर मुलीचीही फसवणूक होऊ नये म्हणून पोलिसांशी संपर्क केला. आणि कामाला गती मिळाली. 
    या प्रकरणाची तत्कालीन पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख,अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर,पोलीस उपअधीक्षक अमोल मांडवे तपास अधिकारी रवी मातेरा यांनी टिकटॉक शी संपर्क साधून तो बदनामीकारक ते अकाऊंट डिलीट करून संजू नागनाथ पवार याला अटक करून पिडीत मुलीला न्याय मिळवून दिला आहे.पुढील तपास नालासोपारा पोलीस करीत आहेत,या गुन्ह्यासाठी कमीत कमी ३ वर्षाची शिक्षा आहे. 
     या कृत्याबद्दल पोलिसांचा पुरेसा प्रसादही या विकृतास मिळाला आहे.अशा कामी अधिक वेगाने पोलिसांनी काम केले तर अधिक चांगली वचक अशा विकृतांवर बसेल असे मत शीतल करदेकर यांनी व्यक्त केले. आणि पोलीसांनी केलेल्या या कामाबाबत आभार मानले आहेत 
.    

मुंबईहुन आलेल्या नागरिकांमुळे होतोय कोरोनाचा प्रसार ? पेण शहरात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण !



पेण दि. २८ (अरविंद गुरव)  -  पेण शहरातील हुडको वसाहती भागात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. पेण शहरातील नागरिक भीतीच्या छायेखाली असून, हा पॉझिटिव्ह रुग्ण कोणाकोणाच्या संपर्क आला याचा शोध सुरू आहे.
   गुरुवारी दुपारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये पेण शहरातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाचा आता शहरातही शिरकाव झाला आहे. शहरानजीकच्या आणि ग्रामीण भागातआत्तापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळले होते. परंतु, शहरात आजवर कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता.
काही दिवसापूर्वी व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने टाळेबंदित शिथिलता देण्यात आली आणि पेण बाजारपेठेतील दुकाने एक दिवसाआड उघडी ठेवण्यास परवानगी दिली गेली. त्यातच काल बुधवारी २२ आणि आज गुरुवारी १८ संशईतांचे स्वेबचे नमूने तपासनिसाठी पाठविले असतांनाच. आज गुरुवारी आलेल्या अहवालातील एक रुग्ण शहरातील हुडको वसाहत येथील असल्याने खळबळ उडाली आहे. हा ५५ वर्षीय रुग्ण कोटक महिंद्रा बँकेच्या जवळील परिसरातील असून तो पेण ते मुंबई (गोरेगाव) येथे कामानिमित्ताने ये-जा करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
   त्यातच पेण ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्नाच्या संपर्कात आलेल्या आणि वडाळा-मुंबई येथून आलेल्या ६४ वर्षीय पुरुषालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. पेण तालुक्यात कोरोनाचे आता आठ रुग्ण असून त्यातील २ रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाले आहेत.
   दरम्यान, पेण शहरात पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, शहरात कोरोनाचा रुग्ण आढळताच हुडको परिसर सील करण्यात आला आहे. याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गुरुवार, २८ मे, २०२०

पत्रकार खंडुराज गायकवाड यांना पत्नीशोक

मुंबई -
 
   जेष्ठ पत्रकार व लोककलेच्या अभ्यासक श्री. खंडूराज गायकवाड यांच्या पत्नी मनीषा खंडूराज गायकवाड( वय ३९) यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी गोरेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले
गुरुवारी दुपारी ३ च्या दरम्यान त्यांचा राक्तदाब कमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार केल्यावर त्यांना दोन दिवसांपूर्वीच डिस्चार्ज मिळाला होता. मात्र आज दुपारी अचानक श्वसनास त्रास होऊ लागला. त्यांना रुग्णालयात नेण्याचे प्रयत्न सुरू असताना त्यांचे निधन झाले.
 श्री. खंडूराज गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबावर अकाली कोसळलेल्या आदर्श वार्ताहर परिवार  सहभागी आहे. ईश्वर त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना हे दुःख सहन करण्याची  शक्ती देवो ही प्रार्थना! 
   



ठाण्यातील माध्यमकर्मींना राज्यमंत्री बच्चू कडूंमार्फत जीवनावश्यक वस्तूंची सहायता ; एनयुजे महाराष्ट्र ने मानले आभार


ठाणे -(प्रतिनिधी )
     बुधवार दि. 27 मे रोजी  ठाणे येथे राज्यमंत्री बच्चू कडू यांचे वतीने मुक्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल पाटील यांचे पुढाकाराने एनयुजे महाराष्ट्र चे संस्थापक सदस्य अतुल कुलकर्णी यांनी काही गरजू पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली गेली. 
येत्या काळात आणखी महत्वपूर्ण मदत करणेसाठी ठाणे जिल्हा पालकमंत्री मा एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे. मुंबई, पालघर, रायगड ,नाशिक आदि जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांशी समन्वय सुरु आहे
ठाण्यातील माध्यमकर्मींना राज्यमंत्री बच्चू कडूंमार्फत जीवनावश्यक वस्तूंची सहायता केले बद्दल एनयुजे महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी  आभार मानले!



आदर्श वार्ताहर पाक्षिकाचा सामाजिक उपक्रम : कोरोना योध्यांना सन्मानित करण्यासाठी आवाहन



मुंबई -

     सध्या जगभरासह आपल्या भारत देशातील विविध राज्यांमध्ये विशेषतः मुंबई -महाराष्ट्रात कोरोना( कोविड -19)विषाणूने हाहाकार माजवला आहे. कोरोनाबाधितांच्या  आकडेवारीत रोज मोठी  भर पडत आहे. असे असले तरी कोरोनासारख्या महामारीपुढे हतबल न होता भारत देश मोठ्या ताकदीने या आजाराशी लढत आहे. 
    आज हा आजार नियंत्रणात आणण्यामध्ये डॉक्टर, नर्सेस, पोलीस बांधव, सफाई कर्मचारी, इलेक्ट्रॉनिक -प्रिंट माध्यमातील छायाचित्रकार - पत्रकार प्रतिनिधी, समाजसेवक, बँक कर्मचारी तसेच इतर क्षेत्रातील कर्मचारी फार महत्वपूर्ण -मोलाची भूमिका बजावत आहेत.हे सर्वजण धैर्यशाली -योद्धे आहेत. हीच गोष्ट लक्षात घेऊन त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करताना त्यांचा "कोविड योद्धा "म्हणून सन्मान करण्याचे मुंबईतील "पाक्षिक आदर्श वार्ताहर" ने ठरवले आहे. 
        तेव्हा हे सत्कार्य आमच्या हातून घडण्यासाठी आपले संपूर्ण नाव, पत्ता -संपर्क क्रमांक आणि आपले कार्यक्षेत्र याबाबतची माहिती पुढील मोबाईल नंबर (व्हाट्सअप )किंवा ई-मेल वर पाठवण्यात यावी असे आवाहन  पंकजकुमार पाटील (संपादक - आदर्श वार्ताहर पाक्षिक वृत्तपत्र)यांनी केले आहे. मोबाईल  क्रमांक -9833127069, ई-मेल -adarshvartahar@gmail.com
अधिक माहितीसाठी आमच्या अधिकृत www.facebook.com/adarsh vartahar 

आणि www.adarshvartahar01.blogspot.com या न्युज पोर्टलला अवश्य भेट द्यावी 

समृध्द युवा फाऊंडेशन ( महाराष्ट्र ) संस्थेचा प्रेरणादायी उपक्रम



मुंबई ( शांताराम गुडेकर / दिपक कारकर )  

         सध्याचे जगावर असणारे कोरोनाचे भयंकर संकट या स्थितीत पोलीस मात्र चौवीस तास ड्यूटी करत आहे. कोरोनाच पोलिसांवर होणारं संक्रमण व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी समृद्ध युवा फाऊंडेशन ( महाराष्ट्र ) टीमच्या वतीने पोलिसांना सहकार्य म्हणून पालघर जिल्ह्यातील विरार ( पुर्व ) पोलिस ठाणे व ६ बिट चौक्या सुलभ शौचालये येथे कोरोना प्रतिबंधक फवारणी करण्यात आली. 
    तसेच रोडवरील गरीब गरजूंना पाणी बोटल व बिस्किट वाटप करण्यात आले.आजवर उपरोक्त संस्थेतर्फे विविध समाजिक,शैक्षणिक उपक्रम हाती घेऊन सामाजिक कार्याचा वसा अखंडित ठेवला आहे.या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

दादा प्रतिष्ठान तर्फे रेशनकार्ड नसणाऱ्यांना धान्याचे किट वाटप


घाटकोपर(शांताराम गुडेकर/निलेश मोरे  )     

              कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच सामान्य जन जीवन देखील विस्कळीत झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. कामे बंद असल्याने हाताला पैसा नाही.शासनाने रेशनकार्ड नसणाऱ्यांना  धान्य वाटप सुरू केले असले तरी मुंबईच्या दादा प्रतिष्ठान  या युवकांच्या ग्रुपने सामान्य तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाहीत अशांना संचारबंदीत धान्याचे किट वाटप केले आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू पवार व रिधी अलविटा फाऊंडेशन यांच्यावतीने घाटकोपर येथील एम.जी.रोड येथे नागरिकांना धान्याचे किट वाटप करण्यात आले.

बुधवार, २७ मे, २०२०

आदर्श वार्ताहर -"समाज संवाद"

वृत्तपत्रसृष्टीला विशेष आर्थिक  
पॅकेजची  गरज 

देशात लॉक डाऊन चा चौथा टप्पा सुरू आहे. लॉक डाऊन सुरू होऊन आता साठ पेक्षाही जास्त दिवस उलटून गेले आहेत. लॉक डाऊनमुळे देशातील लघु उद्योगांना मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे ते वृत्तपत्रांना. लॉक डाऊनमुळे वृत्तपत्रांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  लॉक डाऊनमुळे वृत्तपत्र घरोघरी पोहचण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. पुण्यामुंबई सारख्या मोठ्या शहरात घरपोच वृत्तपत्रे देण्यास अजूनही परवानगी मिळाली नाही. स्टॉलवरून वृत्तपत्र खरेदी करण्यास वाचक टाळाटाळ करीत आहे. कोरोनाच्या भीतीने वाचक वृत्तपत्र विकत घेण्यास धजावत नाही त्यामुळे वृत्तपत्रांचा खप खूप कमी झाला आहे.  लॉक डाऊनच्या काळात शासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहिराती, इतर व्यावसायिक जाहिराती बंद झाल्या आहेत. त्यामुळे वृत्तपत्रांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. आर्थिकदृष्ट्या वृत्तपत्रांची मोठी कोंडी झालेली आहे. त्यात छापखान्यातील कागद आणि शाईवर जीएसटी आकारण्यात येत असल्याने त्याचा मोठा फटका वृत्तपत्रसृष्टीला बसलेला आहे. जाहिराती बंद झाल्याने वृत्तपत्रांचा आर्थिक कणाच मोडला आहे.  स्वतःचे आस्तित टिकवण्यासाठी काही  वृत्तपत्रांनी आपल्या जिल्हावार आवृत्या बंद केल्या आहेत. सर्वच वृत्तपत्रांनी पानांची संख्या कमी केली आहे. कोरोनाच्या या महासंकटात मोठे वृत्तपत्रे कसेबसे तग धरून तरी आहेत पण क वर्ग वृत्तपत्रांचे मात्र अस्तित्वच पणाला लागले आहे. क वर्ग वृत्तपत्रांमध्ये जिल्हा दैनिकांचा समावेश होतो. हे वृत्तपत्रे शेवटच्या घटका मोजत आहेत. काही क वर्ग वृत्तपत्रांनी तर आपली छापील आवृत्ती केंव्हाच बंद केल्या आहेत. छोट्या वृत्तपत्रांचा आवाका जरी छोटा असला तरी या वृत्तपत्रांनीच कोरोना काळात जनजागृतीचे मोठे काम केले आहे.  वृत्तपत्र हा  लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. जर वृत्तपत्रांचे आस्तिवच धोक्यात आले तर लोकशाहीसाठी ती धोक्याची घंटा असेल. लोकशाही वाचवायची असेल तर वृत्तपत्रे वाचवावेच लागेल. वृत्तपत्रांचे आस्तित टिकवायचे असेल तर वृत्तपत्रांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे लागेल त्यासाठी सरकारने वृत्तपत्रसृष्टीला विशेष आर्थिक पॅकेज घोषित करावे तसेच कागद, शाई यावरील जीएसटी रद्द करावी. 

-श्याम बसप्पा ठाणेदार 
दौंड, जिल्हा पुणे 

आदर्श वार्ताहर -"समाज -संवाद "

कोरोनासह जगायला शिका
जागतिक महामारीचा वाहक म्‍हणून संबोधला जाणारा कोरोना विषाणू आज सर्वत्र सर्वदुर पसरलेला आहे. सध्‍याची एकंदरीत परिस्‍थीती पाहता येत्‍या काही काळात तरी हा विषाणू संपूर्णपणे मानव जातीतून निघुन जाणे दुरापास्‍त झाले आहे. सरकारने लागू केलेला लॉकडाऊन हा काही कायमस्‍वरुपी पर्याय होऊ शकत नाही. सर्व व्‍यवहार, शाळा मोठया कालावधीकरीता बंद ठेवणे शिक्षण व अर्थव्‍यवस्‍थेसाठी घातक आहे. कधी ना कधी हे सर्व व्‍यवहार पूर्ववत करावेच लागणार आहेत. त्‍यावेळीदेखील कोरोनाचा धोका आपल्‍यामध्‍ये असणार आहे. त्‍यामुळे कोरोनामुक्‍त देश किंवा राज्‍य येत्‍या काही काळात तरी शक्‍य नाही. म्‍हणूनच कोरोनासह जनजिवन लवकरच सुरु होणार आहे. त्‍यावेळी आपल्‍याला सध्‍या आपण घेत असलेली प्रतिबंधात्‍मक काळजी पुढेदेखील प्रकर्षाने घ्‍यावीच लागणार आहे. मास्‍क, सॅनिटाझर यांसह सोशल डिस्‍टंसिंगचा वापर यापुढेदेखील करणे आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने अनिवार्य आहे. स्‍वच्‍छता हा आपल्‍या जिवनाचा अविभाज्‍य भाग बनायला हवा. कोरोनाच्‍या सहवासातील जिवन धोकादायक असले तरी आवश्‍यक दक्षता घेतली तर ते जिवघेणे ठरत नाही हे एव्‍हाना सिध्‍द झाले आहे. तसेच या आजारावर लवकरच लसदेखील उपलब्‍ध होईल ज्‍यायोगे प्रादुर्भावाचा धोका कमी होणार नाही. मात्र तोवर तरी आपल्‍याला प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांव्‍दारे दैनंदिन जिवन कोरोनाच्‍या सहवासासह व्‍यतीत करावे लागणार आहे एव्‍हढे नक्‍की.

-वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई       

आदर्श वार्ताहर -"समाज -संवाद "

   फडणवीसाना महाराष्ट्राची चिंता ?

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता सरकार अनेक उपाययोजना करूनही तो आटोक्यात येत नाही हे दुःखदायक आहे.पण याही परिस्थितीत विरोधी पक्ष भाजप महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा येनकेन प्रयत्न करीत आहे .उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून ही प्रयत्न झाले होते पण आता हे सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरले असून शेतकरी,मजूर आणि बारा बलुतेदार याची बाजू घेऊन फडणवीस आणि त्याची टीम राज्यपालांना भेटायला गेली होती.केंद्राचे पॅकेज कागदावरच असताना महाराष्ट्र सरकारने केंद्राप्रमाणे पॅकेज जाहीर करावे अशी विचित्र मागणीही फडणवीसांनी केली आहे.वास्तविक सरकार जर अपयशी असेल तर जनमानसात आंदोलने करून , टीका करून लक्ष वेधने हे विरोधी  पक्षाचे काम असू शकते पण त्यासाठी उठसुठ राज्यपालांना भेटणे योग्य नाही.महाराष्ट्रातून निवडून येऊनही काही दिवसांपूर्वी याच फडणवीस आणि त्यांच्या टीमने राजकीय द्वेषातून आपला निधी सीएम फंडात जमा न करता पीएम फंडात जमा केला त्यावेळी त्यांना महाराष्ट्राची चिंता नव्हती मग आताच यांना महाराष्ट्र बचावचा नारा देण्याचे का सुचले ? त्यामुळे फडणवीसाची ही महाराष्ट्राबद्दलची चिंता किती तकलादू आहे हे जनता जाणून आहे.खरेतर फडणवीसांनी महाराष्ट्राची चिंता करण्याचा हक्क केव्हाच गमावला आहे.

-अरुण पां. खटावकर
लालबाग ४०० ०१२

आदर्श वार्ताहर -"समाज -संवाद "


स्वागतार्ह आणि अभिनंदनीय

लाखोंच्या संख्येने आबाल वृद्धासह वर्षानुवर्ष शांत, शिस्तबद्ध, भक्तिभावाने तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला जाणारी वारकर्‍यांची पायवारी आणि नेत्रदीपक पवित्र पालखी सोहळा हे महाराष्ट्राचे एक पारंपरिक वैभव, शान परंतु यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, प्राप्त परिस्थिति ध्यानी घेऊन पालखी सोहळ्याचे आयोजन न करता केवळ मानकर्‍यामार्फत संतांच्या पादुका कुठेही न थांबवता वाहनातून तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे घेऊन जाण्याचा प्रमुख अशा चार वारकरी संस्थांनी घेतलेला निर्णय वाचनात आला. या चार संस्थांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आणि अभिनंदनिय आहेच, अनुकरणीय सुद्धा आहे. आपल्या मुळे दुसर्‍याला त्रास, वेदना, दुख होऊ नये ही शिकवण माऊलीने, संतांनी दिली आणि तीच परंपरा वारकरी संप्रदायाने सुरू ठेवलीय शिवाय या निर्णयाने परंपरागत पादुका वारीची प्रथा सुद्धा चालू राहील. तमाम वारकरी बांधवाना मानाचा मुजरा.


-विश्वनाथ पंडित
जिजामाता मार्ग, ठाणे 

"मुख्यमंत्री ठाकरे यांचे 'कोविड योद्धांना' भावनिक पत्र....."


मुंबई प्रतिनिधी - (प्राजक्ता अरुण चव्हाण)

  जगात, भारतात, महाराष्ट्रात वाढत चाललेला कोरोना कोविड - १९ ची संख्या पाहता अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. या कोरोना कोविड - १९ च्या युद्धात उतरलेले आपले सैनिक यांचे आभार स्वतः हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्तिगत पत्राद्वारे लिहून मानले आहे. 
  परिचारिका, फार्मासिस्ट, डॉक्टर, सामान्य स्वंयसेवक, सामाजिक कार्यकर्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, पॅरामेडिक, इतर वैद्यकीय व्यावसायिक, माहिती तंत्रज्ञानक्षेत्र, शिक्षक, संरक्षण सेवा, सुरक्षा रक्षक, सैन्य वैद्यकीय संस्थेतील लोक अशा विविध क्षेत्रातून मुंबईसह महाराष्ट्रात २१ हजार ७५२  लोकांनी "कोविड योद्धे" होण्यासाठी अर्ज केलेले आहेत. यात वैद्यकीय क्षेत्रातील योद्ध्यांची संख्या १२ हजार १०३ आहे तर इतर क्षेत्रातील ९ हजार ६४९. तसेच ३ हजार ७१६ कोविड योद्ध्यांनी रेड झोनमध्ये काम करण्याची तयारी सुद्धा दर्शविली आहे.
  महाराष्ट्रात कोविड योद्धा साठी प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये ३ हजार ७६६ अर्ज मुंबईसाठी आहेत. या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी 'प्रिय कोविड योद्धा' म्हणून केलेला आहे. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अर्जांची संख्या १ हजार ७८५ आहे. तर इतर क्षेत्रासाठी १ हजार ९८१ अर्ज आले आहेत. मुंबईमध्ये उपचारासाठी ज्या जम्बो सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. त्यात काम करण्यासाठी तयारी दर्शविलेल्या सर्व 'कोविड योद्धांना' बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नियुक्तीपत्र देण्याची कार्यवाही सुद्धा सुरु आहे. 
  आपणास व्यक्तिगत पत्र लिहताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी छाती अभिमानाने फुलून गेली आहे. हीच आपल्या महाराष्ट्राची व मराठी मातीची महान परंपरा. संकटकाळात तो मागे हटत नाही. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याप्रमाणे कणखर होतो. आज आपण कोरोनाच्या भीषण संकटाशी युद्ध करत आहोत. हे युद्ध साधे नाही. या युद्ध संकटात एक 'सैनिक' बनून आपण 'कोविड योद्धा' म्हणून मैदानात उतरला आहात. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झाला आहात. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले मत या पत्रात व्यक्त केले आहेत. 
  त्यावर त्यांनी हे ही स्पष्ट केले की, हे युद्ध सुद्धा सीमेवरील सैनिकांप्रमाणे लढावे लागेल. महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक जणू आज एक सैनिक बनुनच संकटाचा मुकाबला करताना दिसून येत आहे. आपणासारखे 'कोविड योद्धा' आता युद्धात उतरल्याने मला मुख्यमंत्री म्हणून मोठे बळ मिळाले आहे. ही एक प्रकारे देश आणि देवपूजाच आहे. हीच आपली संस्कृती आहे. शस्त्रांपेक्षा ही मोहीम आपल्याला सेवेने जिंकायची आहे. थोडक्यात सेवा हेच आपले शस्त्र राहील. हा महाराष्ट्र, महाराष्ट्रीय जनता आपल्या रक्ताची, नात्याचीच आहे. महाराष्ट्राच्या हाकेला प्रतिसाद देत आपण पराक्रमाच्या परंपरेस जपत आहात. आपले आभार तरी कसे मानावेत? ही सेवा महाराष्ट्राच्या व शिवरायांच्या चरणी रुजू झाल्याशिवाय राहणार नाही.
  अशा स्वरूपात 'कोविड योद्धांना' भावनिक पत्र लिहून त्यांचे आभार मानून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले विचार ही मांडले आहेत. हे पत्र मेलद्वारे पाठविण्यात आले आहे.

मीरा-भाईंदर शहरात 'कोरोना केअर सेंटर' व आरोग्य सुविधेसाठी १५ कोटी मंजूर ; आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तात्काळ मान्य , मीरा भाईंदर पालिकेत स्वतंत्र आयएएस (IAS) ऑफिसर येणार


भाईंदर / प्रतिनिधी 

मीरा-भाईंदर शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पावसाळ्यापूर्वी मीरा भाईंदर शहरात 'कोविड १९ हॉस्पिटल' / 'कोरोना केअर सेंटर' तयार करणे तसेच शहरात आरोग्य सुविधेत वाढ करण्याची शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेली मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्य केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख , मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सुचनेनुसार , मीरा भाईंदर शहरात हे कोविड हॉस्पिटल म्हणजेच केअर सेंटर उभारणे व आरोग्य सुविधा निर्माण करणे यासाठी पहिल्या टप्प्यात १५ कोटींचा निधी राज्य सरकारने तात्काळ मंजूर केला आहे , अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी आज दिली. 

   मुंबई आणि ठाण्याला लागून असलेल्या मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता पावसाळ्याचे जून , जुलै हे महिने 'कोरोना'चे सर्वाधिक धोकादायक महिने असतील असे सांगितले जात आहे. आताच कोरोना बाधितांची वाढलेली संख्या पाहता मोठ्या प्रमाणात मीरा भाईंदर मध्ये आरोग्य सुविधेत वाढ करण्याची गरज आहे , याकडे सरनाईक यांनी सरकारचे लक्ष वेधले होते. 
     मीरा भाईंदर शहरात सध्या वाढणारे रुग्ण व जून - जुलै महिन्यातील 'कोरोना'चा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य सरकारने मीरा भाईंदर शहरात आरोग्य सुविधा वाढविण्याचे आदेश पालिकेला द्यावेत. तसेच मुंबईत 'एमएमआरडीए' ने ज्या पद्धतीने मोठी हॉस्पिटल मैदानात तयार केली आहेत त्याचधर्तीवर मीरा भाईंदर मध्ये  'कोरोना केअर सेंटर' म्हणजेच कोरोना काळजी केंद्र तात्काळ सुरु करण्यात यावे , अशी विनंतीही सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती.  'कोरोना काळजी केंद्र' या माध्यमातून आणखी १ हजार अतिरिक्त खाटा , आयसीयू कक्ष , व्हेंटिलेटर , पुरेसा औषध साठा, आरोग्य यंत्रणा अशी पुरेशी आरोग्य व्यवस्था मीरा भाईंदर मध्ये केली जावी अशी विनंती सरनाईक यांनी केली होती. आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर सरनाईक यांची मागणी मान्य झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ दखल घेत कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. 

    आराखडे बनविण्याचे आदेश

 'कोरोना केअर सेंटर' बनविण्यासाठी मीरा भाईंदर शहरात योग्य अशी जागा निश्चित करून त्यासाठीचा आराखडा बनवून तो आराखडा तात्काळ राज्य सरकारला मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचना कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. 

पावसाळा तोंडावर आहे. आरोग्य सुविधा वाढवायचे काम पुढील १५-२० दिवसात पूर्ण करावे लागेल. त्यामुळे शहरात नव्या आरोग्य सुविधा बनविताना त्या ठिकाणी चिखल होणार नाही किंवा पावसामुळे येणाऱ्या रुग्णांना त्रास होणार नाही या सर्व गोष्टींचा विचार करूनच आरोग्य सुविधा निर्माण करण्याचा निर्णय होणार आहे. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. 

 मीरा भाईंदरसाठी आणखी एक आयएएस (IAS)     ऑफिसर येणार !

मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाच्या मदतीला व फक्त 'कोरोना' उपाययोजनांचे कामकाज पाहण्यासाठी एक 'आयएएस' ऑफिसर दिला जावा , अशी मागणी सरनाईक यांनी केली होती. ही मागणीही मान्य झाली असून लवकरच मीरा भाईंदर महापालिकेत एक आयएएस ऑफिसर राज्य सरकारकडून नियुक्त केला जाणार आहे. हा आयएएस (IAS)ऑफिसर फक्त मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात 'कोरोना' नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजनाचे काम करेल , अशी माहिती सरनाईक यांनी दिली. 


   सरकार अजून मदत करेल - सरनाईक

मुंबई व आसपासच्या शहरात कोरोना बाबत ज्या उपाययोजना होत आहेत त्याच्या समन्वयाचे काम राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे हे सरकारकडून पाहत आहेत. त्यांच्याशी आमदार सरनाईक यांनी सविस्तर चर्चा केली असून मीरा भाईंदर शहरात कोणकोणत्या आरोग्य सुविधा वाढवायच्या याबाबत दोघात चर्चा झाली आहे.  पहिल्या टप्प्यात मीरा भाईंदरच्या आरोग्य सुविधेसाठी सरकारने १५ कोटी मंजूर केले आहेत. गरज पडली तर राज्य सरकार अजूनही मदत करेल , असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.  


कोकणभवन बेलापूर येथील सहकारी संस्था निबंधकाची कार्यालये बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत स्थलांतरीत करा - सहकारी संस्थाधारकाची व सभासदांची मागणी.

          
     मुंबई दि. ( प्रतिनिधी) 
         नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत सीबीडी  बेलापूर कोकण भवन येथे असलेली सहकारी संस्था निबंध काची कार्यालय बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत स्थलातरीत करण्याची मुंबई पूर्व उपनगरातील सहकारी संस्थाधारक व सभासदाच्या  वतीने सहकारातील निष्ठावान  कार्यकर्ते  व गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे मागणी केली आहे.                                             
     यासंदर्भात अधिक माहिती अशी की बृहन्मुंबई महानगरपालिकेतील एल, एम, एन व एस विभाग असलेल्या कुर्ला, चेंबूर,मानखुर्द ,घाटकोपर विद्याविहार व विक्रोळी कांजूर भांडूप भागातील सहकारी गृहनिर्माण,सहकारी पंतसंसथा व सेवा सहकारी संस्थाची प्रशासकीय जिल्हा निबंधक,व उपनिबंधक याची कार्यलये बृहन्मुंबईमहानगरपालिके हद्दीत असायला हवी  होती तर ती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दी बाहेर कोकण भवन बेलापूर येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत 1981 पासून कार्यरत आहेत.
     सहकारी क्षेत्र हाच देशाचा त्याच बरोबर सर्व सामान्य सभासदाचा आर्थिक कणा असून देश अधिक बलवान होण्यासाठी सहकार क्षेत्रा खेरीज इतर  साधन नाही आणि हेच कार्य सहकारी पतसंस्थाच्या माध्यमातून सुरु आहे. सहकारी पतसंस्था  टिकल्या तर मोठमोठ्या बँका  टिकतील व सर्व सामान्य सभासद व सहकारी संस्था चालकही जिवंत राहील. यासाठी महाविकास आघाडी सरकारने घाटकोपर, विक्रोळी, कांजूर, भांडुप, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द  येथे राहणाऱ्या  सर्व सहकारी संस्थाच्या सभासदाना इतर विभागाच्या तुलनेत दुजाभाव झालेला आहे. त्यामुळे मुंबईच्या पूर्व उपनगरातील लाखो सभासदाना मानसिक व आर्थिक मोठ्या प्रमाणात   त्रास सहन करावा लागत  आहे.
    इतर विभागाचे सहकारी निबंधकाचे कार्यालय  बृहन्मुंबईतच आहेत . त्याप्रमाणे  एम,  एन,  एल,  एस विभागाचे सहकारी निबंधकाचे कार्यालय  मुंबईच्या हद्दीत स्थलांतरीत करून अनेक वर्षा पासून अन्याय सहन करणाऱ्या  सहकारी संस्थाच्या संस्था चालकांना सहकार चळवळीची जाणीव असणाऱ्या  महाविकास आघाडी सरकारने  न्याय मिळवून दयावा व सहकारी संस्था निबंध  कार्यालये  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत  त्वरीत सुरू करावेत  अशी मागणी संस्था चालकांनी केली आहे.

कांजुरमार्ग-भांडुप पूर्व याठिकाणी भाजपकडून नागरिकांना होमिओपॅथी गोळ्यांचे वितरण मुंबई



मुंबई -(विशेष प्रतिनिधी )

  सध्या कोरोनाने महाराष्ट्रासह संपूर्ण मुंबई परिसरात हाहाकार उडवून दिला आहे. कोरोनासारख्या या महामारीवर वर्तमान स्थितीत कायमस्वरूपी औषधं वा लस उपलब्ध नाही. परंतु रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी व कोरोनाला लांब ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात अर्सेनिक अल्बम 30 या  होमिओपॅथी गोळ्या वाटप सुरु आहे. या कार्याचा भाग म्हणून सन्माननीय  खासदार  मनोज  कोटक  यांच्या नेतृत्वा  खाली आणि माजी  आमदार मंगेश  सांगळे व  जिल्हा उपाध्यक्ष  रवींद्र  कदम  यांच्या  मार्फत कांजुरमार्ग मार्ग आणि भांडुप (पूर्व )येथे भाजप  वॉर्ड  117 अंतर्गत   नागरिकांच्या आरोग्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने तसेच कोरोना  आजारावर  प्रतिबंधक  उपाय योजना म्हणून   अर्सेनिक  अल्बम  30 या  औषधाचे   कांजूरमार्ग -भांडुप मधील  20, 000 कुटुंबामध्ये  मोफत  वितरण  करण्यात  येत  आहे. 

  तेव्हा हे औषध  मिळवण्यासाठी भाजप पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वीरेंद्र  महाडिक (वॉर्ड अध्यक्ष  117)यांनी केले आहे.


भाजप व सोबती फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबीर यशस्वीरीत्या संपन्न




मुंबई -(विशेष प्रतिनिधी )

    कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कांजूरमार्ग(पुर्व ) येथील भाजपा ने पुढाकार घेऊन सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप आजारावर उपचार करून त्यावर मोफत औषधे देण्यासाठी ठिकठिकाणी मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहेत. त्यानुसार मा. खासदार मनोज कोटक यांच्या सौजन्याने व श्री.संजय नलावडे, भाजप नेते यांच्या नेतृत्वाखाली वॉर्ड 117 मधील शिवशक्ती गणेशोत्सव मंडळ, प्रेमनगर याठिकाणी  "मोफत आरोग्य शिबीर - डॉक्टर आपल्या दारी" ह्या मोहीमे अंतर्गत आरोग्य शिबीर सोमवार दिनांक २५ मे  रोजी यशस्वीरित्या पार पडले.
       या शिबिरास विभागातील रहिवाशांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.सदर शिबीरा मध्ये  लहानांपासून, तरुण व प्रौढ अशा एकूण ३५३ जणांची तपासणी  करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. 
    प्रेम नगर येथील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवशक्ती मित्र मंडळाचे कार्यकर्ते विपूल शिंदे,वैभव देवरुखकर,सचिन कोमुर्लेकर,रामचंद्र भर्तृ,गणेश सोनावणे,दिनेशचव्हाण,सखाराम चव्हाण यांनी सहकार्य केले.
     तसेच भारतीय जनता पार्टीचे महेश चव्हाण, दत्ता परब,नितीन चव्हाण,श्रेयस आजगेकर,राजेंद्र राजम, अनिल नार्वेकर राजू आंब्रे, विल्सन केनी, संतोष शिंदे,राज विचारे,दिनेश कदम,मिलिंद आगवणे,
बबन साळवी या  सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
सोबती फौंडेशन व भाजप च्या वतीने शेवटी  सर्व पदाधिकारी ,कार्यकर्त्यांचे व मंडळाचे  आभार मानण्यात आले. 


राष्ट्रवादीकडून कांजूरमार्ग मधील जनतेला होमिओपॅथी औषध वाटप




मुंबई - (पंकजकुमार पाटील )

   सद्यस्थितीत कोरोनासारख्या महामारीने देशासह, महाराष्ट्र आणि मुख्यत्वे मुंबईत संपूर्ण जनजीवन भयभीत करून टाकले आहे. या आजारावर कुठलेही प्रभावी औषधं उपलब्ध नसल्याने इथे कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. 
   परंतु काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात ठिकठिकाणी  प्रतिकार क्षमता वाढवणाऱ्या अर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथी गोळ्यांचे वितरण सुरु आहे. 
     त्यानुसार कांजूरमार्ग पूर्वेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  ईशान्य मुंबई चे जिल्हा अध्यक्ष मा. धनंजय दादा पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मोबाई गावठाण पंचायत चे सरपंच जोसेफ डिमेलो व विभाग सरपंच रिगन सनी मेंडोझा यांच्या मार्फत होमिओपॅथी औषधाचे वाटप कांजूरमार्ग -भांडुप परिसरातील नागरिकांना करण्यात आले. 
     नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे राष्ट्रवादी पक्षाकडून कळवण्यात आले  आहे.

मंगळवार, २६ मे, २०२०

कायम स्वरूपी सुसज्ज व अत्याधुनिक हॉस्पिटलसाठी उरण सामाजिक संस्थेची मागणी ; JNPT च्या वर्धापन दिनी सोशल डीस्टन्सिंगचे नियम पाळत घर बैठे अनोखे आंदोलन !



 उरण : दि 26(विठ्ठल ममताबादे)

    स्वातंत्र्य काळा पासून उरण तालुका आरोग्य क्षेत्रात पिछाड़ीवर आहे. स्वातंत्र्य मिळून आज 60 वर्षाहुन अधिक वर्षे झाले तरीही उरण मधील नागरिकांना अजूनही आरोग्य सेवेच्या मूलभूत हक्क व अधिकार, सेवा सुविधा मिळालेले नाहीत. करोना सारख्या महाभयंकर रोगानेही उरण मध्ये प्रवेश केला आहे. मात्र उरणमध्ये  अत्याधुनिक व सुसज्ज असे एकही  शासकीय हॉस्पिटल नसल्याने उरण मधील नागरिकांना मुंबई, नवी मुंबई मध्ये  जाऊन योग्य ते उपचार करून  घ्यावे लागतात. मात्र हा उरण मधील जनतेच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार वर्षानुवर्षे चालूच आहे. तेंव्हा उरण मध्ये कायम स्वरूपी सुसज्ज व अत्याधुनिक हॉस्पिटल असावे अशी मागणी उरण सामाजिक संस्थेने शासनाकडे अनेक वेळा केली आहे. शासन दरबारी याचा अनेक वेळा पाठपुरावा केला मात्र शासनाने या समस्याकडे दूर्लक्षच केले. त्यामुळे उरणच्या नागरिकामध्ये शासनाच्या या उदासीन धोरण बाबत खूपच नाराजी पसरली आहे. या सर्व पार्श्वभुमीवर या महत्वाच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी JNPT च्या वर्धापन दिनीच म्हणजेच दि 26/5/2020 रोजी उरण सामाजिक संस्थेने केलेल्या आवाहनानुसार उरण मधील नागरिकांनी आपल्या घरातच बसून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत पोलिस प्रशासनाला सहकार्य करीत एक दिवसाचे अनोखे घर बैठे आंदोलन केले.

  उरण तालुक्यात JNPT हे आंतर राष्ट्रीय स्तराचे बंदर आहे. येथील CSR फंडचे करोड़ो रुपये इतर जिल्ह्यातील कामासाठी वापरले जाते. तेच फंड उरण तालुक्यातील सुसज्ज हॉस्पिटल बांधण्यासाठी वापरल्यास उरण मध्ये त्वरित सुसज्ज व अत्याधुनिक हॉस्पिटल उभे राहिल. मात्र याकडेही JNPT प्रशासन दुर्लक्ष करत आहे. उरण तालुक्यात JNPT बंदराकडे देशाच्या वेगवेगळ्या राज्यातुन दररोज हजारो कंटेनर येतात. सदर कंटेनरच्या ड्रायवर, क्लीनर पासून करोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उरण पनवेलच्या वेशीवरच ड्रायवर -क्लीनरची करोना तपासणी करावी, JNPT, ONGC,BPCL, CFS गोडावुन येथे बाहेरुन येणाऱ्या कर्मचा-यांची त्या त्या आस्थापनांच्या प्रवेश द्वारावरच व रोजच्या रोज करोना तपासणी करण्यात यावी. JNPT, ONGC, BPCL, CFS गोडावुन आदि कंपन्यांनी त्यांचा अखत्यारित असलेला CSR फंडाचा उपयोग करून उरण तालुक्यात अद्यायावत करोना केअर सेंटर आणि विलगीकरण कक्ष उभारावे. या सर्व कंपन्यांनी उरण तालुक्यातील रुग्णालयांना एम्बुलेन्स,पीपीई कीट, वेंटिलेटर, मास्क इत्यादि करोना संबंधित साहित्य फ्री मध्ये त्वरित पुरवावित या मागणी सह उरण तालुक्यात कायम स्वरूपी सुसज्ज व अत्याधुनिक असे हॉस्पिटल उभारण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटिल यांनी दिली. सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील यांनी उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला उरण मध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.या घर बैठे आंदोलनामुळे शासनाला आता तरी  जाग येईल अशी आशा उरण मधील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

आदर्श वार्ताहर -"समाज -संवाद"

" इकडे रोम जळतोय आणि तिकडे निरो फिडल वाजवतोय "

 मुंबईतील सरकारी रुग्णालयांची संख्या पाहिली आणि मनात एक विचार आला , अरे बापरे ! एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या मुंबईत फक्त १४ रूग्णालय आहेत . 
केइएम रूग्णालय (१९२६ )  लोकमान्य टिळक सायन रुग्णालय ( १९४७ )जे जे हॉस्पिटल (१८४५)नायर हॉस्पिटल ( १९२० )कस्तुरबा हॉस्पिटल  ( १९४५ )कुपर हॉस्पिटल ( १९६९ )टाटा हॉस्पिटल ( १९४१ )          गोकुळदास तेज. हॉस्पिटल  (१८७५ )  सैफी हॉस्पिटल   (१९४८ )   मुंबई डेंटल हॉस्पिटल (१९२३)   सेट वी शी गांधी  (१९५८)  भाटिया हॉस्पिटल(१९३२)भगवती हॉस्पिटल (१९६२)राजावाडी हॉस्पिटल (१९५६ )   या रूग्णालयात जनतेला वैद्यकीय उपचार घेण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत .   आता सध्याच्या कोरोना संकटाच्या परिस्थितीत प्रश्न असा निर्माण होतो की राजकारणी नेते मंडळींनी स्वातंत्र्यानंतर मुंबई मध्ये किती नवीन हॉस्पिटल बांधली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईची अवस्था अतिशय बिकट होत चालली आहे , या समस्येचा सामना करण्याची जबाबदारी कोणाची आहे .
१९४७ ते २०२९ अशा  ७३ वर्षाच्या कालावधीत विकास या शब्दाची राजकीय परिभाषा  नेमकी काय होती याचे मूल्यमापन करणे गरजेचे होते , आणि आज वर्तमानात हे होणे तेवढेच गरजेचे आहे. सात बेटांवर बसलेल्या आणि देशाची औद्योगिक राजधानी असलेल्या मुंबईला शहराची लोकसंख्या १९८५ साला नंतर झपाट्याने वाढली. १९४७ साली या शहराची लोकसंख्या ३०४०२७० इतकी होती आणि आज २०२० मध्ये २०४११०००  इतकी झालीआहे .अन्न, वस्त्र, निवारा यांशिवाय वैद्यकीय सुविधा ही देखील प्राथमिक गरज आहे, हे ब्रिटिश कालीन लोकांना आणि त्यावेळी अस्तिस्त्वात असलेल्या राजकीय नेत्यांना अवगत होते, परंतु हे ज्ञान १९४७  नंतर लोप पावत गेले. फक्त सत्तेसाठी **राजकारण** ही प्राथमिक गरज नव्याने निर्माण झाली आणि ती वैद्यकीय गरजेपेक्षा प्रचंड मोठी झाली आणि यातच वैद्यकीय सेवेचा विश्वासघात झाला. दिवस रात्र सत्तेच्या खुर्ची चा एकच ध्यास राजकीय नेत्यांना असतो . स्वातंत्र्याच्या ७३ वर्षात आपण केईएम, जेजे, सायन हॉस्पिटलांसारखे एकही हॉस्पिटल उभारू शकलो नाही, हे राजकीय अपयश आहे, याबद्दल काहीच दुमत नाही. आजच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या राजकीय नेत्यांनी कधीही साधी खंत तरी व्यक्त केली आहे का ?आजार वाढले आहेत पण वैद्यकीय उपचार गरीबांना , मध्यम वर्गीयांना  परवडणारे नाहीत , पणअतिशय गंभीर आजारात देशातील एकही नेता मुंबईत वैद्यकीय उपचार घेत नाही . तर ही राजकीय नेते मंडळी अमेरीका, ब्रिटन, जर्मनी मध्ये वैद्यकीय उपचारा साठी जातात.पण जनतेचे काय ? मुंबईची ही अवस्था असेल तर ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेचे तीन तेरा वाजले आहेत, परंतु याबाबत बोलायला कोणीही तयार नाही.एकीकडे कोरोनाच्या संकटात जनतेला हाल सोसावे लागत आहेत , आणि दुसरीकडे राजकीय नेते राजकारण करण्यात व्यस्त आहेत . सध्या जे काय चाललंय ते चुकीचे आहे . एकंदरीत काय तर  " इकडे रोम जळतोय आणि तिकडे निरो फिडल वाजवतोय " अशी परिस्थिती आहे ‌

-लक्ष्मण राजे
मीरा रोड पूर्व

शिंपी समाजाला आर्थिक पॅकेज दयावे



मुंबई -(गणेश हिरवे)

आज वैश्विक कोरोना महामारीमुळे देशातील उद्योगधंदे व कारखाने बंद पडले आहेत. लाॅकडाउनचा फार मोठा तडाखा बारा बलुतेदार व अलुतेदार घटकांतील लहान-लहान व्यावसायिकांना बसला आहे.रेडिमेड गारमेंन्ट्समुळे अगोदरच टेलरिंग व्यवसायावर अवकळा आली आहे. लगीनसराईच्या काळात वर्षभराची तजवीज करुन ठेवणाऱ्या शिंपी समाजबांधव व्यावसायिक व कारागीरांवर ऐन लगीनसराईच्या काळामध्ये फार मोठे संकट कोसळले आहे. नुकतेच केंद्र सरकारने याबाबत उपाययोजना म्हणून २० लाख कोटीच्या पॅकेजमध्ये MSME सेक्टरसाठी  ३ लाख कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले.पारंपारिक चरितार्थाचे 'शिवणकाम' हे एकमेव साधन असलेल्या शिंपी समाजातील बांधवांवर उपासमारीची वेळ येत आहे व साधारण खेडेगावातील हा वर्ग सध्या लग्नसराई बंद असल्याने याला बळी पडलेला दिसून येत आहे व यासाठी या समाजाला मदत व्हावी व आर्थिक संकटातून ते बाहेर पडावे यासाठी नुकतेच अखिल भारतीय शिंपी समाज कोकण विभागीय अध्यक्ष रवींद्र कालेकर व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आर्थिक मदतीचे निवेदन मुख्यमंत्री व तहसीलदार व लोकप्रतिनिधी यांना देण्यात आले.



प्रसिद्ध अभिनेते, साहित्यिक, कवी आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार सोहळा संपन्न..!

मुंबई-दादर (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)  आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सो...